Jan 27, 2022
विनोदी

नंदिनी...श्वास माझा 82

Read Later
नंदिनी...श्वास माझा 82

भाग 82

( आधीच्या भागात : एका हॉल मध्ये मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो , राहुल लहान मुलांसोबत प्लॅन करून रश्मीला मनवण्यात यशस्वी होतो. नंदिनी ने सुद्धा तिच्या हातावर सुंदर अशी मेहेंदी काढली असते ... ती राज ला दाखवते...तिला तसे बघून राजाला आधीची नंदिनी आठवते .... रश्मीला तिची आई आणि बहिण खाऊ घालत असतात तेव्हा नंदिनीचे मन भरून येत... ते बघून राहुल तिला जेवण भरवतो.... आता पुढे....)

जूनचा शेवटचा आठवडा सुरू होता...... प्रसन्न सकाळ,  आज थोडं आभाळी वातावरण होते ..... तसे तिथे थंड आणि शांतच वातावरण होते....अधूनमधून सकाळची  कोवळी  सूर्याची किरणं ढगामागून डोकावत होती.....उन्हाळा असून सुद्धा तिथली सृष्टी हिरवीगार होती.... उंच पहाडावरचे ठिकाण असल्यामुळे अधून मधून ढग जवळ येत होते.... खूप सुंदर असे नयनरम्य दृश्य होते......

आज हळद...आणि संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम होता...... सगळेच हळदीच्या तयारीमध्ये लागले होते.... रिसॉर्ट मध्ये एक ओपन पण मोठा शेडेड एरिया होता...तिथेच हळदीचा कार्यक्रमाची कलरफूल झिरझिरीत पडदे , मिरर स्ट्रिंग्ज , फुलांची सजावट केली होती.... मधून मधून  छता पासून खाली फुलांची छोट्या छोट्या झुंबर सारखी लटकन खाली आली होती.....  मधोमध थोड्या अंतरावर  दोन थोडे उंच चौरंग सुशोभित करून ठेवले होते.... सगळी पाहुणे मंडळी हळू हळू तिथे जमत होती.... आता वाट फक्त होणाऱ्या वधू वराची होती....

आजची थीम होती पांढरा - पिवळा रंग.... बहुतेक सगळेच महिला मंडळींनी  पिवळ्या रंगाच्या शेड परिधान केले होते....तर पुरुष मंडळींनी कोणी पिवळा कुर्ता, शर्ट , किंवा पांढरा कुर्ता शर्ट घातले होते... हा पण बायकांचाच कार्यक्रम म्हणून सगळ्या बायका पुढे होत्या...पुरुषांसाठी बाजूने बसायला सोय केली होती...

राजने पांढरा लीनेन चा फिटिंग चा शर्ट आणि लाईट ब्ल्यू रंगाची जीन्स ... तो एकदम कॅज्युअल लूक मध्ये होता.... नंदिनी मात्र एकदम ट्रॅडिशनल तयार झाली होती... तिने गोल्डन  हळदी रंगाचा  Brocade silk चा कमी घेर असलेला घागरा , स्लिव्हलेस ब्लाउज , त्यावर नेटची  साडी सारखी ओढणी घेतली होती....( राज ने केलेली शॉपिंग होती...नंदिनीला साडी नीट सांभाळता येत नाही लक्षात ठेऊन त्याने सगळी शॉपिंग केली होती....) केसांचा मधातून भांग काढत, कानापासून थोडे केस मागे क्लिप मध्ये अडकवत मोकळे सोडले होते , त्यात फुलांसारख्या डिझाईन ची डार्क गुलाबी बिंदी केसांच्या भांगेतून मागे घेत कपळवर सोडली होती...कानात मॅचींग मोठे गोल भरीव डिझाईन चे रींग्ज त्याला हिरव्या छोट्या मोत्यांचे लटकन... हातात थोड्या हिरव्या काचेच्या बांगड्या...साजेसा साधाच मेकप , कपळवर पिवळी गोल्डन स्टोनची टिकली.....नेहमी प्रमाणेच ती आजही सुंदर दिसत होती.... एका साईड ला बसत ती बायकांची सुरू असलेली लकबक , चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह बघत होती........ तिची पण हळद अशीच असती..... विचार करत तो बघत होती....

 

 

राहुल ने रश्मीला मॅचींग कुर्ता आणि व्हाईट पायजामा घातला होता.... तो सुद्धा आपल्या मित्र आणि भावंडांसोबत तिथे येऊन बसला होता....

आता रश्मी तिच्या मैत्रिणी आणि बहिणींसोबत येत होती....रश्मीने पिवळी प्लेन साडी , त्यावर मोगर्याचे आणि रेड रोज फुलांच्या कॉम्बिनेशन चे दागिने घातले होते...अगदी फुलांची राणी दिसत होती ती....

 

 

तसे तर नवरा नवरीची हळद वेगवेगळी असते, पण आता सगळेच कार्यक्रम एकत्र करायचे ठरले त्यामुळे हळदीचा कार्यक्रम सुद्धा एकत्रच होता... राहुल मध्ये ठेवलेल्या चौरंगावर बसला होता.... रश्मीला सुद्धा त्याच्या बाजूला असलेल्या चौरांगवर बसवण्यात आले.... त्यांच्या पुढे एका नक्षीदार पारंपरिक भांड्यामध्ये हळद सजवून ठेवली होती.... आता पारंपरिक पद्धतीने हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता...

राहुल हळद लावून तीच उष्टी हळद रश्मीला लावण्यात आली.... नंतर घरातील सगळ्या बायका एक एक करत त्या दोघांना हळद लावत होत्या....राहुल आणि रश्मी दोघेही खूप खुश दिसत होते ..

" चांगली खूप हळद लाव ग रश्मीला .... राहुलरवांपुढे रंग छान निखरायला हवा....."....रश्मी कडील एक नातेवाईक बाई बोलल्या

ते ऐकून रश्मीच्या चेहरा थोडा पडला....नंदिनी तिथेच बाजूला उभी होती..
अनवधानाने का होईना पण  वारंवार रशमीची आणि राहुलची रंगावरून होणारी तुलना कुठेतरी नंदिनीला सुद्धा आवडत नव्हती...

" नाही हा मावशी , आधीच आमचा राहुल रश्मीच्या रंगात रंगला आहे... आता रंग बदलायला नको.......काय राहुल बरोबर ना......?"....नंदिनी त्या दोघांना हळद लावत त्या पाहुण्या बाईंना उद्देशून म्हणाली...तसा राहुल ने हसत रश्मी कडे बघत  होकार दिला ...... ते बघून रश्मीचे कोमेजलेले हसू परत उमलले.....तिचा तो आनंद परत चेहऱ्यावर पसरला.....पण त्या मावशी बाईंच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला....

" खूप उद्धट  आहे देशमुखांची मोठी सून.... मोठ्यांपुढे कसे बोलावे , येवढे ही कळत नाही?? .... त्यात आपल्या दिराला पण राहुल भाऊजी म्हणायचं सोडून राहुल राहुल करतेय.....मोठ्या घरच्या लोकांचे रंगच वेगळे..... रश्मीला तर आपल्या मुठीत करेल....लक्ष दे बाई रेवती ....."....त्या पाहुण्या बाई कुचकट बोलत होत्या...

" असं काही नाही आहे ....हा थोड्या सरळ बोलणाऱ्या आहे , कोणाची मन दुखलेली त्यांना आवडत नाही....म्हणून तेव्हाच्या तेव्हा बोलून देतात पण साफ मनाच्या आहेत....... "....रेवती रशमीची आई

" मला तर उद्धट आणि आगाऊ वाटते...बघ मी सांगायचं काम केले...तुमचं तुम्ही बघा.... या श्रीमंतांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे...." ...त्या बाई.

" वहिनी , असे काही नाही , काळजी नका करू तुम्ही...."...रेवती

कार्यक्रम सुरू होता की तेवढयात मुजिक  आवाज वाढला आणि रुची ,  रश्मीच्या मैत्रिणी , मावस चुलत बहिणी समोर येत रश्मी राहुलच्या भोवती नाच करत होत्या..........आता त्यांनी नंदिनीला पण आपल्या मध्ये ओढले.... नंदिनीने बाजूला ठेवलेला आपला काळा गॉगल उचलला आणि डोळ्यांवर लावला... तिला बघून रुची आणि सगळ्यांनी आपले गॉगल चढवले.... आणि आता मधोमत जाऊन, कंबरेवर हात ठेवत  सगळ्यांनी  ठेका धरला.....राज एका बाजूला उभा नंदिनीची ही मस्ती बघत होता.....पिवळा गेटअप , त्यात हळदीने माखलेले अंग , त्यावर डोळ्यावर काळा चष्मा..आणि चेहऱ्यावर खट्याळ भाव   ....त्या रुपात त्याला ती खूप क्यूट वाटत होती....

नवराई माझी लाडाची-लाडाची ग
आवड़ हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची-नवसाची ग
अप्सरा ज(स)शी इंद्राची-इंद्राची ग
नवराई माझी...

बौराई चली शरमाती, घबराती वो
पिया के घर इठलाती, बलखाती वो
सुरमई नैना छलकाती-छलकाती वो
पिया के घर भरमाती, सकुचाती वो

राजचा फोन वाजला तसा तो तिथे आवाजाचा गोंधळ होता म्हणून थोडा दूर जाऊन बोलत होता....

तिथली बाकीची मंडळी पण त्यांच्यामध्ये शामिल झाली.... सगळे एकमेकांना उरलेली हळद लावत होते.... आता सगळ्या मुलींनी नंदिनीला घेरले होते, ........ त्यांनी नंदिनिवर अक्षरशः सगळी हळद ओतली होती.....नंदिनी मात्र त्यांना चुकवायचा प्रयत्न करत घोळक्यातून बाहेर पळत आली......बाकीच्या तिला हळद लावण्यासाठी तिच्या मागे होत्या......नंदिनी पळत असताना अचानक राजला धडकली ..... राजचा फोन खाली पडला... ...नंदिनी स्वतहाला सावरत उभी राहिली......फोन उचलत मागे वळून बघितले तर नंदिनी उभी होती.... पळल्यामुळे तिला चांगलीच धाप लागली होती, ती जोरजोराने श्वास घेत राजकडे बघत होती. .... राजला बघून सगळ्या मुली मागेच जगाच्या जागी थांबल्या.....

" अरे राज भाऊजी कोरे कसे राहिले??..... मुलाचा भाऊ आहे , त्यांना पण हळद लागायला हवी "...... रेवा वहिनी

" पण हळद तर सगळी संपली..... आताच नाहीका का नंदिनीच्या अंगावर ओतली सगळी....".....

" अरे....असे नाही चालायचे , हळदीच्या दिवशी सगळ्यांना हळद लागायला हवी...... "...

" नंदिनी ,तू तिकडे बोलली ना राहुल रश्मीच्या रंगात रंगलाय..... आता तूच बघ बाबा राजला आपल्या रंगात कसे रंगवायचे ते?......"....एक मोठी ताई

मुलींचे बोलणे सुरू होते....नंदिनी राजकडे बघत होती....त्यांचं बोलणं ऐकून ती राज कडे बघत गालात हसली........ राज तिच्याकडे बघत होता.....तिच्या डोळ्यात त्याला  वेगळे भाव जाणवत होते....काहीतरी वेगळं होते आज , जे रोज असायचे तसे नव्हते .... ती लाजत होती......तो तिचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होता...

" अग बघत काय बसलीय.... लाव त्याला हळद "....ताई

नंदिनीने मागे वळून मुलींकडे बघितले.... 

" अग लाजते काय?..... तुझाच नवरा आहे तो.... जा पुढे.....".....

ते ऐकून नंदिनी हळूहळू एक एक पाऊल टाकत राज जवळ जात होती......ती आता त्याच्या खूप जवळ पोहचली होती......राजला तर काहीच कळत नव्हते ती काय करते आहे.......त्याच्या सगळ्या बहिणी , वहिनी वैगरे असल्यामुळे त्याला काही बोलता सुद्धा येत नव्हते..... ..तो फक्त तिला बघत उभा होता ...

दोघांना मोकळं सोडावं म्हणून ताईने तिथे सगळ्यांना तिथून जायला सांगितले....हळू हळू तिथून सगळे गायब व्हायला लागले....

नंदिनी पुढे गेली...तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या मानेला पकडले......आपले पाय उंचावले.....एकदा त्याच्या डोळ्यात बघितले आणि त्याच्या एका गालावर आपल्या गालाचा स्पर्श केला...........त्याच्या हृदयची धडधड वाढली होती.... श्वास रोखल्या गेले........तिच्या त्या स्पर्शाने आपोआप त्याचे डोळे बंद झाले......नंतर तिने आपला दुसऱ्याला गाल त्याच्या दुसऱ्या साईडच्या गालावर घासला.....थोड्यावेळ साठी तर त्याला काय होतंय काळात नव्हते.... डोकं पण पूर्ण ब्लँक झाले होते.....नंतर नंदिनिने आपल्या नाकाने त्याचा नाकाला धक्का लावला...तसे त्याने डोळे उघडले.....तर नंदिनी  गोड हसत त्याच्याकडे बघत उभी होती....

मघाचा राहिलेला फोन अर्ध्यातच कट झाल्यामुळे परत वाजला.... तसा तो भानावर आला.....

" नंदिनी , मर्यादे मध्ये राहायला हवे, लोकांना दाखवायला हे सगळं करायची काही आवश्यकता नाही आहे..."...... त्याने तिच्या कंबरेला पकडत तिला दूर केले.....

त्याच्या त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात पाणी तरळल....त्याचे ते चटकन बोलणं तिच्या मनाला लागले.....

" अरे तुम्ही इथे आहात??, कधीचे शोधतोय तुम्हा दोघांना... ...."... राहुल त्यांना शोधत तिथे आला......बोलतच होता की नंदिनीच्या डोळ्यात त्याला पाणी दिसले.....त्या दोघांमध्ये काहीतरी गडबडले आहे त्याचा लक्षात आले...

" नंदीनी तू ठीक आहे?? काय झाले रडायला...?"..... राहूल..

" काही नाही रे..... राजला हळद लावत होती तर याची दाढी रुतली मला.......".....नंदिनी चेहऱ्यावर उसण हसू आणत बोलली.... राज मात्र दोघांवर एक नजर टाकून फोन पिकप करत बोलत पुढे गेला....

" नंदिनी , काही बोलला काय तो??? खरंच काही नाही झाले ना?? ...."...... राहुल

" नाही रे , खरंच काही नाही ....आणि तो मला कधीतरी माझं मन दुखावेल असे काही बोलतो काय??....."....नंदिनी

" ह्मम ..... बर चल , थोडं काय ते राहिले आहे .... आई आवाज देत होती तुला.....".....राहुल

" हा.... तू हो पुढे , मी आलेच......".....नंदिनी

" ठीक आहे , ये लवकर.....".....राहुल बोलून पुढे निघून आला....

नंदिनी मात्र पुढे जाणाऱ्या  पाठमोऱ्या राजकडे बघत होती......तेवढयात अचानक   पाऊस सुरू झाला......आणि हळूहळू त्याचा वेग वाढत होता.....

" पावसाळ्याचा पहिला पाऊस ,  हळद लागली  , देवाचा आशीर्वाद सुद्धा मिळाला आहे राज  आपल्याला.... तुझी माझी जोडी नेहमीच राहील....तू माझा ,मी तुझी.... आता तर सगळ्या मर्यादा ओलांडायच्या आहेत तुझ्यासोबत ..... राज , स्वतः पण मर्यादेत , संयमाने राहतो तू , कोणी माझ्यावर चुकूनही  बोट उचलू नये याची सुद्धा काळजी घेतो तू..... आज परत नव्याने तुझ्या प्रेमात पडले....".....तिचे  रडवले डोळे आता आनंदाने भरले होते......... आणि पावसाचा आनंद घेत..... ती सगळे होते तिथे गेली....

  ऋतुचा  पहिला पाऊस कोणाला हवाहवासा नाही वाटत..... पावसामुळे येणार तो मातीचा सुगंध....तुमच्या सगळ्या महागड्या परफ्यूमच्या सुगंधाला मागे टाकतो .....पाऊस आल्यामुळे सगळेच भारी खुश झाले होते....हळदीचा कार्यक्रम झाला होता ...मोठी मंडळी आपल्या रूममध्ये आंघोळ करायला निघून आली होती..... रश्मी आणि राहुलला सुद्धा तिथे थांबू नव्हते दिले .... नंदिनी आणि बाकी सगळे मात्र पावसात धमाल डान्स करत होते..... DJ चा आवाज वाढला आणि इकडे यांची मस्ती.....त्यानंतर नंदिनी रिसॉर्टच्या एका कॉर्नरला  जात तिथे उभी होती. तिथून महाबळेश्वरचे सौंदर्य खूप छान दिसत होते.... पाऊस, हिरवी झाडं , खाली आलेले थोडे ढग.... सगळ्यांचा बेधुंद आनंद लुटत होती...

राज तिथून सरळ आपल्या रूममध्ये निघून आला होता......नंदिनिने लावलेली त्याच्या गालाला हळद, तो स्वतःलाच आरसामध्ये बघत होता...आणि परत त्याला ते क्षण आठवले.... आणि मग तो बोलल्यामुळे तिच्या डोळ्यात आलेले पाणी.....बाहेर पाऊस पडत होता....तो खिडकीजवळ येत उभा होत बाहेर पडणारा पाऊस बघत होता...त्याचा आवडता हवाहवासा पहिला पाऊस....नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला तो नंदिनीच्या गावाला जायचा....मग हा असा जूनचा पाऊस , नंदिनी सोबत खूप भिजायचं पावसात... मनसोक्त नाचायचं......पण आज हाच पाऊस मनाला रडवत होता....

" जास्ती बोललो काय नंदिनीला ??... ती तर हवा तेव्हा हवा तिथे स्पर्श करू शकते मला... मग मी का चिडलो तिच्यावर ...? मला हवा वाटत होता तो स्पर्श , ती अशी जवळ हवीशी वाटत होती...मग तरीही चिडलो मी तिच्यावर .... "

" तिचा आजचा स्पर्श मैत्रिणी सारखा नव्हता...वेगळा होता... तिचे प्रेम आहे दुसऱ्यावर ... ती अशी माझा जवळ नाही येऊ शकत.... हे चूक आहे , विश्वासघात आहे आपल्या प्रेमासोबत...... हे नवराबायको असल्याचं नाटक आता नाही सहन होत आहे .... कधी कधी हे लग्न होते आहे , कधी हे सगळे जातात असे झालंय.... मला नाही जमत आहे हे नाटक आता करायला..... ".... राज बाहेर पाऊस बघत विचार करत होता..

आज नंदिनीचा झालेला स्पर्श त्याला वेगळा भासला होता.....काहीतरी वेगळं होते... मन काही वेगळं बोलत होते तर डोकं काही वेगळं सांगत होते ... डोकं आणि मन  दोघांमध्ये आता  द्वंद्व सुरू झाले होते....

त्याने ओले कपडे बदलले, आंघोळ केली.....पण डोक्यात सुरू असलेले विचार काही थांबायचं नाव घेत नव्हते...

" काय झालंय आमच्या नात्याला..??.. का असे वेगळे वळण घेऊ बघत आहे ? ....  नंदिनीच्या मनात काही वेगळं.....की माझा काही गैरसमज झाला आहे , माझा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे म्हणून मला असे वाटत असेल??.....नाही नाही असे नसेल.....पण एकदा विचारून बघू काय ?".....त्याचा डोक्यात असंख्य विचारांनी थैमान घातले होते....डोकं जड झाले होते ....

नंदिनी सोबत एकदा बोलूया,  विचार करत तो त्याच्या रूमच्या  बाहेर पडला .... समोर नंदिनीच्या रूमचे दार नॉक केले , बराच वेळ झाला , दार उघडल्या गेले नाही ...त्याने तिला फोन लावला...तो पण स्विच ऑफ येत होता.... रूम मध्ये नसावी कदाचित , विचार करत तो पुढे गेला... अपेक्षित ठिकाणी तिला शोधत होता पण ती कुठेच दिसत नव्हती.... तेवढयात राहुल दिसला..

" राहुल , नंदिनी दिसली काय ? तिच्या रूममध्ये नाहीये..."...राज

" हा अरे हो .... तिचे अमेरिका वरून काही फ्रेंड्स आले आहेत ....तिने लग्नासाठी त्यांना पण आमंत्रित केले होते...... त्यांना पिकप करायला गेली आहे खाली...".... राहूल

" Okay !' .... राज , राजचे पुढे जाणारे पाय मागे फिरले....

" अमेरिका मधले फ्रेंड्स म्हणजे नंदिनीचा मित्र पण असणार....ती म्हणाली होती लग्नासाठी बोलावले आहे..."....विचार करतच तो त्याच्या रूममध्ये जात दार बंद करून घेतले..... नंदिनीला तो तिच्या प्रेमाबद्दल, त्याने फील केलेल्या भावने बद्दल विचारणार होता... पण तिचे मित्र आले ऐकूनच त्याचा सगळं गैरसमज दूर झाला होता.... रूममध्ये येत त्याने स्वतःला बेडवर झोकून दिले...डोकं खूप जड झाले होते .... थकवा पण खूप वाटत होता...कदाचित मनाने खूप थकला होता.... विचार करतच त्याचा डोळा लागला...

नंदिनीने  अमेरिका मधील तिच्या ग्रुपला राहुलच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते, आणि त्यांना सुद्धा भारतीय लग्न बघायचे होते, आणि त्या निमित्ताने भारत सुद्धा फिरणार होते....

