भाग 60
" जाऊ द्या तिला राहुल " ....रश्मी
" अगं, पण राज??? तो कसा राहील आज तिच्याशिवाय?? " ....राहुल
" ते दूर कुठे आहेत राहुल.... ते जरी शरीराने दूर असतील, तरी ते मनाने एक आहेत....तिला जाऊ द्या .....गरज आहे ती......तिला शोधू देत स्वतःला......इथे सगळ्यांमध्ये तीला कळत नाही आहेत तिच्या भावना......दूर राहील , ती शोधेल स्वतःला....तिला कळेल ती सुद्धा राज दादा शिवाय नाही राहू शकत, तीच प्रेम आहे त्यांच्यावर, पण तिला ते कळत नाही आहे .....थोडी मोकळीक ध्या तिला, बघू ध्या आजूबाजूला, जगात काय घडतं आहे ....कशी लोकं आहेत......आजपर्यंत ती दादा आणि तुमच्या सगळ्यांच्या नजरेतून जग बघत होती, जगत होती....आता तिला स्वतःला ठराऊ ध्या सगळं. तसे पण दादांनी तिला सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या प्रकारे शिकवल्या आहेत की ती कधीच चुकीचे असे काही करणार नाही...एक संधी घेऊ देत तिला " ....रश्मी
" अग राज तर असू दे, पण ती स्वतःच त्याच्या पासून दूर नाही राहू शकत . माहिती नाही हे असे सगळे अचानक तिच्या डोक्यात कुठून आले...?? आम्हाला माहिती पण नाही तिने हे सगळे केव्हा केले..?? " राहुल
" ह्मम, तिला माहिती असेल तुम्ही तिला परवानगी नाही देणार, म्हणून नसेल सांगितले तिने ....आणि ती त्याच्या शिवाय राहू शकणारा नाही म्हणतोस ना, तर तिचे तिला कळू दे हे सर्व......तुम्ही सगळे समजाऊन सांगणार तर ती कदाचित ॲक्सेप्ट करेल ही हे सगळं...पण ती जबरदस्ती केल्यासारखे होईल तिला....जे कदाचित राज दादांना पण नाही आवडणार.......तिचे त्यांच्यावर प्रेम आहे हे जर तिला तिचेच कळले तर हे नातं जास्ती बहणार....आणि तिचा हक्क आहे रे तुला तिची ओळख निर्माण करायची, स्वतःच्या भरोवाशावर काही करायचे......." रश्मी
" ह्मम........तू तिचीच साईड घे..." .... राहुल
" साइड नाही रे,मी कोणाचीच साईड नाही घेत आहे , पण एक मुलगी म्हणून मी तिच्या भावना समजू शकते आहे . तुम्ही सगळे तिला तुमच्या नजरेतून म्हणजे राज दादा ची बायको, तू तिला तुझी बहीण वा वहिनी म्हणून बघतोय, बाकी तिला सून म्हणाऊन बघत आहेत.....पण मी तिला, एक मुलगी म्हणून बघते आहे , तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे ....बाकी काही " ....रश्मी
" आणि मग राज?? त्याचं काय??? त्याचा विचार नको करायला .....त्याने आपलं अख्खं आयुष्य तिच्या नावाने केलंय ". ....राहुल
" राहुल अरे आता असे आहे काय की तुम्ही तिला भेटायला जाऊ शकत नाही??? राज दादा पाहिजे तेव्हा तिला भेटायला जाऊ शकतात....जग आता बरेच जवळ आले आहेत.....पाहिजे तेव्हा बघू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता....." रश्मी
" ह्मम" ....राहुल
" She deserves one chance to prove herself, to know herself " रश्मी
रश्मी आणि राहुल एका कॅफे मध्ये बसून झालेला प्रॉब्लेम डिस्कस करत होते....राहुल ला रश्मी चे बोलणे पटले तर नव्हते पण विचार करायला नक्कीच भाग पाडले होते
******
" राज, अरे तू काय बोलतो आहे हे ??? तिला त्रा काळात नाहीच, तुला पण आता कळेनासे झाले आहे??? तिने तुझ्यापुढे डोळ्यांतून थोडे अश्रू काय काढले, तू लगेच विरघळला....." .....आई
" आई , तिचं पण बरोबर आहे ग, आतापर्यंत ती तेच करत आली जे आपण तिला शिकवले, करायला लावले....आणि तिने ते सगळं हसत केले....कधीतरी उलटून काही विचारले आहे काय तिने ?...तिची ट्रीटमेंट, वेगवेगळ्या टेस्ट, किती त्रास व्हायचा तिला, हॉस्पिटल चा रस्ता दिसला तरी घाबरायची , किती ते इंजेक्शन्स ,मला पकडून उभी राहायची....पण मी म्हणतोय म्हणून तिने ते पण काहीच कंप्लेंट न करता हसत सहन केले....... , आज ती पूर्णपणे नॉर्मल आहे , तिला जगू दे........ तिला तिच्यासाठी जगायचं, स्वतःच स्वप्न पूर्ण करायचे आहे , तिला स्वतःच्या भरवशावर काही करायचे आहे , माझं प्रेम खरंच इतके सेल्फिष नाही आहे की ते तिला बांधून ठेवेल......मला तिला उडतांना बघायचे आहे ..." ...राज
" ठीक आहे ना, आम्ही तरी कुठे नाही म्हणत आहोत ....आम्ही फक्त हे म्हणत आहोत तिला तुझ्या नि तिच्या लग्नाचं खरे रूप सांग, तुझ्या प्रेमाबद्दल सांग , तुम्ही दोघं एक व्हा, मग हवे तिथे जा " ... आई
" आई, तिला हे सगळं काहीच नीट आठवत नाही आहे , मी सांगेल ही, आणि ती ॲक्सप्ट सुद्धा करेल, पण ही तिच्यावर जबरदस्ती नाही काय होणार?? मला ती तिच्या मनापासून जवळ हवी आहे . आणि जर आता ही गोष्ट काढली तिच्या पुढे तर ती ना तर इथे नीट राहू शकेल, तिथे नीट राहू शकेल......" राज
" ह्मम, रश्मी पण असेच म्हणत होती सेम, तिचे म्हणणे आहे की तिला एक संधी तर द्यायलाच हवी, तिला तिचे स्वतःचे अस्तित्व निर्माण कार्याला, एक संधी तिला स्वतहाला तिच्या भावना समजून घ्यायला..." राहुल
" आता ही रश्मी पण तिची साईड घेते आहे ???? काय झाले आहे तुम्हा सर्वांना?? " ...आई
" ती साईड नाही घेत आहे , ती फक्त येवढे बोलली की ती एक मुलगी म्हणून तिच्या भावना समजू शकते...." ....राहुल
" अरे , काय हे तुम्ही भावना, स्वप्न, अस्तित्व लावून ठेवले आहे ....???...आमच्या वेळ असे काही नव्हते....जे सांगितले मोठ्यांनी ते निमूट पणे ऐकले.....आमची काय लग्न नाही झालीत, की आमचे संसार नाही झाले...... तुमचं हे नव्या पिढीचे हे भलतंच काहीतरी असते " ...आई चिडत बोलली
" आई तुझी किती स्वप्न होती......तुला गाणं म्हणायला आवडत होते, तुला पुढे शिकायचं होते....?? होती न तुझी स्वप्न काही.....पण तू बाबांना नाही आवडत म्हणून हे काहीच केले नाही...फक्त घर एके घर....तुझं सगळं आयुष्य तू आमच्यासाठी, या घरसाठी वाहून घेतले " ....राज
" घर सांभाळणे, म्हणजे मी काय वाईट केले काय??? की मी हे नको होते करायला???" आई
" तू काहीच वाईट नाही केले, तू तर खूप छान आई आहेस, गृहिणी आहेस......पण आई तू स्वतःसाठी कधी जगली....स्वतःच्या आवडीनिवडी साठी काही करू शकली काय...?? तुला जर ते पण करायचा चांस भेटला असता, तू किती आनंदी राहिली असती......??? मी बघितले आहे तुला एकट्यात रडतांना ........तेव्हा तुझ्यासाठी काही करू शकलो नाही, पण आता , आता मी करू शकतो, माझ्या हातात आहे हे......" राज
राज च्या बोलण्याने सगळेच निशब्द झाले होते....कोणाला काय बोलावं काहीच कळत नव्हते.....कुठेतरी त्याचे बोलले बरोबर ही होते..
" आई, संसार दोघांचा मिळून असतो....जबरदस्ती केली तर तो चुर्गळतो, एक जीव त्यात घुसमटतो.....मला जबरदस्तीने संसार नाही करायचा, नकोत मला तिच्या मनाविरुद्ध मुलं.....आणि देवाला जर वाटते आहे माझं तिच्यावरचं प्रेम खरं आहे तर ती येईल परतून...." राज
" आईसाहेब , तुम्ही तरी समजावा याला....." आई
" ते कोणाचं ऐकतात, जे आज ऐकणार आहे ???, त्यांना नेहमीच स्वतःची मनमानी करायची असते...." .....आजिसहेब
" अहो बाबा.....तुम्ही तरी बोला काही???" ...आई आबांना म्हणालो
" नीती, तो बरोबर बोलतो आहे ....आणि रश्मी ने सांगितल्याप्रमाणे तिला एक संधी तर द्यायलाच हवी....." आबा
" यांचे तर आपलं सगळं वेगळेच असते....यांना विचारून काहीच फायदा नाही..." आजिसहेब
" मला एक सांगा, जर आपली मुलगी असती, आणि तिला शिकायला बाहेर जायचे असते, तर आपण काय तिला परवानगी दिली नसती???? नंदिनी सून तर आहेच, पण त्या आधी ती या घरची मुलगी आहे....मला तरी तिला एक संधी द्यायला काही हरकत नाही.....इतके दिवस वाट बघितली, थोडे दिवस आणखी" .....आबा
" आई , मी जेव्हा अमेरिका ला जाणार होतो ना, तेव्हा ती सुद्धा खूप घाबरली होती.... मी परतून येणार की नाही त्याची तिला भीती वाटत होती, खूप रडली होती ती, तिला नको होते मी तिला सोडून जावे....ती तरी फक्त सहा महिने म्हणते आहे, मी पाच वर्षासाठी जाणार होतो, किती मोठा काळ होता हा या सहा महिन्यांपुढे??? तरी ती माझी वाट बघायला तयार होती. फोन वर रोज एकच सांगायची, " राज एक दिवस कमी झाला" , त्यातच तिला खूप आनंद व्हायचा....एक एक दिवस मोजत होती ती.... तिचं आयुष्य तिने माझ्याभोवती गुंफून ठेवले होते , माझ्याशिवाय तिला दुसरे काहीच नको होते. आजी आबा आणि माझ्याशिवाय कोण होत तिचे..??..किती लहान होती ती तेव्हा पण, फक्त अठरा वर्षाची , कितीशी अशी समज तिला???.....पण तिला माझी स्वप्न माहिती होती , तिला मी आनंदी हवा होतो, तिला मी माझी स्वप्न पूर्ण करायला हवी होती.....मग ती हे सगळं तेव्हा समजू शकली, तर मी आता का तिची स्वप्न समजू शकत नाही , तेव्हा तिने मला माझ्या निर्णयामध्ये साथ दिली, तर आता मी का तिला साथ नको देऊ??? तेव्हा नी आता मध्ये फरक इतकाच आहे की लग्न झाले आहे, लग्न फक्त माझे झाले आहे.......तिच्या परवानगीने केले होते काय मी हे लग्न??? हा सर्वस्वी फक्त नी फक्त माझा निर्णय होता......खर तर तिच्यासोबत हा अन्याय च केल्यासारखे होते ना , तिच्या परवानगीशिवाय तिचे लग्न केले....., मला ती हवी होती आई, तिला मी नाही, तेव्हा तर ती मला ओळखत सुद्धा नव्हती...." राज
" तू एका साईड ने विचार नको करू , तिच्या जागेवर जाऊन बघ नी मग विचार कर.....मला हे लग्न तिच्यावर लादायचे नाही " राज
राज चे बोलणे ऐकून आई शांत झाली होती......
आणि राज ने नंदिनी ला सांगितल्या प्रमाणे तिच्यासाठी सगळ्यांकडून परवानगी सुद्धा काढली होती.
*****
" Thank you अजिसहेब, thank you आबा, " म्हणत नंदिनी सगळ्यांना आनंदाने मिठ्या मारत होती......
" आई सॉरी ना , अशीच रुसली असणार आहे काय तू माझ्यावर??? " नंदिनी आई जवळ गेली तेव्हा त्या थोड्या नाराज होत्या...
" राज म्हणतोय म्हणून जाऊ देते आहे , नाहीतर मला हे अजिबात आवडले नाही आहे " .....आई
" आई, मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटते आहे , पण मी खरंच माझी काळजी घेईल आहे ..... प्लीज ना आता रागावू नकोस........बघ तू जर हसशील नाही ना, तर हे गालावरचे मार्क्स पण जाणार नाहीत.......मला कॉलेज मध्ये सगळे विचारात होते काय झालं म्हणून......सांगितले आईचे प्रेम आहे ते , हसना ग आता प्लीज".....नंदिनी
" तुझ्यावर प्रेम करतात ना सगळे, त्याचा फायदा उचलते......बदमाश आहेस.......जा नीट रहा म्हणजे झाले" ....आई तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत बोलल्या...
" Love you Mom...." ....म्हणतच तिने आईच्या गालावर किस केले...
राज दूर एका कोपऱ्यात भिंतीला टेकून हाथ फोल्ड करत उभा नंदिनीचा उत्साह बघत होता....तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याच्या पण ओठांवर स्मायल आले .....
" Thank you Raj , you are the best " नंदिनी
" लक्षात असू द्या हे ..... नाहीतर मनात येईल , हवे तसे बोलता " .......आजिसहेब
आजिसहेबांच्या बोलण्यावरून त्या दिवशी ती राज ला काय काय बोलून गेली ते आठवले....
" सॉरी राज , मला माफ कर, परत नाही बोलणार अशी " नंदिनी आपले दोन्ही कान हाताने पकडत लहानसे तोंड करत त्याच्या पुढे उभी राहिली.......
सॉरी नको म्हणू या आविर्भावात राज ने हसत नकारार्थी मान हलवली.......त्याच्या चेहऱ्यावरचे हसू बघून नंदिनी ला सुद्धा बरे वाटले........आणि ती त्याच्या गळ्यात जाऊन पडली.......त्याने सुद्धा तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला....
" बस, या मुलींना चांगलं माहिती , समोरच्याला कसे गंडवायचे.......चांगलं शस्त्र वापरतात या.......दोन अश्रू काढले की समोरचा विरघळला......" ....राहुल
" राहुल आगाऊपणा नाही करायचा हा आता.....सगळे आता मानले आहेत.....उगाच आता तू काही खापर फोडू नकोस ..." नंदिनी
" ये मीच समजावले जरा सगळ्यांना........तेव्हा कुठे तयार झाले सगळे " राहुल
" असू दे , असू दे ......" नंदिनी
" अरे खरंच, मला रश्मी ने पटवून सांगितले......नी मी इकडे ..." राहुल
" आणि तुला तिचं पटले पण??? Great" .... नंदिनी
" आता तिने सांगितले म्हणजे ऐकावे तर लागणारच ........सुखी राहायचं आहे मला....." ...राहुल
" बरं ते जाऊ दे नंदिनी......मस्करी खूप झाली.....तू खरंच एकटी गेली नाही की राहिली नाही आहे, आम्हाला काळजी असेलच ना ?" .....राहुल
" मी एकटी नाही आहे, माझ्याच कॉलेज चे आणखी चार लोकं सिलेक्ट झाले आहेत, हा आमचे सब्जेक्ट वेगळे आहे पण एकच कॉलेज मिळाले आहे , त्यातल्या तर दोन माझ्याच मैत्रिणी आहेत...आम्ही सोबत राहू......बाकी मला सेल्फ defence येते....मी स्वतःची काळजी घेऊ शकते.......आणि त्यातही मला जर खरंच काही प्रोब्लेम आला तर मी राज ला सांगेलच......" ...नंदिनी
" Okay......good then " .... राहुल
" बरं, जायचे कधी आहे ??? " काकी
" पंधरा दिवसांनी " .....नंदिनी हळूच अडखळत बोलत होती
" काय??? हे असे कुठे असते , येवढ्या लवकर??" राहुल
" सॉरी, ते मला पंधरा वीस दिवस आधीच माहिती झाले होते, पण मला तुमच्या सोबत बोलायला भीती वाटत होती, म्हणून हिम्मत नाही झाली सांगायची " ...नंदिनी
" Wah, great....." राहूल
" अरे बापरे , मग तर खूप कमी वेळ आहे तयारी करायला......" आई
" हो आणि राहुल??? ही नसणार तर राहुल ची एंगेजमेंट कशी होणार??? आणि सहा महिन्यांनी येणार ही, तोपर्यंत तर बराच उशीर होईल.." काकी
" घ्या, हीचे आपले वेगळेच सुरू झाले...." राहुल
" आपण पंधरा दिवसांच्या आत करू एंगेजमेंट , मी बोलतो देसाई काकांसोबत " राज
" अरे वाह, छानच मग तर.....चला तयारी ला लागायला हवे " काकी
" Yeah....... engagement ........ मला तर खूप तयारी करायची आहे , पण येवाध्या कमी वेळात कसे होईल सगळं ??...... " नंदिनी
" नंदिनी, तुला जे हवे आहे लिस्ट कर.....आपण जाऊ आहे शॉपिंग साठी.....आणि तिथे पण जे जे हवे आहे ते सगळं लिस्ट करून ठेव , मी बघतो सगळं " .....राज
" नंदिनी, एक प्रॉब्लेम आहे?? तुझं ऑफिस??? मिनिमाम एक महिना आधी नोटीस द्यावे लागते ऑफिस सोडायच्या आधी......तुझा तो खडूस मॅनेजर ऐकेल काय??" ....नंदिनी
" त्याचे मी सांभाळते, you don't worry, आणि तू विसरतो त्याचा बॉस चा बॉस पण आपल्या मुठ्ठीत आहे ......" नंदिनी राज कडे बघत राहुल ला डोळा मारत बोलली....
" तू त्याचा पूर्ण फायदा उचल हा......देऊ नकोस काही" .....राहुल
" उनके लिये तो अपनी जान भी हाजीर है सहाब...,बस एकबार बोल दे....." नंदिनी
" त्याची जान तुझ्यात आहे"........राहुल राज कडे बघत मनातच बोलला...
" बस झाली तुझी नौटंकी...... चल कामाला लागा........" राहुल
" चला पंधरा दिवस आहेत.......एन्जॉय करूया खूप" .....नंदिनी
" हो.........." ...राज
*******
क्रमशः
*******
तुम्हाला बऱ्याच लोकांना आधीचा पार्ट आवडला नाही.......पण तो स्टोरी चा एक भाग आहे .......परत छोटा पार्ट आहे म्हणून complaint होती, म्हणून आज हा पार्ट टाकला आहे ......hope तुम्हाला आवडला असेल...
साधे सोपे, कमी detailing चे लिहिले तर मग त्या भावना कष्या कळणार......म्हणून लिहिले.....नसेल आवडले तर नक्की सांगा......भावनिक dialogue कमी करेल आहे...
Thank you..
********