भाग 62
" आजी sss........." नंदिनी , घराच्या दारात आली तेव्हा तिला तिचे आजी आबा सोफ्यावर बसलेले दिसले. त्यांना इथे आलेले बघून तिला खूप आनंद झाला होता, आणि ती तिथूनच पळत आजीच्या गळ्यात येऊन पडली.
" अग हळू...." ..... आजीसाहेब
" हो, सॉरी सॉरी.... आजी तू कधी आली??? आणि अशी अचानक??" ......नंदिनी आबांजवळ जात बसत बोलली.
" हे आताच आलोय एक तास झाला असेल. राजने गाडी पाठवली होती आम्हाला घ्यायला.... तसे राहुलच्या साखरपुड्याला येणारच होतो , दोन चार दिवस आधी आलोय. राज म्हणाला नात अमेरिकेला चालली, तिच्या सोबत वेळ घालवायला आधीच या ... राजने बोलावले आहे म्हटल्यावर यावेच लागेल ना " ....आजी
" खरंच .....?? तू इथे राहणार आहे ??? I am so happy ......Raj you are great .....". .... नंदिनी राजकडे बघत बोलत होती. तिचा उत्साह तर बघण्यासारखा होता.
" आजी - आबा, मला खूप दिवसांपासून तुमची खूप आठवण येत होती . पण ना कामा कामातच वेळ जात होता. पण मी येणार होते तुम्हाला भेटायला , अमेरिकेला जायच्या आधी. पण हे खूपच ऑसम झाले, आता आपण सगळे एकत्र राहू " ......नंदिनी
" हो ना, घरात सगळी कामं हीलाच करावी लागतात....भांडे घासणे, स्वयंपाक करणे ......इत्यादी इत्यादी " .......राहुल तिची मस्करी करत होता. त्याचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले.
" हो माहिती आहे मला, तिकडे आली तरी तुझं मन सगळं इथेच असते ते . खूप जीव लावला तुम्ही सगळ्यांनी आमच्या लेकीला.... की आमची लेक आम्हालाच विसरली बघा....."......आजी आनंदाने बोलत होत्या.
" हो ना, तुमची नात आहेच तशी.....घरात असली की आमचा जीव नाकोनाकोसा करून सोडते, आणि नसली की घर आम्हाला नाकोनाकोसे करून सोडते . आता तिकडे गेली की माहिती नाही कसे होणार आहे " ..... आजीसाहेब
" आजीसाहेब , तुम्ही माझं कौतुक करत आहात की माझं गाऱ्हाणं सांगत आहात ???" ...... नंदिनी न समजल्यासारखी आजिसहेबँकडे बघत होती.
" तुम्हाला जे समजायचे ते समजा, तसेही तुम्ही खूप मोठ्या झाल्या आहात आता .... बरं ते जाऊ द्या, आताच आले आहेत , जा त्यांना त्यांची खोली दाखवा, आणि आराम करू द्या त्यांना थोडा वेळ .....नाहीतर गप्पा मारत बसाल " ...... आजीसहेब
" हो...... पण किती मस्त वाटते आहे ना, दोन दोन आबा, दोन दोन आजी, सगळे एकत्र.... I am so lucky " ....नंदिनी आज खरंच आजी आबांना इकडे बघून खूप आनंदी झाली होती.
नंदिनीचे लग्न झाल्यापासून तिचे आजी आबा दोन तीन वेळच येऊन गेले होते, त्यात पण फार फार तर दोन दिवसाच्या वर ते थांबले नव्हते. यावेळी ते आठ दहा दिवस थांबणार होते. ती खूप खुश झाली होती. नंदिनी तिकडे गावाला जायची तर दोन दिवस झाले की तिला इकडली घरची आठवण व्हायला लागायची....तिने नेहमीच राज जवळ बोलून दाखवले होते, की सगळे एका घरात का राहू शकत नाही . राजने दोन तीन दा आबांना म्हटले होते, पण त्यांचे म्हणणे होते की हातपाय चांगले आहे तोपर्यंत गावीच राहतो. अगदीच म्हातारपण आले तर मग राज नंदिनी शिवाय त्यांचे दुसरे कोण आहे. म्हणून मग राजने सुद्धा त्यांना फार आग्रह नव्हता केला. पण आता नंदिनी अमेरिकेला जाणार होती.... दिवस कमी होते ... गावाला भेटायला गेले तरी फार तर एक दोन दिवस, म्हणून त्याने आजी आबांना नंदिनी अमेरिकेला जाईपर्यन्त इथेच राहायला राजी केले होते. त्याला माहिती होते नंदिनी त्या दोघांना इथे बघून खूप खुश होईल , आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाले सुद्धा होते.....नंदिनी खूप खुश झाली होती.
" राज कसला भारी आहेस तू .....काय मस्त सरप्राइज दिले तू मला.......हे दूनिये मधले सगळ्यात बेस्ट, ऑसम सरप्राइज होत हा...... आपण सगळे एका ठिकाणी....किती मस्त वाटते आहे , तुला शब्दात पण नाही सांगू शकत आहे ...." .....नंदिनी खूप एक्सायतेड होत बोलत होती .....राज तिचा चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळत होता.
" मग काय देणार आता त्याला, बोल "......राहुल
" तो जे म्हणेल........anything , everything " ...... नंदिनी
" राज बघ, मागून घे जे हवे ते ......खूप छान चांस आहे.... आणि प्लीज ते बोर बोर काही नको मागू हा...की तू नेहमी हसत राहा, रडू नको अँड ऑल.....तशी पण ती रडत नाहीच , रडवत असते लोकांना " .....राहुल
राहुलचे बोलणे ऐकून राजला हसू आले.
" ते बोर असले तरी माझ्यासाठी महत्वाचे आहे" ....राज हसतच बोलला.
"ये तुझं का बरे पोट दुखते रे ......you are jealour of me right...?? राज माझ्या वर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो म्हणून" ......नंदिनी
" मी का जेलस होऊ , मी तर खुश आहो, आणि तसे पण त्याचं घरात सगळ्यांवर प्रेम आहे ...आणि तुला इतके कळते तर तू पण कर ना प्रेम त्याच्यावर .......तुला कोण अडवते आहे ?" ...,..राहुल
" मी तर करतेच ना त्याच्यावर प्रेम ..... He is the bestest person in my life " ...... नंदिनी
" मट्ठ आहेस तू ........देवा अक्कल वाटताना हिला का विसरलास " .....राहुल वरती बघत हाथ जोडत नाटकी नाटकी बोलत होता.
" हा.......तू मला बेअक्कल म्हणतो आहेस..." ....नंदिनी त्याला मारायला त्याचा मागे पळाली
"हो मग...........काहीच कळत नाही तुला" .....राहुल पुढे पुढे पळायला लागला. नंदिनी त्याच्या मागे. दोघांचाही असाच गोंधळ सुरू होता.
बघितले , कोण म्हणेल या घरात लहान मूल नाही ते, घरात असले की असेच घर डोक्यावर घेतात...असाच गोंधळ घालतात हे दोघं.....त्यात कधी कधी तो तीसरही शामिल होतो, मग तर बघायलाच नको....नंदिनीचा तर फारच अंगात मस्ती येते ...." ..... आजिसहेब , नंदिनीच्या आजी सोबत बोलत होत्या.
" हो ना, म्हणूनच तिकडे आली की तिला बोर होते , इथे छानच रमली नंदिनी . " .....आजी
" त्या अमेरिका ला गेल्या की घर बघा कसे सूने सूने होईल....आम्ही तर राहून घेऊ, पण राज ची खूप काळजी वाटते आहे....ते नंदिनीला सोडून कधीच राहिले नाही आहे . पण ऐकत सुद्धा नाहीत ही आजकालची मुले, काय करणार .....शेवटी त्यांच्या इच्छे खातर हो म्हणावे लागते " ...... आजिसहेब
" हो ना, मला जेव्हा नंदिमीच्या जाण्याबद्दल कळले, तेव्हा नव्हतेच आवडले. आधीच हे सगळं असे विचित्र झाले आहे , त्यात आता हे नवीन ..... राजसोबत बोलून बघितले, नंदिनी सोबत सुद्धा बोलणं झालं...पण ती म्हणाली राजने परवानगी दिली आहे , ....आता राजनेच परवानगी दिली आहे म्हटल्यावर काय बोलणार ना " ....आजी
" हो .... बघू देवाच्या तरी मनात काय आहे ते......त्याच्या मर्जीपुढे आपले काय चालते " ......आजिसहेब
" हो, ते पण बरोबर आहे " .....आजी
******
क्रमशः
*****
कधी कळणार नंदिनीला राजचे प्रेम, त्याच्या भावना...???
बऱ्याच जणांना प्रश्न पडले आहे , नंदिनी ला सगळं समजते , मग राजचे प्रेम का कळत नाही आहे??? कुणाकुणाला तर नंदिनीचा राग पण येतोय .. ती त्याला सोडून कशी जाऊ शकते....का ती इतकी कन्फ्युज आहे??? कथा तिथेच थांबली वाटतेय???
आज आपण बोलुयात नंदिनी बद्दल.....
बऱ्याच मित्रांना प्रश्न पडला आहे की कधी नंदिनीला राजचे प्रेम कळेल. तिला लग्न काय आहे हे माहिती असूनही का राज चे प्रेम कळत नाही आहे ??
नंदिनी राज चे लग्न झाले तेव्हा ती एक सात वर्षाच्या मुलीप्रमाणे वागत होती. त्या वेळी राज पूर्णपणे तिची आई, बाबा, मित्र ....नवरा सोडून सगळ्या प्रकारच्या भूमिके मध्ये होता. अगदी तिच्या खूप जवळाचा. त्यामुळे त्याची तिच्या बद्दलची काळजी करणे, प्रेम , राग हे सगळं तिला नॉर्मल घरातले जसे प्रेम असते तसे वाटते. लग्न झाले आहे , आता आपलं नाव नंदिनी श्रीराज देशमुख आहे हे पण तिला माहिती आहे, पण त्याचं तिला काही विशेष वाटत नाही आहे .तिला समज आल्यापासून ती तेच स्वतःचे नाव समजत आहे. तिला ते लग्न नीटस आठवत पण नाही आहे . ते लग्न तेव्हा झाले जेव्हा लग्न काय असते, लग्नाची ओढ काय असते? मनाचा मनाशी जुळणारा संबंध, शारीरिक अट्ट्रॅक्शन काय असतं, हे तिला माहिती नव्हते, त्यामुळे साहजिकच आहे ती त्या लग्नाला सीरियस घेत नाही आहे. आणि बकीच्यांकडून पण लग्न घाईत वैगरे झाले आहे , असेच तिला कळले आहे.
तिला आता हळू हळू प्रेम कळू लागले आहे . पण ती कन्फ्युज आहे, कारण घरात रोज ज्याला बघत आलो आहे , जो कधीतरी आईवडीलांसारखा सुद्धा वागला आहे , त्याला अचानक बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याचा भूमिके मध्ये कसे काय बघता येईल??. नवरा झाल्यावर वडील सारखं, मित्र सारखे बनून काळजी घेणे सोपे, पण जो वडीलधाऱ्या रोल मध्ये होता त्याला एकदम नवरा, प्रियकर समजून घेणे कठीण आहे .त्या नजरेने त्याला बघणे, तिला सोपे नाही आहे. तिच्या मनाची घालमेल होते आहे. जशी ती राहुल च्या अंगा खांद्या वर उड्या मारते तशीच राज सोबत हि, म्हणूनही तिला स्पर्श मधला वेगळेपणा अजून कळत नाही आहे. एकदम राज ला बघण्याची नजर तिची कशी काय बदलणार??? कधीतरी राज च्या स्पर्शात रोमांच असतात, तर कधी काळजी . तिची त्याच्याकडे बघण्याची नजर बदलते आहे , पण पूर्णपणे अजूनही नाही बदलली. तिला कुठेतरी वाटते आहे राज ने आपली जबाबदारी घेतली आहे , त्यामुळे तो इतर दुसरीकडे कुठे त्याचं नात प्रस्थापित नाही करत आहे. तिला सद्ध्या आता फक्त त्याचं सुख, आनंद दिसतोय, जो त्याला भेटावा असे तिला मनापासून वाटते आहे. दुसरं तीच स्वप्न होते तिला काहीतरी बनून दाखवायचं, करून दाखवायचं , राज च नाव न वापरता , तिला तिची ओळख , तिचं अस्तित्व निर्माण करायचे आहे . आणि म्हणूनच तिला राज पासून दूर जाणे गरजेचे आहे.
राज चे तिच्यावर खूप प्रेम आहे....तो तिला ते बोलून, तर कधी स्पर्शातून जनाऊन पण द्यायचा प्रयत्न करतो. तरी सुद्धा तिला काही त्रास झाला की त्याला मग ते सगळं ही नको असते ....आणि मग अचानक त्यातला प्रियकर कुठेतरी मागे पडतो. त्याने गेल्या तीन चार वर्षात तिला झालेला त्रास इतका जवळून बघितला आहे , त्याने स्वतः तो फील केला आहे, त्यामुळे आता त्याला तिला परत काही त्रासात बघ्याला भीती वाटते, घाबरतो तो... नंदिनीला काही त्रास झाला तर तो त्याच्यासाठी जीवघेणा होऊ शकतो इतका तो तिला त्रासात बघून थकला आहे .आणि म्हणूनच जसे आहे त्यातच खुश आहे तो. आणि म्हणून त्याला तिला त्याच्या भावना सांगायची भीती वाटते....तो वाट बघतोय तिला त्या भावना कळायची.
प्रत्येक नात्यांना आपली वेळ घेऊ देणे गरजेचे आहे.
Thank you
नमस्कार फ्रेंड्स
सगळ्यात पहिले तर खूप सॉरी , भाग टाकायला उशीर होतो आहे . तरी आज छोटासा भाग टाकला आहे. तेवढाच लिहून झाला होता. इरा रहस्य कथा स्पर्धेसाठी एक कथा लिहायला घेतली आहे, ती वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे म्हणून नंदिनीचे लिखाण मागे पडत आहे. तुहिरे चे काही भाग लिहून आहेत म्हणून ते पोस्ट करते आहे.
नंदिनी सोडून इतर कथा पोस्ट केल्या तर तुम्हाला राग येतोय....मला कळतोय तुमचा राग . खरे तर नव्हते लिहिणार स्पर्धेसाठी, सगळे लेखक खूप छान छान लिहीत आहेत, स्पर्धा नाहीच कोणासोबत . रहस्यकथा आपलं काम नाही , मला माहिती आहे, पण लिहिता येते काय म्हणून हा चांस घेतला. माझ्या रहस्यकथा चे नाव आहे दुर्गा.....
, ' दुर्गा .." ..ही जरी रहस्यकथा असली तरी एक प्रेम कथा आहे. आशा करते तुम्हाला आवडेल. नंदिनी चे भाग यायला थोडा उशीर होईल... थोड सांभाळून घ्या.
मी कॉमेंट्स वाचत असते, रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करते, कधी कधी वेळेअभावी नाही होत. त्याबद्दल क्षमस्व.
नंदिनीचे भाग यायला उशीर लागेल, नक्की कधी पुढला भाग पोस्ट होईल सांगू नाही शकत.
Thank you.
*****