Aug 09, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 67

Read Later
नंदिनी...श्वास माझा 67

भाग 67

साखरपुडा खूप छान पार पडला होता अगदी सगळ्यांचा मनाप्रमाणे झाले होते. लग्न नंदिनी अमेरिका वरून परत आल्यावर करायचे ठरत होते. राहुल रश्मीला सुद्धा एकमेकांचे प्रेम फुलवायला , आणि लग्न आधीचे ते मंतरलेले दिवस जगायला भरपूर वेळ मिळणार होता.

उद्या नंदिनी अमेरिकाला जाणार होती. तिची बॅग पॅकिंग तयारी असे काही सुरू होते.  तिने बॅग्स, कपडे, काही छोट्यामोठ्या वस्तू असा सगळं पसारा बेडवर पसरवून ठेवला होता, आणि त्या सगळ्यामध्ये मधात बसली होती.
पण तिला काहीच सुचत नव्हते. कशातच तिचे मन लागत नव्हते. राज सोडून  घरातले सगळे तिच्या आजूबाजूला तिला काही ना काही सूचना देत होते. पण तिचे कोणाकडेच लक्ष नव्हते. ती तिच्याच विचारात बसली होती, उदास वाटत होती.

" अगं नंदिनी, आम्ही तुझ्या सोबत बोलत आहोत. ऐकू तरी येत आहे काय आमचे ??? ....आई

" ह..??.... काय झाले ???काही म्हणाले काय?? " .... नंदिनी

" नंदिनी, थोडा आराम कर, मग कर हे सगळं. साखरपुडा , पाहुणे  थकली आहे तू. एक झोप झाली की फ्रेश होशील, मग कर हे राहिलेले कामं  " ..... काकी

" नाही ओ काकी, खूप कामं पडली आहे....झोपेल ना तर दिवसच संपेल..." ...नंदिनी

" ब्रेक टाईम ....." ...रश्मी हातात एक ट्रे पकडत नंदिनीच्या रूम मध्ये आली..तिच्या पाठोपाठ छाया एक ट्रे पकडत घेऊन आली. दोघीही बाहेर बाल्कनी मध्ये गेल्या...तिथे टेबलवर सगळं अरेंज केले...

" इट्स गप्पा गोष्टी टाईम , चला सगळे बाल्कनी मध्ये...." ...रश्मी आतमध्ये येत बोलली.

" नंदिनी , हे सगळं आपण नंतर मिळून करूया.... होईल लवकर, नको काळजी करू, चला आता बाहेर थोडा फॅमिली टाईम सेलिब्रेट करूया ..." ....रश्मी

" हो, चला......' .....निती

सगळे उठून बाहेर बाल्कनीत आले. दोन्ही आबा, दोन्ही आजी , घरातले सगळेच तिथे जमले होते.

" वाह वाह ..,.... छान छान ....." ....आबा

सगळे आपल्या कंफर्ट नुसार चेअर सोफावर जाऊन बसले..... छाया आणि रश्मीने प्रत्येकाला प्लेट्स दिल्या.

" Wow ....... चॉकलट केक , कॉफी , ढोकळा....खरंच खूप गरज होती या सगळ्यांची ......, सुपर्ब यार रश्मी, you are great..." ...राहुल , रश्मीचे कौतुक करायचे एक चान्स सोडत नव्हता.

" राज........" .....नंदिनिने कॉफीचा एक घुट घेतला आणि आपोआप तिच्या तोंडून त्याचे नाव बाहेर पडले.

" Yess right..... हा सगळा प्लॅन राज दादांचा आहे. कॉफी आणि केक बाय दादा, ढोकळा मी बनवला.."....रश्मी

" वाह सहीच, ढोकळा mind blowing ........ आहा..हा...हा...." .... राहूल

"नौटंकी........." ...रश्मी हळूच बोलली.
 

नंदिनीची नजर मात्र राजला शोधत होती. तिचे बाकी लोकांच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हते. तिच्या आवडत्या झुल्यावर बसत ती दाराकडे टक लावून राजची वाट बघत होती.

" राज कुठे आहे???? तो नाही आला इथे??" ...आजी

" हा , दादा म्हणाले तुम्ही सगळे सुरू करा, ते फ्रेश होऊन येतात आहेत." .... छाया

" बरं , ठीक आहे ...." ...आजी

सगळ्यांच्या आपापसात गप्पा सुरू होत्या. बालकनी तशी चांगली मोठी होती. राजने तिथे बरेच फुलझाड, बरीच शो ची झाडे लावली होती. संध्याकाळचे पाच वाजत आले होते.  पक्षांचा किलबिलाट, अधूनमधून हवेची थंड  झुळूक , हवे सोबत येणारे फुलांचे सुगंध, सोबत सगळा परिवार एकसाथ , सगळं कसे प्रसन्न आणि हवेहवेसे वाटत होते.

" शी बाबा, हा कुठे राहिला??? इतका काय फ्रेश होतो आहे??? सगळ्यांचं खानेपिने होऊन जाणार, तेव्हा येईल का हा?? ...."  नंदिनी कॉफी पीत पित दाराकडे बघत स्वतःसोबत मनातच बोलत होती, की तेवढयात राज फ्रेश होऊन तिथे आला होता.

" राज , खूप छान केले, इथे सगळ्यांना जमावले , एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतोय, छान एकदम " ... आबा

राजने हसून त्यांना प्रतिउत्तर दिले.. नंतर आई, काकी, आजी त्याने बनवलेल्या केक कॉफी असे सगळ्यांचे कौतुक करत होत्या. तो पण हसत खेळत त्यांच्यासोबत गप्पा मारत होता. नंदिनी दूर झुल्यावर बसत , कोफीचे एक एक घोट घेत घेत राजला बघत होती. त्याची ती हसरी, प्रसन्न मुद्रा बघून नंदिनीचा थकवा , सगळंच कुठल्या कुठे पळाले होते. आता तिच्या चेहऱ्यावर पण गोड हसू पसरले होते. आतापर्यंत शांत , एका कोपऱ्यात बसलेली नंदिनी सगळ्या सोबत थट्टामस्करी करायला लागली.

