Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 75

Read Later
नंदिनी...श्वास माझा 75

भाग 75

 

" राज नंदिनीला जेवायला बोलावून आण....".... आई

 

"ती झोपली आहे......"....राज

 

" अरे पण जेवायची वेळ झाली.......जेवून घे मग परत झोप म्हणावं".......आई

 

" अशी अवेळी  झोपत तर नाही ती कधी..... बरं आहे ना तिला??"....काकी

 

" पहाटेला लवकर उठून आली इकडे...झोप नसेल झाली.....तसेही नाश्ता तिने पोटभर केला आहे.... झोपू दे..... कधी कधी जेवण पेक्षा झोप महत्वाची वाटते.....करू देत आराम".....राज

 

" बरं ठीक आहे.....".....आई

 

राज जेवण आटोपून आपल्या रूममध्ये जात होता तर नंदिनीला एकदा बघुन यावे म्हणून तिच्या रूम मध्ये गेला. नंदिनी त्याने दिलेला मोठा टेडी पकडून निवांत झोपली होती. खूप शांत आणि समाधानी दिसत होती. .ती एकदा झोपली की खूप गाढ झोपायची....घरात ती बिनधास्त असायची....तीला माहिती असायचे घरात कुठेही झोपले तरी सकाळी मात्र ती तिच्या रूम मध्ये असायची...इतका गाढ विश्वास होता तिचा राजवर.......

 

ती अमेरिका वरून परत आल्यापासून त्याला मनभरून तिला बघता आले नव्हते...सकाळी पण तिने त्याच्यावर खूप चिडचिड केली होती...आता ती शांत झोपली होती.......  झोपेत तर ती त्याला फारच आवडायची....ती खूप गोड भासायची त्याला.....त्यामुळे राजला तिला मनसोक्त बघता यायचे.......

 

" नंदिनी तुला बघण्याचा हक्क सुद्धा गमावलाय ग मी....तुझ्या जागेपणी तुला बघता सुद्धा नाही येणार.......sorry पण तुला बघावल्या शिवाय राहवत नाही ......."....राज आपला लॅपटॉप घेऊन तिथेच टेबल खुर्चीवर काम करत बसला....काम कमी नी तिला बघनेच जास्ती सुरू होते.....अधूनमधून झोपेत ती गोड हसायची.......काहीतरी गोड स्वप्न बघत असावी. ....त्याला खूप गम्मत वाटत होती..

 

.................

 

" Oye कुंभकर्ण ....उठ आता......कधीची झोपलिये......." ...राहुल नंदिनीला उठवत होता....

 

"गुड मॉर्निंग ......."....नंदिनी आळोखे पिळोखे देत उठली

 

" भारीच.... न पिता चढली आहे तुला तर... "..... राहूल

 

" नशा ये प्यार का नशा है........by the way मी असं काय केले तू बदबडतोय."....नंदिनी

 

" मॅडम संध्याकाळ झालीय.....सकाळ नाही..".....राहुल

 

"काय??.... बापरे मी ऐवढे झोपले......."...नंदिनी

 

" हो...जसे काही कोणी तुला झोपू नाही दिले.....चेहरा बघ किती सुजला तुझा"...... राहूल

 

" Peace....... आपल्या घरासारखा स्वर्ग नाही कुठे..... I love my home ....."..... नंदिनी आळस झटकत उठली....." कॉफी हवी बाबा आता.....परत झोपावस वाटेत आहे".....नंदिनी

 

" नंदिनी ताई , राहुल दादा कॉफी ......"...छाया कॉफीचा ट्रे आतमध्ये घेऊन आली...

 

" राज .........कॉफी घ्यायला ये...."....पुढून जाणाऱ्या राजला राहुलने आवाज दिला.....तसा राज नंदिनीच्या रूममध्ये आला.

 

"नकोय मला....."...राज

 

" जुग जुग जियो मेरी छाया काकी.....माझ्या मनातले जाणले तुम्ही....... "... नंदिनीने एक कप उचलला...

 

" ताई ते......"....छाया बोलणारच होती की राजने तिला डोळ्यांनीच नाही म्हणून सांगितले.

 

छाया थोडीशी हसली.....

 

नंदिनीने कॉफीचा एक सीप घेतला....," राज"...मनोमन ती बोलली....तिच्या लक्षात आले कॉफी राजने बनवली आहे....

 

" इयू........ काय छाया काकी तुम्ही पण आजकाल कडू झाल्या वाटता......".....नंदिनी राहूल ला एक डोळा मारत बोलली.... तिला बघून राहुलला हसू येत होते.....

 

" म्हणजे...?? काय झालं ताई??काही चुकलं काय?".....छाया थोडी घाबरली

 

" साखर टाकायच्या विसरल्या कॉफीमध्ये...शी किती कडू झालिये कॉफी .... ".....तिने कप बाजूला ठेवला...नी पाण्याचा ग्लास हातात घेतला.....

 

" ताई......"....छाया काही बोलणार तेवढयात राहुलने त्यांना इशाऱ्याने काही नाही..जा म्हणून सांगितले.... ... तस्या त्या निघून आल्या.

 

" काय....?? असं कसं होऊ शकते.....??"....राज

 

" कडू लोकांच्या सहवासात......."....नंदिनी

 

" ठीक तर आहे....."....राज, मनातच बोलत.....त्याने नंदिनीची कॉफी उचलली आणि एक सीप घेतले..

 

राजला कळला होता नंदिनीचा टोमणा....पण त्याने दुर्लक्ष केले.

 

" काय...??...कसे शक्य.....??....दाखव......"....तिने त्याच्या हातातली कॉफी घेतली......

 

" अरे हा....आता ठीक आहे टेस्ट......उगाच ओरडले छाया काकीवर......"....ती कॉफी पित बोलली

 

तेवढयात राज चा फोन वाजला आणि तो बोलायला म्हणून बाहेर गेला....तो बाहेर गेला तसे नंदिनी ने कप फिरवले....आणि त्याने कॉफी सिप घेतली होती त्या साईडने कॉफी प्यायला लागली

 

" Very filmy हा........".... राहूल

 

" फिल्मी तर फिल्मी.......असू दे..... प्यार में सब जायज है.......".....नंदिनी

 

"नौटंकी......"....राहुल

 

" त्या खडूसला  कळायला नको , मी एवढी हींट देतेय त्याला..."....नंदिनी

 

" खडूस??"...... राहूल

 

" प्रेमाने म्हणतो तो वाला खडूस रे......तसा तो गोडच आहे खूप".....नंदिनी

 

" कसं वाटले अमेरिकेला ?? आवडले काय??"..... राहुल

 

" छान आहे.......बऱ्याच गोष्टी आवडल्या...... लोकं पण छान आहेत... ओळखीची गरज नाही....All time हसून अभिवादन करतील.... वीकेंड ला तर खूप फिरायचो.....पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सर्वांना खूप मिस केलें......"....नंदिनी

 

" ह्मम..... ते तर आहे.... बरं काय आवडले तिथे जास्ती....."..... राहुल

 

" तिथले लोक ना रुल्स खूप फॉलो करतात.... ट्रॅफिक रुल्स असो नाही तर स्वच्छतेचे सगळंच डोळसपणे पाळतात....लहान दोन वर्षाचं मुल सुद्धा तिथे रस्त्यावर कचरा काय साधा कागद सुद्धा नाही फेकत.... लहानपणा पासून वळणच तसे असावे त्यांना....गाव असो वा शहर खूप स्वच्छ देश आहे...

 

पब्लिक लायब्ररीची सिस्टीम मला खूप आवडली तिथली....सगळ्यांसाठी खुली.....आणि किती मोठी जसा काही एखादा मॉल.......प्रत्येक वयानुसार मांडणी केलेली......लहान मुलांसाठी पुस्तकं ,खेळणी स्पेशल सेक्शन म्हणजे ज्या बायकांना वाचायला आवडते पण मुलांमुळे वैगरे वेळ नाही मिळत त्यांच्यासाठी खूप उत्तम, ...आणि सगळी पुस्तकं तिथे..... एज्युकेशनल , आणि बाकी इतर सगळीच पुस्तक....किती छान ना...."....नंदिनी

 

"खूप आवडली वाटते लायब्ररी??"..... राहूल

 

"हो ना , बघ ना , ज्यांना अभ्यासासाठी/वाचण्यासाठी पुस्तक घेणे परवडत नाही, पण त्यांची स्वप्न आहे खूप शिकायची....त्यांना किती फायदा होतो त्यांचा.....खूप आवडले बाबा मला ते....मी लायब्ररीची मेंबरशिप घेतली आणि खूप पुस्तकं वाचली....खूप वेळ घालवला तिथे.....मला राजची खूप आठवण यायची....किती करतो  ना तो गरजू मुलांना एज्युकेशन मिळावे त्यासाठी....किती धडपड सुरू असते त्याची....मला खूप अभिमान वाटतो यार त्याचा .... इतकं कोमल मन कोणाचं कसे असू शकते ना......".....नंदिनी

 

" ह्ममम , बरोबर आहे म्हणूनच आपले वाचक म्हणतात असं इतकं चांगलं कोणी असू शकतं काय?". ..... राहूल

 

" हा हा हा..... आहे ना माझा  श्रीराज.....असतात रे चांगली लोकं, किती समाजिक कामं करतात , स्वतःला सुद्धा वाहून घेतात त्या कामांसाठी.. .......आणि मी काय म्हणते कशाला हवी तुलना....तुलना नकोच मुळी.....पण जर काही चांगलं शिकता येत असेल राज कडून तर काय हरकत आहे?......".....नंदिनी

 

" हो ते आहेच....मी तर शिकतोय बाबा त्याच्या कडून......बर मला सांग ना तुला कधी रियलाइज् झाले तू राजच्या प्रेमात पडलीय...??..".... राहुल.

 

"हो हो सांगते...किती घाई..."....नंदिनी

 

" अरे मग काय....कधीची वाट बघत आहेत सगळे.....मला सगळ्या डिटेल्स हव्यात" ....राहुल

 

" ....मला पण सगळं सांगायला आवडेल रे, खरं तर मला भरपूर काही सांगायचं होते, त्यात दोन तरी पार्टस जातील....पण अरे आजकाल  वाचक बोर व्हायला लागले .....थोडक्यात सांगते ...."....नंदिनी

 

" बरं बाबा आता थोडक्यात सांग , नंतर मला सगळे डिटेल्स सांग........."....राहुल

 

" खरं तर मी अमेरीकेला जायच्या आधीच राजकडे अत्त्रॅक्ट होत होते.....तुला आठवते माझं आणि राज चे वाद झाले होते ऑफिस मध्ये त्या मुलीला प्रोजेक्ट वरून काढ म्हणून......मला नव्हते आवडत कुठली मुलगी त्याच्याजवळ गेलेली ....म्हणून मग माझी चिडचिड व्हायची..........."....नंदिनी

 

" हो आणि त्यातच तुझं ते ॲसिडीटी प्रकरण......."... राहूल हसायला लागला...

 

" अरे हो रे....तो जवळ आला,त्याचा थोडा जरी स्पर्श झाला की फारच धडधडायला व्हायचं....मग काय करणार... मला कळत पण नव्हत मला काय होतंय......जेवढी माझी बुद्धी काम करत होती तेवढे समजले मला..त्यात माझ्या फ्रेंड्स पण म्हणाल्या ॲसिडीटी झाली असणार.....कारण मी कोणाच्या प्रेमात असेल हे त्यांच्या पण पचनी नव्हते पडणारे.....

 

अमेरिकाला गेले.....त्या देशाच्या भूमीवर पाय ठेवल्या ठेवल्या खूप प्रसन्न वाटले......जिकडे बघाव तिकडे सगळं पांढरं.... कापसा सारखा मऊसूत बर्फ....कसलं भारी वाटत होते....तिथली घरं...लोकांचा तो पेहराव....सगळं ते मी कार्टून बघायची ना एकदम तसेच....खूप मज्जा वाटली ते सगळं बघायला....हॉटेल मध्ये पोहचलो.....जाम दम होते.....इतका 25-28 तासांचा तो प्रवास...त्यात विमनामध्ये एकाच जागी बसायचं....पूर्ण अंगच अकल्डले...त्यात जेट ल्याग .....दोन दिवस तर फक्त झोपण्यात गेले. कॉलेजला गेले.. एडमिशन प्रोसिजर सगळं पार पाडले...तिथे एक शैला नावाची भारतीयच मैत्रीण मिळाली..जी माझी तिथली सगळ्यात बेस्ट फ्रेंड होती ...ती तिथेच रहात होती त्यामुळे मला तिथे काही गैरसोय झाली नाही...तिने तिथे सगळं गाव फिरवले..सगळी बेसिक माहिती करून दिली...नवीन जगातले आयुष्य ते पण राजविना खरं तर तिनेच सोपी करून दिले.....नाही तर मला तिथे राहणं खूप कठीण होत होते....राजची इतकी सवय आहे ना की एकट्याने काहीच करायला जमत नव्हते...पण मग शैला होती सोबत आणि सगळं मग हळू हळू जमायला लागले....दिवस कॉलेज आणि बाकी कामत जायचा...पण रात्र जाईना....सुरुवातीच्या पंधरा वीस रात्री तर मी अक्षरशः रडून काढल्या आहेत.......फोनवर व्हिडिओ कॉल वर कितीही बोलले तरी सगळ्यांचा सहवासाची खूप सवय होती...त्यात सतत मी राजच्या अवतीभोवती असायची....तो जवळ असायचा....खूप आठवण यायची.... हळूहळू आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाहीये हे जाणवायला लागले होते....पण कुठेतरी राज आपल्या आयुष्यात थांबला आहे, माझ्या काळजीपोटी तो त्याचा आयुष्यात move on करत नाहीये ,  असे वाटत होते...त्याने पुढे जावे, त्याने पण आयुष्य मन भरून आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जगावे वाटत होते....त्याला कोणीतरी आवडते माहिती होते...म्हणून मग मी त्याच्यासोबत फोन वर बोलणे सुद्धा कमी केले...त्यातच मला इथे एक छान पार्ट टाईम जॉब सुद्धा मिळाला....त्याला मी इथेच राहण्याचा हट्ट केला...त्यात आमचा थोडा वाद सुद्धा झाला.... आणि मग आणखीच जास्ती दुरावा निर्माण झाला....आणि ती भूतकाळात हरवली..

 

" नंदिनी....no use.... I know खूप मुलींचा क्रश आहे तो ...पण त्याच्यावर लाईन मारून काहीच फायदा नाही.....तो भाव सुद्धा नाही देत....."......नंदिनी लॅपटॉप मध्ये राजचे फोटो बघत होती...तिचे लक्ष नव्हते शैला आलेली....ते बघून शैला बोलली

 

" तू ओळखते याला ???"......नंदिनी अवाक तिच्याकडे बघत होती...

 

" याला कोण नाही ओळखत....the femous buisnessman and great human being Shiraj Deshmukh.......married आहे......बघितले आहे मी त्याला काही वर्षांपूर्वी....इथूनच  पोस्ट ग्रॅज्युएशन केलेय त्याने ....माझ्या मोठ्या बहिणीच्या क्लासमध्ये होता....एक दोनदा घरी पण आला आहे.....damn hot आहे,फोटो पेक्षा पण रिअल मध्ये ऑसम दिसतो.... बोलणं तर इतकं छान आहे की  त्याचं बोलणं ऐकताना हिप्नोटाईज सारखं व्हायचं.... कुठलाही मुलीच्या स्वप्नाला राजकुमार..अगदी तसाच ....माझ्या ताईला खूप आवडत होता...."....शैला

 

" मग....मग काय झाले ???"......नंदिनी आश्चर्य चकित होत विचारत होती.....दुनिया किती गोल आहे , तिला गंमत वाटली......तिला राज शिकायला इकडे होता हे माहिती होते...पण बाकी काही नाही....आणि कधी असे विषय निघाले नाही .....

 

" मग काय....काही नाही ...तिने त्याला सांगितले की तिला तो आवडतो...... त्याने स्पष्ट नकार दिला...,माझी ताई सगळ्याच बाबतीत हुशार होती आणि दिसायला पण सुंदर....तरी त्याने नकार दिला....."....शैला

 

" का....? "......नंदिनी

 

" त्याचं कुठल्यातरी मुलीवर प्रेम आहे म्हणाला होता.....ती त्याची जीव की प्राण आहे .....त्याची बालपणीची मैत्रीण.....  ".... शैला

 

" तुला तिचं नाव माहिती?"......नंदिनी

 

" कोणाचं??".....शैला

 

" तीच ग , श्रीराजच्या love lady चे??"....नंदिनी

 

" नाही ग ..... तो त्याची पर्सनल लाईफ जास्ती डिस्कस नव्हता करत म्हणे....माझी ताई पण जाम मागे लागली होती त्याचा......तिने पण विचारले होते....तिला त्या मुलीसोबत बोलायचं होते... रिक्वेस्ट करायची होती ... श्रीराजवर तिचे खूप प्रेम आहे सांगायचं होते ताई ला.....पण नाही सांगितले त्याने तिचं नाव ...तो तिला खूप जपतो असे ताईने सांगितले..... किती लकी ना ती...."....शैला

 

" ह्मम...... मग लग्न ?? केले त्याने तिच्यासोबत??"....नंदिनी

 

" तेवढे नाही माहिती यार.....सोशल मीडिया वर  त्याचं  स्टेटस म्यारिड आहे.....पण त्याचा बायकोचा एक पण फोटो नाहीये कुठेच, पण एकदा वाचलं होत की ती नॉर्मल नाहीये...सो I doubt त्याचं लग्न तो प्रेम करत होता तिच्यासोबत त्याचे लग्न झाले की नाही...त्याची फॅमिली पण खूप स्त्रिक्ट आहे म्हणे... "....शैला

 

" ह्मम , बरच माहिती तुला त्याच्याबद्दल..."....नंदिनी

 

" I am also big fan of him.....follow his all articles, buisness advices...... त्याचे इंटरव्ह्यू किती इंस्पिरेशनल असतात .... फाइन आर्ट्स माझी हॉबी आहे....पण माझं mba झाले आहे....."....शैला

 

" Okay......".... नंदिनी .... तिला वाटले काहीतरी माहिती मिळेल पण काही झाले नाही.

 

" So I am telling you... याचे स्वप्न नको बघू...हा पण यांच्यासारखा मुलाचे स्वप्न बघू शकते....and yess sure  follow him for good thoughts... "....शैला तिची मस्करी करत होती...

 

" ह्मम...."....नंदिनीने आपलं लॅपटॉप बंद केला....परत तिच्या डोक्यात त्या mysterious girl बद्दल विचार सुरू होता...पण राजने शिकलेल्या, सुंदर मुलींना रिजेक्ट केले ती मुलगी त्याचसाठी खूप स्पेशल आहे हे मात्र तिला कळले होते....

 

नंदिनीला तिथे बरे मित्र मैत्रिणी मिळाल्या होत्या...त्यातलाच जय एक होता....नंदिनीच्या कॉलेजला एक जय नावाचा इंडियन ओरिजिनचा मुलगा होता... ....  त्याला नंदिनी आवडायला लागली होती.... तिचं पण त्याच्यासोबत चांगले जमत होते...

 

*****

 

" Hey Nandini.... तुला माहिती तो जय....त्याच्या मागे कॉलेज च्या अख्ख्या मुली आहे ....पण तो तुझ्या मागेपुढे करतोय"......शैला

 

" Shaila.....we are just friend yyar....."... नंदिनी

 

"  Do you love someone ??"..... शैला

 

" Umm....don't know yar......".... नंदिनी

 

" Still तुझ्या डोक्यात श्रीराज देशमुख तर नाही....?? अग हे is out of our access..... Jay is really good guy yar...... बिचारा तुझ्या मागे मागे असतो..."....शैला

 

" आम्ही फ्रेंड्स आहोत ग..... असे कधी मी विचार नाही केला आहे....."....नंदिनी

 

" नंदिनी मला ना तू कन्फ्युज वाटते आहे......तुमच्या दोघांचं किती पटते, छान आहे ग तो....".....शैला

 

" मला नाही कळत ग हे प्रेम वैगरे.......मला नाही माहिती मी कोणावर प्रेम करते वैगरे......खूप कंपलिकॅटेड आहे हे सगळं....leave it"..... नंदिनी

 

" अग सोपा फॉर्म्युला आहे....,डोळे बंद कर आणि प्रेम म्हटल्यावर कोणाचा चेहरा दिसतो बघ........"....शैला

 

" काही काय.....?".....नंदिनी

 

" जरा फिल्मी आहे पण काम करतो.....try तर कर"....शैला

 

शैलाच्या खूप आग्रहाखातर नंदिनीने डोळे मिटले...आणि तिच्या डोळ्यांपुढे राजचे वेगवेगळे रूप येऊ लागले......तिने खाडकन डोळे उघडले...

