नाते जपलेले जिवापाड

येत्या आठवड्यात नाना माईंच्या लग्नाचा 50 वी एनिवर्सरी होती, त्या निमित्ताने घरी पूजा त्या नंतर छोटासा रिसेप्शन सारखा प्रोग्रॅम अरेंज केला होता, जवळच्या नातलगांना बोलवलं होत, नाना माईंचा मुलगा सतीश मुलगी सायली ही येणार होते घरी,


नाना माई एक सुखी जोडपं, दोघ छान एकमेकांन सोबत सुखी होते, एक मुलगी एक मुलगा, मुल ही वेल सेटल, एकमेकांची खूप छान काळजी द्यायचे दोघं.....

येत्या आठवड्यात नाना माईंच्या लग्नाचा 50 वी एनिवर्सरी होती, त्या निमित्ताने घरी पूजा त्या नंतर छोटासा रिसेप्शन सारखा प्रोग्रॅम अरेंज केला होता, जवळच्या नातलगांना बोलवलं होत, नाना माईंचा मुलगा सतीश मुलगी सायली ही येणार होते घरी, सतीश नौकरी निम्मीत् परगावी राहत होता, सायली परदेशात राहत होती, सतीश बऱ्याच वेळा नाना माईंना बोलत असे की आमच्याकडे राहायला या, पण होतय तोपर्यंत करू आम्ही अस सुरू होत नाना माईंच आणि हे वडिलोपार्जित घर त्यांना खूप प्रिय होतं बरेच वर्ष इथे राहिल्यामुळे कुठे जावंसं वाटत नव्हतं, मित्र-मैत्रिणींचा ग्रुप होता त्यांचा इकडे, खूप छान वेळ जात होता त्यांच्या इकडे, तसे वर्षात एक दोनदा ते मुलाकडे जात असत, दोन वर्षापूर्वी परदेशात पण ट्रीप झाली त्यांची, एकंदरीत सगळं चांगलं चाललं होतं

जसा कार्यक्रम जवळ येत होता नाना माई माईंचा उत्साह वाढत चालला होता

सकाळी माई उठल्या नाना जागेवर नव्हते, कुठे गेले हे सकाळी, बघते तर नाना चहा ठेवत होते,

"अहो मला का नाही उठवल",......माई ,

"पड ग जरा, तू ही दमते आता हल्ली",........ नाना ,

चहा घेवून दोघ बाहेर ओसरीत येवून बसले, समोरचे काका वॉकला जात होते,

"कुठे पर्यंत आली प्रोग्रामची तयारी",...... काका

"सुरू आहे" ,........ नाना

"मुल येणार आहेत ना",...... काका

" हो तर त्यांच्या शिवाय मजा नाही",..... नाना

दूध वाला भैय्या आला त्याने अर्धा लिटर दूध दिल

"पुढच्या आठवड्यात दोन लिटर दूध हव आहे पनीर वगैरे ही लागेल",..... माई

" हो माई लक्ष्यात आहे माझ्या",...... भैय्या

"आटपा हो तुम्ही आंघोळ करून घ्या आणि टेलर कडे जावून या, कपडे लवकर तयार कर म्हणा आणि माझी साडी पिको फॉल झाली का ते बघा",...... माई

नाना आवरून आले

" अजून काही आणायचं आहे का"?,....... नाना

"नाही तुम्ही या लवकर, येताना बाजूच्या माळ्याला आपलं गार्डन साफ करायला सांगा, तो घरच जाळ काढेल का तेही विचारा",...... माई

कामाला अगदी उत्साह आला होता

मुलीचा फोन आला, तिकडे परदेशात रात्र होती, तीच आवरला होत सगळ......

