Aug 16, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 56

Read Later
नंदिनी...श्वास माझा 56

भाग 56

 

नंदिनी ला जेव्हापासून पेंटिंग बद्दल कळायला लागले होते आणि तिने कॉलेज जॉईन केले होते तेव्हापासून तिने त्या क्षेत्रातली अधिकाधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली होती......त्यातच तिला California University बद्दल कळले होते, नी तिथे एक सहा महिन्याचा कोर्स होता , त्यासाठी तिने परीक्षेसाठी बरीच मेहनत घेतली होती.......आणि त्यातच आता तिचे सिलेक्शन झाले होते......पण मोठा प्रश्न होता तो घरून परमिशन मिळणे.....

 

एक तीच स्वप्न होते पेंटिंग मध्ये मास्टरकी मिळवणं.....तिची आवड, तिचं पॅशन तिला एका वेगळ्या लेव्हल ला न्यायचे होते.... दुसरं म्हणजे इथे या काही दिवसांमध्ये तिच्या भावनांची, विचारांची, नात्यांची तिच्या डोक्यामध्ये खूप उलथापालथ झाली होती....तिच्या डोक्यात बरीच प्रश्न निर्माण झाली होती....त्याची उत्तरं सुद्धा तिला मिळत नव्हती.... एरव्ही इतर प्रश्न असते तर तिला राज कडून समाधानकारक उत्तरं सुद्धा मिळाली असती....ती बिनधास्तपणे राजला सगळं विचारायची........पण आता तिला पडलेली प्रश्न त्याच्याशीच संबंधित होते.......तिला त्याच्यासोबत बोलतांना आजकाल थोडा अवघडलेपण वाटायला लागला होता......त्यामुळे या परिस्थिती पासून थोड दूर वेगळ्या वातावरणात जाऊन स्वतःचा शोध घेऊ असे तिला वाटत होते.....

 

 

राज ला पण नंदिनिमध्ये खूप बदल जाणवायला लागले होते.....कधी त्याला तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसत होते, पण आजकाल ती त्याला बघून पळायला लागली होती....म्हणून तो पण थोडा कन्फ्युज झाला होता.....नंदिनी आपल्याला अवॉइड करतेय आहे असे त्याला वाटत होते....पण कधी ती एकदम फ्री वागायची तर कधी अगदी परक्यासारखी.....त्या दोघांमध्ये काहीतरी अवघडलेपण आले आहे त्याला जाणवत होते......एक दोनदा त्याने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता.....पण नंदिनी त्याच्यासोबत नीट बोलली नव्हती , त्यामुळे मग तो काही बोलला नाही.

 

 

**

 

बरं झालं नंदिनी लवकर आली आज ऑफिस मधून.......उद्या रश्मी च्या घरचे येणार आहेत ......लग्नाबाबत पुढले ठरवायला.........तर मला तयारीला थोडी मदत कर..........काकी

 

बरं.......मी आलीच फ्रेश होऊन.......नंदिनी

 

हो ये तुझ्यासाठी कॉफी करते......... बरं राज नाही आला आज....???.....काकी

 

 

कामात होता तो, माझं झालं, मी आले निघून.......नंदिनी

 

बरं ठीक आहे, जा फ्रेश होऊन ये.......काकी

 

हो........नंदिनी तिच्या रूम मध्ये निघून आली..

 

 

 

काकी नंदिनी आली काय ??.....राज ऑफिस मधून येत बोलला

 

हो, अरे आताच आली......तुला उशीर होईल म्हणाली.....म्हणजे तू कामात आहेस म्हणाली होती........ काकी

 

ह्मम ..... ओके...........राज आपल्या रूम मध्ये निघून गेला...

 

 

काकी.......बोला काय काम करायचे आहे .......नंदिनी फ्रेश होऊन खाली आली

 

हो सांगते...... अग आता ते उद्या पहिल्यांदा येतील आपल्याकडे तर मला वाटते आपण त्यांना काही गिफ्ट वैगरे द्यावे........तर माझ्याकडे काही गिफ्ट आहेत, मला सिलेक्ट करून दे .....काकी

 

ठीक आहे........चला.....नंदिनी

 

हो ते करूच ग आपण......आधी हे घे कॉफी.....आणि ही राज ला नेऊन दे .........काकी

 

छाया काकी ss....... राज ला कॉफी नेऊन द्या......नंदिनी ओरडली

 

त्या स्वयंपाक करत आहेत......तू जा ...तू देऊन ये........काकी

 

मी तुम्हाला मदत करते ना.......नंदिनी

 

ते नंतर कर, जा आधी त्याला कॉफी आणि हे स्नॅक्स देऊन ये.........काकी

 

ह्मम.......नंदिनी ने ट्रे घेतला नी राज च्या रूम जवळ येत दाराला नॉक करत होती....

 

नंदिनी......तुला दार नॉक करायची काय गरज आहे......तुला माहिती आहे तू कधी पण येऊ शकते इथे....... राज

 

 

असू दे, माणसानं आपल्या हद्दीत राहावं.......नंदिनी साईड टेबल वर ट्रे ठेवत बोलली......तुझी कॉफी नी स्नॅक्स......नंदिनी परत जायला वळली...

 

नंदिनी.........अजूनही तू नाराज आहे काय माझ्यावर.......ते मी ऑफिस मध्ये बोललो होतो.......राज पाठीमागून तिचा हाथ पकडत बोलला

 

राज, मला तुझ्यासोबत काही बोलायचं नाही.....हाथ सोड माझा........नंदिनी 

 

नाही, जोपर्यंत तू माझ्यासोबत नीट बोलत नाही, मी नाही सोडणार.....म्हणत त्याने तिला स्वतःकडे वळावले...

 

I need to stay in my limits...... तू माझा बॉस आहेस हे मी विसरायला नको.........नंदिनी नाराजीच्या सुरात म्हणाली..

 

नंदिनी, हे काय बॉस आणि एम्प्लॉइ च घेऊन बसली आहे, ते आपल्या सर्वांचे ऑफिस आहे......तिथे काही रुल्स आहेत ते आपल्या सगळ्यांना फॉलो करायचे आहे येवढच बोललो होतो मी.....राज

 

राज मला खरंच या कुठल्याच विषयावर बोलायचं नाही आहे.......मला काम आहेत.....जाऊ दे.......नंदिनी

 

नाही......नाही जायचं......... I want to see your smily face.......show me your sweet smile , then go.......... राज

 

 

मला असं खोटं खोटं हसता येत नाही....,आणि मुळात तू मला का अडवतो आहेस......कोण आहे मी तुझी.....???....मला तुझ्यासोबत काहीच वाद घालायचा नाही आहे.....माझं डोकं दुखतय, जाऊ दे मला.........नंदिनी

 

तू माझी बा.........बोलता बोलता राज चूप झाला...

 

अरे वाह....बेस्ट फ्रेंड्स भांडिंग......wow मजा येणार.....कोणाचा किती स्कोर झालाय............राहुल नुकताच ऑफिस मधून आला होता नि त्याचा रूम मध्ये जात होता की त्याला दोघांचा आवाज ऐकू आला.....नी तो रूम मध्ये आला होता......नी डोळ्यांनीच राज ला काय झाले म्हणून इशर्यानेच विचारात होता...

 

मी नाही भांडत आहे, हाच बडबड करतोय........मला जायचं, जाऊ दे........नंदिनी

 

बापरे, भयंकर तापलं दिसतंय........काय झाले....मी काही मदत करू शकतो......?? राहुल

 

तू काय मदत करणार.....मीच माझ्या लिमिट क्रॉस केल्या....मी विसरले होते हा माझा बॉस आहे ते..........नंदिनी

 

 

काय झालं.....??.....राहुल

 

माझ्या ग्रुप मध्ये एक संजना नावाची मुलगी आहे.....तिचे सिलेक्शन माझ्या एका प्रोजेक्ट मध्ये झाले .....तर तिला त्या प्रोजेक्ट मधून काढ म्हणते आहे.........राज

 

का.....??......राहुल

 

कारण मी डिझर्व करते ते.......नंदिनी

 

नंदिनी, पण तिला सिलेक्शन टीम ने सिलेक्ट केले आहे ....... रुल्स नुसार सुरू आहे ते........राज

 

हो आणि रुल्स नुसार तू मला आठवण करून दिली की तू तिथला बॉस आहे ते........I hate you......now please leave my hand........ नंदिनी चिडत बोलत होती......

 

पण तिचा I hate you शब्द राज च्या काळजाला भिडला होता...,.आधीच तिने मी तुझी कोण आहे म्हणत त्याला परके केले होते, त्यात आता हे शब्द....,.त्याला खूप वाईट वाटले नी त्याने तिचा हात सोडला.....

 

त्याने हाथ सोडला तशी नंदिनी त्याच्याकडे न बघता बाहेर चालली गेली....

 

Bro, are you okay.......??.... राहुल

 

ह्मम.......राज

 

भाई ती रागात आहे म्हणून बोलली तशी, राग शांत झाला की कळेल तिला......you don't worry....... राहुल

 

ह्मम....... राज

 

Okay मी आलोच फ्रेश होऊन, मला थोडे डिस्कस करायचे न्यू प्रोजेक्ट बद्दल......राहुल

 

हो.....ये......राज, राज च्या डोक्यात मात्र तिचे ते शब्दाच फिरत होते....आजपर्यंत कधीच ती राज ला असे बोलली नव्हती....

 

*****

 

नंदिनी खाली जाऊन तिने काकिंना त्यांनी सांगितलेली सगळी कामे केली........

 

छाया काकी मला भूक नाही आहे ,मी जेवणार नाही आता........माझ्यासाठी काही बनऊ नका......नंदिनी ओरडतच आपल्या रूम मध्ये गेली....

 

**

 

नंदिनी नाही आली जेवायला........थांब बोलाऊन आणतो......राज डायनिंग टेबल जेवायला आला तर त्याला नंदिनी दिसली नाही.....आणि तो तिला बोलवायला म्हणून जात होता

 

अरे ती भूक नाही आहे म्हणाली.......निती

 

का.....??...काही खाल्ले आहे काय तिने ...??.... राज

 

काय..... असिडिटी झाली करत असते आजकाल........काकी

 

अजून ठीक झालीच नाही......??....राहुल

 

काय माहिती.....आजकाल आपल्याच तालात असते......निती

 

मी बघून येतो........राज

 

बसा.....तुम्ही जेऊन घ्या.....त्या आधीच सांगून गेल्या आहे आज जेवणार नाही म्हणून........असू द्या नसेल वाटेत  बरं त्यांना........सूनबाई रात्री थंड दूध द्या त्यांना , बरे वाटेल...... आजिसहेब

 

माझ्यावरचा राग जेवणावर काढला आज...... राज मनातच  विचार करत चुपचाप कसातरी  जेवण केले.......आपल्यामुळे नंदिनी उपाशी आहे विचार करत त्याचासुद्धा घशाखाली अन्न गेले नाही.....कसेतरी पाण्यासोबत त्याने अन्न गिळले होते.....

 

**

 

येऊ काय मॅडम..........राहुल तिच्या रूमध्ये जात बोलला

 

आला आहेस तू ऑलरेडी.......नंदिनी पुस्तकात काही करत बोलली.

 

नंदिनी.....काय झालं इतकं चिडायला....???नक्कीच जे राज ने सांगितले तेवढे कारण नव्हते.....??....राहुल

 

तू त्याची वकिली करायला आला असेल तर मला काही बोलायचे नाही.....नंदिनी

 

नंदिनी, तुला आधीपासूनच माहिती आहे ना तो ऑफिस च्या बाबतीत किती स्त्रिक्ट आहे......नियमांनी वागणारा व्यक्ती आहे तो........ ऑफिस मध्ये घरचे, बाहेरचे सगळे सामान आहे त्याच्यासाठी......तो कधीच कुठला भेदभाव करत नाही..........राहुल

 

हो, पण मी फक्त येवढेच बोलली ना की त्या संजना ला त्याच्या ग्रुप मध्ये नको घेऊ......... येवढेसे सुद्धा नाही ऐकू शकत तो माझं........आणि वरून मला तिच्या समोरचं रागावला...... कॅबिन मध्ये यायच्या आधी नॉक करून ये म्हणून..........नंदिनी.

 

ओह.....तर तिच्या समोर रागावला हा प्रॉब्लेम आहे तर......हो हे राज च चुकलेच जरा.....राहुल

 

हो.....आणि मला म्हणाला he is the boss there....and his words will be the last words......... नंदिनी

 

तू वाद घातला.....??.....राहुल

 

वाद नाही, थोडासच बोलली , की तिला काढ म्हणून, नाही ऐकले त्याने.......नंदिनी

 

का.....का काढायचं तिला.........??...राहुल

 

मला नाही आवडत ती.......ती जास्तीच राज च्या जवळ जवळ करते.......नंदिनी, आपल्याच तालात बोलून गेली...

 

 

Ohh.....so you are feeling jealous?? ....... राहूल ला आता खरं कारण कळले होते, आणि त्याला हसायला येत होते......

 

मी का जेलस होऊ......मला ती आवडत नाही म्हणून म्हणाली...त्या मुली त्याच्यावर किती किती लाईन मरतात.., काय काय बोलत असतात.........या राज ला काहीच कळत नाही........नंदिनी

 

काय बोलतात....??? शिव्या वैगरे देतात काय??? खडूस बॉस टाईप........राहुल

 

नाही..... तस नाही.......नंदिनी

 

मग....??....शिव्या पण नाही देत, मग ..? .....राहुल

 

ते.....असेच.....म्हणजे......हॉट .....से......से......शी मला नाही सांगायचं....... नंदिनी

 

ह्मम........ सिरीयस मॅटर आहे.........राहुल आपलं हसू दाबत बोलत होता...

 

 

हो ना......त्या राज ला काहीच कळत नाही, ती संजना फाईल चेक चा बहाना करत त्याच्या मागे मागे , त्याच्या जवळ जवळ जाते...........ती काय करतेय बघायला गेले तर तो माझ्यावरच चिडला.............नंदिनी

 

 

नंदिनी, राज हँडसम नाही आहे..?? राहुल

 

आहे ......खूप हँडसम आहे......

 

 

हॉट नाही.......??

 

आहे......

 

मग......? हे तर कम्पलिमेंट आहे ना......वाईट काय आहे त्यात........राहुल

 

हो, पण मल नाही आवडत.....त्या का बघतात त्याला...????...नंदिनी

 

तो बघतो???.............राहुल

 

नाही.............नंदिनी

 

मग.....??....नंदिनी काहीच प्रॉब्लेम नाही आहे ..,..तू उगाच त्याच्यावर चिडचिड केली......आणि काय काय बोलून आली.......त्याला किती वाईट वाटत असेल......त्याची काय चूक आहे त्यात??........राहुल

 

त्याचीच चूक आहे......कशाला इतका चांगला राहतो तो....??मला नाही आवडत त्याला दुसऱ्यांनी कोणी बघितले, काही बोलले तर..........नंदिनी

 

राहुल ने डोक्यावर हात मारून घेतला....येवढे समजाऊनही   नंदिनीची गाडी परत फिरून त्याच रुळावर आली होती...

 

आणि हे असिडिटी च काय आहे.....??? किती दिवसांपासून सुरू आहे हे.....?? आज जेवायला पण नाही आली तू.......यात पण राजची च चूक दिसतेय मला......राहुल

 

हो....त्याच्यामुळेच होते....खूप वाईट आहे तो.....नंदिनी

 

असिडिटी आहे की अजून काही???? .....एकदा चेक कर नीट .........नी तो वाईट नाही आहे ........He is the best......... तू ओळखायला चुकते आहेस.........

 

बरं आराम कर........good night ......take care...... राहुल बोलून बाहेर आला....

 

 

You are in love Nandini .....you loves Raj...... accept it fast.......... राहूल मनातच बोलत तिथून चालला गेला...

 

 

नंदिनी असिडिटी अजून पण बरी नाहीं झाली आहे काय...??... उद्या डॉक्टर कडे जाऊ आपण........राज नंदिनीच्या रूम मध्ये आला 

 

 

मला कुठे नाही जायचं तुझ्यासोबत.......नी मी ठीक आहे........नंदिनी पुस्तक वाचायचं नाटक करत बेड वर झोपली होती....,

 

मग जेवायला का नाही आली......??.....राज

 

मला भूक नव्हती..........नंदिनी

 

माझा राग जेवणावर काढला ना..........राज

 

नंदिनी काहीच न बोलता चुपचाप पुस्तक वाचत होती

 

जेवायला चल........राज

 

नंदिनी काहीच बोलत नव्हती, चूप बसली होती....

 

I am very much Sorry...........raj

 

नंदिनी ने पुस्तक चेहऱ्यावर धरले....

 

चल जेवायला.......राज

 

मला भूक नाहीये.......नंदिनी

 

मला माहिती आहे तुला भूक लागली आहे.......तू येते आहेस ??? मला तुला जबरदस्ती नेता येते........राज

 

आगाऊपणा करायचा नाही......मला भूक नाही आहे ....मी सांगितले आहे .......नंदिनी

 

ठीक आहे जशी तुझी इच्छा......म्हणतच त्याने नंदिनीच्या हातातले पुस्तक काढून बाजूला ठेवले.....नी तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतले......नी खाली घेऊन येत होता...

 

 

राज सोड मला......नंदिनी पाय झाडत होती....

 

राजने तिला वरती घेत अजून घट्ट पकडले...

 

Sh sss ....... आता मी जे म्हणेल ते चुपचाप ऐकायचे.......राज तिच्या डोळ्यात बघत बोलत होता...

 

नाहीतर..........नंदिनी चा आवाज आता नरम होत होता...

 

राज काहीच बोलला नाही....तो फक्त तिच्याकडे एकटक बघत होता....

 

तू हीपनोटाईझ करतोय मला........पण मी होणार नाही.......नंदिनी

 

काय.....??......... राज शॉक झाला

 

हो .....तू असा बघतो नी मग मला हीपनोटाईझ करतो.......मग मला काहीच कळत नाही....पण मी यावेळेस होणार नाही......नंदिनी

 

काय......??.तू पागल झाली काय....????......राज ने तिला डायनिंग टेबल वर नेऊन बसवले....नी किचन मधुन एका बाउल मध्ये पास्ता नी एका प्लेट मध्ये ब्राउनी केक चे दोन पिस आणून ठेवले.....

 

जितका राग काढायचा आहे माझ्यावर काढ, मारायची इच्छा असेल तर मार.....पण जेवणावर राग काढायचा नाही........आणि हे चुपचाप संपवायचं........राज

 

समोर ठेवलेल्या प्लेट्स बघूनच नंदिनीचा राग कुठल्या कुठे पळाला होता......तरी उगाच अटीट्युड दाखवत होती..

 

तू बनवलं आहेस???.....नंदिनी

 

ह्मम.........राज

 

ठीक आहे मग खाते, मला दुसऱ्यांच्या मेहनतीचा रिस्पेक्ट करता येतो.......म्हणत ती पास्ता नी केक वार तुटून पडली......खूप मान लाऊन, मिटक्या मारत आनंदाने खात होती........राज तर फक्त तिला बघत बसला होता.....तिला खातांना बघून त्याला तृप्ततेची ढेकर आली.....तीच पोट भरलेले बघून त्याचे पोट भरले होते.....

 

राज ने प्लेट्स सिंक मध्ये नेऊन ठेवल्या , नी नंदिनीच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.....

 

You are the happiness of me...... जर तू खुश नसशील तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही........राज तिच्या गालावर एक हाथ ठेवत तिच्या डोळ्यात बघत बोलत होता......... त्याच्या डोळ्या दोन अश्रूही जमा झाले होते......बोलतांना त्याचा आवाजात तिला खूप पेन जाणवला होता......त्याचे शब्द तिच्या काळजाला चिरून गेले होते......ती त्याच्याकडेच बघत होती...

 

संजना ला घेऊन तुला जो पण प्रॉब्लेम आहे उद्या ऑफिस मध्ये सोल्व करू.....आणि तू म्हणते आहेस तेच होईल...... कॅबिन मध्ये येताना तुला नॉक करायची गरज नाही....तुला पाहिजे तेव्हा तू कुठेही येऊ जाऊ शकते.....no one will stop you to do anything , anywhere....this is my promise to you ... फक्त खुश रहा सोन्या........ कंपनी, घर हे मला काहीच नको आहे .....तू जर आनंदी नाहीस तर हे सगळं मला नकोय......तू खुश आहेस....तर मी खुश आहे......... त्याचा डोळ्यात बरच पाणी जमा झाले होते......नंदिनी ला दिसू नये म्हणून त्याने मान वळवली......

 

चल झोप आता..........म्हणतच तो पुढे जायला निघाला...

 

 

सॉरी राज...........पळतच जात तिने राजला मागूनच मिठी मारली.........नी त्याच्या पाठीवर डोकं ठेवले.....नंदिनी ला रागाच्या भरात आपण काय बोलून गेलो....याची चूक कळली होती......त्याचा एक एक शब्दाने तिच्या मनाला घायाळ केले होते....तिला स्वतःची चूक उमगली होती.....आपण राज च मन किती दुखावले याची तिला जाणीव झाली होती....आणि पुढे जाणाऱ्या राजला ती बिलगली होती......

 

सॉरी.......मला तसे नव्हते म्हणायचे.......मला तुला hate you नव्हते म्हणायचे........ माझंच चुकलं ,मी ऑफिस चा वाद घरात नव्हता आणायला हवा होता......तुझी काहीच चूक नव्हती.....मीच उगाच वाद घातला ..... I am sorry Raj.......... I am sorry...... नंदिनी

 

 

तिचा सॉरी शब्द ऐकून त्याला आणखीच त्रास व्हायला लागला.....तिच्या एका हाताला धरून त्याने तिला पुढे आणले......

 

राज सॉरी, खरंच माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता.....मी रागात बोलून गेले...... मी हेट नाही करत तुला......मलाच कळत नाहीये मला काय होते आहे.......मी का अशी छोट्या छोट्या कारणासाठी भांडते आहे.......पण मी तुला हेट नाही करत...... सॉरी ना.......नंदिनी

 

Sh sass.....त्याने त्याचा एक बोट तिच्या ओठांवर ठेवला....... नको ना हे सॉरी,हे सगळं नको बोलू आता.......राज

 

मग असा का म्हणाला......माझ्या जगण्याला काही अर्थ नाही.........असा कसा तू काही बोलू शकतो.......तू नाही तर मी कुठे जाईल......आई नाही, बाबा नाही, बहीण नाही, भाऊ नाही, बालपण नाही, आठवणी नाही, मी कोण आहे ,का आहे, माझं अस्तित्व काय आहे....?? काहीच माहिती नाही............आणि तू असा बोलतोस....मी तर नसमज आहे..पण तू तर समजदार आहेस ना........मी तुझं मन दुखावले म्हणून तू पण माझे मन दुखावणार काय........ I really hate you.....खूप त्रास देतोस तू मला........नंदिनी रडतच त्याच्या छातीवर बुक्क्यांनी मारायला लागली.........

 

सॉरी.........आता नाही बोलणार असं..........त्याने परत तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतले.......नी वरती तिच्या रूम मध्ये नेत तिला तिच्या बेड वर झोपवले.......

 

Good night ........ तिच्या अंगावर पांघरून नीट करत तो त्याच्या रूम मध्ये जायला निघाला...

 

राज..........तू मला सोडून नाही जाशील ना............नंदिनी

 

तिचा आवाज ऐकून तो मागे फिरला......

 

नाही..............

 

पक्का प्रॉमिस..........

 

हो............

 

तुझी गर्ल फ्रेंड आली तरी...........

 

राज ने डोक्यावर हात मारून घेतला......

 

नंदिनी...... I am always with you....... झोप आता...

 

माझा बॉयफ्रेंड असला तरी.....

 

आहे का तुझा कोणी बॉयफ्रेंड.....???

 

नाही......

 

मग, उगाच नसलेल्या गोष्टींचा विचार का करतेस........

 

आला तर.........

 

मग असं कर मलाच तुझा बॉयफ्रेंड बनव.......तुझे हे सगळे प्रश्नच बंद होऊन जातील........,नंदिनी झोप आता .... फालतूचे काहीतरी डोक्यात घेऊन बसते तू....जो आपला असतो तो आपल्याच जवळ राहतो.......जर मी तुला तुझा वाटतो तर मी तुझाच राहील......... It's all depends on you....whom you want to keep in your heart.......now don't think much.......sleep tight..........

 

ह्मम.....good night.......

 

******"

 

क्रमशः 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️