Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 73

Read Later
नंदिनी...श्वास माझा 73

भाग 72

" तू खूप वाईट आहेस.........आजचा दिवस माझ्यासाठी किती मोठा होता....तुझ्या नावाला शोभव म्हणून स्वतःच अस्तित्व निर्माण करत होते.... आजच्या या अवॉर्डमुळे कितीतरी लोकं मला माझ्या नावाने ओळखायला लागली.....किती मोठा दिवस होता माझ्यासाठी....पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्तीचं माझ्या सोबत नव्हता....ज्याच्या सोबत मला तो क्षण जगायचा होता.... ज्याचा सोबत मला माझा आनंद साजरा करायचा होता....तोच माझ्यासोबत नव्हता......का असा वागतोय तू???.....कशी जगले आहे मी तुझ्याशिवाय माझेच मला माहिती.....एक एक दिवस एका युगा प्रमाणे भासत होता.......कधीपासून आसुसले होते माझे डोळे  तुला बघायला.....तुझ्यासोबत बोलायला......तुझा आवाज ऐकायला माझे कान किती अधीर झाले आहेत......कधीची तळमळते  आहे तुझ्या जवळ यायला....तुझ्या मिठीत यायला......मला हवा आहेस तू.....घे ना मला तुझ्या मिठीत....अनुभवू दे ना मला तुझा प्रेमळ स्पर्श.....".....बोलता बोलता नंदिनीचा आवाज खूप जड झाला होता.... त्याच्या मिठीत जाण्यासाठी आपले हात पसरवत ती त्याच्या जवळ गेली....तसा तो दोन पावलं मागे सरकला........

त्याला असे करतांना बघून नंदिनीला खूप वाईट वाटले आणि ती शॉक सुद्धा झाली....कारण तो तिच्यासोबत असा कधीच वागला नव्हता....ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती.....

बाहेर दाराजवळ उभा राहुल हे सगळं बघत होता.....नंदिनी परत राजला हग करायला म्हणून पुढे गेली तर तो परत मागे जात होता की त्याचा तोल गेला...त्याचा हातातला मोबाईल खाली पडला......राज पडतच होता....की नंदिनी त्याला पकडायला म्हणून पुढे जाणार तेवढयात राहुलने येऊन राजला पकडले....

"तू ठीक आहेस???"....नंदिनी एकदा राहुलकडे बघत राजकडे बघत बोलली.

" I am fine......"...राजचा बोलतांना सुद्धा तोल जात होता...तो अस्पष्ट असा अडखळत बोलला.

"लिव्ह मी.... I am okay bro....."... राज राहुलला त्याला सोडायला सांगत होता....राहुल त्याला पकडून उभा होता...

" You are drunk???? तू अल्कोहॉल घेतलेली आहे????".... नंदिनी डोळे विस्फारून राजकडे बघत होती.....आजपर्यंत राजला तिने असे कधीच बघितले नव्हते....आता तिला त्याचा वागण्याचा राग सुद्धा येत होता..

" कोणीतरी म्हणलं होते ' राज लाईफ एंजॉय कर '....so enjoying my life....".... राज

"अशी????"दारू प्यायला नव्हते सांगितलेले....आणि ते पण एवढी....की तुला स्वतहाला सांभाळता सुद्धा येत नाही आहे ...".......नंदिनी

" it's my style.........."..... राज , त्याने परत एका बॅग मधून एक बॉटल काढली आणि ती उघडून बाजूला असलेल्या ग्लास मध्ये ओतली......नी ग्लास हातात पकडला..

" राज , आता नको......."..... राहूल

" तू जा इथून, हिला पण घेऊन जा..... लेट मी एन्जॉय माय लाईफ........" ...राज एक घुट पित बोलला.

" ते ठेव आधी......"....नंदिनी त्याचा हातातला ग्लास घ्यायला गेली.

" Don't touch me........".... राज

" राज आगाऊपणा करू नकोस.....दे इकडे तो ग्लास....."....नंदिनी

" I said don't touch me...... जा इथून..... मला त्रास होतो तुझा चेहरा बघून......मला नाही बघायचा तुझा चेहरा........गोssss.........".... राज थोडा ओरडतच बोलत होता. ते ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी साचायला लागले......
 

"राज अरे हे  काय बोलतोय?????....मी काय केलं आहे......".... नंदिनी

" नंदिनी तो शुद्धीत नाही आहे....तो काय बोलतो आहे त्याला सुद्धा काळात नाही आहे.....आणि त्याला आता समजावून काहीच फायदा नाही आहे ".....राहुल नंदिनीला समजावत बोलत होता. ...राजचे बोलणे तिच्या मनाला येवढे लागले होते की  नंदिनीला राहुलचे बोलणे ऐकू सुद्धा जात नव्हते... राज मात्र आपल्याच विश्वात होता....मनाला येईल ते बडबडत होता...मनाला येईल तसे वागत होता....मुळात तो स्वतःच हरवला होता....नंदिनीला मात्र त्याला तसे बघून खूप त्रास होत होता.... एकतर अमेरिका वरून परतल्यावर राज तिला आता भेटला होता त्यातही तो या अवस्थेत.....ती वारंवार त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती...त्यावर राज परत परत चिडत होता....राहुल दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत होता पण कोणीच समजण्याच्या मूड मध्येच नव्हतं...

" माझ्या जवळ येऊ नकोस..... Go from here..... I don't want to see you.....".... नंदिनी परत परत जवळ येताना बघून तो ओरडला.... राज आता खूप रागात आला होता आणि त्याच रागात त्याच्या हातातल्या गलासावर इतका जोर लागला की तो ग्लास त्याच्या हातातच फुटला.....सगळीकडे काचं काचं..... राजच्या हातात पण बरीच काचं गेली होती....त्यामुळे हातातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या.....राजचे हे असे रूप ती पहिल्यांदाच बघत होती........ हे बघून आता नंदिनी खूप घाबरली..तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागले होते....

" नंदिनी....तू जा तुझ्या रूम मध्ये....मी बघतो त्याला.......".....राहुल

" अरे पण......."....नंदिनी

" नंदिनी , ऐक माझे.... प्लीज तू तुझ्या रूममध्ये जा....उगाच परत जास्ती आरडा ओरडा झाला तर घरात सगळ्यांना टेन्शन येईल.....मी आहो इथे.....नको काळजी करू....".... राहूल, नंदिनी ने एकदा राजकडे बघितले आणि जड मनाने राजच्या रूमच्या बाहेर येऊन त्याला दिसणार नाही अशी उभी राहत आतमध्ये राजला बघत होती....

राहुलने राजला बेडवर बसवले

" ती कोण होती????....."....राज अडखळत बोलत होता.........पण आता राजचे डोके इतके जड झाले होते की तो लगेच बेडवर मागे पडला आणि झोपला सुद्धा....राहुलने त्याचा हातात रुतलेले काचं बाहेर काढले...हात स्वच्छ करून त्याला व्यवस्थित मलमपट्टी करून दिले......नंदिनी बाहेरून हे सगळं बघत होती...राहुलचे बाहेर लक्ष गेले तर नंदिनी उभी त्याला दिसली....तो लगेच उठून बाहेर तिच्याजवळ गेला....

" राज........"....नंदिनी रडत होती

" ठीक आहे तो.......सगळं ठीक होईल...."...राहुलने नंदिनीला आपल्या कुशीत घेतले....

" काय झालं त्याला....तो असा कधीच वागत नाही......"...नंदिनी

" नंदिनी कशाचे ट्रेस असेल......नको काळजी करू .... उद्या सकाळी नॉर्मल असेल तो.... "..... राहूल

" मी जाऊ त्याच्याजवळ?"...नंदिनी

" ह्मम.......जा.....मी घरात बाकीच्यांना बघतो..."... राहूल

" Thank you......"... नंदिनी

" कशा बद्दल??".... राहूल

" राजला सांभाळल्या बद्दल......".... नंदिनी

" वेडी आहेस काय तू ???..... ".... राहूल

नंदिनी त्याच्याकडे बघून कसनुसे हसली .... राहुल तिथून खाली यायला निघाला...परत काही आठवून महे फिरला

" नंदिनी.....".... राहूल

" हा...."....नंदिनी

" तुला राज आवडतो ना.......??.... राहूल

" हो....तो नेहमीच आवडतो मला"...नंदिनी

" तस नाही.....You love Raj......right??".... राहुल

राहुलच्या प्रश्नाने नंदिनी थोडी गोंधळली .....त्यात राजचे इतक्यातले तिच्यासोबत असलेली वागणूक बघता तिच्या मनात आता बरेच प्रश्न उभे राहिले होते......तिला काय उत्तर द्यावे कळत नव्हते...

" माहिती नाही......"....नंदिनी , तसा राहुल किंचितसा हसला....

" आई , काकी..???'"...नंदिनी

" नको काळजी करू मी बघतो त्यांना.... तू दार लाऊन घे...म्हणजे कोणी येणार नाही डिस्टर्ब करायला आणि कोणाला जास्ती काही कळणार नाही...."....राहुल

" ह्ममु.....".....नंदिनी

आता जास्ती नको विचारायला विचार करत तो खाली निघून आला.... नंदिनी राजच्या रूममध्ये गेली....

राज ऐरपोर्टवरून इच्छा नसताना सुद्धा  अवॉर्ड फंक्शन हॉल साठीच यायला निघाला होता....त्यात त्याने मोबाईलवर नंदिनीचा फोटो बघितला आणि त्याखालील लाईन....ते शब्द ' त्याला आवडेल ना ...'..... हे वाचले आणि तो पूर्णपणे तुटला होता.... त्याला तिचे सगळे बोलणे आठवत होते.... हे सगळं त्याला असह्य झाले होते आणि तिथून त्याने गाडी वळवायला सांगितली होती....घरी जाणे सुद्धा त्याच्या जीवावर आले होते....सगळेच खूप प्रश्न विचारणार होते...त्याला आता कोणाच्याच कोणत्याच प्रश्नांचे उत्तर द्यायचे नव्हते....तो त्या मनःस्थितीत नव्हता....आणि रस्त्यात त्याला हॉटेल दिसले तिथेच तो थांबला होता.....विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आणि शेवटी  त्याने अल्कोहोलचा सहारा घेतला होता...वारंवार ड्रायव्हर काकांनी त्याला कमी प्यायच सुचवूनही त्याने त्यांचे ऐकले नव्हते....आणि लिमिटच्या बाहेर त्याने आज पिले होते....राज ऐकत नाही बघून ड्रायव्हर काकांनी राहुल ला फोन केला होता.... आणि परिस्थिती सांगितली होती. आज राजचे दुःख ,त्याला होणारा त्रास हे नंदिनीच्या आनंदापुढे वरचढ ठरले होते.....नेहमी तिच्या आनंदासाठी झटणारा तो....आज मात्र तिच्या आनंदात शामिल होऊ शकला नव्हता....

नंदिनी आतमध्ये जात राज जवळ उभी पाणी भरल्या डोळ्यांनी  त्याला बघत होती.....तो शांतपणे झोपला होता.....त्याच्याकडे बघता बघता तिचे लक्ष त्याच्या पायांकडे गेले.....त्याच्या पायात शूज होते....तिने ते अलगदपणे काढून बाजूला ठेवले....त्याचे पाय नीट बेड वर ठेवले...... त्याच्या कंबरेतला बेल्ट लूज केला....त्याच्या हातातले घड्याळ काढून बाजूला ठेवले....त्याच्या अंगावर पांघरून नीट टाकले.....आणि त्याच्या डोक्याजवळ येऊन बसली....त्याच्या डोक्यातून मायेने हात फिरवत होती..

" राज ....तुझ्या प्रेमात पडले रे मी...... खूप खूप प्रेम करायला लागले मी तुझ्यावर.....आज तुझ्यापुढे माझं प्रेम कबूल करणार होती....तुला प्रपोज करणार होते....तू माझ्यावर प्रेम करतो काय माहिती नाही रे .... कदाचित तू त्या दुसऱ्या मुलीला विसरू शकाशिल काय माहिती नाही.....पण एकदा तुला सांगायचे होते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे....... खरं तर मला ज्या दिवशी कळलं मी तुझ्यावर प्रेम करायला लागले त्याच दिवशी मी तुला सांगणार होते.....कदाचित माझ्या काळजीपोटी तू माझ्या प्रेमाचा स्वीकार सुद्धा केला असता....पण मला  प्रत्यक्षात तुझ्या पुढे तुझे चेहऱ्यावरचे भाव बघायचे होते..... तू आनंदी होतोय की तुला नाही आवडत आहे हे जाणून घ्यायचे होते...म्हणून मी फोनवर नाही सांगितले....."

" मी जाणनेनला तू, मी ओळखलेलाला तू, माझ्या नजरेतला तू , खूप मन लावून रेखाटलेले तुझे चित्र.....तू यावे ,  बघावं असं वाटत होते.....त्यातून तुला माझं तुझ्यावरच प्रेम कळेल , कदाचित तुला सांगायची गरजही पडणार नाही असे वाटत होते.....तू हवा होता राज....तू मला हवा होता.....मला तुझी बायको म्हणून जगायचं होते रे......."..... नंदिनी पट्टी बांधलेला त्याचा हात हातात घेत बोलत होती....तिने हळूवारपणे त्याच्या हातावर किस केले...नी व्यवस्थित त्याचा हात बेडवर ठेवला....

"राज काय होत आहे तुला??? का स्वतःला त्रास करून घेतो आहेस???तू असा नाही आहेस.......काय त्रास होतो आहे सांग ना???? का अवॉइड करतो आहे मला???..तू सांगून तर बघ.......जे शक्य असेल ते सगळं करेल मी....फक्त एकदा बोल ना .....राज मला तू फक्त आनंदी हवा आहेस" ......त्याच्या जवळ येत त्याच्या चेहऱ्याजवळ झुकून त्याला बघत बोलत  होती....तो जरी शांत वाटत होतं तरी त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता...

"माझामुळे त्रास होतोय ना तुला....म्हणूनच म्हणाला ना माझ्या निघून जा...???...साधं तुला स्पर्श सुद्धा नाही करू दिला तू मला........नकोय ना मी तुला तुझ्यापुढे ...नाही येणार तुझ्या पुढे.....पण तू खुश राहा ...."...ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत रडत बोलत होती....

" माहिती नाही तुझ्या जागेपणी तुला बोलू शकेल की नाही.......' I love you Raj........".. आज तिला सगळी बंधनं तोडून राजजवळ जायचं होते...... ती झुकत त्याच्या ओठांजवळ येत होती......त्याच्या ओठांवर किस करणार तेवढयात तिला राजचे बोलणे आठवले.....' फर्स्ट किस खूप स्पेशल असते...ते वाया घालवायचे नाही......'...तिने आपला हात त्याच्या ओठांवर ठेवला....आणि आपल्या हातावर किस केले.......आणि तिच्या डोळ्यांतले एक अश्रू त्याच्या गालावर पडले....

******

रात्रीच्या सगळ्या प्रकारामुळे राजला सकाळी उठायला 10 11 वाजले होते...... त्याचं डोकं खूप जड झाले होते.....हातात पण पेन जाणवत होते.....त्याने हाताकडे बघितले तर हाताला पट्टी दिसली.........तो डोक्याला हात लाऊन बसला होता....त्याला रात्री हॉटेल मध्ये गेला त्या नंतरचे काहीच आठवत नव्हते........ छाया ताईने त्याला निंबु पाणी आणून दिले......

" What's up bro.......एकट्यानेच पार्टी केली तू???......"..... राहुल राजच्या रूममध्ये आला...

" गुड मोरनिंग....... राहूल हे हातला माझ्या.....?"......

" ह्मम....मोठमोठ्या गोष्टी केल्यास तू ....त्याचेच परिणाम हे सगळं......"...... राहूल

" सगळं.....म्हणजे???, आह.... डोकं दुखत आहे खूप.... ".....राज

" हँगओव्हर आहे......ते निंबु पाणी पी आधी.... बरें वाटेल थोड्या वेळाने......"...... राहूल

"ह्ममम.......".....तो दारातून बाहेर बघत पाणी पीत होता..

" नाहीये ती इथे......दिसणार नाही...".......राहुल

" म्हणजे???" ....राज

" नंदिनीला शोधतो आहे ना .....ती नाहीये घरी.....आजी आबाकडे गावाला गेली "......राहुल

" काय??"......राज

" ह्मम.....आज सकाळीच गेली....."....राहुल

" पण का???"..... राज

" तूच बोलला ना तिला......माझ्या समोर येऊ नकोस......तुला त्रास होत होता ना तिचा इथे असण्याचा.....म्हणून तू तिकडे सिंगापूरला जाऊन बसला होता ना ती इथे येतंय ऐकून......".... राहूल

" असे काही नाही आहे......आणि मी कधी म्हणालो असा मला तिचा त्रास होतो आहे......आणि तुला पण माहिती आहे मी तिच्या बाबतीत असे काही बोलू शकत नाही.......आणि मला काहीच का आठवत नाही आहे..???..."...राज

" ज्या बॉटल घशात उतरवल्या होत्या ना तू....त्यांनी त्यांचं काम परफेक्ट केले आहे....."...असे म्हणत  अवॉर्ड फंक्शन ,त्याची पेंटिंग सगळं सोडून...राहुलने  रात्री घडलेले सगळे राजला सांगितले

" नंदिनीला खूप हर्ट केले मी...........".....राज

" रडवले आहेस तू तिला......".... राहूल

" पण ती का गेली???....आणि तुम्ही तिला एकटीला जाऊ दिले???......."....राज

"आजी आबांची आठवण येतेय म्हणाली......एकटे नाही पाठवले आपले ड्रायव्हर काका गेले आहे पोहाचावयाला.....मी जाणार होतो तर ती नाही म्हणाली....लग्न आहे म्हणून"......राहुल

" पण मग लग्न???".....राज

" येणार आहे तेव्हा..... जाऊ दे तिला....गरज आहे तिला आजी आबांची......तसा पण तू हा असा वागणार आहेस....तिला त्रास होण्यापेक्षा तिथे ती फ्रेश होईल".....राहुल

" ठीक आहे......".... तसेपण राजला तिला फेस करायची हिंमत होत नव्हती....त्याला पण सावरायला वेळ मिळणार होता......त्याला परत काही आठवले...

" कालच फंक्शन??? तिचं सरप्राइज ???".....त्याने अडखळतच विचारले..

" बेस्ट आर्टिस्टचा अवॉर्ड मिळाला तिला.....आणि सरप्राइज तिने कॅन्सल केले तू नव्हता तर......बाकी जे काही विचारायचे ते तिलाच विचार.......मला नाही पडायचे तुमच्या भानगडी मध्ये.......तुला काय होतंय तू सांगणार नाहीस.......तिला काय वाटते आहे ती बोलणार नाही....तुमचं तुम्ही बघा......"....राहुल

" तू चिडला आहेस माझ्यावर?".....राज

" मग तू जसा वागला आहेस त्यावर कसे रिॲक्ट व्हायला हवे....??? तुला वारंवार विचारूनही तू काही सांगत नाही आहेस..... प्रॉब्लेम्स असतात....पण शेअर केल्याने त्यावर काही उपाय काढता येतो....पण नाही तुला सांगायचे नाही काही .".....राहुल

" असं काही नाही आहे.....कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे......"....राज

" जाऊ दे तुला जेव्हा बोलावस वाटेल तेव्हा बोल.....पण काल जे वागला आहेस ते परत नकोय मला......मी तुझा लहान भाऊ आहो पण प्रसंगी मोठा बनायला पण मागेपुढे बघणार नाही हा.......आणि नंदिनीला काहीच त्रास होता कमा नये...."......राहुल

राज तर अवाक होत राहुल कडे बघत होता......आज तो बालिश राहुल त्याला मोठा झाल्यासारखा भासत होता....त्याची कर्तव्य ,जबाबदारी  तो घ्यायला शिकला होता......

" आणि हो खाली बऱ्याच प्रश्नांना तुला सामोरे जायचे आहे....तयारीने ये.....बाकी तुमच्या मध्याला वादाचं मी काही सांगितले नाही आहे.....सांभाळून घे खाली.....खूप भंडावून सोडले आहे त्यांनी मला.....". ..बोलून राहुल बाहेर निघून गेला......राजला स्वतःचाच राग येत होता  , आपण नंदिनीला असे कसे बोलू शकतो हेच त्याला कळत नव्हते....

खाली आल्यावर आई काकी, आजीसाहेब सगळ्यांनीच राजची चांगलीच क्लास घेतली होती.....प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देता देता तो चांगलाच थकला होता....

अमेरिकेवरून आल्यापासून नंदिनी आजी आबांना भेटायला गेली नव्हती.....त्यांची खूप आठवण येतेय कारण पुढे करून नंदिनिने घरून गावाला जाण्याची परवानगी घेतली होती.....आणि तिच्या इच्छे खातर घरातल्यांनी सुद्धा तिला काही दिवस राहायला जाण्याची परवानगी दिली होती.....

*****

क्रमशः

 

 

नमस्कार मित्रांनो 

कथेला भरभरून प्रेम दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!

कथेचे काही भाग तुम्हाला बोर वाटत असतील किंवा कथा तानते आहे असे वाटत असेल....पण कथची, पुढील प्रतिक्रिया येण्यासाठी त्याची गरज आहे येवढेच सांगू शकते. 

माझ्या या कथे बद्दल किंवा माझ्या बाकी इतर कथेबद्दल काहीपण प्रॉब्लेम असतील...किंवा काही आवडत नसेल जसे की मी काही गाणे टाकत असते, किंवा कोणाला कथा ही सिरियल सारखी वाटते आहे कथे सारखी नाही , किंवा इमोशन्स जास्ती लिहिल्या जातात etc.. तर ते कथेच्याच खाली कॉमेंट मधून मला सुचवा....मी ते नक्कीच माझ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करेल आहे. 

आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया , लाईक साठी खूप खूप धन्यवाद .... आठवड्यातून दोनदा या कथेचे भाग पोस्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आहे...

Thank you 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️