" काय नंदिनी, आता पर्यंत उदास बसली होती. आता एकदमच मूड बदलला ..???" ..रश्मी नंदिनिजवळ येत झुल्यावर बसली. रश्मीच्या मागे मागे राहुल ही तिथे पोहचला आणि त्यांच्या बाजूला बसला.

" तुला माहिती आहे ही कॉफी आहे ना ती वर्ल्ड बेस्ट कॉफी आहे , सगळा थकवा जातो याने..." ...नंदिनी

" कॉफीमुळे की कॉफी बनवणाऱ्यामुळे ???" ....रश्मी

" हां......???? हो ते पण  आहेच, दोन्ही बेस्ट आहेत  " ....नंदिनी

" Yess , राज दादा इज बेस्ट ..." ...रश्मी मुद्दाम रहुळकडे बघत बोलत होती.

" मला पण येतं जरा ..."...राहुल

" काय????" .....रश्मी

" पिता  त्याला कॉफी पित येतं , असे सांगतोय तो " .....नंदिनी आणि रश्मी  एकमेकांना टाळी देत हसत होत्या.

" हो तर मग, खाना खाना, पिना और त्याची चव सांगना भी एक कला होती है . तुम्हाला काय समजणार मंद बुद्धिंनो ...." ... राहुल

" असू दे तुझी कला तुझ्या जवळ .  ...रश्मी मस्त झालाय ग ढोकळा . किती भारी चव आहे तुझ्या हाताला . आमच्या भुक्कडची मजाच आहे ......"  नंदिनी

" भुक्कड काय ग ???? घरात एक नंबरची खादाडी तूच आहेस......". ....राहुल

" मी खादाडी....???? स्वतः कडे बघ जरा...." ...नंदिनी

नंदिनी , राहुल, रश्मीची मस्ती सुरू झाली होती. एकमेकांना चिडवत , दंगामस्ती करत त्यांचे खळखळणे सुरू होते. राज बाल्कनीच्या दुसऱ्या कोपऱ्यात कॉफी पित त्यांना बघत होता.

" तुला सगळं कळते ना ??? नंदिनी उदास होती म्हणून तू हे सगळं केलंय ना??? " .... नंदिनीची आजी राजजवळ येत बोलली.

" ह्मम, उद्या जायचे म्हणून तिचे मन लागेना झाले आहे . खाणे आणि परिवार तिच्या सगळ्यात आवडीच्या गोष्टी आहेत. हे असले की ती खूप प्रसन्न असते.  " ....राज नंदिनिकडे बघत आजीसोबत बोलत होता.

" खूप नशीबवान आहे माझी नंदिनी .... जे तू तिच्या आयुष्यात आहेस." ..... आजी

" आम्ही सगळे नशीबवान आहोत, जे ती आमच्या घरात आणि आयुष्यात आहे. ती आल्यापासून खऱ्या अर्थाने घराला घरपण आले आहे. हे असं परिवार एकत्र क्वचितच यायचा ते पण कामापुरते. सगळे स्वतःच बिझी असायचे.  खऱ्या अर्थाने आता आम्ही सगळे एकत्र आहोत. " ...राजने हसून आजीला उत्तर दिले.

" कोण जिंकणार बाबा तुला बोलण्यात...." ...आजी हसतच बोलत होत्या.

" अग खरे बोलतोय ग..... आणि तू तरी माझ्यामध्ये आणि नंदिनिमध्ये कधी भेदभाव केला आहेस काय?? जितके प्रेम काळजी तुला नंदिनीची आहे , तितकीच नेहमी माझी पण केलीय. बेस्ट आजी आहेस तू " ..... राज आजीच्या खांद्यावरून हात घालत आजीच्याजवळ गेला.

एक दोन तास मस्त गप्पागोष्टी करत सगळे खाली निघून आले.

" नंदिनी , तू बस इकडे आरामात, मी करतो आहे " .....राज

" मी करते ना मदत...." ...नंदिनी

" नको, तू आराम कर, खरंच तुला गरज आहे , प्रवास मोठा आहे, आराम काही होणार नाही. आणि मला माहिती कशी करायची पॅकिंग , you don't worry ...." .... राज

" आम्ही पण मदत करतो पॅकिंगसाठी , लवकर होईल. "..  रश्मी राहुल नंदिनीच्या रूम मध्ये येत बोलले.

" बरं , ठीक आहे.... मी इथे बसते, काही अडलं तर सांगा".... नंदिनी सोफ्यावर पाय लांब करत बसली.

राजने त्याच्या खिशातून एक लिस्ट काढली . राज लिस्ट मधून बघून एक एक गोष्ट सांगायचा आणि रश्मी ते बॅग मध्ये भरायची . राहुल साईडला एक टेबल जवळ बसत पेपरचे विमान बनवत कधी रशमिवर उडवायचा कधी नंदिनिवर ...नंदिनी मात्र राजला काम करतांना बघत होती. तो  सगळं आठवून , काळजीने सगळं ठेऊन घेत होता. रश्मी सुद्धा खूप मन लावून राज सांगत होता तसे तसे पॅकिंग करत होती.

नंतर राजने नंदिनीची सगळी औषधे आणत तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तिला सगळ्या औषधांचे डिटेल सांगत सगळं समजावून सांगत होता.

राज तिला सगळ्या इंट्रक्शन्स देण्यात मग्न होता. सगळ्यांना तिची काळजी घेत असताना बघून  तिचे मन खूप भरून आले होते. सगळ्यांचे तिच्यावरचं प्रेम बघून तिच्या डोळ्यात आता पाणी जमायला लागले होते.  जागेवरून उठत ती राजच्या कंबरेमधून हात घालत त्याला बिलगली. तिचे असे अचानक जवळ आलेले बघून राज पण  गोंधळाला. त्याने त्याच्या हातातले पेपर बाजूला ठेवले आणि तिला जवळ घेतले.

रश्मी आणि राहुल सुद्धा तिला असे भाऊक झालेले बघून शांत एका ठिकाणी उभे होते.

" काय झाले आहे ??? बरं नाही वाटत आहे काय ??" ....राज

नंदिनी तसेच त्याला पकडत  त्याच्या छातीवर डोकं घासत नकारार्थी मान हलवली . थोड्या वेळ ती त्याला तशीच पकडत रडत उभी होती. राज सुद्धा तिला पकडत, तिला बघत   शांत उभा होता.

" खुशी-खुशी कर दो बिदा तुम्हारी बेटी राज करेगी
महलों का राजा मिला के रानी बेटी राज करेगी
खुशी-खुशी कर दो बिदा तुम्हारी बेटी राज करेगी" .........

राहुल एकदम नाकातून सुरताल काढत गाणं म्हणत होता. तो इतका अजब गजब गाणे म्हणत होता की  रडता रडता नंदिनीला खुदकन हसू आले. रडता रडता ती हसत होती. ती तशीच राजच्या शर्ट मध्ये चेहरा खुपसत हसत होती. तिला असे खुदुखुदू हसतांना बघून राजला पण आता हसायला येत होते.
 

" मी काय सासरी चालली काय ??? " ....नंदिनी  राजच्या कुशीतून बाहेर येत डोळे पुसत हसत हसत बोलत होती.

" हा मग, रडत तर तू तशीच आहे, हे आमचं ध्यान सुद्धा सासरी येतांना येवढ रडणार नाही  ......" ... राहूल रश्मीच्या गालावर टिचकी मारत बोलला. .

" मी रडणारच नाही आहे . इतके छान घर आहे, रडत रडत येईल होय मी ??? नाचत गाजत, हसत धमाकेदार एंट्री करेल मी . तूच तयारी करून ठेव रडायची " ....रश्मी सेम राहुलच्या गालावर टिचकी मारत बोलली.

तसे सगळे हसायला लागले. 

" मी का रडू , मी रडत नसते "....नंदिनी नाक वर ओढत फुरफुर करत बोलत होती.

" हो माहिती, रडवत असते ते ...शेंबडी ...." ..राहुल

" ये शेंबडी कोणाला म्हणातो , स्वताला बघ , सतत आश्ची  उष्ची करत असतो ते.... अन् किती भंकस गातो रे तू ...." ..नंदिनी

"ओरिजनल है अपना......" ..राहुल

त्याच्या बोलण्यावर सगळे हसायला लागले.

" By the way, तू उद्या जातांना पण अशीच रडणार आहे काय???? नाही म्हणजे बकेट्स वैगरे घेऊन जाऊ सोबत, नाहीतर पुर यायचा विमानतळावर " ...राहुल

" सांगितले ना मी रडत नसते ते ...." ...नंदिनी

" चल लाव बेट, मी म्हणतो तू रडशील उद्या " .... राहुल

" तू हरशिल आहे , मी रडणार नाही " ....नंदिनी

" तू हरशिल ..." ...राहुल

" तू...." ... नंदिनी

" तू......" ....राहुल

" अरे बस बस , किती भांडता लहान मुलांसारखे " ....रश्मी

" लहानच आहेत ते , ते हॉस्पिटल मध्ये असतात ना , पळण्यामध्ये तसे ...." ..राज

" राज ....शी बाबा तू पण सुरू झाला ......" ... नंदिनी

" राज ..... शी बाबा तू पण सुरू झाला ...." ...राहुल

" राज, याला सांग हा ......" ...नंदिनी

" राज , हिला सांग हा ....." ... राहुल

" राहुल , इरिटेट नको करू.....' ...नंदिनी

" तू करते आहेस......." ...राहुल

" मी नाही, तू करतोय ....." ..नंदिनी

" तू करते आहे, ड्रामा क्वीन " ....राहुल

" हा?? ड्रामा क्वीन ??? मी ड्रामा क्वीन आहे ?" ..... नंदिनी, नंदिनी राहुलला मारायला त्याच्या मागे धावली. तो पण पुढे पळायला लागला . झालं त्यांचे आता असाच खेळ सुरू होता. त्यांना बघून रश्मीने डोक्यावर हात मारून घेतला. राज त्या दोघांची मस्ती एन्जॉय करत होता.

पळता पळता राहूल जागेवर थांबला ... नंदिनी पण त्याच्या पुढे येत थांबली. दोघेही एकमेकांना बघत होते.

" But I will miss you re ......." ... राहूल

" Me too re ....." नंदिनी राहुल जवळ जात त्याला मिठी मारली. त्याने पण तिला आपल्या कुशिमध्ये घेतले.

" Amazing relationship  " ..... त्यांना बघत रश्मीच्या तोंडून शब्द बाहेर पडले.

*****

नंदिनीचे सगळे पॅकिंग वैगरे नीट झाले होते. रात्रीचे जेवण वैगरे आटोपून नंदिनी आणि घरातले सगळे गप्पा गोष्टी करत बसले होते.

" डोकं दुखतेय काय बाळा ???" .... नंदिनीची आजी हातात  तेलाची वाटी घेत राजच्या रूम मध्ये आल्या. राज काऊच वर डोक्याला हात लावत दाबत बसला होता.

" आजी, अग बस . नाही ग इतकं काही नाही , असेच आपले " ....राज

" ह्मम , स्वतःला होणारा त्रास कधीच सांगायचा नाही ना ?? " ...आजी

" अग असे काही नाही ...." ...राज

" तुझं चेहराच सांगतोय, किती थकला आहेस रे बाळा  , खाली पण बसला होता तर लक्ष नव्हते तुझे कुठेच. ये डोक्याची तेलाने मालिश करून देते , बरे वाटेल आहे " .... आजी

राज आजीच्या पुढ्यात तिच्या पायाजवळ खाली येऊन बसला. आजी तेलाने त्याच्या डोक्यावर मालिश करत होती.  त्याला खूप रिलॅक्स वाटत होते.

" राज, वाईट वाटते आहे ना ती जात आहे म्हणून ?? " ... आजी

" ह्मम ..... आता सवय राहिली नाही ना तिच्या शिवाय राहण्याची " ....राज

" मग का जाऊ देतो आहेस??? तू नसती परवानगी दिली तर ती गेली सुद्धा नसती.   इतकी तर ओळखतेच मी तिला .  चिडली असती, रागावली असती पण झाली असती नंतर शांत ."   ... आजी

"  आजी तिची मनापासून जायची इच्छा होती. काय तर तिने फक्त सहा महिने तर मागितले आहेत ना , आणि वाईट किंवा चुकीचे असे काही करत नाहीये ती , चांगलेच करतेय . होऊ दे तिच्या मनासारखे  . तिला हक्क आहे ना तिच्या आवडीने तिचं आयुष्य जगायचे . " ... राज

" बाळा , तिला तुमच्या लग्नाचे सत्य सांग आता. सांग तिला तुझं किती प्रेम आहे तिच्यावर . आता उशीर नको करू . आता ती समजदार झाली आहे. थोडा त्रास होईल तिला, पण नंतर ठीक होईल " .... आजी

" कोणाला काय त्रास होतो आहे ????" ...नंदिनी बोलतच राजच्या रूम मध्ये आली.

" काही नाही, अश्याच आमच्या गप्पा सुरू आहेत " ...राज

" Wow तेल मालीश , मला पण करायची , आजी मला पण करून दे " ....नंदिनी राजच्या जवळ जात बसली.

" त्याची होऊ दे, मग तुझी करते " ....आजी

" आधी मला ...." नंदिनी ,आणि बसल्या बसल्या त्याला धक्का देत होती.

" नाही मला, मी आधी आलोय " ..... राजला उगाच तिची मस्करी करायचा हुरूप आला.

" माझी आजी आहे " ....नंदिनी

" माझी पण आजी आहे . " ....राज

" माझी जास्ती आहे. " ..... नंदिनी

" मी तुझ्या चार वर्ष आधी आलो , म्हणून माझी जास्ती आहे " ....राज

" हा , हा तर काही जोश मध्ये दिसतोय आज ... हार मानायला तयार नाही . राहुल घुसला की काय याच्या अंगात ??" .... नंदिनी त्याच्याकडे बघत मनातच विचार करत होती.

" आजी sss .... बघ ना हा , हे बघ उद्या मी जाणारच आहे ना , उद्यापासून तू हव तर दोनदा कर " .,.नंदिनी

' उद्या मी जाणार आहे '  , ऐकून तो चुपचाप बाजूला सरकला.  ती सरकतच आजी जवळ येत त्याला चीपकुनच बसली .

" किती त्रास देते ग त्याला ??? तो ऐकतो म्हणून किती त्रासवायचे??? " ..... आजी

" आजी , गंमत केली ग , घे बाबा तुझं होऊन जाऊ दे आधी, आजी ला राग येतोय माझा " ...नंदिनी बाजूला सरकत बोलली.

" आजी, तिचं होऊन जाऊ दे आधी, मग मला लाऊन दे " ...राज नंदिनी सरकत होती तर तिचा हात पकडत तिला थांबवत बोलला.

" नाही तू लाव, तू खूप थकला वाटतो आहे  , आजी याला लाऊन दे " ...नंदिनी

" मनानं थकला .....".  ...आजीने राजच्या डोक्यावर थोडे तेल ओतले आणि त्याच्या केसंमधून हात फिरवत होती.

" म्हणजे ??? राज , तू ठीक आहेस ना ??? " ...नंदिनी त्याच्या कपाळाला हात लावत बोलत होती .

" काही नाही चिमणे , मी ठीक आहो  ....." ..त्याने हसुन उत्तर दिले.

तिघांच्या पण गप्पागोष्टी छान सुरू होत्या. आजी नंदिनीला काय करायचे, काय नाही ते त्यांच्या परीने सांगत होत्या. नंदिनी राजचा हात आपल्या हातात घेत त्याच्या बोटांसोबत , हातासोबत खेळत  ' ह्मम ह्मम' करत होती.  बोलता बोलता कधीतरी नंदिनीची मान राजच्या खांद्यावर पडली. त्याचा हात मात्र तिने घट्ट पकडून ठेवला होता.

" झोपली वाटते???" ... आजी

" हो ....." ... आता त्याने तिचा हात आपली हातात धरून घेतला होता .

"  काळजी आहे तिला तुझी . ". ...आजी

" हो ग .... " ...राज

" किती दिवस असा राहशील ??? तुझी बायको आहे ती . कळू दे तिला " ...आजी

"  तिला तिच्या भावना कळू दे आजी. " .... राज

" इतके दिवस झालेत , आतापर्यंत तिला कळायला हव्या होत्या. " ... आजी

" ती थोडी गोंधळली आहे ग  , म्हणून तिला कळायला उशीर लागतो आहे . तिचा तरी काय दोष यात?? बघ ना आतापर्यंत मी तिच्या आई वडिलांच्या भूमिकेमध्ये होतो. तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळत होतो. जो आतापर्यंत वडीलधाऱ्या रुपात, मित्राच्या रुपात होता त्याला अचानक प्रियकर , नवरा म्हणून स्वीकारणे , त्या नजरेने बघणे खूप कठीण आहे. तिचे तिच्या भावनांसोबत द्वंद सुरू आहे. तिच्यासाठी हे सगळं सोपी नाही आहे. तिला तिचा वेळ देऊया. " ...राज त्याच्या खांद्यावर निर्धास्तपणे झोपलेल्या नंदिनिकडे बघत बोलत होता.

" पण किती दिवस वाट बघणार आहेस ??,  सांग  तिला तुझ्या भावना , आता उशीर नको जास्ती . तुमचं वैवाहिक जीवन बघायचे आहे आम्हाला. आता वय होत आले आमचे. पतवंड कधी बघतोय असे झाले आता. " ....  आजी

" कठीण आहे हा तुम्हा मोठ्या लोकांचे , डायरेक्ट पतवंडावर पोहचता तुम्ही " .... राज

" हो मग, तुझा परिवार पूर्ण झालेला बघायचा आहे. मला माझा राज सुखी झालेला बघायचा आहे " ....आजी

" हो , बस आता ही सहा महिन्यांची वाट , नंतर मी तिला माझ्या भावना सांगणार आहो. आता जाऊ दे तिला, नाहीतर द्विधा मनस्थिती असेल तिची . मोकळेपणाने राहू देत तिला. ती आली की वेळ न घालवत लगेच तिला आमच्या नात्यांबद्दल  सांगणार आहो, तिच्यासमोर मी माझं प्रेम कबूल करणार आहे. " ...राज

" छान . चला काहीतरी ऐकले तू , यातच मला समाधान आहे. " ....आजी

" हो ..." ...राज

" डोकं दुखायचे कमी झाले आता ??? " ...आजी

" हो, बरे वाटते आहे " ...राज

" ठीक आहे , तू पण झोप आता . जागू नको जास्ती . " ....आजी तिथून उठत बोलल्या.

" हो , नंदुला झोपवतो  तिच्या रूम मध्ये , आणि झोपतोच आहे. " .....राज

"  आता उचलून घेऊन जाऊ नको , तुला पण ठीक वाटत नाही आहे .... इथेच झोपू दे तिला ,." .....आजी बोलतच बाहेर जात रुमचे दर बंद करून गेल्या.

नंदिनी त्याला पकडून त्याचाजवळ  झोपली होती, त्याला तिला दूर करायची इच्छा तर नव्हती होत , पण तसे बसल्या बसल्या पण झोपल्या जाणार नव्हते. तिला उचलून घेत राजने तिला बेडवर नीट झोपवले. तो सोफ्यावर जाऊन झोपला. तिला बघता बघता केव्हातरी पहाटे तो झोपी गेला.

******

" नंदू झोपू दे ..." ... शरू डोक्यावर उशी घेऊन कड बदलून परत झोपला. नंदिनी  त्याला उठवत होती.

" किती झोपतो आहे रे , उठ ना आता . ऑफिस साठी उशीर होईल ?" ... नंदिनी . नंदिनीची शरू च्या मागे बडबड सुरू होती, पण शरू डोक्यावर उशी घेऊन तिच्या बोलण्याकडे काहीच लक्ष न देता झोपला होता.
" हा असा उठणार नाही " ...... विचार करतच नंदिनी त्याच्या जवळ जाऊन बसली . तिने अलगदच त्याच्या चेहऱ्यावरची उशी बाजूला केली.  आणि तिचे ओले केसं त्याच्या चेहऱ्यावरून अलगदपणे मोरपीस फिरवावे तसे फिरवत होती. नंदिनी नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती . बघते तर शरू झोपला होता. आवाज देऊनही उठत नाही बघून ती त्याच्याजवळ जाऊन बसली होती आणि त्याच्या खोड्या काढत होती.

तिने नुकतीच आंघोळ केली होती,  चंदन रोजचा मंद मंद गंध  पसरला  होता. तिच्या बांगड्यांची होणारी खणखण , मधुर संगीत त्याचा कानी पडत होते. तिच्या मुलायम केसांचा होणारा थंड स्पर्श त्याला रोमांचित करत होते. तिच्या लक्षात सुद्धा येणार नाही इतका फास्ट त्याने त्याची कड पलटत , एक हात तिच्या कंबरेमध्ये घालत तिला स्वतः कडे ओढले. नंदिनी त्याच्या अंगावर जाऊन पडली,  दोन्ही हातांनी पकडत तिने तोल सावरला होता. तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्याला मानेला स्पर्श करत होते. तिचे लांब मंगळसूत्र त्याच्या छातीवर त्याला गुदगुल्या करत होते.

फिक्कट आकाशी झिरझिरीत साडी, सारखेच स्लिव्हलेस ब्लाऊज , कपाळावर छोटीशी चंद्रकोर , हिरव्या डोळ्यात काजळ , लाल चुटुक नाजूक ओठ , ओले केस त्यातून टपटपनारे  पाण्यांचे मोती , सगळंच त्याला वेड लावत होते .... तो तिला बघण्यात गुंग झाला होता.... तो पण झोपून उठलेला, केस विस्कटलेले , डोळ्यात चमक आणि ओठांवर गोड हसू ,  भयंकर गोड दिसत होता. ती पण त्याला बघण्यात हरवली होती.

" उशीर होतोय ..."...नंदिनी एकदम हळू आवाजात बोलत होती.

" नाही...." .... शरूने पण त्याच आवाजात उत्तर दिले.

" दार उघडं आहे " .....नंदिनी

" असू देत "...... शरू

" कोणी बघेल " ....नंदिनी

" बघू देत. " ..... शरू

" कोणी येईल " .....नंदिनी

" येऊ देत " ..... शरू

" ऑफिस ??" ....नंदिनी

" सुट्टी "..... शरू

" कशाची??" ..... नंदिनी

" आज रोमान्स डे " ..... शरू

" शरू sssss" ...... नंदिनी

" नंदू ssss ...." ... शरू

" शरू sss...." ... नंदिनी

" I love you ???????? " ..... शरू

" तू बदमाश झाला आहेस " ...नंदिनी

" मी काय केले " ... शरू

" तुला हेच सूचतेना , 24*7. ??" .... नंदिनी

" मला बरंच काही सुचते आहे ,  ...... " ... शरू

" काय .....??" ...नंदिनी

" Shssss  " ...... शरू

तिचे केस ओले असल्यामुळे काही चुकार बटा तिच्या गालाला, कानाजवळ मानेला चीपकल्या होत्या.  एका हाताने तिला कंबरेमध्ये घट्ट पकडून ठेवत दुसऱ्या हाताने तिच्या गालावरचे केस तो मागे सारायला लागला . एक एक केस तो मागे सारत होता. त्याच्या त्या होणाऱ्या स्पर्शाने तिचे गाल आरक्त झाले ,  तिच्या हार्ट बिट्स वाढल्या होत्या, पोटात फुलपाखरं उडताय तिला वाटत होते. तिच्या मानेला मागून  पकडत  तिला हळूहळू स्वतःजवळ घेत होता . 

त्याच्या डोक्यातला खट्याळ विचार तिला कळला होता , " तू डांबिस झाला आहेस " ..... नी हसतच त्याच्या छातीवर त्याच्या शर्टमध्ये तिने आपला चेहरा लपवला . तिला असे लाजत हसतांना बघून त्याला सुद्धा हसू आले . आपले दोन्ही हात तिच्या भोवती घट्ट करत त्याने तिला मिठीत घेतले.
 

" वाह यार नंदिनी, काय नशीब आहे , आजकाल सकाळी उठले की राजचा हा लोभस चेहरा दिसतोय .... " ... नंदिनी आळोखे पिळोखे घेत उठली तर समोर सोफ्यावर राजला झोपलेले बघून ती मनातच बोलत होती.

" अरे , ही तर राजची रूम दिसत आहे , मी इथेच झोपली वाटते..." ... विचार करतच तिला रात्रीचे आठवले.

ती खडबडत उठत राज जवळ येत त्याचाजवळ येऊन बसली, तर राज झोपेतच हसत होता . त्याला बघून तिचा पण ओठांवर हसू उमलले.

" स्वप्नात दिसतंय ध्यान " ....मनातच विचार करत  मानेला हात लावत ताप वैगरे आहे काय बघितले. रात्री तो तिला  थोडा अस्वस्थ वाटला होता.  ती त्याचा ताप चेक करत होती तेवढयात त्याने तिचा हात पकडला .

" नंदू , जाऊ नकोस ...." .... तो झोपेतच बोलला .

" काय???" " ..... ' नंदू'  ऐकून तिला थोडे अजब वाटले. तिच्या आवाजाने तो एकदम जागा झाला, नी उठून बसला आणि तिच्याकडे अजब नजरेने बघत होता.  

" अरे यार, स्वप्न होते ......" मनातच खट्टू होत  त्याने त्याच्या केसंमधून दोन्ही हात फिरवले. 

" सकाळ झाली पण ?".... राज

" हो , कधीच . काय रे स्वप्न बघत होता काय??? आताच हसत होता, नी आता काय असे तोंड पाडून बसला?? जसेकाही काहीतरी हरवलंय" ...नंदिनी

" नाही ग ... असं काही नाही . खूप वेळ झाला ना , म्हणून " ...राज

" कोणाला बघत होता स्वप्नात?" ..... नंदिनी खूप उत्साहाने विचारात होती.

" तुला ....." ....राज

" काय रे , कधीतरी खरं सांग ?" .... नंदिनी

" माझ्या बायकोला ......." ... राज

" खरंच ???" " ....नंदिनी

" हो ...... " ...राज

" काय करत होतास?" .....नंदिनी

" नंदिनी , हे काय प्रश्न विचारते आहेस.... चल उठू दे , आधीच खूप उशीर झाला आहे " .... राज अंगावरचे पांघरुण बाजूला सारत उठला.

" हो हो, मला पण आवरायचं आहे . आज निघायचे आहे ना .... वेळ कमी आहे ".... नंदिनी बडबड करत आपल्या रूम मध्ये पळाली.

" Hope , my dream will come true soon ....." ... राज तिचा कडे बघत उभा होता.

******

" सगळं नीट घेतले आहे ना सोबत ???" ....निती

" हो ......." ....नंदिनी

" बरं , बस इथे  हळद कुंकू लावते आणि औक्षण करते " .... नीती

" ओके बॉस ...." ...नंदिनी चेअर वर बसली.
आई नीतीने तिचे औक्षण केले, तिला दहीसाखर खाऊ घातले. नंदिनीने सगळ्यांना वाकून नमस्कार केला..सगळ्यांना हग केले.

" लवकर या परत , आणि थोड्या मोठ्या होऊन या " .... आजीसाहेब

" मोठी म्हणायचं की मोटी. ???" ...राहुलने मस्करी केली.

" दोन्ही चालेल ...." ....निती

" मोठी ठीक आहे, पण मोटी इकडे चालेल काय??" ...राहुल राज कडे इशारा करत मस्करी करत होता.

राज आपले दोन्ही हात खिशात घालून चुपचाप उभा नंदिनीला बघत होता. तो खूप शांत होता.

" राजला काय प्रोब्लेम असेल आहे ?? अन् मी काय मोटी होणार आहे काय???" ... नंदिनी

" हा मग, तिकडे हे पिझ्झा बर्गर खाऊन आणखी काय होत???" ...राहुल

" मी जशी जाते आहे , तशीच परतणार आहे .... तू आपली काळजी कर , लग्न जमाल्यापासून चार किलो वाढलेय तुझे..." ...नंदिनी , नंदिनी आणि राहुलची परत जुंपली.

" अरे बस बस, तिकडे उशीर व्हायचा " .....काकी

" तुला नंतर बघते रे ......"  ,नंदिनी

" आजीसाहेब , करलो जितना एन्जॉय करणा है , छे महिने बाद फिर अपणी जुगलबंदी काँटिन्यु करेंगे .." ..म्हणत ती आजिसहेबांच्या गळ्यात जाऊन पडली.

" खूप काही करायचे आहे, या लवकर. खुश रहा  " ... आजीसाहेब तिच्या पाठीवर थोपटत बोलल्या.

" आबा तब्बेतीची काळजी घ्या, औषधांच्या वेळा चुकाऊ नका . आणि आजिसहेबांना मी नसल्याची कमतरता भासू देऊ नका, जमके फाईट करना.." ...ती आबांच्या कुशीत गेली.

" आजी आबा , काळजी घ्या तुमची. आणि काहीपण लागले तर राजला सांगा . " ..ती तिच्या आजी आबांजवळ त्यांच्या कुशीत गेली.

" आमची नको काळजी करू, सगळे आहेत इथे. तुझी काळजी घे बाळा. " ... आबा

एक एक करत तिने सगळ्यांचा निरोप घेतला.  ती हसत बोलत असली तरी तिचे डोळे मात्र खरं काय ते बोलत होते.
डोळ्यांतील उदासी आणि चेहऱ्यावरचा आनंद, ओठांवरील हसू या सगळ्यांची सांगड घालण्याचा तिचा प्रयत्न राज बघत होता. 

" येते मी ....." ...नंदिनी घरा बाहेर पडत होती तर सगळे तिच्यासोबत बाहेर येत होते. .

" तुम्ही सगळे कुठे??" .नंदिनी

" एअरपोर्ट वर " .... काकी

" काय???" ....नंदिनी

" हो मग, तुला पोहाचावयाला " ...काका.

" राज, राहुल येतोय, रश्मी आहे सोबत ......." ...नंदिनी

" आम्ही पण येतोय ...." ....काकी

" अरे तिथे आतमध्ये पण जाता नाही येत. दोन तास जाणे , दोन तास येणे, आजी आबा सगळ्यांना त्रास होईल उगाच . तुम्ही कोणी येणार नाही आहात. घरीच राहायचं. " ....नंदिनी

" अरे पण ...."

" अरे नाही आणि का रे नाही.... ऐकायचे माझे...आणि घरी राहायचं .... माझं चेक - इन वैगरे सगळं आटोपले की मी व्हिडिओ कॉल करेल आहे . " ..... नंदिनी

" बरं , तू म्हणशील तस " .....निती .

" यू गयी अँड यू आयी..... Take care you all ssss " .... ओरडतच ती घराबाहेर पडली.

" तू मुद्दाम त्यांना येऊ नाही दिलेले ना, कारण तुला माहिती होत तुला जायला त्रास झाला असता??" ...राहुल

" ह्मम ....... " ....नंदिनी

एका मोठ्या गाडीत राहुल ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला, बाजूला रश्मी बसली. राजने नंदिनिसाठी गाडीचे मागचे दार उघडले. नंदिनीने एकदा त्याच्याकडे बघितले आणि आतमध्ये जाऊन बसली. राज पलीकडून येत तिच्या बाजूने बसला. राहुलने गाडी सुरू केली. सगळेच शांत बसले होते. सगळे शांत बघून रश्मीने शांतता भंग करत काही टॉपिक सुरू केले. आता नंदिनी , रश्मी आणि अधूनमधून राहुल बोलत होते. राज मात्र शांत बसला नंदिनीला बघत होता. त्याचे मन खूप अस्वस्थ होते, पण तो चेहऱ्यावरून एकदम नॉर्मल आहे दाखवत होता.

सगळे एअरपोर्टवर पोहचले. राहुलने ट्रॉली आणत नंदिनीचे सगळे सामान गाडीतून आनलोड करत ट्रॉली वर ठेवले..

" Wait " .... नंदिनी दार उघडतच होती की राजने तिला थांबवले आणि बाहेर आला, तिच्या साइडला जात तिच्या साईड चे दार उघडले. चेहऱ्यावर गोड हसू आणत त्याने तिच्यापुढे आपला हात दिला.

" ओहो, स्पेशल ट्रीटमेंट  ...." ... राहूल

" आहेच ती माझी स्पेशल प्रिन्सेस  "....राज
नंदिनीने  हसतच त्याचा हातात आपला हात दिला.

" तुझे फ्रेंड्स ??" ...रश्मी

" हा पोहचले आहेत आतमध्ये " .....नंदिनी

" Okay , good .." ... राहूल

" नंदिनी , मन लाऊन शिक  , आणि खूप एन्जॉय कर . " ....रश्मी

" हो...... आणि तुला माझी जागा घ्यायची आहे . घरी सगळ्यांची काळजी घे , आणि कोण काय ऐकले नाही ना मला कळव.  " ....नंदिनी

" हा , डॉन भाई को सब बताना क्या ...." ..राहुल

" हो आणि महत्वाचं म्हणजे या राहुल्याला खूप म्हणजे खूप पिडायच , अगदी मनसोक्त  .... " ....नंदिनी

" बिघडवं हा तू माझ्या मारक्या म्हशीला , सोडणार नाही तुला " ....राहुल

" ये ssss .......म्हसोबा....." ...रश्मी ..
तसे तिघेही हसायला लागले.

" बरं , नंदिनी , उशीर होईल, तुझे फ्रेंड्स वाट बघत असतील " ...राहुल. त्याचा या वाक्याने नंदिनी आणि राज दोघांचेही कंठ खूप दाटून आले होते.

नंदिनी ने रश्मीला हग केले , नंतर राहुलच्या गळ्यात पडली.

" या आपल्या बोक्यांबोकडे लक्ष ठेवशील " ..नंदिनी राहुल ला हग करत त्याच्या कानात बोलत होती.

" हो, तुझी काळजी घे तू" .... तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो बोलला.

नंदिनी राज जवळ गेली  .

" राज, माझी काळजी करणे सोड आता, स्वतःसाठी जग .. एन्जॉय कर ...." तिचा आवाज कापरा झाला होता.

" आता रडणार आहेस तू???"...राहुल

" नाही......" ..म्हणत तिने आपल्या मनाला आवरले, आणि  राजला हग केले.... राजने पण तिला मिठी मध्ये घेतले.

