Aug 09, 2022
प्रेम

नंदिनी... श्वास माझा 57

Read Later
नंदिनी... श्वास माझा 57

भाग 57

दुसऱ्या दिवशी रश्मी च्या घरचे येणार होते म्हणू सगळे तयारीला लागले होते . राहुल तर खूप एक्साईतेड होता , बाकी पण घरात उत्साहाचे वातावरण होते . मुलगी बघणं , लग्न जमावने , चालीरीती बोली हे सगळं खूप वर्षांनी घरात होत होते . तसे तर राज चे लग्न झाले होते पण तेव्हा हे असे काहीच झाले नव्हते . मुळात त्याचे लग्न हेच वेगळ्या परिस्थितीत, वेगळे असेच झाले होते, त्यात नंदिनी ला कोणी सून म्हणून स्वीकार करायलाही कोणी तयार नव्हते. राज आणि नंदिनीचे लग्न सगळ्यांच्या नाराजी मध्येच झाले होते. त्यामुळे आज घरात जो उत्साह होता तो तेव्हा नव्हता...म्हणून आज सगळेच खुश होते .

इकडे नंदिनी आपल्याच विश्वात होती. ती फक्त नी फक्त राजचाच विचार करत होती, त्याने तिला जे सांगितले होते की मलाच बॉयफ्रेंड बनव, सगळे प्रश्नच सुटतील...तिच्या डोक्यात तेच फिरत होते . राज आपला बॉयफ्रेंड हा विचारच करून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . राहुल आणि रश्मी चे लग्न जमले तेव्हापासून घरात होणाऱ्या गमती जमती, राहुल रश्मी ला भेटल्यावर झालेल्या गोष्टी नंदिनिजवळ सांगायचा, त्यामुळे आता तिच्या मनात पण लग्नाबद्दल चे कुतूहल निर्माण झाले होते. आपलं पण असे लग्न व्हावे , आपण पण अश्या गोड गोष्टी एन्जॉय करू असे तिला वाटायला लागले होते . पण तिच्या मनात लग्नाबद्दल बऱ्याच गोष्टी सुरू होत्या , तिच्या आणि राज च्या लग्न बद्दल च्या, त्याबद्दल पण तिला जाणून घ्यायची इच्छा झाली होती. पण या विषयावर कोणीच नीट उत्तर देत नाही हा विचार करून  पाहुणे गेल्यावर आपणच राज सोबत आपल्या झालेल्या लग्न बद्दल सगळं विचारायचे तिने ठरवले होते . 

नंदिनी घरचं आवरता आवरता राहुलच्या रूम समोरून जात होती तर तिला राहुल खूप कन्फ्युज असलेला दिसला .

ये दादया.....हे काय, किती पसारा करून ठेवला आहे ?? ....आणि हे काय ...तू हे इतके सगळे कपडे घालणार आहेस काय..??? ...नंदिनी त्याच्या रूम मध्ये जात बोलली

यार नंदिनी, बरे झाले तू आली, बघ ना काही कळत नाही आहे , काय घालू ते ....?? राहुल कन्फ्युज होत बेड समोर उभा कपडे बघत होता .

अरे काही घाल..........तू आहे तसाच दिसशील .....नंदिनीने त्याची मस्करी केली

म्हणजे...??

वाघाचे पंजे.....नंदिनी

नंदिनी मी आधीच टेंस आहो, त्यात ती फालतूचे pj नको मारू ग......राहुल

तू काय पहिल्यांदा भेटतो आहे काय तिला.... येवध टेन्शन घ्यायला....??..नंदिनी

अगं तसे नाही.....पण तरीही.....लग्न होतेय..... लाईफ मधलं सगळ्यात इंपॉर्टन्ट गोष्ट आहे ही........ राहूल

ह्ममम, राहुल तुला कधी कळलं रे की हीच माझी लाईफ पार्टनर आहे..?? म्हणजे मी तर तीच्यातले गुण बघून तिला पसंत केली....पण तुला असं कधी फील झाले की हीच ती आहे ...?? म्हणजे ती तुला अशी आवडायला लागली??......नंदिनी

जेव्हा तू तिचा व्हिडिओ दाखवला ना तेव्हाच आवडली, पहिल्याच नजरेत....सेल्फ डीपेंडेंत....आणि जेव्हा तू तिची माहिती सांगितली...तेव्हा तर कळलेच की हीच आपल्या घरी सून म्हणून शोभते.....आणि जेव्हा तिला भेटायला गेलो होतो हॉस्पिटल मध्ये ....तेव्हा जे काय ती चिडली होती ना माझ्यावर, तिच्या डोळ्यात बघितले, नी तिच्या प्रेमातच पडलो.......राहुल

मग ते तुला असे आजूबाजूला गुलाबी गुलाबी दिसत होते काय?? असं मुसिक वाजत होते काय.? ते जसे मूव्ही मध्ये दख्वतात तसे..?? ....नंदिनी

नंदिनी, ते तसे मूव्ही मध्येच होतात, असं रिअल लाईफ मध्ये नसते होत...... .......राहुल

ह्ममम.....नंदिनी ला थोड हिरमुसला सारखं झाले...

येडाबाई....... राहुल ने तिच्या डोक्यावर टप्पी मारली

बरं चल, सांग लवकर यातले काय घालू..??...राहील

घाल रे काही पण...... बर हे घे, नंदिनी ने त्यातलाच एक शर्ट काढून त्याच्या हातात दिला.

बरं काकी ने सांगितलं आहे , लवकर तयार हो, आता येतीलच ते .....नंदिनी

Okay boss....... राहुल

बॉस...??.... चल मी बघून येते माझा बॉस काय करतोय.....तू हो लवकर रेडी.....नंदिनी

ये नंदिनी, काय ग अजून पण राग गेला नाही काय?? सोड न आता......तो तुझ्या मतविरुधा काहीच करणार नाही.....मी तुला सांगतो, तो तू म्हणशील तर सगळे कंपनी चे रुल्स बदलून टाकेल......त्याने तर त्याचं पूर्ण आयुष्य पणाला लावले आहे....हे कंपनी वैगरे काहीच नाही त्याच्यासाठी....... राहुल

आयुष्य पणाला लावले म्हणजे...??...काय केलंय त्याने ??.....नंदिनी

तुझ्याशी लग्न केलंय ना......राहुल

का केले त्याने माझ्यासोबत लग्न??...नंदिनी

आता राहुल च्या लक्षात आले की बोलण्याबोलण्यात आपण काय बोलून गेलो..

अगं म्हणजे तू किती गडबड करतेस........तू जिथे असली तिथे किती सुनामी येते......किती मारझोड करते......तुझ्यासोबत जो लग्न करेल त्याचे आयुष्य पणालाच लागेल ना......राहुल मस्करी करत बोलला..

ह्मम....मला काहीच कळलं नाही.... चल जाऊ दे, तू आटोप लवकर.....बोलतच नंदिनी बाहेर गेली..

नंदिनी राहुलच्या बोलण्याचा विचार करतच आपल्या रूम मध्ये गेली..... नि खिडकी मध्ये उभी होत विचार करत होती.....

राज ने त्याचं आयुष्य पणाला लावले आहे...म्हणजे काय केले असेल...??....राहुल गमतीत पण कधी कधी महत्वाचं बोलून जातो....ती विचार करत होती..

नंदिनी.........झाली काय तयारी...???.......आई ने खालूनच आवाज दिला...

त्या आवाजाने नंदिनी आपल्या विचारातून बाहेर आली....

हो....करते आहे....येते......नंदिनी ने पण आवाज दिला

नंदिनी पटापट तयार झाली.....नी खाली गेली....राहिलेले सगळे थोडेफार बघत होती.

नंदिनी.....जा बघ राज तयार झाला काय.....?? त्याला कामाशिवाय काहीच दिसत नाही....आज पाहुणे येणार आहेत तेही विसरला असेल........जा एकदा आठवण करून दे त्याला....आई

हो...ठीक आहे.....बाकी इथलं झाले ना सगळे...??...काकी मी ते सगळे गिफ्टस पॅक करून तुमच्याच रूम मध्ये कपाटात ठेवले आहे.......नंदिनी , ओरडतच राज च्या रूमकडे जायला निघाली.

हो ठीक आहे.....राहुल ला पण एकदा आवाज देशील ग......काकी

हो........नंदिनी

हे काय राज, तू अजून रेडी नाही झाला...?? खाली सगळे वाट बघत आहेत........नंदिनी राजच्या रूम मध्ये जात बोलली......आणि त्याला बघून परत वळली.....तो टॉवेल गळ्यात घालून लॅपटॉप मध्ये काहीतरी करत होता.....

बस.....झालेच आहे, पाच मिनिट फक्त.....तो लॅपटॉप मध्येच बघत बोलला..

ह्ममम.........नंदिनी

बरं, नंदिनी एक काम कर ना....मला एक शर्ट काढून दे घालायला कपाट मधून.........राज

काय रे तुम्ही लोकं, आज माझ्याच मागे लावत आहात हे बोरिंग काम....इथे मला स्वतःचे कपडे सिलेक्ट करायला कंटाळा येतो....तुम्ही त्यात तुमचे सांगत असता......नंदिनी राज चे कपाट उघडत शर्ट बघत बडबड करत होती..

किती बोरिंग शर्ट आहेत याचे...... सेम पॅटर्न....फक्त रंग वेगळे आहेत......यात काय सिलेक्ट करायचे.......डोळे मिटून कु.ठलाही काढला तरी चालतो.......नंदिनी मनातच बडबड करत होती..

राज, हे सगळेच शर्ट फारच बोर आहेत रे........पण एक गंमत सांगू तुला......

हम.......राज काम करता करता ह्मम ह्मम करत होता...

तुझ्यावर ना हे बोरिंग शर्ट पण मग इंटरेस्टिंग होतात......कसला भारी दिसतो तू........त्या office मधल्या मुली ना भयंकर लाईन मरतात तुझ्यावर........उगाच चिडले मी काल तुझ्यावर.....तुझा तरी काय दोष म्हणा.......आता हे येवढे बोर कपडे पण तुला चांगले दिसतात.....हे नाही घालणार तर काय घालणार ना तू......

नंदिनी......काय बडबड करते आहे .....काहीच कळत नाही आहे ........  राज चे सगळे डोके कामात होते , ती काय बोलते आहे त्याकडे त्याचे लक्ष नव्हते...

उम्म.....कोणता देऊ........??.....नंदिनी

तुला आवडेल ते दे........राज

ह्मम......एक एक शर्ट बघत होती..

कुठला देऊ.....??...नंदिनी

किती कन्फ्युज होते आहे नंदिनी........ बर तुला मॅच होणारा दे.......राज

काय.....??......नंदिनी

तुझं कन्फ्युजन दूर करतो आहे.........राज

तू पिंक कलर घालशील???.....नंदिनी

तुला आवडत असेल तर दे .....तिथे डाव्या साईड ला आहे बघ..लाईट बेबी पिंक.......राज

नंदिनी आश्चर्यचकित झाली, कारण तो कधी असे  रंग घालायचा नाही, तरी तिथे कपाट मध्ये पिंक पीच शेडचे चार शर्ट होते........ती त्यातला एक शर्ट काढायला गेली तर तिथे  साईड ला तिला एक बॉक्स दिसला.....

लेडीज ज्वेलरी बॉक्स...??.....इथे काय करतोय....म्हणून तिने तो बॉक्स उघडून बघितला तर त्यात एक हार्ट शेप चे पेंडंत असलेली नाजूक चेन ठेवली होती......

कुणाची असेल ही....??..त्याला आवडते त्या मुलीची असेल काय....??..नंदिनी विचार करत होती...

सापडला काय....??....राज हातातला लॅपटॉप बंद करत बाजूला ठेवत बोलला...नी उठतच तिच्या जवळ मागे येऊन उभा राहिला

ह" .....त्याचा आवाज ऐकून तिने तो बॉक्स बंद केला नि जिथे होता तिथे ठेऊन दिला...

हो.....हे घे... म्हणतच तिने एक शर्ट काढला नी मागे वळली.... नी राज ला धडकली...

नंदिनी, हळू.........म्हणत त्याने तिला पकडले....

ह्मम....

आ sss....... नंदिनी विव्हळली, तिचं कानातले त्याच्या गळ्यातल्या चेन मध्ये फसलं होते, आणि ती जेव्हा त्याच्या पासून दूर जात होती, तिचा कान ओढल्या गेला...

तो जवळ आल्यामुळे आधीच तिला काहीच सुचत नव्हते....त्यात ते पेंडंत बघून तीच डोकं सरकलं होते.....त्यात ती ते अडकलेले कानातले काढायचा प्रयत्न करत होती, ते निघत नव्हते........ ती त्रासाली होती

Wait........ शांत हो, मी काढतो......म्हणत तो कानातले आणि चेंन काढायचा प्रयत्न करत होता.....त्याच्या हाताच्या स्पर्शाने अजून ती कावरीबावरी होत होती.....

काय बडबड करत होती......शर्ट बोर आहेत आणि काय......??...हा पिंक शर्ट विचारात होती...??...एकदा तूच हट्ट केला होता पिंक कलर माझा फेव आहे , तोच घालायचा.....म्हणून मग तेव्हा घेतले होते ते सगळे शर्ट...एका ने तुझे मन नव्हते भरले, मग हे येवढे घेण्यात आले .......राज तीच कानातले काढत बोलत होता.....पण आता नंदिनी ला काहीच ऐकू जात नव्हते.....

हा जवळ आला की च फक्त अँसिडीटी होते......एरवी नाही वाटत मला.....राहुल म्हणत होता अँसिडीटी आहे की दुसर काही.......चेक कर......मग हे दुसरं काही काय असेल.......??...आज दिवसभर लक्ष ठेवायला लागेल अँसिडीटी कधी कधी होते तर.....नंदिनी आपल्याच विचारात होती..

आऊच..........नंदिनी ने कानाला हात लावला..

दुखते आहे काय???......ते निघत नव्हते, म्हणून मग हे कानातलच काढले.......राज तिच्या कानावर फुंकर मारत चोळत होता........

नंदिनी, दूर हो याच्या..... हार्ट बिट्स वाढत आहेत खूप, हार्ट अटॅक येतोय काय.???....विचार करतच तिने त्याला धक्का दिला नी त्याच्या दूर झाली......तिच्या अश्या करण्याने तो पण अवाक झाला......

काय झाले नंदिनी?? Are you okay...?? मी काही चुकीचे केले काय.???.....राज

न..... नाही...... तयार हो आणि ये लवकर खाली....बोलतच ती तिथून पळाली

काहीच कळेना झाले आहे  या मुलीचे.........राज विचार करत ती गेली त्या दिशेने बघत होता..

 

 

*****

 

आता कथा शेवटच्या टप्प्यात आली आहे......जास्ती बोर नाही करणार.....thank you 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️