नटले मी तुमच्यासाठी

All womens are Ornament lovers

नटले मी तुमच्यासाठी

श्री आदिशक्ती महिला ग्रुप यांनी आयोजित केलेल्या भाजीच्या दागिन्यांची स्पर्धा,तिथल्या पोस्ट पाहून जे सुचलं ते लिहिलं,दागिने स्पर्धेत सहभागी होणा-या महिलांसाठी

दागिन्यांचा मोह असतो प्रत्येक स्त्रीला,

भाज्यांच्या दागिन्यांनी शोभा आली आहे स्पर्धेला,

घरगुती कार्यक्रमांत शोभा सोन्या चांदीच्या दागिन्यांची,

त्याला जोड असायची कधी कधी इमिटेशन ज्वेलरीची,

आजकालच्या मुलींची आवड आहे फुलांच्या दागिन्यांची,

स्पर्धेने मात्र मागणी वाढली आहे भाज्यांच्या दागिन्यांची,

त्यातून दिसत आहे कलाकारी सा-या भगिनींची,

सोन्याच्या दागिन्यांचा रंग असतो फक्त पिवळा,

पण भाज्यांच्या दागिन्यांचा रंग आहे वेगवेगळा,

ग्रुपमध्ये भरले आहे सर्वांनी वेगवेगळे रंग,

चला उठवू आपण आपल्या आयुष्यात आनंदाचे तरंग,

त्या तरंगात होवून जाऊ आपण सारे दंग.

रुपाली थोरात