Jan 22, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 62

Read Later
नंदिनी...श्वास माझा 62

भाग 62

नंदिनीची US ला जायची बहुतेक सगळी तयारी झाली होती. तिकीट बुक झाली होती. ती तिच्या फ्रेंड्स सोबत जाणार होती. तिथे त्यांना काही दिवस राहण्यासाठी सोय करण्यात आली होती.  आता तयारी होती राहुल आणि रश्मी च्या साखरपुड्याची.

घरात खूप उत्साहपूर्ण वातावरण होते. थोड्या लोकांमध्ये करायचे म्हटले तरी जवळ जवळ च्या गावातल्याच लोकांची बरीच मोठी लिस्ट झाली होती. साखरपुड्यासाठी फंक्शन हॉल ,  हॉटेल बुक करण्यात आले होते. आता राहिली होती ती शॉपिंग. पाहुण्यांसाठी गिफ्टस , देणेघेणे घरातील महिला वर्ग बघणार होते, बाकी रशमिसाठी  कपड्यांची, ज्वेलरी ची शॉपिंग राहुल, नंदिनी, राज, रश्मी मिळून करणार होते. त्याप्रमाणे त्यांनी सोबत जायचा प्लान बनवला होता.

******

" काय चॉईस होत नाही आहे वाटतं ? " .....नंदिनी , राहुल आणि रश्मी बूटिक मध्ये साखरपुड्यासाठी कपडे बघत होते तेव्हा त्यांच्यामध्ये येत बोलली.
 

" बघ ना नंदिनी हा, सेम कलर घालू म्हणतेय मी, तर हा नाही म्हणतोय, फारच भाव खातोय  " ....रश्मी शिकायतीच्या सुरात बोलली.

" अरे यार तुम्ही मुली पिंक, पीच, परपल असे कलर घेता बाबा, मी नाही घालणार असे बायकी कलर." .....राहुल

राहुलचे बोलणे ऐकून तिला राज आठवला, त्यादिवशी तो तिला मॅच होईल तो कलर घालतो म्हणाला होता. त्याला पिंक आवडत नाही तरी त्याने तिच्या इच्छेसाठी चार चार पिंक शेड्स घेतले होते. ते सगळं आठऊन तिच्या ओठांवर स्मायल आले.

"  तिचा पहिल्यांदाच होतो आहे साखरपुडा, करू दे ना तिला तिच्या आवडीप्रमाणे , होऊ दे ना तिच्या मनासारखे " ....नंदिनी

" ये बाई , माझा पण पहिल्यांदाच होतो आहे साखरपुडा , मला पण माझ्या आवडीचे करायचे आहे , हक्क आहे तो माझा . तुम्हा मुलींची ना मी दादागिरी नाही खपाऊन घेणार हा   . अन् तू जा ना , तुझं बघ " ....राहुल

" माझं ??....ते राज बघतोय , त्याला जास्ती कळते , मला काय सूट होते त्याही पेक्षा मी कोणते कपडे इजीली कॅरी करू शकते ते ....तो घेतो नीट, आणि मला आवडते त्याची चॉईस . " ....नंदिनी

" How cute ????❣️" .... रश्मी दोन्ही गालांवर हाथ ठेवत बोलत होती.

" नुसते क्यूट नाही, शिका जरा काही, तो जे म्हणतो ते नंदिनी घालते " ......राहुल

" आणि तो मी जे म्हणते ते कपडे घेतो जरा  ...." ....नंदिनी

" ह्मम....शिका जरा काही " ....रश्मी राहुल बोलला त्या सेम टोनिंग मध्ये बोलली ????

" ही नंदिनी, इतके अतरंगी कपडे घेते त्याच्यासाठी, त्यात कलर तर काहीच विचारू नको, त्यात तिची दादागिरी अँड ब्लॅकमेलिंग,  तो बिचारा हीचं  सगळं हसत हसत सहन करतो ." ......राहुल

" Hey what do you mean by ' सहन " ?? हँडसम दिसतो तो त्यात, तुझ्यासारखे नाही, काहीही, कितीही डिझायनर घाला, जैसे थे वेसे " ....नंदिनी

ये दोघे तिथेच सुरू झाले ....रश्मी दोघांची टॉम न जेरी वाली फाईट एन्जॉय करत होती.

" ये तू आमचा प्रॉब्लेम सोडवायला आली आहेस की वाढवायला ...... राज , हे तुझं पॅकेट ने तिकडे , गडबड करते आहे खूप " ..... राहुल राज कडे इशारा करत बोलला.

" राज आपल्या भावाला सांभाळ हा ,  नाहीतर रश्मीला घेऊन जायील इथून " ....नंदिनी

" ये कोणाला धमकी देते. ".....राहुल

" तुलाच " ......नंदिनी

" राज........".....राहुल

" राज ........" ...नंदिनी

" अरे तुम्ही काय लहान मुलांसारखे भांडत आहात ?" ....रश्मीने डोक्यावर हात मारला .

" नंदिनी ,  तिकडे चल, काही ड्रेस काढले आहेत , ट्राय कर ते  ".....राज नंदिनीचा हात पकडत तिला दुसऱ्या काउंटर कडे नेत होता .

" बघून घेईल तुला...." नंदिनी आपले दोन बोटं राहुलच्या  डोळ्यांकडे इशारा करत बोलली

" मी पण .....बघून घेईल " ...... राहुल.

" हे राम, कठीण आहे बाबा तुमच्या दोघांचं " .....रश्मी

सगळे आपापले कपडे बघत होते. त्यानंतर ज्वेलरी आणि बरीच काही शॉपिंग झाली होती.
 

" बस झालं आता, मला नाही करायची शॉपिंग . थकले मी . भूक लागली मला. " ......नंदिनी.

" ह्मम , मला पण लागली भूक. चला आता काही खायला जाऊया. "......राहुल

" भांडताना नाही थकले तुम्ही दोघं ?" .....राज त्यांची मस्करी करत होता.

" राज....मी कुठे भांडले, हाच सुरू करतो , आता तू पण बोलणार आहेस काय?" .....नंदिनी बिचारा आवाज काढत बोलली

" तू बोलू देशील तर तो बोलेल ना ?" ....राहुल तिची मस्करी करायला लागला.

" दादा आपण निघायला हवे, नाहीतर हे दोघे परत सुरू होतील " ....रश्मी

" ह्मम.....मी कार घेऊन येतो पार्किंग अरिया मधून.  "....राज, कार घ्य्याला पुढे गेला.

राज कार घेऊन पुढे आला . नंदिनी मागे रश्मी जवळ बसायला दार उघडणार तेवढयात राहुल ने तिला टाकले

" मला बसू दे की माझ्या होणाऱ्या बायको बरोबर " ...राहुल

" बस ना, मी कुठे काय म्हणते आहे , तुझीच आहे ती....मी कुठे चोरते आहे तिला....." नंदिनी पुढला दरवाजा उघडत राजच्या  शेजारी जाऊन बसली. थोडा वेळ शांततेत गेला. मग मात्र परत नंदिनीची बडबड सुरु झाली. ती बसली जरी पुढे होती, तरी तिची मान पूर्ण एकशे अंशी च्या डिग्री मध्ये मागच्या साइडला होती, ती रश्मी सोबत गप्पा मारत होती . राहुल वैतागून नंदिनी आणि रशमिकडे  बघत होता.  राहुलचा चेहरा बघून राजला त्याची गंमत वाटत होती.

" नंदिनी, मान दुखेल आहे सरळ बस " .....राज

"नंदिनी मॅडम , तुम्ही जरा आजूबाजूच्या गोष्टींचा आस्वाद घेता काय , आम्हाला जरा बोलू देता ?" .....राहुल

" आजूबाजूला काय आहे बघण्यासारखं?? गाड्या आणि दुकानं दिसत आहेत. तू बोल ना तुला कोण अडवले आहे " .....नंदिनी

" हे काय , येवढे मोठे आय टॉनिक आहे तुझ्या बाजूला, बघ ना तू त्याला, आणि मल पण बघू दे जरा माझ्या रश्मीला . तुझ्यामुळे तिने माझ्याकडे नीट बघितले पण नाही आहे " ......राहुल

" काय रे ...तू पण ना ....., नंदिनी आपण बोलूया.....याला काय, कितीही बघितले तर कमीच आहे......" रश्मी राहुलच्या हातावर मारत बोलली.

" आय टॉनिक ???? माझ्या बाजूला??? " .....नंदिनी राहुलच्या बोलण्यावर विचार करत बाजूला बघितले तेव्हा तिच्या डोक्यात क्लिक झाले, की राहुल राज बद्दल बोलतोय.

" खरंच इकडे तिकडे बघायची काय गरज आहे , जेव्हा ताजमहाल आपल्या बाजूला आहे " ....नंदिनी राजकडे बघत होती, आणि तिच्या मनात हा गोड विचार येऊन गेला, आणि तिला स्वतःच्याच विचारांचे हसू आले.  आणि आता ती राजकडे बघण्यात मग्न झाली होती. आता कार मध्ये एकदम शांतता पसरली होती. राजने सॉफ्ट मुजिक लावले होते. रश्मी राहुल आपल्या गप्पांमध्ये होते. राज ड्राईव्ह करत होता. नंदिनी राजला बघत होती.

"  काय बघते आहे ? " ...... राजचे लक्ष नंदिनिकडे गेले होते.

" ताजमहाल " ........नंदिनी आपल्याच दुनियेत विचार करत बोलत होती.

राहुलला तिचे उत्तर ऐकून हसायला आले.

" ताजमहाल ???....इथे कुठे ताजमहाल आहे ?" ......राज अजब नजरेने तिला बघत होता.
 

" ताजमहाल, I mean eye tonic....."..... नंदिनी भानावर येत चाचपडत बोलत होती.

" काय.....???" ......राज
 

" म्हणजे ताजमहाल खूप सुंदर आहे , म्हणजे बघायला खूप छान वाटतो " ...... नंदिनी ने आपली नजर वळवत बोलली

" नंदिनी , तू पागल होत आहेस.......कशी बघत होती राज कडे???? कोण काय विचार करेल???राहुलचे तर ठीक आहे , पागलच आहे तो, पण रश्मी??,  रश्मी काय विचार करेल??? पण मी काय करू, त्याच्याकडे एकदा बघितले की बघतच रहावेसे वाटते. काबरे हा इतका गोड आहे ..?? शी बाबा , तो काय विचार करत असेल " .....नंदिनी खिडकीतून बाहेर बघत आपल्या मनातच विचार करत होती.

" नंदिनीचा ताजमहाल आहे इथे, तू नको लक्ष देऊ, ड्राईव्ह कर " .....राहुल हसतच बोलला.

" तुम्ही दोघेही पागल आहात, आणि दुसऱ्यांना पण पागल करून सोडता " .....राजने ड्रायव्हिंग वर लक्ष घातले.
 

थोड्या वेळातच  ते एका इटालियन रेस्टॉरंट मध्ये पोहचले  होते.

" रश्मी, तुझं आवडती डिश ऑर्डर कर. ".....राहुल तिच्या हातात मेनू कार्ड देत बोलला.

" नंदिनी, तू पण......." .." तुला काय गरज, तुमचं तर मेनू कार्ड  बाजूलाच आहे .  " .......राहुल

" मला माहिती आहे , आज माझं मी ऑर्डर करणार आहे " ....नंदिनी मेनू कार्ड वाचत बोलली.

" काहीच कळत नाही आहे , नंदिनी तुला इटालियन फूड आवडते, पण तुला कोणत्या डिश ला काय म्हणतात माहितीसुद्धा नाही . यांना नावासकट डिश चा फोटो द्यायला काय प्रोब्लेम होतो ?? आता काय करू, सगळ्यांसमोर तर खूप बोलली , माझं मी बघते, आता काय करू?" .....मनातच विचार करत ती मेनू कार्ड बघत होती . आणि नुडल्स ओळखीचा शब्द बघून तिने ऑर्डर केले.  राज तिला बघत बसला होता.

राज आणि राहुल ने सुद्धा आपापली ऑर्डर दिली. सगळ्यांच्या डिश आल्या. त्यात नंदिनीची डिश अजीब दिसत होती. बघूनच तिला खाऊ की नको असे झाले होते.
पण परत राहुल चिडवेल म्हणून ती कसेतरी तोंड करत एक बाईट तोंडात टाकले..

राहुल आणि राज तिच्यावर नजर रोखत बघत होते. कारण त्यांना माहिती होते जे तीनी ऑर्डर केले आहे ते तिला अजिबात आवडणारे नाही आहे. राज मध्ये बोलणार हिंहोटा, पण राहुलने त्याला अडवले होते. रश्मी त्या दोघांना आणि नंदिनीला बघत होती.

" इयु...........ही कशी टेस्ट आहे ??? , मला नको हे ....राज तू घे हे " .....म्हणत तिने आपली प्लेट राजपुढे सरकवली, आणि राजची प्लेट आपल्याकडे घेतली.

तिचे एक्स्प्रेशन बघून आता राहुल मोठ्याने हसायला लागला होता. राहुल काहीतरी बोलणार तेवढयात राजने त्याला डोळ्यांनीच चूप रहा म्हणून खुणावले.

राजने काही सॉसेस मागवले.

" नंदिनी, इकडे बघ ....I will show you, how to   make this dish  tasty " ......म्हणत त्याने काही सॉसेस आणि काही spices त्यावर टाकले आणि मिक्स केले.  नंदिनी तो काय करतोय तेवढे बघत होती.

" Now taste it " ..... राज ने तिच्यापुढे प्लेट धरली. नंदिनीने त्यातून एक चमच घेत खाल्ला..

" Wow, it's super tasty now. "....तिचे डोळे आनंदाने मोठे झाले. " पण आता तूच खा ते, तू मागवलेले माझे फेवरेट आहे " ...म्हणत तिने खाण्यावर कन्संत्रेट केले.

रश्मीला तर या तिघांची बाँडींग बघून खूप छान वाटत होते. ती फक्त त्या तिघांना न्याहाळत होती. डिनर आटोपून सगळे कार मध्ये येऊन बसले. आधी रश्मीला घरी पोहचवायचे, नंतर घरी जायचे असे ठरले होते. रश्मीचे घर दूर होते , म्हणून बराच वेळ लागणार होता. सगळे गप्पा करत होते आणि राज कार चालवत होता. राहुलच्या डोक्यात परत काही आले आणि तो बोलायचा सुरू झाला.

" बापरे दमलो आता, किती फिरवतात या मुली " .....राहुल

"मजा आली आज....मी खूप एन्जॉय केले, you three are awesome company  ...." ....रश्मी
 

"हो ना , सांग याला माझी कंपनी नेहमीच चांगली असते.  आम्ही फिरवले की तू??? तुझेच नखरे जास्ती सुरू होते, हे नको, ते डार्क होते आहे , याची फिटिंग नाही बरोबर . मी तर काहीच वेळ लावला नाही. तुझ्यामुळे दमले मी , हुश  "......नंदिनी

" हो काय, सांगते बघा कोणाला??? तू काय केले ग??? सगळं राजनेच केले चॉईस . तुला तर तुझे जेवण सुद्धा नीट मागवता आले नव्हते . आणि चालली मोठी एकटी तिकडे ....माहिती नाही काय करणार आहे ?" ....राहुल

" म्हणजे??? मला आवडते त्याची आवड म्हणून , म्हणून मी मध्ये पडले नाही " .....नंदिनी

" नंदिनी, तू आता ॲक्सप्ट कर,  तू एकटी मॅनेज नाही करू शकत. तुला काय खायचे, तुझी आवडती डिश कुठली तुला हे सुद्धा नाही माहिती .  तुला कपडे कसे घ्यायचे , काहीच माहिती नाही. तुला काहीच येत नाही .  You are depend on Raj , you are nothing without Raj , you can't live without Raj " .... राहूल

राहुल बोलत होता तेव्हा नंदिनी राजकडे बघत होती . राहुलचे बोलणे तिच्या मनाला छेदत होते. " खरंच आपल्याला काहीच येत नाही, साधं जेवण सुद्धा नाही मागवता आले आपल्याला, बनवता तर काहीच येत नाही.  " .....तिच्या डोळ्यात पाणी साचायला लागले . भरल्या डोळ्यांनी ती राज कडे बघत होती.  राहुलचे टोचून बोलणे सुरूच होते.

" चूप बस राहुल आता ....तिला वाईट वाटते आहे" .....रश्मी हळूच राहुल ला म्हणाली.

" तेच पाहिजे आहे, तिला कळायला तर हवे पावला पावलावर तिला राजची गरज आहे ते . आज बघितले ना  , सगळं तोच बघतो, तिचे कपडे घेतांना पण तो किती काळजी घेतो, नरम हवा, तिला टोचायला नको , हेवी नको, तिला सांभाळता यावा , इतक्या बारीकसारीक गोष्टी बघतो तो . तिला सगळं आयते मिळाले आहे , तिला त्याची जाणीव तर व्हायला हवी . " ....राहुल

राजचे लक्ष नंदिनिकडे गेले, तो पण राहुलचे बोलणे ऐकत होता. नंदिनीच्या डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. भरल्या डोळ्यांनी ती राजकडे बघत होती . तिचे मन खूप जड झाले होते, राजच्या लक्षात येताच त्याने कार साइडला लावली आणि बाहेर आला.

" Nandini, come out ..... " .... राज ने तिच्या हाताला पकडत तिला बाहेर आणले.

" Ice cream ??" ..... राज

नंदिनी ने रडतच नकारार्थी मान हलवली.

" राहुल,रश्मी आइस्क्रीम घेऊन या" ......राज

राजचे बोलणे ऐकून राहुल रश्मी आइस्क्रीम आणायला गेले.

" का बोलला इतकं टोचून ??? गरज होती काय??? किती आनंदी होती ती . आता जातांना पण रडवणार आहेस काय तिला ??? शिकेल ना हळूहळू, आतापर्यंत गरज नाही पडली तिला . पाण्यात उतरले, बुडायला लागले की पोहायला येतं " ......रश्मी

" हो तुझे बरोबर आहे , पण तिला तिच्या भावना कळव्यात म्हणून बोललो मी " ....राहुल

" चल आता आइस्क्रीम घेऊ " ......रश्मी

" नंदिनी, तो गंमत करत होता तुझी, तुला तर माहिती आहे , तो नेहमीच असे काही ना काही बडबडत असतो. इतकं मनावर घ्यायचे काय " .....राज तिच्या पुढे उभा होत तिचे डोळे पुसत बोलला.

" पण बरोबरच तर बोलला जे  बोलला ते ....मला काहीच येत नाही . मी कधीच लक्ष दिले नाही, माझ्या मनात आले ते तू माझ्यासमोर मी म्हणायच्या आधीच घेऊन आला आहेस . मला खायला काय आवडते, कशात काय टाकायचे माहिती सुद्धा नाही. साधं मला एखाद्या फंक्शन साठी तयार व्हायचे, ते पण तुझ्या मदतीशिवाय होत नाही.  आज माझी चोईस्ट चुकली म्हणून हक्काने मी तुझी प्लेट घेतली, तुला माझी प्लेट हवी आहे की नको हे सुद्धा विचारले नाही मी तुला . पण मला खरंच स्वतःच काही करायचे आहे , पण मी कसे करू ???  " .....नंदिनी रडता रडता बोलत होती.

तिला रडतांना बघून राज ला खूप वाईट वाटत होते.

" सोन्या, प्लीज नको ना रडू . हे बघ जे झाले आहे ना त्यात सगळ्यात जास्ती माझी चूक आहे . मीच तुला कधी करू नाही दिले काही, जर करू दिले असते तर तुला आले असते ना हे सगळं  . It's all my fault. पण बघ अजूनही वेळ झालेला नाही , आपल्याजवळ आहे थोडा वेळ, मी तुला सगळं शिकवतो , जे जे तुला गरजेचे आहे ते ते सगळं तुला शिकवतो .... ओके . पण प्लीज रडू नको आता "  ....राज तिचा हात आपल्या हातात  घे, एका हाताने तिचे डोळे पुसत तिला समजावत होता. 

" किती प्रेम करतात ना राज दादा नंदिनिवर , किती इजीली  म्हणाले ' it's all my fault " , खरंच खूप मोठं मन असावे लागते , चूक नसतानाही आपली चूक आहे म्हणणे " ....रश्मी , आइस्क्रीम घेऊन येत असताना राज आणि नंदिनीला बघून राहुल सोबत बोलत होती.

" प्रेम यालाच म्हणत ना रश्मी....प्रेमात कोण खरं ,कोण चूक नसते बघायचे ना ... एकमेकांचा आनंद, एकमेकांची खुशी बघायची असते, एकमेकांचे मन जपता येणे महत्वाचे . मी नंदिनिला कळाव म्हणून बोललो होतो, पण आमचे हे बुद्धुराम, त्याला एक थेंब पाणी सुद्धा सहन होत नाही नंदिनीच्या डोळ्यामध्ये. थोडं तर तिला विचार करू द्यावा ना ?? ..पण नाही आधीच सगळं आपल्यावर घेऊन मोकळे झाले. " ......राहुल

" ह्मम..... ती जोपर्यंत त्यांच्या डोळ्यांसमोर राहील ना , ते असेच वागणार , म्हणजे मला तरी वाटते आतापर्यंत जेवढे मी त्यांना ओळखले आहे . ती थोडीही कष्टी झाली की दादा तिची समजूत घालत सगळं शांत करणार . एका अर्थी ती जात आहे ते मला योग्यच वाटते आहे , तिकडे तिला वेळोवेळी ती राज दादांवर किती डिपेंड आहे, ती त्यांच्या शिवाय रही नाही शकत तिला कळेल तरी . आणि तिचा त्रास दादांना दिसणार नाही, डोळ्याआड असणार त्यामुळे ते पण तिची मनधरणी करायला लगेच तिथे जाणार नाही. " .....रश्मी

" ???? आईस्क्रीम....." ...राहुल नंदिनिपुढे आइसक्रीम धरत बोलला.

" नकोय " ....नंदिनी तोंड फुगवत बोलली.

" नंदिनी, इतके काय मनावर घ्यायचे , तुला तर माहिती हा कसा आहे . तुझे आवडते आइस्क्रीम आणलय त्याने, घे बघू आता " .....रश्मी

" रश्मी दे ते इकडे " .... राज ने तिच्या हातातून ???? आइस्क्रीम कप घेतला. 

" चांगले झाले ना आज राहुलने या गोष्टींची आठवण करून दिली, आपल्याला शिकता येईल, काहीच बिघडलेले नाही आहे .....हो ना ??  तू रुसली राहुलवर, पण बघ रशमिलाच खूप वाईट वाटते आहे , चालणार आहे काय तुला ???  " आणि एक स्पून आइस्क्रीम घेत तिच्या पुढे धरले ..... 

नंदिनी ने नकारार्थी मान हलवली...

" मग  आता हस बघू , आणि हे लवकर खा..... तुझ्या रागापुढे आइस्क्रीम सुद्धा वितळायला लागले आहे .....मी आणि राहुल क्या चीज है फिर  " ....राज तिची मस्करी करत होता

त्याचे बोलणे ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर स्मायल आले. आणि राहुल ला टशन मध्ये बघत  तिने आइस्क्रीम संपवले.

" भाई मी ड्राईव्ह करतो आता....तू बस मागे. " ....राहुल. राजने  त्याचा हातात कार ची चाबी दिली.  तो आणि नंदिनी मागे जाऊन बसले.

राहुलने कार स्टार्ट केली. कोणीच कोणासोबत बोलत नव्हते. . 
 

" खरंच मी राजवर किती अवलंबून आहे. कधीच विचार केला नाही आपलं सगळं करतांना त्याला किती त्रास होत असेल . नेहमीच आपला हट्ट , आणि तो कितीही ठाकला असला, बरे नसले तरी पुरवायचा. मी कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न पण नाही केला, हे सगळं करतांना त्याला किती कष्ट पडत असतील. त्याला काय आवडते, त्याच्या आवडीसाठी मी कधीच काही केले नाही , की कधी गरजच नाही वाटली. आपलंच नेहमी आपण बघत गेलो" .....
नंदिनी शांत विचार करत  बसली होती. ती खिडकी मधून बघत आतापर्यंत जे झाले त्याचच विचार करत होती.

" अति प्रेम माणसाला कधी कधी दुबळ बनवते" ... राहून राहून राजच्या मनात हाच विचार येत होता. राज शांतपणे डोळे मिटून मागे टेकून बसला होता.  " नाही माझं प्रेम तिला दुबळ नाही बनवणार, मी असे नाही होऊ देणार" राज विचार करत होता.

सगळं अचानक असे शांत झाल्यामुळे राहुल ला वाईट वाटत होते, आपण उगाच असे काही बोलून गेलो त्याला वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव रश्मीने अचूक टिपले होते.

" It's okay..... everything will be fine. "..... रश्मी ने गेयरवर असलेल्या राहुलच्या हातावर हाथ ठेवत डोळ्यांनीच खुणावले. 

" राहुल साँग लाव ना ......." ....रश्मी कार मध्ये असलेली शांतता तोडत बोलली. तसे राहुल ने साँग प्ले केले.

छुटेया ना छूटे मोसे
रंग तेरा ढोलना
इक तेरे बाजो दूजा
मेरा कोई मोल ना
बोलना माही बोलना
बोलना माही बोलना

राहुलने रशमीचा हात आपल्या हातात घेतला, नी एका हाताने स्टरींग सांभाळत होता.  तिने पण त्याच्याकडे बघत त्याला गोड स्मायल दिले.

तेरे लिये आया
मैं तो तेरे संग जाना
ढोलणा वे तेरे नाल
जींदड़ी बितावाँ
कदी नइयो छोड़ना
इश्क़ दी डोर ना
सारे छड जायें
माही तू ना छोड़ना
बोलना माही बोलना
बोलना माही बोलना

राज नंदिनिकडे बघत होता, जसेकाही त्याच्या मनातलेच बोल ते गाणे बोलत होते.  नंदिनीची नजर त्याच्यावर गेली, तशी त्याने आपली नजर फिरवली.

" Don't worry Raj, everything will be fine soon. मी इथे नसणार आहे, तेव्हा तू नक्कीच स्वतः साठी जगायला लगाशिल. माझ्या जबाबदारी मुळे मि तुझे आयुष्य खराब होताना नाही बघू शकत." ....नंदिनी त्याच्याकडे बघत आपल्याच विचारात हरवली होती. विचार करता करता कधीतरी तिचा डोळा लागला.  रस्त्यात अधूनमधून येणाऱ्या खड्ड्यांमुळे तिच्या मानेला दचके बसत होते  . राजचे तिच्याकडे लक्ष गेले. तो तिच्याजवळ सरकला, आपला एक हाथ तिच्या मानेच्या मागे टाकत तिला स्वतच्या कुशीत घेतले. 

" You deserve all the happiness , and you will get it .... I love you sweetheart "  तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि तिला घट्ट पकडत सीट ला मागे आपले डोकं टेकवून डोळे मिटून बसला.

छुटेया ना छूटे मोसे
रंग तेरा ढोलना
इक तेरे बाजो दूजा
मेरा कोई मोल ना
बोलना माही बोलना
बोलना माही बोलना

तेरे संग हँसना मैं
तेरे संग रोना
तुझमें ही रहना मैं
तुझमें ही खोना
दिल में छुपा के तुझे
दिल नइयो खोलना
मर के भी माही तोसे
मुँह न मोड़ना
बोलना माही बोलना
बोलना माही बोलना
छुटेया ना छूटे मोसे
रंग तेरा ढोलना
इक तेरे बाजो दूजा
मेरा कोई मोल ना
बोलना माही बोलना(बोलना)
बोलना माही बोलना(माही बोलना)

*******

" नंदिनी, come soon home, their is a surprise for you " ........ राहुल ने नंदिमिला मेसेज केला.

******
" प्रेम आणि काळजी इतकीही नको की त्यामुळे समोरचा दुबळा बनेल , मग नातं कुठलेही असू देत " खऱ्या नात्यात  उन्नती होते, अधोगती नाही ????????

*****
क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️