नंदिनी...श्वास माझा 78

Raj Nandini

भाग 78

( आधीच्या भागात आपण बघितले , अहेर देणेघेण यावरून आजीसाहेब आणि राज मध्ये थोडा वाद होतो..... नंदिनी त्यात सूर्वर्णमध्य काढत काही उपाय करते. पण राज मात्र चिडचिड करत असतो...ते घालवायला म्हणून ती ice cream party करत डान्स करत ... शिंपल्यांचे शोपिस नको, जीव अडकला मोत्यात म्हणत त्याच्यासमोर गुलाबाचे फुल धरते...आता पुढे.....)

आज घरात कुळाचार.....पहाटेच सगळे उठून तयारी करत होते. थोड्या वेळाने पूजा सांगायला महाराज येणार होते....नंदिनीचा उत्साह तर वाखाणण्याजोगा होता...

नंदिनी पहाटे लवकरच  उठली , आंघोळ वैगरे सगळं आटोपून आईकडून तिने स्वतःची तयारी करून घेतली..

" नंदिनी ... राज आणि राहुलला उठाव....उशीर व्हायला नको... जोशी महाराज वेळेचे खूप पक्के आहेत...त्यांना थोडा सुद्धा वेळ झालेला चालत नाही...."....आई

" राहुलला झोप येत असेल होय आता..... माझ्या आधीच तो उठला आहे.... जिम एरियामध्ये दिसला मला....."...नंदिनी

" काही झालं तरी मुलं मात्र जिम मध्ये जायला नाही विसरत .... बरंय".....आई

" बरंय काय बरंय......व्यायाम नाही करत आहे तो....फोन वर बोलतोय रश्मी सोबत, अन तुझं मोठं लेकरू...ते आजकाल जातच नाही जिममध्ये.....लोळत असतय...."....नंदिनी

" काय....??"....आई

" हो मग....तुला भारीच कौतुक त्यांचे..."..नंदिनी

" काय करावं या मुलांचे.....वेडे दोघंही....बिचाऱ्या त्या रश्मीला तरी झोपू दे म्हणावं त्याला....होणाऱ्या नवरीला आरामाची गरज असते...लग्नात पण दगदग होईल...."..आई

" असू दे ग..... प्रेमाच्या दोन शब्दांने सगळा थकवा निघून  जातो...उत्साह आहे दोघांचा... लग्ना आधीचे हे मंतरलेले दिवस परत नाही येणार आयुष्यात ...."...नंदिनी थोडी खट्टू होत आपल्याच विचारात बोलली.

आईला तीच दुःख कळले होते ...... कारण हे कुठलेच गोड क्षण नंदिनीला अनुभवता आले  नव्हते ....

" बरं, राजला  तरी जाऊन उठव.....आणि आठवण करून दे कुळाचार पूजा आहे आज....आणि त्याला जरा कुर्ता पायजमा वैगरे काही घालायला सांग....नको तूच काढून दे....उगाच कुरकुर करत असतो....."....आईने विषय बदलावला....

" हो ठीक आहे.....नको काळजी करू...."...नंदिनी तयार होत राजच्या रूममध्ये त्याला उठवायला गेली...

नंदिनी दार उघडून आतमध्ये आली, अजूनही बाहेर  अंधारच होता...खोलीमध्ये मंद प्रकाश होता.....  त्याला उठवायला त्याच्या बेड जवळ आली, बघते   तर राज शॉर्ट्स आणि व्हाईट स्लीवलेस टीशर्टमध्ये एक पाय थोडा जवळ घेऊन पालथा झोपला होता.... त्याने अंगावरचे पांघरून सुद्धा काढून फेकले होते.....त्याचे केस जरा वाढलेच होते...ते  विस्कटलेले त्याच्या कपाळावर आले होते...शेविंग,मिशी  पण आजकाल त्याने वाढवली होती.....त्या मंद प्रकशात सुद्धा त्याचा चेहऱ्यावर खूप तेज दिसत होते....

देख के तुमको होश में आना भूल गये

याद रहे तुम और ज़माना भूल गये

जब सामने तु हम्म हम्म हम्म

जब सामने तुम आ जाते हो

क्या जानिए क्या हो जाता है

कुछ मिल जाता है कुछ खो जाता है

क्या जानिए क्या हो जाता है

"Oh  My sweet.... sleeping beauty .....".... नंदिनी तिथेच खाली जमिनीवर आपल्या पायांवर बसत , आपल्या हातांच्या ओंजळीत आपली हनुवटी ठेवत त्याला बघत होती....तिला तो क्षण खूप गोड वाटत होता...त्याला बघतांना तिच्या ओठांवरील हसू जास्तीच रुंदावले .....

