Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 58

Read Later
नंदिनी...श्वास माझा 58

 

भाग 58

 

राहुल, राज दोघेही तयार होऊन खाली आले......नंदिनी, निती रागिणी सोबत कामात मदत करत होती...

 

 

नंदिनी, हे काय किती साधे साधे तयार झाला आहात तुम्ही??? आजिसहेब

 

आजिसहेब ते साडी मध्ये काहीच सुचत नाही हो...तशी पण मी साधीच छान दिसते असे मला कोणीतरी म्हणलं होते.........नंदिनी राज कडे बघत होती. 

 

तिचा वाक्य ऐकून राज गालाताच हसला......( जेव्हा ती एकदा कॉलेज मध्ये जायला तयार झाली होती तेव्हा तो तिला म्हणाला होता ....जे ती आता सांगत होती) 

 

सादगी मे ही सुंदरता होती है आजिसहेब......आप नाही समझोगी स्यानोरीटा.......... राहूल.

 

हो रे.....नी तू मोठा नटून थाटून आला.....रागिणी

 

हमें तो हक है नटने थटने का......शादी है भाई हमारी......राहुल.

 

राहुलचं ऐकून सगळे हस्याला लागले..

 

बरं नंदिनी, इकडे या ...आजी तिला रूम मध्ये घेऊन गेली नी तिच्या हातात एक बॉक्स दिला....येवढे घाला......नी त्या बाहेर निघून आल्या..

 

नंदिनी ने  त्यातले कंगण काढले नी ती ते घालायचा प्रयत्न करत होती....पण ते पेचाचे कडे होते....तिला ते घालता येईना....

 

आई घालून दे ना हे ......नंदिनी हातात कडे पकडून घेऊन येत काकी जवळ गेली

 

नंदिनी , माझे हात खराब आहे.....रागिणी कडे जा.....आई 

 

 

काकी, हे घालून द्या, नाहीतर आजिसहेब ओरडतील मला .........नंदिनी

 

नंदिनी.... अग बघ आता पाहुणे येण्याताच आहेत....बरीच कामं आहेत बघ माझी राहिलेली......... म्हणतच काकी त्यांच्या रूम मध्ये निघून आल्या..

 

राज सोफा बसला फोन मध्ये काहीतरी करत होता......अचानक शांतता का झाली म्हणून मान वर करत इकडे तिकडे बघितले.....तर तिथे कोणीच नव्हते......खिडकी जवळ एका साईड ला टेकून उभी हाताकडे बघत  काहीतरी करत त्याला दिसली.....

 

तिच्या हातातले कंगण घेत राज नंदिनी पुढे उभा राहिला.......त्याने कंगण घेतले बघून नंदिनी नजर वर करत त्याच्याकडे बघत होती ....

 

राज ने त्याचा हाथ पुढे केला.......नी तिच्याकडे बघत होता..

 

काय......???.....नंदिनी

 

हाथ दे तुझा........राज

 

तिने तिचा हाथ त्याच्या हातात दिला.......तिचा हाथ आपल्या हातात बघून त्याला त्याचा लग्नाचा दिवस आठवला......आणि एक गोड स्मायल त्याच्या ओठांवर आली......तो हळूवारपणे तिच्या हातात कंगण घालत त्याचे स्क्रू टाईट करत होता...... नंदिनी  शांत एकटक त्याच्याकडे बघत होती..........त्याला बघतांना तिच्या ओठांवर हलकीशी गोड स्मायल होती.......दुरून आई आणि काकी दोघांना बघत होत्या........त्यांना तसे बघून आई च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या...

 

वहिनी.... असं करून चालणार आहे काय....??....रागिणी

 

कधी माझं बाळ सुखावेल ग....?  काय वाईट केलंय त्याने कुणाचे...की देव पण त्याची  परीक्षा घेत थकत नाही  आहे...?? कधी त्याला त्याच्या हक्काचे प्रेम मिळेल??....निती

 

वहिनी, अहो देव पण चांगल्याच लोकांची परीक्षा घेतो.... तिचं प्रेम आहे हो त्याचावर.......तिचा पण जीव त्याच्यासाठी कासावीस होतो, आपण बघितले आहे ना या तीन वर्षात....फक्त तिला कळत नाही आहे .....रागिणी

 

हो, तिचे पण खूप प्रेम आहे ....पण त्याला नवरा म्हणून कधी स्वीकारेल ती??? तो तर नाही थकनार तिची वाट बघून.....पण मीच थकले आहे आता....देवा संपव रे ही परीक्षा आता.....निती आपले हाथ जोडत देवघराकडे बघत बोलत होती.

 

वहिनी इतका काळ धीर धरून ठेवला...आता बस थोडाच वेळ अजून....तिच्याकडे बघा......स्पष्ट दिसते आहे तिला पण तो हवाहवासा वाटतो आहे आता....फक्त कळत नाही आहे तिला.......रागिणी

 

ह्मम....असेच होऊ दे.....निती

 

दोघी आपली काम करत होत्या..

 

झालं........छान दिसत आहे........राज

 

कोण...?? हाथ की हे कंगण??.......नंदिनी

 

तुझ्या हातात हे कंगण.......राज 

 

खूप हुशार आहेस ना तू बोलण्यात..??......नंदिनी हसत होती

 

ह्मम...... तुझ्यासारखाच..........राज हसला

 

नंदिनी हसली आणि पुढे जात होती..

 

नंदिनी...............राज

 

काय......??...नंदिनी

 

खूप सुंदर दिसत आहेस........... राज

 

तू नेहमीच माझं मन ठेवायला असा बोलत असतो......नंदिनी

 

पण मी खरं बोलतो......राज

 

नंदिनी गोड हसली......नी तिथून पळाली....

 

रश्मी आणि रश्मी च्या घरचे आले होते......आज ते पहिल्यांदा घरी आले होते......रुची तर बाहेरून बघत बघत येतानाच घर बघून थक्क झाली होती.....रश्मी पण कौतुकाने सगळं बघत होती.  देसाई दाम्पत्याला पण सगळं सुखावस्तू घर बघून छान वाटले...... नाष्टापाणी आटोपत इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या......मध्ये जेवायला थोडा वेळ होता....मग नंदिनी रश्मी रुची ला घर दाखवायला घेऊन गेली....

 

 

आणि ही आहे आमच्या राहुल साहेबांची रूम........नंदिनी रश्मी रुची ला रूम मध्ये नेत बोलली.......त्यांच्या पाठोपाठ राहुलजी पळत आला होता...

 

Yeah wow .... ताई भारीच आहे ग जीजू ची रूम..... जिजू एक नंबर, आवडले मला.........रुची , राहुल 

 

हो ना , कशालाच काही मॅच नाही.........रश्मी राहुल कडे बघत बोलली

नंदिनी ला तर तिचं हसू आल...

 

रुची आपलं चॉईस कलरफुल आहे, आपण काही एकाच कलर ला चीपकुन नाही बसत....व्हरायटी आवडते आपल्याला......राहुल रशमिकडे बघत बोलला

 

जिजू, मला पण आवडलं हा..........रुची

 

 

रश्मी.....हा असाच आहे ग........जाऊ दे, ये इकडे बाल्कनी दाखवते......म्हणत ते बाल्कनी मध्ये गेले....

 

 

Wow.............. रश्मी

 

ह्मम.....हेच एक काम चांगलं केले आहे त्याने.......... झाडा फुलांची खूप हाऊस आहे ....हेच एक काम आवडीने करतो, अगदी न विसरता.......नंदिनी

 

ताई ला पण खूप आवडतात झाडं लावायला....पण आमच्या इथे चाळी मध्ये जागा नाही ना जास्ती...मग तिने तिकडे आश्रमा मध्ये लावले आहे...... तिथेले ये आजी आजोबा छान काळजी घेतात झाडांची.......रुची

 

अरे वाह.....हे तर मस्तच की मग.....काहीतरी मिळतेजुळते आहे........wah wah..... छत्तीस गुण मिळाले आपले. t...... राहुल

 

छत्तीस...??....रश्मी

 

अरे हो निसरागासोबत जो समरस होतो , त्यांचे सगळेच्या सगळे गुण मिळतात..... वेसे तो अपना छत्तीस का आकडा रहेगा बॉस........राहुल तिची मस्करी करत बोलला..

 

राहुल च्या बोलण्यावर रश्मीला हसू आले.....

 

जिजू......तुम्हाला काय आवडले होते ताई मध्ये..???...रुची

 

तुझी अख्खी ताई च आवडली........ राहूल

 

रश्मी त्याच ऐकून ब्लश करत होती.......तिला तसे बघून राहुल ला परत तिची मस्करी करायचा मूड झाला....

 

सगळीकडून मारकुंडीच दिसते ती.....म्हणून तर मारकुंडी म्हैस म्हणत होतो.........राहुल 

 

काय.....??....मी मारकुंडी म्हैस काय???...थांब संगतेच तुला.... रश्मी..

 

अरे मारकुंडी असली तरी काय.......खूप गोड म्हैस आहे ही.........राहुल

 

हो का म्हैसोबा............रश्मी त्याला मारायला त्याच्या मागे धावली......आणि आता ते मारामारी खेळत होते.......रुची ला आईचा फोन आला म्हणून ती खाली निघून आली.....नंदिनी त्या दोघांना कौतुकाने बघत होती..........आणि तीला पण ती आणि राज कसे मारामारी करत होते ते आठवले.......ती त्या दोघांना बघण्यात गुंतली होती......

 

अरे तुम्ही इकडे आहात तर.........नंदिनी मी तुलाच शोधत होतो............बऱ्याच वेळ पासून नंदिनी गायब आहे बघून राज तिथे आला होता...

 

हा.....यांना घर दख्वत होते........नंदिनी

 

बरं यांना बोलू दे..... आपण जाऊया..........राज

 

अहो दादा ठीक आहे.........आपण सगळेच गप्पा मारुया.....रश्मी

 

सगळे तिथेच बाल्कनी मध्ये असलेल्या सोफा वार बसले.....नंदिनी झुल्यात जाऊन बसली...

 

त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या....नंदिनी तिला आपल्या कॉलेज ऑफिस च्या गोष्टी सांगत होती....आणि तिने कोणाला कुठे मारले, पिदाडले तेही सांगत होती.......नंतर रश्मी पण तिच्या मारमारीचे किस्से सांगत होती.....दोघींच्या गप्पा खूप रंगल्या होत्या.......राहुल ने तर त्यांना बघून डोक्यावर हाथ मारून घेतला....

 

राहुल कासानुसा चेहरा करत राज कडे बघत होता......राज ला त्याला बघून हसायला येत होते.....

 

भाई, प्लिज..........राहुल

 

नंदिनी...........राज

 

हा राज.............नंदिनी

 

चल.............राज

 

थांब रे......बोलू दे ना ......किती मजा येते आहे......नंदिनी

 

नंदिनी, नंतर बोल ..मला काम आहे तुझ्या कडे.......राज

 

नाही,  मला बोलायचं आहे.........काम नंतर करू......नंदिनी, नंदिनी परत गप्पा मारायला लागली..... 

 

Sorry guys.........ती येत नाही आहे बघून, राज नी नंदिनीला उचलले नी तिथून घेऊन गेला.....

 

Thanx bro...... राहूल ने त्याला एक डोळा मारत अंगठा दाखवला....

 

रश्मी तर डोळे मोठे करत राहील आणि राज कडे बघत होती

 

तू सांगितले त्यांना वहिनी ला न्यायला......??...रश्मी

 

हो.....मग मला तुझ्यासोबत बोलायचं होते.....तिच्यापुढे कसे बोलणार......म्हणून सांगितले त्याला मेसेज करून......राहुल

 

बिचारी वहिनी.......किती क्यूट दिसतात ना दोघंही .....रश्मी.

ह्मम........रश्मी मला तुझ्यासोबत खूप महत्वाचे बोलायचे आहे....... राहुल 

 

हा बोल ना.........रश्मी

 

ते, नंदिनी ला समजत नाही राज तिचा नवरा आहे , ती अजूनही त्याला आपला मित्रच मानते.......राहुल

 

म्हणजे...??....ते नवरा बायको आहेत ना? त्यांचे लग्न झाले आहे ना...??....रश्मी

 

हो......पण......राहुल तिला राज नंदिनी बद्दल सांगत होता..

 

 

घर खूप छान आहे तुमचे........रेवती

 

धन्यवाद.....नंदिनी करत असते काही काही , तिला आवड आहे घर सजवायची.....हे पेंटिंग वैगरे पण तिनेच केलेले आहे...........रागिणी

 

किती कौतुक आहे ना तुम्हाला तिचं........खूप छान वाटले, तुम्ही सुनेला अगदी मुली सारखे ठेवले आहे......रेवती

 

 

ताई, आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं होते तुमच्यासोबत , नाही म्हणजे आता आपले संबंध जुळले, तर तुम्हाला पण आमच्या बद्दल सगळं माहिती असायला हवे.......निती

 

 

काही झालं आहे काय?? काही टेन्शन  ??......रेवती

 

नाही नाही, काही झालं नाही आहे........राज नंदिनी बद्दल सांगायचे होते........रागिणी

 

निती रेवती ला रजनंदिनी बद्दल सांगत होती...

 

रेवती सगळं ऐकून निशब्द झाल्या होत्या...

 

ताई तुम्हाला हे माहिती असावे म्हणून सांगतोय......रागिणी

 

वहिनी....आमच्या रश्मी खरंच सोन्यासारखे घर मिळाले बघा.......आता तर काहीच काळजी राहिली नाही......तुम्ही नंदिनी ताई ला इतके छान सांभाळून घेतले, राज दादांचे तर कौतुक करावे तेवढे कमीच....खूप आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी सगळ्यांचे, लवकरच ठीक होईल सगळे........ रेवती

 

 

 

राहुल चे सगळं ऐकून रश्मी चे डोळे आपोआपच पाणावले होते........

 

रश्मी काय झालं???........राहुल

 

राहुल तुला माहिती, जेव्हा तुमचं स्थळ आले तेव्हा तुम्ही इतके नावाजलेले, पैसेवाले, ...मला वाटलं तुमच्या सगळ्यांमध्ये माझी स्वतःची ओळख दाबून जाईल, माझं काहीच अस्तित्व राहणार नाही.....त्यासाठी मला तुला होकार द्यायला भीती वाटत होती.....मी माझी ओळख मिटू नये म्हणून धडपडत होते, आणि इथे तर त्या स्वतःलाच ओळखत नाही..........किती वाईट आहे हे सगळं........राज दादा तर खरंच...hatts off...... पण नंदिनी वहिनी.....त्यांची स्वतःसोबत किती द्वंद्व सुरू असेल......त्यांचे त्यांचा जवळ काहीच नाही.........राज दादकडे अटलिस्त त्याच्या प्रेमाच्या आठवणी तरी आहेत......पण नंदिनी वहिनी कडे तर काहीच नाही........रश्मी

 

ढोम्या , तू हे मुद्दाम केले ना.........नंदिनी कॉफी चा ट्रे घेऊन राहुल च्या रूम मध्ये आली.....तिच्या आवाजाने रश्मी ने चुपचाप तिचे डोळे पुसले........

 

मी काय केले......??....राहुल शहाणपणाचा चेहऱ्यावर आव आणत बोलला

 

मी बघितला तुझा मेसेज राज च्या फोन मध्ये..... तू भेट नंतर मला..........नंदिनी, ती राहुल रश्मी पुढे पुढे कॉफी चा मग ठेवत बोलली......नी परत जायला निघाली...

 

 

रश्मी उठून एकदम नंदिनी ला जाऊन मिठी मारली..

 

तिने अशी अचानक मिठी मारल्यामुळे नंदिनी एकदम गोंधळली.....नी तिच्या पाठीवर एक हाथ ठेवत राहुल कडे ..काय झालं म्हणून डोळ्यांनीच त्याला विचारले..... त्याने डोळ्यांनीच माहिती नाही म्हणून खुणावले....

 

रश्मी काय झाले ?? ...नंदिनी

 

काही नाही , thank you म्हणायचं होते........इतके छान घरात घेऊन आले तुम्ही मला........रश्मी आपल्या भावनावर कंट्रोल करत बोलली

 

हा....ते तर आहे, My family is the bestest family ......... नंदिनी 

 

आणि तुम्ही पण बेस्ट आहात...तुम्ही किती प्रेम करता सगळ्यांवर ,....you and Raj dada  are the bestest couple in the world .......you two looks very cute together...... रश्मी, रश्मी बोलत होती तेव्हा नंदिनी तिच्याकडे गोंधळलेल्या नजरेने बघत होती......

 

नंदिनी sss............ निती ने आवाज दिला

 

आले आई......... बरं तुम्ही बोला मी येते.....म्हणतच ती तिथून निघून गेली...

 

जेवणं वैगरे सगळं आटोपून ...लग्न बद्दल चे डिस्कस करून रश्मी आणि तिच्या घरचे परत गेले.

 

राज आणि मी कपल........असे का म्हणाली रश्मी.......??... बेस्ट कपल सारखं तर काहीच नाही आहे आमच्या मध्ये...??... कपल सारखेच काही नाही, मग बेस्ट कपल ....?? नंदिनी विचार करतच चालत होती की तिला आजिसहेबंच्या खोलित्तून राज लग्न असे काही शब्द कानावर पडले...नी ती तिथेच थबकली....

 

 

 

हे बघा आता राहुलचं लग्न जमले, छान सगळं व्यवस्थित सुरू आहे , त्यांची आता काही काळजी नाही, रश्मी चांगली मुलगी आहे....त्या सगळं छान सांभाळेल.......आता फक्त राज चे राहिले.....त्यांचं आयुष्य आहे तिथेच थांबले आहे किती वर्षापासून..??? त्यांचं आयुष्य आता पुढे जावे, लग्न, मुलं असे सगळं व्हावे....किती दिवस ते असेच राहणार आहेत??? प्रत्येक गोष्टींमध्ये वाट बघायची एक लिमिट असते......असे ते आपले आयुष्य वाया नाही घालाऊ शकत....त्यांना त्यांच्या प्रेमापुढे हे काहीच कळत नाही आहे ....??...असे येवढे मोठे आयुष्य नाही जगता येत.....काळजी वाटते त्यांची आता....... छोट्या नातावसारखे मोठ्या नातवाचे पण सुखाचा संसार बघायचा आहे आम्हाला.........आम्हा कोणाचं ते ऐकत नाहीत..... तुमचं ऐकतात ते ...तर मला असे वाटते की तुम्ही त्यांच्यासोबत बोलावे, त्यांना समजवावे...........आजिसहेब

 

हो आईसाहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात.....मला पण त्याची काळजी वाटते.....असा एकट्याने कसा जगणार आहे....?? प्रेमाचं ठीक आहे पण कालांतराने आपलं माणूस लागतेच सुख दुःख वाटून घ्यायला........आई

 

हो....त्यांना समजवा मग आता........ आजिसहेब

 

हो.....पण त्याला नंदिनीची काळजी आहे.....तो काहीच ऐकून घेत नाही.....नंदिनी पुढे त्याला काहीच दिसत नाही, त्याचं सुख कशात आहे त्याला कळत नाही आहे ....त्याचा लग्नाचा सगळं खेळ झाला आहे...त्या लग्नाला तरी कुठे लग्न म्हणता येईल.....भावाला भावली चे लग्न करायचे तसे झाले सगळे........आई

 

आम्हाला तर ते आवडेलच नव्हते......आमचा विरोधच होता तेव्हा........ आजिसहेब

 

नंदिनी दाराजवळ उभी हे सगळं ऐकत होती.........आपल्यामुळे राज चे आयुष्य खराब झाले असे तिला त्यांच्या बोलण्यावरून वाटले.....सगळं ऐकून तीच मन खूप भरून आले......आता तिला पुढे काहीच ऐकावल्या जात नव्हते......आणि ती रडतच आपल्या रूम मध्ये पळतच गेली........नी स्वतहाला बेड वर झोकून दिले....

 

 

हो....पण तेव्हा राज कुणाचेच ऐकुन घेण्याचा मनस्थिती मध्ये नव्हता........तो स्वतःच पूर्णपणे तुटला होता.........आई

 

ह्मम.....तेव्हा आम्ही जरा वाईट च वागलो त्यांच्यासोबत ....त्यांना तेव्हा सगळ्यात जास्त आपली सगळ्यांची गरज होती, तेव्हाच आपण त्यांना एकटे सोडले....त्यांचं नंदिनी वर चे प्रेम कळायला उशीर लागला आम्हाला.....त्यांची प्रेमाची परिभाषा वेगळी आहे....कधी कधी खूप कौतुक ही वाटते त्यांचे........पण तेव्हा जरा आमचे चुकलेच.....पण आता आपली चूक सुधारवी वाटते.....पण आता आम्हाला नंदिनी खूप आवडतात........आता त्यांच्याशिवाय घरात काही करामत ही नाही, आपल्या घराची शोभा आहे त्या.....हसरे खेळते घर केले त्यांनी .. ....आता नंदिनी ला बहुतेक सगळं समजते, तर राज ला एकदा सांगून त्यांना त्यांच्या भाषेत त्यांचं लग्न, प्रेम या गोष्टी समजावून सांगायला सांगा....राज चे ऐकतात नंदिनी....समजतील त्या.......आणि आपण आहोत बाकी सगळं सांभाळायला.......... आजी साहेब

 

हो आईसाहेब....तुमचं बोलणं अगदीच पटते आहे ....राज सोबत बोलून बघते........आई

 

हो.......आता घायी करायला हवी........आजिसहेब

 

***

 

नंदिनी ने  आजिसहेब आणि आईचे अर्धवटच बोलणं ऐकले होते........आणि तिला येवढेच कळले की तिच्यामुळे राज चे आयुष्य खराब झाले आहे..... 

 

माझ्या मुळेच राज एकटा आहे.......मी एकटी पडू नये म्हणून तो लग्न नाही करत आहे.......माझी काळजी आहे त्याला.......माझ्यासाठी तो एकटा आहे....राहुल पण बोलला होता त्याने त्याचे आयुष्य पणाला लावले आहे , हेच बोलत होता काय तो पण......त्याला एक मुलगी आवडते .....आता आई पण बोलली त्याचं प्रेम आहे तिच्यावर........त्याचा कपटामध्ये पण एक हार्ट चे पेंडंत होते, तिचेच असावे.........पण राज कदाचित माझ्यामुळे लग्न करत नाही आहे , जोपर्यंत मी त्याच्या आयुष्यात असेल, इथे त्याचा जवळ असेल तोपर्यंत तो पुढे जाणार नाही.......मला पण तो आनंदी हवा आहे......हो मला तो आनंदी असला की खूप आवडतो..... त्याचं हसणं आवडते मला....मला हवा आहे तो सुखी आनंदी....... येस मला त्याच्या आयुष्यात सुख आणायचे आहे.........मला त्यासाठी इथून जावेच लागणार....मी त्याचा समोर असेल तर तो दुसरा काही विचार करणार नाही.....मी नसेल इथे तर तो स्वतःचा विचार तरी करेल.........हो जाऊ ....तसे पण California University मध्ये झाले आहे सेलेक्शन.....हा चांगला बहाणा आहे त्याच्या पासून दूर जाण्याचा......हो हेच करू...............नंदिनी विचार करत होती......... ती बेड वरून उठली , आपले डोळे पुसले...मनामध्ये दृढ निश्चय केला ...नी राज च्या रूम मध्ये गेली.....

 

राज.............नंदिनी

 

ये नंदिनी.............राज लॅपटॉप घेऊन बसला होता....

 

राज तुझं काम झाले की सांग.....मला थोड महत्वाचे बोलायचे आहे तुझ्या सोबत आणि बाकी सगळ्यांसोबत पण........नंदिनी

 

नंदिनी.....तुझं ऐकायला मी नेहमीच फ्री आहो.......बोल काय महत्वाचं बोलायचे आहे.......राज लॅपटॉप बाजूला ठेवत बोलला...

 

राज, मी California University साठी प्रेपरेशन केले होते..... त्यात माझं सिलेक्शन झाले आहे...... स्कॉलरशिप पण भेटलिये.........नंदिनी

 

Okay.....good....... तू आहेसच हुशार आणि मेहनती.......राज

 

राज.....मला तिथे जायचे आहे...........नंदिनी शांतपणे म्हणाली..

 

काय........??........राज

 

*******

 

क्रमशः

 

*****

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️