" झाली का ग तयारी? उद्या निघताय ना तुम्ही"?...... माई

" हो उद्या निघतोय, दोन दिवसात लॅण्ड होवु नंतर सासरी एक दिवस, मग येवू कार्यक्रमाला",....... सायली

"नीट ये ग, खूप सामान आणु नको परी कडे लक्ष दे",..... माई

"हो आई किती काळजी करणार, नीट येवू आम्ही",....... समाधानाने माईने फोन ठेवून दिला

नाना सामान घेवून आले,

" कधी देणार ते तुमचा कुर्ता आणि माझी साडी ",...... माई

" उद्या बोलले ते ",..... नाना

"तुम्ही दम दिला ना त्यांना ",..... माई

हो....... हसत नाना आत गेले

दुपारी जेवण झाल,

" अजून फुल वाला का आला नाही? तो डेकोरेशन साठी घर बघायला येणार होता ना"?,..... माई

" हो येईल ग तो, किती ती तुझी घाई प्रत्येक कामाची, जरा विश्रांती घे, नाहीतर आधी खूप दमशील आणि कार्यक्रमाच्या वेळी थकलेलं वाटेल तुला आणि एक दुसरे काम नाही झालं तरी चालण्यासारखं आहे, एवढ टेन्शन घेऊ नकोस",........ नाना

नानांचे ही बरोबर आहे, माई दर वेळी उगीच दमत राहतात, त्यांना प्रत्येक काम परफेक्ट लागते आणि आता या वेळी दोघे मुले येत आहेत त्यामुळे तर काय करू आणि काय नको असं झालं आहे त्यांना, आशा रोज येते कामाला, तिची मदत घेऊन फराळाचे डबे भरून ठेवले आहेत आधीच, पुढच्या आठवड्याचा सगळ्या मेनू ठरवुन ठेवला आहे, काय करायचे काय नाही ते सगळे आधीच ठरलं आहे, सुट्टी घ्यायची नाही असाही दम आशाला मिळाला आहे

दोन-तीन दिवस धावपळीत गेले, हे आलं नाही ते आलं नाही, हे नीट ठेवा ते नीट ठेवा, साफसफाई, असं सगळं सुरू होतं, कार्यक्रमाला अगदी दोनच दिवस बाकी होते, उद्या सायली येणार होती, आज सतीश येणार होता,

सतीश सुनबाई प्रिया आणि त्यांचा मुलगा शुभम येणार होते, आशाने स्वयंपाक करून ठेवला होता, सतीश ला काय काय आवडतं ती त्याची आवड डोळ्यासमोर ठेवून माईंनी आशाला सगळ्या सूचना दिल्या होत्या, उद्या त्या सायलीचा आवडता स्वयंपाक करणार होत्या,

नानांची आज सकाळपासून गडबड चालली होती, दोन तीन वेळाच त्यांनी पुढच्या खोली आवरली होती, नर्वस झाले होते ते, सकाळचा चहा नाष्टा हि नीट घेतला नव्हता त्यांनी, कितीतरी वेळा माईंनी सांगितलं की आहो जरा गडबड कमी करा, ते त्यांच्या वेळेतच येणार आहेत, पण नानांना दम नव्हता, तीन चार वेळा तरी ते गेट जवळ जाऊन वापस आले होते,

आणि गेट जवळ गाडी थांबली, शुभम पळत आला, आल्या आल्या आजी-आजोबांना भेटला, त्यांच्यासाठी येताना फुलांचा गुच्छ आणला होता, तो दिला पाया पडला, किती समजूतदार झाला नाही, सतीश आणि प्रिया गाडीतुन बॅगा काढत होते, नाना मदतीला धावले, बॅगा आत घेतल्या

सतीश येऊन माईंना भेटला, नाना सुनबाईंना घेऊन आत आले, दोघांना भेटले, सतीश प्रिया त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, तशी त्यांची नेहमी भेट होत होती पण यावेळचा प्रोग्राम वेगळा होता, आशाने सगळ्यांचा चहा ठेवला,

सतीश आणि प्रिया आवरायला रूम मध्ये गेले, दहा मिनिटांनी ते बाहेर येऊन बसले, प्रिया चहा द्यायला उठली तसं माईंनी तिला बसवलं,

