( आधीच्या भागात : घरी कुळाचार पूजा होते . नंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम , नंदिनी पायऱ्या उतरतांना पडत होती तेव्हा नंदिनिने साडी का नेसली म्हणून राज ने चिडचिड करत तिला एका जागेवर बसायला लावले..त्याचाच बदला म्हणून तिने त्याच्या हाताने आपल्या हातात बांगड्या भरून घेतल्या.... नंदिनी आणि घरातील सगळ्यांचे एकमेकांसोबत असलेले नाते सबंध बघून सगळ्यांना नंदिनीचे खूप कौतुक वाटत होते. आता पुढे .... )
भाग 79
उद्या महाबळेश्वर साठी निघायचे म्हणून रात्री सगळ्यांनी पटापट सगळं आवरून घेतले. नंदिनी ने नेहमी प्रमाणे खूप गोंधळ पसारा करून ठेवला होता...दर वेळी राज असायचा मदतीला... त्यामुळे पटापट काय घालायचं वैगरे गोष्टींचं सिलेक्शन व्हायचं...पण आता उगाच तिने भाव खाल्ला होता....राज ची हेल्प घ्यायची नाही ठरवले होते...आता मात्र तिला ते जड जात होते... ..तिने हवं नको ... गरज नसतांना सुद्धा बऱ्याच गोष्टी बॅगमध्ये भरल्या होत्या...
काकी आणि आईने एकदा सगळं चेक केले....सगळे लग्नासाठी जाणार, म्हणून छायावर घरातली सगळी जबाबदारी दिली होती...काय करायचं वैगरे सगळं समजावून सांगितले होते......
" सॉरी राज , तुला खूप सतावते आहे ना मी ...मला पण आता ही आपल्या मधातली भिंत नकोय.....कधी कधी तुझ्या मिठी मध्ये शिरते आहे असे झाले आहे ....तुला करकचून पकडायचे आहे....तुझ्या कुशीत झोपायच आहे .....फक्त आणि फक्त तुझंच बनून जायचं आहे... .. बस दोन दिवस ....सगळं ठीक होईल...."....नंदिनी तिच्या मोबाईल मध्ये राजचे एक एक फोटो बघत मनामध्ये बोलत होती .... त्याच्या नकळत तिने त्याचे मोबाईल मध्ये खूप फोटो काढले होते.... पण जास्तीत जास्त फोटो मध्ये तो चिडकाच दिसत होता .... कालचे बांगडी भरण्याचे राहूलने त्या दोघांचे काही फोटो क्लिक केले होते....ते सुद्धा ती बघत होती...... आणि एका फोटोवर तिची नजर स्थिरावली...ज्यात तो नंदिनीच्या हातात बांगड्या भरतांना खाली बघत लाजत होता जेव्हा बाकीच्या बायका त्याला चिडवत होत्या..... मुलं लाजातात सुद्धा याचीच तिला गंमत वाटत होती.... " राज तुझं प्रत्येक रूप मला नव्याने तुझ्या प्रेमात पाडतं ...."
"आजची ही दुराव्याची शेवटची रात्र....तीन दिवसांनी जेव्हा परत येऊ तेव्हा सगळंच वेगळं असेल..नवीन असेल....नवीन आयुष्य...नवीन स्वप्न.......तू आणि मी सोबत असू.......नेहमीसाठी एकमेकांचे ......"... ती खूप वेळ तो फोटो झूम करून बघत होती......त्या फोटो वर किस करून मोबाईल बाजूला ठेवत ती झोपी गेली...