 

" काय झालं?? जय दिसला ना ?".....शैला

 

नंदिनी फक्त शैला कडे बघत होती.... तिचं हृदय जोरजोराने धडधडत होते ...

 

" शैला प्रेम झाले आहे कसे कळेल ??".... नंदिनी

 

" तस तर बरंच काही आहे.....शब्दात सांगता नाही येणार ... प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असू शकते.....जेव्हा त्या व्यक्ती शिवाय श्वास घेणे कठीण वाटते ....तेव्हा समजून जावे आपल्याला प्रेम झाले आहे.

 

.." शैला

 

" जॉय सोबत तुला असेच फील होते???"....नंदिनी

 

" नाही ग...."...शैला

 

" पण मग तो तुझा बॉयफ्रेंड आहे ना....."....नंदिनी

 

"  चांगला मुलगा आहे .... असं खरं प्रेम आजकाल कुठं असते.... All are very much practical here...".... शैला

 

" पण मग तू त्याचा सोबत लग्न....??"....नंदिनी

 

" बघू ग ... अजून काय ठरले नाही आहे..... बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वेगळा कॉन्सेप्ट आहे , लग्न करूच असे काही नाही.....".....शैला

 

" पण मग तुम्ही लिव इन मध्ये आहात....सोबत राहता...."....नंदिनी

 

" आजकाल ते नॉर्मल आहे ग इथे, आता तर भारतात पण नवराबायको सारखे  एकत्र राहतात लग्न करता....आणि सोपं पडते ना... उगाच कुठल्या अपेक्षा नाही, जबाबदाऱ्या नाही....इतर नात्यांचे ओझे नाही....आणि आपली प्रायव्हसी मिळते आपल्याला...कोण डोकावत नाही आपल्या आयुष्यात.... पटलं तर सोबत राहायचं ... नाहीतर वेगळे व्हायचे....."...शैला

 

" आणि मुल झालं तर??"...नंदिनी

 

" हाहाहाहा..... सगळे वेल एज्युेकेटेड आहेत.....अशी वेळ येतच नाहीत....."....शैला

 

" स्ट्रेंज.... म्हणूनच कोणाला खरं प्रेम समजेना झालय......मना मनाची ओढच राहिली नाहीये....आता प्रेम म्हणजे फक्त शरिरक गरजे पुरते मर्यादित झाले आहे.....सोबत रहा...बोर झाले की वेगळे व्हा......."....नंदिनी

 

" हो....आता दुसऱ्यावर प्रेम करायला वेळ कोणाजवळ आहे...प्रत्येकजण फक्त स्वतः वर प्रेम करतो....."....शैला

 

" असं नसते यार.... हे खूप व्यवहारीक जगणे झाले...."...नंदिनी

 

" जाऊ दे , आमचं असच आहे....तुला खरं प्रेम मिळाले तर सांग.....पण तो जय पण छान आहे ..."..... शैला

 

" ह्मम....."....नंदिनी

 

आपण राजच्या प्रेमात पडलो आहे हे बऱ्यापैकी नंदिनीला क्लिअर झाले होते......आपण राज वर प्रेम करतोय हे मनात येताच तिला खूप आनंद झाला होता.....पण लगेच राज दुसऱ्या कोणावर प्रेम करतोय हे तिच्या लक्षात आले....आणि प्रेमाचं दुसरं नाव त्याग असते हे तिच्या लक्षात आले.....त्याच्या साठी आपण आपल्या प्रेमाचा त्याग करावा हे तिने ठरवले....पण ती मात्र दुःखी राहत होती....

 

*****

 

" नंदिनी तू म्यारिड आहे??? " ......शैला शॉक झाली होती

 

" हो..."....नंदिनी

 

" तू आधी का नाही सांगितले.....??"....शैला

 

" मला नव्हते सांगायचं कोणाला.........जयने  मला प्रपोज केले...मी त्याला नाही म्हणून सांगितले......मित्र आहोत, मित्रच राहूया सांगितले.....पण जय ऐकतच नव्हता.....म्हणून मला मग खरं सांगावे लागले....."...नंदिनी

 

" कोण...?? आणि मला प्रेम, लिव इन बद्दल बोलत होती...आणि तूच तर त्या बिजनेसमन लाईन मारते....त्याचे फोटो बघत असते......this is rubbish... "...शैला

 

" मी नंदिनी श्रीराज देशमुख आहे......"....नंदिनी

 

" व्हॉट?? You mean The Shriraj Deshmukh...?? तू त्याची बायको आहे? ..... नंदिनी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघू नये.....he is married.... तुला आवडतो तो....पण म्हणून तू असे खोटं काही बोलू नको".....शैला

 

" I am Mrs Shriraj Deshmukh ..... "..... नंदिनी

 

" I am going to be mad..... मग तू आहे तर त्याची लव्ह लेडी.......आणि त्या दिवशी तू मला विचारत होती तो कोणावर प्रेम करतो.....and I am silly one ... तुला सांगत बसले....."....शैला खूप नाराज झाली होती...

 

" नाही, मी ती नाही.......मला नाही माहिती तिच्या बद्दल म्हणून सहज विचारत होते.....trust me....".... नंदिनी

 

" तेवढा chain of industries ची मालकीण तू....मग इथे जा छोटा जॉब का करते आहे.... ? सोन्याच्या चमाचाने खाणारी तू इथे येवढे दगदग का करतेय ?? I can't believe तू त्याची वाइफ आहेस??".... शैला

 

नंदिनी ने तिला सगळं जेवढ नंदिनीला कळत होते ते सांगितले...आणि ती इथे का आली हे सुद्धा सांगितले....