"या सुट्टीत काहीही काम करायचं नाही, मी ही करणार नाही, हे चार-पाच दिवस आपण खूप एन्जॉय करायचे आहेत, खूप गप्पा करायच्या आहेत,",....... माई

"आली का सायली नाना",..... सतीश

"हो तिच्या सासरी आहे ती, उद्या येणार आहे इकडे",...... नाना

"परवाची झाली का सगळी तयारी"?,..... सतीश

"हो घरगुतीच कार्यक्रम आहे, फार मोठा नाही फक्त आपल्या सगळ्यांना मस्त एकत्र राहायचं आहे आणि खूप एन्जॉय करायचं आहे",....... माई

जेवणासाठी माई ताट घेत येत होत्या, प्रिया ही मदतीला आली,

" अरे वा आज सगळं सतीश च्या आवडीच दिसत आहे",....... प्रिया

"आणि तुझ्या आवडीची आहे बघ ही भरलेली भेंडी",...... माई

" तुम्हाला लक्षात होतं माई",...... प्रिया

" हो मग मी कशी विसरेल तुझी आवड",....... माई

हास्यविनोद करत जेवण झालं, नानांना तर काही सुचतच नव्हतं, शुभम आणि नानांची मस्त जोडी जमली होती, उद्या त्यात परी सुद्धा सामील होणार होती, नाना आता चार-पाच दिवस कोणाशी बोलणार नव्हते, फक्त ते आणि नातवंड, अशा वेळी कोणी त्यांना डिस्टर्ब करायचे नाही, मजा घेऊ द्यायचे त्यांना , अशा वेळी एकदम लहान होऊन जायचे ते, मुलांसोबत खेळत राहायचे दिवसभर

तो संपूर्ण दिवस गप्पांमध्ये गेला, आशाला स्वयंपाकाला बोलावल्यामुळे विशेष काम नव्हतं

दुसऱ्या दिवशी सकाळी माई लवकरच उठल्या, आज सायली येणार होती, तिच्या आवडीचा स्वयंपाक करायचा होता, तिचा आग्रह असायचा की आई भाजी तूच कर, त्यामुळे आज त्या स्वतः भाजी करणार होत्या

सतीश हि बहिणीला भेटायला खूप उत्सुक होता, जवळजवळ चार-पाच वर्षांनी भाऊ-बहीण भेटणार होते, लहानपणी खूप पटायचं त्या दोघांचं

सगळ्यांची आवरायची गडबड होत होती, बाहेर गाडी आलीच तेवढ्यात, सायली तिचा नवरा परेश मुलगी परी गाडीतून उतरले, सतीश बाहेर सामान काढायला मदत करत होता, सायली येऊन नाना माईंना भेटली, छोट्याशा परीचे चे लाड सुरू होते, सायलीने फिरून पूर्ण घर बघितलं, अगदी जसच्या तस आहे सगळं, अजिबात बदल नाही काही, हाच तर कोझिनेस आहे इथला, घरातल्या प्रत्येक वस्तूत नाना माईंचा चेहरा दिसतो, किती छान वाटत आहे आणि किती स्वच्छ ठेवल आहेस घर तु माई आणि अजूनही आमच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत, माई ना खूप भरून आलं होतं, दोघं मुलं सून जावई घरी नातवंड, बऱ्याच दिवसापासून ते असे एकत्र जमायचे स्वप्न बघत होते ते,

सतीश आणि सायली भेटले, किती बोलू आणि किती नको असे झाले होते त्यांना, या घराच्या बऱ्याच आठवणी आहेत, दोघ आठवणी काढत बसले, त्यांच्या गप्पां ऐकत बाकीचेही रमले, माईंनी वाढायला घेतलं, प्रिया आणि सायली ही मदतीला गेल्या, सगळं सायलीच्या आवडीचं केलेलं, सायलीच्या डोळ्यात पाणी होतं,

"आज कित्येक दिवसांनी मी आईच्या हातचा खाणार आहे" ,........ सायली येवून माईंच्या गळ्यात पडली,

परेश कौतुक बघत होता, मुलं येऊन बसले जेवायला,
आज मम्मी च्या आवडीच सगळं जेवण, परीला आश्चर्य वाटत होत, मम्मी तुला हि भाजी आवडते हे मला माहितीच नव्हत, आजीला कसं माहिती, हास्यविनोद करत जेवण झालं

सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट दाखवले, आईसाठी भारीतली साडी नेकलेस सेट, बाबांसाठी घड्याळ कोट गिफ्ट बघून आई-बाबा भारावुन गेले,

"कशाला एवढा खर्च केला, पूर्ण कार्यक्रमाचेही एवढं बजेट नसेल एवढाचं तू गिफ्ट आणला आहे" ,..... नाना

"हे गिफ्ट मी एकटीने आणलेलं नाही आहे ते मी आणि सतीश ने मिळून घेतल आहे, अर्ध अर्ध आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं केला आहे, त्या मानाने हे गिफ्ट काहीच नाही",....... सायली

फुल वाला आला....

" काल का नाही आला रे शाम? आता बघून घे किती फुलं लागणार ते आणि उद्या लवकर ये डेकोरेशन ला",...... माई

" किती वाजता आहे कार्यक्रम "?,..... शाम

" असं किती वाजता वगैरे काही नाही पण दिवस भर सेलिब्रेशन आहे ",...... माई

" आज संध्याकाळी करू का डेकोरेशन"?,.... शाम

" नको उद्या पहाटे लवकर ये ताजी फुलं घेऊन, आज संध्याकाळी तू आजची फुलं वापरशील ",...... माई

या वयातही माईंचा व्यवहारिक पणा वाखाणण्याजोगा होता, सतीश सायली नाना हसत होते, त्यांना या गोष्टी पूर्वीपासूनच माहिती होत्या, माईंच्या हुशारीमुळे तर एवढं सगळ टिकून होत, संसारात काटकसर केली त्यांनी, मुलांना चांगलं शिकवलं, नानांची चांगली साथ दिली, पै पै चा हिशोब असायचा त्यांच्याकडे, एवढं करूनही अडलेल्याला निडलेल्याला मदत करायच्या माई,

कार्यक्रमाचा दिवस उजाडला, सकाळपासूनच गडबड चालली होती सगळ्यांची, सायली परेश सतीश प्रिया सकाळपासूनच कामाला लागले होते, आज नाना माईंना काहीही करू द्यायचं नाही असं ठरवलं होतं त्यांनी, आशा ही लवकर आली कामाला, आज फार मोठा बेत होता स्वयंपाकाचा त्यामुळे तिने मदतनीस सोबत आणली होती, तिला काय हव काय नको ते बघायला माई उठल्या तसं सायली आणि प्रिया ने त्यांना दटावून खाली बसवले, प्रियाने जाऊन सगळं सामान काढून दिलं

जरा वेळाने बाहेर गाडी आली, त्यातून नाश्त्याचे सगळं सामान आलं

"आता कशाला बोलावलं नाश्त्याला आपल जेवण होतच आलं होतं",...... माई

"असू दे ग माई",..... सायली

सायलीने नाष्टा उतरवून व्यवस्थित एका टेबलावर रचून ठेवला

दहा मिनिटातच नाना माईंच्या ज्येष्ठ ग्रुपचे सदस्य आले, सगळ्यांनी मोठा पेढ्याचा पुडा आणि फुलांचा गुच्छ आणला होता, त्यांना बघून नाना माईंना खूप आनंद झाला, ग्रुप सदस्यांनी मिळून छान गाणी म्हटली, ओळख करून दिली, सगळ्यांनी हास्यविनोद करत नाश्ता झाला, त्या प्रसंगी एक छोटा केकही नाना माईंनी कापला, खूप मस्त गेला सकाळचा दोन तीन तासाचा वेळ, सगळ्या सदस्यांनी निरोप घेतला

