नाते जपलेले जिवापाड... भाग 2

हास्यविनोद करत जेवण झालं, नानांना तर काही सुचतच नव्हतं, शुभम आणि नानांची मस्त जोडी जमली होती, उद्या त्यात परी सुद्धा सामील होणार होती


नाते जपलेले जिवापाड... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.......

दोन-तीन दिवस धावपळीत गेले, हे आलं नाही ते आलं नाही, हे नीट ठेवा ते नीट ठेवा, साफसफाई, असं सगळं सुरू होतं, कार्यक्रमाला अगदी दोनच दिवस बाकी होते, उद्या सायली येणार होती, आज सतीश येणार होता,

सतीश सुनबाई प्रिया आणि त्यांचा मुलगा शुभम येणार होते, आशाने स्वयंपाक करून ठेवला होता, सतीशला काय काय आवडतं ती त्याची आवड डोळ्यासमोर ठेवून माईंनी आशाला सगळ्या सूचना दिल्या होत्या, उद्या त्या सायलीचा आवडता स्वयंपाक करणार होत्या,

नानांची आज सकाळपासून गडबड चालली होती, दोन तीन वेळाच त्यांनी पुढच्या खोली आवरली होती, नर्वस झाले होते ते, सकाळचा चहा नाष्टा हि नीट घेतला नव्हता त्यांनी, कितीतरी वेळा माईंनी सांगितलं की आहो जरा गडबड कमी करा, ते त्यांच्या वेळेतच येणार आहेत, पण नानांना दम नव्हता, तीन चार वेळा तरी ते गेट जवळ जाऊन वापस आले होते,

आणि गेट जवळ गाडी थांबली, शुभम पळत आला, आल्या आल्या आजी-आजोबांना भेटला, त्यांच्यासाठी येताना फुलांचा गुच्छ आणला होता, तो दिला पाया पडला, किती समजूतदार झाला नाही, सतीश आणि प्रिया गाडीतुन बॅगा काढत होते, नाना मदतीला धावले, बॅगा आत घेतल्या

सतीश येऊन माईंना भेटला, नाना सुनबाईंना घेऊन आत आले, दोघांना भेटले, सतीश प्रिया त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, तशी त्यांची नेहमी भेट होत होती पण यावेळचा प्रोग्राम वेगळा होता, आशाने सगळ्यांचा चहा ठेवला,

सतीश आणि प्रिया आवरायला रूम मध्ये गेले, दहा मिनिटांनी ते बाहेर येऊन बसले, प्रिया चहा द्यायला उठली तसं माईंनी तिला बसवलं,

"या सुट्टीत काहीही काम करायचं नाही, मी ही करणार नाही, हे चार-पाच दिवस आपण खूप एन्जॉय करायचे आहेत, खूप गप्पा करायच्या आहेत,",. माई

"आली का सायली नाना",. सतीश

"हो तिच्या सासरी आहे ती, उद्या येणार आहे इकडे",.. नाना

"परवाची झाली का सगळी तयारी"?,. सतीश

"हो घरगुतीच कार्यक्रम आहे, फार मोठा नाही फक्त आपल्या सगळ्यांना मस्त एकत्र राहायचं आहे आणि खूप एन्जॉय करायचं आहे",.. माई

जेवणासाठी माई ताट घेत येत होत्या, प्रिया ही मदतीला आली,

" अरे वा आज सगळं सतीशच्या आवडीच दिसत आहे",.. प्रिया

"आणि तुझ्या आवडीची आहे बघ ही भरलेली भेंडी",.. माई

" तुम्हाला लक्षात होतं माई",.. प्रिया

" हो मग मी कशी विसरेल तुझी आवड",. माई

हास्यविनोद करत जेवण झालं, नानांना तर काही सुचतच नव्हतं, शुभम आणि नानांची मस्त जोडी जमली होती, उद्या त्यात परी सुद्धा सामील होणार होती, नाना आता चार-पाच दिवस कोणाशी बोलणार नव्हते, फक्त ते आणि नातवंड, अशा वेळी कोणी त्यांना डिस्टर्ब करायचे नाही, मजा घेऊ द्यायचे त्यांना , अशा वेळी एकदम लहान होऊन जायचे ते, मुलांसोबत खेळत राहायचे दिवसभर

तो संपूर्ण दिवस गप्पांमध्ये गेला, आशाला स्वयंपाकाला बोलावल्यामुळे विशेष काम नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी माई लवकरच उठल्या, आज सायली येणार होती, तिच्या आवडीचा स्वयंपाक करायचा होता, तिचा आग्रह असायचा की आई भाजी तूच कर, त्यामुळे आज त्या स्वतः भाजी करणार होत्या.

सतीश हि बहिणीला भेटायला खूप उत्सुक होता, जवळजवळ चार-पाच वर्षांनी भाऊ-बहीण भेटणार होते, लहानपणी खूप पटायचं त्या दोघांचं.

🎭 Series Post

View all