नंदिनी...श्वास माझा 54

राजनंदिनी

भाग 54

छान उत्तम झाले जेवण........अन्नपूर्णा माता प्रसन्न दिसतेय........आबा

हो काकी, आणि गोडाचा शीरा तर खूपच टेस्टी.......मला गोड फारसे आवडत नाही.....पण शीरा ऑसम होता .....राहुल पाणी पीत बोलत होता..

शिरा रश्मी ने केला आहे ........रेवती

ते ऐकून राहुल ला जोरात ठसका लागला......

अरे हळू ......काकी त्याच्या पाठीवरून हाथ फिरवत म्हणाल्या.....नंदिनी आणि रुची ला तर खूप हसायला येत होते.....त्या दोघी तोंड दाबून हसत होत्या.....रश्मी ला तर लाजल्यासारखे झाले होते.....कोणीकडे बघू असे तिला झाले होते......

आई मी ठीक आहो......राहुल

चला म्हणजे आता रोज शीरा होणार ब्रेकफास्ट मध्ये...........नंदिनी राहुलच्या कानाजवळ खुसरपुसर करत होती...

हो..... जसं रोज डिनर मध्ये पास्ता बनतो......राहुल

व्हाटेवर..........नंदिनी

म्हणजे काय.....तुझ्याच एकटीचा लाड करायचा काय...????....आता माझा पण लाड करणारी येणार आहे.....जसा तुझ्याजवळ तुझा लाड पुरवणारा आहे.....आता तशीच माझी पण हक्काची माझा लाड पुरवणारी असणार आहे.......राहुल

म्हणजे...... राज वर माझा हक्क आहे ...??....तो माझा आहे काय....???...जशी रश्मी राहुल ची होणार आता.....??...नंदिनी राहुल कडे बघत आपल्याच विचारात हरवली होती.......

काय झालं........??....राहुल

ह......काही नाही.......माझाच लाड होणार जास्ती.......नंदिनी

Okay then .... wait and watch..... who's life partner is more superior......?? Yours or mine ......??? राहूल

राज माझा लाईफ पार्टनर आहे.......??? तो तर माझा फ्रेंड आहे......पण मग हा राहुल असा का बोलतोय...??...आमचं लग्न झालेय म्हणून म्हणतोय काय तो असा....??....पण आमचं लग्न तर लहानपणी झाले आहे......it was just a game.....it was not real marriage .....yess it was not...... मला तर आठवत सुद्धा नाही आहे नीट काही.....आजी पण बोलली होती एकदा...खूप गडबडीत झाले माझे नी राज चे लग्न.....ते लग्न खरोखरचे होते की गमतीचे......???........राहुल सारखे असे कांदेपोहे वैगरे तर काहीच झाले नव्हते.....??....शी....मला काहीच का आठवत नाही आहे.......माझं डोकं दुखतय.....नंदिनी डोक्याला हात लावत आपल्याच विचारात हरवली होती.....

नंदिनी काहीतरी विचार करते आहे बघूनच राहुल ने तिच्या डोक्यात लाईफ पार्टनर वाला कॉन्सेप्ट मुद्दाम टाकला होता...

नंदिनी...काय होते आहे ...??...डोकं दुखत आहे काय...??...... राज

ह.....काही नाही......ठीक आहे मी........नंदिनी

Okay then relax...... जास्ती विचार नको करू कशाचा.......राज

हो.......नंदिनी

चला तर मग, राहुल आणि रश्मी च लग्न पक्क समजायचं.........??..... आबा

हो, मुलांचा होकार असेल तर आम्हाला काही प्रोब्लेम नाही......रमेश देसाई

तुम्हाला राहुल बद्दल, त्याच्या जॉब बद्दल वैगरे काही जाणून घ्यायचं असेल तर विचारू शकता.......आबा

आबासाहेब......तुम्हा सर्वांना आता जवळून बघितले.....तुमचे संस्कार सगळं कळले....तुम्ही तुमच्या सुनांना तुमच्या मुलीसारखं मानता हे आपल्या या मोठ्या दोन सूना आणि नंदिनी ताई कडे बघून कळतच आहे.....त्यामुळे रश्मी आपल्या घरी सुखात राहील याचा आम्हाला जराही डाऊट नाही......आणि राहुल रावांबद्दल म्हणाल तर त्यांच्या बायोडाटा मध्ये त्यांचे एज्युकेशन डिटेल आणि जॉब , स्यालरी सगळं लिहिले आहेच, आणि रश्मी पण आपल्या पायावर उभी आहे..तर काही काळजी नाही.... राहुलराव रश्मी ला आनंदात ठेवतील ,खात्री आहे ........रमेश

तरीपण मोठा मुलगा कंपनी चा मालक आणि लहान त्याच्या हाताखाली काम करतो आहे ....तुम्हाला त्याबद्दल काही विचारायचं नाही ???....आबा

श्रीराज दादांबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे , ते किती हुशार आहेत.....त्यांचे इंटरव्ह्यू, लेख बघितले आहे आम्ही....त्यांचे विचार आपण विचार करू त्याही पलीकडे आहेत.....ते त्या योग्यतेचे आहेत म्हणून मालक आहेत......आणि राहुल राव त्यांच्या हाताखाली काम करतात आहे म्हटल्यावर काय बघ्याचे आहे.....आणि तसेही आम्हाला दोन भावांमध्ये काही comparison नाही करायची....दोघंही वेगवेगळे आहेत....ज्याच्या त्याच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळतोच..त्यामुळे काही काळजी नाही....रमेश

रमेश देसाईंचे बोलणे ऐकून सगळ्यांना समाधान वाटले .

राहुल......??....रश्मी...??......पुढले ठरवायचे मग????.आबा

हो आबा.....राहुल

रश्मी...??......आबा आणि बाकी सगळे तिच्याकडे बघत होते....

रश्मी ने पण होकारार्थी मान हलवली.......

चला , म्हणजे सगळ्यांना सगळं पसंत आहे .....तरी मला वाटते की आपण घाई नको करायला.....राहुल रश्मी ला एकमेकांसोबत थोडा वेळ घालवू देऊयात.....आणि मग लगेच साखरपुडा ठराऊ ......चालेल??...आबा

हो.....अगदी मनातले बोललात.....रमेश

ठीक आहे.......आबा

बरं आम्ही काय म्हणतोय......एकदा तुम्ही सगळे घरी या...सगळं बघून घ्या....... आजीसहेब

अहो...तुम्हा सर्वांना बघितले....घराचं काय येवढे..... रेवती

अहो रेवती ताई तेवढेच आपल्याला आणि आम्हाला रश्मीला भेटता येईल.......नाहीतरी ही मुलं काय.....बाहेरच भेटतील......निती

हो तेही बरोबरच......ठीक आहे ....रेवती

चला आता निघायला हवे....बाकी पुढल फोन वर बोलून ठराऊ.....रविकांत

हो ठीक आहे.....रमेश

रेवती बायकांना लावायला हळदीकुंकू घेऊन आली...आणि सर्व लेडीज ला हळदकुंकू लावले....

खूप गोड आहे तुमची ही मोठी सूनबाई............रेवती नंदिनी ला कुंकू लावत तिचे गाल ओढत बोलल्या.....

Thank you काकी.....म्हणतच नंदिनी ने त्यांना हग केले....

नंदिनी....निती तिला आवाज देत त्यांच्या पाया पड असे इशर्याने सांगत होत्या...

असू द्या हो.....मी तिच्या आई सारखीच आहे.......रेवती

आई..........नंदिनी मनातच काही विचार करत होती...

राज नंदिनिकडेच बघत होता......आणि आता नक्कीच ती आई बद्दल विचार करत असेल ...त्याला समजले होते , तो तिथे तिच्या जवळ जाऊन उभा राहिला.......नी कोणाला दिसणार नाही असा तिचा हाथ आपल्या हातात पकडुन घेतला......राज ने हाथ पकडला तशी नंदिनी त्याच्याकडे बघत होती......राज तिच्याकडे बघत तिला गोड स्मायल दिले.....त्याला तसे बघून नंदिनी सुद्धआपल्या विचारांतून बाहेर आली...

अगदी लक्ष्मीनारायण चा जोडा शोभतो.......... असेच नेहमी सोबत खुश रहा......रेवती राज च्या डोक्यावरून हात फिरवत बोलली

सगळ्यांनी हसत हसत निरोप घेतला......नी बाहेर कार जवळ आले.....राज आणि राहुल ने आजिसहेब आणि आबांना कार मध्ये नेऊन बसविले...

रश्मी....लवकर लवकर ये आता आपल्या घरी......नाहीतर मुलगा काही आता घरी नाही टिकायचा.........काकी मस्करी करत बोलल्या...

रश्मी ने हसतच मान हलवली......

आई sss......... अग काय तू........राहुल ने आपल्याच केसातून हाथ फिरवत आपला चेहरा दुसरीकडे वळवला......इतकं त्याला लाजयाला झाले होते...

जिजू फारच लाजरे आहेत बाबा आमचे......ताईच्या एकदम विरुद्ध...........रुची

ये गप ग.....रश्मी ने तिच्या पाठीत हळूच धपाटा मारला...

आई sss ग........ किती मारते...... जिजू सांभाळून हा....आमच्या इथे प्रेम करायची पद्धत ही अशी आहे .....जितका जास्त मार, तितके जास्त प्रेम........रुची

हा हा हा हा......मस्त आहे.......त्याच्या नशिबात असेच मारखाऊ प्रेम आहे.........नंदिनी हसतच बोलत होती..

बरं रेवती ताई येतो आम्ही.....या मुलांचे काही संपयाचे नाही......भेटू परत लवकरच........काकी

हो........रेवती

राज ने नंदिनिसाठी कार चे दार उघडले......नंदिनी आतमध्ये जाऊन बसली....

राहुल आजिसहेन आबांना घेऊन पुढे निघाला....त्या पाठोपाठ काकांनी गाडी काढली...,.नंतर राज आणि नंदिनी निघाले...

किती छान आहेत ना ते राज दादा नी त्यांची बायको नंदिनी वहिनी........किती क्यूट आहे त्या....नी किती सुंदर आहे..... असं वाटते आपला एक बोट लागला तरी मळतील त्या.......रुची

हो खरंच......आणि किती मस्तीखोर सुद्धा.....क्रिकेट खेळताना किती गोंधळ सुरू होता त्यांचा......रश्मी

हो...आणि आई तुला सांगते हे राहुल जिजू सुद्धा काही कमी नाही हा.......खूप मस्ती करत होते बाहेर....... राज दादा आणि जिजू भाऊ भाऊ वाटतच नाही....तेच दोघं बहिनभाऊ वाटत होते......रुची

खूप छान वाटली त्या तिघांची बाँडींग........रश्मी

हो ...सगळेच लोकं चांगले वाटले........आणि हो नंदिनी नी च तुला कुठेतरी बघितले म्हणे.....आणि अग हो....ती आली पण होती आपल्या घरी सर्वेक्षण की काहीतरी करतोय म्हणून , तहान लागली म्हणून पाणी मागायला आली होती.....तरीच तीला कुठेतरी बघितले आहे वाटत होते.....पण आठवतच नव्हते....त्यादिवशी जीन्स शर्ट वार होती.....नी डोकं बांधलेले होते.........आज किती वेगळी दिसत होती....रेवती

आई... अग.....तू अशी कोणालाही आपली पर्सनल माहिती देत असते काय.....??.... अग किती फ्रौड होतात आहे आजकाल.... असं कोणावरही विश्वास ठेवायचा काय...??...रश्मी

अग.....नाही ग....तिने काहीच पर्सनल विचारले नाही.....आणि इथे दारा बाहेरच बोलली बघ.....तहान लागली म्हणाली आणि पाणी मागितले, आणि असेच एक दोन पत्ते विचारले.....रेवती

बरं ठीक आहे....पण लक्ष ठेव......सगळेच लोकं चांगले नसतात.....रश्मी

हो.....रेवती...

पण ती बहुतेक आम्ही कसे आहोत तेच बघायला आली असणार......आता आपल्या दीराच लग्न करायचं म्हणजे मुलीबद्दल, परिवराबद्दल खात्री करायला नको......??....रेवती

ह्मम...ते पण आहे.......रश्मी

रश्मी तुला राहुल कसे वाटले.....??.आमची जबरदस्ती वैगरे तर नाही वाटली ना तुला??..म्हणजे काही असेल तर सांग......???......रेवती

चांगला आहे ग......फक्त थोडा भांडकुदळ वाटतो....रश्मी

हो....तू तरी कोणती शांत आहेस........रेवती

काय ग तू पण आई.....,..पण खरंच चांगला वाटला..दिसायला तर आहेच चांगला...पण त्याचे विचार पण चांगले वाटले......आता बोलला तसाच असेल तर बेस्ट च आहे बघ....... तस वाटते तर आहे तसाच असेल.......रश्मी

हो...घरतल्या सगळ्यांचेच विचार चांगले वाटत होते....नशीब काढलं बघ.......पुण्याईच म्हणावं...इतकं छान घर मिळाले......काळजी मिटली आता....बस आता या रुची ने चांगलं शिकावं नी असाच चांगला मुलगा मिळाला की मोकळे आम्ही......रेवती

आई फालतू फालतू सेंटी डायलॉग नको मारू ग आता.....रश्मी आपल्या आई च्या गळ्यात जाऊन पडली...


 

नंदिनी.....लाँग ड्राईव्ह वर येशील आज माझ्यासोबत......???....राज

वाह......नेकी और पूछ पूछ......,.नंदिनी

Thanks..... let's go then.....म्हणतच राज ने कार सुरू केली...

पण आज कसं काय अचानक....???.....नंदिनी

छान वातावरण आहे ......राज

पण मग मला बाईक ने यायचे होते........नंदिनी

बाईक ने पण येऊ कधीतरी....... राज

तुझं कधीतरी कधीच निघत नाही..........नंदिनी

जाऊया बाईक ने .......राज

पक्का प्रॉमिस...??......नंदिनी

हो........तू म्हणशील तेव्हा .......राज

राज खिडकी ओपन कर...... लॉक का केल्या.....??..... नंदिनी

थंडी हवा आहे नंदिनी..,.......राज

मग काय मजा येणार...???...माझ्यातरी साईड ची ओपन कर खिडकी........नंदिनी

राज ने सॉफ्ट मुझिक लावले आणि ड्रायव्हिंग एन्जॉय करत होता.....अधून मधून तो नंदिनी कडे बघत होता....

नंदिनी खिडकी मध्ये बघत पूर्ण हवा चेहऱ्यावर घेत एन्जॉय करत होती........

आऊच...............

काय झालं....???......राज ने कार रस्त्याच्या एका साईड ला घेत थांबवली..

ही...इथे साडी ची पिन टोचते आहे......नंदिनी आपल्या खांद्याजवळ हातांनी काहीतरी करत बोलत होती......आणि तीनी ती पिन काढली....

Okay......... आता ठीक आहे..?? उगाचच हे साडी वैगरे घालत बसली......??...ज्यामध्ये कंफर्टेबल वाटते तेच घालायचे ना............ राज त्रासिक सुरात बोलत होता..

ठीक आहे आता...... ये काय त्यात ......मला पण आवडते साडी घालायला.........हो म्हणजे सांभाळायला जरा कठीण असते..........पण ठीक आहे एखाद्या वेळेस चालते..........नंदिनी

ह्मम..........राज, राज ने कार सुरू केली

ये राज..........नंदिनी

काय.......??

तुला मुलगी सगळ्यात जास्ती कुठल्या ड्रेस मध्ये आवडते.....??? .........जाऊ दे तू तरी कुठे बघतो मुलींना........ wrong question ....... नंदिनी

काय.....??..म्हणजे काय.....म्हणायचं काय आहे तुला , मला मुलीमध्ये इंटरेस्ट नाही.......???.....राज ला तिची मस्करी करायचा मूड झाला..

हा ssss......... तुला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे....??...नंदिनी आश्चर्यचकित होत त्याच्या कडे बघत होती...

मुलींमध्ये नाही......फक्त एका मुली मध्ये आहे ....आणि हो मला ती साडी मध्ये खूप आवडते............राज ने तिच्या नाकावर टिचकी मारली..

नंदिनी नाक चोळत बसली...

कोण  आहे ती मुलगी....???.....खूप स्पेशल आहे काय तुझ्यासाठी...??....नंदिनी

ह्मम आहे एक......हो स्पेशल पण आहे......पण मी तिच्यासाठी स्पेशल आहो की नाही माहिती नाही मला......राज

का....??...तू तर किती हँडसम , सुपर आहेस........तिला तू का नाही आवडणार....??......नंदिनी

आवडत असेल ग........मी प्रेमाचं म्हणतोय........तीच माझ्यावर प्रेम आहे की नाही माहिती नाही........राज

मग सांगून दे ना तिला..........नंदिनी

आणि नाही म्हणाली तर..........???......राज

तर.....काय.......?? अशी कशी नाही म्हणेल ती.........मला सांग , मी बघते........नंदिनी

नंदिनी.....असा कोणाला फोर्स करता येतो काय.....???....कळेल कदाचित तिला हळू हळू....... वाट बघू........राज

म्हणजे राज ला अजूनही ती मुलगी आवडते.....त्याचा मनामध्ये अजूनही तीच आहे .......राहुल म्हणत होता ती.....नंदिनी स्वतशीच विचार करत होती

नंदिनी............राज

ह्मम.....??.....नंदिनी आपल्याच विचारत हरवली होती

तुला कसा मुलगा आवडतो.....??.....राज

मला तुझ्यासारखा नी राहुल सारखा...........नंदिनी

राज ला हसायला आले..........

का......काय झालं हसायला......?? ......नंदिनी

कॉलेज मध्ये वैगरे कोणी आवडत नाही....???......राज , आता राज तिच्या मनात काय असेल जाणून घेण्यासाठी बोलत होता..

शी.......ते तर मलाच घाबरतात........खूप फाटरू मुलं आहेत......त्यांच्यासोबत काय मजा.......माझ्यावर जर वाईट वेळ आली तर कोण सांभाळून घेईल मला........नंदिनी

म्हणजे अजून कोणी आवडत नाही....??मग तुझं ते गुलाबी प्रेमाच्या स्वप्नांचं काय....??....राज

जाऊ दे .....नंतर बघू ........नंदिनी

मला सांगशील कोणी आवडला तर.....??.....राज

हो.......सगळ्यात आधी तुलाच सांगेल......नंदिनी

म्हणजे अजूनही आपण हिच्या मनात नाहीये तर.........पण मग तिच्या डोळ्यात का मला प्रेम जाणवत आहे.......राज स्वतःशीच विचार करत होता..
 

राहुल आणि रश्मी ची जोडी किती छान दिसतेय ना.......सेम टु सेम आहेत दोघंही........नंदिनी

हो........... राज

रुची पण किती गोड आहे......माझं नी तिचं मस्त जमेल वाटते......नंदिनी

ह्मम.......तुझ्यासारखी.......अल्लड......तू अशीच होती ............ राज, बोलण्याच्या ओघात बोलुन गेला..नी त्याला आपली चूक समजली......

छान आहे रुची पण.....सगळी फॅमिली छान आहे ......राज विषय बदलावयाला बोलला

हो........किती साधे आहेत ना ......नी किती माफक अपेक्षा......फक्त आनंदाने जगता यावं येवढेच...........नंदिनी

नंदिनी .....तेच तर महत्वाचे असते ....तुम्हाला पाहिजे ते सगळं असेल तुमच्या जवळ पण तुम्ही त्यात आनंदी नाही तर काय उपयोग.......राज

ह्मम.....राज, राज कार थांबावं.......नंदिनी ओरडली

काय झालं??? राज तिच्या अचानक ओरडल्याने दचकला.....नी कार एका साईड ला घेतली..

बघ न पुढे पार्क आहे....किती छान वाटते आहे .......म्हणतच नंदिनी दार उघडून बाहेर गेली सुद्धा....नी आजूबाजूला आकाशाकडे बघण्यात हरवली होती..........बाहेर खूप हवा सुटली होती, बाजूला पार्क, फुलांचा सुगंध, शुभ्र चांदणं...वातावरण खूप छान वाटत होते............नंदिनी   खूप गोड आणि चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता......राज तिला कार मधून बघत होता....

नंदिनी अचानक शांत झाली आणि  ती कारच्या बोनेट ला टेकून हाथ फोल्ड करून पुढे आकाशात बघत उभी होती .....राज तिला असे अचानक शांत झालेले बघून बाहेर तिच्या बाजूला येत उभा राहिला...

राज... आई कुठे आहे ......???..... नंदिनी...ती आपल्या हातावर हात चोळत होती..

घरी पोहचली असेल.........राज, राज ला तिचा बोलण्याचा अर्थ कळला होता पण मुद्दाम त्याने विषय वाढू नये म्हणून काहीतरी उत्तर दिले...

ती नाही रे........जशी रश्मी ची आई आहे तशी, माझी आई.........नंदिनी

ती.....तिथे.....राज एका ताऱ्याकडे इशारा करत.....नंदिनीचे हाथ आपल्या हातात घेत बोलला...

तिला बहुतेक थंडी वाजत होती, तो तिचे हाथ आपल्या हातांमध्ये चोळत गरम करत तिच्याकडे बघत होता.....

राज.........तू बघितले माझ्या आईला ला???.कशी होती ती?????.....नंदिनी

नाही.......पण छान असेल......हे येवढ गोड पिल्लू जीचे ती छानच असेल ना.......आणि नंदिनी आई, आई सारखी असते......आपल्या आई सारखी.........राज

राज....मला काहीच काबर आठवत नाही.......??....मला माझं लहानपणीचे काहीच नाही आठवत.....मी कशी होती, काय करत होती......कुठे राहत होती, माझे फ्रेंड्स कोण होते.......मला काहीच का आठवत नाही.......नंदिनी

नंदिनी.....होत असे कधी कधी......प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, प्रत्येकाचे बॉडी function वेगळे वेगळे काम करतात......नको इतका विचार करु....उगाच डोक दुखेल ..........राज

पण माझ्यासोबत च का होत आहे असे???.....सगळ्यांना त्यांचे बालपण आठवते......मला का नाही ......मला आई बाबा पण नाही आठवत ......किती bad luck आहे माझे.........मला माझी आई का सोडून गेली.....मला हवी आहे आई.........नंदिनी रडत रडत बोलत होती, ती आता खूप भावनिक झाली होती.......तिला खूप वाईट वाटत होते........

नंदिनी........आपला इतका छान परिवार आहे ना......आई आहे, आजी, आबा, सगळेच आहेत.......मी आहे ना नंदिनी  .......आणि तुला भूतकाळात जगायचं आहे की तुला तुझा वर्तमान एन्जॉय करायचा आहे??..... तुझं भविष्य तुला सुंदर करायचे आहे ???....जे आपल्या हातात नाही त्यासाठी रडत बसायचे काय नंदिनी.....??...... म्हणतच त्याने तिला आपल्या कुशीत घेतले.........

नंदिनीला त्याच्या कुशीत मायेची ऊब जाणवत होती........उगाचच आपण असे काही काही बोलतो....राज ला त्रास होतो.....तो किती काळजी घेतो माझी......तो वेळोवेळी माझी आई झाला आहे..........मला तर कधीच आईची आठवण सुद्धा आली नाही......आज कदाचित रश्मी ची आई बघून असे वाटत असेल.....नको मला कोणी, माझा हाच परिवार बेस्ट आहे ....राज बरोबर बोलतोय.....वर्तमान नी भविष्यावर कोन्संत्रेट करायला हवे, जे आपल्या हातात नाही त्यासाठी दुख्खी होण्यात काहीच अर्थ नाही.... ....नंदिनी मनातच शांत होत विचार करत होती.....

नंदिनी......तुझं अंग किती थंड पडले आहे.......?? चल जाऊया आता.... ....राज ने तिला मिठीत घेतले तेव्हा त्याला जाणवत होते ......

नको ना...... थांबुया थोडा वेळ.......नंदिनी, त्याच्या मिठीतुन दूर झाली......नी पळतच पुढे जात हवे सोबत तीच खेळणे सुरू झाले होते......थोड्या वेळ पूर्वीची दुखावलेली नंदिनी आता परत आनंदी दिसत होती......तिचा हाच गुण राज ला सगळ्यात जास्ती आवडायचा.....समजाऊन सांगितले की ती लगेच समजून जायची.....दुख्खला कधीच स्वताहवर हावी नाही होऊ द्यायची.....लवकरच विसरून जायची......आयुष्याला आनंदाने जगायला ती शिकली होती.......राज कार ला टेकून, दोन्ही हात पँट च्या खिशात घालून हसऱ्या खेळत्या नंदिनी ला बघत होता....

नंदिनी मला तू नेहमीच अशी हवी आहे .....माझी हसरी खेळती नंदिनी.......तिला तसे बागडताना बघून त्याच्या पण ओठांवर हलकीशी स्मायल आली....

राज चा मिठीमध्ये तिला positive वाटत होते.....थोड्या वेळ साठी डगमगली होती...पण राजने समजवल्यायवर समजली सुद्धा होती.......आणि आता तिला खूप फ्रेश वाटत होते........आणि परत ती स्वच्छंद मनाने हाथ पसरवत हवे सोबत स्वतःशीच गोल फिरत होती.....

हवा आता जोऱ्याने वाहायला लागली होती.....वातावरण अचानक बदलले.......बहुतेक पाऊस येईल असे वाटत होते.......आजकाल पावसाला तसाही काही काळ वेळ राहिलेला नव्हता.....

नंदिनी परत जाण्यासाठी राज कडे वळायला गेली नि एक जोरदार हवेची झुळूक आली आणि तिच्या साडीचा पदर उडाला.................राज तिलाच बघत होता......

साडीचा पदर हवेवर इतका उडत होता की तिला तो नीट करता येईना........पदर नीट करता करता तिची राजकडे नजर गेली.......आणि तिच्या लक्षात आले आपण राज समोर आहे.....नी आपला पदर उडल्यामुळे आपलं पोट वैगरे दिसत आहे........तिला खूप अक्वर्ड वाटत होते.......

राज ला तिला असे बघणे काही नवीन नव्हते......त्यामुळे तीच पोट दिसतेय...किंवा काही.....त्याला त्याचं काहीच वाटलं नव्हते.......पण बघतांना अचानक त्याची नी नंदिनीची नजरानजर झाली........पदर सावरण्यासाठी चाललेली तिची खटाटोप......त्यात राजकडे ती अवघडलेल्या नजरेने बघत होती ...... तिच्या डोळ्यात त्याला एक लाजेची झलक दिसली, एक पुरुष आपल्या पुढे उभा आहे .... तिचं अवघडलेपण त्याच्या लक्षात आले ......नी त्याच्या लक्षात आले, आपली नंदिनी आता मोठी झालिये....तिच्यासाठी आपण आता पर पुरुष आहोत....हे त्याला कळले होते.......नी त्याने आपली नजर वळवत तिच्याकडे पाठ करून उभा झाला........

 

त्याच्या तसे करण्याने.......आता आपण राजसाठी लहान नाही आहोत.....मोठी झाले आहोत .......हे कळायला नंदिनी ला वेळ नाही लागला..........

राज ने कार मधून शाल काढली आणि नंदिनी कडे जात होता........त्याला तसे जवळ येतांना बघून नंदिनीच्या हृदयाची धडधड वाढत होती.........तिने कसाबसा आपला पदर सावरत धरत राज कडे बघत होती..............राज तिच्या जवळ जात तिच्या खांद्यावरून घेत तिला त्याने शाल नीट पांघरून दिली........... ती राजकडे अवघडल्या नजरेने बघत होती......तिला लाज सुद्धा वाटत होती...

थंडी आहे खूप....... चल निघूया , म्हणत त्याने तिचा हाथ आपल्या हातात धरला......नी तिला कार मध्ये नेऊन बसवले...........

दोघंही घरी यायला निघाले होते.......पण आता दोघांमध्ये एक वेगळीच शांतता निर्माण झाली होती......नंदिनी एकदम शांत बसली खिडकीच्या बाहेर बघत होती......तिला राजच्या नजरेला नजर मिळवणे खूप अवघड वाटत होते.....

नंदिनी......का तुला इतकं लाजयाला झालं राजपुढे.......क्रिकेट खेळताना पण त्याने साडीचा पदर माझ्या कंबरे मध्ये खोचून दिला तेव्हा पण त्याच्या स्पर्शाने करंट लागल्यासारखे का होत होते.........नंदिनी काय होते आहे तुला आजकाल............पागल होईल मी आता..........नंदिनीचा विचार करता करता डोळा लागला.........नी खिडकीला टेकून ती झोपली सुद्धा होती.......

मला काय झालं होत आज.......मी तिला असं बघत होतो.....तिला काय वाटले असेल........का नाही कंट्रोल करू शकलो मी स्वताला......नव्हते होते तिला असे बघायला........आता काय विचार करेल ती.......जोपर्यंत तिला तिचं किंवा माझं प्रेम कळत नाही.....राज कंट्रोल कर स्वताला.........उगाच थोड्याशा चुकीमुळे गैरसमज व्हायला नको........खूप नाजूक नात आहे हे........प्रेमामध्ये वासनेचा लवलेशही नको असायला.........सांभाळून वागायला हवे आता........राज ड्राईव्ह करता करता मनात च विचार करत होता.....तेवढयात त्याचे लक्ष नंदिनिकडे गेले तर ती झोपली होती........

सोन्या, गैरसमज नको करून घेऊ काही.......त्याने तिच्या डोक्यावरून एक हाथ फिरवत तिचे चेहऱ्यावर उडणारे केस तिच्या कानामागे अडकवले........

जवळपास रात्रीचे साडेबारा वाजत आले होते........राज कार घराच्या गेट मधून आतमध्ये घेतली........

नंदिनी......घर आले......राज ने तिला तिच्या गालावर थोपटत होता...

ह्मम............नंदिनी डोळे बंद करूनच बोलत होती......बहुतेक झोपेतच बोलत होती......राज ने दोनदा आवाज दिला पण ती उठत नव्हती.....शेवटी त्याने तिला उचलून घेतले.........नी तिच्या रूमर मध्ये नेऊन तिला झोपवले.........नी परत जाणार तेवढयात त्याला आवाज आला........

राज....... आईसारखा मला एकटे सोडून जाणार नाही ना तू.............

राज ने वळून बघितले तर नंदिनी झोपेत बोलत होती.......वारंवार तीच एक लाईन बडबडत होती.....

जरी मघाशी तो विषय तिने बाजूला सारला असला ,तरी आता झोपेत तिला असेच काहीसे स्वप्नं येतील....रात्रीतून ती कदाचित घाबरेल्ही........राज ला आतापर्यंत तिच्या या सगळ्या सवयी माहिती झाल्या होत्या.......

नंदिनी.......मी इथेच आहो.......झोप चिमण्या........राज तीच्य शेजारी जाऊन बसत तिच्या केसातुन हाथ फिरवत होता.......तिने त्याचा एक हाथ आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला होता.......राज तिला कुरवाळत तिथेच बसल्या बसल्या झोपी गेला.....
 

नंदिनीच्या भावनांची आता उलथापालत सुरू झाली होती......राज बद्दलच्या वाटणाऱ्या भावना आता तिच्या बदलत चालल्या होत्या......तो आपला मित्रच आहे की अजून काही या द्वंद्व मध्ये ती अडकत चालली होती.......बऱ्याच गोष्टी फील करूनही तिला कळत नव्हत्या.......बघुया कसं सुटते तिच्या स्वतःच , स्वतःच्याच हृदयासोबत, मनसोबत होणारे द्वंद्व.......

*******

क्रमशः

********

🎭 Series Post

View all