आता पाऊस सुद्धा थांबला होता... नंदिनीने त्या फ्रेंड्स ला त्यांच्या रूम्स दाखवल्या...गेस्ट सेक्शनकडे त्या रूम होत्या....... आदल्या दिवशी ते सगळे मुंबईला पोहचले होते...बऱ्यापैकी त्यांचा आराम सुद्धा झाला होता....त्यामुळे आता त्यांचा थोडा फिरायचा प्लॅन झाला होता......सगळे फ्रेश होत खाली आले.... नंदिनीने राहुल आणि खाली जे जे घरातील होते त्यांना तिच्या मित्रांसोबत ओळख करून दिली.... थोडफार खाऊन सगळे बाहेर फिरायला गेले...

नंदिनीला खूप थकवा जाणवत होता....ती सुद्धा थोडं खाऊन तिच्या रूममध्ये आराम करायला निघून आली ....

संध्याकाळी एक दिड तासाचे  सीमांतपूजन आणि त्यानंतर संगीत असा कार्यक्रम ठरला होता.....सीमंतीपूजन लवकर असल्यामुळे सगळे आपापल्या तयारीला लागले होते.....

नंदिनी झोपून उठली...तिला अंग बरच जड वाटत होते...थकवा पण जाणवत होता....आळस झटकून ती तयारीला लागली.....

सिमंतीसाठी म्हणून आधी साडी घालायची आणि नंतर संगीतसाठी परत तयार व्हायचं.... तिच्या आता जीवावर आले होते....तिने डायरेक्ट संगीतसाठी जो  ड्रेस घालायचा होता तो घातला...... तिने पिंकिश व्हाइट रंगाचा, त्यावर पिंक पिस्ता रंगाचे मोठे मोठे लाईट असे फुलांचे डिझाईन असलेले, त्याला गोल्डन काम केलेले हेवी बॉर्डर ,  खूप घेरदार ,आतमध्ये खूप लेयर , फुलला असलेला प्युर जॉर्जेट  घागरा घातला होता....त्यावर सेम रंगाचे प्लेन , मागून डीप नेक असलेले ब्लाउज .. घागरा सारखीच सेम ओढणी घेतली होती.... केसांचा न्यु स्टाईल आंबडा ....त्याभोवती  सिंगल लेयरचा मोगऱ्याच्या फुलांचा नाजूक गजरा....  डायमंडची ज्वेलरी... माथ्यावर भांगेत एक नाजूक बिंदी, कपाळावर साजेशी छोटी टिकली.....साजेसा मेकप ...,.हातात मॅचींग नसतांना सुद्धा राजने तिला घातलेल्या दोन दोन हिरव्या काचेच्या बांगड्या आणि त्यांच्या मधत डायमंडचे ब्रॉड कडे....पायात पैंजण, कंबरेवर नाजूक एक सर असलेले डायमंडचे कंबरबंध ....सुरेख नाजूक अशी ती दिसत होती.....

 

 

तिने पटपट आपले आवरले....पायात मोजडी घालणार तेवढयात तिला थोडं गरगरल्यासारखे वाटले.....आधीच उशीर झाला म्हणून तिने दुर्लक्ष केले आणि रूम लॉक pकरत बाहेर निघून आली....

एका मोठ्या हवेशीर असलेल्या  हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता....मोठे झुमर , लाइट्स , व्हाइट आणि बेबी पिंक रंगांचे फुलं वापरून सजवलेला स्टेज... स्टेजच्या पुढे  मोकळी जागा सोडण्यात आली होती.... आणि दोन्ही साईडला बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती ..

सगळे पाहुणे खाली हॉलमध्ये जमले होते .....काही नातेवाईक मंडळी आज दुपारी आले होते .... बहुतेक आता सगळेच नातेवाईक जे आमंत्रित केले होते ते  पोहचले होते...राज , राहुल यांचे अगदी जवळचे  मित्र परिवार सुद्धा आले होते....

नंदिनी भराभर चालत राजला शोधत  तिथे हॉलमध्ये येत होती की दारातच तिला राज दिसला.... तो त्याच्या मित्रांसोबत बोलत उभा होता....तो बिझी आहे बघून ती चुपचाप त्याच्या बाजूने आतमध्ये जायला निघाली....

" नंदिनी .....'.....

आवाज आला तसे वळून बघितले तर राज होता....तशी ती त्याला बघून हसली....

" हा राज....."....नंदिनी  , राज तिच्या जवळ आला...

" तू ठीक आहेस ??".....राज , राजला तिचे डोळे थोडे चढल्यासारखे , निस्तेज वाटत होते... कदाचित मघाशी तिला " मर्यादेत रहा " बोललो, तेव्हा ती रडत होती... म्हणून डोळे असे दिसत असावे , असे त्याला वाटले ...ते बघून त्याला आता खूप गिल्टी वाटत होते, उगाच आपण तिला बोलून गेलो असे वाटत होते.

" हो ....."...नंदिनी

नंदिनी राजकडे बघत होती....तिला सुद्धा त्याचे डोळे थोडे सुजल्यासारखे वाटत होते...इतका हँडसम दिसत असूनही त्याच्या ओठांवरील हसू कुठेतरी गायब होते.... रोज तो खोटं का होईना हसत होता......पण आज ते सुद्धा तिला दिसले नव्हते.....

' काय झालं?'  , असे तिला त्याला विचारावेसे वाटले, पण त्याला काय झाले आहे याचे उत्तर तिला कदाचित माहिती होते... .....आणि विचारले असते तरी तो तिचं मन राखण्यासाठी  खोटंच बोलला असता, हे तिला माहिती होते....म्हणून ती काही बोलली नाही.

तो पुढे काही बोलणार तेवढयात तिला कोणीतरी आवाज दिला...

" राज, आवाज देत आहेत .... मी जाऊ ?" ...नंदिनी

" ह्मम ....."..... राज

परत त्याला एक स्मायल देत ती तिथून आतमध्ये घोळक्यात हरवली....

राहुल आणि रश्मी पारंपरिक पद्धतीने तयार झाले होते ..
सिमंतीपूजन पारंपरिक पद्धतीने सुरू होते....नंदिनी काकींजवळ उभी पूजेसाठी जे जे हवे ते हातात देत होती......अधूनमधून  काही स्नॅक्स आयटेम , पाणी , ज्यूस इत्यादी तिथले वेटर हॉलमध्ये फिरवत होते .....तेवढयात तिचे मित्रमंडळ तिथे आले....नंदिनी रितूला तिथे मदत करायला बसवत मित्रांकडे गेली....

" Good evening guys......"... नंदिनी त्यांच्याजवळ येत बोलली

" Good evening Gorgeous ....".. जय

जय (ज्याने अमेरिकामध्ये नंदिनीला प्रपोज केले होते ) , शैला , दोन अमेरिकन मुली, आणि एक मुलगा ...असे पाच जण आले होते ...

" Hey Nandini , your are looking so pretty ...."..... एक अमेरिकन फ्रेंड

" you are looking like a princess in this Indian traditional outfit ...."... जय

" Thank you very much.....".... नंदिनी

" Wait guys.... Hey Nandini , where is your Prince charming ..... I want to meet him yaar .... " .... शैला

" Yess yess, we also wants to meet him ..." ..

नंदिनी तिच्या फ्रेंड्स सोबत बोलत होती, तेव्हा राजचे लक्ष त्यांच्याकडे गेले....जय इंडियन दिसत होता , त्यात दिसायला पण हँडसम होता...नंदिनिसोबत हसून खेळून बोलत होता... जय तोच मुलगा असू शकतो असा राज अंदाज बांधत होता...कारण बाकी तर नॉन इंडियन मुलं होते ...त्याला बघून त्याच्या हृदयातून एक तीव्र अशी कळ गेली.... आणि त्याने नजर फिरवली....

" Okay...".... म्हणत तिची नजर राजला शोधत होती...

" एक मिनिट , मला दिसला तो , हो तो ...तोच आहे...."...शैला खूप एक्साईटेड होत ओरडली...

" Oh my God ... He is so handsome ... Looking so hot.....".... अमेरिकन फ्रेंड

 

 

राज दिसत सुद्धा तसाच होता...त्याने पिंकिश व्हाइट ( नंदिनीला मॅचींग ) कलरचे जोधपुरी सूट आणि क्रीमइश व्हाइट ट्राउजर घातले होते...पायात लेदर शूज..., केस परफेक्टली जेलने सेट केले होते ....व्यवस्थित शेपमध्ये असलेली मिशी आणि शेविंग.... एकदम परफेक्ट लूक होता...

 

राजला बघून आता जयचा चेहरा पडला... खरंच राज इतका ऑसम दिसत होता...आणि बाकी तर शैलाने त्याला  त्याच्या बिजनेस आणि बाकी सगळंच सांगितले होते...

 

" Wait , मी राजला घेऊन येते ... तुमच्या सोबत भेट घालून देते...."....म्हणत नंदिनिने बघितले तर तिथे राज नव्हता....तेवढयात परत तिला कोणीतरी आवाज दिला ...

 

" नंदिनी , जा तू ... नंतर भेटू आम्ही ...."....शैला

 

" Okay dear.... तूम्ही बसा इथे , मी आलेच...."....बोलून परत ती स्टेजकडे गेली....

 

सिमंती पूजन आटोपले होते...आता पारिवारिक फोटोशूट सुरू होता... अगदी मोजकेच फोटो काढत होते...

 

देशमुख फॅमिलीचा फोटो काढायचा होता.... राज नंदिनी जवळ उभा होता...

 

" Sir, प्लीज थोडे मॅडम जवळ ".... फोटोग्राफर हाताने राजला इशारा करत होता....तसा राज थोडा नंदिनी जवळ सरकला....पण स्टेज वरून त्याची नजर जयवर होती....त्याने जयचा उतरलेला चेहरा बघितला होता....

 

" Sir , couple पोज "..... फोटोग्राफर त्याला तिच्या खांद्यावर हाताने तिला जवळ पकड म्हणून सांगत होता....पण राजची हिम्मत होत नव्हती...आणि नंदिनी मात्र त्याच्याकडे बघत होती की राज आतातरी जवळ घेईल......पण त्याच्या चेहऱ्यावर तिला काहीतरी त्रास दिसत होता...काहीतरी दुखतेय त्याला...तिला जाणवत होते ..

 

" It's fine ....."..... राज बोलला , तसे मग फोटोग्राफर जास्ती काही बोलला नाही....आणि त्याने पटापट काही फोटो क्लिक केले.....

 

सिमंती पूजन आटोपले होते...आता वेळ झाली होती संगीत कार्यक्रमाची....

 

अँकरने संगीत प्रोग्रमची धुरा हातात घेतली... खरं तर नंदिनी करणार होती...पण तिला कंफर्टेबल वाटत नव्हते म्हणून तिने प्रोफेशनल अँकरला सांगितले होते...आणि ती राज जवळ येऊन बसली.....बाकी सगळे सुद्धा आपापल्या जागी जाऊन बसले..... राहुल रश्मी साठी स्टेजच्या बाजूला खास अशी बसण्याची सोय केली होती ...

 

कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांच्या डान्सने झाली....नंतर आजी आबांनी एक छोटासा कडव्यावर गमतीशीर नाच केला... नंतर काका काकी, रश्मीचे आई बाबानी रंग जमावले....अँकर अधूनमधून चुटकुले सांगत , प्रश्न विचारत कार्यक्रम आणखी उत्साही करत होता... आता   रुची आणि रश्मीच्या मैत्रिणी स्टेजवर आल्या........रुची रश्मी बनली होती...

 

मैं ससुराल नही जाऊंगी डोली रख दो काहारो

 

साल दो साल नही जाऊंगी डोली रख दो काहारो

 

मैं ससुराल नही जाऊंगी डोली रख दो काहारो

 

पहला संदेसा ससुर जी का आया

 

पहला संदेसा ससुर जी का आया

 

अच्छा बहाना ये मैने बनाया

 

बुड्ढे ससुरे के ओ बुड्ढे ओ बुड्ढे

 

ओ बुड्ढे ससुरे के संग नही जाऊंगी

 

डोली रख दो काहारो

 

साल दो साल नही जवँगी डोली रख दो काहारो

 

दूजा संदेसा सासू जी का आया

 

दूजा संदेसा सासू जी का आया

 

बुढ़िया ने हाए मुझे कितना सताया

 

इस बुढ़िया को इस बुढ़िया को अब मैं सताऊँगी

 

डोली रख दो काहारो..........

 

तीन चार गणे मिळून एक फ्युझन साँग तयार करण्यात आले होते ...

 

नंतर त्या मुलींनी रश्मीला पण आपल्या डान्समध्ये ओढले......रश्मी पण त्यांना साथ देऊ लागली... थोड्या वेळ डान्स करत ती आपल्या जागेवर जाऊन बसली...

 

ते बघून रश्मीच्या आईच्या माथ्यावर आठया  पडल्या...त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला... पण देशमुख परिवाराला हसतांना बघून त्यांचे टेन्शन कमी झाले.... सगळे खूप एन्जॉय करत होते....रश्मी पण बसल्या बसल्या राहुलला चिडवत होती....

 

आधी राहुलचे मित्र आणि भावंडं डान्स करणार होते...पण रश्मीचे ते मैं सासुराल नही आऊंगी बघून तो जोश मध्ये आला होता....तो पण त्यांच्यात शामिल होत एक उदी मारत स्टेजवर  आला....

 

बालिका तुम्हारे सपनों का राजकुमार, आ रहा है

 

वर माला बारात डोली सजा के दूल्हा, छा रहा है

 

शुभमंगल सावधान

 

हे या, हे या, हे या

 

हीरिए सेहरा बाँध के मैं तो आया रे (हे या)

 

डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे (हे या)

 

अब तो ना होता है

 

इक रोज़ इंतेज़ार सोह्णी

 

आज नहीं तो कल है

 

तुझको तो बस मेरी होणी रे

 

तैनू ले के मैं जावांगा

 

दिल दे के मैं जावांगा

 

तैनू ले के मैं जावांगा

 

दिल दे के मैं जावांगा

 

नंदिनी जोरजोराने टाळ्या वाजवत सगळं एन्जॉय करत होती...अधूनमधून ती राजकडे बघायची तर तो शांत बघत  बसला होता...

 

काहीतरी काम सांगून नंदिनी तिथून उठून आतमध्ये गेली....काहीतरी करून थोड्याच वेळात ती परत आली....

 

नंतर असेच दोन डान्स झाले..... आणि नंदिनीचा नंबर आला .... अँकरने तिचं नाव घेतले तसे तसे तिने इशर्याने त्याला नंतर म्हणून सांगितले.....आता राहुल आणि रशमीचा एक रोमँटिक गाण्यावर डान्स झाला....

 

राजने तर स्पष्ट नकार दिला होता डान्स साठी....तो इतका चांगला डान्सर असून त्याने डान्ससाठी मनाई केली हेच सगळ्यांना खटकत होते....

 

नंदिनीचे राहून राहून राजकडे लक्ष जात होते....तो निर्विकार  बसला होता....त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते....ते बघून आता नंदिनीला खूप वाईट वाटत होते.... तिचं मन खूप दुखायला लागले...

 

" नंदिनी , बस झाले आता....मला नाही बघवत आता राजला होणार त्रास .... लवकरच काहीतरी करायला हवे....असे तर तो पुढील लग्न सुद्धा एन्जॉय करू शकणार नाही .... "....नंदिनी मनातच विचार करत होती....

 

आता कार्यक्रमाचा शेवट होत आला होता... अँकरने नंदिनीचे नाव घेतले....नंदिनिने एकदा राजकडे बघितले आणि ती जागेवरून उठून स्टेजवर गेली.... तिने सगळ्यांना बघून गोड स्मायल केले....

 

नंदिनी खूप छान डान्सर आहे सगळ्यांना माहिती होते , तिचा डांस बघायला सगळे उत्सुक होते....

 

नंदिनीने अँकर कडून माईक हातात घेतला.... हसून दोन्ही हात जोडत तिने सगळ्यांना नमस्कार केला....

 

" ओह... नंदिनी गाणं म्हणतेय तर ...... "....

 

तशी ती परत हसली....

 

" मला माहिती आहे तुम्ही सगळे इथे संगीत कार्यक्रमासाठी जमले आहात...सगळे माझा डान्स बघण्याकरिता उत्सुक आहात.... मी पण एक डान्स करणार होते ..पण मी आता ते कॅन्सल केले आहे....

 

तिचे बोलणे ऐकून राज संभ्रमित नजरेने तिच्याकडे बघत होता.... आता पर्यंत निस्तेज , थकले वाटत असलेल्या त्या तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती...त्याला तिचे पूर्ण attitude वेगळे भासत होते.....काहीतरी वेगळं होणार आहे....एक भीतीची घंटा त्याच्या मनी वाजली.....तो टक लाऊन तिच्याकडे बघत होता ..

 

" राहुल रश्मी सॉरी.., खरं तर हा कार्यक्रम तुमचा आहे... पण मला काहीतरी बोलायचं सगळ्यांशी..... मी बोलू काय ??" .....नंदिनी राहुल रश्मीकडे बघत होती.... राहुलने नजरेनेच तिला होकार दिला.... रश्मीने सुद्धा मान डोलावली...

 

" आबा, आजीसाहेब ..... मला बोलायचं आहे काही.... बोलू काय ?".....नंदिनी राजच्या आबांकडे आजीसाहेबांकडे बघत बोलली..... तिच्या आवाजात एक कळकळ होती....एक ओलावा जाणवत होता.... सगळा हॉल तिच्या आवाजाने स्तब्ध झाला होता.... तिचे फ्रेंड्स...बाकी सगळे नातेवाईक तिच्याकडे बघत होते.... राज सुद्धा जीव मुठीत धरून तिच्याकडे बघत होता....त्याला त्याच्या हार्ट बिट्स वाढल्या सारख्या वाटत होत्या....

 

आबा आजीसाहेबांनी पण मान हलवत होकार दिला... त्यांना माहिती होते नंदिनी एक समजदार मुलगी आहे , काहीतरी खूप महत्वाचं  असल्याशिवाय ती अशी मध्येच बोलणार नाही.....

 

तशी ती गोड हसली....

 

" आज मी तुम्हाला एका स्पेशल व्यक्ती सोबत भेटवणार आहे ..... माझं आयुष्य.... माझं जग....."....नंदिनी

 

नंदिनी अशी बोलली आणि सगळे शॉक झाले.... ते ऐकून राजच्या तर हृदयात धडकी भरली.... जो त्याला नको वाटत होता शेवटी तो क्षण आला होता.....त्याला आता तिथे बसणे जड व्हायला लागले.... मन घाबरायला लागले....कुणीतरी गळा दाबत आहे असे वाटत होते.  ... त्याचे अंतकरण जड झाले.....डोळ्यात अश्रू जमायला लागले......

 

" हे सगळं मी आता सांगते आहे कारण मला इथे सगळे हवे होते....म्हणून मी वाट बघत होते. .मी सगळ्यांची गुन्हेगार आहे......त्या एका व्यक्तीचा अधिकार तर होताच हे सगळं जाणून घेण्याचा ...पण सोबत तुम्हा सगळ्यांचा पण अधिकार आहे......माझ्याकडून जी चूक झाली आहे ... अनाहूतपणे का होईना पण चूक झाली आहे...माझ्यामुळे तुम्ही सगळे दुखावले गेले आहेत.....माझ्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यावर थोडाफार का होईना , पण फरक पडला आहे....माझ्या परिवाराने खूप वाईट काळ अनुभवला आहे....त्याची झळ सगळ्यांनाच पोहचली आहे.....माझ्यामुळे खूप मन दुखावली गेली आहेत...काही  आयुष्य पणाला लागलेत...., एका आजीला दुखावले आहे....आबांचे हसू गेले . ....एका आईचा जीव तिच्या मुलासाठी कासावीस झाला, एका वडिलांनी बघितलेले स्वप्न पणाला लागलेत ....एक काका  काकी आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करू लागली....एक भाऊ आपला मित्र गमावून बसला....आणि राज...त्याचे तर पूर्ण आयुष्यच पणाला लागले.... त्याच्या आयुष्याची जशी काही लॉटरी झाली....सगळे डोळ्यात प्राण आणून कधी हे लॉटरी लागते आहे याची वाट बघत होते............मला सगळ्यांची माफी मागायची आहे .... .."

 

नंदिनी बोलत होती पण त्याला काहीच ऐकू जात नव्हते.....' एक स्पेशल व्यक्तीला भेटवायचे आहे " या एका वाक्यानेच  त्याचे कान सुन्न झाले होते.......तो भरल्या डोळ्यांनी तिला बघत होता..........त्याच्या हृदयात मात्र खालच्या ओळी सुरू होत्या.....अश्या त्याच्या भावना होत्या......

 

तुटताना तुटतो हा जीव का सांग ना

 

निघताना अडतो पाय का

 

संपले जरी सारे तरी, आस कोणती माझ्या उरी

 

सरताना सरते ही वेळ का सांग ना

 

तुटताना तुटतो हा जीव का

 

हरलेले श्वास हे, चुकलेली पावले

 

मन मागे ओढते, अडखळते अन पडते का

 

माझे सारे जिथे, काही नाही तिथे

 

मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का

 

नसताना असतो हा भास का सांग ना

 

स्वप्ने विरली आता, जो तो झाला रिता

 

त्या दिवसांची हवा दरवळते अन छळते का

 

क्षण हे जाळिती, राती आता सुन्या

 

तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का

 

मिटताना मिटतो काळोख का सांग ना

 

तुटताना तुटतो हा जीव हा सांग ना

 

.....त्याला हे सगळं ऐकावल्या सुद्धा जाणार नव्हते की बघावल्या सुद्धा.......आणि कोणाचं लक्ष नाहीये बघून तो तिथून जायला वळला....चालतच पुढे जात होता....

नंदिनी बोलत होती.....राज

मात्र जवळपास  हॉलच्या गेट जवळ पोहचला होता........

 

*****

 

क्रमशः.....

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️