
भाग 51
नंदिनी आता ऑफिस मध्ये बऱ्यापैकी राज च्या अवतीभोवतीच्या असायची...त्याने तिला तो असेल त्या बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये घेतले होते.......ती त्या मध्ये काही काम नव्हती करत ...फक्त वेळ भेटेल तसे प्रेझेंटेशन, मीटिंग अटेंड करायची.....नी त्यातून नवीन जे शब्द कानावर पडायचे ते एका बुक मध्ये लिहून काढायची....बाकीच्यांचे चाललेलं डिस्कशन, प्रश्न उत्तरे .... असे सगळे ती बघायची....आणि मग घरी येऊन त्याच डिटेल मध्ये वाचन करायची....त्यात जर काही कठीण वाटले तर राज अनाव राहुल कडून समजून घ्यायची.....सोबतच तिला यामुळे राजच्या अवतीभोवती राहायला भेटायचे, त्यामुळे त्याच्या जवळ येणाऱ्या, त्याच्या सोबत बोलणाऱ्या प्रत्येक मुलीवर तिची बारीक नजर असायची.......एखाद्या मुलीसोबत राज जास्तीच बोलतांना दिसला की त्या मुलीची सगळी माहिती काढायची........ असं काय ते ऑफिस च्या कामासोबत तिचे हे फा काम पण सुरू होते.....
रश्मी च तिच्या आईसोबत झालेल्या बोलण्याप्रमाने रश्मीच्या आईने राहुल च्या आई ला फोन करून घरीच कांदेपोहे करायचं सांगितले आणि घरी येण्याचे निमंत्रण दिले होते...... आजीसाहेबांनी आधी थोडी कुरबुर केली त्यांच्या कडे जायला..पण नंतर घरातले सगळे तयार होते तर मग त्या पण तयार झाल्या होत्या....आणि येणाऱ्या रविवारी म्हणजे उद्याच रश्मी च्या घरी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरला होता..
काय मग राहुल साहेब.....खुश काय.....नंदिनी
हो.....पण मला टेन्शन आलाय ग........राहुल
का रे .....कशाचे टेन्शन....???.....आणि मुळात टेन्शन घेण्यासारखे काय आहे??.....आणि तू असा का दिसतोय,.....काही झालं आहे काय...??....नंदिनी
राहुल ने इकडे तिकडे बघितले ...नी कोणी जवळ नाहीये बघून बोलायला लागला..
नंदिनी मी त्या दिवशी तिला भेटलो होतो.........राहुल
तिला.....??...कोणाला...??.....नंदिनी
रश्मी......रश्मी.देसाई ला.....राहुल
काय...??......नंदिनी जोरात ओरडली
Sh sss .... अग गप.....हळू.....बाकीचे ऐकतील ना.......तो तिला पकडत तिच्या तोंडावर हाथ ठेवत बोलला
नंदिनी ने मानेनेच हो म्हटले, नी राहुल चा हात बाजूला केला...
पण तू कसा काय भेटला........??...नंदिनी खुसरपुसर आवाज करत बोलत होती
अग मला तिला बघायची इच्छा झाली होती.....व्हिडिओ मध्ये त बघितले होतेच पण प्रत्यक्षात पण बघायची इच्छा झाली....म्हणून मग सकाळी ती हॉस्पिटल मध्ये यायच्या वेळेला मी तिथे गेलो नि बाहेरच कार जवळ टेकून तिची वाट बघत उभा होतो.......ती दिसली येतंना....ती तिची स्कूटर पार्क करत होती....तिला बघून मी तिच्या जवळ जात होतो....hi hello करायला......तिला बघण्यात तेवढा गुंतलो की चालता चालता एका नर्स ला धडकलो....
ये हिरो.....काय??? ..मुलगी बघितली नाही की लागले तिच्या मागं.......
राहुल ने साईड ला बघितले तर रश्मी उभी होती......तिला बघून तर राहुलची बोलतीच बंद झाली....
हे का डोळे फाडून बघत आहात..........रश्मी
अ..... सॉरी..... सॉरी मिस चुकून झालं....लक्ष नव्हते.......राहुल
चुकून...?? काय चुकून.....हा काय बगीचा आहे काय इथे डोळे बंद करून फिरायला........आणि चांगलीच ठाऊक आहेत तुमच्यासारखी मुलं........मुलींच्या मागे मागे भिनभिन करत असतात.......एक पंच दिला ना की अक्कल ठिकाणावर येईल....म्हणत रश्मी एक पंच साठी हाथ पुढे करतच होती की राहुल ने तिचा हाथ पकडून घेतला......आणि तिचा हाथ मागे नेला....त्यामुळे ती त्याचा जवळ आली.....
मॅडम......तुमचं बरोबर आहे ,कुणी इतकं सुंदर डोळ्यांसमोर असेल तर लक्ष कसं राहायचं दुसरी कडे...तो तिच्या डोळ्यात कॉन्फिडन्स नी बघत होता........पण मी खरंच सांगतो आहे या मॅडम ला खरंच चुकून धक्का लागला होता.....मुद्दाम काही केले नव्हते......आणि तुमचे हाथ पाय किती चालतात मला माहिती आहे....त्यामुळे तुम्ही पुढे अस्तांना अशी चूक तर मी अजिबात करणार नाही..... राहुल बोलून तिचा हाथ सोडला....नी जिला धक्का लागला होता तिच्या कडे वळला.......
मॅडम सॉरी.....चुकून झालं तसे.........राहुल
It's okay sir...... मला माहिती तुमचं लक्ष नव्हते....... नर्स
या मॅडम ला प्लीज सांगाल तुम्ही......यांचा गैरसमज होतो आहे.........राहुल
रश्मी मॅडम.....सर खरं बोलत आहेत.....चुकीने धक्का लागला त्यांचा........नर्स
Thank you मॅडम.......राहुल
रश्मी तर आधीच त्याच्या तिच्या असे जवळ आल्याने चिडली होती....त्यात आता नर्स पण तिची बाजू घेत आहे बघून तिचा राग वाढला होता....... रागानेच राहुल कडे बघत हॉस्पिटल मध्ये गेली...
शिट यार......काय करायला आलो होतो नी काय झालं.......राहुल ने तिला जातांना बघत एक हाथ केसंतून फिरवला नी आपल्या गाडीत जाऊन बसला....
मैत्री करायला गेलो होतो.....नी दुष्मनी ओढून आलो....... सगळा घोळ झाला........ राहूल
नंदिनी ते ऐकून खूप हसायला लागली .....
तू हसते आहेस......मला इथे भीती वाटते आहे ती उद्या कशी रिॲक्ट करेल ते......खूपच तिखट आहे बाबा ती...,राहुल
हा हा हा.....तिखट मुलीच नंतर खूप गोड होतात.....राज त्यांचं बोलणं दुरून ऐकत होता...... तो त्यांच्या जवळ आला.......
हा...........नंदिनी आपले दोन्ही हात गालावर ठेवत राज कडे तोंड उघडं ठेऊनच डोळे मोठे करत बघत होती.....राहुलची पण काही वेगळी परिस्थिती नव्हती...तो पण राज कडेच बघत होता........
अरे असे काय बघत आहात..... भूत बघितल्या सारखे........राज नंदिनीच्या हनुवटीला खालून आपल्या हातानी प्रेस करत तीच तोंड बंद करतात होता......हाथ काढला की परत नंदिनी चे तोंड उघडत होते as it is.........
ये....तुझं हे येडपट , क्राईम पार्टनर, सांभाळ.......आणि तू काय असा शॉक होतो आहेस.......राज ने राहुल च्या खांद्यावर एक पंच मारला....
ये sssss.......my bother...... Raj is back...... राहुल जोऱ्याने ओरडला.........
राज ने डोक्यावर हात मारला........दोघंही नौटंकी......
नंदिनी...........आपलाच राज आहे......राहुल ने नंदिनीच्या पाठीत हळूच एक फटका दिला......
हा..... राज आहे......???....अजूनही ती राज कडे शॉक मध्ये असल्यासारखी बघत होती...
तुम्ही दोघं अती नाही करत आहात........राज
आम्ही नाही, तू अती करतोस........सतत आपला मोठ्या माणसांसारखा......हा असाच होता काय रे लहानपणापासून..???...नंदिनी
नाही ग........खूप मस्ती करायचा......आताच असा झालाय तीन वर्षा पासून.......राहुल
का...??....काय झालं असे.....??....नंदिनी
त्याची मैत्रीण कुठे सापडत नाहीये........ती हरवली आहे.........म्हणून......राहुल
किती टाईमपास करता रे तुम्ही दोघं........नंदिनी याच्याकडे लक्ष नको देऊ......हा असच काहीतरी फालतू सांगत असतो.......माझी मैत्रीण फक्त तू आहेस......अजून कोणी नाही.........राज
पण ती तुझी बालपणी ची कुठे आहे........राहुल परत मस्करी करत होता..
राहुल लग्न करायचे ना ......रश्मी सोबत....???.....राज
आता तू पण धमकावणार काय....??....राहुल
नाही......जो घोळ घालून ठेवलाय ना त्याचा विचार कर........राज
ये....नंदिनी हो ना......फार गडबड झालिये.....काय करायचं..??......राहुल
करूया रे काही, काहीतरी सोल्युशन निघेलच......फक्त तू अगदी निडर राहायचं.....आणि हो जेव्हा एकट्यात बोलायचं चांस भेटेल तेव्हा खरं काय ते बोल......अगदी तुझ्या गर्लफ्रेंड पासून सगळं ......तिला सगळं माहिती असायला हवे...............नंदिनी
झालं मग.......राहुल
नंदिनी बरोबर बोलतेय....नवीन नाते जोडतोय.....विश्वासावर असायला हवे........मैत्री , प्रेम तर असतोच कुठल्या पण नात्याच्या पाया, पण विश्वास सगळ्यात महत्वाचे असते.....आणि आपल्या जोडीदार प्रती आदर, रिस्पेक्ट आयाला हवा....गमती जमती वेगळा भाग पण जेव्हा गरज पडली तेव्हा सगळ्यांसमोर एकमेकांची साथ द्यायला , एकमेकांच्या बरोबरीने उभे राहायला मागेपुढे नाही बघायचं.....जे बरोबर आहे, जे खरे आहे त्याची साथ देता यायला हवी..........तरच हे लग्न चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल......प्रेम जरी फक्त बेडरूम पुरते मर्यादित ठेवायचे असते ,तरी आदर हा सगळीकडे ठेवता यायला हवा.............राज
ऑसम...........नंदिनी टाळ्या वाजवत होती.....
यार आधीच मी घाबरलो आहे त्यात तुम्ही दोघे नवीन नवीन सांगत घाबरवत आहात.........राहुल
ये डरपोक........ चल तयारी करू उद्याची......मला काही आयडिया आल्या आहेत.....म्हणत नंदिनी राहुल चा हाथ ओढत त्याला बाहेर घेऊन जाऊ लागली.....आणि परत काहीतरी आठवले आणि ती परत राज जवळ आली........राज तिला परत आलेले बघून फक्त तिच्याकडे प्रश्नार्थक नजरे ने बघत होता......
नंदिनी ने राज च्या मानेला कानाजवळ पकडत त्याच्या कानाजवळ जात होती.......राज ला तर ती काय करतेय काहीच कळत नव्हते.....तिला अचानक इतके जवळ आलेले बघून त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती.... त्याचं तर डोकच ब्लँक झाले होते......ती त्याच्या कानाजवळ गेली....