 

" Ohh.... He still in contact with that girl??"... शैला

 

" बहुतेक नाही....माझ्यासमोर तरी कधी बोलला नाहीये तिच्यासोबत...."....नंदिनी

 

" It means काहीतरी इश्यूज झाले दिसत आहेत त्या दोघांमध्ये..... And he moved on.... आणि त्याने तुझ्यासोबत लग्न केले.."....शैला

 

" काय माहिती, असू शकते.......पण तो अजूनही तिच्यावर प्रेम करतो.....".....नंदिनी

 

" Do you love him?".... शैला

 

" हो ..."....नंदिनी

 

" त्याला सांगितले तू??".....शैला

 

" नाही..... "....नंदिनी

 

" सांग ना मग"....शैला

 

" तो आधीच माझ्यामुळे सफर झाला आहे....मल वाटते त्याने त्याची लाईफ नव्याने सुरू करावी.....मी माझ्या मुले त्याचे लाईफ खराब नाही करू शकत...."....नंदिनी

 

" Nandini , I don't think so he will go back with that girl..... मी जेवढे त्यांचे व्हिडिओ बघितले आहे...माझ्या ताई कडून ऐकले आहे.... तो दिलेले कमिटमेंट पाळतो.....he sticks with his words.... त्याने तुझ्या सोबत लग्न केलेय...सगळ्यांसमोर तुला बायको म्हणून स्वीकारले आहे .... तो तुलाच त्याची बायको म्हणतो.....नसते मानले तर त्याने त्याचे स्टेटस म्यारिड नसते ठेवले....तो कुठल्याही मुलीसोबत एन्जॉय करू शकला असता...but he is looking very loyal person......".... शैला

 

" पण त्याने मला कधीच त्याच्या बायको प्रमाणे टच नाही केले ... तो मला त्याची बेस्ट फ्रेंड सारखाच वागवतो...माझी खूप काळजी घेतो......मला माझी फिलिंग सांगून आमची मैत्री स्पॉइल नाही करायची आहे.....जर त्याला माझ्या बद्दल तसे फील होत नसेल तर.. I don't want to loose him..."... नंदिनी

 

" नंदिनी तुझा प्रॉब्लेम कळतोय मला.... चल चर्च मध्ये जाऊया...तिथे मिळेल आपल्याला सगळ्या प्रशांनाची उत्तर..."...शैला

 

" चर्च??"....नंदिनी

 

" देव एक आहे नंदिनी....तिथला असो वा इथला......... आणि देव फक्त योग्य आणि खरा मार्ग दाखवतो......"....शैला

 

दोघीही चर्च मध्ये निघून आल्या...

 

शैला ने तिथे असलेल्या फादरला नंदिनीच्या मनातला प्रश्न , दुविधा विचारली...

 

" My child.... लग्न , जोड्या स्वर्गात बनतात, हे आम्ही पण बिलिव करतो.... जरी तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करत असला तरी त्याची ती पास्ट लाईफ होती... त्यानं त्याचे वर्तमान स्वीकारले आहे...तो त्या मुलीकडे परत जाणार नाही.... परत जायचं की नाही हे त्याने ठरवावे...पण तू तुझ्या मनातलं त्याला सांगावं,. तुझ्या मनातील नातं मैत्रीच्या पुढे गेले आहे....तुझी मैत्री आता फक्त मैत्री राहिलेली नाही आहे....तुमचं नातं बदलत आहे ,तुझ्याकडून तरी...नात्यात प्रामाणिक राहावे... तरच ते टिकतं ... नात्यांचा विचार दोघां मिळून घ्यावा .... एका कोणावर ते नातं ओझं म्हणून नसावं....आणि एकमेकांच्या विचारांचा रिस्पेक्ट करावा....त्याचा पण हक्क आहे तुझ्या मनातले जाणून घ्यायचे....आणि तो मला खूप loyal person वाटतो आहे..... दोघांनी मिळून नात्याचा निर्णय घ्या... आणि आनंदाने जे असेल ते स्वीकारा..चूप बसून दोघांनाही त्रास होणार...प्रेम कोणावर हि होऊ शकत, कधीही होऊ शकतं....बोलणे महत्वाचे....संवाद महत्वाचा...तरच उत्तर मिळतील .......stay blessed my child...."... फादर

 

"Thanks a lot father.... ".... नंदिनीला खूप आनंद झाला होता...

 

" मग....??".... राहुल

 

राहुलच्या आवाजाने ती भानावर आली...

 

" चर्च मधून बाहेर पडल्या पडल्या मी राज ला फोन केला होता....त्याला कळवले की मी प्रेमात आहे त्या दिवशी रात्री......तेव्हा पासून तर तुला माहितीच आहे काय झाले....इकडे राज दुखावला गेला होता...आणि  मी मात्र खूप आनंदी  अगदी हवेतच होती......
 

