नंदिनी...श्वास माझा भाग 4

Sharu nandu

भाग ४

पूर्ण दिवस  बाहेर  घालऊन शरू नंदू घरी पोहचले...

गाडी थांबत नाही तर नंदू लगेच उडी मारून घरात पळाली...

तिला दिवसभर केलेल्या गोष्टी आजीला कधी सांगतेय असे झालं होत, इतकी आनंदात होती ती आज...

" आजी sssss"....... करत नंदू आजीच्या गळ्यात पडली... तिचे हाथ धरून उड्या मारत गोल गोल फिरू लागली....

" अगं पडेल मी... हळू... आणि हे काय हाथ पाय न धुता आत आली.... चल जा आधी हातपाय धुवून ये" .... आजी आपले हाथ सोडवत म्हणाली...

"काय आजी तू पण ना ... मला किती काय काय सांगायचं तुला" ...नंदू पाय आपटत बाहेर गेली....

नंदू फ्रेश होऊन आतमध्ये येऊन बसली...

शरू गाडी पार्क करून हातात खरेदी केलेल्या  सामांनांच्या पिशव्या हातात पकडत  आतमध्ये आला...

" तुला पण कामाला लावलं हिने?"  ... आजी हसत बोलली...

" हो बघ ना ... गाडीतून उडी मारली नी सरळ घरात पळत आली ही ... नी परत या बॅग्स नाही दिसणार तर गोंधळ घालेल म्हणून आणल्या...आजी काहीतरी दे ना खायला ,  खूप थकलोय मी... या चिमणी डांबरटने खूप चालवलं मला" ..... शरू मस्करी करत म्हणाला..

" ये sss.... मी की तू?? ....... माझे तर पाय पण दुखतायेत....दाबत बसावे लागतील" ..... पाय दाबायची  अक्टिंग करत ..सोफावर पाय लांब करत बसत....नंदूने नाटकी सूर काढला..... नी दिवसभर घडलेल्या गोष्टी आजी ला सांगायला लागली.... continue तिची बडबड सुरु होती...

आजीने दोघांना छान थंड कोकमच सरबत आणून दिलं...

सरबत पित शरू  नंदूचे हावभाव टिपण सुरू होते.....

"बापरे आजी कान नाही दुखत काय तुमचे??...किती बोलते ही"....हसत शरू म्हणाला...

"ये तू गप बस रे .... मला बोलू दे " ... म्हणत नंदू ने परत continue केले....

बोलता बोलता ती तिथेच झोपी गेली .. तशीही थकली होती..

आजी नी शरू तिला तसं झोपलेलं बघून हसायला लागले ...

" चला आजी तुम्ही पण शांततेचा आनंद घ्या .... मी येतो" ... बोलत तो पण घरी गेला.

रात्री ८ वाजता जेवण आटोपून नंदू वरती तिच्या रूममध्ये आली....

"ऑ ssss ...." डोळे मोठे करत दोन्ही गालावर हात ठेवत नंदू आश्चर्यचकित झाली....

नंदूची रूम   कँडल लाइट्स नी फुग्यांनी सजवलेली होती...  रंगबिरंगी फुगे खाली सोडले होते ...साईडला टेबलवर एका कॉर्नरला एक बाऊल मध्ये काही फुलं सजाऊन ठेवली होती... फुलांमुळे खोलीमध्ये मंद मंद छान गंध पसरला होता...

तिने बेडजवळ येऊन बघितले तर तिथे एक बॉक्स ठेवला होता नि त्याच्या बाजूला एक लेटर तिला दिसलं ... तिने ते  वाचायला घेतले...

माझी गोड गोड नंदिनी...

तुला वाढदिवसाच्या खूप मोठ्या शुभेच्छा....

होप तुला हे डेकोरेशन आवडले असेल....तुझ्यासाठी एक गिफ्ट ठेवलंय...माहिती नाही तुला आवडेल की नाही , मला आवडलं  म्हणून आणलय....९ वाजेपर्यंत तयार होऊन रहा..

