नंदिनी...श्वास माझा 70

राज नंदिनी

भाग 70
 

नंदिनीचा तिथे  बराच मोठा ग्रुप तयार झाला होता....सगळ्यांनी मिळून पार्टी केली... नंदिनीला गिफ्टस दिलेत.....

"Hey Nandini....call us on your marriage.....we always heard about Indian marriages....now we want to be a part of it..."..... अमेरिकन फ्रेंड

" yeah sure!!!!!.....Sorry , I forget to tell you all .... After three weeks...my brother's marriage is there...you all are invited.... I know it's on time...but if managable...pls come....".... नंदिनी

" Wow..... This is ossum news .....we will definitely try to make it...."... अमेरिकन फ्रेंड

"Thanks a lot friends....you made my stay here very ossum and memorable......Okay guys.....see you soon then....."... नंदिनी

" We will also miss you dear......but it's good we wil be in contact...."... फ्रेंड

" Yess.....miss you all...."... नंदिनी ने सगळ्यांना हग केले.... फ्लायिंग किस करत बाहेर पडली.

नंदिनी घरी परत जाणार म्हणून खूप आनंदात होती. तिने सगळ्यांसाठी काही ना  काही शॉपिंग केली होती....आणि शेवटी आलाच तिचा जाण्याचा दिवस.....आणि ती भारतात आली..

*******

" नंदिनी sssss..............."....एअरपोर्टच्या गेट मधून नंदिनी येताना दिसली , तसे राहुलने तिला आवाज दिला..

"राहुल sssss........"...राहुल ला बघून नंदिनीला खूप आनंद झाला ...नंदिनीने सामानाची ट्रॉली साइडला लावली आणि पळतच येत राहुलच्या गळयात पडली...

"Wel come back to India.... Sweety..."... राहुलने तिला आपल्या कुशीत घेतले....

"कसा आहेस???"....नंदिनी

" मी....मस्त....तू जाडी वाटते आहेस...."...राहुलने मस्करी केली...

" बोक्या......."...नंदिनी

"बरं आम्ही पण आहो बरे काय इथे..."....रश्मी

"ओ राहुलची स्वीटहार्ट कशी आहेस तू ..." .. नंदिनीने तिला पण हग केले...

"मी छान....."..रश्मी

"राहुल , तू सामान आण ना..... मी राजला भेटायला जाते....कधी कधी बघते त्याला, असे होते आहे मला..."...नंदिनी... बोलतच पुढे जायला निघाली.

" कुठे चालली???"....राहुल

" तो कार पार्किंग मध्ये असेल ना .... मी जाते पुढे....तुम्ही या ..."...नंदिनी खूप उत्साहात बोलत होती.

"राज नाही आला आहे .....".... राहूल, तिचा उत्साह त्याला मोडावं नव्हता वाटत....पण शेवटी त्याने सांगितलेच...

"काय???...असे होऊच शकत नाही....तू मस्करी करतोय.... I know ..."... ती पुढे जायला निघाली.

"मी मस्करी नाही करत आहे.......राज नाही आला आहे...."... राहूल

"हे बघ राहूल , उगाच माझं डोकं खाऊ नकोस....एकदा राजला भेटते, मग हवे ती मज्जा कर...."...नंदिनी

"नंदिनी, राहुल दादा नाही आले आहेत ......त्यांना काही काम....."....रश्मी बोलतच होती की नंदिनी मध्येच बोलली.

" Okay........."...नंदिनीचा चेहरा पूर्ण उतरला होता. राज तिला घ्यायला आला नाही बघून तिला खूप वाईट वाटले होते. कार मध्ये सामान लोड करत तिघेही घराच्या दिशेने निघाले. नंदिनी मात्र शांतच बसली होती. रश्मी बरेच विषय काढत होती.....बरेच प्रश्न विचारत होती...नंदिनी फक्त हो, नाही.... दोन तीन शब्दात उत्तर देत होती.

"राहुल....राहुल..... कार ऑफिसकडे घे....आधी राजला पिकप करू.....".... ऑफिसचा रस्ता बघून नंदिनी एकदम एक्साईटेड झाली.

"तो ऑफिसमध्ये नाहीये...."....राहुल

"घरी चल ....फास्ट चालव ना गाडी....".....नंदिनी आनंदित झाली.

