Oct 24, 2021
प्रेम

नंदिनी..श्वास माझा 9

Read Later
नंदिनी..श्वास माझा 9

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 9


 

नंदू झाडाच्या कठड्यावर बसून एकटक प्रेमाने खेळत असणाऱ्या शरू कडे बघत होती....... खेळत असताना सुद्धा टीनाच सगळे लक्ष नंदू कडे होतं, तिला असं शरू कडे बघतांना पाहून तिला खूप राग आला, ती पाणी पिण्याच्या बहाण्याने नंदू जवळ गेली.

काय मग कसं वाटते पडल्यावर..... टीना द्वेषाने नंदूला म्हणा ली..

तू मुद्दाम पाढलास ना मला ....नंदू टिनाला बोलली

स्मार्ट गर्ल, हो तू नाही का सकाळी प्लॅन करून मला पाडलं... टिना रागात म्हणाली

सुरुवात तूच केलीस, तू सतत आम्हा गावाकडच्या मुलींना डीच्वत  होतीस आणि तसे मी तुला नाही म्हटलं की ते हाय हिल्स घाल म्हणून.... नंदूने तिला तिच्या शब्दात उत्तर दिले

हो तुम्ही गावाकडच्या मुली दिसतात खूप साध्या सरळ पण खूपच हुशार आहात, चांगल्या मुलांना गळ्यात कसं पाडायचं तुम्हाला चांगलं ठाऊक आहे...... टिना

हे बघ तू आम्हाला काही म्हणशील आणि मी ते खपवून घेणार नाही...नंदू

का जे खर आहे ते बोलली मी...... तू नाही का राजा स्वतःच्या जाळ्यात ओढून राहिलीस, सगळ कळतय मला आणि सगळे दिसते..... टिना

शरू माझा बालपणीचा मित्र आहे आणि तू आमच्या मैत्रीत न पडलेली बरी.....नंदू

चांगलेच वापर करून घेते तू त्याचा..... टीना

आल्यापासून बघते तू मला सतत त्रास देते आहेस..., तू तर आजीला पण खूप त्रास देत असते राजला काय तू तर सगळ्यांना तुझ्या आजी-आजोबांना पण खुप त्रास देत असते.... म्हणूनच सगळे सोडून तुला जात असतात, आता राजपण अमेरिकेला चालला एकदा काय तो अमेरिकेला गेला की इकडे परत नाही यायचा, तीतली लाइफ तिथल्या मुली बघून तो तुला तर पूर्णच विसरणार आहे मला खात्री आहे...... टिना

असं काहीच होणार नाहीये.....नंदू
आता मात्र नंदूच्या डोळ्यात पाणी साचलेला लागलं होतं... टीना च बोलणं तिच्या जिव्हारी लागत होतं

हे सगळ दुरून मीना बघत होती, आणि तिला जाणवलं काहीतरी नक्कीच वाईट होते आहे.....ती तिथला खेळ सोडून नंदू जवळ पळत गेली.... मीनाला असं पळत जाताना पाहून बाकीचे पण त्यांचा खेळ सोडून तिच्यामागे आले...

तू तुझ्या त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना त्रास देत असते ,तू राजला सुद्धा त्रास देत असते ,सगळ्या गावाला तू त्रास देत असते ,सगळ्यांच्या खोड्या करत फिरत असते, नक्कीच तू तुझ्या आई बाबांना पण त्रास दिला  असशील म्हणूनच ते तुला सोडून चालले गेले...., टिना

आता मात्र नंदूच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले तिचं मन दाटुन आलं तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता तिला बोलायला सुद्धा जड होत होतं,....

तितक्यात शरू आणि सगळे लोक तिथे पोहोचले होते टीनाच हे बोलणं त्यांनीसुद्धा ऐकलं होतं..... टीनाचे ते शब्द शरूच्या सुद्धा जिव्हारी लागले होते....त्याने नंदु कडे बघितले, तिच्या डोळ्यातले असे पाणी बघून, तिची अवस्था बघून त्याच्या हृदयात सुद्धा कळ उठली......

स्टॉप इट टिना.... शरू थोड्या मोठ्या आवाजातच ओरडला
धावतच तो नंदू जवळ गेला, नंदू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होते,

मी.... मी नाही त्रास दिला कोणाला ,मी नाही त्रास दिला माझ्या आई-बाबांना..., ती रडतच कसबसं शरू कडे बघत बोलत होती.... तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते, तिचा गळा दाटून आला होता...

तिला असं रडताना बघुन शरूने लगेच तिला आपल्या कुशीत घेतले...., ती अजून जोरात जोरात हुंदके देऊन रडत होती... आणि परत परत तेच बोलत होती मी आईबाबांना त्रास नाही दिला ,मी आई-बाबांना त्रास नाही दिला...

हो बाळा शांत हो, मला माहितीये तू कोणाला त्रास नाही दिला .........शरू नंदू च्या डोक्यावर हात फिरवत बोलत होता.... तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता...

पण नंदूला ही गोष्ट फार लागली होती तिचं रडणं काही थांबेना सगळे तिच्या आवाक्याच्या बाहेर गेलं होतं, ती सतत शरू कडे बघून एकच बडबड करत होती....

