Login

नंदिनी...श्वास माझा 64

राज नंदिनी

भाग 64

" नंदिनी , अग बारा वाजत आले,  जागी आहे अजून, राहिलेले बाकी काम उद्या कर ..." ....राज , नंदिनी तिच्या रूममध्ये दिसली नाही म्हणून शोधत खाली आल होता. तर नंदिनी काही काम करत होती.

" झोपच नाही येत आहे , बघ ना किती कामं राहिली आहेत...राहुलचा साखरपुडा बेस्ट झाला पाहिजे, काहीच कमतरता नको राहायला ... तर तेच बघत होते. परत पाहुणे येतील ,मग नाही वेळ मिळणार हे सगळं करायला . " ....नंदिनी , नंदिनी काही घरातले इंटरिओर बघत काही चेंजेस करत होती.   खाली चटई वर बसून काही गिफ्ट वैगरे पॅकिंग करत होती, खूप पेपर वैगरे पण पसरून ठेवले होते . पण खूप मन लाऊन , सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेत ती सगळं काम करत होती.  बेबी पिंक लूज टीशर्ट, सेम कलर चा मिकी मिनी माऊस डिझाईन असेला पायजमा , केसांचा मेसी बन, त्यातून दोन चार केस बाहेर येत तिच्या मानेसोबत खेळत होती. कानामागे केसात फसवलेली पेन्सिल . राजला ती खूप गोड वाटत होती.

" तुला इतकं काम करायची काय गरज आहे??? कोणाला सांग, करतील ते. इतके टेन्शन का घेते आहे ?? " ... राज

" कोणाला कशाला ??? माझं घर आहे ना ... मला माहिती माझं घर कासू सुंदर दिसणार, दुसऱ्यांना काय माहिती आपल्या घरात कोणाला काय आवडते, कसे आवडते, सगळ्यांच्या आवडीप्रमाणे घर असायला हवे ना ... आणि टेन्शन नाही रे , तसेही तर जास्ती काही येत नाही, मग जे येते ते तरी करू दे ना ??? आवडते मला आपल्या घरात काम करायला. एकदा तिकडे गेले की कोण काम सांगणार आहे ??" ..... नंदिनी , राज ला तिच्या बोलण्याचे कौतुक वाटले आणि आनंद सुद्धा झाला.

" बरं बाबा कर, तुला जे आवडते ते कर...मला पण सांग काय करू ते  " .... राज तिच्याजवळ जात , खाली बसत तिचे गाल ओढत बोलला. ती इतकी गोड भासत होती त्याला, की तिचा लोभ केल्याशिवाय त्याला राहवले नाही.

" आऊच......राज मी लहान आहे काय आता ...." ..... नंदिनी आपले गाल चोळत बोलत होती

" माझ्यासाठी तर आहेच, माझी गोलुडी , पिल्लुडी चिमणी.... लहानपणी तुझे गाल खूप गोबरे मऊ मऊ होते...तेव्हा पण मी असाच ओढायाचो तुझे गाल.....नुसता बोट जरी लावला ना तर लाल लाल व्हायचीस..... " ....राज , बोलतांना त्याच्या डोळ्यामध्ये खूप चमक होती. नंदिनी त्याचे डोळेच बघत होती, बोलतांना त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद बघत होती.

" काय झाले??? अशी काय बघते आहे??" ...राज

" राज, मला  सगळ्यांची खूप आठवण येईल तिकडे. मला माहिती नाही मी कशी राहील . राहू शकेल ना मी ??" ......नंदिनी

"हो , तू खूप छान रुळशील तिकडे, don't worry... तुला माहिती तू जी स्वप्न बघते ना , ते पूर्ण करण्याची जिद्द आहे तुझ्यामध्ये, तू ते पूर्ण करणारच , त्यामुळे आठवण आली तरी तू जे ठानले आहे ते तू करशिलच ... सो तुला अवघड जाणार नाही, तू तुझ्या कामात इतकी बिझी होशील की तुला नाही येणार आठवण.आणि जर आलीच आठवण तर मला सांग ,  चोवीस तासात मी तिथे असेल, नाहीतर तू इथे असशील ..... Okay ..... " .... राज

" हो ...... " ....नंदिनी

"राज  मॅगी खाणार ??? भूक लागलीय, इतके काम करून जेवण केलेले सगळं पचल..." ..नंदिनी

" Okay , मी बनवतो " ..... राज , तिथून उठत बोलला.

" मी बनवते, तू खाणार काय विचारत होती " ... ती त्याचा हात पकडत बोलली .

" ओह हो , मला स्पेशल ट्रीट ची ऑफर आहे तर मग..." ..राज

" काय रे मस्करी करतो माझी, तुझ्यासारखे नाही येत स्पेशल काही बनवता... आपली साधीसुधी मॅगी " ... नंदिनी

" तुझ्या हातचं सगळं स्पेशल आहे, बनव , मग मी कॉफी बनवतो " .... राज

" Okay ....." ... नंदिनी उत्साहात किचन मध्ये गेली. तिने फ्रिज मधून काही भाज्या काढल्या आणि कापायला घेतल्या. राज तिथेच बाजूला टेबल वर बसला आणि एक बॉक्स गिफ्ट रॅप करायला घेतला, नंदिनी करत बसली होती त्यातलाच.

" राज , तो रंग नाही, तो तिथला पलीकडचा पिंक रंगाचा घे , मुलीचं गिफ्ट आहे ते " ..... नंदिनी भाजी चिरता चिरता राजकडे बघत बोलत होती.

" नंदिनी, तिकडे बघ......."

" आ sss........." नंदिनी कळवली . भाजी चिरता चिरता तिचे बोट कापलं गेले होते.

" Shit..... कापलं ना , म्हणतच होतो " ... राज जागेवरून उठत पळतच नंदिनी जवळ गेला आणि तीच बोट हातात पकडत बघत आपल्या तोंडात घातला... त्याचे तसे करतांना बघून नंदिनी कळवळायची थांबली, आणि त्याच्याकडे बघत होते. त्याच्याकडे बघून तिला असे वाटत होते की तिचे नाही त्याचेच बोट कापलं गेले आहे. त्याला बघून तीच दुखणं कुठल्या कुठे पळाले होते. तिला एकटक बघत असल्याचे बघून त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

"  काय गरज होती , मला सांगायचं असते ना , मी कापून दिल्या असत्या भाज्या. तुम्हा मुलींच्या ना डोक्यात एका वेळी दहा गोष्टी असतात, मग हे असच होणार ना ???? " ....राज बोलता बोलता, त्याने हळदीचा डब्बा उघडला , त्यातली चिमुटभर हळद घेतली आणि तिच्या बोटावर लावत बोट घट पकडून धरले... त्याचे रागावणे सुद्धा तिला खूप गोड वाटत होते .  नंदिनी त्याला बघत  त्याच्या डोळ्यात हरवली होती.

" नंदिनी प्रेमात तर पडलीय तू, फक्त स्वीकार कधी करशील ,त्याची वाट बघतोय ......" .....राज तिला असे हरवलेले बघून मनातच विचार करत होता.

" खूप दुखते आहे काय ??? " ......राज

" अह, तू जवळ असला म्हणजे दुखणं मंतर छु होत उडून जाते......" ......नंदिनी त्याच्या डोळ्यात हरवली होती.

तिचे बोलणे ऐकून त्याला हसू आले...

" कवियत्री मॅडम , तुमच्या बोटाला हळद लावली, म्हणून विचारात होतो " .....त्याला पण तिची मस्करी करायची इच्छा झाली होती.

" काय.......??? " ....नंदिनी डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती.

" ह्मम, हळद ....इथे "....तो तिचं बोट दाखवत बोलला.

हळद लावलेले बोट बघून आता नंदिनी ओरडायला लागली.

" खूप दुखतेय........ आ sss " .... नंदिनी आपल्याच बोटावर फुंकर घालत ओरडत होती.

" Sh sssss , ओरडते काय आहे, सगळे उठतील ना ... पाच सात मिनिट झालेत पण हळद लाऊन , नौटंकी......" ....त्याने एक हाथ तिच्या कंबरे मध्ये घालत तिला जवळ ओढत  पकडले, आणि एक हाथ ती ओरडत होती तर तिच्या तोंडावर ठेवत बोलत, इकडे तिकडे कोणी उठले काय बघत  होता. त्याने अचानक तिला जवळ घेतल्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली होती ,  तिला तर सुचेनासे बंद झाले  होते .

" ये नंदिनीचा आवाज होता ना हा ??? काय झालं , ती ठीक तर आहे ना ??" ...... रश्मी, रश्मी आणि राहुल फोनवर बोलत होते, तेव्हा तिला नंदिनीचा ओरडण्याचा आवाज ऐकू गेला होता.

" भारी तीक्ष्ण कान आहेत ग तुझे, फोन मधूनही तुला आवाज आला. Don't worry राज आहे तिथे तिच्या सोबत   "....राहुल

" अरे हो, पण झाले काय??? ती ठीक आहे ना ?" ....रश्मी

" ह्मम ,  किचन रोमान्स ........" .....राहुल

" काय ???? ....."...रश्मी

" किचन रोमान्स म्हणतात त्याला, किचन मध्ये आहेत दोघं " .......राहुल

"रोमान्स ??? आणि हा असा आरडाओरडा करत ??? अजब आहे " ..... रश्मी

" ह्मम , त्या दोघांचा असाच असतो . ते दोघच अजब आहेत, त्यांचं सगळंच अजब गजब असते .  " ... राहुल

" आणि तू काय करतोय तिथे ...?? त्यांना बघतोय ??" ... रश्मी

" मी का जाऊ तिथे???  मी इथे माझ्या रूम मध्ये आहो ...ते दार उघडं आहे म्हणून आवाज क्लिअर आला असेल " .....राहुल

" तू दार उघडं ठेऊन झोपतो ??? " ..... रश्मी

" हो..... दार बंद करून झोपायला बायको कुठे आहे इथे. बायको आली की करेल दार बंद  " ....राहुल

" चावट कुठला..... तुला फक्त चांस च हवा असतो ना बोलायला ??" ....रश्मी

" काय ती काही करू तर देत नाही, मग बोलूनच चावट पणा करतो...... अँड excuse me , माझं लग्न जमले आहे यार, मी आता नाही करणार तर काय म्हातारा झाल्यावर करणार काय चावटपणा ..... ते पण माझ्या बायकोसोबत करतोय   "....राहुल

" तू ना , फार बदमाश आहेस " ....रश्मी

" ह्मम, जसा आहो , तुझाच आहो आता ......" राहुल

राहुल आणि रश्मीच्या रोज रात्री बारा एक पर्यंत गप्पा सुरू असायचा , रात्रीच्या शांततेत नंदिनीचा ओरडण्याचा आवाज तिला फोन मधून गेला होता.

" नंदीनी चा आवजा येतोय , काय झाले रात्रीचे ....." ..स्वतःशीच बोलत नंदिनीची आजी उठत रूम मधुर बाहेर येत होत्या.

" काय झाले मावशी ??? काही हवे आहे काय ??" ... नीती राज ची आई, आजींना रूम मधून बाहेर येताना बघून बोलल्या.

" नाही, काही नकोय. ते नंदिनीचा ओरडण्याचा आवाज आला, काय झालं म्हणून बघायला जात होते "... आजी

" अच्छा ते होय, किचन मध्ये आहेत दोघं, काहीतरी खायचं बनवत असतील...झुरळ वैगरे काही दिसलं असेल, म्हणून ओरडत असेल ती. तुम्ही नका काळजी करू, राज आहे तिथे तिच्या सोबत. रोजचच असते बहुदा दोघांचं, नंदिनीला रात्री भूक लागते, मग तो काहीतरी तिच्या आवडीचे बनवत असतो . " ..... नीती

"काय...?? राजला बनवायला लावते ही कार्टी ? ?? हिने त्याचसाठी बनवायचे सोडून तो हिच्यासाठी बनवतो ??? थांबा तिची कानउघाडणी करते.........." ....आजी

" करू द्या हो.... काय फरक पडतो कोण करताय ते.... दोघं एकमेकांसोबत आनंदी आहेत, एकमेकांसोबत वेळ घालवत आहे , येवढे पुरेसे नाही काय ???  " ....निती

" अग ,पण राज तिचा नवरा आहे , तिने त्याला बनऊन खाऊ घालायला हवे , बायकोचे काम आहे ते " ..... आजी

" मावशी, अहो काय नवरा बायको घेऊन बसला आहात, आणि आता काही ही कामं मुलाची, ती कामं मुलीची असे नाही राहिले. आजकाल नवराबायको दोघं मिळून घर सांभाळतात .  ज्याला जे आवडते ते करू द्यावे , राजला तिला नवीन नवीन तिच्या आवडीचे बनवून खाऊ घालायला आवडते, आणि तिला राजच्या हातचे खायला. राजने बनवलेल्या साध्या सिंपल पदार्थ पुढे आपली पंच पक्वान्न ही कमी पडतात , नंदिनीला चॉईस दिली तर ती फक्त त्याच्या हातचे बनलेले खाईल , इतकं आवडते तिला त्याचा हातचे. " ..... नीती

" पण तो कामावरून येतो, थकला असतो , त्यात रात्री असं त्रास देणे .... बरे नाही वाटत " ....आजी

" थकला असतो तो, पण ती असली ना पुढे की एकदम फ्रेश होतो  . दोघं एकत्र वेळ घालवतात, एकमेकांच्या आवडीनिवडी जपतात, एकमेकांची काळजी घेतात, परिवाराची काळजी घेतात . मग हे सुनेने असे वागावे, मुलाने असे वागावे, कशाला हवे. त्यांची कर्तव्ये ते योग्यप्रकारे पार करतात आहेत, अगदी आनंदाने आणि प्रेमाने. नको सून, मुलगा, मुलगी तो भेदभाव. फक्त दोघे खुश आनंदी असावे, आणि लवकरात लवकर आपला संसार सुरू करावे , येवढेच इच्छा आहे आमची सगळ्यांची. बाकी त्यांना करू देत, जगू देत एकमेकांसाठी ..... तुम्हाला तर माहितीच आहे, तो वेडा आहे तिच्यासाठी ,तेवढीच एक भीती आणि काळजी वाटते त्याची. इतके निस्वार्थ, निरागस आणि पवित्र प्रेम आहे त्याचे की ,  त्याच्या प्रेमापुढे आम्हा सगळ्यांची हार होते बघा ."....निती

नीतीचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात पाणी तरळले...

" राज तर आहेच चांगला मुलगा, आमच्या आयुष्यात देवासारखा आला. पण तुम्ही सगळे खरंच खूप समजूतदार आहात , खूप सांभाळून घेता नंदिनीला . नाहीतर इतर घरांमध्ये कामं मधून , माझ्या मुलाला कामं का सांगितली या विषयावरून किती मोठे बाऊ होतात.... "... आजी

" मावशी , पिढी बदलते आहे, विचार बदलतात आहेत , कामं करायच्या पद्धती बदलतात आहेत......मग त्यात आपण आपलं जुने काय घेऊन बसायचे?? नव्याचे स्वागत नको करायला ??? आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत, पण ते चुकत नाही आहेत, आणि जुन्या चांगल्या गोष्टी विसरले नाही आहेत ..मला तर वाटते आपल्यापेक्षा पण जास्ती चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी हाताळतात आहेत.....मग का उगाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुरबुर करत घरातले वातावरण आणि क्रमाने दोघांमध्ये वाद निर्माण करायचे??? ती दोघं खुश आहेत ना एकमेकांसोबत ....मग काय फरक पडतो कोण काय करतंय??? कोण कोणाला खाऊ घालत आहे.... ".... नीती

" तुझ्यासारखी असेल ना सासू, कुठलीच सून दुःखी नसणार, आणि आनंदाने संसार करेल. बस देवाला प्रार्थना आहे त्या पोराची परीक्षा नको बघू जास्ती  .... ".... आजी

