नात प्रेमाचं

Grandmother and grand daughter love

नव्याने विदेशातून व्हिडिओ कॉल केला. तिच्या आजीला तिला बघायचे होते.  तिची आजी मीरा तिच्या शेवटच्या घटका मोजत होती. नव्याचे वडील शिरीष यांनी आजी ला नव्याचा कॉल दाखवला. नव्याला स्क्रीन वर बघून आजी खूप प्रसन्न झाली. खरतर नव्याला भेटायची आजी ची खूप इच्छा होती. आणि नाव्याला ही आजी ला भेटायची इच्छा होती. परंतु विदेशातून येणं लगेच  तेवढं सोपं नव्हतं.
            तर ही गोष्ट आहे आजी आणि तिच्या नाती ची. दोघांच्या प्रेमाची, मैत्रीची. मीरा ह्या जुन्या काळातील एक शिस्तप्रिय शिक्षक. ६०-७० च्या दशका मध्ये जेव्हा मुलीने शिक्षण घेणे सोपे नव्हते. त्याकाळी त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे वडील ही शिक्षक. त्यांनी मीराला शिकण्यासाठी प्रो्साहन दिले. गावातल्या शाळेमध्ये मुली जास्त शिकत नव्हत्या, म्हणून त्यांनी मीरा ला व तिच्या दोन भावंडाना तिच्या सोबत पाठवले. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी राहून शिक्षण घेतले. मीरा  दहावी उत्तीर्ण झाली. सगळ्यांनी खूप कौतुक केले. पण समाज दबावामुळे मीरा चे दहावी झाल्या वर लग्न करून टाकले. मिराचे लग्न अशोक सोबत झाले. अशोक शिकलेला होता. परंतु नोकरी चांगली मिळत नसल्याने त्यांनी कपड्याचे दुकान टाकले. मीराला पुढचे शिक्षण घायचे होते. अशोक ने ही पाठिंबा दिला. मीरा ने d.ed केला. नंतर तिला शिक्षिकेची नोकरी एका चांगल्या संस्थांमध्ये मिळाली.
     अशोक आणि मीरा चा चांगला संसार झाला. २ मुला झाली. खरतर मीराला एका मुलीची खूप हौस होती. पण तिच्या नशिबात मुलचं. अशोकला मात्र मुलगी नको होती. त्याला वाटायचं मुली सांभाळन फार अवघड. पण नंतर मीरा ने पण जाऊ देत 2 मुला ही पण देवाची च देणं. म्हणून स्वतला समजावून घेतला. तिला नेहमी वाटे एक मुलगी असली की कसा घर भरलेला वाटत. मुलींना किती छान छान कपडे घेता येतात. आणि मुलींना फार माया असते. असा नेहमी वाटत राहायचं. 
      पण तिचे दोन मुलगे शिरीष आणि शांतनू. दोघे ही आई ला फार जीव लावत असे. मीरा ला शाळेची नोकरी आणि मुलांची जबाबदारी. दोन्ही करता करता तिला मुलांच्या बालपणात रमायला वेळ च भेटत नसे.
        असे च दिवस सरत गेली. शिरीष आणि शतानु मोठी झाली. शिरीष आता लग्नाला आला होता. मीरा ही शिरीष ला सांगे, "शिरीष, बाळा तू लवकर लग्न कर रे आता. माझ्या ने आता होत नाही. एक सून आन आता लवकर घरी." शिरीष लग्नाच बोलताच लाजला. आणि एवढी काय घाई आहे आई बोलून निघून गेला.
    मीरा आणि अशोक ने स्थळ शोधायला सर्वात केली. एक स्थळ होऊन आल.

🎭 Series Post

View all