Aug 16, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 84

Read Later
नंदिनी...श्वास माझा 84

भाग 84

 

( आधीच्या भागात : संगीतचा कार्यक्रम सुरू असतो , बहुतेक सगळेच डान्स आटोपले असतात... नंदिनी स्टेजवर येते , एका परी कथे द्वारे आणि तिने बनवलेल्या पेंटिंग द्वारे ती तिच्या आणि राजच्या  आतापर्यंतचा आयुष्याचा प्रवास सगळ्यांसमोर मांडते ... ज्यातून राजबद्दल असलेले तिचे प्रेम स्पष्ट दिसून येते... आणि ' मला फक्त तू हवा , तुझ्यात मला सामावून घेशील काय ?'... येवढे विचारते.... आणि त्यावर राज लगेच होकार देतो .... आता पुढे )

 

" डॉक्टर ... ?..."....राज

 

" Don't worry , काळजी करण्यासारखे काही नाही ,  ठीक आहेत त्या ... थोडा ताप आहे ...... मी इंजेक्शन दिले आहे , आराम करू द्या ,  उद्या सकाळपर्यंत एकदम नॉर्मल होतील...."... डॉक्टर

 

" Thank you Doctor ".... राज

 

" My pleasure ....." ... बोलून डॉक्टर निघून आले .

 

नंदिनीने त्याला मिठी मारली तेव्हाच राजला तिचे अंग गरम वाटले होते....आणि थोड्याच वेळात तिने त्याच्या खांद्यावर मान टाकली होती... आणि तो तिला घेऊन रूममध्ये आला होता..... रिसॉर्टला फोन करून डॉक्टरला बोलावून घेतले होते.... सकाळी हळदीच्या वेळी ती बरीच पावसात भिजली होती, आणि त्यात लग्नाची दगदग ... तिच्या अंगात थोडी कणकण होती ... खरं तर संध्याकाळपासूनच तिला थोडं गरागरल्या सारखे होत होते...पण कार्यक्रम होता म्हणून तिने दुर्लक्ष केले होते....

 

इकडे संगीत हॉलमध्ये  सगळ्यांसाठी म्हणून हाई बिट्स  म्युझिक सुरू होते  ... आणि सगळे त्यावर एन्जॉय करत होते .....

 

" राहूल ..... तू इथे एकटा काय करतोय...?? कधीची शोधतेय तुला "....रश्मी हॉलच्या बाजूला असलेल्या एका रूममध्ये जिथे राहुल एका कॉर्नर्मध्ये चेअरवर बसला  होता तिथे त्याच्या जवळ जात बोलली...

 

रश्मीला बघून राहुलला त्याचा भावना  आवराल्या  नाही आणि त्याने बसल्याबसल्या रश्मीच्या कंबरेत पकडून घेत तिला मिठी मारली....

 

" राहुल, काय झाले अचानक ? आतापर्यंत तर खुश होता ... नाचत होता ...आता एकदम असं ?"....रश्मीने पण त्याला पकडत त्याच्या केसंमधून हात फिरवत बोलत होती.

 

" रश्मी , माझं काही चुकलं कधी , तर फाईट कर   , मार मला .... पण कधीच अबोला नको धरू ..... मला नाही होणार सहन ....."..... राहूल थोडा भावूक झाला होता..

 

" हो राहूल.... अरे काल ती अशीच गंमत होती रे ...."....रश्मी

 

" I know , but still ..... promise me ...".... राहूल

 

" राहूल , अरे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ..... I love you yaar ......."... रश्मी , तशी त्याची तिच्या भोवतीची मिठी घट्ट झाली ..

 

" काय झालं राहूल , असा का बोलतोय ...... का उदास झाला असा ....?"....रश्मी

 

" रश्मी तू काही तास नाही बोलली माझ्यासोबत.... मला करमेना, कासावीस होत होते.... राजला कसे झाले असेल ग , इतकी वर्ष तो नंदिनी पासून दूर होता...मला तरी माहिती होते तुला काहीतरी करून मानवता येईलच , नाही पण मानली तरी तू काय सोडणार नाहीस मला... गंमत आहे एक होऊच.....पण राज चं ग ??.... सगळंच भविष्य अंधारात होते... पुढे काय होणार आहे काहीच माहिती नव्हते , त्याची नंदिनी त्याच्या जवळ असूनही त्याची नव्हती .... किती रडला असेल तो...किती त्रास झाला असेल त्याला .... मला विचार पण करवत नाही आहे .... कसं सहन केलं हे सगळं माझ्या भावाने ..... आज तर नंदिनीच्या बोलण्यातून , त्या फोटो मधून अश्या बऱ्याच गोष्टी कळल्या ,ज्या मला सुद्धा नव्हत्या माहिती..... Please don't leave me alone .... never ever.....".... राहूल

 

" राहूल , आपण सोबत आहोत ... आणि नेहमीच राहू .... ".... रश्मी

 

" ये शोन्या .... आता असाच रडत बसणार आहेस काय...??..  आता जुनं सगळं विसरायचं .... नव्याने सुरूवात करूयात आपण सगळे ....  बघितले ना राज दादा किती खुश आहेत .... आता आपल्याला त्यांच्या आनंदात शामिल व्हायचं आहे आणि त्यांचा आनंद , त्यांचं सुख द्विगुणित करायचं आहे .... कळतं काय मी काय म्हणते आहे ते.....?".....रश्मी

 

" ह्मम .....".....तो डोळे पुसत उठला .... रश्मीने त्याला घट्ट मिठी मारली....आणि हळूच त्याच्या एका गालावर छोटंसं किस केलं....तसा तो हसला आणि त्याने तिच्या कपाळावर किस केले....

 

" चल जायचं?? आपल्याला शोधत असतील ...."...रश्मी

 

" ह्मम.....".... राहुल

 

आणि दोघंही सगळे होते तिथे निघून आले.... पण घरच्यांचं सगळं लक्ष राज नंदिनीकडे लागून होते...सगळं आटोपून ,  सगळे आरमासाठी आपापल्या रूममध्ये निघून आले...

 

राजच्या रूमचे दार नॉक झाले .... तसे त्याने दार उघडले तर  आजीसाहेब  आबा , आई , काकी, रविकांत , राहुल उभे होते..... रश्मी पण येत होती पण उद्या लग्न, तिचा आराम व्हावा म्हणून सगळ्यांनी तिला आराम करायला पाठवून दिले होते...

 

" राज , नंदिनी कशी आहे ?" .... आबा

 

" ठीक आहे आबा,झोपली आहे  ,..थोडा ताप होता, डॉक्टर चेक करून गेले.... उद्या पर्यंत ठणठणीत होईल..."... राज

 

" हो , आज सकाळी पावसात पण खूप नाचली... ओली झाली ....."....काकी

 

" ह्मम .... तेच म्हणाले डॉक्टर......" .... राज

 

" राज हे सगळं ..... तिला आठवले काय आधीचे सगळं ?"........आई

 

" नाही आई ...... तिची मेमरी परत नाही आली आहे .....".... राज

 

" मग हे सगळं आधीचे ??.." पण काही क्षण फक्त तुमच्या दोघांमधले होते .... ते कसं कोण सांगणार ? तुझा काही गैरसमज "..........."...

 

( नंदिनीने पेंट केलेल्या काही फोटोंमध्ये फक्त राज आणि तिचे काही फोटो होते , जसे राज तिच्या गळ्यात ते डायमंडचे पेंडंट चेन घालत होता...... रात्री छतावर नंदिनिने त्याच्या पायावर उभं राहतं कपल डान्सचा फोटो .........ते बघून राज पण शॉक होता )

 

" तेच तर मला पण नाही कळत आहे .... पण तिची मेमरी नाही आली आहे ......तिची स्मृती परत आली असती तर तिने मला राज नाही शरू म्हणून आवाज दिला असता......"....राज 

 

" तिला सगळ कळलं आहे कोणाकडून तरी ......".... राज राहूलवर नजर रोखत बोलला.....

 

" मी का पडू तुमच्या दोघांमध्ये ...... तुझं प्रेम तूच व्यक्त केले आहेस तिच्या पुढे......"..... राहूल

 

" Are you mad ......??.... मी काहीच नाही बोललो तिला ..."...... राज

 

" तूच बोलला आहेस ..... मी फक्त ते तिच्यापर्यंत पोहचवायचे काम केले.....".... राहूल

 

" काय ?"...... राज , बाकीचे पण त्या दोघांकडे बघत त्यांचं बोलणं ऐकत होते....

 

" नंदिनी ठीक आहे ना ?"...… नंदिनीचे आबा आणि आजी तिथे येत बोलले

 

" हो आबा ठीक आहे , झोपली आहे "..... राज आणि त्याने परत राहूलकडे मोर्चा वळवला....

 

" तू हा असा दर्दी देवदास बनून फिरत होता....दोघंही एकमेकांवर इतकं प्रेम करता ....दोघंही गैरसमज करून बसले ..... दोघंही एकमेकांच्या खुशीसाठी त्यागाची मूर्ती होऊन बसले.... माझ्या पेक्षा ग्रेट त्यागमुर्ती कोण जसं काही सिद्धच करायचे होते तुम्हाला....तिला वाटले तुला कोणी दुसरी आवडते, तुला वाटले तिला.....अरे पण एकदा बोलून तर घ्यायचं? तू पण आगाऊ , तिच्या शो ला तरी यायचं होते..... त्याच दिवशी सांगणार होती ती तुला .....पण नाही महाशयांनी वेगळाच प्लॅन केला होता .... किती बोलला होता तू  तिला.... अगदी माझ्या डोळ्यांसमोर येऊ नको , असं म्हणाला होता ..... किती दुखावली गेली होती ती .... किती रडली..... शेवटी तुझी इच्छा ठेवायची म्हणून तू उठायच्या आधी गेली सुद्धा होती..." ..... राहूल

 

हे सगळं तर बाकी घरच्यांसाठी नवीन प्रकरण होते...

 

" अरे राज , मी सांगितले नंदिनीला सगळं ... नको त्याला बोलू काही ".... नंदिनीची आजीमध्ये बोलली

 

" ती त्या दिवशी अचानक आली ........ डोळे  खूप सुजले होते .....तिला विचारले काय झाले तर झोप नीट नाही झाली म्हणून  तिने सांगितले......तू का सोबत नाही आला विचारले  तर तुझ्या हाताला लागले आहे , आणि मला तुमची खूप आठवण येत होती असे बोलत होती.........तेव्हाच तिचं काहीतरी बिनसले आहे जाणवत होते ...... ......थकली आहे , आराम करते म्हणून आतमध्ये चालली गेली.......तुला फोन करायचं म्हटले तर मला नको म्हणाली......मग विचार केला आधी नंदिनी सोबत  बोलावं .....मग तुझ्यासोबत ...... म्हणून मी पण शांत बसली ... "....आजी

 

सगळे आजीचे बोलणे ऐकत होते ....

 

"थोड्या वेळाने तिला जेवायला म्हणून बोलवायला गेले तर रडत रडत एक कुठली तरी वही वाचत होती....मी घाबरली तिला असे रडतांना बघून ....तिला विचारले तर मला म्हणत होती  " आजी , राज माझा बालपणीचा मित्र आहे ना ?" "....तिचा प्रश्न ऐकून मी तर आश्चर्यचकित झाले , आणि थोडे गडबडले सुद्धा , कळत नव्हते काय बोलू .....तिने परत तोच प्रश्न केला.... आणि मी हो म्हणाले ..... तिच्या डोक्यात खूप प्रश्न सुरू होते.... पण तिचं डोकं सुद्धा खूप दुखत होते... जेवून घे म्हणत होती तर तिचं आपलं भलतंच सुरू होते ....

 

" आजी ,  या डायरीमध्ये खूप काही लिहिले आहे ... माझं बालपणीच्या गोष्टी.....अगदी लहान सहान गमती जमती.....  मला हे काहीच आठवत नाही आहे .... हे सगळं मी कधी जगली?......".....नंदिनी खूप पॅनिक झाली होती ....

 

" नाही आठवत कधी , होतं असं कधी कधी ... चल जेवून घे "....आजी

 

" आजी, या डायरीमध्ये लिहले आहे मी B.Sc शिकत होते ..... पण मी तर fine arts शिकत होती ..... मी राज सोबत फोनवर बोलत होती.... तो कधी पहाटेला तर कधी मध्यरात्री फोन करायचा..... तो शिकायला अमेरिकाला गेलेला आहे ते माहिती आहे .... पण हे सगळं .... हे काहीच आठवत नाही आहे ..... माझं डोकं दुखतेय खूप "..... नंदिनी

 

" नंदिनी , हे  बघ रात्री झोप नाही झाली तुझी , त्यात प्रवास....... जेवण कर आणि आराम कर  बरे वाटेल आहे ...."....आजी  तिला समजावण्याचा सुरात बोलत होती.

 

" आजी , तुम्ही सगळे माझ्या पासून काहीतरी लपवत आहेत..... आणि आणि .... यात त्या नंतर काहीच लिहिले नाही आहे ... पुढल्या पाच सहा वर्षाचं काहीच नाही आहे ..... डायरेक्ट आता मी अमेरिकाला गेले तेव्हा पासून लिहिले आहे ..... आजी सांग मला , नाही तर मी जेवणार नाही आणि तुमच्या कोणासोबत बोलणार पण नाही ...."...नंदिनी खूप हायपर झाली होती.