" खुश रहा " ...बोलतच त्याने तिला आपल्याजवळ घट्ट पकडले.  त्याला पण तिला हसत बाय करायचे होते, त्याचे मन खूप दाटून आले होते, बोलाव तर खूप वाटत होते , पण ओठातून शब्द निघत नव्हते. कसेबसे त्याने स्वतःला सावरून धरले होते. हे दोनच शब्द कसेबसे तो बोलला होता.

राजपासून दूर होत तिने आपली ट्रॉली पकडली , हात हलवत बाय करत ती पुढे जाऊ लागली.

तिला पुढे दूर  जातांना बघून राजने  आतापर्यंत रोखून ठेवलेल्या त्याच्या भावना नकळत त्याच्या डोळ्यात जमायला लागल्या होत्या. त्याने त्याच्या खिशातला गॉगल काढला आणि डोळ्यांवर लावला. आणि तिला बघत होता.

नंदिनीने  राहुल सोबत न रडण्याची बेट लावली होती म्हणून ती स्वतःला कसेबसे सावरत पुढे पुढे जात होती. पण आता मात्र तिचे मन खूप भरून आले होते, आपोआप डोळे वाहू लागले.  तिच्या भावना तिला आता सांभाळता येत नव्हत्या... ट्रॉली तिथेच ठेवत ती वळली आणि पळतच येत राजच्या  गळ्यात पडली , त्याच्या मानेजवळ घट्ट पकडत , आपल्या टाचा उंचावत त्याच्या गालावर छोटेसे किस केले.  तिचे असे करतांना बघून त्याला खूप गहिवरून आले होते. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती . आताच तिला आपलं प्रेम सांगावे, तिला आपल्या बाहुपाशात घेऊन आपले मन शांत करावे असे त्याला वाटत होते. पण वेळेचे आणि आपण पब्लिक एरियामध्ये आहोत याचे भान ठेवत  त्याने स्वतःला शांत केले.   .तिचे असे अचानक किस केलेले बघून त्याला जुने दिवस आठवले, जेव्हा तो पहिल्यांदा अमेरिकाला जाणार होता , तेव्हा तिने त्याला पाहिले किस केले होते. डोळ्यात पाणी ओठांवर हसू अशी त्याची स्थिती झाली होती . डोळ्यांची उघडझाप करत त्याने डोळ्यातले पाणी डोळ्यातच आटवले .

"  आयुष्यात पुढे जा ..... प्रेम कबूल कर आपले, तिला आपल्या आयुष्यात घेऊन ये  ......स्वतःच्या प्रेमासाठी जग......स्वतः साठी जग....." ...नंदिनी त्याच्या गालावर हात ठेवत बोलत होती. तो हसला.

" वाट बघतोय तुझी ......" तिला परत आपल्या मिठीतमध्ये घेत तिच्या कपाळावर किस केले. आता तिला तिचे मन थोडे हलके वाटत होते.

त्या दोघांना बघून रश्मीचे डोळे पाणावले. राहुलने तिला आपल्याजवळ घेतले.

"Love you all ......." ... आपल्या दोन्ही हातांनी  फ्लायिंग किस करत  नंदिनी ओरडतच पुढे गेली. एकदा मेन गेट मधून परत एकदा मागे वळून बघत हात उंचावत बाय करत एक मोठी स्मायल देत ती तिची ट्रॉली आतमध्ये घेऊन गेली.

" आता मला कळते आहे , मी जात होतो तेव्हा तुला किती त्रास झाला होता माझ्या राजा...... जाणारा   नवीन स्वप्न सोबत घेऊन जातो, पण मागे जो उरतो तो फक्त वाट बघत असतो.....आणि वाट बघणे किती पेन्फुल असते ते कळते आहे मला आता..... सॉरी सोन्या .... खरंच खूप खूप सॉरी ..... तुला एकटं सोडून गेलो होतो...."  ती दिसेनाशी होयीपर्यंत राज तिथेच उभा तिला बघत होता, आणि दोन अश्रू त्याच्या गालांवर ओघळलेच.

******

क्रमशः

*******

*प्रजासत्ताकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!"

 

आभार : ही कथा पुढे लिहायला अनुमती दिल्याबद्दल ईरा टीम चे खूप खूप आभार !!!! 

 

 

नमस्कार मित्रांनो

सगळ्यात आधी सॉरी, कथा पोस्ट करायला उशीर झाला . पण मुद्दाम नाही करत असे... जशी लिहून झाली तशीच लगेच पोस्ट करत असते. तुम्हाला वाट बघावे लागते त्यासाठी खूप वाईट वाटते, पण मी खरंच मुद्दाम नाही करत असे.काहीतरी कारण येतात आणि कथा लिहायला उशीर होतो. तुमचा त्रास मला कळतेय, पण कधी कधी नाईलाज होतो माझा .... आपल्याला वाटत असेल लेखिका खूप भाव खाते आहे , आगाऊ आहे ....पण खरंच असे नाही आहे.... मला स्वतःला आवडते कधी कधी पार्ट पोस्ट करतोय आणि कधी कधी रिप्लाय बघतोय....जसे तुम्ही म्हणालात ना की नेक्स्ट पार्ट आला बघ्याला खूपदा साईट ओपन करता, तसेच आमचे सुद्धा होते, पार्ट टाकला की किती लाईक्स आलेत, कोणी केलेत, किती कॉमेंट्स आलीत ... खूप उत्साहाने बघत असतो. कॉमेंट्स मधून तुमचा राग दिसतोय माझ्यावर....पण तुमची कॉमेंट्स मी खूप positively घेत असते..... जे पण वाटते आहे ते बेधडक बोला, चुकांमधून च शिकायला मिळते. 

नेक्स्ट पार्ट लवकरात लवकर पोस्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, येवढेच सांगू शकते. 

 

हा पार्ट २ ३ पार्टस तेवढा मोठा टाकला आहे....कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद..... 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️