मला मस्तीखोर राज बघायला खूप आवडेल.......ती हळूवारपणे त्याच्या कानात बोलली..........नी त्याला सोडून त्याच्याकडे एकदा हसून बघितले....नी परत गेली....
Someone blushing ha......... I told you.... I told you.......... राहुल नंदिनी गेल्यावर राज जवळ येत बोलला.......नंदिनी बोलून गेल्यावर राज पूर्णच लाल झाला होता....आधीच इतका गोरा...त्यात लाजल्यामुळे त्याचे गाल फारच लाल झाले होते.....आणि तो स्वतःशीच स्मायल करत होता....त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती.......तेच बघून राहुल त्याला चिडवायला आला होता......
********
रुची चल पटपट काम आवर...नंतर छोटीशी रांगोळी पण काढ दारासमोर......येतीलच आता ते लोकं लवकर........रश्मी उशांची खोळी झाल्या काय बदलून......अहो हे काय अजून तुम्ही इथेच बसला आहात...... नाष्ट्याच आणायला गेले नाही अजून, त्यांच्या समोर आणणार आहात काय.........आई ची सतत बडबड सुरु होती...
अग आई किती टेन्शन घेते आहे........अग ते नॉर्मल लोकं आहेत आपल्या सारखे.....आणि मीच म्हणाले बाबांना बाहेरचा नाश्ता नकोय......माझी आईच इतके छान पोहे आणि चहा बनवते....कुणा हॉटेल वाल्याच्या हाताला सुद्धा सर नाही त्याची..........आपण घरीच बनाऊ आहेत.......रश्मी
अग ती इतकी मोठी लोक.......फक्त पोहे देणार आहेस त्यांना.........आई
हवे तर मी गोडाचा शीरा करेल...तुम्हीच म्हणाताना मी खूप छान करते......आणि तसे पण ती लोक ते बाहेरच नेहमीच खात असतील..... आपलं घराचं खाऊन बघा म्हणावं.....रश्मी
बरं बाई.......तुझ्या मताचे होऊ दे.......अग ये रुची आवर ग पटापट......तुम्हा दोघींना तयार पण व्हायचं आहे.....आणि हो ती सारी काढून ठेवली आहे ती घाल आज.....आई
साडी.....??......रश्मी
हो....... अशा कार्यक्रमांना साडीच घालतात....तू खूप सुंदर दिसते साडी मध्ये......आई
अग पण........रश्मी
पण बिन काही नाही, आम्ही तुझं ऐकले , आता तू आमचे ऐकायचे .....आई
रश्मी तोंड वाकडं करत तयारी साठी निघून गेली...
******
काकी, हे सगळं सोबत न्यायाची गरज आहे काय आता....??.....राहुल समोर टेबल वर ठेवलेले गिफ्ट, फळ, खूप सारे डब्बे बघून डोक्यावर आठ्या पाडत बोलला
वहिनी हे कडे चांगले दिसेल काय हो तिला द्यायला.....राहुल ची आई हातात सोन्याचे कडे आणत दाखवत होती.......ते बघून राहुल ने डोक्यावर हातच मारून घेतला...
आई हे काय आहे सगळं......आपण आता फक्त भेटायला चाललो आहे.....अजून काहीच ठरले नाही आहे........ राहूल
अरे.....आपल्याला आवडलीच आहे ती......मी तिला हे कडे घालून माझी सून करून घेणार......राहुल आई
आई....हो आपल्याला आवडली आहे.....पण तिची पण पसंती नको काय.....तिच्यावर कोणीच कुठली बळजबरी करणार नाही, तिच्या घरी पण सांगा......राहुल
काय.....काय झालं...??? राज तिथे येत बोलला.....
ब्रो.....तूच समजाव या महिला मंडळ ला.....हे बघ काय काय किती किती घेतले आहे सोबत......राहुल
राज पण समोर ठेवलेले समान बघून थक्क झाला....
आजीसहेब, काकी अहो आपण आता फक्त भेटायला चाललो आहे.....हे सगळं बघून त्यांना टेन्शन नाही का येणार......आपण तिथे जाऊ, मस्त गप्पा करू, खाऊ पिऊ नी परत येऊ.....आपण एकमेकांना जाणून घ्यायला जात आहोत तिथे......त्यांच्यावर दडपण येईल असे काही करू नका.....मला कळतो आहे तुमचा सगळ्यांचा उत्साह....पण आता ही या सगळ्यांची वेळ नाही आहे.......राज
बरं ठीक आहे हे सगळं नाही घेत.....पण हे कडे ठेवते माझ्या पर्स मध्ये, जर तिने होकार दिला तर मी तिला हे तिथेच घालेल.......रागिणी( राहुल ची आई)
राहुल ने तर डोक्यावर हाथ मारला..... अग आई.......... राहुल काही बोलणार तेवढयात राज ने त्याला दोण्यांनीच असू दे म्हणून खुणावले.....
Okay........ राहुल
चला चला , झाले काय सगळे तयार........ आबा
Wow आबा.....काय हँडसम दिसत आहेत.....आम्हाला कोण बघणार आता......राहुल मस्करी करत बोलला
हो मग....तुमच्या आजिसहेबांना शोभायला नको मी.......आबा
हो ...ते पण आहे....हिटलर ला मॅच करायलाच हवे.....तू पण आपल्या छोट्या हिटलर ला बघून घे बाबा.....नाहीतर तू पण डाऊन दिसायचा.......राहुल
अरे हो तिलाच शोधतोय.....दोन तासांपासून गायब आहे......राज
दोन्ही हिटलर एकाच रूम मध्ये घुसून बसल्या आहेत कधीच्या.......काकी हसतच बोलली
काय....??.....आबा, राज, राहुल एकसाथ ओरडला.
हो....कोण कोणाला तयार करत आहेत माहिती नाही , पण दोघींनी आतमधून दार लावून घेतले आहे........निती
हो मला पण हाकलले दोघींनी रूमचा बाहेर......आता वाट बघण्या खेरीज आपल्या हातात दुसरे काही नाही.........आबा नाटकी दुःखी सुर काढत बोलले
आणि तेवढयात नंदिनी आणि आजिसहेब बाहेर आल्या.......राज तर नंदिनी बघत परत हँग झाला.......बाकी सगळे पण दोघींकडे बघत होते
नंदिनी ने खणाची हिरव्या रंगाची मरहून बॉर्डर असलेली डिझायनर साडी , तिच्या रंगला अजूनच खुलून दिसत होती, , त्यावर मरून रंगाचे स्लीवलेस ब्लाऊज, गळ्यात तीन पदरी मोत्यांची लांब सर, हातात त्यालाच मॅचींग हिरव्या बांगड्या सोबत मोत्यांचे कडे, डोळ्यात भरपूर काजळ, ओठांवर लाईट शेड चे पिंक लिपस्टिक... ..कपाळावर हिरवी गोल टिकली त्याखले उल्टी केलेली छोटीशी हिर्विच चंद्रकोर....केस मोकळे, थोडे केस खंद्यापासून पुढे आलेले.......ती खूप सुंदर दिसत होती.....एकदम नवी नवरीच...इतकं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.......राज तर तिला बघताक्षणी च तिला बघण्यात गुंतला होता....
Wow यार नंदिनी कसली सुंदर दिसत आहे.......राहुल
Thank you thank you .... तू पण आज बरा दिसतो आहेस........नंदिनी
ये फक्त बरा काय ग.....??......तूच अशी म्हणतेय तर ती काय म्हणेल........राहुल चेहरा पाडत बोलला...
अले.....शोना बेबी नाराज झाला.......नंदिनी लाडावत बोलली......
बरं तू पण हँडसम दिसतोय..........
Thank you........ राहुल
पण राज पेक्षा कमीच........नंदिनी ने परत मस्करी केली.....
राहुल ने तोंड वाकडं केले........तुम्हाला माहिती तुमच्या दोघांची दुनिया एकमेकांवर येऊन थांबते.....राहुल
म्हणजे...???
नंदिनी प्रश्नार्थक नजरे ने त्याच्याकडे बघत होती
तुला त्याच्याशिवाय कोणी हँडसम नाही दिसत.....नी त्याला तुझ्याशिवाय कोणी सुंदर नाही दिसत.........राहुल
हा....ते तर आहेच......I am the best...... नंदिनी नसलेले कॉलर उडवत म्हणाली
ये चल जास्ती हवे मध्ये नको उडू.......राहुल
बरं, चला सगळे तयार झाले असेल तर निघुया........आबा
हो हो.....चला, उशीर नको व्हायला....घर शोधण्यात पण थोडा वेळ जाईल.......रविकांत
छाया हे घरीच आहेत, त्यांचं सगळे नीट केले आहे, औषध वरती टेबल वर ठेवले आहे, आम्ही येऊच लवकर, पण तरी उशीर झाला तर जेवण झाल्यावर यांना त्यांची औषध दे......निती छाया ला शशिकांत बद्दल इंस्ट्रक्शन देत होती...
तुमचा बघण्याचा कार्यक्रम झाला असेल तर आमचा पण बघण्याचा कार्यक्रम करूया......राहुल राज ला एकटक नंदिनी कडे बघतांना बघून कोप्र्याने मारत बोलला...
ह.......हो..........राज आपल्या तंद्रिमधून बाहेर येत बोलला...
राज ला तसे बघून आई काकी ला पण हसू येत होते.....
पण..... साडी..????......सांभाळेल काय...??...... राज नंदिनिकडे बघत बोलला
त्या सलवार कुर्ती च घालून आल्या होत्या.....पण मीच त्यांना साडी घालायला सांगितले.....एरवी तुम्ही घालताच ना आपल्या मताचे......मग अशांकर्यक्रमांना साडी च चांगली दिसते.......बायका साडी मध्येच घरंदाज दिसतात......घरची मोठी सून आहे आता त्या, देसाईंना सुद्धा कळायला हवे देशमुखांच्या सूना कशा आहेत ते...........आणि हलकी आहे ती साडी....सांभाळतील त्या...... आजिसहेब
किती रे टेन्शन घेतो....सांभाळेल मी.....मला जाम मजा वाटते आहे...........नंदिनी
ठीक आहे......मी आलोच ..... म्हणत राज त्याच्या रूम मध्ये गेला नि काहीतरी घेऊन परत आला....
बरं चला आता.....निघुया, पाच वाजत आले........रविकांत
बरं, तुम्ही सगळे व्हा पुढे.....मी नी राहुल आमचं काही काम आहे.....दोघं एका गाडीतून येतोय.....नंदिनी
आता कोणते काम आहे......?? राज चेहऱ्यावर आठ्या पाडत बोलला....
आहे ना.....तू जा आजिसहेब आबांना घे तुझ्यासोबत.....काकी आई काकांसोबत निघाले......नंदिनी
आता नंदिनी नेच म्हटल्यावर राज काय बोलणार.....त्याचा हिरमोड झाला........त्याने मान हलवली
नंदिनी परत येताना माझ्या कार मध्ये माझ्या सोबत असेल........राज राहिली चा कानात्त बोलला..
हो ना बाबा....तुझीच बायको आहे........आतपूर्ती सोबत येतोय.....मला जरा भीती वाटतेय म्हणून.......राहुल
आणि ही तुझा आत्मविश्वास वाढावत आहे......??? राज एक भुवई वर करत राहुल कडे बघत होता....
हो.....खूप धीर वाटतो ती सोबत आली की.......राहुल
Great......... चला निघा.......राज
सगळे रशमिकडे जायला निघाले होते.....
********
क्रमशः