Sep 25, 2021
कविता

नातं

Read Later
नातं
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

                                                                           नातं

 

नातं असतं  दोन मनांचं  ,एकत्र आलेल्या क्षणांचं

ते क्षण पुरेसे असतात ,दोन मनांना जोडायला

अन एकत्र ते राहतात ,आयुष्य घालवायला

 

कधी कधी -

आपण मानलेले नातं

दुसऱ्याला नको असतं

त्याला नको असतो आपण

नको असते आपले अस्तित्व

अन आपणाला हवा असतो फक्त तोच

दुसरा- तिसरा नको फक्त तोच

 

अशावेळी

हे नातं नातं नसतं

असतं फक्त एक ओझं

आपल्याला कळत असून

उचलत असतो ते बोझं

 

तोडायचे ते नातं असतं

पण दुसरं मन तयार नसतं

होतं अशा वेळी असह्य जगणे

वाईट आहे हे असं नातं निर्माण होणं

© शीतल महामुनी माने

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now