राहुलला सांगायचे तर बरेच होते...पण नंदिनीचा उत्साह बघता तो चूप राहिला.....घर आले तसे नंदिनी कार मधून उतरत आतमध्ये पळत सुटली.

"अग अग......थांब तिथेच दारात..... तुकडा पाणी ओवाळू दे...." आई

" अरे..... मी कुठली लढाई जिंकून आले आहे ???".....नंदिनी

" तू सुखरूप घरी आली आहेस....हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.....आता नीट उभी रहा ....."... आई

" आई ssss.......लवकर... मला कधी कधी आतमध्ये येतेय असे झाले आहे......"...नंदिनी

आईने नंदिनिवरून तुकडा पाणी ओवाळून बाजूला टाकला.......नंदिनी पळतच आतमध्ये गेली....सगळ्या मोठ्यांच्या पाया पडली......

"कसा झाला प्रवास.....???"....आबासाहेब

"आबा sss..... नंतर सांगते सगळं......आधी राज ला भेटून येते.....".....ओरडतच नंदिनी कोणाचं काही न ऐकता  वरती राजच्या रूमकडे पळाली सुद्धा....

"राज ssssss...........मला खूप राग आलाय तुझा......मला घ्यायला का नाही आला....."..म्हणतच ती राजच्या रूममध्ये गेली.....

"राज..... राज......."......नंदिनी त्याच्या रूमभर  राजला शोधत होती...

"इथे नाही.....माझ्या रूममध्ये असेल ".....स्वतःशीच बोलत ती तिच्या रूममध्ये  गेली... बाल्कनी सगळं बघून झाले.... तरीसुद्धा राज दिसला नाही. आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले होते....

"राज नाहीये इथे....."... राहूल तिथे तिच्या मागे आला होता...

" कुठे आहे?... मला जायचे त्याच्याकडे.... चल ना पोहचवून दे....."....नंदिनी केविलवाणे बोलली.

" तो ऑफिसच्या कामाने बाहेर गेला आहे..."....राहुल

" त्याला माहिती होते ना मी येणार आहे , मग तरीसुद्धा तो बाहेर गेला...."....नंदिनी

" खूप महत्वाचं होते.....म्हणून गेला आहे...."..... राहूल

" कुठे गेला आहे???...मला काहीच सांगितले नाही....."...नंदिनी

" तुझा मूड नव्हता घालवायचा , म्हणून नाही सांगितले...."... राहूल.

" बरं , माझं उद्याचे तिकीट करून दे ..... मला भेटायचं त्याला........"....नंदिनी

"तो सिंगापूरला गेला आहे....."...राहुल

नंदिनीने राहुलच्या हातातला फोन घेतला आणि राजला फोन केला...

"राहुल ... I am in meeting now......will talk you later..."... राज

" Don't cut the phone...,....".... नंदिनी

"नंदिनी..........."....तिचा आवाज ऐकून तो खूश झाला होता...

" राज तुला माहिती होते ना मी येत आहे.....का गेला तू तिकडे??? मला भेटायचं होते तुला....बघायचे होते तुला......."....नंदिनी

"इंपॉर्टन्ट काम होते .....".... राज

"Raj....... I am missing you so much.....please come back .......".... नंदिनी

"काम आटोपले की येतो ......."...राज

"तू खूप वाईट आहेस........ बाय....."....नंदिनिने रागात फोन कट केला.

"हा असा कसा करू शकतो???........शी sss.... बाबा ......"... नंदिनी
 

" नंदिनी, अग खरंच महत्वाचं होते ग काम.....मीच जातो म्हणालो होतो त्याला...पण लग्न, सगळी तयारी....म्हणून तो मला नाही म्हणाला जायला....हे काम आता पुर्ण केले तर मग लग्नाच्या वेळी मोकळं , टेन्शन फ्री राहता येईल....म्हणून तो आता गेला आहे......नाहीतर तो पण किती दिवसांपासून तुझीच येण्याची वाट बघत होता....पण कामसुद्धा आताच निघाले...".... राहुलने कसेबसे नंदिनीला  सांभाळून घेतले.

राहुलला पण वाईट वाटत होते. खरं तर ही ट्रीप तो पुढे ढकलू शकत होता, किंवा काका सुद्धा जाऊ शकत होते...पण तो मुद्दाम गेला होता....त्याचा राहुलला सुद्धा राग आला होता....पण तो असा का करतोय हे मात्र त्याला सुद्धा कळत नव्हते. आणि आजकाल त्याला काही विचारायची सुद्धा सोय राहिली नव्हती.....पण नंदिनिकडे बघून त्याला वाईट वाटत होते....आल्यापासून फक्त राज राज करत होती....त्याला भेटायची तिला किती घाई झाली होती....त्याने बघितले होते.....

" पण मग दोन दिवसांनी माझा अवॉर्ड फंक्शन आहे....मी सरप्राइज प्लॅन केले होते.......तो येईल ना???"....नंदिनी

" Don't worry...... तो परवाच दुपारपर्यंत येणार आहे..... प्रोग्राम तर लेट इवेनिंगला आहे ना....पोहचेल तोपर्यंत......"...राहुल

" Now please smile....."... राहुल

"ह्ममम......"....नंदिनी

"बरं , आता खाली चल...सगळेच वाट बघत आहेत....".... राहूल

"हो... चल.....".....नंदिनी राहुल खाली यायला निघाले ....तेवढयात राहूलचा फोन वाजला ....त्याने नंबर चेक केला...

"नंदिनी, तू हो पुढे ..... मी आलोच फोन अटेंड करून....."...राहुल

"Okay.......".... नंदिनी पुढे निघून आली.

"बोल......."...राहुलने फोन पिकप केला...

"नंदिनी ठीक आहे???".....राज

" राज, आधी चुकीचे वागायचे, आणि मग वरून ठीक आहे काय विचारायचे??... मला अजिबात तुझं वागणं आवडलेले नाही...."...राहुल

"राहुल , नंदिनी ठीक आहे ना ...???".....राज

" हो... तुला इथे नाही बघून थोडी हिरमुसली होती, वाईट वाटले तिला....समजावले आहे ... ठीक आहे आता..."...राहुल

"Thanks......."..... राज

"राज तुझं नक्की काय चालले आहे??? कळेल काय मला??? का नंदिनी पासून दूर पळतो आहे....का तीला इग्नोर करतो आहे......???".... राहूल

" राहुल.... असं काही नाही आहे .... काळजी घे तिची......बोलतो नंतर...."......राज

" राज,... शनिवारी नंदिनीचे एक  अवॉर्ड फंक्शन आहे.....काहीतरी सरप्राइज प्लॅन केले आहे तिने..... तू येतोय.....कळले काय??? ..."...... राहूल.

सरप्राइज शब्द ऐकून राजच्या हृदयात परत धस्स झाले.....

"ह्मम.....बघतो.....".... राज

"राज मला तू इथे हवा आहे......आपल्या जबाबदाऱ्या विसरू नकोस......"....राहुल

" नंदिनीची काळजी घे.... मीटिंग खोळंबिली आहे..... बाय".....राजने बोलून फोन बंद केला.

" राहुल तुझी नाराजी कळते मला....पण माझ्याकडे काहीच सोल्युशन नाहीये सद्ध्या....... मी पण खूप मिस करतोय नंदिनीला..... पण ती पुढे असताना तिच्यापासून दूर राहणे .... नाही जमणार मला......त्रास होतोय मला......तुमच्या कोणाचाच आनंद मला घालवायचा नाही ....,.म्हणून दूर आहो......... तिचं सरप्राइज माहिती मला..... पण त्याला मी सामोरे कसा जाऊ..... नाही जमत आहे...... sorry Nandini.....".... राज मनातच बोलत नंदिनीला आठवत होता.

" राज.....काय प्रोब्लेम होतोय तुला....एकदा तरी शेअर कर........परत आला की बोलायलाच हवे...." ....राज सोबत बोलून मनातच विचार करत तो खाली निघून आला.

नंदिनी आणि घराच्या सगळ्यांच्या खूप गप्पा रंगल्या होत्या..,.नंदिनी तिथल्या सगळ्या गमतीजमती सांगत होती........आज परत सहा महिन्यानंतर घर बोलकं झालं होते......खळखळून हसन्याचे आवाज परत घरात गुंजत होते...तिच्या येण्याने घरात सगळे खूप आनंदी होते......

नंदिनीचा जवळपास 25-28 तासांचा प्रवास झाला होता....ती बरीच थकली होती......जेवण वैगरे आटोपून ती झोपायला तिच्या रूम मध्ये आली......झोप येईना म्हणून राजच्या रूममध्ये गेली.....

" राज..... कधी येशील परत??...... आठवण येते आहे तुझी............. तुझी मिठी वेळोवेळी मिस केली मी......तुझ्या कुशीत यायचे होते रे मला......तुझ्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपायच होते मला.......तुझा सहवास अनुभवायचा होता मला.......".....नंदिनी स्वतःसोबत बोलत तिथे भिंतीवर लागलेल्या त्याच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत होती.....

नंदिनीने राजच्या कपाटमधून त्याचा एक शर्ट काढला.....तो घालून ती तिथेच त्याचा बेडवर राजने तिला गिफ्ट दिलेला एक मोठा टेडी घेऊन झोपली. बऱ्याच वेळ भिंतीवरील त्याचे फोटो बघत कधीतरी तिचा डोळा लागला.

*******

जेट ल्याग असल्यामुळे नंदिनीचा झोपेचा थोडा प्रॉब्लेम झालाच होता....दिवसाला झोप रात्रीचे जागरण असे काही तिचे सुरू होते....

तिकडे राजचे सुद्धा मन लागत नव्हते....तो सुद्धा कसाबसा स्वतःला सावरत वेळ काढत होता...... नंदिनी पुढे कसे जायचे.... तिला कसे फेस करायचे हाच त्याच्यापुढे मोठा प्रश्न होता....नंदिनी येणार आहे म्हणून घरच्यांनी वारंवार नको जाऊ सांगूनसुद्धा सगळ्यांची नाराजी पत्कारात तो कामाचा बहाणा सांगून तिथून निघून आला होता....

******

नंदिनीने सगळ्यांसाठी त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेऊन काहीना काही गिफ्टस आणले होते.....सगळ्यांना तिने गिफ्टस दिलेत.....सगळ्यांना तिचे कौतुक वाटले...परदेशात राहूनही सगळ्यांना आवडेल असेच काही तिने शोधून आणले होते....तिने रश्मीच्या घरच्यांसाठी सुद्धा छान छान असे काही आणले होते.....

" राजसाठी आहे ना ते....????"...राहुल 

नंदिनी तिच्या रूममध्ये राजसाठी आणलेले घड्याळ हातात घेऊन बसली होती....ते बघून राहुल तिच्या रूममध्ये आला होता...

" हो....... त्याला या एकाच तर गोष्टीची खूप आवड आहे....".... नंदिनी

" खूप छान आहे.... पण तो हे सिंगल पिस नसतो घालत.....".... राहूल

" माहिती मला.... हे बघ सेम टू सेम... माझ्यासाठी पण आणलय......किती particular आहे ना तो या बाबतीत.... त्याची वॉच नेहमी माझ्या वॉचला कनेक्टेड असायची....मी कुठे आहे , काय करतेय आहे....सगळं ट्रॅकिंग असायचे त्याचे.....पण बघ ना आता...मी आले आहे तरी आला नाही..... "...नंदिनी उदास होत बोलत होती

" तू आता समजदार झाली आहेस.... म्हणून मोकळं केलेय त्याने तुला.... तुला तुझ्या मनाप्रमाणे करता यावे...जगता यावे....म्हणून आता तो जास्ती मधामधत नाही करत.....पण तू काळजी नको करू तुझ्या अवॉर्ड फंक्शन ला तो येणार आहे......"...राहुल

" खरंच ना...... माझं खूप मोठं सरप्राइज आहे....."...नंदिनी

" ये नंदिनी....काय आहे सांग ना ???".... राहूल.

" मग सरप्राइज कसे राहील?"......नंदिनी

" काही हिंट तर दे.....??..."..राहुल

" नो........ एक तर दिवस आहे राहिला..... वाट बघ".....नंदिनी

"  ठीक आहे...झोप आता. ..".... राहूल

" ह्मम.....राजला फोन करते, मग झोपतेच....."....नंदिनी

"Okay......bye good night...."... राहुल.