" मावशी , नका काळजी करू त्या दोघांची.... देवानं बांधली आहे त्यांची गाठ, त्यालाच काळजी आहे. आम्ही पण सगळे असेच खूप काळजी करत होतो, राजने समजावले तेव्हापासून त्याच्या प्रेमवर आणि तिच्यावर विश्वास ठेवत, सोडले सगळे. चला झोपू, ते दोघं आणखी दोन तास नाही झोपणार.....काहीतरी गडबड दिसतेय आज....." ...हसतच आजींना तिकडे बघा खुणावत निती बोलली. ..

नंदिनी आणि राज एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते .... ते बघून आजींना सुद्धा हसू आले.

" हो बाई, चल .....चालू देत त्यांचं " ..... दोघीही हसत आतमध्ये निघून आल्या.
 

" राज मी तुला खूप मिस करेल......खूप सवय झाली आहे तुझी ...... तुझाच दोष आहे सगळा, का इतके लाडावून ठेवले मला तू ...." ...... नंदिनी , राज तिची लहानातल्या लहान गोष्टीची इतकी काळजी घेतोय बघून तिला खूप भारावून आले होते.

" मी या चुका नेहमीच करत राहील...आणि मला कोणी अडऊ शकत नाही , तू पण नाही   ".....राज हसतच  तिच्या गालावर थोपटत बोलला.

" राज , मी तुला खूप त्रास देते ना ??? अगदीच वेळ काळ काहीच बघत नाही .... मनात येईल ते मागते , मनात येईल तसे वागते.... आज पण बघ ना , मला तुला काहीतरी बनऊन खाऊ घालायचे होते, पण सगळं उलटच झाले... तुजलाच माझ्यासाठी धावावे लागले. नेहमीच असे होते , तुला मदत करायला जाते, आणि सगळं वेगळेच होऊन बसते. पण मी मुद्दाम नाही करत राज, मुद्दाम नाही तुला त्रास देत , होऊन जाते ते, मला पण कळत नाही .... राज..... सॉरी ...... ." ....नंदिनी

" नंदिनी, सोन्या, सगळं ठीक आहे .... तू त्रास नाही देत .... आणि जर देत पण असशील तरी तू दिलेला त्रास मला आवडतो .... " ....राज

" I am all yours my sweetheart ... ...You can do anything with me ..It's all your rights.... I Love you my princess , my cutie pie ...." ... राज तिच्याकडे बघत मनात बोलत होता.

बऱ्याच वेळ पासून ती त्याचा जवळ  होती,  तो तिच्या क्यूट चेहऱ्याकडे बघत होता. तिचे ते हिरवे डोळे त्याचा मनाचा ठाव घेत होते. तिचे ते गुलाबी नाजूक ओठ त्याला वेडावून सोडत होते .  तिचं बोलणं त्याचा काळजाला भेदून जात होते. त्याला तिला जवळ घ्यायचा मोह होत होता... पण हा मोह आवरला नाही आता, तर मग स्वतःला आवरणे त्याला कठीण जाईल , विचार करतच त्याने तिच्या कांबरेमधला हाथ काढला आणि मॅगी बनण्यासाठी म्हणून कीचनकडे जायला वळला ...

" Will you miss me ??? " ...... नंदिनी

नंदिनीच्या त्या एका लाईन ने तो जागीच थंबला.

" कसं सांगू तुला,
तुझ्याशिवाय मी कसा जगणार ... माझ्यासाठी किती कठीण आहे ते .
कसं सांगू तुला , तू माझी जीव की प्राण आहेस ...माझं आयुष्य आहेस ....
कसे सांगू तुला, तू माझा श्वास आहेस .
कसं सांगू तुला, नाही ना जगू शकत तुझ्याविना ...." ... तो मनात बोलत होता.... ती दूर जाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात दोन अश्रू तरळलेच...

" राज, will you miss me ....... ? तुला माझी आठवण येईल काय ?? " .... राज काही बोलत नाही आहे बघून नंदिनी ने परत विचारले.

तिच्या प्रश्नाने भानावर येत , तो झरकन मागे वळला आणि , नंदिनीला काही कळायच्या आतच तिला करकचून मिठी मारली......त्याला अजिबात तिला मिठीतुन दूर करावेसे वाटत नव्हते. पण काही विचार करत त्याने स्वतःचा भावनांवर नियंत्रण ठेवले....अलगद आपले डोळे पुसले ...नी तिच्या दूर झाला...

" तू विसरु देशील मला, सतत फोन करशील.... राज असं, राज तस....याने असे केलं, त्याने असे म्हटले...राज याला काय म्हणतात....याचे उत्तर काय ...... न संपणारा चॅटर बॉक्स आहेस तू ...... तू मोकळा वेळ देशील तेव्हा कुठे विचार करेल ना , तुला विसरायचं....की आठावयच ......" ....राज किचन मध्ये जात मॅगी बनवत बोलत होता....

" हा ये तर आहे.... मग माझे प्रॉब्लेम कोण सोडवणार ....." .....नंदिनी

" पण फक्त प्रॉब्लेम्स साठी फोन नाही करायचा हा....मला एक एक मिनिटाचे सगळे सांगायचे.....सगळे म्हणजे सगळे...." ...राज

" ती नुसता ह्मम ह्मम करत असतो.......काही कळत नाही तुला ........" ...आणि परत नंदिनीची न संपणारी बडबड सुरु झाली .  गप्पा मारता मारता दोघांनीही मॅगी संपविली.

" चला मॅडम, झोपा आता, बाकी काम उद्या करा " ...राज

" राज..... गप्पा मारुया ???" .....नंदिनी

" झोप नाही आली ???"...... राज

" नाही..... मला खूप बोलायचे तुझ्या सोबत, खूप गप्पा मारायच्या.......बघ ना किती छान शांत वातावरण आहे .....उद्या पासून पाहुणे येतील....मग वेळ नाही मिळणार ना...... आजची रात्र सोबत घालवूया ? ? " ...नंदिनी....

" Okay " ..... राज हसतच बोलला.

गप्पा मारत नंदिनी तिचे राहिलेले बाकीचे काम करत होती. थोड्या वेळ बाहेर झुल्यावर बसून झाले.... मध्येच एक कॉफीचा ब्रेक झाला....आता रात्रीचे तीन वाजत आले होते.

" राज , हे बघ .... आजिसहेब, आबा ...सगळ्यांचे जुने ब्लॅक अँड व्हाइट जमाण्या मधले फोटो.... किती क्यूट दिसत आहेत ना अजिसहेब......" ..नंदिनी त्याच्याजवळ जात सोफ्यावर बसली...आणि त्याला जुने जुने फोटो दाखवत होती .... त्यांच्याबद्दल बोलत होती ....बोलता बोलता  अचानक तिच्या खांद्यावर तिला थोडा भार जाणवला......तिने वळून बघितले तर राज झोपला होता, आणि त्याचे डोक तिच्या खांद्यावर पडले होते....तो झोपेत इतका निरागस दिसत होता, की त्याला बघून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला....ती बऱ्याच वेळ त्याच्याकडे बघत होती. त्याला बघता बघता तिचा केव्हातरी डोळा लागला होता.

थोड्या वेळाने राजला जाग आली, लाइट्स बंद होते, कोणीतरी त्यांच्या अंगावर पांघरून घातले होते... त्याचे डोक नंदिनीच्या खांद्यावर होते, नंदिनीचे डोकं त्याच्या डोक्यावर....... तसे बसल्या बसल्या तो अकडला होता....पण त्याला वरती रूमध्ये जायचा कंटाळा आला होता.....नंदिनीला आपल्या कुशिमध्ये पकडून  घेत तिथेच सोफ्यावर पाय लांब केले ....आणि तिला पकडून झोपी गेला.... ती रात्र कधीना संपवी असे दोघांनाही मनोमन वाटत होते....दोघेही आपापल्या भाव विश्वात, गोड स्वप्नांसह  झोपी गेले होते....

*****
क्रमशः

🎭 Series Post

View all