" यार हे ध्यान कसलं गोड दिसतंय झोपेत..... बापरे केवढ  मासूम ....... असं वाटतं त्याच्या गालांचा चावाच घ्यावा........ राज तू असा गोडुला बनून समोर असणार तर कोणी कसं कंट्रोल करायचं .....?? शी बाबा फारच कठीण होत चाललं आहे हे......नंदिनी कंट्रोल ...कंट्रोल...."...त्याचे गाल ओढायला म्हणून पुढे केलेले हात तिने मागे घेतले.....

" पण याच्या वाढलेल्या दाढीचं काही करावं लागेल....लग्नात पण हे असच फिरेल की काय...?? म्हणजे असा पण छानच दिसतो....पण मला ती ट्रिम केलेली शेविंगच जास्ती आवडते... ह्मम बघू बघू... काहीतरी करूच.....आता आधी याला उठवायला हवे....नाही तर ओरडा पडेल....."....नंदिनी स्वतःशीच बोलत होती..

नंदिनीने दोन तीन आवाज दिले ...तरी तो जागा होईना...कसा होणार?? ...खूप गाढ झोपेत होता ...आजकाल त्याची  रात्र विचारांनी ग्रासाली असायची...मग कधीतरी उशिरा त्याला झोप लागायची .... बऱ्याच वेळ त्याच्याकडे बघत नंदिनी उभी होती....बघता बघता तिचं लक्ष त्याच्या पायांकडे गेले....आणि आता तिच्या डोक्यात खट्याळपणा आला..

ती त्याच्या पायांजवळ जात त्याच्या तळपायाला गुदगुल्या करू लागली....तिच्या त्या स्पर्शाने तो खाडकन जागा होत सरळ होत उठून बसला...

" तू..?? इतक्या रात्री...??? ठीक आहेस ना तू?? काही होतंय काय?? काही हवे आहे काय??"......राज काजळीच्या सुरात बोलला...

" ओ प्रश्नमंजुषा.....किती ती काळजी??... सकाळ झाली आहे....".....नंदिनी

" नंदिनी .... बाहेर अंधार आहे.....जाऊन झोप...मला पण झोपू दे ".....राज आळसावत बोलत होता..

" पहाटेचे पाच वाजले आहेत....उठ लवकर .... आवर लवकर स्वतःचे.....सगळे वाट बघत आहेत तुझी....."...नंदिनी

" काय...?? इतक्या लवकर पाच वाजलेत...?? आताच तर झोपलो होतो....."...राज

" ते वेळेतच वाजलेत......महाराजा तुमची झोप खराब केल्या बद्दल आम्हाला क्षमा करा.....पण आता जर तू उठला नाही ना तर  मला बोलणी खावी लागेल......आणि तुझ्यामुळे  मला जर कोण काय बोललं ना ... तर मी सोडणार नाही तुला......"....नंदिनी

" उठतोय......."....त्याला अंधारामुळे नंदिनी नीट दिसली नव्हती....तिचा चेहरा मात्र त्याला खूप प्रसन्न दिसत होता....

" लवकर अंघोळ कर , आणि ये खाली..."....नंदिनी बोलतच बाहेर आली...राज अंघोळीसाठी बाथरूम मध्ये निघून गेला...

" अरे , त्याला कुर्ता घालायचं तर सांगायलाच विसरले...."....नंदिनी परत त्याच्या रूममध्ये गेली...तर राज तिला दिसला नाही....

" आंघोळीला गेला वाटते, मीच काढून ठेवते...."...विचार करतच ती कपाटाजवळ गेली ....आणि त्यात कुर्ता शोधत होती....

आंघोळ करून टॉवेल गळ्यात टाकून एका हाताने डोकं पुसत राज कपाट जवळ कपडे घ्यायला येत होता....

अंधार असल्यामुळे नंदिनीला कपाटामध्ये  नीट दिसत नव्हते....म्हणून लाईट लावावा या उद्देशाने ती झरकन मागे वळली..आणि राजचे तिथे येणे एकसाथ झाले.....आणि मागे वळतांना तिच्या मोकळया लांब ओल्या  केसांचा मारा त्याच्या चेहऱ्यावर, गालांवर ,मानेवर बसला..... तिच्या त्या थंडगार मुलायम केसांच्या माराने त्याच्या शरीरातून गोड अशी वीज सळसळली..,..तिला आपल्या मिठीत घ्यावे असे वाटून गेले...पण नेहमीप्रमाणे त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला......

