नंदिनी...श्वास माझा 68

राज नंदिनी

भाग 68

" छाया ताई नंदिनीची रूम रोज क्लीन झाली पाहिजे, एकही धुळीचा कण नको दिसायला मला ..." ...राज

" हो दादा ..... " ... छाया

" काय आज मूर्ती आनंदित दिसत आहे ....." ..काकी , भुवया  उडवत त्याची मस्करी करत होत्या.

राज घरभर उत्साहात फिरत होता.  नंदिनीच्या आवडीच्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतः लक्ष घालत सगळं नीट करवून घेत होता. आज बऱ्याच दिवसांनी तो खूप आनंदी, मनापासून आनंदी दिसत होता ... त्याला बघून घरचे पण आनंदित होते.

" हो, एक महिन्यांनी नंदिनी येणार आहे ना परत " .....राज लाजतच बोलत होता.

" काय  ,  स्पेशल प्लॅन काय रे मग  ???? " .... काकी त्याला चिडवत होत्या.

" एक काय...... खूप स्पेशल प्लॅन्स आहेत त्याचे " ....राहुल त्यांच्याजवळ येत राजला  चिडवायला लागला  होता.

" हो....आता तिच्यापुढे व्यक्त व्हायचं ठरवले आहे .  मी प्रपोज करणार आहे तिला ....." ....राज

" ओहो....... फायनली कळले तर तुला की बोलायला हवे....." .... काकी

" आता दूर आहे ना ती , कळले त्याला ....नाही तर नेहमी  साधुसंतांच्या भूमिकेत राहायला आवडत असायचं याला ..." .. राहुल

" हो , कळलं आहे मला , नाही जगू शकत तिच्याशिवाय , ती हवी आहे मला नेहमीसाठी , माझ्या डोळ्यांसमोर ... नेहमीसाठी " ....राज

" छान, मग कधीचा मुहूर्त आहे ???" ... काकी

" राहुलचे लग्न झाल्यावर, लगेच दुसऱ्या दिवशी " ...राज

" का???? नंदिनी तर आधी येणार आहे , मग उशीर का???" ...काकी

" ती आल्यावर लगेच पंधरा दिवसात लग्न आहे . लग्नात काही घोळ नको , म्हणून. मला माहिती नाही मी तिला प्रपोज केल्यावर ती त्यावर कशी रिॲक्ट करेल , तिच्या तब्बेतीवर  काही परिणाम झाला तर ???? उगाच लग्नामध्ये गडबड नको , आणि तिला पण लग्न एन्जॉय करू देत ना , उगाच टेन्शन मध्ये नकोय मला ती . " ...राज

" बरं, हा पण चांगला प्लॅन आहे . पण आता हा प्लॅन चेंज करू नको . " ...काकी

" हो काकी ..." ...राज

" Yeah , that's superb ..... I am very happy for you bro . भाई पार्टी करूया तेव्हा . प्लीज नको म्हणशील . " .... राहुल खूप एक्साईटेड होत बोलला.

" आई  आहे म्हटले  उभी इथे " ...काकी डोळे मोठे करत राहुल ला बोलत होत्या.

" आई काय ग, तुझ्यापासून लपून करतो काय काही . कधीतरी असे एखाद्या वेळी चालते ग . आणि राज गेल्या तीन चार वर्षापासून काहीच करत नाही की पित नाही . आनंदाच्या क्षणाला थोडे तर सेलिब्रेशन करूच शकतो ना ??"... राहुल

" बरं बरं ठीक आहे , राजचा आनंद तर आम्ही सुद्धा सेलिब्रेट करू . " .... काकी

" हॉ ssss आई , तू पण पिणार आमच्यासोबत ???" ...राहुल आपल्या गालांवर हात ठेवत डोळे मोठे करत आईची मस्करी करत होता.

" गधड्या....माझी मस्करी करतो हा??" ...काकिने राहुलच्या पाठीत एक धबुक्का दिला.

तसे राज राहुल हसायला लागले.

" बघ किती गोड दिसतो हसतांना , किती दिवस झाला असा मनमोकळा हसलाच नाही. " ...काकी राजच्या गालावर थोपटत बोलल्या.