 

" खूप काही आहे रे सांगायचे.... मला बरं नव्हते...राज ने व्हिडिओ कॉल केला...त्याला सांगायचं नव्हतं तरी त्याने माझ्या आवाजावरून ओळखले मला बरे नाही ते....लगेच यायचं म्हणत होता....पण मी त्याला नको म्हणाले ....तर पठ्ठा रात्रभर व्हिडिओ कॉल वर जागा होता.....माझ्या वाढदिवसाला माझ्या आवडीचे गिफ्ट...इंडियन पदार्थ, खूप बलूनस , खूप फ्लॉवर त्याने पाठवलेले...तुला माहिती त्याने चक्क मोगऱ्याचा फुलांचे गजरे पाठवलेले मला आवडतात तसे....कधीही फोन करा..रात्री, सकाळी कधीही...प्रत्येक वेळी त्याने उचलला आहे...कधीच कुठलाच बहाणा नाही सांगितला...अर्ध्या झोपेतून तो जागा झाला आहे....".....नंदिनी

 

" ह्मम.... झोपलच कुठेय तो सहा महिने नीट......... "....राहुल

 

" हो....मी खरंच नाही ओळखू शकले माझ्या राज ला ..."...नंदिनी

 

"कम्पिटीशनमध्ये भाग घेतला... आपले सगळे स्किल्स पणाला लावले आणि राजचे पेंटिंग तयार केले....आणि ज्याला दाखवायचे होते तो आलाच नाही बघायला.....त्याने बघितले असते तर तो समजला असता .... न सांगताच कळले असते त्याला सगळे.......पण महाराज आलेच नाही....".....नंदिनी

 

" आता कुठेय ते पेंटिंग...?? आता दाखव".....राहुल

 

" ते माझ्याकडे नाही.... त्या मंडळाचे एक्सिभीशन्स आहेत ओवर ऑल इंडिया.... आणि बाहेर काही देशात....वर्षभर तरी ते काही हाती नाही यायचं...नंतर मिळेल..."....नंदिनी

 

"बरं ...पण...."....

 

"चल नंतर बोलूया...तो येतोय इकडे....."...नंदिनी ने राहुलला अडवले...

 

" Sorry.... मी डिस्टर्ब केले काय??"....दोघांनाही एकदम शांत झालेले बघून राज बोलला

 

" अ.....नाही....काही नाही...असेच नेहमीच"..... राहुल...

 

तरी राजला जाणवले ते दोघं काहीतरी लपवत आहेत ते...त्याला वाईट वाटले...

 

"Okay,  जेवायला चला.......".... राज

 

" मी आलेच फ्रेश होऊन.....तुम्ही व्हा पुढे"....नंदिनी

 

राज राहुल खाली निघून आले...

 

नंदिनी फ्रेश होत खाली आली.....सगळे डायनिंग टेबल वर बसले होते.....नंदिनी राजच्या पुढे जाऊन बसली...जेवण करता करता तीच लक्ष राजकडेच होते...

 

" अग , हे काय , इतक्यात झालं पण?? लगेचच उठली...सकाळी पण जेवली नाही आहेस तू? "....नंदिनीला ताटावरून उठताना बघून आई काळजीने बोलली.

 

" नाही ग......"...नंदिनीने आपली खुर्ची एका हाताने उचलली, आणि राजच्या बाजूला ठेवत अगदी त्याच्या जवळ जाऊन बसली...  सगळे तिलाच बघत होते.... राज सुद्धा गडबडला होता....

 

" आई, मला पण राजच्या ताटात वाढ....."..म्हणत तिने भाजी पोळीचा एक घास हातात घेत राज समोर धरला.... राजला काही कळत नव्हते तो तिच्याकडे बघत होता... बाकी सगळे पण त्यांच्याकडे बघत होते . राज अवघडल्या सारखा झाला.

 

" अगं नंदिनी....."....

 

" आई मी माझं कर्तव्य करत आहे...."....नंदिनी

सगळे प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होते..

"  अगं राजच्या  उजव्याच हाताला लागले आहे ना....त्याला पोळी नीट खाता नाही येत आहे....फक्त भाताने एनर्जी राहणार काय???....हवं तर आई  तू खाऊ घाल?".......नंदिनी

 

सगळ्यांना तिचं कौतुक वाटले...तिचे शब्द ऐकून आनंद सुद्धा झाला....दोन दिवस आपण लक्ष नाही दिले त्याची खंत सुद्धा वाटली...

 

" नंदिनी ,  तुम्ही खाऊ घाला....".... आजीसाहेब

 

" अरे घे ना.... आता आजीसाहेबांनी सुद्धा परवानगी दिली आहे....."....नंदिनी

 

राज मात्र तिच्याकडे बघत होता... तिचे हे असे बदललेले रूप....आतापर्यंत चिडचिड करणारी नंदिनी अशी एकदम जवळ आली होती....त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते.

 

" माझ्या हातून नाही जेवायचं काय??? Okay आई तू खाऊ घाल ".....नंदिनी आपला हात मागे घेत होतीच की त्याने तिचा हात पकडला नी तिच्या हाताने पोळीचा घास खाल्ला.....तिच्या हातून जेवतांना त्याचा ओठांचा तिच्या हाताला झालेला तो स्पर्श....तिच्या डोळ्या पाणी देऊन गेले....तिने पापण्यांची उघडझाप करून डोळ्यातले पाणी लपवले होते....एक घास त्याला आणि एक घास स्वतः गप्पा करत तिचे खाऊ घालने सुरू होते...त्यामुळे त्यांना जेवायला बराच वेळ लागत होता.... आजीसाहेबांनी इशारा केला तसे बाकीचे काही ना काही कारण सांगून तिथून उठून गेले.....आई काकी पण किचन आवरायला निघून गेल्या...आता ते दोघच तिथे बसले जेवत होते...आज खूप दिवसांनी ते एकत्र शांत बसले होते...नाहीतर नंदिनीच्या राज साठी फक्त कंप्लेंट सुरू होत्या......दोघांना एकत्र वेळ घालवता यावा म्हणून आजींनी सगळ्यांना तिथून गायब केले होते..

