Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 34

Read Later
नंदिनी...श्वास माझा 34

भाग 34

And the best educationtech award of the year goes to the youngest best buisness man award holder Mr Shriraj Deshmukh.....

एका मोठ्या हॉलमध्ये अवॉर्ड फंक्शन सुरू होतं...... तिथे श्रीराजला हा बेस्ट एज्युकेशन टेक अवॉर्ड मिळाला होता..... आतापर्यंत त्याने यंगेस्त बिझनेस मेंट अवॉर्ड जिंकला होता.... बरेचसे बिझनेस मधले अवॉर्ड मिळाले होते... हा त्याचा पहिल्यांदा एज्युकेशन फील्डमध्ये एंटर केलेला पहिला  अवॉर्ड होता....हा तोच प्रोजेक्ट होता जो नंदिनीला डोक्यात ठेवून त्याने सुरू केला होता......संपली का श्रीराज च नाव बिझनेस वर्ल्ड मधलं चांगलाच ओळखीचा नाव होतं...

श्रीराज च नाव घेताच हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला...... आणि श्रीराज त्याच्या जागेवरून अवॉर्ड घ्यायसाठी उठला...,... आणि सगळ्या नजरा आणि कॅमेरा त्याच्यावर पडले.......... मुली तर त्याच्याकडे टक लावून बघत होते पण बाकी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर स्थिरावल्या होत्या.... ..

                     

 

 

 

 

आज राज ने  त्याचा पुर्ण गेटअप नंदिनीच्या आवडीने केला होता........ थ्री पीस ब्लॅक सुट.... त्यात लाईट ग्रे कलर च कलर वेस्टकॉट..... ब्लॅक शूज.... हाताला ब्लॅक बेल्ट वॉच..... ट्रिम शेव..... परफेक्टली सेट हेअर्स....... आणि चेहर्‍यावर प्रचंड आत्मविश्वास........ त्याचा नाव अनाउन्स आलं तसा तो चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल घेऊन स्टेज वर गेला...... पेजवर एका फेमस व्यक्तीने त्याला अवॉर्ड दिले......

Thanks a lot....... तो परत खाली जाणार तेवढ्यात अँकर ने  त्याला तिथेच थांबवले...

सर प्लीज युवर व्हॅल्युएबल वर्ड्स.....something about your projects... अँकर

Good Evening ....
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद....सर्व मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि लहान च्या प्रेमाने मी आज इथे पोहोचलो आहे त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद

एज्युकेशनल प्रोजेक्ट ही माझी फील्ड नव्हती...... मी पहिल्यांदाच या प्रोजेक्टच्या अनुषंगाने या फील्ड मध्ये आलो....... आजकाल मुलांना सोशल नेटवर्किंग खूप चांगल्या प्रकारे हाताळता येतो...... त्यातून त्यांना चांगलं नॉलेज भेटतं पण नको असलेल नॉलेज सुद्धा भेटत असतं....... तर मी पर्सनली सोशल नेटवर्किंग ....इंटरनेट या गोष्टी मुलांसाठी मला नाही आवडल्या....... घराघरातून आई-बाबा आजी-आजोबा ताई-दादा काकू कशा लोकांपासून बरच काही शिकायला मिळत होतं...... पण आता तसं काही राहिलेलं नाही सगळी लोक आपापल्या कामात व्यस्त झाले..... आणि ती काळाची गरज सुद्धा आहे त्याला नाकारता येणार नाही..... तर मग मुलं जर इंटरनेटचा वापर करतच आहेत तर मला असं वाटलं की त्यातून त्यांना त्यांच्या लाइफसाठी कामात येईल असं काहीतरी एज्युकेशन आपण दिल पाहिजे...... स्पेशली ज्या मुलांना शाळेत जाता येत नाही..... ब-याचशा काही परिस्थिती असतात..... मेडिकल issues असतात..... ज्यामुळे त्या मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही....... अश्या मुलांना डोक्यात ठेवून हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे...... आम्ही बऱ्याच ठिकाणी आमची सेंटर सुद्धा उघडलेली आहेत.....जिथे कमीत कमी दरात चांगलं एजूकेशन मुलांना भेटावं हाच आमचा उद्देश आहे.....बऱ्याच ठिकाणी आम्ही ते फ्री पण अव्हेलेबल करून दिलेला आहे....... आणि सेम ऑनलाइन सुद्धा अवेलेबल आहे........ स्कूलींग सब्जेक्ट तर आहे त्यात त्याशिवाय स्पोर्ट्स... आर्ट्स..... सिंगिंग डान्सिंग.... फिजिकल अवरेनेस..... सोशल अवरेनेस.... मेंटल ग्रोथ..... फिजिकल ग्रोथ... माईd गेम्स...... असे बरेच भाग आम्ही त्यामध्ये ठेवले आहे.....आणि हे सगळ शिकवताना हे मुलांना बोर होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली आहे..... स्पेशल टाईप च्या मुलांसाठी आम्ही वेल ट्रेन टीचर सुद्धा अव्हेलेबल करून दिलेले आहेत........ जास्तीत जास्त गरजू मुलांना याचा फायदा व्हावा एवढेच इच्छा ठेवतो...... इतकेच सांगायचे कि सोशल नेटवर्किंगचा योग्य तो वापर करावा..... आणि आपली मुले त्यावर काय करत आहेत त्याकडे नक्कीच लक्ष द्यावे....

