नंदिनी...श्वास माझा 72

राज नंदिनी

भाग 72

" Ms Nandini , या अद्भुत पेंटिंगसाठी आपले खूप खूप धन्यवाद!!!.....".... अँकर

" My pleasure .....thank  you!!".... नंदिनीने हसून उत्तर दिले.

"काकी नंदिनी......... तिचं प्रेम आहे राजवर....काकी....बघताय ना ".....राहुल खूप आनंदी होत  नीतीला बोलत होता...

"हो बाळा.....वाटते तर तसेच आहे ...."...नीतीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते...

" खूपच ऑस्सम सरप्राइज आहे...... World's best surprise ever.....".... राहूल खूपच आनंदी झाला होता..

"हो......."....काकी

" रश्मी.....नंदिनीचे राजवर प्रेम आहे........ I am so happy Rashmi.... I am so happy ".... रश्मीचा हात हातात घेत तो बोलला. त्याला आनंदी बघून रश्मीला सुद्धा खूप आनंद झाला होता ..

"  राजचे प्रेम जिंकले आहे....त्याचा संयम जिंकला आहे......माझ्या बाळाला त्याचे प्रेम मिळाले आहे...".…..आई

" हो काकी....तिच्या बोलण्यावरून तरी तसेच दिसते आहे.....आणि तिने जे पेंटिंग काढलंय.....त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांशिवाय कोणीच असे काढू शकत नाही....तिने तिची आत्मा ओतली आहे त्यात....".... राहूल

" नंदिनीला सगळं आठवले असेल काय??"...काकी

" काहीच कळत नाहीये......बघू इथे आल्यावर विचारू...."..आई

" सरळ सरळ नको विचारायला...नाहीतर उगाच भलते काही व्हायचे.......मी बघतो विचारतो तिला...."... राहूल

"ठीक आहे"....आई

" राज कुठे राहिला??? आला नाही अजून??"...काकी

" हो ना.... कधीचा फोन करतोय... स्विच ऑफ येतोय...."...राहुल

"पण तू तर नंदिनीला म्हणाला होता ना पार्किंग एरिया मध्ये पोहचले आहेत राज दादा "....रश्मी

" मी खोटं बोललो होतो....तिचा मूड नव्हता घालवायचा मला......".... राहूल

" राज ,कुठे आहेस तू..... मला का दिसत नाही आहेस??... मी प्रेम करायला लागले आहे राज, .....कधी कधी तुला बघतेय असे झालेय मला...."....नंदिनी स्टेजवरून इकडे तिकडे बघत राजलाला शोधत होती....सगळीकडे बघूनही तिला तो दिसला नाही....आतापर्यंत आनंदी असणारा तिचा चेहरा एकदमच उतरला होता....

" Ms Nandini.... पेंटिंग साठी हा कॉन्सेप्ट तुम्हाला कसा काय सुचला???".... अँकर

नंदिनीचे अँकर काय बोलते आहे ,कुठेच लक्ष नव्हते...तिची नजर हॉलभर भिरभिरत होती....राजला शोधत होती...

"Ms Nandini....."... अँकरने परत आवाज देत तिच्याजवळ जात तिच्या हातात माईक दिला...तिच्या जवळ आल्याने नंदिनी भानावर आली....

" Ms Nandini .... ही अशी पेंटिंग बनवायचं तुम्ही कसे ठरवले???"... अँकर, नंदिनिने हातात माईक घेतला....राज न दिसल्यामुळे तिचा मूड ऑफ झाला होता...बोलायचे मन होत नसतानाही स्टेज आणि मान्यवर सर्वच लोकांचा मान ठेवत ती बोलायला लागली...

" Hello precious people......".... तिने बोलायला सुरुवात केली आणि टाळ्यांचा गडगडाट झाला...

"सर्वात आधी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद...आपल्या माझी ही पेंटिंग आवडली....त्याबद्दल आपण सर्वांनी मला गौरवित केले....खूप खूप आभार आपल्या सगळ्यांचे....तर आपला प्रश्न की माझ्या या पेंटिंगचा कॉन्सेप्ट मला कसा सुचला???.....दोन गोष्टींचा अभ्यास करून नंतर मी ही पेंटिंग बनवायला घेतली....

Famous  artist Leonardo da Vinci यांची मोनालिसा ही जगप्रसिद्ध पेंटिंग आपण सगळ्यांना माहिती असेलच....तर या पेंटिंग बद्दल बऱ्याच थिओरीज आहेत....त्यातलीच एक थिओरी म्हणजे या पेंटिंग मधल्या मोनालिसा या हसत आहेत की दुख्खी आहेत......बऱ्याच शास्त्रज्ञांनी त्यावर रिसर्च केले...आणि मग असे सुद्धा सांगण्यात आले की तुम्ही कुठल्या डायरेक्शनने बघत आहात...त्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन अवलंबून आहे....आणि खरंच हे खूप अमेझिंग थॉट होता माझ्यासाठी.

दुसरं म्हणजे.......एकदा देवीमाताच्याच्या देवळात जवळून आरती करण्याचा योग आला.....तेव्हा देवतेचा चेहरा मी न्याहाळत होते....जशी जशी आरतीचे ताट त्यांच्या भोवती फिरवत होते,दिव्याच्या वेगवेगळ्या अँगल पडलेल्या प्रकाशामुळे देवींच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशनस भाव वेगवेगळे भासत होते.......कधी कधी बघनाऱ्याचा दृष्टिकोन तसा असू शकतो किंवा बघनाऱ्याचा मूड वर पण बरेच काही ठरते....पण हा अनुभव खूप छान होता....

तर या दोन गोष्टी लक्षात घेत मी हे माझं पेंटिंग बनवले आहे.....".....नंदिनी

नंदिनीच्या बोलण्यावर परत टाळ्या झाल्या...

"Wow.....it's awesome........ आर्टिस्ट लोकं खरंच खूप ग्रेट असतात.....सतत नवीन, चांगलं काही करता येईल काय याच विचारात असता....एखाद्या सध्या  गोष्टींना सुद्धा स्पेशल बनवते आपली नजर ......".... अँकर

" Art is not what you see, but what you make others see .....".... नंदिनी हसत बोलली

" That's true....... तुम्हाला हे पेंटिंग काढायला खूप कठीण गेले असेल??'.... अँकर

" ह्ममम..... खरं सांगायचं तर नाही..... ज्या व्यक्तीची ही पेंटिंग आहे...जे भाव तुम्ही यांच्या चेहऱ्यावर आता बघितले आहेत...ते सगळे खरे भाव आहेत.... श्रीराज अगदी हुबेहूब तसाच आहे...घरात तर आहेच पण बाहेरच्या जगात सुद्धा तो तसाच आहे.... बिझनेस वर्ल्ड मध्ये बहुतेक सगळेच त्याला ओळखतात...तर त्यांना माहितीच असेल तो कसा आहे ते......मोठी स्वप्न बघणारा आणि ती सत्यात उतरवण्याची हिम्मत ठेवणारा... फुल ऑफ कॉन्फिडनट....प्रत्येकाचा हितचिंतक...खूप केरिंग.......चुकल्यास दरडावून रागावणारा.........कधी कधी एखादी घटना मनाला लागली की दुख्खी होणारा..........पण खूप प्रेमळ.....एकदम divine व्यक्तिमत्त्व..........जे मी खूप जवळून अनुभवलेले आहेत....त्यामुळे हे आर्ट तयार करणे तसे फारसे कठीण नाही गेले......"....नंदिनी

" He is really very special....any relation with you???"..... अँकर

" माझ्या जीवनाचा शिल्पकार...... My lifeline........ Without whom I can't even breath.........".... नंदिनी

" He is none other than Mr Shriraj Deshmukh.......My husband.....My life......all the reasons for my wide smiles......."... नंदिनी

तो हॉल टाळ्यांच्या आवाजाने गुंजित होता........

..आज तिला बोलायचे तर खूप होते....पण ज्याच्यासाठी बोलायचे होते तोच तिथे दिसत नव्हता....तिच्या डोळ्यात पाणि जमले होते...." Thanks a lot"..... म्हणत नंदिनीने माईक अँकर च्या हातात दिला आणि स्टेजवरून उतरत खाली येत होती.

" My husband"..... हा शब्द नंदिनीच्या तोंडून ऐकला आणि आईच्या डोळ्यात पाणी आले......

" राज कुठे आहेस....???...तू ज्याची वाट बघत होता ते आज इथे घडत आहे......"...राहुल वारंवार त्याचा फोन लावून बघत होता....पण फोन लागत नव्हता....

नंदिनी आपल्या जागेवर येऊन बसली....

" नंदिनी.....काय झाले ???इतका आनंदचा क्षण आहे आणि तू रडते आहे???"....आई

" आई, अग राज..... किती महत्वाचा दिवस होता माझ्यासाठी आणि तो नाही आला.....मला खूप दिवसांपासून तो इग्नोर करतोय जाणवत होते...पण कामात असेल, थकला असेल म्हणून मी लक्ष नाही दिले....मला वाटत होते आज तो येईल.....पण नाही आला......मला खूप वाईट वाटते आहे....."....नंदिनी

" नको बाळा.....काही कामात असेल फसला....."...आई नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या....

" नंदिनी, काय ऑसम पेंटिंग बनवले तू......नंदिनी तू शरू....."..... राहूल बोलतच होता की....मध्येच नंदिनी बोलली...