नंदूला असं रडताना बघून आता बाकीच्यांना पण फार वाईट वाटत होतं...

टीना तू असं बोलायला नाही पाहिजे होतं.... शरू थोडा चिडत बोलला

शरूच्या असं सगळ्यांसमोर बोलण्यामुळे टिनाला खूप राग आला...

तुला माझी चुकी दिसते, तिची दिसतच नाही, ही गोड गोड बोलते आणि सगळ्यांना फसवते..... असं पाहिजे तिला तिची आई बाबा तिला सोडून दिले आता अक्कल येईल तिला...... टिना तोंडाला येत होतं तसं बोलत होती.

टीनाच बोलणं ऐकून नंदूला अजून रडू येत होतं, तिची हालत आता खूप खराब होत होती.

टीना......  शरू थोडा मोठ्याने ओरडला...... त्याने डोळ्यानेच रोहनला इशारा केला की टिनाला तिकडे घेऊन जा.... तस रोहन टिनाला  दुसरीकडे घेऊन जाऊ लागला...

मला नाही जायचे तिकडे मी काहीच नाही केलं ना बडबड करत होती.... रोहन तिला थोडा ओढतच नेत होता...

शरूने नंदू कडे बघितलं, तिच्या हनुवटीला धरुन तिचं डोकं थोडं वरती केलं, तिच्या डोळ्यात बघायला लागला, तिच्या डोळ्यात त्याला खूप त्रास खूप दुःख दिसत होतं, त्यामुळे त्याला पण आता आतून त्रास होत होता, त्याने हळूच एका हाताने तिचे डोळे पुसले.......

शांत हो बाळा, असं काही नाहीये ती रागाच्या भरात बोलून गेले,...... शांत हो.... शरू

नंदू च्या गळ्यात खूप दाटून येत होता, ती सतत परत तेच बोलत होती ,मी आईबाबांना त्रास नाही दिला मी आई-बाबांना त्रास नाही दिला...... शरू मी वाईट नाहीये मी त्रास नाही दिला....

हो बाळा तू चांगलीच आहे...... शरू तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होता...

आता बाकीच्यांना पण तिला बघवत नव्हतं,मीना सुद्धा जवळ येऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती,पण नंदूला कुणाचं ऐकू जात नव्हतं ती कुणाचच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते

शरू ने तिला घट्ट मिठी मारली आणि आपल्या मिठीत घट्ट ओढून घेतले.... नी तिच्या कपाळावर गालावर किस करू लागला..... तू चांगलीच आहे ग राणी, खूप चांगली आहे शांत होणा ,बाळा प्लीज शांत हो आता.... तिला असं बघून आता शरूला सुद्धा रडायला येत होते.... तो तिला तसाच आपल्या मिठीत थोड्यावेळ घट्ट घेऊन उभा राहिला... आता त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी यायला लागले होते.

त्या दोघांना असं बघून आता मीनाला आणि बाकीच्या सर्वांना खूप वाईट वाटत होते... त्यांनी त्या दोघांना झाडाजवळ नेऊन बसवले, मीनाने बॉटल काढून नंदूला थोडं पाणी पाजलं...,. नंदू आता थोडी शांत झाली होती एकटक शून्यात नजर लावून बघत बसली होती.....

कोणाचं मन आता तिथे थांबायला तयार नव्हतं ,काय करायला आलो आणि काय झालं....

चला निघूया आता पोहोचायला उशीर होईल..... राहुल मूड चेंज करायचा साठी काहीतरी बोलला

हो चला जाऊया ....सुजी

चला......शरू

सगळेजण गाडीकडे जायला लागले.....

रोहन ने पण टिना ला थोडं समजावून सांगितलं होतं, ती पण आता चूप बसली होती

शालूने नंदूला खूप आवाज दिले पण ती ऐकायला आणि हलायला तयारच नव्हती....

शरूने तिला आपल्या दोन्ही हातांवर कुशीत उचलून घेतलं आणि गाडीत नेऊन समोरच्या सीटवर बसवलं.... तोसुद्धा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला ..

मागच्या सीटवर मीना आणि सुजी बसल्या होत्या
त्यामागे रोहन राहुल आणि टीना बसले

शरूने एकदा नंदु कडे बघितले ती एकटक पुढे बघत होती आणि शांत बसली होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते......शाहरुखने आपल्या हाताने तिचे डोळे पुसले आणि गाडी स्टार्ट केली आणि ते लोक समोर जाऊ लागले

मधून मधून शरू नंदू कडे बघत होता, तिचे मोकळे केस हवेवर उडत होते, तिच्या कपाळावर चेहऱ्यावर येत होते ,शरू आपल्या एका हाताने तिचे केस अधून मधून तिच्या कानामागे करत होता.....

गाडीत कोणीच कोणाशी बोलत नव्हतं ,एकदम नीरव शांतता पसरली होती..

रात्री आठच्या सुमारास सगळे घरी पोहोचले, शालूने नंदूला घरात सोडले..... आजीला झालेले प्रकरण थोडक्यात सांगून तिची काळजी घ्यायला सांगितली..... आणि तो जड मनाने घरी निघून आला.......

********

क्रमशः

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "