Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी ..श्वास माझा 5

Read Later
नंदिनी ..श्वास माझा 5

भाग ५

नंदू .....बस पुरे आता ... खूप झाला गोंधळ घालून... चल पळ आता इथून....आजी

काय ग आजी तुला मदतच तर करत होते ....नंदू

जितक्या वेळ तू मदत केली ना .... त्यापेक्षा जास्त वेळ मला हे सगळं आवरायला लागणार ....... नी काय ग आज हे मसाले वांगे बनवायची लहर कुठून आली....आजी

तूच तर म्हणत असते आता तू मोठी झाली , स्वयंपाकात मदत कर, शिक थोड थोड....मग आता शिकायला आले तर तूच मला हाकलते आहेस ... सांग मग शिकायचं की नाही मी.... नाटकी आवाजात नंदू बोलली

मसाले वांगे शरू ला आवडतात म्हणून बनवलय .....नंदू

जेवायला येतोय काय तो.....मग सांगायचं ना आधी , अजून काही बनवले असते ....आजी

त्याला सांगितले नाही मी, आज दिवसभर भेटला कुठे तो मला, त्याचे उद्या कोणी मित्र येणार आहेत इथे फिरायला...तर तो तयारी करतोय..... बरं मी सलाद कापते...की कोशिंबीर करायची.....नंदू

आजी डोक्यावर हात मारत.... जा मग आधी त्याला सांगून ये जेवायचं.... पहिलेच तुझ्या गोंधळामुळे उशीर झालाय...त्याच जेवण होऊन जायचं....ते कोशिंबीर च मी बघते....आणि तो अवतार ठीक कर कसा झालाय बघ तुझा.......असा वाटतेय ५० लोकांचा स्वयंपाक केलाय.......आजी हसत बोलली

अरे हो ....त्याच जेवण नको व्हायला ...नंदू तशीच पळाली

शरू ssssss......नंदू पळतच शरू च्या वाड्यात आली... तशीच आतमध्ये पळत गेली... शरू.....समोरच दृश्य बघून  ती तिथे दारातच थांबली...

शरू च जेवण चाललं होत, शरू ची आई शरू ला भरवत होती...

इतका मोठा झाला तरी याला आई लागते भरवायला...... लाडोबा झालाय नुस्ता..... शरू आई

असू द्या हो वन्स आवडते मुलांना...मामी

नाहीतर काय , या आई ला कळतच नाही....आता अमेरिका गेल्या स्वतःच्याच हाताने बनवायचे आहे नि खायचे पण ....शरू

हो रे हो ...आताच पिराऊन घे सगळे लाड... बायको आली की व्हायचे नाही....मामी

का.....मी तर तेव्हा पण खाणार आई कडून.....शरू

अरे मग तू तिला खाऊ घालण्यात बिझी होशील ना .... मामी मस्करी करत बोलल्या....
सगळे हसायला लागले...

बायको खाऊ घालेल काय अशी तुला .....आई मस्करित

तेवढयात शरू च लक्ष दाराकडे गेले....शरू च्या डोळ्यात पाणी आले होते.....

हो घालेल ना... मी खाऊ घालणारी शोधणार आहे तो नंदू कडे बघत बोलला...

नंदू मागे वळली नी तशीच पळत घरी गेली..

हिला काय झालं ..... नंदू ने विचार करत जेवण लवकर आटोपले.

नंदू ssss.... शरू आवाज देत नंदू च्या वाड्यात आला..

आजी नंदू कुठेय...शरू

ती वर गच्ची वर असेल......जेवली पण नाही पोर....आजी

का..?..काय झालं...? शरू

नंदू तुझ्यासाठी जेवण बनवले होते आज, तुला बोलवायला आली होती, तू जेवत होता म्हणाली , परत आली....तिला जेऊन घे म्हटले ...तर भूक नाही म्हणाली...आता पर्यंत उड्या मारत होती .. काय झालं काय माहिती अचानक...वरती जाऊन बसली...आजी

ओह अच्छा.... बरं मला माहितीये काय झालं असेल... तू जेवायचं ताट बनऊन दे , मी बघतो तिला....शरू

शरू ताट घेऊन वरती आला...

नंदू टेरेस वर एका कोपऱ्यात उभी होती , वरती ताऱ्यांकडे बघत होती....

शरू ने ताट झुल्यावर ठेवले नी नंदू कडे गेला... तिच्या कंबरेत हात घालून तिला मागूनच मिठी मारली....तिच्या हाताला धरून त्याने तिला हळूच स्वतःकडे वळवलं... नंदुच्या डोळ्यात पाणी होते ...तिच्या कडे बघून त्याच्या पण हृदयातून एक कळ गेली...

आई बाबांची आठवण येतेय ना ...... शरू

त्याच्या असा बोलण्याने तिच्या डोळ्यातले पाणी गालावर ओघळले .... मानेनं च तिने हो म्हणून सांगितले......

त्याने तिच्या हाताला ओढून तिला स्वतःच्या कुशीत घेतले...नी तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला....त्याच्या स्पर्शाने तिला हंडकाच आला , तिच्या आवाजाने त्याने तिच्या भोवतालची त्याची मोठी अजून घट्ट केली.....नी तिच्या पाठीवर हाताने थोपटत होता...तिला पण तिच्या भावना अनावर झाल्याने तिने पण त्याला घट्ट पकडले नी त्याच्या शर्ट मध्ये डोकं खुपसून रडत होती......त्याने पण तिला रडू दिले...

थोड्या वेळाने नंदू ला बर वाटलं...त्याने तिच्या डोक्यावर किस केले.... बरं वाटतेय ना आता ...शरू

तिने होकाराची  मान हलवली, डोळे पुसत ...तुला कसा कळलं मला आई बाबांची आठवण येते आहे ते ...तिच्या त्याच्या डोळ्यात बघत बोलली...

तुझे हे टपोरे टपोरे मांजरीसारखे डोळे आहेत ना ...त्यांनीच सांगितले तू घरी मला बोलवायला आली होती तेव्हाच....शरू

हो तुला अस जेवतांना बघितले...काकी तुला खाऊ घालत होत्या ... खूप छान वाटत होते ..... मला पण आई ची आठवण झाली... मी कधी असे आईच्या हाताने खाल्ले मला आठवत पण नाही रे ..कशी होती माझी आई ते सुद्धा नाही आठवत मला.......का मला आई सोडून गेली...रडक्या आवाजात नंदू बोलत होती....

त्याला तीच दुःख जाणवत होते, shhh....  शांत हो आधी .......तिला जवळ घेतले.....

खूप छान असेल तुझी आई...... त्तेव्हाच तर हे पिल्लू इतकं गोड आहे ना ....शरू

देवाचे प्लॅन्स आपल्याला पण नाही माहिती ना..... जे आपल्या हातात नाही त्याचा विचार नाही करायचा......बर चल आता जेऊन घे....तिच्या हाताला धरून त्याने तिला झुल्यावर बसवले...नी भाजी पोळी चा एक घास त्याने तिला भरवला.....
.त्याल अस भरावतांना बघून तिला परत भरून आला......

काय ग तू चिमणे.....परत तिला जवळ घेतले.... चल आता रडायचं नाही परत........जेवायचं पटापट ...... आई नाही देऊ शकत  पण आईसारखे तर खाऊ घालू शकतो ना ...मी आहे ना राजा ..नको अशी रडत जाऊ....    पाहिजे तर मी तुला रोज खाऊ घालेल.....आवडते काय बघ बर..,...आणि किती गोड आजी आबा आहेत तुझ्या जवळ......बघ बर....तू अशी रडशील तर त्यांना किती वाईट वाटेल आहे ....... शरू

याला माझ्या मनातलं कसा कळतं सगळं.....शरू मनातच विचार करत त्याचा कडे एकटक बघत होती

तिला असा त्याच्या कडे बघतांना बघून.... सगळं कळते मला या ह्रदयातले तिच्या कडे बोट करून......कारण आता ते माझे झाले आहे ......शरू

. एक एक मिनिट ...,......तू आज जेवण माझ्यासाठी बनवलं होत ना .......नी तूच काय खाते आहेस.... चल मला पण भरावं आता...खूप भूक लागली आहे मला....शरू तिचा मूड ठीक करायला बोलला.....

तू तर जेवत होता ना , मी आले होते तेव्हा.....मग आता परत भूक लागली...नंदू

तुला अस बघून माझ्या घश्याखली तरी जाणार आहे काय अन्न........जीव अटकला होता माझा ... कसबस आवरले मी....तुझ्या डोळ्यात एक पण थेंब पाणी नाही बघू शकत मी ..... नाही होत मला सहन.....तुला थोडा पण त्रास झाला ना की मला पण त्रास होतो, नाही होत मला सहन....हे इथे (स्वतःच्या हृदयाकडे बोट दाखवत) खूप दुखते मला.... तिचा डोळ्यात बघत शरूचा आवाज कपरा झाला होता ....

मी तुझ्या आईबाबांची जागा तर नाही घेऊ शकत..... पण मी ते सगळं करेल जे त्यांनी केले असते..... पक्का प्रॉमिस....तू माझ्याकडे कसला पण हट्ट करू शकतेस....मी तुझे प्रत्येक हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करेल....शरू

नंदू एकटक त्याचा कडे बघत होती.....

आता बघतच बसणार आहेस काय, खाऊ घाल ग खूप भूक लागलीय मला...... तसा नंडूने त्याला एक घास भरवला....

त्यांचं बोलणं दारामागुन कोणीतरी ऐकत होते....त्यांना असं  बघून ते चालले गेले....

किती प्रेम करतोस रे माझ्यावर...... जीव ओवाळून टाकतो माझ्यावर.... मला जमेल काय रे तुझ्यासारख प्रेम करायला..... नंदू

प्रेमात असा येवढे तेवढे नसते ग.... .. अपेक्षा नसते ठेवायची....फक्त द्यायचं असते .....नको इतका विचार करु, हे छोटंसं डोकं दुखायचे नाहीतर .....शरू तिच्या डोक्यावर टपली मारत बोलला.....

त्याला आता तिची मस्करी करायचा मूड झाला..... काय ग किती तिखट केले हे .....नुसत्या मिरच्या घातल्यास काय.....अस खाऊ घालणारा आहेस काय मला नंतर..... खूप ट्रेनिंग द्यावी लागेल बाबा..., शरू

ये चूप हा ....इतकी मेहनत करून एकतर काहीतरी बनवलं.....गपगुमान खायचं हा ..... शरू रागाचं नाटक करत म्हणाली...नी तस पण तुमच्या शहराच्या मुलांना नाही सांभाळायची ही तिखट मिरची .......

हो का....गोड करून घेईल मी ही तिखट मिरची.....डोळा मारत शरू ने तिचा बोट चावला... नंदू त्याला खाऊ घालत असताना.......

पागल आहे हा .... मनातच नंदू ....नी त्याला मारायला लागली.....

ये बस कर , लागते ना बाई....म्हणत तो पळायला लागला, नंदू पण त्याच्या मागे पळायला लागली, त्यांचा हा मारमारीचा खेळ थोड्या वेळ तसाच सुरू होता...... जेवण आटोपून ते दोघे खाली आले .....
बाय करून शरू घरी निघून गेला....

******
सकाळी ९ च्या सुमारास...

नंदू नी मीना वाद्यासमोर उभ्या होत्या ...कॉलेज बद्दल त्यांचं discussion सुरू होते .... तेवढयात एक जीप सारखी मोठी गाडी येऊन थांबली....दोघीजणी तिकडे बघत होत्या..

त्यातून एक गोरीपान मुलगी उतरून बाहेर आली,  तिने शॉर्ट पँट, स्लीवलेस टॉप घातला होता ... डोळ्यांवर गॉगल, केस खांद्या पर्यंत मोकळे , पायात शुझ घातले होते.....थोडी मतकटच चालत नंदू जवळ आली....

hhey you gaawvali girl..... where's the Shirke's wada........

तुम्ही कोण ..? नंदू

I am Shriraj's friend, looking for his house ... We came from Mumbai ... गाडी कडे हाथ दाखवत.....

शरू ची मैत्रीण.....?... ती नंदूच्या डोक्यातच गेली...

हा सांगते....हे इथून पुढे जावा.... पहिला उजवीकडे न वळता पुढल्या उजवीकडून वळा..... बऱ्याच वेळ नंदू तिला पत्ता सांगत होती...

ती पत्ता ऐकून गाडी मध्ये जाऊन बसली....गाडी पुढे निघून गेली.....

ये काय ग तिला असा का सांगितला पत्ता, हाच तर वाडा होता .....मीना

ती अँग्रेजन बघितली ना ... कशी बोलली..  किती शान मारत होती.....मला रागच आला तिचा.....अन हे काय इथे येवाध्या मोठ्या अक्षरात नाव पण लिहिले....वाचता नाहीं येत काय........ नंदू

शान मारत होती म्हणून राग आला की शरू ची मैत्रीण आहे म्हणून... मस्करी करत मीना बोलली..

ये तसं काही नाही हा ..... जाऊ दे ना थोडा गाव बघून घेतील...हसत नंदू बोलली

दोघी हसायला लागल्या, मीना तिच्या घरी निघून गेली...

*******

२ तासा नंतर....

तीच सेम गाडी परत तिथेच येऊन थांबली....

अरे हे काय इथेच तर आलो होतो ना आपण.... हे काय इथे नाव पण लिहिले आहे ....रोहन

हो ना ... त्या मुलीने उल्लुच बनवलाय आपल्याला...राहुल

कोणी कोणाला उल्लू  बनवलाय.....नी इतका उशीर कसा झाला तुम्हाला, बोललो तेव्हा जवळच तर होता तुम्ही लोकं... शरू बाहेर येत बोलला

अरे आम्ही मघाशी च आलो इथे, ही टिना.... इथे २ मुली उभ्या होत्या त्यांना पत्ता विचारायला गेली....तीनी असा पत्ता सांगितला ना ..पूर्ण गाव फिरून आलो यार....राहुल

नंदू....डोक्यावर हात मारत..... शरू पुटपुटला...

काय...कोण....? सुजी

अं....काही नाही..... अरे मग मला फोन तर करायचा.... शरू

अरे कोणाच्याच फोन ला रेंज नाही, कसा करणार फोन... रोहन

हाय राज बेबी.... म्हणत टिना शरू च्या गळयात पडली... टिना ला शरू आवडायचा

फारच डांबरट होती रे ती..... गवार, useless... टिना

ये तशी नाहीये हा ती.......उगाच काही बोलू नकोस...मस्करी केली असेल तिने ..... बरं चला आता आतमध्ये.. शरू

तुला फारच पुळका रे तिचा........ टिना

तशी खूप क्युट होती हा ती... गावात पण इतक्या सुंदर मुली असतात तर.....रोहन

क्युट म्हणे....myfoot.... टिना.... टिना ला पण ती डोक्यात गेली होती...

बरं बरं झालं काय तुमचं,इथेच उभ राहायचं काय,  चला आता आत मध्ये...म्हणत सगळे गेट चा  आतमध्ये आले

wow beautiful.... काय सुंदर वाडा आहे रे तुमचा...सुजी

बापरे किती झाड आहेत , म्हणूनच इतकं थंड वाटतेय...किती बरं वाटतेय इथे...राहुल

movies मध्येच बघायला मिळतो असा वाडा....सुजी

गाव पण खूप छान आहे यार.... आता २ तास गल्ली नी गल्ली फिरून आलो ....रोहन

हा हा हा हा ..,....बघा किती छान पत्ता सांगितलं तिने .... तिनं तू उगाच चिडली तिच्यावर..... शरू

तसे सगळे हसायला लागले ... टिना सोडून....

हसत हसत सगळे आतमध्ये गेले

नंदू हे सगळं तिच्या रूम मधून बघत होती....किती अंगावर पडत होती शरू चा.... किती चीपकत होती....., नंदू चा तळपायाची आग मस्तकात जात होती, गवार काय, usless काय... दाखावतेच तुला ही नंदिनी काय चीज आहे ते , कुर्त्याच्या बाह्य वरती करत नंदू बडबडत होती....

*********

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️