नर्तिका (शर्यत मृत्युशी )

चंद्रगुप्त यांच्या आयुष्यातील थरारक सत्य घटनेचे काल्पनिक वर्णन

ही कथा एका ऐतिहासिक सत्य घटनेचं काल्पनिक रूपांतर आहे.काळ आहे ३४०इसा पुर्वीचा.जेव्हा सम्राट चंद्रगुप्त मौर्य  यांनी धनानंदला हरवुन तक्षशीला आपले आधिपत्य स्थापित केले. 

सम्राट चंद्रगुप्त आचार्य चाणक्य आणि इतर मंत्रीगणाबरोबर राज्यविस्तारासाठी चर्चा करत होते  इतक्यात द्वारपालाने सौमित्र राज्याचा राजदुत शांतीचा संदेश असलेला खलिता घेउन आल्याची वर्दी दिली.

सौमित्र राज्यचा राजा हा पुर्वी धनानंदला सामिल होता आणि तक्षशीलाचा मांडलिकही. चंद्रगुप्त यांनी दुताला  राज्यसभेत येण्याची परवानगी दिली.

त्याप्रमाणें तो राजदुत सभेत आला आणि राज्यसभेला वंदन करून खलिता वाचायची परवानगी मागितली.त्या खलित्याच्या अनुसार सौमित्र राज्याला चंद्रगुप्तचे आधिपत्य मान्य आहे ;तसेच  त्यांना कोणतेही युद्ध नको आहे.चंद्रगुप्त यांच्या अभिषेकानिम्मित्त सौमित्र राज्याकडुन शंभर दास दासी ,पन्नास अरबी अश्व ,पन्नास हत्ती,हजार स्वर्ण मुद्रा आणि सर्वात खास नजराणा म्हणजे राजनर्तिकी आणि सौमित्र्य राज्यातील सर्वात सुंदर युवती मयुरा भेट देण्याकरिता आणले गेले होते.तर तक्षशीला नरेश चंद्रगुप्त यांनी भेटीचा स्विकार करून सौमित्र राज्याला पुन्हा अभय द्यावे हीच विनंती होती.


एवढा खलिता वाचुन राजदुताने मयुराला सभेत बोलावण्यास अनुमती मागितली. चाणक्य यांनी काही विचार करून मयुराला सभेत आणण्याची अनुमती दिली.


मयुरा हीला फुलांनी सजलेल्या मेण्यातुन आणले गेले.जसे तिच्या मेण्याचे अच्छादन दुर केले गेलें, सभेतला प्रत्येकजण तिचे सौंदर्य पाहुन अंचबित झाला.


काळ्या नागिणीसारखा  लाबसडक काळा केशसंभार आणि त्यावर सुंगधित सफेद मोगऱ्याचा साज,डोळेही बोलके नि टपोरे तसेच काळेभोर आणि  मिनाक्षी (माश्याचा आकार) आकाराचे ,ओष्ठ(ओठ) अगदी रक्तवर्णी आणि कपोलही (गाल) पाटल(गुलाबी)रंगाचे होते.कायाही गौरवर्णीय आणि सुवर्णकांतीसारखी चमकणारी. दंतपंक्ती अगदीशुभ्र  मोत्याची माळाच.


कंचुकीतुन उभारलेले स्तन ,वक्रकार कटी ,लांबसडक हस्त आणि अंगुली(बोट) व कोमल पद्य(पाय)  त्यावर ऩादवणारी छुमछुम पैजंणाची लय आणि सर्वांगावर  स्वर्ण अंलकाराचा शृगांर नि भावविभोर मुद्रा.

सारी सभाच काही क्षण चंद्रगुप्त यांच्या भाग्याचा हेवा करत होती कारण मयुराही जरी नर्तिका असली तरी तिचा भोग घेण्याचा अधिकार राजाला होता त्यामुळे चंद्रगुप्ताची ती खास गणिका(भोग देणारी दासी) होणार होती.

चंद्रगुप्ताने तिला पाहुन लगेच सौमीत्रची संधी मान्य केली आणि आचार्य चाणक्यने मात्र एक अट घातली की मयुराला सोडुन कोणतेही दास दासी स्वीकार केले जाणार नाहीत .

इतक्यात मयुराने पहिल्यांदा आपल्या मंजुळ आवाजात विनंती केली.

"आचार्य आणि नरेश माझी एक विनंती आहे .माझे साथीदार ह्यांना मात्र मजसोबतच ठेवावे.माझे नृत्य हे त्यांच्या तालावर खुलते.त्यांच्या थापेशिवाय मी पदन्यासाची कल्पनाच करू शकत नाही."

