
भाग 53
आपण इथे कशासाठी आलो होतो , हे तुम्ही विसरला वाटते...??........आबा
राहुल, रश्मी आतमध्ये आले तेव्हा सगळे रागात यांच्या कडे बघत होते.....ते दोघं तिथेच दाराजवळ थांबले व एक एक करत सगळ्यांना बघत होते...
It's all because of you......... आता मला सगळ्यांसमोर तुझ्यामुळे रागे भरनार सगळे.......रश्मी
माझ्यामुळे...??.....मी काय केले...??......राहुल
तू मला बघायला आला.....तुझ्यामुळेच मी तिकडे तुम्हाला शोधायला आले........तुझ्यामुळेच तिथे खेळायला लागले.........रश्मी
मी थोडी सांगितले होते तुला तिकडे ये , नी खेळ म्हणून.......राहुल
हे काय सुरू आहे खुसरपुसर........दोघच काय बोलत आहात.......माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या ......आबा
रश्मी नी राहुल कडे बघत वाकडं तोंड केले......राहुल न पण सारखेच प्रतिउत्तर तिला दिले वाकडं तोंड करून..????
तेवढयात नंदिनी आणि राज पण तिथे त्यांच्या मागे आले होते.....सगळ्यांचे हावभाव बघून नंदिनिने डोळ्यांनीच राहुल ला काय झालं म्हणून इशारा केला...
हे इशर्यांमध्ये काय बोलत आहात....आबा काही विचारत आहेत तुम्हाला.......??...आपण इथे काय करायला आलो आहे?????.....राज ची आई
रश्मी ला बघायला........म्हणजे देसाई कुटुंबाला भेटायला.......नंदिनी मान खाली घालून च बोलली
मग तुम्ही काय करत होता....??.....दोन तास निघून गेले....तुम्ही आता येता आहात घरात...??.....आई
आईच्या प्रश्नाने सगळे राहुल , रश्मी नंदिनी कडे बघत होते. ...
मी काय केले ..??..माझ्या कडे का बघत आहात....??...राहुल मुळेच सगळा उशीर झाला.....आम्ही येतच होतो आतमध्ये तर तिथे ते लहान मुलं खेळत होते....त्यांचा बॉल आला आमच्याकडे....तर हा त्यांना देऊन बॅटिंग करायला गेला होता.........नंदिनी
मी तर फक्त दोन च बॉल मारले नि परत येत होतो......नंतर कोणाला खेळायच होते...???.........राहुल
हा गेला तुकडे म्हणून मी गेली त्याच्या मागे.......नंदिनी
राज तू....??? तू त्यांना बोलवायला गेला होता ना.....??....आई
हो.....पण ते तिथे नंदिनी नाराज दिसली म्हणून मग मी................राज
बरोबर आहे गुळाची ढेप जिथे , तिथेच हा चीपकेल ना.......राहुल हळूच स्वतःतच पुटपुटला.....पण तिथे शांतता ये होती की ते सगळ्यांना ऐकूच गेले होते.......सगळ्यांना ते ऐकून हसायला येत होते पण त्यांनी त्यांची अक्टिंग सुरू ठेवली......रश्मी ला तर हसू कंट्रोल च होत नव्हते.....
राज ने राहुल लांडोले मोठे करत चूप बसायला सांगितले....
रश्मी तू.....तू गेली होती ना सगळ्यांना बघायला....??....रमेश देसाई
हो........ते हे लोकं क्रिकेट खेळत होते....... हा भांडला माझ्यासोबत म्हणून मी.......रश्मी
हा...??.....रश्मी ची आई डोळे मोठे करत तिच्या कडे बघत होती.....
राहुल साईड ला रश्मी ला बघत कोणाला दिसणार नाही असे भुवया उडवत तिच्या कडे बघत होता..... रिस्पेक्ट....
सॉरी.....हे.....हे भांडत होते माझ्यासोबत........रश्मी , तुला तर नंतर बघते अशा आविर्भावात ती त्याच्या कडे बघत होती...
रुची.....??.... तुझं काय म्हणणं आहे आता.....?? ..... रमेश
बाबा, मी त्यांना बोलवायला च गेले होते......पण तिथे गेला तर यांची " कोण जिंकेल" अशी मॅच सुरू होती......सगळे रश्मी ताई ला च चिअर अप करत होते , कोणीच राहुल जिजू ना नव्हते करत म्हणून मी त्यांना चिअर अप करत होती तिकडे...........रुची
जिजू......??.....सगळे एकसाथ
रश्मी ने तर डोक्यावर हाथ मारला......राहुल बाकी सगळ्यांचे हावभाव बघत होता........कोणाच्याच चेहऱ्यावरून काहीच कळायला मार्ग नव्हता.........
सॉरी.......ते.....ते चुकून निघालं तोंडून.......रुची रडवलेला चेहरा करत बघत होती...
आता कोणालाच रागाचं जाती नाटक करता येत नव्हतं.....नी आबा खुदकन हसले......सोबतच बाकीचे ही हसू लागले.....
म्हणजे......म्हणजे तुम्ही नाटक करत होते रागवायचे....???....तुम्ही रागावलेले नाही आहात आमच्यावर...???........नंदिनी
नाही.........आबा
"शी बाबा आबा......किती घाबरावले तुम्ही......मला हार्ट अटॅक च येत होता ना".........नंदिनी कुरकुरल्या सुरात आबांच्या गळ्यात जाऊन पडली.....
"ये बाई असे काही बोलू नको, उगाचच "..........नकळतच राज च्या तोंडून नंदिनी बद्दलची काळजीचे शब्द निघाले...
"अरे गंमत करतेय ती"....आणि नंदिनी असे नाही बोलायचे परत.......आबा, नंदिनी बद्दल थोड पण काही बोललं, खास करून तिच्या तब्बेतीबद्दल.... की त्याचा जीव कासावीस व्हायचा....आबांना राज ची काळजी कळत होती.... आणि म्हणूनच त्यांनी बोलणं सांभाळून घेतले...
रमेश आणि रेवती ला पण खूप कौतुक वाटत होते....सून असून अगदी मुलीसारखं जपतात नंदिनी ला.....आणि राज तर त्यांना बघितल्या पासूनच आवडला होता....आणि आता त्याचं त्याच्या बायको बद्दल वाटणारी काळजी नि प्रेम सगळच त्याच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरून स्पष्टच जाणवत होते.....आणि मनोमन च आपली मुलगी पण याच घरी जावी असे त्यांना वाटून गेले...
बरं तुम्ही सगळे थकले असाल आहात....मी लगेच तुमच्यासाठी जेवणच तयार करते......तुम्ही सगळे फ्रेश होऊन या......... रेवती
जेवणाचे राहू द्या हो....किती घाई होईल.....आता घरी निघायचे म्हणतोय......निती
अहो ताई....8-8.30 होत आलेत.....घरी पोहचायला तुम्हाला एक तास लागेल...आणि आता ही लोक दमली पण आहेत....नाश्ता केला तर भूक मोड होईल त्यांची.....बघते मी जेवायचं.........रेवती
काकी...एक नंबर प्लॅन......काकी मस्त मुगाच्या डाळीची खिचडी करा , कढी, पापड असेल तर ते..... हवे तर मी मदत करते तुम्हाला पापड तळायला..... आणि सोबत हा गोडाचा शिरा दिस्तोयच आहे.........मस्त लवकर पण होईल.......नंदिनी खूप एक्साईट होत बोलली..
नीती ने डोक्यावर हात मारला....तेच थोड जास्ती वेळ थांबायला भेटेल म्हणून राहुल मनोमन आनंदला होता..
नंदिनी.....मी काय म्हणत होती...तू काय सुरू केले...??....निती
मला पण चालेल...... आबा
आता तुम्ही पण..??..... आजीसाहेब
अहो चालते राज च्या आजी..... तेवढच मुलांसोबत गप्पा करता येईल......आबा
आजिसहेबानी डोक्यावर हात मारून घेतला.......
मला पण चालेल.......राहुल ने पण वाहत्या गंगे मध्ये हाथ धून घेतला.....त्याला बघून सगळे हसायला लागले...
आजीसाहेब, आमची पण इच्छा आहे आणि सगळेच म्हणत आहेत तर आताच जेवण इथेच होऊ द्या.......रमेश आजिसहेबांना हाथ जोडत म्हणाला....
रमेशराव, अहो हाथ काय जोडत आहात, उगाच तुम्हाला त्रास नको म्हणून म्हणत होते...पण सगळ्यांची इच्छा आहे तर होऊ द्या सगळ्यांच्या मतासारखे......पण नंदिनिंनी सांगितले तोच मेनू होऊ द्या बरं काय........ आजीसाहेब
आजिसहेबांचे बोलणे ऐकून सगळे खुश झाले....आज पहिल्यांदा भेटते दोन कुटुंब, पण असे वाटत होते जसे वर्षानुवर्षं एकमेकांना ओळखत असतील...
रेवती ताई चला मी येते मदतीला.......निता
असू द्या हो ताई, मी रश्मी आणि रुची करू .....तुम्ही बसा .......रेवती
मुलींना बसू द्या इकडे ....सगळे एकत्र वेळ घालावतील.....आपण करू......निती
बरं..... या.......रेवती
मस्त गरमागरम कॉफी sss.......म्हणत च नंदिनी चे लक्ष राज कडे गेले..........नी तिला रात्रीच्या कॉफी वाला किस्सा आठवला.........नी राज च्या जवळ असण्याचा भास झाला........ न.....नाही......आल्याचा मस्त चहा भेटेल काय तोपर्यंत..........सुरवातीला एक्साईतेड असलेला तिचा आवाज आता हळू झाला होता.......राहुल ला गालात हसायला आलं....
I bet you.....she is falling in love with you..... तिला तूच आठवला होता आता.....म्हणून कॉफी च रूपांतर चहा मध्ये झाले आहे .......राहुल राज च्या कानाजवळ बोलला...
ह्मम....... होप की तू जिंकावस........राज नंदिनिकडे बघत बोलला...
हो सगळ्यांसाठीच करते चहा......
रुची , जा यांना हातपाय धुवायला घेऊन जा .......रेवती
हो आई.....रुची , रश्मी, नंदिनी, राहुल, नी राज बाथरूम जवळ गेले....नी एक एक करून फ्रेश होत होते..
ये काय ग भुक्कड......तुला कधीपासून खिचडी आवडायला लागली.........घरी तर फार नाटक करते.......राज ला तर नको नको करून सोडतेस........राहुल
ये .....तुझ्यासाठी केली जरा ही सगळी सेटिंग....नाहीतरी बाहेर काय उजेड पाडला माहितीच आहे........आणि खिचडी च म्हणशील तर रेवती काकूंना किती त्रास होईल सगळं बनवायला....ते पण आपण इतकेसारे लोक.....नी तुम्हा बाकीच्यांना आवडतेच की....the healthy food खिचडी........नी माझा प्लॅन झाला आहे, तू माझी काळजी नको करू.......म्हणत ती थोडी राज कडे सरकत...the super special yummy pasta......... राहुल ला बोलली....
तू सोडू नकोस हा त्याला...... थोडं तर रिलॅक्स करू देत जा....... बरं आहे बाबा आपल्याला काही येत नाही........राहुल
It's okay Rahul...... मला आवडते पास्ता बनवायला........ राज
तूच......तूच हिला डोक्यावर बसाऊन ठेवलंय......राहुल
Wow...... पास्ता...... माझा पण फेवरेट आहे.......रश्मी
घे.....आता येईल तुला पण बनवता.....राज ने हळूच राहुलच्या कानात त्याची मस्करी केली......
वाह मस्तच....... जमलंच की मग आपलं.....नंदिनी ने राहुल ला एक डोळा मारला....
बरं चला चहा तयार आहे......रश्मी
सगळे थंडी मध्ये गरम आल्याच्या चहा चा आस्वाद घेत होते.........निती, रुची आणि रेवती जेवणच बघत होते......बाकी सगळे रश्मी सोबत तिचं एज्युकेशन , जॉब , तिचं सोशल काम असे डिस्कस करत होते.....नी रश्मी सगळ्यांना जो जे विचारेल ते सांगत होती......राहुल तर फक्त तिला चोरून चोरून बघायचे काम करत होता......नी अचानकच रागिणी ने गुगली टाकली.......
रश्मी बाळा हे बघ....आम्हाला तर सगळ्यांना तू आवडली आहेस.........मला तुला आमची सून करून घ्यायला खूप आवडेल.....तुला आम्ही आवडलो काय...????? तुला आवडेल काय आमच्या घरी यायला...????.........रागिणी
आईचं बोलणं ऐकून राहुल ने डोक्यावर हात मारून घेतला.....कितीही घरून समजाऊन आणा, पण या बायका आपल्याच मनाचं करणार..........आधीच बिघडलंय...त्यात आईची इतकी घाई.......नंदिनी जा ना आई ला समजव ना....घाई नको करू म्हणावं.....राहुल नंदिनी जवळ खुसुरपुसुर करत होता.....पण नंदिनी मात्र एका कॉर्नर ला फोन वर बोलत असलेल्या राज ला च बघत होती......
नंदिनी......काय होतंय तुला.???....अशी का वेड्या सारखी बघते आहेस राज ला.......आता पण पटांगणात किती माती खाल्ली तू........तो फक्त तुला चांगली दिसते आहे म्हणत होता..... इतकं लाजयाला काय झालं होत तुला.......काय विचार करेल तो तुझ्या बद्दल........पण मी असे मुद्धम थोडे वागले...ते तस आपोआपच झालेले.....आजकाल राज जवळ आला की जीव घाबरा घुबरा च व्हायला लागलाय......काही कळतच नाही.... डोकच काम नाही करत काही.....काहीतरी असते त्याच्या पण डोळ्यात.......काहीतरी सांगतोय काय तो....काहीच कळत नाही आहे ............नंदिनी राज कडे बघतच मनामध्ये बोलत होती....
ये नंदिनी.....राहुल ने तिला हलवले.......
ह... काय...काय झालं....??...... नंदिनी
कुठे जातेस ग फिरायला बसल्या बसल्या......हे बघ न आई किती घोळ घालते आहे.......राहुल
तेवढयात रेवती, निती सगळेच बाहेर आले........सगळे रश्मी च्या उत्तर ऐकण्यासाठी तिच्या कडे बघत होते.....रश्मी ला थोड गोंधळला सारखं झालं....रश्मी ने आई आणि बाबा कडे बघितले....त्यांनी डोळ्यांनीच होकार सांगितला.........आबांच्या नजरेतून मात्र तिचा उडालेला गोंधळ सुटला नाही...
हे बघ रश्मी.....अगदी कुणाच्या दबावात येऊन तू निर्णय देऊ नको....हवा तितका वेळ घे....काहीच घाई नाही......तू होकार देशील तर आम्हाला आनंदच होईल.....नी तुझा नकार असेल तरी त्याचा मान ठेवला जाईल.......अजिबात कशाचे दडपण घेऊ नको......आणि तुझ्या काही अपेक्षा असतील तर तू त्याही सांगू शकते आम्हाला.....अगदी मोकळेपणाने बोल....... आबा
नकार.....नकार शब्द ऐकून राहुल ला टेन्शन च आले...
आबांच बोलणं ऐकून रश्मी ला थोड बरं वाटले......
आबा... काकी...मला तुमचा देशमुख परिवार खूप आवडला......तुमच्या घरी येणारी मुलगी खरंच खूप नशीबवान असेल आहे......रश्मी
आता ही नाही म्हणते की काय.......राहुल च हृदय आता भीतीने धडधडायला लागले.....नी तो टेन्शन मध्ये येत तिच्याकडे बघत तीच बोलणं ऐकत होता....
आबा....तुम्हाला आमची परिस्थिती दिसतच आहे, काही लपवण्या सारखे नाही आहे.....तुमची नी आमची काहीच बरोबरी नाही......रश्मी
येवढे च की अजून काही बोलायचे आहे???....आबा
नाही , अजून आहे.......बाबा रिटायर झाले आहेत....बाबांना पेन्शन नाही.....रुची बारावी मध्ये आहे......अजून तिचे सगळेच शिक्षण बाकी आहे.......त्यामुळे मला ही नोकरी नेहमीच करायची आहे.....नी घरी मदत करायची आहे.....आईबाबा नाही म्हणतात....थोडेफार जमावले आहे त्यांनी.....पण माझं लग्नात पैसे खर्च करतील तर रुची च्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल........जे मला कधीच आवडणार नाही......आणि आम्ही दोन मुलीच, त्यामुळे माझ्या आईवडिलांची जबाबदारी ही माझी आहे, ती मी सोडू शकणार नाही........रश्मी
बरं.....आणखी काही...??....आबा
माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू आहे ....मला ते पूर्ण करायचे आहे.......रश्मी
बापरे मुली किती विचार करतात.....रश्मी तर सगळी आपली जबाबदारी समजून आहे......मी तर परीवराबद्दल कधीच असा विचार नाही केला.....मला तर सगळाच हवे ते मिळत गेले...... रश्मी चे बोलणे ऐकून राहुल च्या मनात तिचा रिस्पेक्ट खूप वाढला......बाकी सगळे पण कौतुकाने तिचे बोलणे ऐकत होते.......नंदिनी तर अवाक बघत ऐकत होती तिचे.....
Okay..... आबा तिच्याकडे बघत होते.......
झालं....येवढेच........रश्मी
Good...... तर तुझा पहिला डाऊट....आपली बरोबरी नाही.... तर आपल्या संस्कारांची बरोबरी आहे ....शिक्षणाची बरोबरी आहे... ...बाकी पैसे वैगरे चे म्हणशील तर आम्ही त्याला महत्व देत नाही......दुसरं तुझं नोकरी चे आणि पुढल्या एज्युकेशन बद्दल....तर ते तू आणि राहुल बघ.....तुम्ही दोघं मिळून जे निर्णय घ्याल तो आम्हाला आवडेलच......आबा
राहुल, रश्मी काही विचारते आहे.....तुम्हाला एकट्यामध्ये जाऊन बोलायचं असेल तर बोला.......आबा
नको....इथेच बोलतो....राहुल उठून रश्मी जवळ आला.......रश्मी जर तुझा माझ्यासोबत लग्न करायचं हो असेल तर.....रुची ची पुढल्या शिक्षणाची आणि फ्युचर ची जबाबदारी मला घ्यायला आवडेल......दुसरं तुझी नोकरी.....तुला हवी तशी तू करू शकते...तुझा पगार......तुझी मेहनत आहे ती, तर तो फक्त तुझा हक्क आहे हे ठरवण्याचा की तुला तुझ्या पगाराचे काय करायचे.....मी किंवा घरचे कोणीही त्यात काहीच बोलणार नाही......आणि पुढल शिक्षण .. तुला हव तितकं घे, हवं तितके शिक........शिक्षणासाठी नेहमीच देशमुख परिवाराचा सपोर्ट असतो..... राहुल
रश्मी आश्चर्यचकित होत त्याच्याकडे बघत होती......
आणि हो शेवटचे......मला जावई पेक्षा मुलगा बनून राहायला आवडेल देसाईंकडे......... राहुल
हा ये समजदार कसा झाला.....कधी झाला........काकी स्वतःशीच राहुल ला बघत बोलत होत्या...
मुलं लवकर मोठे होतात रागिणी......कळतच नाही......आपल्या आई मनाला ती छोटीच वाटतात.......निती
खरंय वहिनी.....मला वाटत होत आपण लग्नासाठी घाई तर नाही करत आहोत.....पण योग्य निर्णय आहे आपला....रागिणी
मग रश्मी काय विचार आहे.....??.....रागिणी
हो....मला आवडले तुम्ही सगळे......तुम्ही सगळेच खूप छान आहात, मला आवडेल देशमुखांची सून व्हायला.............. पण हा....हा फारच भांडकुदळ आहे............रश्मी, सिरीयस झालेले वातावरण हलके करण्यासाठी बोलली
बरोबर....आहेच हा भांडकुदळ.....माझ्यासोबत पण खूप भांडत असतो......ये तू, आपण दोघी मिळून याचा क्लास घेऊ.........नंदिनी
सगळे हसायला लागले......
पण आमच्या देशमुख कडे हे एकच ध्यान उरलाय आता......सूनबाई आणण्यासाठी..........बघ काही जमते काय........?? काकी
हा....... अरे माझं पण लग्न आहे, मला पण विचारा कोणी....?? राहुल....राहुल डोळे मोठे करत बघत होता......
ये तू गप रे.......तुला काय कळते आहे......हा रश्मी तु सांग..........??..नंदिनी
ठीक आहे.......सून तर तुमचीच व्हायचं.....मग आता काही ऑप्शन नाही आहे तर .....निभावून घेईल मग...????????????........रश्मी राहुल कडे बघत बोलली
काय....??.....काय बोलली ..........राहुल गोंधळलेल्या नजरेने बघत होता
तुला नवरा बनवायला तयार आहे म्हणते.........नंदिनी त्याच्या पाठीत एक देत बोलली......राहुल ने रश्मी कडे बघितले तर ती त्याला बघून लाजली होती......तिला बघून त्याचा पण चेहऱ्यावर आनंद पसरला होता.....
पण.......पण.........रश्मी
आता काय .......??...तुमच्या terms and conditions संपतच नाही काय कधी....??...राहुल टेन्शन मध्ये येत परत तिच्याकडे बघत होता.........आता बाकीचे पण तिच्याकडे बघत होते......
त.....ते.....मी राहुल पुढे खूप सावळी आहे......तर.......रश्मी
रंगा मुळे कोण सुंदर, कोण नाही.....ठरवायचे काय.......???....खूप मुलींसोबत मैत्री होती....पण तुझ्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी वाटली नाही.......राहुल
त्याचं बोलणं ऐकून रश्मी च्या डोळ्यात थोड पाणीच आले.........कारण लहानपणापासून बरेचदा रंगावरून तिने बरेच टोमणे ऐकले होते.......कितीही शिकली लोक होती तरीही दिसण्यावरून तिने बरेचदा ऐकले होते.....लग्न कसे होईल, घरच्यांपेक्षा बाकीच्यांना च जास्ती काळजी असायची.......आता फिजिओथरेपिस्ट झाल्यापासून नी चांगला जॉब लागल्यापासून लोकांची तोंड थोडी कमी झाली होती.....तरी एखाद दुसरा शब्द तिला ऐकाया यायचाच......आणि म्हणूनच मनात आलेली गोष्ट तिने बोलून दाखवली होती...
ओह......आमचं मारक म्हैस........म्हणत नंदिनी ने तिला हग केले..........तिने पण डोळे पुसले...
राहुल ने डोक्यावर हात मारला.......एक एक प्रॉब्लेम संपतच नाहीये.........
मारक म्हैस......???......रश्मी
नंदिनी ने जीभ चावली......आपण काय बोलून गेलो ते तिला आता समजले होते.....
अ......ते.......तुम्ही तुमचं बघा.........म्हणतच नंदिनी चुपचाप राजच्या मागे येऊन त्याच्या जवळ उभी राहिली....नी त्याचा हात पकडू की नको विचार करत होती......असे काही झाले की तिची सवय होती राज जवळ येत त्याच्या दंडाला पकडून त्याच्या मागे आपला चेहरा लपवायचे.......पण सगळे होते म्हणून ती फक्त चुपचाप त्याच्याजवळ येऊन उभी राहिली होती......
काय केले हे.......??.....राज
चुकून बोलली ना......मुद्दाम थोडी......तसाही तो प्रेमाने तिला तसेच म्हणतो........नंदिनी
वेडाबाई............त्याने तिचा हाथ धरून ठेवला..... त्याला माहिती होते अशी काहीतरी गडबड झाली की तिला घाबरायला होते......तिला जवळ तर नव्हते घेता येत पण त्याने तिला आपल्या जवळ तिचा हाथ पकडून घेतला होता.........तिला पण खूप बरं वाटलं.....
Congratulations Rahul......... राज
Thank you bro...... राहुल ने राज ला हग केले......मागे नंदिनी उभी होती......
It's okay ग........ नी thank you तुला जास्ती, तुझ्यामुळे ती माझ्या लाईफ मध्ये आली आहे......so cool now...... राहुल ने तिच्या नाकाला मारत तिचे गाल ओढले..........तशी नंदिनीची कळी खुलली
वा वा .........रेवती ताई तोंड गोड करा........आबा
हो हो......आबासाहेब......... रेवती
रश्मी , हे कडे.....माझी सून बनून येणार आहेस ना म्हणाऊन.....म्हणत रागिणी ने तिच्या हातात कडे घातले......
Thank you kaki........ रश्मी
काकी नाही, आई म्हणायचं आता.........रागिणी
रश्मी ने आजिसहेबांना जाऊन नमस्कार केला......
खुश रहा..... समजदारी ने वागा........नाहीतर या दोघांची हवा तुम्हाला पण लागायची........आजिसहेब राहुल आणि नंदिनी कडे बघत बोलल्या.........
रश्मी ने मान्य हलवली....पण तिला काही कळले नव्हते
...
कळेल कळेल .....तुम्हाला पण कळेल......आजिसहेब
नंतर रश्मी ने सगळ्यांना नमस्कार केला....तिला नमस्कार करतांना बघून राहुल ने पण तिच्या आईवडिलांना नमस्कार केला.......
चला आता जेवू या......भूक लागली........आबा
हो हो...... रेवती
रेवती, रुची, रश्मी ने खाली आसनं मांडले.....आजिसहेब नी आबा छोटा डायनिंग टेबल होता तिथे बसलेत.....बाकी सगळे खाली......रुची नी पटापट लल पा भोवती छोट्यांच पण सुबक रांगोळी काढली.....अधून मधून उदबत्त्या लावण्यात आल्या......वातावरण एकदम प्रसन्न झाले होते...त्यात लग्न जमाल्याचा आनंद....मग तर काही विचारायलाच नको.........खिचडीचे च जेवण होते....पण सारे पंच पक्वान्न ही त्यापुढे फिके वाटत होते......इतके ते जेवण सगळ्यांना टेस्टी वाटत होते.....
*****
क्रमशः
******
बऱ्याच जणांना वाटत असेल ही कथा राज नी नंदिनी ची आहे ,यात राहुलच्या लग्नाला का इतकं महत्व दिले जाते आहे.........तर थोडफार लग्नव्यवस्थेवर लिहायचे होते म्हणून......हा विषय थोडा लांबवत आहे.....
धन्यवाद
*******