Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 61

Read Later
नंदिनी...श्वास माझा 61

भाग 61

 

 

राज ने घरी सगळ्यांना नीट समजावून सांगत नंदिनी ला बाहेर शिकायला जाण्यासाठी परमिशन मिळवून  दिली होती. राज साठी हा निर्णय घेणे खूप कठीण होता, कारण जेव्हा तो दूर गेला होता त्या नंतर त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेले होते , त्याने कधीच विचार नव्हता केला असे काही वेगळेच त्याच्या बाबतीत घडले होते. आता परत तेच होत होते, आता नंदिनी बाहेर जात होती, वारंवार चांगल्या विचारांपेक्षा वाईट च विचार त्याचा पिच्छा पुरवत होते , पण कुठेतरी चांगले घडेल असेही स्वप्न तो बघत होता, मनावर दगड ठेवून त्याने नंदिनी ला जायची परमिशन दिली होती.

 

घरातले सगळे तसे तयार झाले होते, फक्त आजीसाहेब आणि आई थोड्या नाराज होत्या, पण नंदिनी ने त्यांना आपल्या लोभस बोलण्याने त्यांना मनावले होते. नंदिनी आपल्या जायच्या तयारी मध्ये लागली होती. राज ने तिला पोहचून द्यायचे म्हणत होता, पण ते पण नंदिनिने ऐकले नाही. ती तिच्या फ्रेंड्स सोबत जायचं म्हणत होती. नंदिनी पहिल्यांदाच अशी एकटी जाणार होती म्हणून राज ला थोडी हुरहूर वाटत होती, पण तिच्या वर पूर्ण विश्वास ही होता,  ती स्वतःची काळजी घेऊ शकते , ती आता चांगलीच रफ अँड टफ झाली होती त्या बाबतीत, फक्त राज चे मन टफ नव्हते झाले तिच्या बाबतीत.

 

नंदिनी ने तयारी सुरू केली होती. कॉलेज मधले सगळे प्रोजेक्ट्स असिग्नमेंट्स पटापट पूर्ण केले होते. अनाथ आश्रम मध्ये जाऊन सगळ्या फ्रेंड्स ला भेटून आलो होती. कॉम्प्युटर क्लास ची फीस भरून तिने वर्षा चा कॉम्प्युटर क्लास सुरू केला होता. मित्र मैत्रिणी सोबत गप्पा गोष्टी पार्टी झाली होती.  राहिलेली सगळी छोटी मोठी कामे पूर्ण केली होती. 

 

राज ने अमेरिका ला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची लिस्ट केली होती. त्या प्रमाणे काम सुरू होते. नंदिनी साठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसेन्स वैगरे सगळे काढून घेतले होते. आता फक्त ऑफिस मध्ये जाऊन रिझाइन करायचे तेवढे राहिले होते. 

 

" मिस नंदिनी, तुम्हाला ऑफिस चे रुल्स माहिती आहेत ना ?? मग हे असे वेळेवर तुम्ही कसे काय रिझाइन करू शकता? .... ठाकूर

 

" हो सर , मला सगळे रुल्स माहिती आहे. पण हे असे अचानक झाले आहे , म्हणून वेळेवर सांगावे लागत आहे, हवे तर माझी लास्ट मंथ चा पगार कट करा "....नंदिनी

 

 

" तुमच्या जागेवर आम्ही लगेच कसे काय दुसरे कोणी भेटणार आहे ? " .....ठाकूर

 

 

" सर, प्लीज, मला परत अशी संधी नाही मिळणार, मी रिक्वेस्ट करते, प्लीज माझं रिझाइन लेटर ॲक्सप्ट करा. " .....नंदिनी

 

 

" देशमुख सर , कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीत?? हे रुल्स च्या अगैंस्ट आहे" .....ठाकूर 

 

" सर,जर मी देशमुख सरांकडून परमिशन मिळवली , तर तुम्ही माझं रिझाइन लिटर ॲक्सेप्ट कराल ??" ....नंदिनी

 

" Okay, try... पण  ते नाही देणार " ..... ठाकूर

 

" एकदा प्रयत्न तर करून बघते " ...नंदिनी

 

" Go ahead " ...... ठाकूर 

 

" Thank you sir "....म्हणतच नंदिनी राज च्या कॅबिन जवळ गेली. दार उघडणार तेवढयात तिला तीच डोअर नॉक वरून झालेले भांडण आठवले...आणि ती स्वतः शीच हसली..

 

" किती मूर्ख आहोत आपण, त्या लहान गोष्टीचा किती मोठा बाऊ केला होता. राज कसा आहे आपल्याला सगळं माहिती असताना उगाच त्याला त्रास दिला होता. कुठलीही मुलगी किती पण प्रयत्न केला तरी ,तो स्वतः जवळ कोणालाच भटकू देत नाही , किती लकी आहे ती मुलगी, जिच्या वर राज प्रेम करतो, पण त्या बरोबर खुप मूर्ख पण आहेच, की ती त्याचा स्वीकार करत नाही आहे ....पागल आहे ती, पूर्ण जगात सापडणार नाही असा आहे माझा राज , खूप निर्मळ . देवबाप्पा लवकरच राज च्या आयुष्यात त्याला त्याचे प्रेम भेटू देत, त्याला सुखी कर ,  बाकी काहीच नको मला..." नंदिनी मनातच बोलत वरती बघत हाथ जोडले. ... आणि मग डोअर नॉक केले. 

 

" Yess , come in "........ राज चा आवाज आला

 

नंदिनी दार उघडून आतमध्ये गेली.  समोर राज चेअर बसला फाईल मध्ये बघत काहीतरी करत होता. 

 

" कसलं गोड दिसते हे ध्यान .....आणि व्हाईट मध्ये तर भारीच क्यूट दिसतो ".....नंदिनी त्याला कामात मग्न बघून विचार करत होती. त्याला बघून आपसूकच तिच्या ओठांवर गोड स्मायल आली. 

 

 

राजच्या पुढे एक छोटं चॉकलेट दिसले , त्याने मान वर करत बघितले....

 

" राज , ठाकूर सरांना फोन कर , माझं रिझाइन लेटर ॲक्सप्ट करायला " ....नंदिनी ने परत एक चॉकलेट त्याचा पुढे ठेवले. 

 

" Oh ho, मॅडम रिश्र्वत देत आहेत तर ?" .....राज हसतच तिच्या कडे बघत बोलला. नंदिनी ने त्याचा आवडीची चॉकलेट्स आणली होती. 

 

" मला माहिती तुझ्याकडे हे चालत नाही, पण प्लीज.."....तिने परत एक चोकलेट खिशातून काढत त्याच्या पुढे ठेवले.

 

 

" Oh God , आता कामात लक्ष कसे लागायचं, इतकी गोड मुलगी, इतकी सारी चॉकलेट समोर अस्तांना " ....राज फाईल बंद करून बाजूला ठेवत बोलला.

 

" मग इतकं सगळं गोड आहे तर गोड काम कर ना " ....नंदिनी ने परत एक चॉकलेट त्याच्या पुढ्यात ठेवले.

 

 

" तू तर म्हणाली होती , तू हॅण्डल करशील ?" .....राज 

 

" तेच तर करते आहे ..... बॉस पटला की सगळे ऑफिस आपलेच मग ".....नंदिनी ने परत एक चॉकलेट काढले नी त्याच्या पुढे ठेवले. 

 

" ओह, अख्खं चॉकलेट चे दुकान आणले आहे तर .... गूड " .......राज

 

" हो दुकानदाराला सांगितले, आमचे साहेब भारीच स्त्रिक्ट आहेत, लवकर ऐकायचे नाही ,दिले मग त्याने " ....नंदिनी परत एक त्याच्या पुढे ठेवले.

 

" Impressed"...... राज

 

" आता प्लीज, लगेच हो म्हण, " ....नंदिनी ने एक चॉकलेटचे रॅपर काढत त्याला खाऊ घालायला त्याचा पुढे धरले.

 

" इतकी गोड रिक्वेस्ट कोण नाकारू शकते काय ? " ...त्याने तिचा हाथ पकडला नी तिलाच ते चॉकलेट खाऊ घातले, नी नंतर तिचाच हाथ पकडून उरलेले चॉकलेट स्वतः खाल्ले..

 

" मिस्टर ठाकूर, मिस नंदिनी चे रिझाइन ॲक्सेप्ट करा" ...राज फोनवर बोलून फोन ठेऊन दिला. 

 

" Thank you " .... नंदिनी आनंदाने उड्या मारत होती.  नंदिनी टेबल वरचे चॉकलेट्स उचलायला गेली. 

 

" Sorry, these are mine only....." ... राज ने ते सगळे उचलून आपल्या बॅग मध्ये टाकले.

 

" अरे तू किती हेल्थ कन्शीअस आहेस ".......नंदिनी

 

" असू दे , तू नसणार आहे , तुझी आठवण आली की कामात येतील ते" .....राज

 

राज चे बोलणे ऐकून तिचे मन भरून आले, पण तिने कंट्रोल केले.

 

 

"  कॉफी घेशील??" ....राज 

 

" हो ....." ....नंदिनी

 

" राज ने फोन करून दोन कॉफी ऑर्डर केल्या ..." 

 

गप्पा करता करता दोघेही कॉफी घेत होते..... गप्पा काय, नंदिनी राज ला ऑफिस मध्ये या मुली पासून दूर रहा, तिच्या पासून दूर राहा, काय करायचे, काय नाही असे इंस्त्रक्शन्स देत होती. राज ला तिचं ऐकातांना खूप गम्मत वाटत होती. तो फक्त कुतूहलाने तिच्याकडे बघत तिचा चेहरा आपल्या डोळ्यात साठाऊन घेत होता. 

 

" Okay राज, भेटू घरी..." ...म्हणतच ती उठली आणि जायला वळली. राज तिला बघत होता..

 

 

"Raj, I want to hug you " ..... नंदिनी ने वळत राज कडे बघितले..

 

 

" Come"..... राज ने हात पुढे केलं.....तशी नंदिनी पळत येत राज ला बिलगली. राज ने पण तिला आपल्या मिठीत घेतले...नी डोक्यावरून तिला कुरवाळले....त्याच्या

 

" नंदिनी फक्त दूर जायच्या विचारानेच तू अस्वस्थ होते आहे, खरंच मी राज ला सोडून राहू नाही शकत काय?? राहुल म्हणत होता तसेच आहे काय?? नंदिनी जायचे आहे ना , मग स्ट्राँग रहा, नाहीतर जाऊ नाही देणार हा मला" नंदिनी त्याच्या मिठीत असताना स्वतःशीच विचार करत होती . 

 

जवळ जाऊन तिला आता थोडे ठीक वाटत होते. 

 

" Okay, मी ठाकूर सरांसोबत नी बाकी सगळ्यांसोबत बोलून निरोप घेते." ....नंदिनी त्याचा मिठीतुन दूर झाली. 

 

" ह्मम......" राज

 

"बाय".......नंदिनी बाहेर निघून आली, आणि ठाकूर चा कॅबिन मध्ये गेली. 

 

" मिस नंदिनी, your resign letter is accepted" .... ठाकूर

 

" Thank you sir" .... नंदिनी

 

" मिस नंदिनी, तुम्ही खरंच खूप हुशार आणि हार्ड वर्कर आहात, मी इथे आहे तोवर तुम्हाला इथे कधीही काम भेटेल ." ....ठाकूर

 

 

" Thanks a lot sir, तुमचे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत." ....नंदिनी

 

" मिस नंदिनी, one last question , I want to know your full name?" ..... ठाकूर 

 

" सर, तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच माझ्या पूर्ण नावामध्ये खूप इंटरेस्ट होता?" ..नंदिनी हसत बोलली

 

" हो, तुम्ही खूप हुशार आहात, तुमच्याकडे कोणतीही डिग्री नसतांना तुम्ही सगळे ट्रिकी प्रॉब्लेम्स सॉलव केले आहेत ...तुम्ही साधारण घरच्या नाही , काही तरी स्पेशल आहे , म्हणून मल खूप इच्छा आहे तुमचं पूर्ण नाव जाणून घ्यायची" .....ठाकूर 

 

" सर, एकदा लेटर बघा....मी लिहिले आहे माझे पूर्ण नाव, सी यू सून सर  " नंदिनी हसली नी बाहेर पडली

 

" Nandini Shriraj Deshmukh " ....... ठाकूर परत परत नाव वाचत होता...नी त्याच्या चेहऱ्यावर हसू आले.

 

" Great, ना सरांनी कोणते रुल्स तोडले, नी मॅडम नी सगळे रुल्स फॉलो केले"....Made for each other .. simply a perfect couple " 

 

 

*****

क्रमशः 

 

*******

 

पार्ट टाकायला आणि रिप्लाय करायला उशीर झाला, sorry त्याबद्दल .l थोडी कामात असल्यामुळे  पुढला परत टाकायला थोडा उशीर होईल. तू ही रे चे पोस्ट होतील रेगुरलेली . Thank you . Merry Christmas 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️