हेच तर स्वप्न बघायचा ना तो....त्याची रोजची सकाळ नंदिनीच्या मधाळ आवाजाने व्हावी... डोळे उघडले की तिचे गोजिरे रूप दिसावे....तिच्या ओल्या मऊशार केसासोबत खेळावे .....नुकत्याच आंघोळ करून आलेल्या तिच्या लोभस  रूपाला आपल्या कवेत लपवावे....तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा...,हो हेच स्वप्न बघितले होते त्याने आपल्या उघड्या आणि बंद डोळ्यांनी..........पहाटेच्या त्या मंद प्रकाशात तिचे  काजळ  घातलेले डोळे , तिच्या कपाळावरील जांभळ्या रंगाची  चंद्रकोर त्याला वेडावून सोडत होते......तो त्याच जागी फ्रीज झाल्यासारखा तिला बघत होता ....  आपण तिला वेळेत आपले प्रेम का सांगितले नाही असे विचार डोक्यात येत होते....

चाहा था ये कहेंगे सोचा था वो कहेंगे

आए वो सामने तो कुछ भी ना कह सके बस

देखा कि ये उन्हें हम.....

तिचे त्याच्याकडे लक्ष गेले तर तिचे काही केस त्याच्या गालाला,मानेला चिटकले होते ,त्यातून एक एक केस खाली पडत होता...त्याने नुकताच शॉवर घेतला होता.... ..त्याच्या केसातुन अजूनही पाणी टपटपत होते...त्या अगदी थोड्या लाईट मध्ये सुद्धा त्याचा कपाळावर ,मानेवर, खांद्यावर असलेले पाण्याचे टपोरे बिंदू चांदण्यांसारखे लुकलुकत होते....त्याचा शरीराचा येणारा तो शॉवर जेलचा फ्रेश  सुगंध, त्याचे ते रूप  तिला मोहून टाकत होते......  पहाटेची प्रसन्न शांतता .....नंदिनीचे  हृदय बुलेट ट्रेनच्या स्पीडने धडधडत होते.... तिला  तर आता आपलं हृदय बाहेर उडी घेतो की काय वाटत होते.... येवढ्या तिच्या हार्ट बिट्स तिला अनावर होत होत्या......नंदिनी त्याच्या त्या रूपाने घायाळ झाली होती....त्याला बघण्यात मंत्रमुग्ध झाली होती ..... राजपेक्षा कोणी दुसरं इतकं सुंदर कोणी असूच शकत नाही.....हेच तिला वाटत होते...

देखकर तुमको यकीं होता है

कोई इतना भी हसीं होता है

देख पाते हैं कहाँ हम तुमको

दिल कहीं होश कहीं होता है

हो जब सामने तुम आ जाते हो

क्या जानिए क्या हो जाता है

कुछ मिल जाता है कुछ खो जाता है

क्या जानिए क्या हो जाता है

" नंदिनी sssss......"...खालून आवाज आला तशी ती भानावर आली.... आणि राजला शर्टलेस बघून थोडी दचकली....

" सॉरी......" ......राजने गळ्यातला टॉवेल नीट केला..." मला माहिती नव्हते तू इथे......."

" ते आईने तूला कुर्ता पायजामा घालायला सांगितला आहे ,ते सांगायचे.  विसरली म्हणून परत सांगायला आले होते....कपाटातून काढत होते पण अंधार होता म्हा......."...

" मी तुला विचारले  काय , इथे का आली ते ?"......नंदिनी पुढे बोलणार तेवढयात राज बोलला

नंदिनी ने नकारार्थी मान हलवली...

" मग?? का कारणं  देते आहे?? हे घर तुझं आहे.... "....राज

" तस नाही, ते तू असा.... "....नंदिनी

" तू काय मला पहिल्यांदा असे बघते आहे काय.....? Be comfortable "..... राज

" नाही...पण आधी वेगळे होते....आता वेगळं आहे...."..नंदिनी आपली नजर चोरत बोलत होती......