राहुल गेल्यावर नंदिनी ने राजला फोन केला....

" हॅलो.........".... राज

" राज, तू किती वाजेपर्यंत पोहचतो आहे???" ....नंदिनी

"कधी??? कुठे???"....राज

" राज sss.... तुला सांगितले होते ना.....परवा माझ्या पेंटिंगचे अवॉर्ड फंक्शन आहे .... तिथे यायचे तुला...."....नंदिनी

" ओके.... येतोय......"... राज

" राज , तू असा दोन दोन शब्द का बोलतोय......??....कधीचा नीट बोलला नाही आहेस तू माझ्यासोबत ".....नंदिनी

" नंदिनी रात्र झालीय......म्हणून...."....राज

"रात्री काय माझ्यासोबत बोलायचं नाही, असे काही आहे काय???".....नंदिनी

" थकलोय.....असे म्हणायचे होते मला...."...राज

" का रे तुला बरे वैगरे नाही वाटत आहे काय???? आजकाल खूप थकायला व्हायला लागलंय तुला??".....नंदिनी काळजीने विचारपूस करत होती.

" बरं आहे सगळं...... काँटिन्यु मीटिंग वैगरे होतात, डोकं जरा जड वाटायला लागले, बाकी काही नाही ...".....राज

" तू ये इकडे..... रोज तेलमालिश करून देईल डोक्याला....".....नंदिनी

" किती दिवस नंदिनी..तू माझ्या जवळ राहणार आहेस.... सवय कमी करावी लागेल तुझी".....राज मनातच विचार करत तिच्या बोलण्यावर हसला होता.

"तू हसतोय माझ्यावर......."....नंदिनी

" स्वतःवर हसतोय .......नंदिनी झोप आता "...राज.

" राज..... missing you a lot...... ये बाबा आता लवकर , वाट नाही बघवत तुझी......"....नंदिनी

" ह्मम....गुड नाईट"....राज


******

अवॉर्ड फंक्शनची तयारी झाली होती.... प्रोग्रामचे लोकेशन बरेच दूर असल्यामुळे आजीसाहेब आबा घरीच थांबतील असे ठरले होते...बाकी राहुल, काका, काकी, आई , रश्मी हे सगळे नंदिनीसोबत जायचे ठरले होते......

" नंदिनी.... लवकर तयार हो.... वेळेत पोहचायला हवे..." .....आई, नंदिनीला सुस्तावलेल बघून आई तिला बोलत होत्या

" आई, बघ ना ग, हा राज अजूनही आलेला नाहीये...."....नंदिनी

" माहिती नाही आजकाल हा असा का वागायला लागला आहे....कुठल्याच गोष्टीचे गांभीर्य नाही राहिले याला...."...आई

" आई, काही झाले आहे काय???? ".....नंदिनी

" तसे काही नाही ग, आजकाल बेशिस्त झाला आहे.... मनात येईल तसे वागायला लागला आहे......"...आई

" ठीक आहे ना आई..... त्याला पण मोकळं राहू दे की.... आजपर्यंत आपल्या सगळ्यांची मन राखूनच वागत आला आहे.....".....नंदिनी

" हो, पण आता माहिती ना तुझा प्रोग्राम आहे.... यायला नको वेळेत??....."....आई

" हो.... थोडा थोडा राग मला पण येतोय....."...नंदिनी

" नंदिनी.....हे काय अजून तू तयार नाही झाली....."...राहुल

" अरे होतेच आहे.....पण बघ ना राज आलेला नाही अजून....."....नंदिनी

" अग हो फ्लाईट थोडी लेट झालिये..... आपण निघुया , तो डायरेक्ट तिथेच पोहचतो म्हणाला...."...राहुल

" ओके......"....नंदिनी

सगळे आपापल्या तयारीला निघून आले....

*******

" And the best painting award goes to...... Nandini Deshmukh.......".... आवाज हॉल भर घुमत होता

" राहुल राज कुठे आहे??......".....नंदिनी...नंदिनीची धडधड आता वाढायला लागली होती....

******

क्रमशः

🎭 Series Post

View all