तुझाच बोक्या ..

नंदूने बॉक्स उघडला , त्यात बेबी पिंक कलरचा खूप सुंदर घेरदर गाऊन होता.....ती लगेच तयार व्हायला गेली..

शरू सगळं आटोपून गच्चीवरून उडी मारून आला नी नंदूच्या खोलीकडे गेला...आज त्याला जितकं शक्य आहे तितका जास्तीत जास्त वेळ   नंदू सोबत घालवायचा होता..

तो दाराजवळ आला नि तिथेच फ्रिज झाल्यासारखा उभा झाला....नी आतमध्ये चालेल बघत होता...

नंदू खूप सुंदर दिसत होती .... हाल्फ शोल्डर लाँग फ्लोर length बेबी पिंक फ्रील गाऊन. .. तिच्या गोऱ्या रंगावर खुप्पच क्युट दिसत होता... केस मागे क्लच मध्ये अडकवलेले होते,... कानात खड्यांचे छोटे टॉप्स, नो मेकप फक्त लाईट पिंक लिपस्टिक...डोळ्यात काजळ घातले होते...अगदी परी दिसत होती... शरू आ..वासून तिच्याकडे बघत होता ....

नंदू आरसा पुढे उभी होती नि स्वतहालच बघत होती... हातांनी ड्रेसचा घेर पकडून गोल फिरून बघत होती... मान डावी उजवीकडे वाकऊन बघत होती... वेगवेगळे पोज काय घेऊन बघत होती...... असा तिचा आपला खेळ चालला होता... शरू तिची ती गोड नाटकं बघत उभा होता ....

" अय्या नंदिनी तू तर टीव्हीमध्ये दिसतात हिरोईन तशीच दिसतेय" ....स्वतःचच कौतुक करत तिची बडबड सुरु होती...

" अह s.. माझी प्रिन्सेस तर त्यापेक्षाही , सगळ्यांपेक्षा गोड दिसतेय" ... शरू आत येत तिचा हाथ पकडून स्वतःकडे वळवत तिच्या केसांवर किस करत बोलला...

" उम्म्म.. पण एक कमी आहे ".....असं म्हणत तिच्या केसांचा क्लच काढला आणि तिचे केस आपल्या हातांनी मोकळे करत सारखे केले.. ... " ह्म्म आता परफेक्ट दिसताय" ....

" त....तू कधी आला??...मला कळलं सुद्धा नाही" ...नंदू

" आरसा पुढे मटकत होत्या ना तुम्ही तेव्हा " ....शरू हसत बोलला...

त्याला बघून आधी ती थोडी लाजली .... मग तिला तिच्या हाफ शोल्डर स्लीवसकडे लक्ष गेले ,  तिला थोडे अकवॉर्ड वाटलं,  तिला तसे ड्रेस घालायची सवय नव्हती .... ती हाताने शोल्डर वर करत होती...

" अह ते तसं नाहीये".... म्हणत शरूने परत ते खाली केले...

तिने परत ते वर केले, त्याने परत खाली केले ...

"तस नाही ग , अशी फॅशन आहे त्याची ".....म्हणत परत त्याने ते स्लीवस खाली केले....

" पण मला नाही ना अश्या कपड्यांची  सवय "...म्हणत नंदूने परत  वर केलं ड्रेसच शोल्डर....

त्यांचा  हा खेळ थोड्या वेळ सुरू होता... तो मुद्दाम तिची गम्मत घेत होता ..... शेवटी नंदू मान वळऊन दुसरीकडे पाहत बसली.... शरुला तीला अस बघून हसू आल..

तो तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला...नी त्याने ड्रेसचे शोल्डर वर केले....

" माझ्या परीला जे आवडते तेच मला पण आवडते.... तुझं प्रत्येक रूप खूप लोभसवाणे आहे..... तू जशी तशीच रहा, " .... म्हणत तिला जवळ घेत...तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर करत तिच्या डोळ्यांमध्ये बघत बोलला ... त्याला असे तिच्याकडे प्रेमाने बघतांना बघून तिला लाजल्या सारखे झाले....तिने लाजाताच आपली मान खाली केली...

" आवडलं तुला....??".... शरू

नंदू खूप आनंदली...." खूप आवडलं मला हे सगळं... ड्रेस पण खूप छान आहे ....कधी केले हे सगळं डेकोरेशन??".... नंदू

" तू खाली गप्पा करत झोपली ना तेव्हा" ....अस म्हणत त्याने छोटासा कप केक टेबलवर ठेवला नी त्यावर एक कँडल लावली...." चल ये आता,  आपण केक कट करूया" ..... शरू

"आपण केला होता ना आश्रम मधे केक कट... आता परत....नी हे काय येवढासा छोटासा केक??...मोठा तरी आणायचा ना??......किती यम्मी दितोय तो" ...नंदू

"मला कुठे चान्स मिळाला तुला केक खाऊ घालायला??.......दिवभर इतकं काही काही खाल्लाय ना  ... म्हणून छोटा केक  आता ...... बरं ये आता झाले असतील तर प्रश्न विचारून" ..... शरू

शरूने केक कट करायला तिचा  हाथ हातात घेतला...ती  कँडल फु करायला खाली झुकली तसा शरू पण तिच्या सोबत झुकला त्यामुळे त्याचा स्पर्श तिला होत होता...... असं त्याचं तिच्या जवळ आल्याने तिच्या अंगावर शहरे आले...तिने एकदा मान वळाऊन त्याच्याकडे बघितले...

" Candle....."...डोळ्यांनी इशारा करत हसत त्याने तिला कँडल विझवायला सांगितले...तशी ती त्याच्याकडे बघून गोड हसली

तिने कँडल विझविली... नी केक कट केला... शरूने केकचे छोट पिस घेतले नि तिला भारावले..

नंदूने पण त्याला केक भरवला....." खूप टेस्टी आहे केक" ....

" किती थकला होता तू,  तरी माझ्या आनंदासाठी किती करतो तू??"  ... तिचे डोळे  भरून आले ....

" ये वेडाबाई....तुझा ओठांवरची ही गोड स्मायल बघितले ना की सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो"  ........तिचे डोळे पुसत तो बोलला...

त्याने त्याच्या पॉकेट मधून एक छोटा बॉक्स काढला , त्यातून एक नाजुकशी चेन काढली , त्यात छोटंसं क्यूट डायमंडच  हार्ट ❤️ शेपच लॉकेट होत... त्याने ते हातात घेत तिच्या पुढे धरले...

" May I ........???"..... शरू

नंदूने होकारार्थी मान हलवत परवानगी दिली.

शरू तिच्या मागे जाऊन उभा राहिला... हळूच अलगद तिचे केस पुढे खांद्यावर ठेवले.... तिच्या गळ्यात ते लॉकेट घातलं ...

" Happy birthday my Princess".... शरू तिच्या कानाजवळ जात बोलला

त्याच्या त्या हळूवार स्पर्शाने तिला करंट लागल्यासारखे झाले.......... सरकन वळून त्याच्या कंबरेमध्ये हात घालत त्याला पकडून घेत ती त्याला बिलगली.... तिने तीचा चेहरा  त्याच्या शर्टमध्ये लपवला....त्याने पण तिला मिठीत घेतले...थोड्या वेळ दोघंही तो गोड अनुभव, अनुभवत होते...खूप सुरक्षित हवीहवशी अशी त्याची मिठी तिला वाटत होती......, त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा  वर केला... तिच्या त्या घाऱ्या  डोळ्यात बघायला लागला....ती पण त्याच्या डोळ्यात हरवली होती....

"ये चिमणे .... मला तू अशीच माझ्या जवळ हवी आहे नेहमीसाठी,  आयुष्यभर अशीच माझ्या जवळ राहशील काय माझी बनून???....माझी राणी होशील काय.,.?"  तो हळूवारपणे तिच्याकडे एकटक बघत बोलत होता ...

त्याच्या डोळ्यात तिला खूप प्रेम दिसत होते ....ती एकटक त्याच्याकडे प्रेमाने  बघत होती.... तिच्या डोळ्यात त्याला त्याच उत्तर मिळालं होत...

"मला माहिती खूप घाई होतेय या गोष्टींसाठी,  पण काय करू माझ्याजवळ वेळ नाहीये ग , तू अजून लहान आहेस....पण नंतर वेळ नाही मिळणार  ..मी पुढल्या शिक्षणासाठी काही वर्ष अमेरिकाला चाललोय....परत आल्यावर करिअर सेट करून प्रोपर्ली आबासाहेबान जवळ येऊन  तुला मागणी घालेल आहे ...... तोपर्यंत बघशील ना माझी वाट???" ......शरू

काय बोलावं तिला काहीच कळत नव्हत, पण तो जे बोलत होता ते तिला आवडत होतं.......तो अमेरिकाला जाणार, काही वर्ष भेट नाही होणार म्हणून तिला खूप वाईट वाटत होते, तिच्या डोळ्यात आता पाण्याने जागा घेतली होती..  तिने डोळ्यांनीच त्याला होकार दिला...ती पाणी भरल्या डोळ्यांनी त्याचाकडे बघत होती ....

" ये वेडाबाई" ...म्हणत त्याने तिचे डोळे पुसले ..नी तिला जवळ आपल्या कुशीत  घेतले ....आता त्याच पण मन भरून आल होत ...... तिच्यापासून दूर जायचं... या विचारानेच त्याला असह्य झाले होते....

मूड ठीक करायला त्याने तिला डान्ससाठी विचारले....

" मला हा असा dance येत नाही" ...नंदू...

" मी आहे ना , मी शिकवेल.. फक्त माझ्याकडे बघ तू"  ..शरू

" मुजिक...?"  नंदू

त्याने हळू आवाजात रोमँटिक music लावले...

तुमको पाया है तो जैसे खोया हूँ

कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ

तुमको पाया है तो जैसे खोया हूँ

कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ

किसी जबां में भी वो लफ्ज़ ही नहीं

के जिन में तुम हो क्या तुम्हें बता सकूँ

मैं अगर कहूँ तुम सा हसीं

कायनात में नहीं है कहीं

तारीफ़ ये भी तो सच है कुछ भी नहीं

शोखियों में डूबी ये अदायें

चेहरे से झलकी हुई हैं

जुल्फ़ की घनी घनी घटायें

शान से ढलकी हुई हैं

लहराता आँचल है जैसे बादल

बाहों में भरी है जैसे चाँदनी

रूप की चाँदनी

मैं अगर कहूँ

ये दिलकशी है नहीं कहीं, ना होगी कभी

तारीफ़ ये भी तो सच है कुछ भी नहीं

दोघंही समोरासमोर उभे होते, त्याने तिचा एक हात आपल्या खांद्यावर ठेवला, त्याने एक हाताने तिला कंबरेत पकडून स्वतः जवळ ओढले , तिच्या डोळ्यात बघत दुसऱ्या हाताने तिचा हाथ पकडून डान्स करत होता..ती पण त्याच्या डोळ्यात बघत होती नि त्याच्या सोबत स्टेप्स मॅच करत होती....आता हळूहळू तीने त्याच्या पायांवर आपले पाय ठेवले.... त्याच्या छातीवर आपले डोके ठेवत त्याला आपल्या दोन्ही हातांनी पक्क पकडून घेतले.... तिला आता त्याच्या हार्ट बिट्स स्पष्ट जाणवत होत्या.....सुरू असलेल्या गाण्यापेक्षाही तिला आता त्या ऐकायला आवडत होते....त्यात ती गुंतत चालली होती ..

तुम हुए मेहरबान, तो है ये दास्ताँ

अब तुम्हारा मेरा एक है कारवाँ, तुम जहाँ में वहाँ

मैं अगर कहूँ हमसफ़र मेरी

अप्सरा हो तुम, या कोई परी

तारीफ यह भी तो, सच है कुछ भी नहीं

तुमको पाया है तो जैसे खोया हूँ

कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ

किसी जबां में भी वो लफ्ज़ ही नहीं

के जिन में तुम हो क्या तुम्हें बता सकूँ

मैं अगर कहूँ तुम सा हसीं

कायनात में नहीं है कहीं

तारीफ़ ये भी तो सच है कुछ भी नहीं


त्याने एका हाताने तिला कंबरेमध्ये पकडून घेतले...दुसऱ्या हाताने तिचा चेहरा वर केला.....

तो तिचा चेहरा न्याहाळत होता.....आता त्याच लक्ष तिच्या गुलाबी ओठांकडे गेले... न राहवून तो तिच्या ओठांजवळ येऊ लागला, त्याला जवळ येताना बघून तिला आता तिचे हार्ट बिट्स स्किप झाल्यासारखे वाटले....त्याचे श्वास आता तिला तिच्या गालांवर जाणवू लागले ... आपोआप तिचे डोळे मिटल्या गेले..... तो आता तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवणार तेवढयात  तिला काही आठवले आणि तिने त्याला दूर केले....

"का.....?".... शरू

"आजी ने सांगितले आहे कुणालाच म्हणजे कुणालाच इतक्या जवळ येऊ द्यायचं नाही.....लग्न होई पर्यंत".... नंदू

" इतकं चालते ...... " .... शरू

" नाही.....".... नंदू

" एकच.....".... शरू

" नाही.....".... नंदू

"प्लीज ??? ..."... शरू

" दुर्घटनासे देर भली........".... नंदू ,

" तुला कळते दुर्घटना and all ???'.. तो मिश्किलपणे तिच्याकडे बघत होता....

" हो म्हणजे मी ऐकले होते .... ते कीर्ती ताईचे लग्न झाले ना....ती सांगत होती तिच्या मैत्रिणींना......  किस केले तर.....बा.......".... नंदू त्याला दूर ढकलत ती पळायला लागली..

"Half knowledge is very dangerous....."..तिचे बोलणे ऐकून त्याने डोक्यावर हात मारून घेतला......पण तिची  निरागसता त्याला खूप भावली होती ....तिचे बोलणे ऐकून तो पण हसायला लागला...नी तिला पकडायला तिच्या मागे पळत होता... त्याला पण तिच्या मर्जिशिवाय, समंतिशिवाय असं काही करायचं नव्हतं ....

बेडच्या भोवती फिरत थोड्या वेळ त्यांचा हा पकडपकडीचा खेळ सुरू होता, शेवटी शरूने तिला पकडलच, तसा त्याचा बालन्स गेला नि दोघे बेडवर पडले... थोडा वेळ ते दोघं  एकमेकांकडे बघत होते ....आणि मग खळळून हसायला लागले....

बेडवर पडल्या पडल्या दोघेही  मित्र मैत्रिणीच्या , इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते... नंदूच जास्ती बोलत होती... तो फक्त हु हु करत होता....

बोलता बोलता तिचा डोळा लागला नि ती झोपी गेली...

त्याने तिला बेडवर नीट झोपवलं , तिच्या पायातले शूज काढून बाजूला ठेवत तिच्या नाजुक पायावर किस केले....त्याच्या त्या स्पर्शाने तिने झोपेतच पाय एकमेकांवर घासत ती एका कडावर झाली....तिचे तसे करण्याने त्याला हसू आले............ तिच्या अंगावर पांघरून घातलं... तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावर  किस करून ... तिचाकडे एकदा बघुन त्याच्या घरी निघून गेला..

********

क्रमशः

🎭 Series Post

View all