असे नव्हते की तिने त्याला असे कधी बघितले नव्हते....पण आता तिच्या त्याच्यासाठी असलेल्या  भावना बदलल्या होत्या....त्याच्याकडे बघण्याची नजर बदलली होती.....आता ती त्याला आपला प्रियकर या नजरेने बघायला लागली होती........त्यामुळे  त्याला बघून तिला लाजल्या सारखे होत होते......इतर वेळी त्याच्यासमोर दादागिरी करणारी नंदिनी या क्षणी त्याला असे बघून मात्र पुरतीच बावरली होती...

" नंदिनी sss.... किती उशीर?....."...खालून काकीचा आवाज आला...

" आले sss....".... नंदिनी

" लवकर ये .....".....त्याचाकडे न बघताच ती खाली निघून आली...

त्याच्या डोक्यात मात्र " आता वेगळं आहे " तीच हे बोलले शब्द फिरत होते.....हृदयात काहीतरी टोचल्यासारखे त्याला वाटत होते.....

........

बाहेर अंगणात मांडावाखाली तीन चौरंग मांडण्यात आले...त्या भोवती सुबक रंगीत रांगोळी काढली होती...पूजा सुरू व्हायच्या आधी आंघोळ घालण्याचा कार्यक्रम होते...काका ,काकी आणि राहुल ला चौरंगावर बसवले होते... आजोसाहेबांनी, आई , नंदिनीच्या आजीने नंतर नंदिनी , घरातील काही बायका असे पाच जणींनी मिळून सगळ्यांचे  त्यांचे औक्षण केले.....त्या तिघांना आंघोळ घालण्यात आली.... नंदिनी आणि राजच्या काही चुलत मावस बहीणनी मिळून पूजेची जागा आंब्याचे पान, तोरण, फुले , रांगोळीने सुशोभित केली..... काका,काकी , राहुल  तिघेही पुजेवर बसले.... बऱ्याच वेळ पूजा चालणार होती .... नंदिनी सगळ्या पाहुण्यांना काय हवे नको ते बघत होती....मनोभावे ती सगळ्यांचे आदरातिथ्य करत होती ....तिची बरीच धावपळ सुरू होती...

राज सुद्धा बाहेर काही लागणारं बघत होता...येणाऱ्या जाणाऱ्या चे स्वतागत करत होता....

सगळं आटोपून राज घरातील असणाऱ्या पायऱ्या जवळ उभा सगळीकडे लक्ष देत होता ....तेवढयात त्याचे लक्ष वरती गेले

" Beautiful ❤️ ........"... नंदिनीला बघून आपसूकच त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडला....

वरती  नंदिनी त्याच्या चुलत बहिणी सोबत काहीतरी बोलत उभी होती.....पहाटे ती  त्याच्या रूममध्ये  आली होती तेव्हा त्याचं लक्ष फक्त तिच्या चेहऱ्याकडेच होते....आता तो तिला निरखून बघत होता....ती कमालीची सुंदर दिसत होती....तिने जांभळ्या रंगाची गोल्डन काठ असलेली प्युर सिल्कची हलकी साडी  नेसली होती....त्यावर स्लीवलेस सेम जांभळ्या रंगाचे ब्लाऊज,...केसांची  एक सैलसर वेणी, त्यातल्या काही बटा तिच्या खांद्यावर रुळत होत्या .....त्यात माळलेला  मोगऱ्याच्या फुलांचा गजरा ....डोळ्यात काजळ, कपाळावर जांभळी चंद्रकोर , ओठांना लाईट शेड लिपस्टिक ...गळ्यात नाजूक सर, हातात जांभळ्या काचेच्या सहा सहा बांगड्या त्यात एक एक कडं ....बोलतांना तिच्या ओठांची होणारी हालचाल...क्षणांक्षणाला बदलणाऱ्या तिच्या चेहऱ्यावरचे भाव.....राज तिला बघण्यात गुंतला होता .... त्याच्या बाजूला आलेल्या माणसाकडे सुद्धा त्याचे लक्ष नव्हते ...

जसे राजच्या लक्षात आले नंदिनी वळणार , नंदिनीला कळेल आपण तिच्याकडे बघतोय या भीतीने त्याने लगेच आपली मान वळवली.....तसे त्याच लक्ष त्याचा बाजूला उभा असलेल्या माणसाकडे गेले...

" मिस्टर सुखदेव.....काय काम काढलं?"....राज

" सर..... फंक्शन चे सगळे पेमेंट झाले आहेत.... फक्त हे इथे आपण जे रिसेप्शन ठेवले आहे त्याचं काही राहिले आहे ...."....सुखदेव

"Okay....... चेक द्या....."...राज...