Thanks a lot once again....... राज

सर आम्ही ऐकला आहे की हा प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या वाइफ ला डोक्यात ठेवून केलेला आहे....?.. पाठीमागे बरीच पत्रकार रुपये होते त्यातून एकाने जाणून-बुजून हा प्रश्न विचारला होता... जाणून विचारायला लावला होता...

आता मात्र राज चा लक्षात आले होते की आता इथून बरीच प्रश्नावली सुरू होणार आहे.... बर्‍याच दिवसांनी आपण मीडिया मध्ये सापडलो  आहोत त्यामुळे आता शांततेने काम घ्यावे लागणार होते.......

हो...... इफॅक्ट I like to dedicate this award to my wife Nandini ..... राज चेहऱ्यावर स्मायल ठेवत बोलला

तुमच्या वाइफ च्या मेंटल हेल्थ वरूनच तुम्ही हा प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहात?........पत्रकार

राज ला आता बराच अंदाज आला होता की आता यापुढे सगळे प्रश्न नंदिनी आणि तिच्या मेमरी येशु वरूनच विचारले जातील...... आणि आज तो तयार सुद्धा होता....

खरं आहे....... तिला शिक्षणाची खूप आवड आहे...... तिला गरज असणाऱ्या शिक्षण येथे कुठल्या शाळांमध्ये अवेलेबल नव्हतं...... काहीतरी कारणामुळे तिच्या शाळांमध्ये फिट होत नव्हती........ तिला शिकवताना मी बर्‍याच गोष्टींची खूप डिटेल स्टडी केली....... ॲनिमल विचार केला कि तिच्या सारखी बरीच मुलं आहेत ज्यांना या एज्युकेशनची गरज आहे आणि म्हणूनच प्रोपर टीम बनऊन...... हा प्रोजेक्ट सुरू केला होता...... राज

सर म्हणजे तुमची वाईफ अबनोर्मल आहेत...?.......पत्रकार

ती परफेक्ट आहे.......राज

सर आम्हाला माहिती मिळाली आहे की त्या नॉर्मल  नाही आहे....त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांची मेमरी कमी आहे..?.. पत्रकार

ती विसरली आहे...... मेमोरी कमी नाही आहे......राज

पण मग त्यांची मेमोरी कधी परत येईल....कधी ठीक होतील त्या....?.....पत्रकार

लवकरच.......राज

तुम्ही कधी पर्यंत वाट बघाल.....पत्रकार

Till my last breath....... राज

असं नसते सर.....हे प्रॅक्टिकल नाहीये.....पत्रकार

स्वतः सोबत लोयल असले की सगळच पॉसिबल होते....स्वतः वर नी आपल्या संसाकरांवर विश्वास असला की माणूस डगमगत नाही....... राज खूप कॉन्फिडन्स नी उत्तर देत होता..

तुम्ही इतके सक्सेसफुल आहात तुमच्या लाइफ मध्ये........ आणि दिसायला सुद्धा खूप हॅन्डसम आहात....... तुम्हाला पाहिजे तशी मुलगी मिळाली असती.....then why Nandini mam........ एक महिला पत्रकार

नंदिनी..... माझी बालपणीची मैत्रीण...... आणि आमच्या मैत्रीतच रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये होत गेलं...... मला सुद्धा कळलं नाही की मी कधीपासून तिच्यावर प्रेम करतोय...... पूर्ण नॉर्मल अस आमच लाईफ होतं....... डिग्री नंतर हायर एज्युकेशन साठी मला अमेरिकेला जावं लागलं...... पण मी मी तिला प्रॉमिस केलं होतं की परत आल्यावर आपण लग्न करायचं...... पण त्याच काळात जे नको व्हायला हवं होतं तेच घडलं........ ती 21 वर्षाची असताना तिचा एक्सीडेंट झाला होता आणि त्यामुळे तिच्या डोक्याला बराच मार लागला होता आणि त्यातच तिचा मेमरी लॉस झाला....... तिचं संपूर्ण आयुष्य विसरली आहे......

पाच वर्षानंतर जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती कंडीशन मला पण बघायला गेली नव्हती...... मला खूप वाईट वाटले........ पण तिच्या कंडिशन ने मला काही फरक पडला नाही...... माझं प्रेम थोडासुद्धा कमी झालं नाही.........I kept my words...... I marry with her ...... मी तिला प्रॉमिस केलं होतं म्हणूनच नाही....... पण मी तिच्यावर प्रेम केलं होतं आणि आता सुद्धा करतो..........ती तर माझी लाईफ आहे ....माझा श्वास आहे...... I can't live without her...... ती जरी सगळं विसरली आहे तरी मी नाही विसरलो आहे....

खूप लोक भेटतात ज्यांनी तुमच्यासारखी प्रश्न विचारलेत.....why I select tough life....... मला  पाहिजे तशी मुलगी मिळाली असती आणि हॅपी लाईफ जगता आलं असतं...... बरीच सजेशन्स मिळाली........

मी माझी लाईफ निवडली आहे.....आणि जर प्रेम नी काळजी घेतली तर सगळं ठीक होईल...वेळ लागेल पण ठीक होईल .... यांनी यात काय टफ आहे...फक्त प्रेम द्यायचे आहे.......
आपल्या घरामध्ये आपली मुलं असतात...... त्यामध्ये बरेचदा स्पेशल child  सुद्धा  असतात..... पण त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून आई-वडील त्यांना सोडत नाहीत....... आपल्या घरामध्ये मोठी लोक असतात.... आई वडील असतात.......वयोमानाने किंवा इतर कुठल्यातरी कारणाने काही काही घरातली मोठी माणसं सुद्धा नॉर्मल वागत नाहीत....... बऱ्याच ठिकाणी तर असा बघण्यात आला आहे की आपले प्रॉब्लेम सुद्धा ती वाढवून ठेवतात...... पण त्यांना पण सोडत नाहीत.......... घरामध्ये बहीण-भाऊ असतात......... त्यांच्यासोबत असं काही घडलं तरीसुद्धा आपण त्यांना सोबत घेऊनच चालतो..... का तर ती आपल्या रक्ताची नाती आहेत म्हणून........ म्हणून आपण त्यांना सोडत नाहीत......... फक्त बायको साठीच हा नियम का.......हेच एक नात आपल्या  रक्ताचं नसते म्हणून सोडून द्यायचं..........

हेच एक नातं असतं जे तुमच्या रक्ताचं नसून सुद्धा तुमच्या खूप जवळचं असतं.....हे नात तर जास्ती जपायला हवे.....काळजी घ्यायला हवी....प्रेम तर असतेच पण त्याहूनही एकमेकांचा आदर जास्ती असावं... म्हणूनच तर  या नात्याला जीवन साथी असं नाव दिलेल आहे....... जे फक्त प्रेमावर आणि विश्वासावर असतं....... मी प्रेम केलं आहे मी माझं प्रेम निभावणार आणि जपणार सुद्धा.......

आणि तिच्या ऐवजी जर माझ्यासोबत असं काही घडलं असतं तर.... मी शंभर टक्के sure आहो की तिने सुद्धा मला एकटं सोडलं नसतं.........

Without her I am nothing ......

त्याच्या बोलण्यावर पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला........ बऱ्याच लोकांची तर डोळे सुद्धा पाणावले होते........

तरीसुद्धा विचारणारयाची खोचक प्रश्न प्रश्न संपली नव्हती......

सर मग तुम्ही इतकं प्रेम करता तर तुम्ही त्यांना कधीच सगळ्यांसमोर का आणत नाहीत........ सगळ्यांसमोर मोठा बनण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात पण प्रत्यक्षात त्या वेगळ्याच असतात........ तुम्हाला पण माहिती आहेत की त्या पागल आहेत आणि म्हणूनच तुम्ही त्यांना समोर येऊ देत नाहीत........... पत्रकार

Thanks a lot my friend reminding me to introduce her.......... राज

ऍक्च्युली हा तो स्टेज नाही आहे...... जिथे या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या होत्या......but it's okay........ राज

नंदिनी.............राज

.त्याने पुढे बसलेल्या नंदिनी कडे बघितलं आणि आपला हात पुढे करून तिला यायचा इशारा केला...... राजचा इशारा बघून सगळे लाईट नंदिनी वर पडले......... आणि नंदिनी तिथे उठून उभी राहिली.. तिच्या ओठांवर खूप गोड हसू होते........... आणि सगळे फक्त तिच्याकडे बघतच राहिले.....

                       

 

 


 

 

नंदिनी खूप सुंदर दिसत होती तिने क्रीम कलरचा इंडियन फ्लॉवर लेन्थ ड्रेस घातला होता..... केस मोकळे आणि कानामध्ये साजेसे मोत्यांचे इयरिंग्स.......      अगदी नसालया  यासारखा साधे चा मेकअप....... ती पुढे पुढे चालत होती....... राज सुद्धा तिला घ्यायला म्हणून स्टेजवरून खाली येत होता.....

वेटर लोकांचे अधा मधातून ड्रिंक्स सर्व करणं सुरू होतं......... पुढे बसलेली एक चाळीस च्या आसपासची कार्पोरेट वर्ड मधली बाई उठून कुठेतरी जायला निघाली तेवढ्यात तिचा धक्का वेटरला लागला........ आणि त्याच्या हातातला ट्रे खाली पडला...... आणि थोडं फार तिच्या ड्रेस वर सुद्धा उडाले......

You idiot........दिसत नाही काय तुला........ माझा सगळा ड्रेस खराब केलास....... कोणी हायर केला तुला येथे......you will be fired....... ती बाई ओरडतच तिथून निघून गेली....... वेटर घाबरून खाली बसून तुटलेले ग्लास ट्रेनमध्ये उचलत होता ....... तेवढ्यात नंदिनी तिथे आली..... आणि ती खाली बसून त्या वेटरला मदत करत होती.......

दादा तुम्हाला कुठे लागलं नाही ना.......नंदिनी

नाही...... मॅडम मी करतो हे..... तुम्ही जावा वेटर घाबरतच बोलला...

ठीक आहे दादा ..... दोघांनी मिळून केलं तर लवकर होईल...... नंदिनी हसतच बोलली.

सगळे कॅमेरे त्यांचे फोटो क्लिक करण्यात बिझी झाले होते.....almost वेटर च सगळं उचलून झाले होते.....

तेवढयात राज तिथे आला आणि त्याने नंदिनी पुढे आपला एक हाथ केला.......नंदिनी ने हसतच आपला एक हाथ त्याचा हातात दिला नी उठून उभी राहिली........राज तिला स्टेज वर घेऊन आल......

लेडीज and gentlemen.......please put your hands together and welcome pretty lady Mrs Nandini Shriraj Deshmukh on the stage........ अँकर खूप उत्साहात माईक मधून बोलत होती.......नंदिनी राज सोबत स्टेज वर पोहचली

नंदिनी हे सगळे तुझा वेलकम करत आहेत...... राज

नंदिनी ने सर्व समोर हाथ जोडून...नजर खाली झुकाऊन.... चेहऱ्यावर गोड हसू आणत सर्वांना नमस्कार केला....

 

 

 

 

नंदिनी ला बघून तिथे टाळ्यांचा गडगडाट झाला.........ते सगळं बघून राजाच्या चेहऱ्यावर सुध्धा समाधानच स्मायल आले.....तो खूप कौतुकाने तिच्याकडे बघत होता....

How are you mam... पत्रकार

मी ठीक आहे....तुम्ही कसे आहात.......नंदिनी .. नंदिनी दोन्ही हातानी राजच्या दंडाला पकडत बोलली

How are you feeling about Shriraj sir and his success..... पत्रकार

राज.......राज माझा सगळ्यात आवडता आहे या अर्थ वर......मला तो खूप आवडतो.....तो खूप प्रामाणिक आहे......त्याच मन आणि डोक दोन्ही सारखच वागत....तो जे बोलतो ते तो नक्कीच करतो.....आणि ते चांगलंच करतो....तो कधीच वाईट काम करत नाही.......तो खूप काम करतो....मी त्याला बोलते की मला काहीच नको फक्त तूच हवा.....पण तो दुसऱ्या लहान मुलांसाठी पण काम करतो ना ....त्यांना पण राज ची गरज आहे ......तो माझ्यावर आणि आमचा परिवारावर खूप प्रेम करतो आणि आमची खूप काळजी घेतो......आणि म्हणूनच तो सगळ्यांचा फेवरेट आहे घरात पण आणि बाहेर पण.......जराज बद्दल बोलताना नंदिनी चा डोळ्यात खूप चमक होती...

तिच्या बोलण्यावर सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या....

मॅम...what about your memory loss....? .... पत्रकार

म्हणजे......? .. नंदिनी

आता राज ने नंदिनीच्या हातातून माईक स्वतःकडे घेतला

तुझ्या गोड शब्दांसाठी खूप खूप आभार नंदिनी......राज नंदिनिकडे बघत बोलला.....नंदिनी खुदकन हसली

मला वाटते तुम्हाला हवी तेवढी सगळी माहिती मिळाली आहे ...नंदिनी नॉर्मल आहे की नाही हे येतानाच बघितले आहे ......आणि हो मला नंदिनीचा खूप अभिमान आहे...... We are together, now and forever....

आणि हा professional stage आहे.... इथे personal questions न केलेलीच बरे ....आपल्यामुळे पुढला कार्यक्रम खोळंबला आहे ......सगळ्यांचे परत एकदा खूप खूप आभार......

राज नंदिनीचा हाथ पकडत तिला खाली घेऊन आला....
सगळ्यांचा नजरा मात्र राजनंदिनी वर टिकल्या होत्या...

*******

नंदिनी ला झोप येत नव्हती....तिची सारखी चुळबुळ सुरु होती....ती राजच्या शर्ट चा बटन सोबत खेळत होती.......राज ला तिच्या मनाची अवस्था कळत होती......आज अवॉर्ड फंक्शन मध्ये के काही झाले होते ...नंदिनीच्या मनात खूप प्रश्न उमटले होते....आणि हेच कारण होते तो तिला सगळ्यांपासून दूर ठेवायचा......पण कधी ना कधी ही वेळ येणारच होती हे त्याला माहिती होते......

नंदिनी .....काय झालं......झोप नाही येत आहे काय......राज

राज.....मी चांगली मुलगी नाहीये काय......नंदिनी

तू खूप चांगली मुलगी आहेस......तू बघितले ना आज सगळे तुझं किती कौतुक करत होते .....राज

पण मग ते फोटावाले लोक असे का बोलत होते....नंदिनी

ते.....ते हे न्यूज वाले लोक होते....मीडिया म्हणतात त्यांना....त्यांचं ते कामाचं असते.... खरी माहिती गोळा करायची.....म्हणून मग ते असे सगळे प्रश्न विचारतात......तेव्हाच तर आपल्याला टीव्ही वर सगळं देशाची माहिती कळत असते.......राज

मेमोरी लॉस म्हणजे काय.....आणि मला काय झालं आहे.....माझी तब्बेत ठीक नाही काय......पण मी तर ठीक आहे......नंदिनी

हो तू एकदम ठीक आहे........तुला काहीच झालेले नाही...
Memory loss म्हणजे काही गोष्टी विसरणे......तू लहान असताना पडली होती तेव्हा तुझ्या डोक्याला थोड लागलं होत ....तर तू लहानपणीच्या काही गोष्टी विसरली ....बाकी काही नाही.....आणि तसे पण मला सुद्धा नाही आठवत लहानपणीच......राज ने कशीतरी वेळ मारून नेली...

पण मग मला बरेचदा कोणी कोणी काही काही का बोलत असते.....नंदिनी

नंदिनी कोणी आपल्याला वाईट म्हणाल तर आपण वाईट होत असतो काय......लोकांची कामच असतात तशी कधी वाईट म्हणतात कधी चांगल......आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं.....आपण फक्त येवढे लक्षात ठेवायचे की आपल्याला फक्त नी फक्त चांगले काम करायचे.....वाईट काम कधीच करायचे नाही.....राज

ह्म्म.........नंदिनी

.खूप   मोठ बनून दाखवायचं ना......मग फक्त आपल्या goal वर लक्ष केंद्रित करायचं....बाकी सगळं विसरायचं .......राज

ह्म्म...

हम्म....

हम्म......

हम्म.....

राज बोलतच होता की त्याचं नंदिनी कडे लक्ष गेले.....ती कधीच झोपली होती......

वेडाबई..........राज ने तिच्या कपाळावर किस केले नि तो पण सगळ्या गोष्टींचा विचार करत झोपी गेला.....

राज ला माहिती होत त्यांचा बोलण्याने तिला समाधान झाले नव्हते....आणि तसे पण आजकाल तिला बरीच प्रश्न पडायला लागली होती......पण समजाऊन सांगितले की ती समजेल ......हळू हळू वेळ जात होती तशी ती समजदार होत होती......पण आता त्याला तिच्या प्रश्नांसाठी स्मार्ट उत्तर शोधावी लागणार होती...

******

नमस्कार मित्रांनो

Comments आणि लाईक्स साठी खूप खूप धन्यवाद.....असेच कॉमेंट्स करत रहा...ज्यातून लेखकाचा उत्साह वाढतो..

ही कथा फक्त प्रेम कथा नाही.... यातले मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहचत आहेत ...खूप छान वाटतेय ...

ही एक strugglइंग story aahe .... family life..social life.. personality development ........ त्यामुळे लगेच नंदिनी ची मेमरी परत येऊन goody goody असं सध्यातरी काही होणार नाही...... स्टोरी lenghty होऊ नये म्हणून मी बरेच लावण्या.. ऑफिस नी घरचे scenes कापले आहेत....आणि राज नंदिनी वर focus केलाय.....तर थोडे राज सारखे patience तुम्ही पण ठेवा ही विनंती...

मी सगळे comments आणि मेसेजेस वाचत असते..... फक्त कधी कधी reply द्यायला होत नाही...तरी क्षमस्व ....

काळजी घ्या...स्वस्थ राहा....????

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️