लगेच सतीश आणि परेशने गाद्या टाकल्या पेटी तबला सगळे रेडी ठेवलं एक ग्रुप गायनाच्या कार्यक्रमासाठी आले होते, नानाची गाण्याची आवड बघुन हा कार्यक्रम ठेवला होता, दुपारचं जेवण होईपर्यंत सुरेख गाण्याचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला फक्त घरचीच मंडळी उपस्थित होती, एक से एक गाणी म्हटली जात होती, विशेष म्हणजे नानांनी ही माईंनसाठी एक गाणं म्हटलं, खूप मज्जा आली

दुपारचा स्वयंपाक झाला प्रिया आणि सायली ने मिळून ताट केले, नाना आणि माईंना टेबलावर बसवलं, ताटाभोवती सुरेख रांगोळी उदबत्ती पंचपक्वान्नांनी ताट सजलं होतं, हसत-खेळत जेवणं झाली,

"आता काय सरप्राईज आहे"?,...... नाना माई विचारत होते

आता काही नाही, आता दोन तास आराम करा, मग संध्याकाळी पाहुणे येतील,

सगळ्यांचा आराम झाला, चहा पाणी झालं, संध्याकाळी जेवण बाहेरून येणार होत, चार नंतर पाहूणे यायला सुरुवात झाली, मावशी, काका काकू, जवळची आत्या सगळे आले, गप्पा गोष्टींना उधाण आलं, माई तर गप्पांमध्ये अगदी बुडून गेली होती, इतक्या वर्षात तिला असं निवांत बसायला मिळालं नाही, कोणी आले की स्वयंपाक पाण्यातच बिझी असायची ती,

जरा वेळाने केक कापला सतीश आणि सायली उठले बोलायला,..... "आजचा दिवस खुप भाग्याचा आहे, 50 वर्षापूर्वी नाना माई एकमेकांना भेटले, तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमच्या दोघांकडून खूप शिकायला मिळाले, जोडीदाराशी कसं वागावं, एकमेकांची काळजी कशी घ्यावी, घर कसं चालवावं, थोड्या पैशातच सगळं नीट कसं करावं", किती बोलू आणि किती नाही असे सतीश आणि सायलीला झाले होते


नानांनी उठले त्यांनी बोलायला सुरुवात केली, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला, ते माईंन जवळ गेले, "तू आहेस म्हणून हे सगळ आहे, सगळे श्रेय तुलाच जात, माझा संसार बसवला, नीट सांभाळला, काहीही नव्हतं सुरुवातीला आपल्याकडे, तरी कसली तक्रार केली नाही, होतं नव्हतं त्यात एकदम नीट संसार केला, तुझे खूप आभार आणि आज सगळ्यांसमोर मी तुला सांगतो आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे",

माई एकदम लाजल्या, सगळे हसायला लागले, दोघांनी मिळून केक कापला, जेवण झाले आलेले पाहुणे गेले, सगळे बाहेर बसून मस्त गप्पा करत होते, छान झाला नाही आजचा कार्यक्रम,.....

सगळे झोपायला गेले

नाना खोलीत आले, ते मागे काहीतरी लपवत होते ,

" काय आहे हातात ",....... माई

नानांनी उठून माईंच्या केसात गजरा माळला......

"काय हो हे" ,...... माई लाजल्या होत्या

"माझ्याकडून तुला गिफ्ट",....... नाना

"सकाळी तर द्यायचा ना गजरा, खूप छान आहे हो",....... माई

"नाही मला एकांतात द्यायचा होता, मी काही आणल नाही गिफ्ट तुला " ,...... नाना

"मी ही कुठे आणल काही " ,....... माई

" बर झालं नाही आणल, एक गोष्ट मागू का"?,...... नाना

" हो बोला",..... माई

"माझ्या सोबत असच कायम रहा, अशीच साथ दे ",....... नाना

दोघांच्या डोळ्यात पाणी होत , एकमेकांची साथ हेच मोठ गिफ्ट आहे हे समजून चुकले होते ते, एकमेकांचा हात हातात घेवून बरच वेळ ते बसले होते...... निशब्द होवुन........ ❤️
.......
©️®️शिल्पा सुतार