तसे सुखदेव ने काही चेक्स पुढे केले......राज त्याची पडताळणी करून घेत साईन करत होता....पायऱ्या उतरताना खाली येत असताना नंदिनीचे लक्ष त्याच्याकडे गेले तर तो काही पेपर्स वाचत होता..... राजने लाईट कोसा सिल्कचा फिटिंगचा कुर्ता पायजमा घातला होता...बाह्य फोल्ड केल्या होत्या....त्या सिंपल लूक मध्येसुद्धा तो तिला खूप अत्त्रॅक्टीव वाटत होता....ती त्याला न्याहाळत एक एक पायरी उतरत खाली येत होती....आणि अचानक  तिच्याकडून दोन पायऱ्या स्किप झाल्या ......पडण्याचा भीतीमुळे तिचे डोळे बंद झाले होते....... पडता पडता तिचे मागून  डोके भिंतीवर आपटणार तेवढयात तिला तिच्या डोक्यामागे मऊशार स्पर्श जाणवला...आणि तिच्या दंडाला कोणीतरी घट्ट पकडुन ठेवले आहे तिला जाणवले....तिने डोळे उघडले तर राज तिच्या पुढे उभा होता...आणि त्याचा हात तिच्या डोक्यामागे ...

राज जरी पेपर बघत होता तरी त्याचे लक्ष नंदिनिकडेच होते.....आणि जसे त्याला ती पडताना दिसली....त्याचा हृदयात धस्स झाले होते.....भीतीने हृदयाची धडधड वाढली होती ......कारण तिच्या डोक्याला काही लागणे म्हणजे तिच्यासाठी चांगले नव्हते...आणि त्याने लगेच तिला पकडले होते....

" तुला साडी घालायची काय गरज होती...... आई sss हिला....".....राज आई म्हणून ओरडणारच होता की नंदिनी ने त्याचा ओठांवर हात दाबून धरला आणि हळूच त्याला पायऱ्यांच्या पलीकडे एका कोपऱ्यात नेले...

" ओरडत का आहेस..?? सगळे घाबरतील ना.. पूजे मध्ये डिस्टर्ब होतील.....जरा डोकं वापर.. ..."....नंदिनी

राज फक्त तिच्याकडे बघत होता...

" आता बोल ना , आता का बोलती बंद झाली...."...नंदिनी तो काही बोलत नाही बघून परत बोलली. तशी त्याने नजरेने खुणावले...तेव्हा तिच्या लक्षात आले तिचा हात त्याच्या तोंडावर आहे.....त्यामुळे त्याला बोलता येईना....तिने लगेच तिचा हात बाजूला केला...

" तुला साडी नेसायची  काय गरज होती....?? सांभाळल्या जात नाही ,  पडत होती आता ".....राज थोडा चिडल्यासारखा बोलत होता...

" साडी नाही , तुझ्यामुळे पडत होती.....इतके हॉट शॉट दिसायची काय गरज होती....."...नंदिनी त्याच्याकडे बघत मनातच बोलत होती...

" ते कोणालातरी मी साडीमध्ये आवडते म्हणून...."....नंदिनी हसत बोलली.... ती हसते आहे.. स्वतःची काहीच काळजी नाही बघून त्याला आणखीच राग येत होता....

" साडी नेसायची  असेल तर एका जागेवर बसायचे.....वरती खाली धावपळ करायची असेल तर ड्रेस घालून ये "....राज

" Okay मी बसते एका जागेवर,  पण मग मला काही हवे असेल तर कोण देणार?? आई , काकी, छाया काकी सगळे कामात आहे...  "..... नंदिनी

राजने तिचे बोलणे  ऐकून डोक्यावर हात मारून घेतला...

" तर तुला साडीतच राहायचे ?"....राज

" हो ..."...नंदिनी बत्तिशी दाखवत होती

" हट्टी....."....राज

" Thanks.... देशमुखांचाच गुण आहे तो "....नंदिनी

त्याच्या प्रत्येक शब्दाला नंदिनीचे उत्तर तयारच होते...नंदिनी सोबत वाद घालून  काही फायदा नाही ....राज la कळले होते..