पहिल्यांदाच चंद्रगुप्तने आचार्य यांच्याशी सल्लामसलत न करता ह्या प्रस्तावास मान्यता दिली, असं वाटत होते कि चंद्रगुप्तला मयुराच्या सौंदर्याने मोहित केले आहे.

आचार्यांना चंद्रगुप्तचे हे वागणे खटकले खरे पण,त्यानी मयुराच्या प्रस्तावास मान्यता दिली .

मयुराच्या सौंदर्याने व नृत्य कौश्यल्याने सभा दिवसेदिवस खुलत होती.चंद्रगुप्त तिच्या नृत्यावर नि बुद्धिकौश्यलावर प्रभावीत होत होते.

मयुराही चंद्रगुप्तला आपलेसे करण्याचे सारे प्रयत्न करत होती.अशातच एक तबला वादक मयुराच्या वाद्यवृंदात सामिल झाला.त्याचें तबला वादन आणि मयुराचा पदन्यास ह्याने तर राजसभा दुमदुमत होती.

एकेदिवशी मात्र मयुराच्या कक्षात तिच्या विश्वासु दासी अवनी हिने लपतछपत एक खलिता आणुन दिला तो वाचताच मयुरा थोडी चितेंतच पडली..तिने दासीला आपली नेहमीची कुपी आणायला सांगितली.त्या कुपीतील द्रव्य प्राशन केल्याबरोबर तिच्या मनाची तृप्तता झाली.


त्यानंतर तिने एक खलिता लिहुन परत तिच्या हाती दिला.त्या खलित्याच्या लिहले होते.

मयुर नाचे थुईथुई

मायन डोले त्यावरी

लवकरी अग्नीवर्षा होई

अवनीने तो खलिता एका बासुरीत बंद करून परत नेला.तिच्या कक्षाच्या बाहेर असलेला वादक हे सारे पाहत होता.त्याने मयुराच्या दासीला मध्येच अडवुन आपल्या तबल्याकरिता हातोडी आणावयास फर्मावले.

त्या दासीला खरेतर तो खलिता त्वरीत योग्य व्यक्तीस देणे गरजेचे होते ; पण तिला राजवादक देवाशिषच्या आज्ञेचे उल्लंघन करवेना .तिने ती बासरी आपल्या अधरीय वस्त्राखाली लपवुन लहान हातोडी आणावयास नृत्यागारात गेली इतक्यात तिच्यावर पाठुन प्रहार झाला.अवनी तिकडेच मुर्छीत झाली आणि देवशिष यांने हळुच ती बासरी काढुन आतील संदेश वाचला नि परत त्या बासुरीत संदेश तसाच ठेवला.

तो त्वरीत आचार्य नि चंद्रगुप्त यांना सजग करायला महालात गेला, पण तिकडे त्याला कळले कि मयुरा चंद्रगुप्त यांच्या शयनकक्षात आधीपासुनच विचरत असल्याने कोणालाही नरेश यांना भेटायची परवानगी नाही आहे.


प्रत्येक क्षण अमुल्य होता कारण मयुरा ही साधी नर्तिका नव्हती तर विषकन्या होती.तिच्याकडे असलेल्या कुपीतुन ती रोज काही थेंब जहाल विश प्राशन करे.तिचे विष एवढे भयवाह होते कि एकदा चुकुन तिच्याजवळ विचरत असलेला भ्रमराने तिला डंखित केले आणि तो स्वत:च मृत्यु पावला.हे सारे तिच्यावर सतत लक्ष ठेवणाऱ्या देवाशिषने पाहिले होते.

हे पाहुन व तिच्या कुपीचे परिक्षण केल्यावर त्याला जाणवले होते मयुरा ही विषकन्याच आहे.

ती रात्र आणि प्रत्येक क्षण मोलाचा होता.जर नरेश चंद्रगुप्तने प्रणय करताना तिचे चुंबन घेतले तर त्यांचा मृत्यु निश्चित होता.सौमित्र राज्याने नर्तिकी ऐवजी विषकन्या पाठवली ;ज्याने चंद्रगुप्त मारेल आणि मग तक्षशिला नरेश मेल्याबरोबर सौमित्र राज्याचे मांडलिकत्व नष्ट होइल हा हेतु ह्यापाठी होता.