" त्याचा मजनू झाला आहे , मजनुची लैला कुठं आहे इथे " ....राहुल

" तुझ्या जिभेला काही हाड रे ..... भयंकरच बोलायला शिकला. थांब रश्मीला येऊच दे , मग शब्द नाही निघणार तोंडातून " ....आई

" तो तर सुखी संसाराचा मंत्रच आहे ना??? .... वारसा मलाच चालवावा लागेल ना ...??? बाबांना बघूनच शिकलोय  " .... राहुल

" तू ना आता मार खाशील , सांगून ठेवते " .... काकी

" काय गप्पा रंगल्या आहेत ?? " .... नीती त्यांच्याजवळ येत बोलल्या .

" काही नाही, नंदिनीची आठवण काढणे सुरू आहे . ' .... राहूल , राजकडे इशारा करत बोलत होता.

" ओह , अच्छा अच्छा, ते तर आपलं आवडतं काम आहे  " .... नीती

" आई , तू पण सुरू झाली  ???? हे दोघे काय कमी होते ..." राज

" का तुला आवडत नाही , नंदिनीला आठवत बसने ....???" ... आई

" येह बात काकी , दे टाळी " ... राहुल नीतीला टाळी देत बोलला.

" आई sssss ....." ....राजला तिचे ऐकून लाजयाला झाले होते.

" ये sss , कोण त्रास देतय माझ्या मुलाला , नंदिनीला नाव सांगेल त्याचं " ....काकी थोडा कडक आवाज काढत बोलल्या.

" काकी ......" .... राजने डोक्यावर हात मारून घेतला.

" बिचारा........ राज ....... " ....राहुल मस्करी करायला लागला.

" बरं बरं पुरे आता .... जरा कामाचं बोलूया आता ??" ... नीती

" हा , बोला वहिनी ...." ... काकी

" राहुल , तुला लग्नासाठी  पत्रिका सिलेक्ट करायला सांगितली होती ??? झाले काय काम ??" ...निती

" हो , आबांना दाखऊन मजकूर पण फायनल केला आणि प्रिंटिंगला पाठवल्या  आहेत.  दोन दिवसात येतील . " ...राहुल

" मी काय म्हणते रागिणी , नातेवाईकांकडे पत्रिका वाटायला तू आणि भावजी जा . मित्र परिवार  आणि जिथे नाही जमणार तिथे राज पत्रिका देऊन येईल. " ... नीती

" हो चालेल ." ... रागिणी

" बरं , बाहेरची तर बाकी सगळी कामं बरीच आटोपली आहे.  अहेराचे पण सगळं घेऊन झाले आहे . काही राहिले का ते तू एकदा बघुन घे. " ...निती

" मला तुमची ही आहेर पद्धती अजिबात आवडत नाही . I really hate it " ..... राज

" पद्धत , परंपरा असते ती , वर्षानुवर्ष पाळत आलो आहेत .   " ...निती

" चुकीच्या पद्धती बदलायला हव्या. चुकीच्या गोष्टींना आपण तरी समर्थन नको द्यायला . " ... राज

" आम्हाला करू दे , पाळू दे आपल्या रीतिभाती . जे काही बदल आणायचे तुला, ते तुझ्या मुलांच्या लग्नात कर तू . " .. काकी

" हे भगवान ....कठीण आहे तुमचं. कसेच काय तुम्ही लोकं घुमुन फिरून माझ्यावर येता  " .....राजने डोक्यावर हात मारून घेतला. राहुल त्याला बघून खिखी हसत सुटला.

" तू आमचा लाडोबा ना , पण तू काळजी नको करू नंदिनी आली ना , को घुमुन फिरून तुम्हा दोघांवर येऊ " .... काकी

" कठीण आहात तुम्ही लोकं.......काम करतो ....बाय " .. राज

" हो हो , जा जा आराम करून घे , तुझी महाराणी आली की एका जागेवर बसू देणार नाही . ' राज sss हे न राज ते ........" ....राहुल

" मी आराम नाही काम करायला चाललो आहे ." .... राज

" तेच ते रे ..... सेमच असते ते...." राहुल

" वहिनी , आपल्याला पण आटोपते घ्यावे लागते, नंदिनी आली की आपल्याला काही सुधारू देणार नाही , आणि तिचे ती वेगळे ऑर्डर सोडेल ते आहेच " ...काकी

" अरे , तुम्ही सगळे असे बोलत आहात जशी काही ती कुठली डॉन वैगरे आहे . एवढी गोड माझी नंदिनी , अन् काय काय बोलत आहात तुम्ही " ...राज

" ह्मम sss ...... माझी नंदिनी sssss ...." ...आई, काकी एकसाथ चिडवत होत्या .