" मग एकाच जागेवर बसायचे....तिथून थोडी करी हलली ना .... तर मी सगळ्यांसमोर आईला सांगेल...."....राज

" Okay... पण मग मला काही हवे असेल तर?"....नंदिनी

" मला सांग ...मी देईल तुझ्या हातात आणून...पण उठायचं नाही...."... राज

" पण मग तुला माझे कामं करतांना बघून  सगळे जोरू का गुलाम, बायकोच्या तालावर नाचणारा , बायकोच्या मुठीत आहे इत्यादी काही बोलतील ना ?".... नंदिनी

" आपण कुठे आहोत नवरा बायको...?? आणि असं काय कोणी नाही म्हणत...."....राज

"For your kind information .... इथे सगळ्यांना मी तुझी बायको आहे हेच माहिती आहे ... ...त्यांना कुठं काय माहिती आपला प्लॅन ?  "....नंदिनी

"Whatever.... कोण काय बोलत आहे ,मला काही फरक पडत नाही ... तू एका जागेवर बसायचं...काय हवे नको मला सांग, मी जवळ नसेल तर  मेसेज कर ,नाही तर फोन कर .... आणून देईल...."....राज

" Are you suru ?? नाही म्हणजे बघ हा...??...कोण काय म्हणाले तर मी तुझेच नाव सांगेल.... मग माझ्यावर चीडायचे नाही...."...नंदिनी आणखी जास्तीच त्याच डोकं खात त्याला त्रास देत होती.....

" हो म्हणालो ना......"....राज चिडत बोलला

" चिडकुराम ....... ".....नंदिनी हसतच पूजा सुरू होती तिथे बायकांच्या साईड ला जाऊन बसली..... राजचे मात्र सगळे लक्ष तिच्याकडेच होते....

आता मात्र नंदिनी राज रिकामा दिसला की त्याला कधी वरती तिच्या रूम मधून , कधी किचन मधून....काही ना काही आणून मागत होती.....आतापर्यंत जवळपास पाच सात वेळा असे झाले होते......राज नंदिनी जवळ तिने मागितलेले काही द्यायला आला की नंदिनी जवळ बसलेल्या बायका त्यांच्याकडे बघत होत्या.....अधून मधून राहुल सुद्धा त्यांच्याकडे बघत होता..... एकदा तर त्याने इशाऱ्याने काय झाले म्हणून विचारले सुद्धा.... नंदिनीने त्याला एक डोळा मारत काही नाही असे खुणावले होते.....

पूजा होत आली होती..... आरती , प्रसाद झाला......आता घरचा अहेर कार्यक्रम सुरू होता......घरातील सगळे बसले ..... पण राजने मात्र यायला नकार दिला....तिथे पण नंदिनिने तो काही कामात आहे कारण पुढे करून वेळ सांभाळून घेतली.... .. आता घरातील सगळ्या लहान मोठ्या बायकांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता... एक एक बाई बांगड्यावाल्या मावशी पुढे येऊन बसायची...मावशी त्यांना बांगड्या भरून द्यायची....

" का ग ... का त्रास देतेय त्याला....?".... राहूल

" माझ्यावर चिडला तो, साडी का नेसली म्हणून.... एकतर त्याच्याच साठी साडी नेसायची...साधं कौतुक तर नाही  , वरतून माझ्यावरच रागवायचे............ "....नंदिनी

" बरोबर आहे त्याचं..... तुला झेपत नाही साडी.....मी पण बघितले होते...तू पडत होती ते ......"... राहूल तिची मस्करी करत होता

" मी काय साडीमध्ये अडकून पडत नव्हते......"....नंदिनी

" मग??"....राहुल

" ते तर...... मी ......... जाऊ दे सोड...... पण त्या चिडकुरामला ......"....नंदिनी  बोलतच होती तेवढयात काकीने तिला बांगड्या भरण्यासाठी  आवाज दिला....

" आले.....मला एका जागेवर बसावतो काय ...... आता बघ गंमत......"...तिच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू आले..

" आता काय करणार आहेस तू??".....राहुल

" बघ ......".... हसतच ती मावशीबाई पुढे जाऊन बसली..

" आ sssss.........".....मावशोबाई तिला बांगड्या भरतच होत्या की नंदिनी थोडी जोरातच कळवळली...

राहुलला ती काय करणार ते कळले आणि त्याने हसतच डोक्यावर हात मारून घेतला.....

नंदिनीचा कळवळल्याचा आवाज ऐकून राज धावतच तिथे आला...

" काय झाले?? तू ठीक आहेस ?".... राज

" काय नाय साहेब ... ते एक बांगडी फुटली घालतांना ...थोड रुतले असेल ताईंना ...."..... मावशीबाई

" काय...??? "....त्याने लगेच त्या मवाशीच्या हातातून नंदिनीचा हात काढून घेत आपल्या हातात घेतला....आणि  कुठे लागले आहे काय ते बघत होता... तर एका ठिकाणी छोटीशी खोच लागल्यासारखे दिसत होते...

" नंदिनी दुखत आहे काय ?"... राज

" ह्मम .... थोडंसं ".....नंदिनी बारीक चेहरा करत बोलली

" एक काम नाही करता येत कोणाला नीट "..... राज चिडत होता...

" अरे मवशीबाईंची काहीच चूक नाहीये....त्या घालायला गेल्या आणि मी माझा हात दाबायला गेले...एकत्र झालं म्हणून हे असं......".... नंदिनी

" उठ, बांगड्या वैगरे काही भरायच्या नाही......"...तो तिचा हात पकडत तिला उठायला सांगत होता...

" अरे राज येवढं काही नाही झाले आहे.... आज हिरव्या बांगड्या भरायच्या असतात.... मावशीबाई हळूवारपणे भरा आता ".....आई

" नाही नको.....".... राज

" साहेब सवासणीने भरायच्या अस्त्यात....शुभ असते "....मावशी बाई

राज आईकडे बघत होता...त्या त्याला भरू दे म्हणून खुणावत होत्या....

" तुम्हीच भरल्या पाहिजेत, असा काही नियम आहे काय?"....राज

" नाही... कोणी बी भरून द्या.... फक्त भरा....".... मावाशिबाई

" द्या मला .....".....राजने त्यांच्यापुढे आपला हात पुढे केला.... मावशी बाईंनी राजच्या हातात तीन बांगड्या ठेवल्या...

राज नंदिनी पुढे बसून हळूवारपणे तिच्या हातात बांगड्या घालत होता.....

" माझा राज....तू आहेसच वेगळा...खूप प्रेमळ.......".... त्याची तिच्यासाठी काळजी ते पण सगळ्यांसमोर...हे सर्व बघून ती मनोमन  खूप सुखावली होती..... आणि खूप कौतुकाने त्याच्याकडे बघत होती..

सगळे त्याची गंमत बघत होते...... काही तरुण मुलींना तर  नंदिनीच्या नशिबाचा हेवा सुद्धा वाटला असेल.... काहींना राज सारखा मुलगा,नवरा हवा होता...तर काही मोठ्या बायका नाक मुरडत होत्या.....काही कौतुकाने त्यांची गंमत करत होत्या...

"  खुप्पच काळजी बाबा बायकोची "  ..." असा नवरा हवा ग बाई......" मुठीत आहे बाई नवरा "  .... जसे राजने वाक्य ऐकले....तो नंदिनिकडे बघायला लागला.... त्याच्या माथ्यावर दोन तीन आठ्या पडल्या होत्या....

" मी म्हणाले होते ना .."...या आविर्भावात ती भुवया उडवत हसत त्याच्याकडे बघत होती... त्याला तिचं बोललेले आठवत होते....

" हो मग आमची नंदिनी आहेच इतकी गोड , तिच्या मुठीत राहायला कोणाला नाही आवडणार....आणि काळजी तर घ्यायलाच हवी ना......राज,कर बाळा तू तुझं काम ......"......काकीने एक डायलॉग फेकून मारला....

" माझ्या मुलांना  दृष्ट लावाल काय......राज तू नको देऊ इकडे लक्ष "....आईने पण काकीच्या सुरात सूर मिसळला..

तसे सगळ्या बायका हसायला लागल्या.......फोटोग्राफर मात्र त्याचे काम चोख बजावत होता....त्याने प्रत्येक क्षण अगदी काव्यमय आपल्या कॅमेरा मध्ये कैद केले होते....

त्याला मात्र आता तिथे खूप लाजल्यासारखे झाले होते.....लाजून त्याचा चेहरा लाल झाल्यासारखा दिसत होता....नंदिनीला त्याचे ओठ थोडे रुंदावल्या सारखे वाटले..........नंदिनीने त्याला हसतच एक डोळा मारला.....तिला असे बघून आता त्याला सुद्धा हसायला आले......तो मनापासून हसायला लागला...... सगळ्या बायकांकडे बघत त्याने हात जोडले.... आणि आणखी जास्ती काही ऐकायच्या आधी तिथून गायब झाला.....

घरात जाते खेळते....गमती जमती चे वातावरण झाले होते.....सगळ्या बायका राजाचे कौतुक करून थकत नव्हत्या.... नंदिनीचे नशीब कसे उत्तम आहे तिला सांगत होत्या...... राज चे कौतुक ऐकून नंदिनीला पण त्याचा खूप अभिमान वाटत होता.....

" हे काय होते??  तू मुद्दाम केले ना??" ....राहुल

" Yess"...... नंदिनी

" त्याच्या प्रेमाचा फायदा घेते ना तू?"....राहुल

" Yess ".... नंदिनी त्याला आपली बत्तिशी दाखवत हसतच मान वर खाली हलवत हो म्हणत होती..

राहुलला तिच्या त्या अवताराकडे बघून हसू येत होते

" त्याच्या प्रेमाचा फायदा मी नाही घेणार तर कोण घेणार? आपला हक्क आहे त्याच्यावर , After all मी त्याची सात फेरे घेतलेली लीगल वाइफ आहे.......मी त्याच्या सोबत काहीही  करेल, म्हणजे अगदी काहीही.......कोण अडवणार मला ?".....नंदिनी

" फार बदमाश झालीस हा तू".... राहूल

" तुझा भाऊ करायला भाग पाडतो मला असे स्टंट्स...... बुद्धुराम "......नंदिनी

" काय काय करत असतेस , देवा आता तूच बघ....माझ्या भावाची डोरी तुझ्याच हातात ".....राहुल नौटंकी करत होता

" ये गप रे........तुझं लग्न  ,हे  क्षण त्याच्या आठवणीत राहिले पाहिजे......"....नंदिनी

" कठीण आहे बाबा तुझं"....राहुल

" Couple goals ..".... नंदिनी

" काय...?"....राहुल

" Couple goals सेट करत आहोत....म्हणजे प्रत्येकाला वाटायला हवे couple असावे तर असे.... " ......नंदिनी

" वहिनी साहेब ...... ग्रेट आहात आपण.. आपले पाय दाखवा...."... राहुल तिला नमस्कार करायचं नाटक करत होता...

" मग....बायको कोणाची ....."....नंदिनी

" हो हो....कळले."..... राहुल

" ये पण आपण दिर भावजय नंतर हा..... आपण नेहमी फ्रेंड्स असणार आहोत....जसे आधी होतो....काही बदलायला नको....मला आपले हेच नाते खूप आवडते..... माझं फक्त राज सोबत नातं बदलले आहे , पण आपले सगळ्यांचे असेच असणार आहेत..."...... नंदिनी

" कोई शक मोहोतरमा "....राहुलने तिच्या खांद्यावर हात टाकत तिला जवळ घेतले......आणि दोघंही गप्पा करत होते.....

घरातल्या पाहुण्यांना मात्र नंदिनी चे  खूप कौतुक वाटत होते.... कुठेच किंवा कोणत्याच नात्यात ती या घरची सून आहे असे अजिबात वाटत नव्हते..... राजमुळे जरी  ती या घराला जोडली गेली असली तरी तिने तिचे एक वेगळे , प्रेमाचे , आपुलकीचे नाते सगळ्यांसोबत निर्माण केले होते......तिच्यासाठी तिचं हे सासर आहे असे कधीच तिला   जाणवले नव्हते.... जी वागणूक राज , राहुलला मिळत होती सेम तीच वागणूक नंदिनीला मिळत होती....प्रत्येक नात्यात पारदर्शकता होती, विश्वास होता....आणि भरपूर प्रेम....अपेक्षाविरहित.......

खरंच आहे नात्यांचे ..... खूप अपेक्षा असल्या नात्यांकडून तर ते नातं आतमधून पोकळ होत जाते......

*******

खरं तर या लग्नाचा खर्च  रश्मीच्या घरी परवडणारे नव्हते.....पण राहुल आणि रश्मीच्या सगळ्या आवडीनिवडी, सगळे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी राजने घेतली होती..... नंदिनी आणि राजचे त्यांना हवे तसे लग्न नव्हते झाले.....म्हणून कमी लोकात पण सगळ्या हौशी तो पूर्ण करणार होता.....

घराचे लग्नाचे छोटेमोठे कार्यक्रम आटोपले होते.....महाबळेश्वर हे लग्नासाठी ठरवलेले ठिकाण होते...सगळे आपापल्या बॅग्स भरत होते.....तयारी सुरू होती...उद्या सकाळी लवकर निघायचं होते.....

*****

क्रमशः

🎭 Series Post

View all