राहुलच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती....नवीन क्षणांची, नवीन नात्यांची गोड स्वप्ने , हुरहूर त्याच्या मनी दाटली होती.....नवीन जबाबदारी त्याला सांभाळायची होती....नवीन नाती जपायची होती... फुलवायची होती... आतापर्यंतचे बिनधास्त ,मनमौजी आयुष्य तो जगत आला होता...पण आता तसे चालणार नव्हते , आपल्या आयुष्याशी कुणाचं तरी आयुष्य जुळते आहे...आपल्या प्रत्येक वागण्याचं तिच्या आयुष्यावर चांगले वाईट असे किती परिणाम होऊ शकतात , आता इथून पुढे प्रत्येक पाऊल सोबतीने टाकायचा आहे एकमेकांच्या साथीने.....हेच सगळं त्याच्या डोक्यात सुरू होते....त्याच्यासाठी सुद्धा तीन दिवसांनी परतल्यावर सगळंच बदलणार होते.....
आज त्याने रश्मीला फोन नव्हता केला....ज्या गोष्टी त्याच्या मनात सुरू आहे , त्या तिच्या पण मनात सुरू असणार होत्या....त्यात तिची पण त्या घरची एक मुलगी म्हणून शेवटची रात्र असणार होती.....तिला तिच्या परिवारासोबत वेळ घालवू द्यावा हाच त्याचा उद्देश होता...
इकडे राजला सुद्धा झोप येत नव्हती....जसे जसे राहुलच्या लग्नाची वेळ जवळ येत होती...त्याची धडधड, नंदिनीला गमावण्याची भीती वाढत होती....त्याला कशातच चैन पडे ना झाले होते.....आजची या घरातील शेवटची रात्र होती जेव्हा नंदिनी त्याची बायको (atleast officially का होईना ) म्हणून असणार होती ....उद्या जेव्हा लग्नात ती तिच्या त्या मित्राला भेटवेल ...त्या नंतर त्याचं आयुष्याच बदलणार होते....कदाचित सगळी स्वप्नच तुटणार होती.....आयुष्य कुणाकडे बघून जगायचे, का जगायचे अशी बरीच प्रश्न त्याच्या डोक्यात घोंगावत होती.....तो सुद्धा बऱ्याच वेळ नंदिनी चे फोटो बघत विचार करत होता....
हाल-ए-दिल मेरा पूछो ना, सनम
हाल-ए-दिल मेरा पूछो ना, सनम
आपके इश्क़ की मदहोशी में डूबा है ये आलम
हाल-ए-दिल मेरा पूछो ना, सनम
हाल-ए-दिल मेरा पूछो ना, सनम
जब शाम आए, तुम याद आए
तूफ़ान लाए यादों में तुम
बेबाक सी है हर एक तमन्ना
गुस्ताख़ियों में अब दिल है गुम
ख़ाबों के क़ाफ़िले
बातों के सिलसिले साथ मेरे चलें
रात-दिन, हर घड़ी सरग़ोशी में खोया है ये आलम
हाल-ए-दिल मेरा पूछो ना, सनम
हाल-ए-दिल मेरा पूछो ना, सनम
आजची रात्र एकच .... पण प्रत्येकासाठी वेगवेगळी होती....कुणी दुःखी होता,कुणी आनंदी तर कुणी नवी स्वप्न बघत होता.....पण एक नक्की होणार होते इड्या जेव्हा घरात परततील तेव्हा .....चौघांचे आयुष्य बदलणार होते........
किती गंमत असते ना या एका क्षणाची..... सगळ्यांसाठी तीच रात्र, तोच दिवस ....पण या एका क्षणात शेकडो आयुष्याचा जुवा च सुरू असतो...कोणीतरी जिंकणार ,कोणीतरी हरणार....कोणीतरी तुटणार .... प्रत्येकजण वेगवेगळी परीक्षा देत असणार.....
.........…............
पहाटे पाच ला दोन मोठ्या 53 seater व्होल्व्हो बसेस एक देशमुख बंगल्यासमोर आणि एक रश्मीच्या चाळी पुढे येऊन दिमाखात उभ्या राहिल्या....
