नाते जपलेले जिवापाड... भाग 1.. रीपोस्ट

आटपा हो तुम्ही आंघोळ करून घ्या आणि टेलर कडे जावून या, कपडे लवकर तयार कर म्हणा आणि माझी साडी पिको फॉल झाली का ते बघा


नाते जपलेले जिवापाड... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.......

नाना माई एक सुखी जोडपं, दोघ छान एकमेकांसोबत सुखी होते, हम दो हमारे दो... एक मुलगी एक मुलगा, छान चौकोन कुटुंब, आता या कुटुंबात अजून मेंबर्स आले होते तसे, मुल ही वेल सेटल, आता दोघे उरले होते घरात, एकमेकांची खूप छान काळजी द्यायचे नाना माई ..

येत्या आठवड्यात नाना माईंच्या लग्नाची पन्नासावी एनिवर्सरी होती, त्या निमित्ताने घरी पूजा होती, त्या नंतर छोटासा रिसेप्शन सारखा प्रोग्रॅम अरेंज केला होता, जवळच्या नातलगांना बोलवलं होत, नाना माईंचा मुलगा सतीश मुलगी सायली ही येणार होते घरी, सतीश नौकरी निम्मीत् परगावी राहत होता, सायली परदेशात राहत होती,

सतीश बऱ्याच वेळा नाना माईंना बोलत असे की आमच्याकडे राहायला या, पण होतय तोपर्यंत करू आम्ही अस सुरू होत नाना माईंच आणि हे वडिलोपार्जित घर त्यांना खूप प्रिय होतं बरेच वर्ष इथे राहिल्यामुळे कुठे जावंसं वाटत नव्हतं, मित्र-मैत्रिणींचा ग्रुप होता त्यांचा, इकडे खूप छान वेळ जात होता त्यांच्या , तसे वर्षात दोन वर्षात ते मुलांकडे जात असत, दोन वर्षापूर्वी परदेशात पण ट्रीप झाली त्यांची, एकंदरीत सगळं चांगलं चाललं होतं.

जसा कार्यक्रम जवळ येत होता नाना माई माईंचा उत्साह वाढत चालला होता.

सकाळी माई उठल्या नाना जागेवर नव्हते, कुठे गेले हे सकाळी, नाना चहा ठेवत होते,

"अहो मला का नाही उठवल",......माई ,

"पड ग जरा, तू ही दमते आता हल्ली",........ नाना ,

चहा घेवून दोघ बाहेर ओसरीत येवून बसले, समोरचे काका वॉकला जात होते,

"कुठे पर्यंत आली प्रोग्रामची तयारी",. काका

"सुरू आहे" ,.. नाना

"मुल येणार आहेत ना",. काका

" हो तर त्यांच्या शिवाय मजा नाही",. नाना

दूध वाला भैय्या आला त्याने अर्धा लिटर दूध दिल

"पुढच्या आठवड्यात दोन लिटर दूध हव आहे पनीर वगैरे ही लागेल",..... माई

" हो माई लक्ष्यात आहे माझ्या",.. भैय्या

"आटपा हो तुम्ही आंघोळ करून घ्या आणि टेलर कडे जावून या, कपडे लवकर तयार कर म्हणा आणि माझी साडी पिको फॉल झाली का ते बघा",.. माई

नाना आवरून आले

" अजून काही आणायचं आहे का"?,.. नाना

"नाही तुम्ही या लवकर, येताना बाजूच्या माळ्याला आपलं गार्डन साफ करायला सांगा, तो घरच जाळ काढेल का तेही विचारा",..माई

कामाला अगदी उत्साह आला होता.

सायलीचा फोन आला, तिकडे परदेशात रात्र होती, तीच आवरला होत सगळ......

" झाली का ग तयारी? उद्या निघताय ना तुम्ही"?.. माई

" हो उद्या निघतोय, दोन दिवसात लॅण्ड होवु नंतर सासरी एक दिवस, मग येवू कार्यक्रमाला",.. सायली

"नीट ये ग, खूप सामान आणु नको परी कडे लक्ष दे",..... माई

"हो आई किती काळजी करणार, नीट येवू आम्ही",.. समाधानाने माईने फोन ठेवून दिला

नाना सामान घेवून आले,

" कधी देणार ते तुमचा कुर्ता आणि माझी साडी ",. माई

" उद्या बोलले ते ",. नाना

"तुम्ही दम दिला ना त्यांना ",..माई

हो..हसत नाना आत गेले

दुपारी जेवण झाल,

" अजून फुल वाला का आला नाही? तो डेकोरेशन साठी घर बघायला येणार होता ना"?,..माई

" हो येईल ग तो, किती ती तुझी घाई प्रत्येक कामाची, जरा विश्रांती घे, नाहीतर आधी खूप दमशील आणि कार्यक्रमाच्या वेळी थकलेलं वाटेल तुला आणि एक दुसरे काम नाही झालं तरी चालण्यासारखं आहे, एवढ टेन्शन घेऊ नकोस",. नाना

नानांचे ही बरोबर आहे, माई दर वेळी उगीच दमत राहतात, त्यांना प्रत्येक काम परफेक्ट लागत आणि आता या वेळी दोघे मुले येत आहेत त्यामुळे तर काय करू आणि काय नको असं झालं आहे त्यांना, आशा रोज येते कामाला, तिची मदत घेऊन फराळाचे डबे भरून ठेवले होते आधीच, पुढच्या आठवड्याचा सगळ्या मेनू ठरवुन ठेवला होता , काय करायचे काय नाही ते सगळे आधीच ठरलं आहे, सुट्टी घ्यायची नाही असाही दम आशाला मिळाला होता.

🎭 Series Post

View all