 

नंदिनी ने त्याला पोळी भरवली.....नंतर ती त्याला भात खाऊ घालणार होती..

 

" मी खातो चमाच्या ने..."......राज

 

" का...?? माझ्या हाताने खायला त्रास होतोय तुला??" ......नंदिनी

 

" इतकी नकोशी झालिये मी तुला??"....नंदिनी

 

तिचे हे शब्द त्याचा काळजाला भिडले....त्याने फक्त मान हलवली...

 

" नाही ना , मग गपचुप जेवायचं....आणि आता दोन दिवस , हात ठीक होई पर्यंत मीच खाऊ घालणार आहे तुला......सो काही बहाणे नको.....".....नंदिनी त्याला आमटी भात खाऊ घालत होती....तो पण मुक्याट्याने खात होता.....

 

जेवण आटोपले....नंदिनी प्लेट वैगरे आतमध्ये नेऊन ठेवत होती....

 

" नंदिनी.....".... राज

 

" माझी नाराजी गेली नाहीये अजून.......मला बोलायचं नाहीये तुझ्यासोबत.....".....नंदिनी

 

" एकच प्रश्न".....राज

 

" काय?"....नंदिनी

 

" तो.....तो मुलगा??...तुझं त्या दिवशी चे सरप्राइज".....राज अडखळत बोलला

 

" तुझ्याशिवाय माझं सगळंच अपूर्ण आहे.......तू नव्हता त्या दिवशी.....मग नाही सांगितले कोणाला....मला सगळ्यात आधी तुला सांगायचं होते.......तूच नव्हता....मग काय फायदा".....नंदिनी

 

" काय नाव त्याचं?"......राज

 

" नाव काय.... राहुलच्या लग्नाला बोलावले आहे मी , प्रत्येक्षातच भेट.....कसा वाटतोय माझ्यासाठी ते पण सांग?....तुझ्या मर्जी विरुध्द काही नसेल आहे....."....नंदिनी

 

" ह्मम..जा आराम कर ".....राज

 

"ह्मम......तू हो पुढे".....नंदिनी, राज पुढे जयाल निघाला

 

" राज...I love you रे, "....... त्याला जातांना बघून नंदिनी मनातच बोलली.....तसे राजला काहीतरी फील झाले आणि तो मागे वळला...

 

" आवाज दिला....??"......राज

 

नंदिनीने नकारार्थी मान हलवली....

 

" मला वाटलं...."...राज

 

" काय वाटले...??"....नंदिनी खूप उत्सुकतेने त्याच्याकडे बघत होती

 

"काही नाही.....मी जातो रूम मध्ये....".....राज

 

" गुड नाईट ".....नंदिनी

 

********

 

क्रमशः...

 

Three dangerous words for me....

 

नेक्स्ट पार्ट कधी ?? ????
भारी टेन्शन येते राव.....????
भीती वाटायला लागली कोण कधी रागवेल तर....????

 

Friends.... कधी कधी लिहायला वेळ लागतो...त्यात माझ्या दुसऱ्या कथा पण सुरू आहे....कथा लिहिताना त्या पात्रांमध्ये घुसून लिहायला लागते....कधी नंदिनी मध्ये उडी मारा, त्यातून मग तुहिरे मध्ये... जमलंच तर दुर्गा मध्ये उडी घ्या.......मग जी कथा लिहून झाली ती पोस्ट करते..........कधी एखादा भाग छान होतो, कधी नाही होत....स्वतःच वाचला तर समाधान नाही वाटत...मग परत काही डिलीट करून चेंजेस केल्या जातात..... उद्देश एकच चांगले लिखाण व्हावे..

 

तीन कथा सुरू असल्यामुळे जरा गडबड होते आहे...म्हणजे चूक माझीच आहे...एका वेळेला एक कथा लिहायला हवी होती...नंदिनी माझी पहिली कथा......पहिल्यांदा लिखाणाचा अनुभव घेत होती....लिखाणाचा उत्साह भारी वाढला.......त्यात परत काही सुचले म्हणून मी तु ही रे कथा सुरू केली.....

 

मी नंदिनीचे 60 भाग नीट पोस्ट केले... आताच थोडी गडबड होते आहे..... थोड समजून घ्या ही विनंती

 


मी कॉमेंट्सचे रिप्लाय देते... कधी नाही होत....बरेचदा नेक्स्ट पार्ट कधी येईल मी कॉमेंट्स च्या शेवटी लिहिते...बहुतेक तुमची नजर नाही पडत त्यावर.... लिहून झाला की भाग मी लगेच पोस्ट करते....तुम्हाला वाट बघावी लागते त्यासाठी सॉरी....पण जाणून बुजून असे करत नाही .

 

धन्यवाद....काळजी घ्या, आनंदी राहा

 

******

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️