"शरू???? कोण आहे??? मला पण हे नाव ऐकले वाटते आहे ...."...नंदिनी डोक्यावर ताण देत बोलत होती..

तिच्या बोलण्याने राहुलच्या आणि बाकींच्याच्या लक्षात आले की तिला आधीचे काहीच आठवले नाही आहे.......

" शरू नाही....त्याला शरयू म्हणायचं होते..... अगं माझी एक मैत्रीण आहे ती तुझी खूप मोठी फॅन आहे....तिने तुझे सोशल मीडिया वर तुझे काही पेंटिंग्ज बघितले आहे.....ते सांगत होता राहुल....."...रश्मीने गोष्ट सांभाळून धरली....

" Ohh thank you...... पण शरू.??? काही तरी आहे....."...नंदिनी

" अग ते सोड.....किती सुंदर पेंटिंग केले आहे तू राज चे.....खूपच सुंदर रेखाटले आहे तू त्याला....."....काकी

" राहुल....तू म्हणाला होता ना राज आला आहे ,,, बाहेर आहे.....कुठे आहे तो???".....नंदिनी

" अग......"....राहुल

" तू खोटं बोलला ना.....राज नाही आला आहे....."...नंदिनी

" अग तो येणार होता....."....राहुल
 

नंदिनी राहुलचे बोलणे सुरू होते....इकडे कार्यक्रमाची सांगता झाली होती .... सगळे नंदिनिजवळ येत तिचे अभिनंदन करत होते...नंदिनी सगळ्यांना हसून धन्यवाद करत होती. तेवढयात कार्यक्रमाचे संयोजक तिथे आले.....

" Ms Nandini.... ".... संयोजक

" Yess sir......".. नंदिनी

" तुमच्या या पेंटिंग साठी बरीच लोकं विकत घ्यायचे म्हणत आहेत......??..तसे आपल्याकडे ऑक्शन असतात पेंटिंग साठी... पण काही लोकं आताच विचारत आहेत???"...संयोजक...

" सॉरी सर..... माझ्या इतर पेंटिंग मी चारिटीसाठी देत असते....पण ही पेंटिंग विकाऊ नाही आहे....."...नंदिनी

" एक मॅडम म्हणाल ती किंमत द्यायला तयार आहेत???".... संयोजक

" Sorry sir...... it's my soul..."..... नंदिनी

" Okay Ms Nandini....... I respect your decision.....".. संयोजक बोलून निघून आला...

" काय म्हणाली???...राज तुझा soul आहे???"..... राहूल

"Painting....." ... राज आला नव्हता म्हणून नंदिनीला खूप राग आला होता..

" नंदिनी तू....."....राहुल

" हे बघा इथे जे झाले आहे ना, त्यातले कोणीच राजला काहीही सांगणार नाही......आई तू पण काहीच बोलणार नाही आहे......"....नंदिनी

" अग पण...."......आई

तेवढयात राहूलला एक फोन आला...

"हा ड्रायव्हर काका......ठीक आहे....."... राहूलचा चेहऱ्यावरचे भाव उतरले होते ....

"काय बोलले???"....आई

"काही नाही.....ट्रॅफिक खूप होते म्हणून इकडे येता आले नाही.....घरी चालले ते......."....राहुलने परत वेळ मारून नेली.

" राज???"......नंदिनी

" तो झोपला होता गाडी मध्ये....फोन बंद आहे त्याचा...म्हणून ड्रायव्हर काकांनी कळवले...."... राहुल

"बघितले ना कसा वागतोय ते.......पण नाही नी बिन नाही...... इथे काय घडले आहे त्यातले राजला काहीच कळता कामा नये......  मी किती दिवसांपासून एक स्वप्न बघत होते.....राजने इथे न येऊन माझी सगळी स्वप्न, आशा मातीमोल केल्या आहेत......इतके पण काय इंपॉर्टन्ट काम होते त्याला  की तो माझ्यासाठी थोडा वेळ  काढू नाही शकला......किती फोन केले..आधी तर उचलले नाहीत आणि आता बंद करून ठेवला आहे....माझा फोटो पाठवला त्यावर सुद्धा काही रिप्लाय नाही केला त्याने.......".... राजचा अशा वागण्याने नंदिनीला खूप वाईट वाटले होते....नंदिनीचे मन खूप भरून आले होते

" अग प्रवास करून आला ना..... थकला असेल वा बरे नसेल वाटत त्याला...."....काकी

"पण मग सांगावं ना तसे???....येतो म्हणून का बोलला आधी???".....नंदिनी

" बरं बरं...... कोणी काहीच बोलणार नाही.....राजला कोणीच काही सांगणार नाही......पण तू अशी रडू नको"....आई तिचे डोळे पुसत बोलली

"

माझं अजिबात इथे मन नाही लागत आहे आता..... घरी जायचे मला...."....नंदिनी

" हो जाऊया......बाबा तुम्ही रश्मीला घरी सोडा...... मी नंदिनीला घेऊन जातो....."....म्हणत तो रश्मीच्या कानात काही बोलला..

" ठीक आहे.....तुम्ही दोघं व्हा पुढे....मी तुझी आई,निती  वहिनी रश्मीला घरी सोडतो नी येतो आरामात...."...राहुलचे बाबा

" हो चालेल......".....राहुल

राहुल नंदिनी एका कारने पुढे निघून आले.....

नंदिनी कारमधून उतरून पळतच घरी आली......राहुल सुद्धा तिच्या मागोमाग आला....

" छाया ताई ..... राज???"....नंदिनिने घरात पाऊल टाकल्या टाकल्या छाया ला प्रश्न केला..

" ते.......".....छाया काही बोलणार तेवढयात राहुलने तिला काही इशारा केला...

" दादा आताच आले, त्यांच्या रूममध्ये आहेत...."....छाया

ते ऐकून नंदिनी लगेच वरती राजच्या रूम मध्ये जाण्याकरता पळाली.......

" छाया ताई आजीसाहेब आबा???त्यांना काही माहिती तर....."....राहुल

" नाही, राज दादा आले तेव्हा इथे कोणीच नव्हते.... आजीसाहेब आबासाहेब त्यांच्या रूम मध्ये आराम करत आहेत......"....छाया

" Thank God ...... बरं ठीक आहे मी वरती आहो.....आई बाबा काकी येतीलच थोड्या वेळात....."....बोलत राहुल वरती निघून आला...

" राज I hate you..... I hate you........ "..... ओरडतच नंदिनी राजच्या रूममध्ये गेली.....नंदिनी त्याला बघून दारातच थबकली होती........राज टेबलला टेकून  उभा मोबाईलमध्ये काही बघत होता.......त्याचे केस विस्कटलेले होते...हवेवर थोडे केस उडत होते..... शर्टच्या वरच्या दोन तीन बटन ओपन होत्या.... शर्टच्या स्लीवस फोल्ड केल्या होत्या....थोडासा शर्ट इन केला होता...बाकी बाहेर आला होता....ब्लॅक ट्रौजर ....पायात शूज.....नुकताच बाहेरून आलेला दिसत होता,त्याचा चेहऱ्यावर भयंकर शांतता दिसत होती.........नंदिनी डोळे भरून त्याला बघत होती

त्याचा तो चेहरा बघून, नंदिनीचा आतापर्यंतचा राग कुठल्या कुठे पळाला होता.....आज सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवसांनी ती त्याला बघत होतो......तिच्या आवाजाने त्याचे लक्ष नंदिनिकडे गेले....

"नंदिनी........"...तो अडखळत बोलला....नी नंदिनिकडे बघत होता...

त्याच्या तोंडून आपले नाव ऐकून तिला खूप आनंद झाला नि ती पळतच राज जवळ येत त्याच्या पुढ्यात येऊन थांबली.......

" तू खूप वाईट आहेस.........आजचा दिवस माझ्यासाठी किती मोठा होता....तुझ्या नावाला शोभव म्हणून स्वतःच अस्तित्व निर्माण करत होते.... आजच्या या अवॉर्डमुळे कितीतरी लोकं मला माझ्या नावाने ओळखायला लागली.....किती मोठा दिवस होता माझ्यासाठी....पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्तीचं माझ्या सोबत नव्हता....ज्याच्या सोबत मला तो क्षण जगायचा होता.... ज्याचा सोबत मला माझा आनंद साजरा करायचा होता....तोच माझ्यासोबत नव्हता......का असा वागतोय तू???.....कशी जगले आहे मी तुझ्याशिवाय माझेच मला माहिती.....एक एक दिवस एका युगा प्रमाणे भासत होता.......कधीपासून आसुसले होते माझे डोळे  तुला बघायला.....तुझ्यासोबत बोलायला......तुझा आवाज ऐकायला माझे कान किती अधीर झाले आहेत......कधीची तळमळते  आहे तुझ्या जवळ यायला....तुझ्या मिठीत यायला......मला हवा आहेस तू.....घे ना मला तुझ्या मिठीत....अनुभवू दे ना मला तुझा प्रेमळ स्पर्श.....".....बोलता बोलता नंदिनीचा आवाज खूप जड झाला होता.... त्याच्या मिठीत जाण्यासाठी आपले हात पसरवत ती त्याच्या जवळ गेली....तसा तो दोन पावलं मागे सरकला........

त्याला असे दूर होताना बघून नंदिनी शॉक झाली.....

******
क्रमशः

🎭 Series Post

View all