 

तेवढयात एक फोन आला... आजीने फोनवर बोलून फोन ठेऊन दिला....

 

" राहुल फोन करतोय तुला .... तू उचलत नाही म्हणाला......कमीत कमी पोहचल्याचे तर कळवायचे होते ....तिकडे सगळे काळजी करतात तुझी ..... "....आजी

 

" माझं लक्ष नाही फोनकडे  ......तू मला आधी हे सगळं सांग ....मला माहिती तुला माहिती आहे सगळं.....मला खूप दिवसांपासून वाटते आहे तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवत आहात...आणि हो माझं लग्न?? माझं लग्न बद्दल तर राजने काहीच लिहिलेलं नाही यात.....इतक्या लहान सहान गोष्टी त्याने लिहिल्या आहेत.....मग ही इतकी महत्वाची गोष्ट कशी नाही लिहिली त्याने ....आजी बोल ना ...मला घाबरायला होत आहे आता ... ".... नंदिनी

 

" हे बघ नंदिनी , सांगते मी तुला सगळं, पण बाळा आधी जेवून घे .... तुला बरं नाही वाटत आहे ... औषध घे ....नाहीतर तब्बेत खराब होईल....तुझे आबा पण नाही घरी....राज पण नाही आहे .... बरं वाटलं तुला की सगळं सांगते ...".... आजी

 

" जबरदस्ती नंदिनीला खाऊ घातले , औषध दिले ... औषधांमुळे हळूहळू तिला झोप लागली .......संध्याकाळी उशीरानेच उठली , आणि परत तिने तोच नांदा लावला.....येव्हणा तिचे आबा पण घरी आले होते .......तिने इतका गोंधळ घातला की शेवटी तिला सगळं सांगावे लागले....आणि राहुलने पण फोनवर थोडा अंदाज दिला होता .... .. " .. आजी बोलत होती

 

" खूप रडली पोर त्या नंतर..... कसं सांभाळावे काहीच कळत नव्हते....' माझ्यामुळे राजचं आयुष्य खराब झाले .....मी खूप दुखावलं राजला , खूप त्रास दिला......आणि काय काय बडबड करत होती.. स्वतहालाच दोष देत होती .....खूप समजावले तुझा दोष नाही त्यात....... पण तरीही रडणं काहीच कमी होईना.....रडून रडून दमली, आणि मग शांत झाली..... परत तिला काही आठवलं आणि आता घरीच जायचं म्हणत होती..... तेव्हा रात्र झाली होती...पण तिचा हट्ट सुरूच होता.....तिच्या आबांनी समजावले तिला... आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जा म्हणून कशीतरी तिची मनधरणी केली...... देव पावला आणि नंदिनीने ऐकले.... तिची ही अवस्था होती , असे वाटत होते परत रात्रीतून तब्बेत बिघडते की काय ....नाहीतर तुलाच बोलवावे लागले असते....पण झालं नीट सगळं .... पण बाईसाहेब काही केल्या रात्रभर झोपल्या नाही.... पहाटे चार वाजताच तयार होऊन बसल्या ... माधवला कधी येतो म्हणून फोन करून परेशान करून सोडले तिने.... आला शेवटी तो एकदाचा गाडी घेऊन पहाटेच पाचला.... मला आणि यांना म्हणाली कोणाला काही सांगू नका.... काय ते सरप्राइज द्यायचं आहे ....म्हणून मग आम्ही काही बोललो नाही.... वाटलं होऊ देत तिच्या मनासारखं.... खूप परीक्षा दिली मुलांनी ..... सुख कुठे आता आयुष्यात येऊ बघत होते....""....आजी बोलता बोलता भाऊक  झाल्या....राजला नंदिनीची अवस्था  ऐकून थोडं गहिवरून आले...." तिला जेव्हा माझी गरज होती तेव्हाच मी तिला दूर केले" सतत त्याच्या डोक्यात तिच्यासोबत त्याचं तुटक वागणं आठवत होते ...... बाकीच्यांना पण वाईट वाटत होते....

 

" मला  अवॉर्ड शो च्या दिवशीच कळले होते की   'Nandini loves you' ..... पण तिनेच मला तुला काही सांगायचं नाही वचन घेतले होते.... मग नाही सांगू शकलो तुला....पण ती गावाला जात होती त्या दिवशी नाही बघावला गेला मला तिचा त्रास .......शो च्या रात्री तुला झोपवून तुझं काही सामान तुझ्या ड्रॉवरमध्ये ठेवायला गेलो तर त्यात एक डायरी दिसली .... ' नंदिनी '   लिहिले होते त्यावर ... म्हणून ओपन केली फक्त पाहिले पेज वाचले आणि लक्षात आले की तू लिहितो आहे ते.....तुझं तिच्यावरच प्रेम आहे हे आता कळने मला गरजेचे वाटले ... त्या डायरीमध्ये काय आहे मला माहिती नव्हते....पण नक्कीच काहीतरी खास असेल मला वाटत होते....मग मीच  ती  डायरी तिच्या पर्समध्ये ठेऊन दिली होती.... इथे आल्यावर तिने माझ्याकडून सगळं वदवून घेतले.....लग्न नंतर काय झालं वैगरे सगळं सांगितले तिला...."..... राहूल

 

" पण नंदिनीला काही झालं असते तर....?".....राजचा काळजीचा सुर निघाला

 

" मी आधीच तिच्या डॉक्टरांशी बोलून सगळं डिस्कस केले... Medicines पण पाठवल्या होत्या.....आणि गरजच पडली तर डॉक्टर सुद्धा तयार होते ....".... राहूल

 

" Sorry" .... म्हणत राजने राहूलला मिठी मारली ...

 

" किती मार दिला यार तुझ्या बायकोने मला  .... माझी कॉलर सुद्धा सोडली नाही .... फूल प्लॅनिंगनी आल्या होत्या मॅडम..... काय करते आहेस विचारले तर ' तुझी वहिनी बनायचा प्लॅन आहे म्हणे अन् तुझी पण वाट लावेल म्हणाली '..... ".... राहूल , सगळे अचानक भाऊक झालेले बघून राहूलने मस्करी केली...तसे सगळे हसायला लागले....

 

" हो , वाट तर तिने माझी लावलीच होती...".....राज सुद्धा हसायला लागला....

 

सगळ्यांच्या शंकांचे निरासन झाले होते..... उशीर झाला पण आता सगळं ठीक झाले याचेच सगळ्यांना समाधान वाटत होते ... आणि आता राजचे वैवाहिक जीवन मार्गस्थ लागेल याचा सगळ्यांना खूप आनंद झाला होता.....

 

" बरं , चला झोपा आता लवकर ... उद्या लग्न आहे ... सकाळी लवकर उठावे लागेल...."....आबा

 

" उद्या आम्हाला आमच्या दोन्ही नातसूना भेटणार..... आमचा परिवार पूर्ण झाला.... आता कशाचच मागणं नाही ... अंबामाई  तुमचे आभार मानावे ते तेवढेच कमी  " .... आजीसाहेब हात जोडत बोलल्या...

 

" काय... कशाचंच मागणं नाही म्हणे..... आता उद्या लग्न झाले की परवा पासून पणतू पणती मागणं सुरू कराल तुम्ही लोकं "...... राहूल

 

" गधड्या ...... जिभेला काही हाडच नाही तुझ्या ..... "...राहुलच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला...

 

" सत्य बोलायला पण मार खावा लागतो..... माझंच लग्न आहे.... कार्यक्रमाचा उत्सवमूर्ती मीच....मलाच मारता राव तुम्ही लोकं ....."..... राहुल आपली पाठ चोळत होता....सगळे मात्र खळखळून हसत होते.

 

एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या रूममध्ये आराम करायला निघून आले.....राजसुद्धा आतमध्ये आला  आणि फ्रेश झाला.....

 

डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यामुळे ती शांत झोपली होती ...राज तिच्या डोक्याच्या शेजारी  बेडवर  येऊन बसला....तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता....' मला तुझ्यात सामावून घेशील काय ?' ....हे तिचं वाक्य आठवून त्याला गहिवरून आले ...

 

" तशीच आहे ही चिमणी... जशी आधी होती.... काहीच बदललं नाहीये ".....राज , तिने सगळ्यांच्या नकळत केलेलं त्याच्या गळ्याजवळ किस , येवढ्या भाऊक क्षणी सुद्धा तिने केलेला  तिचा तो खोडकरपणा , ते आठवून त्याला तिचं हसू आले ... त्याने हळूच तिच्या कपाळावर किस केले.....

 

तिच्याकडे बघत त्याला जुन्या गोष्टी आठवत होत्या.... आज तो  इतका  खुश होता  की त्याच्या ओठांवरचं हसू आज कायम होते.... आज त्याचं हृदय सुद्धा हसत होतं.... उड्या मारू, गाणे म्हणू की नाचू अशी त्याची अवस्था झाली होती.....जसे काही त्याने पहिल्यांदा नंदिनीला प्रपोज केले आणि तिने होकार दिला ... असेच फिलिंग त्याला येत होते.... आज परत तो २१-२२ वर्षाचा झाला होता.... पहिल्यांदा त्याने नंदिनीच्या अठराव्या वाढदिवसाला आपले प्रेम तिच्यापुढे कबूल केले होते....तेव्हा जो आनंद त्याला झाला होता अगदी तसाच होत होता....नंदिनीला आपल्या मिठीत घेऊन तिच्यासोबत सेम तसाच डान्स करायची इच्छा होत होती .... पण नंदिनी मॅडम, त्या तर मस्तपैकी झोपल्या होत्या... आपल्या मनातले बोलल्या आणि झालं.... त्याचं काही ऐकूनच घेतले नाही .... तापाने फणफणल्या होत्या ....त्यामुळे तो चुपचाप तिच्याकडे बघत बसला होता....सगळ्या जुन्या आठवणी आठवतच कधीतरी त्याचा डोळा लागला...

 

रात्री कधीतरी राजला नंदिनीची चुळबुळ जाणवली.... राजचे लक्ष गेले  तर तिला तिचे घातलेले दागिने टोचत होते ..... संगीत कार्यक्रमातून त्याने तिला वर रूममध्ये आणलं तेव्हा तिला चांगलाच ताप चढला होता...त्यामुळे कपडे किंवा दागिने बदलणे जमले नव्हते...ती तशीच झोपून गेली होती.... पण आता मात्र तिला ते अस्वस्थ करत होते ..... पण ती मात्र औषधाच्या गुंगीत होती.... राजने ती उठणार नाही याची दक्षता घेत सगळे दागिने हळूहळू काढून बाजूला ठेवले....केसांचा आंबडा पण सोडला....कपडे मात्र त्याने बदलले नाही.... आता नंदिनीला सगळं समजत होते.... त्यामुळे तिच्या परवानगीशिवाय तिचे कपडे बदलणे त्याला योग्य वाटले नव्हते  ...... रात्रीचे जवळपास 2 वाजले होते त्यामुळे दुसऱ्या कोणाला उठवणे सुद्धा त्याला योग्य वाटले नाही .....राज तिच्या बाजूने उठत सोफ्यावर झोपायला जाणार तेवढयात तिने झोपेतच त्याच्या अंगावर हात टाकला.... दागिने टोचत नसल्यामुळे परत ती शांत निवांत त्याला पकडून झोपली ..... तो पण मग तिच्या जवळच बसल्या जागी झोपला....

 

उद्याचा सूर्योदय सगळ्यांच्या आयुष्यात एक नवी किरण, नवी स्वप्न ....नवी नाती ..... घेऊन येणार होता..... सगळ्यांची आयुष्य ज्या एका वळणार अडकली होती.... ती वाट आता परत सुरळीत होणार होती...

 

*******

 

क्रमशः

 

*******

 

नमस्कार मित्रांनो

 

या कथेला तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्यासाठी मी आपल्या सगळ्यांची खूप आभारी आहे .... भाग 83 वर तर आपण सगळ्यांनी  लाईक्स आणि कॉमेंट्सचा तर कौतुक रुपी अक्षरशः  पाऊस पाडला.... त्यासाठी तुमचे आभार मानण्यासाठी शब्द पण कमी आहेत....

 

या कथेने खूप रडवले...त्यासाठी खूप खूप सॉरी ..... नेहमीच हसावण्याचा/आनंद वाटण्याचा  प्रयत्न असतो पण कधी कधी कथानकाची गरज म्हणून थोडे भावनिक शब्द टाकावे लागले....

 

नंदिनीने राज ला शरू म्हणून आवाज द्यावा , अशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती... सॉरी ती पूर्ण करता आली नाही.... ( त्यासाठी सिनेमा मध्ये दाखवतात तसे काही अपघात वैगरे घडवून आणावा लागला असता.... )

 

मागच्या भागात क्रमशः न लिहिल्यामुळे बऱ्याच वाचक मित्र मैत्रिणींचा गोंधळ झाला की कथा संपली...तर मी सांगू इच्छिते की काही भाग येतील पुढे...पण आता काही भाग नंतर कथा निरोप घेईल....

 

परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद !!


*******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️