" I mean आपली , मी चाललो....."..... राज लाजातच तिथून पळाला.

******

नंदिनी एक महिन्याने परत येणार होती , म्हणून नंदिनी आल्यावर पंधरा दिवसांनी राहुलच्या लग्नासाठी मुहूर्त काढले होते. जरा घाईतच मुहूर्त काढण्यात आले होते , पण नंतर परत तीन चार महिने लग्नाची मुहूर्त नव्हते. आधीच साखरपुडा होऊन पाच महिने झाले होते, जास्ती उशीर नको  म्हणून हा मुहूर्त काढला होता.

नंदिनी गेल्यावर दोन दिवसांनी तिचे आजी आबा पण त्यांच्या गावी परतले होते. ती गेल्या  दिवसापासून घरातले वातावरण शांत झाले होते. पहिले दहा पंधरा दिवस तर सगळ्यांनाच जड गेले होते. पण हळूहळू सगळ्यांनी आपल्या कामात रमऊन घेतले होते. पण संध्याकाळी , जेवतांना वैगरे सगळ्यांना तिची खूप आठवण येत होती. जेवतांना सगळ्या जास्ती नखरे आणि बडबड तिचीच असायची , त्यामुळे प्रत्येकजण तिला खूप मिस करत होते.

सगळेच तिला इतके मिस करत होते तर राजचे तर काही विचारायला नको . सुरुवातीच्या दिवसांच्या रात्री तर अक्षरशः त्याने जागून काढल्या होत्या. दिवस कामात , ऑफिसमध्ये, सगळ्यांमध्ये  जायचा, पण रात्र मात्र त्याला खायला उठायची . तो घरात एकदम गुमसुम राहायला लागला होता. तिचा फोन आला म्हणजे मात्र चित्र वेगळेच असायचे . तेवढा वेळ तो भयंकर उत्साही असायचा . पण नंतर नंतर तिने फोनवर बोलणे कमी केले होते, दिवस रात्रीचा पण घोळ होत होता, इकडे दिवस तेव्हा तिची रात्र, राज रात्री जागून बोलायला पण तयार असायचा , पण तेव्हा तिचं कॉलेज वैगरे कामं असायची, त्यामुळे आपोआपच बोलणं कमी कमी व्हायला लागले होते.  अधून मधून चान्स मिळाला की मात्र राहुल काकी वैगरे त्याला भारी पिडायचे.

नंदिनी परत येणार आहे कळले, तेव्हा आधी राहुलच्या लग्नाची तारीख फिक्स करण्यात आली होती. लग्नाचं मुहूर्त निघाल्यामुळे आतापर्यंत शांत असलेल्या घरात आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

*****

" नंदिनी, किती दिवस झाले मनसोक्त बोललो नाही आहोत . कुठे इतकी बिझी झाली . स्वतः तर फोन सुद्धा करत नाही आहेस , मी फोन केला की दोन शब्द बोलते आणि ठेऊन देते . राग आला आहे काय तुला तिथे जॉब साठी नाही म्हणालो म्हणून . ट्रस्ट मी , इथे तुला खूप चांगले जॉब मिळतील.  " ..... राज , राज त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर नंदिनीचे फोटो बघत बोलत होता.

फोटो बघता बघता त्याची नजर तिच्या  एका फोटोवर येऊन थांबली,  त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचा फोटो होता तो .

" माझी गोडुली , सोनुली , कसली गोड दिसत होती चिमणे तू त्या दिवशी या रेड ड्रेसमध्ये . किती हट्टाने मला तू हे फुलाफुलांच्या डिझाईनचा  ड्रेस घालायला लावला होता . सगळ्या अजब स्टाइल्स तू मला ट्राय करायला लावत होती . पाडव्याच्या दिवशी काकी समोर , सगळ्यांसमोर किती फजती केली होती तू माझी , सगळे किती चिडवत होते मला , लाजल्याहून लाजल्यासारखे झाले होते मला , आणि तुम्हाला मॅडम, त्याचा काहीच फरक पडत नव्हता  , तुम्ही आपल्याच मस्तीत . तुझी मस्ती सुद्धा तुझ्यासारखी गोड, तुझा मला त्रास देणे, माझ्या खोड्या काढणे , रात्री बे रात्री पास्ता कॉफीचा हट्ट , सगळच मला खूप आवडत होते,  मी खूप एन्जॉय करत होतो ते .

ऑफिसमध्ये आली इंटरव्ह्यू द्यायला, किती शॉक झालो होतो मी , कसली कॉन्फिदंट दिसत होती. तयारी तर मीच करून दिली होती तुझी , पण जे attitude ने तू एन्ट्री केली.... बापरे तुला बघुन तर मी पुरताच घायाळ झालो होतो. आणि नंतर जो काही तू इंटरव्ह्यू दिला, I was speechless ... मी तर फक्त तुला न्याहाळत होतो . तुझ्या डोळ्यांतील चमक, शब्दा शब्दाला तुझ्या ओठांची होणारी हालचाल , माझ्या तर डोक्यानेच काम करणे बंद केले होते.

प्रत्येक रुपात आवडतेस तू मला .... तुझी माझी पहिली भेट, तुझे ते हिरवे डोळे ते गोबरे गाल , सात वर्षाची तू , तेव्हाच माझ्या मनात घर करून गेली होती. तेव्हा प्रेम वैगरे कळत कुठे होते, पण तू माझ्यासाठी स्पेशल आहेस हे मात्र कळले होते. उन्हाळा कधी येतो  मी आईसोबत गावी कधी जातो, आणि तुला कधी बघतो  असे व्हायचे माझे. आधीपासूनच मला तुला बघायला खूप आवडत होते, तेच आताही कायम आहे , तुला बघत मी माझं अख्खं आयुष्य घालवू शकतो , इतकी मला तू आवडतेस . तुझी प्रत्येक रूपे , लहानपणी पासून ते आतापर्यंतची तुझे सगळे बदल, तुझी सगळी रूपे जशीच्या तशी माझ्या डोळ्यात आहेत ....

माझं प्रेम कधी कधी तुझ्यापुढे कबूल करतो असे झाले होते मला, तुला पण मी आवडत होतो कळत होते तुझ्या डोळ्यात बघून ,  पण वाट बघत होतो ... तुझ्या अठराव्या वाढदिवसाला तुला प्रपोज करायचं ठरलेच मग .... किती गोड परी दिसत होती तू त्या रात्री , स्वप्नसुंदरी ..... ती रात्र माझ्या आयुष्यातली खूप सुंदर रात्र होती. तुझं वाढदिवस....किती आवडले होते तुला ते हार्ट शेप पेंडंट ... माझ्या हाताने मी तुझ्या गळ्यात घातले होते. तू सुद्धा मल एक लॉकेट घालून दिलेले, तुझ्या आणि माझ्या नावाचे ....मी दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे बघावं नाही हे  आठवणीत राहावं म्हणून घातले होते ना तू ते मला ..??? ...माझ्या अजूनही आहे ते गळ्यात आणि तुझ्याशिवाय मी कुणाकडे बघितले सुद्धा नाही आणि कोणाला जवळ सुद्धा येऊ दिलेले नाही ........." राज त्याच्या डायरीमध्ये लिहीत होता.....नंदिनी गेल्यापासून त्याला खूप एकटे वाटत असायचे आणि तेव्हापासून तो डायरी लिहायला लागला होता.... डायरी मध्ये काय तर फक्त नंदिनी.... नंदिनी .... नंदिनी ......

रात्रीचे जवळपास 2 वाजत आले होते , बऱ्याच वेळ तो डायरी लिहीत बसला होता . 
 

" मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय , तुला माझ्या भावना सांगणार आहो मी तुला......" ..राज लिहीत होता की  तेवढयात त्याचा फोन वाजला .... फोन हातात घेऊन बघितला तर नंदिनीचा फोन होता. तो फोन बघून खुश झाला....त्याने फोन रिसिव्ह केला आणि काही बोलणार तेवढयात नंदिनी फोनमधून ओरडली .

" Raj , I am in Love ....I am in love Raj ......" ... ती पलीकडून ओरडून सांगत होती.

तिचे शब्द ऐकले आणि त्याच्या हातातून आपोआप फोन खाली पडला......

*******
क्रमशः.....

🎭 Series Post

View all