नंदिनी... श्वास माझा 52

राज नंदिनी

भाग 52

या या.......रमेश देसाई हाथ जोडत हसतमुखाने चाळीच्या समोर येऊन उभे देशमुख परिवाराचे स्वागत करत होते.....

नमस्कार काका......राज ने पण हाथ जोडून हसत त्यांना अभिवादन केले.....बाकी सगळ्यांनी पण हसुन त्यांना डोळ्यांनीच नमस्कार म्हटले....

या....इकडे... या साईड ने........रमेश देसाई त्यांना रस्ता दाखवत त्यांच्या घराकडे घेऊन जात होते......बाकी सगळे इकडे तिकडे बघत त्यांच्या मागे मागे जात होते....आजिसहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे कमीजास्त होत होते.....बाकी सगळे मात्र कुतूहलाने आजूबाजूचे बघत जात होते....

रुची पाहुणे आले बरं काय......रमेश देसाई आतमध्ये जाईल असा आवाज देत दारापर्यंत पोहचले...

नमस्कार......या या......रेवती आणि रुची दारातच हसतमुखाने सगळ्यांचे स्वागत करत होते.....देशमुख परिवाराला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, प्रसन्नता बघून खूप  छान वाटले.....

या बसा........रमेश

सगळे चेअर सोफा वर जाऊन बसले.......

काही त्रास तर नाही झाला न घर शोधायला........रमेश

नाही नाही.......पत्ता बरोबर डिटेल मध्ये व्यवस्थित दिला होता.....आरामात पोहचलो......रविकांत

रुची सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली.....

बरं ओळख करून देतो......म्हणात आबा सगळ्यांची त्यांना नाव सांगत ओळख करून देत होते..

मी प्रभाकर देशमुख.....या राहुल चा आजिसहेब .....शालिनी देशमुख..,..या थोरल्या सूनबाई निती शशिकांत चा पत्नी....या रागिणी हे रविकांत राहुल चे आई वडील, आणि हा श्रीराज ....आमचा मोठा नातू........आबा सगळ्यांची ओळख करून देत होते...

राहुल राव  नाही दिसत आहेत....??....रमेश

हो तो आणि आमच्या मोठ्या नातसून बाई राज ची पत्नी दोघे येतात आहे....... आबा

बरं .....या रेवती रश्मी ची आई आणि ही आमची धाकटी लेक रुची....बारावी ला आहे या वर्षी......रमेश

नंतर त्यांच्या इकडच्या तिकडच्या नॉर्मल गप्पा सुरू होत्या...

ये ताई......काय सुपर फॅमिली आहे.......सगळेच लोक मस्त वाटत आहे.......आणि ते राहुल जिजू चे मोठे भाऊ काय ऑसम आहेत, खूपच हँडसम आहेत........रुची खूप एक्सितेड होत रश्मी ला सांगत होती....ते आल्यापासून आतापर्यंत काय काय झाले, काय बोलणे झाले......वैगरे सगळं सांगत होती...

Not bad....looks interesting........ रश्मी मनातच विचार करत होती, कारण तिने जे एक्सपेक्ट केले होते तसे काही घडले नव्हते....रुची च्या तरी बोलण्यावरून देशमुख लोकं चांगली भासत होती..

आणि राहुल ग......??...रश्मी

ते आणि त्यांची वहिनी यायचे अजून.......पण ताई बघ ना त्यांचा भाऊ किती हँडसम आहे , राहुल जीजू पण मस्तच असणार.......रुची

जिजू.....? काय हे जीजू लाऊन ठेवले आहे.....रश्मी

मला तर आवडले बाबा ते लोक.......तू तुझं बघत बस..... बरं चल आता , आई ने बोलावले आहे बाहेर........ रूची

रुची चा पाठोपाठ रश्मी आली.......तिने हसून सगळ्यांना हाथ जोडून हसत नमस्कार केला.....

फोटो पेक्षा पण प्रत्यक्षात खूप छान दिसते ना वहिनी.......रागिणी

हो.......निती

ये बाळा.....इकडे.माझ्या जवळ बस........रागिणी ने तिला आवाज दिला, रश्मी त्यांच्या जवळ जाऊन बसली.....नंतर महिला मंडळाच्या तिला बरेच प्रश्न, इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या.......

राज, अरे राहुल नंदिनी कुठे राहिले बघ.....बराच वेळ झाला.......आबा

हो....राज फोन लावत होता...पण लागत नव्हता....नेटवर्क प्रॉब्लेम काही वाटत होता......राज फोन करायला बाहेर आला.....

इकडे रुची , आई आणि रश्मी ने सगळ्यांसाठी नाश्त्याच्या प्लेट घेत होत्या...

रश्मी लोकं खूप छान वाटत आहेत ग......तू म्हणाली तसे अजिबात नाही वाटत....कुठेच श्रीमंतीचा घमेंड नाही वाटत..... हा त्या आजिसहेब थोड्या कडाक वाटत आहेत....पण ते जुनं माणूस आहे......जुने लोकं थोडे कडकच असायचे.......पण बाकी एकदमच छान वाटत आहेत........बघ बाई ,तुझ्याच हातात आहे आता.......नशीबच उजळेल बघ त्यांच्या घरी जाऊन तुझं.........आई च देशमुखांचे गुणगान काही थांबत नव्हते

हो छान वाटत आहेत लोकं..... अग पण ज्याच्यासोबत लग्न करायचे तो कसा आहे ते जास्ती महत्वाचे नाही काय...??...घरातला लहान आहे म्हणे.....खूप लाडावला असू शकतो.....आणि लाडाने लोकं वायच जातात.......रश्मी

कठीण आहे तुझं......मला येवढेच सांगायचे आहे की ते आले की नीट बोल त्यांच्यासोबत......तुझा अरेरावी पणा करू नकोस........आई

हो ग....,...रश्मी

राज फोन लागत नाही म्हणून बाहेर आला.....फोन रिंग जात होती पण कोणी उचलत नव्हता ....इकडे तिकडे बघता बघता त्याचं लक्ष साईड ला असलेल्या पटांगणावर गेले.....आणि तो शॉक झाला.....राहुल आणि नंदिनी तिथे काही लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळत होते.......राज ने तर त्या दोघांना बघून डोक्यावर हाथ मारून घेतला.....आपण करायला काय आलोय, नी हे करत काय आहेत.....या दोघांना एकत्र सोडले तेव्हाच कळायला हवे होते......राज स्वतःशीच विचार करत त्यांच्या कडे जात होता......

काय झालं.....??...राज ने राहुल ला नंदिनी कडे इशारा करत डोळ्यांनीच विचारले.......नंदिनी आणि सोबत ३-४ लहान मुलं एका साईड ला उभे होते....त्यात नंदिनी तोंड फुगाऊन उभी होती...

हरत आहेत त्यांची टीम......????????????????????????......म्हणून फुगला आहे फुग्गा...........राहुल नंदिनी कडे बघत हसतच तिला चिडवत बोलला

राज ला पण नंदिनीचे हावभाव बघून खूपच हसायला येत होते........ती एकदम तिच्या सोबत असलेल्या लहान मुलांसारखी एकदम तोंड फुगाऊन , हरण्याचा टेन्शन मध्ये उभी होती.....

राहुल तू आगाऊपणा करू नकोस हा.........हे साडी वैगरे घातले आहे म्हणून.....नाहीतर कधीचीच हरवली असती तुला.........नंदिनी चिडत बोलत होती

हा हा हा.....खेळता येत नाही.......साडी बिडी च कारण देते.......राहुल

राहुल......ती चिडतच पाय आपटत होती...

मी नंदिनी च्या टीम मध्ये...... राज पुढे आला

Ye ssssss.......... नंदिनी ओरडली तशी बाकीचे मुलं पण तिच्यासोबत उड्या मारायला लागली.......

बघ आता कोण हरते ते..??........नंदिनी

नाही.....हा......हे चीटिनग आहे........तो एक्स्ट्रा प्लेअर झाला तुमच्या टीम चा.......असे नाही चालणार........राहुल

आता परत नंदिनीचा चेहरा पडला......

Okay okay......... नंदिनीच बॅटिंग करेल........मी फक्त तिच्या हाताला पकडेल .......ते तर चालेल.........??? राज ने राहुल कडे बघत एक डोळा मारला......

"भावाला इकडे रोमान्स सुचत आहे"....मनातच विचार करत राहुल पण गालात हसला........

ठीक आहे चालेले........काय छोटी पलटण चालेल ना.......???....या ताई ला खेळता येत नाही नीट तर हे अंकल तिला शिकावतील......राहुल
 

अंकल....???......राज एक भुवई उंचावत राहुल कडे बघत होता

नंदिनी पण तोंड दाबून हसत होती..

हा.....आता ही मुलं मला दादा, हिला ताई......मग तुला दादा कसे वाटेल........म्हणून अंकल.......तुझीच साईड सावरली यार मी.........राहुल  राज ची मस्करी करत बोलत होता......

हो चालेल...... मुलं ओरडली...

राज बाहेर राहुल ला बाहेर बघायला गेला....आला नाही बराच वेळ झाला.........आई

मी बघतो.......रविकांत

अहो काका , मी बघते.........तुम्ही सगळे नाष्टा घ्या आणि गप्पा करा.......रश्मी

बरं ठीक आहे.......रविकांत

रश्मी राज ला बघायला बाहेर आली........पण राज तीला कुठेच दिसत नव्हता.......ती आतमध्ये येणारच की तेवढयात तिला मुलांचा गलका ऐकू आला.....आणि तिने चाळीच्या मागच्या बाजूला असलेले पटांगण बघितले तर लहान मुले नी त्यांच्या सोबत दोन मोठी मुले नी एक साडी मधली मुलगी दिसली...........आणि तिने राज ला ओळखले.....नी अंदाज बांधला हेच असतील.......आणि ती थोडी साईड ला जाऊन त्यांना बघत होती....

एक मोठा मुलगा पाठमोरा,  आपल्या खांद्यावर एका लहान मुलाला बसाऊन सगळे मुलं त्याच्या भोवती नाचत ओरडत होते......रश्मी ला ते बघून खूपच भारी मजा वाटत होती..

कसले भारी लोकं आहेत हे........कुठून उच्च सोसायटी च्या लोकांसारखे अजिबात वागत नाही आहेत.....अगदी आपल्या इथलेच जवळचे वाटत आहेत.......आणि हा बहुतेक राहुल असावा......किती भारी आहे हा.....डायरेक्ट छोट्या ला खांद्या वर बसवले..... अन् काय नाचून राहिला त्यांच्या सोबत......अगदी माझ्यासारखाच.....स्वभावाने बरा वाटतोय.......रश्मी आताच काही मत बनऊ नको.....त्याला आपल्या अटी मान्य होतील तरच आपण पुढे बघू..........रश्मी त्यांन खेळताना बघत तिच्या डोक्यात विचार सुरू होता...

Yeah.....yeah..... फोर ....आमचा फोर ......राहुल आणि त्याची टीम उड्या मारत होती....

बस झालं......आता आम्ही बघ सिक्स मरतो की नाही ते.....राज चल.......नंदिनी बॅट घेऊन  बॅटिंग साठी उभी राहिली.....इकडे राहुल बॉलिंग करणार होता......

राज नंदिनीच्या मागे जाऊन उभा राहिला...त्याने मागून नंदिनी जवळ येत , नंदिनी ने पकडलेल्या बॅट ला तिच्या हातावरून पकडले...........

रेडी...????.....राहुल

हो..........नंदिनी

ये पिल्ल्यांनो बरोबर फिल्डिंग करा.........म्हणत राहुल ने एक बॉल टाकला.........संध्याकाळची वेळ, हवा वाहत होती......राज बॉल ला मारणार तेवढयात नंदिनीचे मोकळे केस हवे बरोबर उडत राजच्या चेहऱ्यावर आले.......आणि थोड्यावेळ साठी तो त्या रेशमी केसांच्या स्पर्शात हराऊन गेला...........

आली मोठी सिक्स मारणारी.........राहुल परत नंदिनी ला चिडवायला लागला.......

राज....... कुठं लक्ष आहे तुझं....??....राज बॉल पलीकडून निघून गेला....नंदिनी ने तिच्या हाताच्या कोपाऱ्याने मागूनच राजच्या पोटात ठुसा मारला.......

येह हवाये जुल्फो मे तेरी गुम होजाये...........,...राहुल गाणं गुणगुणायला लागला........नी राज ला बघून हसत होता....

थोड्या अंतरावरून रश्मी हे बघत गालातच बघत हसत होती......अजूनही ती राहुलच्या मागे उभी होती.....त्यामुळे राहुल तिला पाठमोराच होता.......

कसला पिडतोय आपल्याच भावाला हा......किती बदमाश आहे......... वेरी क्यूट...........रश्मी मनातच विचार करत होती..

नंदिनी च्या मारल्याने राज भानावर आला...... अग हे तुझे केस माझ्या डोळ्यात जात आहेत......थांब....म्हणताच त्याने हळूवार पणे आपल्या बोटांनी तिच्या मानेवरून सरकवत तिच्या खांद्यावर पुढे आणले........आणि तिचा साडी चा पदर हाताने नीट पकडून पुढे नेत तिच्या कंबरवर खोचला.....हे सगळं इतक्या फास्ट झाले की नंदिनी लांकाहीच कळलं नाही, ...त्याच्या तश्या झालेल्या स्पर्शाने  नंदिनीच्या अंगावर रोमांच आल्यासारखे झाले.....तिच्या हृदयची धडधड खूप वाढली होती.....तिला पोटात कसेतरी व्हायला लागले........काहीतरी होतंय पण तिला कळत नव्हते.......आता मात्र तीच डोकं पूर्णच ब्लँक झालं होते......तिला काहीच सुचत नव्हते.....आणि ती फक्त आता चोरून चोरून साईड ने राज ला च बघत होती.....

राज ला तर मी रोज च बघते......पण आज बघतांना का येवढा आनंद होत आहे......अस वाटतेय राज कडेच बघत राहावं...... ....नंदिनी राज  कडे बघत मनातच विचार करत होती.......

राज बॅटिंग साठी पोझिशन घेत होता.....नंदिनी आता लक्ष दे......त्याने राहुल कडे बघत नंदिनी ला सांगितले.....

ह.....हो.......म्हणत नंदिनी पुढे बघायला लागली.....पण राहून राहून तिची नजर राज कडेच जात होती....

होगया है तुझको तो प्यार सजना.....लाख करले तू इन्कार सजना.........राहुल ने एकदा नंदिनी कडे बघितले, राज ला एक डोळा मारला... आणि बॉल टाकला.........

Yeah........ सिक्सर............छोटे मुलं ओरडले नी नाचायला लागले........

Yeah......... नंदिनी राहुल पुढे जात त्याला ठेंगा दाखवत नाचत होती........राज ला तिला तसे करतांना बघून खूपच हसायला येत होते.......तो स्वतःतच हसत होता.....

ये दादा ...तू हरवले आम्हाला....राहुल च्या टीम मधला एक चुटका बोलला.....तसे बाकीचे पण बोलायला लागले.....

ये ताई......तू ये ग आमच्या टीम मध्ये, या दादाने हरवले आम्हाला......... मुलं

मुलांच्या आवाजाने राज आणि नंदिनी चे लक्ष पण तिकडे गेले............आणि नंदिनी नाचता नाचता सरळ झाली

फुसकला सगळा प्लॅन.......ही अशी अचानक इथे कशी काय......??.....नंदिनी हळूच पुटपुटली....नी राहुल ला डोळ्यांनीच इशारा करत होती...तिकडे बघ म्हणून....पण राहुल ला काही कळत नव्हते...

मुलं कोणासोबत बोलत आहे म्हणून राहुल ने मागे वळून बघितले तर रश्मी उभी होती

राहुल ला बघून रश्मी शॉक झाली

तू..........????.........रश्मी

राहुल.नी डोक्यावर हात मारला..... गंडल्ला प्लॅन..........तो  बिचाऱ्या नजरेने तिच्याकडे बघत होता....

ओ Mr Romeao इथ काय करत आहात......हॉस्पिटल फिरायला कमी झालं की आता इकडे आलत चक्कर मारायला........रश्मी

मॅडम ....जरा शांत व्हा......मी सांगतो काय झाले आहे ते......राहुल

मला काही ऐकायचे नाही आहे....आताच्या आता इथून चालते व्हा........नाहीतर.......रश्मी

नाही तर काय....??.....नाही जात काय करणार.........राहुल

ही माझी गल्ली आहे हा लक्षात ठेवायचं.........रश्मी

हा ... तर मी कुठे म्हणतोय नाही आहे ते........मला पण या गल्ली ला माझी बनवायला आवडेल....... राहुल गालात हसत बोलला...

तुझ्या जाम च अंगात आली आहे ....थांब दख्वतेच तुला....तू तुझ्या पायवर घरी जाता येणार नाही.......रश्मी

सगळे त्या दोघांचे भांडण बघत होते.......त्यांचं भांडण संपायचे नाव घेत नव्हते.......आणि राहुल अजूनच मस्करी करत बोलत होता त्यामुळे रश्मी अजुनच चिडत होती.....

नंदिनी....जा बोल तिच्यासोबत.....नाहीतर यांचे भांडण जास्ती वाढेल.......राज

हो.........नंदिनी रश्मी जवळ आली.......

रश्मी.....एक मिनिट मला बोलायचं....इकडे साईड ला येते प्लीज........नंदिनी
नंदिनी मध्ये आल्याने ते दोघं चूप झाले.....नी रश्मी तिच्यासोबत साईड ला गेली...

रश्मी..... मी नंदिनी.......हा श्रीराज......आणि हा राहूल.....राहुल देशमुख ...तुझ्यासाठी आलेले स्थळ......लग्नासाठी.......नंदिनी

काय..........???......हा......हा राहुल देशमुख आहे.......रश्मी ला काही विश्वास बसत नव्हता......

हो ....हाच राहुल देशमुख........नंदिनी

कॅन्सल........रश्मी

व्हॉट......??......राहुल

तू रीजेक्ट..........मला नाही करायचं तुझ्या सोबत लग्न.......... रश्मी

अरे....यार.....मी तुला त्या दिवशीच सांगितले आहे ....मी मुद्दाम नाही केलेले......राहुल

रश्मी तो खरं बोलतोय.......नंदिनी

ताई.......या दादाने आम्हाला हरवले.......आपल्याला जिंकायचं.......मुलांनी मध्येच सुर काढला..

अरे ओ चुटक्यांनो.......पाहिले ते तिला ताई म्हणायचं बंद करा.....आंटी म्हणा.........राहुल

नंदिनी आणि राज गालातल्या गालात हसत होते..

ये आंटी कोणाला बोलतोय......मी ताई आहे यांची.....रश्मी

बरं.......ये पोरांनो मला अंकल म्हणायचं.....दादा नाही.......राहुल

ताई ..... चल ना या अंकल ला हराऊ........ मुलं

हो हो चला चला.....मज्जा येईल , मला पण हरवायचे त्याला.......नंदिनी

ये तू माझ्याकडुन आहेस ना.......राहुल

तुला हरवायच्या  टीम कडून........नंदिनी

असं काय......आता तुम्हाला बोल्ड च करतो........राहुल बॉल हातात घेत बोलला

नाही सिक्स मारले तर रश्मी देसाई नाव नाही लावणार......,रश्मी

चालेल......रश्मी देशमुख करूया तुझं नाव.......राहुल

You........ रश्मी त्याच्या पुढे बोट करत बोलली

अजूनच छान दिसते रागा मध्ये.......राहुल

तुला बघुन घेईल.........रश्मी

त्यासाठीच तर आलोय.......बघ जितके हवे तितके.......राहुल

आगाऊ..........रश्मी

So sweet of you........ राहूल

ये चला रे आपण बॅटिंग करू....... बॅट पकडत रश्मी आपल्या जागेवर गेली....

रश्मी हरवायचे आहे त्याला.......नंदिनी

हो...... don't worry.......... रश्मी ती नंदिनी ला thumsup दाखवत म्हणाली....

मी हरायला तयार आहो.........राहुल ओरडला

राज ने डोक्यावर हात मारला......

हा पूर्णच वेडा झाला तिच्या मागे......नंदिनी खुदकन हसली

रश्मी पण राज ला बघायला गेली आणि बराच वेळ झाला परत नाही आली बघून रुची त्यांना बघायला बाहेर आली होती......तिला पण हे लोक खेळताना दिसले नी ती पण त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली....

रश्मी ...रश्मी.......नंदिनी नी बाकीचे मुलं रश्मी ला चेअर अप करत होते......राहुल ला कोणीच करत नव्हते.....

राहुल ने बॉल टाकला.....

ये सिक्स..........नंदिनी आणि बाकी सगळे टाळ्या वाजवत होते...

पहिला होता.....मुद्दाम हळू टाकला........राहुल

असू दे, असू दे.......नंदिनी

आता बघच...........परत राहुल ने बॉल टाकला.....परत सिक्स......मॅच चांगलीच रंगात आली होती.....रुची ला पण मजा येत होती......सगळेच आपल्याला घरात परत जायचे आहे विसरले होते.....
 

जो शोधायला गेला तो परत येत नाही आहे बघून आता घरातले बाकी सगळे च बाहेर काय गडबड आहे म्हणून बघायला आले होते........बाहेर येऊन बघतात तर सगळे मुल बाहेर खेळण्यात दंग झाले होते.......

रश्मी ची आई चा राग तर पारावर चढला होता.....काय या पोरी...सध्या गोष्टी समजत नाही.....पाहुणे आले आहेत तर कसं वागायचं असते.....काय म्हणतील लोकं , आईवडिलांनी काहीच संस्कार केले नाहीत.....काहीच शिकवले नाही.........त्या हळुहळु च रमेश देसाई जवळ बडबड करत होत्या...

रेवती शांत हो......बाजूला सगळे उभे आहे.....नंतर बोलू आपण......रमेश समजावण्याचा सुरात बोलत होते..

देसाई राव संबंध पक्का झाला......चला आता पुढल ठराऊन बोलूया..........आबा मुलांकडे बघत हसत बोलले

रेवती रमेश त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरे ने बघत होते

अहो.......त्या दोघांना ते आवडले आहेत......आता आपण पुढे बोलूया.......आबा

तुम्हाला कसे कळले.........?? रमेश

सगळ्यांचे चेहरे बघा......सगळं सांगत आहेत........ चला आतमध्ये ....आपण आपलं मोठ्यांचे काम करूया.....त्यांना खेळू द्या......आबा

अहो पण???............रेवती

खेळू द्या हो रेवती ताई......... मुलं आनंदी आणि खुश असायला हवी.....मग घरात असो की घराबाहेर.....काय फरक पडतो......आबा

हो हो.....चला चला......खूप मन मोकळे खेळत आहेत......कामाच्या व्यापात कुठे वेळ मिळतो आजकाल त्यांना.........खेळू द्या त्यांना........दोघांनी एकमेकांना बघणे, भेटणे, जाणून घेणे महत्वाचे, नाही काय...??.....निती

ठीक आहे......आपण बसुया आतमध्ये.......रेवती

सगळे आतमध्ये चालले गेले....

सगळे रश्मी ला चीयर अप करत होते, राहुल बिचारा एकटा पडला होता.........आता शेवटचा बॉल उरला होता....

जिजू sss...... जिजू.......... जीजू sssss...... जिजु s.......... रुची चिअर अप करायला लागली..

रश्मी डोळे मोठे करत रुची कडे बघत होती.........राज, नंदिनी, राहुल गालातच हसत होते.....

अग ये.......डोकं बिक फिरले आहे काय तुझं........रश्मी

मला तर आवडले बाबा माझे जिजू........... जिजू करेल तर यांनाच.......दुसरे नको कोणी मला........तू तुझं बघ, माझं ठरले आहे.........रुची

रश्मी तर शॉक झाली.....

Thank you रुची darling.... मला पण तू फारच आवडली......... माझं पण ठरले आहे, तुझ्या ताई ला बघ म्हणावं तिचं तीच......... राहुल तिला फ्लायिंग किस देत होता...

जिजू जिंकायचं हा......रुची

मी तर तुझ्या ताई ला पहिल्यांदा बघितले, नी तेव्हाच हरलो ग.......राहुल

भयंकर flirty आहे हा........रश्मी

लास्ट बॉल आहे...... बेट लाऊया..........मी जिंकलो तर मी तुझ्यासोबत लग्न करणार......राहुल

काही फालतूपणा...... चल बॉलिंग कर.......आणि रश्मी पोझिशन घेऊन उभी झाली.......आता आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.......अंधार पडला होता संध्याकाळचे ७-७.३० वाजले असतील........बाजूच्या street light चा थोडासा प्रकाश पडत होता......काही मुलं संध्याकाळ झाली म्हणून आपापल्या घरी पळाले होते....तर काही तिथेच होते.....त्यांना पण भारी मजा येत होती...आता सगळे नजर रोखून त्या दोघांकडे बघत होते.......सगळं असं आता टीव्ही मध्ये दख्वतात तसे slow motion मध्ये सुरू होत????????.....आणि राहुल ने बॉल फेकला..........तो जाऊन रश्मीच्या हातातल्या बॅट वर आपटला.....आणि रश्मी ने बॅट घुमावली......बॉल वरती उडाला.............

सी ssssss....... क...............आणि ही कॅच...............रुची ओरडली........

ये ssss........नंदिनी बाजूला उभा असलेल्या राज चा हात पकडत आनंदाने उड्या मारायला लागली.......राहुल जिंकल्याचा तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता........राज ची तर नजर हटत नव्हती तिच्या चेहऱ्यावरून.....तो तिच्यामध्ये हरवला होता.....

चलो.......हम बारात लेके आरहे आपके द्वार........दुल्हन हम ले जायेंगे..........राहुल शॉक झालेल्या रश्मी जवळ जात एक डोळा मारून हसतच  बोलला..........रश्मी तर फक्त त्याच्याकडे बघत होती......

ऐसे ना देख पगली..... प्यार हो जाएग..........राहुल

ये जीजू सुपर.........रुची.... बरं

या सगळे आत, वाट बघत आहे, मी तर सांगायलाच विसरले......आणि तुम्ही रे पोरांनो चला पळा आपल्या घरी.....उद्या आपण जिंकल्याची पार्टी करू......चला आता पळा.......रुची

तसे सगळे लहान मूल आपापल्या घरी पळाले.....रुची पण आतमध्ये निघून गेली...

Thank you....... राहुल बोलतच नंदिनी जवळ गेला...

ये मोटी ...हरली तू...........राहुल परत तिला चिडवायला लागला...

ये sss मोटा तू..........म्हणतच नंदिनी त्याच्या मागे मारायला पळाली.......रश्मी मात्र कौतुकाने त्यांची मस्ती बघत होती.......

नंदिनी आणि राहुल आलटून पालटून कधी राज च्या भोवती तर कधी रश्मीच्या भोवती पळत होती.....नंदिनी ला साडी असल्याने नीट पळता येत नव्हते , तिने एका हाताने साडी वरती पकडून ठेवली होती.......राज आणि रश्मी त्या दोघांनाच बघत होते..........हिवाळ्याची रात्र.....सगळीकडे आता शांतता होती.....थंड हवा सुरू होती.......आणि राहुलच्या डोक्यात परत एक खट्याळपणा आला....त्याने इकडे तिकडे बघितले...तिथे कोणीच नव्हते....आणि त्याने परत आपला चांस मारला.....पळता पळता त्याने नंदिनी ला धक्का मारला........आणि काही कळायच्या आतच नंदिनी राज च्या अंगावर जाऊन पडली.........

चल आतमध्ये जाऊ, सगळे वाट बघत असतील......राहुल रश्मी जवळ येत बोलला...

तू....तू मुद्दाम दिला ना त्यांना धक्का......मी बघितले.......थांब मी जाऊन सांगते........रश्मी नंदिनी कडे जात होती......तेवढयात राहुल ने तिचा हाथ पकडला नी मान हलवत च नाही म्हणाला.....  त्यांना एकदा बघ असा डोळ्यांनीच इशारा केला.....तशी रश्मी त्या दोघांना बघायला लागली....

नंदिनी आणि राज एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते........

खूप प्रेम आहे ना दोघांचे एकमेकांवर......रश्मी

ह्मम....जगावेगळे प्रेम आहे त्यांचे.....खूप कठीण परीक्षा देतात आहे ते......मी फक्त थोडी मदत केली....... राहुल

म्हणाजे.....??......रश्मी राहुलच्या डोळ्यात बघून बोलत होती.....तिला त्याच्या डोळ्यात काहीतरी sadness जाणवले......

वाघाचे पंजे................ चल आपण जाऊया..... तसं पण आपला कांदेपोहे चा कार्यक्रम आहे.........

हो......रश्मी पुढे निघाली.....राहुल तिच्या बाजूने जात होता...

नंदिनी जेव्हा पळता पळता जेव्हा राज च्या पुढे आली होती....बरोबर तो चांस बघून राहुल ने नंदिनी ला धक्का दिला होता.......अचानकपणे धक्का लागल्याने नंदिनी एकदम छातीवर जाऊन आदळली होती......ती पडू नये म्हणून त्याचे नकळत हाथ तिच्या कंबरेवर गेले होते.....नी त्याने तिला पकडले होते......थंडी मध्ये त्याचा हाथाचा गरम स्पर्श तिच्या कंबरेला झाला होता.....ज्यामुळे एकदम तिला शहारून आले होते..,.. हार्ट बिट्स पण वाढल्या होत्या.......ती त्याच्या मिठी मध्ये होती......थंडी मध्ये त्याचा मिठीतली ऊब तिला हवीहवीशी वाटत होती........तिने हळूच मान वर करत राज कडे बघितले.....तर तो खूप प्रेमाने तिच्या कडे बघत होता.........आता ती पण त्याचा नजरे मध्ये कैद झाली होती..........हवे मुले तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते......ती मात्र त्याला बघण्यात गुंतली होती........तिच्या डोळ्यात त्यालाही प्रेम दिसत होते.......तो गोड हसला.............. ती अशी सुंदर तयार झाल्यापासून आता ती त्याला इतक्या जवळून बघता येत होते.......ती खूपच नाजूक सुंदर दिसत होती......तिचे डोळे तर त्याला वेड लावत होते........तिचे उडणारे केस ,त्याला तिला बघण्याच्या मध्ये येत होते......तिचे डोळे, ओठ झाकत होते......आणि तिचे केस दूर करण्याचा मोह त्याला आवरता आले नाही......आणि त्याने हळूवार पणे तिच्या कपाळावर त्याच्ये दोन बोटं ठेवत , हळूवार पणे खाली आणत तिचे केस तिच्या कानामागे अडकवले........त्याच्या त्या होणाऱ्या स्पर्शाने तिचे डोळे आपोआपच मिटल्या गेले...,.तो हसला........तो खाली वाकला नी तिच्या कानाजवळ गेला..... कानावरचे केस बाजूला करत बोलला......" खूप गोड दिसत आहेस ".......

नंदिनी ने डोळे उघडून त्याच्याकडे बघितले नी लाजतच परत त्याच्या कुशी मध्ये शिरली.......ती अशी जवळ आलेली बघून त्याने एक समाधानाचा श्वास सोडला.......... तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने पण तिला आपल्या मिठी मध्ये जवळ घेतले होत........आणि त्याच्या डोळ्यातून एक अश्रू....कदाचित आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून गालावर घरांगळला होता.......कदाचित आज त्याला तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसले होते......

तिथेच दूरवर कुठे तरी गाणं सुरू होत....जे त्या वातावरणाला अजूनच रोमँटिक बनवले होते...

ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम इकतारा..
है रोम रोम इकतारा
जो बादलों में से गुज़रे..
ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे

तू होगा ज़रा पागल,
तूने मुझको है चुना
तू होगा ज़रा पागल,
तूने मुझको है चुना
कैसे तूने अनकहा,
तूने अनकहा सब सुना
तू होगा ज़रा पागल,
तूने मुझको है चुना
तू दिन सा है, मैं रात
आना दोनों मिल जाएँ शामों की तरह
ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे

की ऐसा बेपरवाह मन
पहले तो न था
की ऐसा बेपरवाह मन
पहले तो न था
चिट्ठियों को जैसे मिल गया
जैसे इक नया सा पता
की ऐसा बेपरवाह मन
पहले तो न था
खाली राहें, हम आँख मूंदे जाएँ
पहुंचे कहीं तो बेवजह
ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे

*******

क्रमशः

*****

Hello mitranno

Mala mahiti asa kandepohe program kadhi jhalach nasel, kinva tumhi aikala hi nasel........aata kathach wegali mhantalyawar kandepohe pan wegalech nahi ka... Mala kalatey jara jastich filmy jhalay........pan kathach aahe....chalaun gheuya...????...

Aaj cha part kasa watala nakki kalawa

Thank you

🎭 Series Post

View all