हेच त्या संदेशातही होते ..मयुराचा प्रभाव राजावर पडत आहे.लवकर चंद्रगुप्त याचा मृत्यु  होइल म्हणजेच अग्नी वर्षा होइल.

आचार्यही त्या क्षणी आपल्या कुटीत नव्हते.देवाशिषने मग एक कठोर निर्णय घेतला.त्याने एक खडग घेतले नि त्याला विष लावुन विखारी खडग बनवले. तो स्वतःही उत्तम योद्धा होता त्यामुळे त्याला  चंद्रगुप्तच्या योद्धांना  खडगने (तलवार )गारद करायला त्याला वेळ लागला नाही.

तो त्वरीत कक्षात पोहचला तेव्हा  त्याने पाहीलं मयुराने चंद्रगुप्तला नृत्य नि मदिरापान याने रिझवल होतं आणि ती आपले विषारी चुंबन देणार इतक्यात देवाशिषने तिला मागे ढकलले.

जे अर्थात चंद्रगुप्त याला आवडले नाही त्याने त्वरीत आपले शस्त्र उचलले नि तो क्रोधात देवाशिष वार करयला धावला.

देवाशिषने चंद्रगुप्ताचे खडग आपल्या खडगाने हवेतच रोखुन धरले आणि देवाशिष याने क्रोधित चंद्रगुप्तला सावध करण्याकरता आपले म्हणणे मांडत म्हणाला,


"महाराज..! मी देवाशिष. आचार्य चाणक्यांच्या शिष्य आहे.माझ्यावर विश्वास ठेवा .ही विषकन्या आहे.सौमित्र राज्याने तिला आपणास मारावयास पाठविले आहे."


हे ऐकल्यावर चंद्रगुप्त थोडासा शांत झाला.देवाशिषने मग खुणेसाठी गुप्त शब्दाचे उच्चारण केले ज्याने देवाशिष हा आचार्यांचाच शिष्य आहे हे त्याला जाणवले.


तसेच त्याने खुणेने अस्त्र घेउन देवाशिष मारायला आलेल्या मयुरालाही रोखले कारण मयुराही उत्तम जरी नर्तिका असली तरी ती उत्तम युद्धपटुही होती.

आपल्यावरती नरेशांचा विश्वास बसला आहे हे पाहुन देवाशिष प्रणाम करत म्हणाला.

" महाराज ,जे दास दासी सौमित्र राज्य आपल्याकरता भेट म्हणुन देण्यात येणार होते ते दास दासी नसुन त्यांच्या वेशातील योद्धे होते.ज्याचा संशय आचार्य यांस आला होता म्हणुन त्यांनी नकार दिला, पणआपण मात्र मयुराच्या सौंदर्यने मोहित झाला होता."

"म्हणुन त्यांनीच तिचा भेद काढावयास मला तिच्या वादवृंदात सामिल केले ."

हे ऐकताच चंद्रगुप्त अजुन विचारात पडला,पण मयुराला समजले कि आता आपला भेद उघडकीस आला आहेच तर किमान चंद्रगुप्तला मारण्याचे तरी काम करूया कारण अयशस्वी ठरल्यामुळे  तिचा वध मौर्यसेना किंवा सौमित्र गुप्तहेर यांजकडुन होणारच होता.

तिने झटकन स्वत:वर वार करत आपल्या रक्तात भिजवलेली कट्यार चंद्रगुप्तावर वार करण्यासाठी उचलली, इतक्यात प्रसंवधान साधुन देवाशिष याने तिचेच मुंडके उडवले आणि चंद्रगुप्त यांच्या प्राणाचे रक्षण केले.


अश्याप्रकारे आचार्य चाणक्य यांच्या गुप्तहेरांनी कितीतरी वेळा चंद्रगुप्त यांचा जीव वाचवला आहे.चाणाक्यनितीत अश्या विषकन्यांचा उल्लेख आढळतो.


त्यावेळी अश्या विषकन्या नि विषपुत्र लहानपणीपासून प्रशिक्षत केले जायचे व त्यांना युद्ध कला आणि नृत्य व वादन कला ह्यात निपुण केले जायचे ज्यामुळे ते सहज शत्रुगोटात प्रवेश करू शकत .जे वेळप्रसंगी शत्रु राजाला किंवा खास सरदाराला मारू शकत होते.त्यांना अगदी लहानपणासुन थोडे थोडे विषाची मात्रा दिली जात असे ज्यामुळे ते मोठे होउन स्वत:च जीवंत विशारी शस्त्र बनत.