बस जशी चाळीपुढे येऊन उभी राहिली तशी रमेश देसाईंची गडबड वाढली.....घरातील पुरुष मंडळी , मुल सगळे बस मध्ये त्यांचे सामान भरण्यात व्यस्त झाले....लहान मंडळी तर भयंकर उत्साही...अगदी मोठे लोकं उठयाच्या आधी उठून बसलेली...रश्मी ताईच्या लग्नासाठी सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागून राहिली होती...
सगळी धावपळ सुरू असताना रश्मी मात्र शांत एकटक आपलं घर न्याहाळत एका जागी बसली होती....घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या खूप आठवणी होत्या....सुखद दुःखद....सगळ्या...किचन मध्ये आईसोबत घालवलेले क्षण, टीव्ही च्या रिमोट साठी रुची सोबत झालेली भांडणं , भविष्यासाठी शिक्षणासाठी दिवाणावर बसून मारलेल्या गप्पा.....रोज संध्याकाळी देवापुढे आईसोबत म्हटलेली रामरक्षा..... ऐकले नाही की आईचे पाठीत पडणारे धपाटे.....आजोबांनी दिलेलं छोटंसं पन्नास पैसाचे चॉकलेट .......आजीचे फुलांचे गजरे बनवून देणे....मुलीसारखी वाग म्हणून सतत ओरडणे.......रुची सोबत कपड्यांसाठी केलेली भांडणं.....पहिल्यांदा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा रूचीने घेतलेली तिची काळजी......कॉलेजला जायला त्रास होतो म्हणून बाबांनी लोन काढून घेऊन दिलेली स्कूटर...ती मिळाली तेव्हा येवढा आनंद जसकाही BMW घेऊन दिली असावी..... कॉलेज मधून यायला उशीर झाला म्हणून रागावलेली आई...तेव्हा बाबांनी घेतलेली तिची बाजू......चुलत मावस बहीण भावांसोबत सोबत घावेलेली दरवर्षीची दिवाळी...पत्ते कॅरम खेळत घालवलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या....... शोकेस मध्ये ठेवलेले तिचे मेडल, तिच्या ट्रॉफी...भिंतींवर एक तिरप्या कोणात लावलेले मित्र मैत्रिणींनी दिलेले बर्थ डे ग्रिटींग्ज ....त्यांच्या आनंदासाठी आई बाबांनी केलेली तडजोड......अशा किती तरी असंख्य आठवणी ,क्षण डोळ्यांपुढून सरसर सरकत होते.......आणि आपोआप तिचे डोळे पाणावले...आकाशात झेप घ्यायला ती शिकली होती..... राहुलच्या साथीने तिचे पंख कदाचित आणखी बळकट होणार होते .......पण उडायचं कसे, पंख पसरवयाचे कसे, हे मात्र ती या घरून शिकली होती तिच्या प्रेमाच्या मायेच्या लोकांकडून..
तिचा घरातून पाय निघवेना.....आईला तिच्या मनाची होणारी घालमेल कळत होती... सगळे कामं आटोपून बाबसुद्धा तिच्या जवळ येऊन बसले...
" बाळा .... "....आईने ( रेवती देसाई ) मायेने रश्मीच्या डोक्यावरून हात फिरवला...
" आयुष्यात पुढे जायला मागचं का सोडायला लागते??".....रश्मी
" हा तर निसर्गाचा नियम आहे बेटा....बदल तर होणारच....नाही तर आयुष्य एकाच ठिकाणी थांबेल ना "...आई तिला समजावत बोलत होत्या
"आई , सासर माहेर एकच असते तर किती छान झाले असते....". ...रश्मी
" सामाजिक नियम आहे ... मुलींना नवीन घरी जावं लागतं ... मुलींमध्ये सगळ्यांमध्ये सामावून जाण्याची शक्ती असते.....आणि तू इतकी शहाणी मुलगी....अशी का बोलते आहे ??".....आई
" मला तुमच्या सोबत पण राहायचं .... मला तुम्ही सगळे हवे आहात ".....रश्मी
" रश्मी.... आम्ही नेहमीच तुझ्यासोबत असणार आहोत....तू शरीराने दूर असशील, पण मनाने जवळ आहोत....आणि दूर कुठे आपण एकाचा शहरात आहोत...पाहिजे तेव्हा भेटता येते.... तशी तर देशमुख परिवार खूप चांगला, प्रेमळ परिवार आहे... तुला कशाचीच कमतरता नाही भासू देणार ती लोकं ..... आणि राहूलरावांबद्दल काय बोलायचं ... सोन्यासारखा मुलगा आहे .... तुला खूप खुश ठेवतील ".....आई
" रश्मी ते लोकं खूप चांगले आहे , मुख्य म्हणजे माझी मुलगी खूप गुणी आहे....तुला तिथे काहीच त्रास नाही होणार ..... पण तरीही तुझा हा बाप नेहमीच तुझ्या पाठीशी असणार आहे हे लक्षात ठेव... हे घर तुझं होतं आणि नेहमीच राहील ... थोड पण काही वाटले तर बिनधास्त येऊन आपल्या आई बापाला सांगायचं .....आम्ही ते आईवडील नाहीत जे मुलीला ओझं समजणार,किंवा लग्न करून दिले की झालं सगळं...किंवा मुलगी माहेरी पाहुनी झाली असे काही नाही .........."... रमेश बाबा तिची डोक्यावर थोपटत म्हणाले
ते ऐकून रश्मीला गहिवरून आले...ती आपल्या बाबांच्या कुशीत शिरली.....
" अरे ते तिकडे राहुल जिजू वाट बघत आहेत ना..... मी काय म्हणते ताई त्यांना कळवू काय ताईला वेळ लागेल तुमच्याकडे यायला?? नाहीतर तुझं इथेच घर राहायचं ठरत असेल तर सांग तसे.... मला पण भारी आवडतात ते......".....रुची यांचा सुरू असलेला भावनिक प्रोग्राम बघून मस्करी करत आली...
" ये काही काय बोलते...."...आईने रूचीच्या पाठीत धपाटा दिला.
" अरे.... हे काय....ते म्हणतात ना ' साली आधी घरवाली ' ..... म्हणून...तसेही ताईचा घरा बाहेर पाय पडेना.... सगळे बसले सुद्धा जाऊन बस मध्ये...नंदिनी वहिनीचा फोन सुद्धा येऊन गेला...निघालेत काय विचारायला....."....रुची
" हो ग जिजु ची चेली...... निघतोय थोड्या वेळात कळव ".... आई
" बाबा, जसे हे घर नेहमीसाठी राहणार आहे तसेच मी या घरासाठी असणार आहे.... मी माझा पगार इथे नेहमी प्रमाणे आई जवळच देणार....तुम्ही मला त्या बाबतीत काही बोलायचे नाही.... आणि काहीही झाले, काहीही गरज पडली , काही टेन्शन असले की तुम्ही सगळे माझ्यासोबत शेअर करणार आहात...... प्रॉमिस करा मला.....तेव्हाच समजेल तुम्ही मला परके केले नाही आहे .... " ....रश्मी
नाही हो करता करता शेवटी आई बाबांनी तिला प्रॉमिस दिलेच..... सगळ्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल प्रेम काळजी दिसत होती...
रश्मीने देवाला आणि घरातील सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला आणि सगळे बस मध्ये येऊन बसले.... श्रीगणेशा करत बस महाबळेश्वरच्या दिशेने निघाली.
जरी आताचा काळ आधीसारखा राहिला नव्हता... सुनांना बरीच मोकळीक होती.....मुलींसाठी त्यांच्या आईवडिलांच्या घराची दारं नेहमीसाठी च उघडी होती....तरीसुद्धा आडनाव, पत्ता बदलणार होता... आणि हा बदल जरी दिसायला छोटा असला तरी त्या मुलीसाठी खूप मोठा, आयुष्य बदलणारा बदल होता....
..........
देशमुख बंगल्यामध्ये गडबड सुरू होती....पहाटे तशी कोणाला भूक नव्हतीच त्यामुळे चहा पाणी आणि थोडा लाईट स्नॅक्स सगळ्यांनी घेतले होते.... नंदिनी सगळ्या वृद्ध मंडळींना औषधं, त्यांच्या उपयोगाच्या गोष्टी घेतल्या काय आठवण करून देत होती...
इकडे राज स्वतः लक्ष घालत सगळं सामान नीट बस मध्ये ठेऊन घेत होता..... एक एक करून सगळ्यांना बस मध्ये बसवून घेत होता.... राहूल सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर आला...... सगळेच बस मध्ये बसले होते... नंदिनीचे मात्र अजूनही घरातले काही आवरात नव्हते .... शेवटी बरेच आवाज दिल्यावर नंदिनी बाहेर निघाली..... राज बसच्या दारात उभा होता.....

नंदिनीने बेबी पिंक रंगाचा स्टोन वर्क असलेला स्लिव्हलेस कुर्ता, सेम रंगाचा पटियाला , सेम रंगाची स्टोन वर्क बॉर्डर असलेली शिफॉन ची ओढणी , हातात राजने भरलेला हिरव्या रंगाच्या दीड दीड डझन बांगड्या ...खूप गोड दिसत होती ती ....राज तिला बघण्यात मग्न झाला होता...
नंदिनी पळत बस कडे येत होती..... ऑटोमॅटिकच राजने तिला बसमध्ये चढण्यासाठी हात पुढे केला.... जसा शाहरुख काजोल ला ट्रेनमध्ये चढायला हात देतो सेम तसच....
"Don't worry भैय्याजी, दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे "..... राजचा एक कझिन राहुल सोबत येत ओरडला....तशी नंदिनीच्या ओठांवर खट्याळ हसू आले......राज अजब नजरेने त्याला बघत होता.... नंतर नंदिनीकडे बघितले तर ती सुद्धा हसत होती....
राहुलने त्या कझिन ला एक इशारा केला तसा त्याने मोबाईल काढला....
" ह्याटरे .... कपल गोल्स....दादा वाहिनी मॅचींग मॅचींग .... एक फोटो तो बनता है......... भैय्याजी इस्माईल "...... राजचा चढलेला चेहरा बघून तो ओरडला. आणि पटापट दोन चार फोटो क्लिक केले....... राहूल मात्र गालात हसत होता....
" ये चिडकू , हस की जरा.... बोर नाही झाला काय या सेम एक्स्प्रेशन ने....."..... नंदिनी राजला चिडवत म्हणली...
" हसा तो फसा ....... "..... राहुल
" राहुल खी खी करणार आहेस की येणार पण आहेस....?? आता उशीर होत नाहीये काय तुला "...राज जरा चिडत बोलला..
" राज सिमरनके लिये पुरी लाईफ निछावर कर सकते हैं.... दोन चार मिनिटे क्या चीज है ब्रदर....."...... राहुल बसमध्ये चढत राज जवळ जात बोलला.....
" याला काय झाले?? आतापर्यंत कधी निघायचं म्हणून कुरकुर करत होता....."...राज
" कूछ कूछ होता है राज , तुम नाही समझोगे ".....नंदिनी त्याच्यावर डायलॉग मारून फेकत पुढे गेली...
" लग्न आता पासूनच आंगात आले....सगळे पागल झाले......"....राज परत पुटपुटला
" रबने बना दी जोडी sssss......". ... तो कझिन बस मध्ये चढत पुढे जात राजला लाईन मारत फेकत पुढे गेला.... राज त्रासिक चेहऱ्याने सगळ्यांना बघत होता...
सिनियर मंडळी पुढे तर बाकी सगळे मागे अशी बसमध्ये बसायची व्यवस्था केली होती... सगळे आपापल्या जागी जाऊन बसले....
बसची पूजा झाली, नमस्कार करत बस पुढे जायला सज्ज झाली..... राज सगळ्यात शेवटी मागे जाऊन बसला....नंदिनी मध्य भागात उभी राहत गप्पा ठोकत होती..... अधून मधून राहुलला चिडवत होते....एखाद दोन टोमणे नंदिनी राजवर फेकून मारत होती....त्यात तिला बाकीच्यांची पण साथ मिळत होती.......राज शांतपणे सगळं बघत बसला होता, दादा आपले दर्दी मुड मध्ये होते ना, हसू तर कसे महागच झाले होते त्याच्यासाठी..... .......... जोश आणि उत्साहपूर्ण वातावरणात बस पुढे जायला निघाली होती......
जवळपास आठ साडे आठ च्या दरम्यान बस एका ठिकाणी थांबली....... तिथे नाश्त्याची उत्तम सोय केली होती..... देसाईंची बस अगोदरच येऊन तिथे थांबली होती......नैसर्गिक सौंदर्य त्यात सकाळची वेळ ....... बाहेर बगीच्यात काही लाकडी चारपाई ठेवण्यात आल्या होत्या... सिनियर मंडळी टेबल खुर्चीवर जाऊन बसले तर बाकी मंडळींनी चारपाईवर बसने पसंत केले......तिथले वेटर सगळ्यांना नाश्ता देत होते..... पण नंदिनी आणि राज सुद्धा स्वतः लक्ष देत होते.... रश्मीचे आई बाबा सुद्धा आदरातिथ्य म्हणून उठले होते....पण नंदिनिने त्यांना सुद्धा नाश्ता करायला बसवले होते..... राहुल रशमीची नजरेनं बोलणं सुरू होते....दोन बस चे पाहुणे असल्यामुळे दोघांची पण एकमेकांजवळ जायची हिंमत होत नव्हती...
सगळ्यांचा नाश्ता नीट सुरू आहे बघून नंदिनी हळूच रश्मीला आणि रूचीला बाहेर घेऊन आली....
" अरे वाह, आज पिंक डे वाटतं .... मी एकटाच oddman out झालो "....राहुल रशमिकडे बघत बोलला...रश्मीने सुद्धा लाईट पिंक रंगाची सिल्क ची हलकी फुलकी काठापदरी साडी नेसली होती...
" तू आहेसच अतरंगी....."...नंदिनी
" आधी ठरवून घ्यायचं असते ना , राज दादाने बघ कसे मॅचींग केले .... राज दादा कडून शिक जरा काही..."...एक बहिण चिडवायला लागली
" मी मुद्दाम नाही केले... ऑटोमॅटिक झाले....."... राज
" दिल से दिल का रिश्ता जुडा है.... "...... एकाने टाँट मारला..
" आज सगळ्यांच्या अंगात फिल्मी भूत घुसलं दिसतंय"....ते ऐकून राजने डोक्यावर हात मारून घेतला...
" आम्हीच दिसतोय तुम्हाला आज ? याचं लग्न आहे याला त्रास द्या..."... राज ....
" तुझ्या लग्नात तू आम्हाला मौका नाही दिला.... हा चांस आम्ही सोडायचो नाय..... सुत समेत वसूल करेंगे......"..
राजला तर काय बोलावं काही कळत नव्हते...तो बिचाऱ्या चेहऱ्याने बघत होता... नंदिनीला त्याला बघून खूप हसायला येत होते...
" तुला भारी हसायला येत आहे ?"....राज
" हा आता जोक वर नॉर्मल माणूस हसतच असतो "...नंदिनिने राहुल ला टाळी दिली.
" वहिनी तुम्हाला राग तर नाही ना आला ?, म्हणजे चालेल ना तुम्हाला ?".....एक कझिन
" चालेल काय पळेल.......धमाल करायलाच जमालोय आपण....एक एक क्षण आठवणीत राह्याला हवा.......बिनधास्त........."....नंदिनिने हिरवी झेंडी दाखवली..... आता कोण ऐकताय.... सगळे मस्ती करायला लागले...
नाश्ता वैगरे सगळं आटोपून सगळे परत आपल्या जागी येऊन बसले....आणि एका पाठोपाठ बस पुढल्या वाटेवर सुरू झाल्या......आधी बऱ्याच वेळ राज एकटा बसला होता.....आता मात्र नंदिनी राजच्या बाजूला खिडकी जवळ जाऊन बसली.....
" बापरे किती गर्मी....."....नंदिनी तिचे केस वरती करत क्लच मध्ये अडकवत बोलत होती...
" तुला नाही होत काय रे गर्मी ?"... नंदिनी त्याच्या दाढी कडे इशारा करत बोलली....
"What??"..... राज
" काही नाही , जोक केला मी .....".....नंदिनी
" नंदिनी , you are impossible "...... राज
" देशमुखच मी "..... नंदिनि त्याला बत्तिशी दाखवत बोलली...... राजला हसू तर येत होते....पण त्याने कंट्रोल केले.....
आता अंताक्षरी खेळण्याचा कार्यक्रम ठरला.... लहानांसोबत मोठे सुद्धा सुरताल मिळवू लागले.... अक्षरशः राजचे आबा सुद्धा गाणं म्हणत होते....छोटी मंडळी सुद्धा अधून मधून आपली कविता म्हणत होते...एखाद्या शब्दावरून गाणे नाही आठवले तर एखादी आजी त्या शब्दांवरून भजन म्हणून भाव खाऊन जात होती.....खिडकी जवळ बसल्यामुळे नंदिनीला बाजूच्या सीटवर बसलेल्या सोबत नीट बोलता येईना.... म्हणून ती वारंवार राजच्या अंगावर झुकत बोलत होती, गाणे म्हणत होती.....
" इकडे बस .....".....राज
" नाही, मला खिडकी जवळ बसायचं.....बाहेरच जे सुंदर निसर्ग बघायचा आहे..".....नंदिनी
टाळ्या वाजवत गाणे म्हणताना सगळे एकमेकांना साथ देत होते....पण परत परत समोर झुकतांना टाळ्या वाजवताना कधी नंदिनीचा हात त्याच्या नाकाला लागत तर कधी गालांना...कधी त्याच्या पायावर तिचा पाय बसायचा....त्यात तो त्यांच्या सोबत अंताक्षरी खेळत सुद्धा नव्हता....
" नंदिनी , इकडे बस......".... राज
" तुला सांगितले ना मला खिडकी जवळ बसायचे आहे......निसर्ग बघत नयन सुख घ्यायचे आहे...."...नंदिनिने त्याचा वैतागलेला चेहरा बघितला होता....
" अरे पण तू खिडकीतून बघत कुठे आहेस... ?? तू एकदाही तिकडे बघितले नाही, इकडेच बघतेय..."...राज
" हा तर आता खेळ सुरू आहे, गप्पा गोष्टी तर इकडेच बघणार ना...??..... नाही बोलले तर सगळे म्हणतील राजची बायको किती शिष्ट आहे.....कुलाचार दिवशी पण नाही काय मग तुला काय काय म्हणत होत्या...... "....नंदिनी
" हे भगवान.....मग इथे बस माझ्या जागेवर...."....राज
" शी बाबा किती डिस्टर्ब करतो आहेस... , तुला कळत नाही काय रे ....कितीदा सांगायचे मला खिडकी जवळ बसायचे..... चिडकुराम ...किती चिडचिड करतोय....तुला ky त्रास होतो आहे मी इथे बसले तर??....."...नंदिनी
" कसं सांगू नंदिनी, तुझा होणारा एक एक स्पर्श मला घायाळ करतो...."....राज मनातच बोलत तिच्याकडे बघत होता...
" असा तर जवळ घेत नाहीस...... तुझ्या जवळ येण्याचा चांस मिळतोय...तो का सोडवा मी "....नंदिनी त्याच्याकडे बघतच मनात बोलत होती...
" काय झालं?"....नंदिनी
" काही नाही ...... sorry तुला डिस्टर्ब केले.......तुझं चालू दे......"......राज ....
" It's fine......".... नंदिनी परत अंताक्षरीमध्ये बिझी झाली...
" भयंकरच बोलायला लागली ही.....माझी तर एकही गोष्ट आजकाल ऐकून घेत नाही....मी जे म्हणणार त्याच्या बरोबर उलटच करायचं असते हिला नेहमी" .......राज विचार करत बसला होता..
खाणेपिणे झाल्यामुळे आणि पहाटे लवकर उठल्यामुळे सगळे आता पेंगायला लागले होते.....नंदिनी बाहेर बघत होती....राज कडे लक्ष गेले तर तो सुद्धा झोपला होता...सगळ्यात शेवटी बसलेले, त्यात अधून मधून दचके लागत होते....त्यामुळे त्याची मान आजूबाजूला पडत होती...परत तो सरळ करायचा ......नंदिनी त्याच्या शेजारी सरकली....पण तिची हाईट कमी असल्यामुळे तिच्या खांद्यावर तिला त्याचं डोकं ठेवता येईना.... बराच वेळ विचारकरून शेवटी तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टाकलं...........तिच्या त्या स्पर्शाने आणि अचानक खांद्यावर भार जानावल्याने तो जागा झाला...बघतो तर नंदिनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपली होती.... हाताकडे लक्ष गेले तर तिच्या हातात तिने त्याचा हात धरून ठेवला होता.... बऱ्याच वेळ तिच्याकडे बघत असताना त्याचा डोळा लागला....आणि एक दचका बसला तशी त्याची मान नंदिनीच्या साइडला झुकत तिच्या डोक्यावर स्थिरावली... .... त्याच्या डोक्याला नीट आधार मिळाल्यामुळे तो आता नीट झोपला होता.....त्याला तसे झोपलेले बघून नंदिनीच्या ओठावर हसू उमटले......त्याच्या हातावर आपल्या हाताची पकड घट्ट करत ती पण बिनधास्त झोपली...
पुणे क्रॉस केल्यावर महाबळेश्वरला जायच्या आधी वरती चढतांना जो मोठा घाटाचा भाग लागला....तेव्हा नंदिनीला जाग आली.... बाहेर बघितले तर हिरवीगार झाडं .... ढगाळ थंड वातावरण.....नंदिनीला ते सगळं बघतांना खूप मज्जा वाटत होती... पण जस जसे वर जात होते, रस्ता निमुळता होत होता, खाली खोलवर बघितले तर भीती सुद्धा वाटत होती....नंदिनी पहिल्यांदा तिथे आली होती.....पहिल्यांदाच ती जागा बघत होती...
फायनली दोन्ही बस निश्चित केलेल्या स्थळी रिसॉर्टमध्ये पोहचल्या होत्या..... वधुवर दोन्ही पक्षाच्या दोन वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती.... सगळ्यांची सामान त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये पोहचवण्यात आले होते.....सगळे फ्रेश होऊन डायनिंग अरिया मध्ये जमले होते..... जवळपास दुपारचे दोन वाजत आले होते.....सगळ्यांनी पटापट जेवणं आटोपली....आणि आपापल्या रूम मध्ये निघून आले..... दोन तीन तास आराम केल्या नंतर सिनियर मंडळी सोडून बाकी सगळे रिसॉर्ट जवळ असणारे काही पॉइंट्स फिरून आले होते....
रश्मीच्या नातेवाईकांना तर हे सगळं बघून खूप मजा वाटत होती....ये सुद्धा मनसोक्त फिरत होते.... लहान मुलांना तर स्ट्रॉबेरी बघून खूप मजा वाटत होती....
मुद्दाम राजने एक दिवस आधीची बुकिंग केली होती.... आराम आणि पाहुणे मंडळींना महाबळेश्वर चा आनंद घेता यावा.... उद्या पासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार होते....
*****
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा