Nov 30, 2021
माहितीपूर्ण

नारायण गोपाळ धारप

Read Later
नारायण गोपाळ धारप

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


नारायण धारप

नारायण गोपाळ धारप हे प्रसिद्ध मराठी भयकथा लेखक होते. २७ ऑगस्ट १९२५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी. एस्सी. टेक ही पदवी मिळवली होती.
गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला सुरुवात केली, आणि त्यानंतर ते सातत्याने लिहीत राहिले. मराठी साहित्यातील भयकथा, रहस्यकथांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत, त्यांत धारपांचे स्थान अव्वल आहे.
१९५२ सारी त्यांनी \" हिरवे फाटक \" ही पहिली भयकथा लिहिली. वाचकांना कथेचाच एक भाग बनविणारी वातावरणनिर्मिती, अन् उत्कृष्ट लेखनशैली हे त्यांच्या कथा - कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी लुचाई, स्वाहा, ४४० चंदनवाडी, चंद्राची सावली यांसारख्या उत्तमोत्तम भयकथा लिहिल्या. त्यासोबत त्यांनी रहस्य ( चेतन, काळोखी पौर्णिमा, उभे आडवे धागे इ. ) विज्ञानकथा ( सीमेपलीकडून, अरिष्ट अंगारक, पळती झाडे ) कौटुंबिक इत्यादी कथाप्रकारातही लेखन केले. ड्रॅक्युला या संकल्पनेवर लिहिलेली \" लुचाई \" ही भयावह कादंबरी, अनुवादित असूनही धारपांचे चित्तथरारक लेखन आणि त्यांनी केलेले कथेचे बेमालूम भारतीयकरण यांमुळे त्यांचीच वाटू लागते. स्वाहा, ४४० चंदनवाडी सारख्या झपाटलेल्या वास्तूंवरील कथा वाचताना अंगावर रोमांच उभे राहते, अन् अंतर्मनातून भीतीची जाणीव होते. त्यांच्या समर्थ, भगत, जयदेव, महावीर आर्य, कृष्णचंद्र या मानसपुत्रांच्या कथा आजही लोक आवडीने वाचतात.
१८ ऑगस्ट २००८ रोजी वयाच्या ८२ वर्षी त्यांचा मृत्यू झाला. \" विधाता ? महावीर आर्य \" हा त्यांनी अखेरच्या काळात लिहिलेला कथासंग्रह होता.
२०११ मध्ये त्यांच्या अनोळखी दिशा या कादंबरीतवर आधारित याच नावाची मालिका स्टार प्रवाह वर प्रदर्शित झाली होती. त्यांच्या कथेवरील ग्रहण ही मालिकाही खूप गाजली.


प्रथमेश काटे

मराठी कथा ( प्रेम, भय, गूढ, विनोदी )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing