नंदिनी...श्वास माझा 49

राजनंदिनी

भाग 49

नंदिनी , आपण एकत्र मूव्ही बघतोय......???.....त्यासाठी तू मला ऑफिस मधून बोलाऊन घतेले...??.....राहुल

नंदिनी किती उधम घातलेला तू मघापासून.........तुला मूव्ही दाखवायची....??.....काकी

आजिसहेबांच्या पण डोक्यावर आठ्या आल्या......

नाही हो काकी......ये तू चूप बस रे जरा थोड्या वेळ........थोडा धीर धर........तर मी एक सरप्राइज देणार आहे...ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात....,..

काय.......??....तू प्रेमात वैगरे तर नाही पडलीस.....??.....राहुल

राहुलच्या बोलण्याने राज च्या काळजात एकदम धस्स झाले..........अचानक त्याच मन भरून आलं होत.........पण तो स्वतः ला सावरत नंदिनी काय सांगते आहे त्याकडे बघत होता........

नंदिनी चे लक्ष राज कडे गेले.....याला काय झालं.....हा का टेंस दिसतोय......... टेंस नाही....काहीतरी वेगळं आहे याच्या डोळ्यात....काहीतरी पेन वाटतोय........नंदिनी तुझं गूग्लिंग खूप होतंय.......साधा नॉर्मल व्यक्ती पण तुला वेगळा भासायला लागला......नंदिनी इकडे कन्संट्रेत कर......नाहीतर सगळे आता गळा दाबतील.....नंदिनी मनातच विचार करत तिने राहुल वर फोकस केला..

ये गप रे तू......किती बडबड करतोस....... बरं सगळ्यांनी आता इकडे बघा.......तुम्हाला तुमचं सरप्राइज कळेल आहे......,म्हणत तिने टीव्ही वर एक व्हिडिओ ऑन केला...

त्यात एक मुलगी पाठमोरी होती.....नी समोर असलेल्या मुलांनाची चांगलीच पिटायी करत होती......

बोल , देशील त्रास मुलींना.....दे धाड sss.....
एका लयीत ती त्या समोर असलेल्या दोन मुलांना चांगलीच चोपून काढत होती......

नंदिनी....हा काय मारमारीचा व्हिडिओ लावला.....पण ही तू तर नाही आहे........ काकी

काकी.......तुमची भावी सूनबाई...........नंदिनी

क......काय.....काय.......????....राहुल घाबरल्यासारखा होत उडी मारत दोन्ही पाय वरती घेत सोफ्यावर राज ला पकडून बसला होता.....बाकी पण सगळे शॉक झाले होते..... नी व्हिडिओ बघत होते...

अरे ही कोणती तोफ शोधून आणली हिने.....राज समजावं तुझ्या बायकोला.......खरंच मला रोज मार खाऊ घालण्याचा प्लॅन केलाय हिने....... राहुल राज जवळ खुसरपुसर करत होता...

रश्मी देसाई... वय 24वर्ष, उंची 5.6 , रंग गव्हाळ, शिक्षण BPT ( bachalors in physiotherapy) , persuing MPT.....(masters in physiotherapy), City shine हॉस्पिटल मध्ये नोकरी करते.... वडील रमेश देसाई रिटायर्ड, आई रेवती देसाई गृहिणी, एक लहान बहीण रुची  देसाई, बारावी ला आहे......एका श्वासात तिने त्या मुलीची सगळी माहिती दिली.........

बापरे चांगलीच ओळख काढून आलेली दिसत आहे ही.....राहुल मनातच विचार करत होता...

Not bad............. रविकांत राहुल चे वडील

Very impressed......... आबा

व्हिडिओ अजूनही सुरू होता....अजूनही ती त्या मुलांनाची पिटाई करत होती.....अजूनही ती पाठमोरी होती...

रीजेक्ट..... रीजेक्ट........राहुल

ये चूप बस रे , तुला काय कळतं मुलींमधले........नंदिनी

नंदिनी चा बोलण्यावर सगळ्यांना हसू आले..

अग बाई बघ ना ती किती मारते आहे त्या मुलांना.....तुला हीच भेटली होती काय...??....ती मला पण मारेल ना......,राहुल आता टेन्शन मध्ये आला होता...

हा....तू जर काही चुकीचं करशील तर तुला पण मार भेटेल...जसा त्या मुलांना भेटतो आहे......नंदिनी त्याची मस्करी करत होती...

चला निघायचं इथून....आणि मला परत तुम्ही दिसायला नको.....नाहीतर पुढल्या वेळ तुमच्या पायांवर तुम्हाला उभ राहण्याच्या लायकीचे ठेवणार नाही......आपला ड्रेस झटकत, हाथ झटकतच, आपली लांब सडक वेणी मागे फेकत ती पलटली.....नी आजूबाजूला जमलेले सगळे आता टाळ्या वाजवत होते........नी आता ती , तिचा चेहरा....सगळ्यांना दिसत होता........

लाईट ग्रीन कुर्ता, खाली सेम रंगाचे लेगिंग्ज, कुर्त्यावर कॉटनच एम्ब्रोडरी केलेलं छोटे छोटे आरसे लावलेले जॅकेट घातलं होतं....गव्हाळ रंग, टपोरे काळे भोर डोळे, सरळ नाजूक नाक.....ओठावर गोड स्मायल.....कपळवर छोटी काळी टिकली, कुरळ्या केसांची लांब वेणी......चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्र्वास..........सगळे एकटक तिच्याकडे बघत होते.....आजिसहेबांच्या चेहऱ्यावर समिश्र भाव होते.........राहुल तर हँग च झाला होता.....नंदिनी, काकी कधी तिच्याकडे तर कधी राहुल कडे बघत होत्या......नंदिनी तर तोंड दाबून हसत होती......

राहुल तोंड बंद कर....... माशी जाईल.....काकी

अ.............राहुल आता बाकिंच्याकडे बघत होता.....नंदिनी आणि काकी सोडून सगळेच टीव्ही कडे बघत होते....

काय राहुल साहेब विकेट पडली ना.........नंदिनी हसू दाबत बोलत होती...

आता पर्यंत बडबड करणारा राहुल त्या मुलीला बघून चूप झाला होता..

बरं कशी वाटली रश्मी....???......नंदिनी

चांगली आहे......आबा

अहो पण एक मा घरात कमी होत की दुसरं पण तसच आणायचं काय........आजिसहेबांच्या चेहऱ्यावर राहुल सारखेच भाव दिसत होते...

मला एक कळत नाही आहे तुम्ही दोघं तिला मारताना बघून का येवढे घाबरत आहात...........आबा राहुल आणि आजिसहेबांची मस्करी करत होते

अहो पण फक्त मारामारी करते म्हणून.......

मारामारी नाही म्हणत त्याला आजिसहेब, स्वसंरक्षण, समाज रक्षण म्हणतात त्याला.......आजिसहेब बोलत होत्या तेवढयात नंदिनी बोलली....बर ठीक आहे, आता काही फोटो बघा....म्हणत तिने रश्मीचे काही फोटो दाखायाला सुरुवात केली.....ज्यात ती काही म्हाताऱ्या लोकांना ट्रीट करत होती.... टाँगळे, हाथ पाय असे काही चेक करत होती....दुसऱ्या काही फोटो मध्ये ती काही लहान मुलांसोबत खेळत होती, त्यांना पुस्तक घेऊन शिकवत होती...

हे वृद्धाश्रमाचे फोटो आहेत.....जिथे ती फ्री मध्ये सर्व्हिस देते......इथे काही २-३ वृद्धाश्रम आहेत तिथे ती रविवारी त्यांच्या चेकप साठी जात असते.....आणि ही तिच्या गल्लितली काही लहान मुले आहेत ज्यांची ती शिकवणी घेते....नी या दोन मुलींची स्कूल फी पण हीच भरते......लहान मुलांना अभ्यासामध्ये पाहिजे ती सगळी मदत करते......बाहेरून स्ट्राँग, पण मनाने एकदम कोमल.......लहान मोठा, गरीब श्रीमंत सगळ्यांचा योग्य मान करणारी...गरजूंना मदतीला नेहमीच तत्पर असलेली......पण खूप self respect जपणारी.......रश्मी देसाई...

गल्ली....??......आजिसहेब

ह्मम......ती एका चाळी मध्ये राहते.....खाऊन पिऊन सुखी घर आहे......पैस्याने श्रीमंत नाहीत....पण हा मनाने खूप श्रीमंत आहे, जाऊन आली मी त्यांच्या घरी...तिच्या आई बाबा ना भेटलिये....एक सर्व्हे करणारी बनून गेली होती ????........तर आजिसहेब एकदम परफेक्ट आहे.....फक्त तुमचं स्टेटस् काय आहे ते बघा तुम्ही......नंदिनी

ह्मम...... आजीसाहेब

अरे मला तर विचारा कोणी..??.....मला आवडली की नाही...???.....लग्न मला करायचं आहे ...राहुल

हो ते ही बरोबरच.....तुझ्या पेक्षा तिला विचारायला लागेल.....तिला तू आवडला की नाही .....कारण ती तुझी बेबी, शोना वाली नाहीये ????..नंदिनी त्याची मस्करी करत होतो.....

Bro......... राहुल

राज..........नंदिनी

Bro,  हिला सांग चूप बसायला........राहुल

राज , याला सांग माझं तोंड आहे मी बोलले......नंदिनी

दोघांची भांडणं सुरू होती......राज दोघांची भांडण खूप एन्जॉय करत होता....कधीकाळी त्याचं आणि नंदिनीचे पण असेच गोड भांडणं व्हायचे.....त्याला ते आठवत होते...

बरं मग तुम्ही सगळे ठरवा........मी माझं काम केले.......नंदिनी

हो.....जेवढे तुम्ही सांगितले त्यावरून आवडलीये आम्हाला....राहुल पेक्षा थोडी कमी गोरी आहे पण दिसायला  छान आणि चुणचुणीत वाटतेय......राहुल ला विचारा बाकी........आजिसहेब

काकी काका तुम्हाला कशी वाटली...??...नंदिनी

एकदम भारी, राहुल ला अशीच पाहिजे.....तिच्या हातात तरी सीधा राहील......काकी

सिधा म्हणजे??? मी काय वाकडा आहो काय.......राहुल

अरे म्हणजे तुला सांभाळेल.....असे म्हणायचे तिला.......आई

ओके.......राहुल तोंड वाकडं करत होता

तुला आवडली काय राहुल ती...?? राज

हो.....म्हणजे.....नाही....म्हणजे...हो......अरे यार कसं सांगू मी........राहुल आता लाजला होता...

हसला तो फसला......मला माहिती आहे आवडलीये त्याला..........नंदिनी

हो.....तुला सगळंच कळते.......राहुल

हो.........नंदिनी

मग राज ला कोण आवडते शोधून काढ आधी.....राहुल

त्याला आवडते कोणी........??......ती प्रश्नार्थक नजरेने राज कडे बघत होती......राज ने तिला गोड स्मायल दिले....

याच्या हसण्यावरून तरी वाटतेय...याला खरंच कोणीतरी आवडते आहे......कोण असेल ती?? ऑफिस मध्ये कोणी असेल काय..??...........पण राज ला कुणीतरी आवडते म्हटल्यावर मला आनंद का नाही होत आहे......नंदिनीच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी व्हायला लागली........

मॅडम कुठे हरवल्या....राहुल तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवत बोलत होता.....

ह......काही नाही...... बरं तुला जर आवडली असेल तर सांग.....आधी तू नी ती भेटून घेऊ.....तुम्ही बोला एकमेकांसोबत......तुम्ही एकमेकांना पसंत असाल तर मग आम्ही मोठी लोकं पुढे ठरवु........नंदिनी

मोठी लोक...??.....तू...??.....राहुल

हा....म्हणजे हे बाकीचे रे.....मी फक्त मीटिंग प्लॅन करून देईल........ बरं चला तुम्ही लोकं ठरवा काय ते.....मला अभ्यास आहे , मी जाते.......नंदिनी बोलून तिच्या रूम मध्ये निघून गेली...

नंदिनी बुक्स उघडून बसली होती......पण तिच्या डोक्यात राहुल ने टाकलेली च गोष्ट सुरू होती..... राजला कोणीतरी आवडते.......वारंवार तिच्या डोक्यात तेच सुरू होते.....

ये राहुल....राहुल...एक मिनिट थांब........म्हणतच ती तिच्या दारासमोरून जाणाऱ्या राहुल ला आवाज देत बाहेर गेली..

काय ग ....काय झालं??...काही प्रोब्लेम आहे काय अभ्यासामध्ये...??......राहुल

ह.....नाही.....नंदिनी

मग??.... राहुल

राज ला खरंच कुठली मुलगी आवडते काय रे...??.....
नंदिनी

हो.......का ग..?? Are you feeling jealous ??????? राहूल ला तिच्या चेहऱ्यावरून च कळले होते तिला किती टेन्शन आले आहे ते....आणि म्हणूनच तो तिची मस्करी करत होता...

श्या.......मी का जिलस होणार......मला तर आनंद होईल......त्याला कुणी आवडत असेल तर चांगलंच आहे ना .......नंदिनी पण मला आनंद का होत नाही आहे ती मनातच विचार करत होती..

ओके, मग ठीक आहे.......राहुल

कोण आहे रे ती..???....म्हणजे ऑफिस मध्ये वैगरे आहे काय...??...कधीपासून आवडते ती त्याला..??....नंदिनी

तो लहान होता ९ वर्षाचा , तेव्हापासून ओळखतो तिला...नी तेव्हाच पासून आवडते ती त्याला.......राहुल

ओह ..... बाल मैत्रीण......?? नंदिनी

हो......राहुल

कुठे आहे ती...??.....नंदिनी

त्याच्या हृदयात नी डोक्यात.........राहुल ला आता जाम माझा येत होती तिची..

म्हणजे..??...हे काय......??.....नंदिनी गोंधळली होती....

अग म्हणजे मनापासून आवडते ती त्याला........आणि हो ती आता त्याच्या ऑफिस मध्येच जॉब करते........राहुल ने तिला विचार करतांना बघून परत एक पुडी तिच्या डोक्यात सोडली...

नाव काय......??...नंदिनी

तू detective गिरी करतेस ना....मग शोध आपली आपली......मला फसवलस ना आज त्या मारकुंड्या म्हशी मध्ये...... जा आता मला नाही सांगायचं काही......राहुल

खरंच ....नाही आवडली काय तुला ती.....असू दे मग....दुसरी बघू......नंदिनी चेहरा पाडत बोलली

अग हो.....इतकी नाराज का होते आहेस......मी गंमत करतोय तुझी.....तू पण ना कधी कधी फारच सिरीयस होते बाबा.....मला आवडली रश्मी.....रश्मी देसाई.........राहुल

खरंच.....??....नंदिनी

हो.....बेस्ट आहे........फक्त आता मी तिला आवडायला हवे....... राहुल

तुला कोण नाही म्हणू शकते रे........ती हो च बोलणार.......नंदिनी

हो का....??.....राहुल

हो मग.....you are the best brother...... आणि चांगला मुलगा पण आहेस.....म्हणजे बघ ना इतक्या गर्लफ्रेंड होत्या तुझा...पण कधी तू कुणाचा गैरफायदा नाही घेतला.......नंदिनी

हो का......तुला कसं माहिती....??....राहुल

कारण तू Shriraj Deshmukh चा भाऊ आहेस.......नंदिनी

ओह.....इथे पण क्रेडिट त्यालाच.....??....राहुल

हो मग.....any doubt....????????... कळते रे , मुलींना कळते मुलांच्या नजरेवरून च कळते......

अच्छा.......जी......राहुल

love you brother........ नंदिनी राहुल ला साईड ने हग करत त्याला बोलली..

Love you sweety.....त्याने पण तिला जवळ घेतले..

छोटा फिलॉसॉफर......झोपा आता .....सकाळी उशीर होईल......राहुल

हो.......नंदिनी

राहुल ला काही आठवले.....
आणि हो राज बद्दल विचारत होती ना.....त्याला कोण आवडते ते....त्याची बेस्ट फ्रेंड आहेस ना.??...मग शोधून काढ तूच...... राहुल

ह्मम......नंदिनी

चल... गूड नाईट.....राहुल त्याच्या रूम मध्ये निघून गेला..

नंदिनी पण आपल्या रूम मध्ये जात होती......जाता जाता ती राज चा रूम जवळ थांबली.....आतमध्ये राज सोफ्यावर बसून लॅपटॉप मध्ये काही काम करत होता........नंदिनी बाहेरूनच त्याला बघत होती

याला कुणीतरी आवडते म्हणजे नक्कीच कुणीतरी खास असणार.... अशितशी मुलगी याला आवडायची नाही.....हाच खास आहे तर ती पण खूप स्पेशल असणार......नंदिनी दारातूनच त्याच्याकडे बघत विचार करत होती..

नंदिनी......तिथे का उभी आहेस...??...आत ये....राज लॅपटॉप मध्ये बघतच काम करताकरता बोलला

तुला कसे कळले मी आहे ते..??....मी तर काहीच आवाज केला नव्हता......नंदिनी त्याच्या रूम मध्ये जात बोलली..

मला कळते.....तू आसपास असली की कळते सगळे.....राज काम करता करता बोलत होता...

किती काम करतो रे.....थकत नाहीस काय...??....नंदिनी

नाही.....you ...... परत बोलत काही विचार करत...you all are my energy boesters...... तुमच्या सोबत वेळ घालवला की फ्रेश होतो.....मग काम करायला परत एनर्जी मिळते.......आणि तसे पण काही किड्स प्रोजेक्ट करतोय .... ऑफिस मध्ये ऑफिस ची च काम पुरतात...म्हणून आता करतोय.....राज

राज...मला पण सांग.....मी पण शिकून घेते , मग मी पण तुला मदत करेल.....नंदिनी

ओके ....ये इथे बस.......

नंदिनी त्याच्या जवळ जाऊन बसली......तो काम करता करता तिला काही टर्म्स समजाऊन सांगत होता........

किती छान सांगतोय........किती छान बोलतोय.....नंदिनी मात्र त्याला बघण्यात हरवली होती.....

नंदिनी....कळतेय काय काही...??...तिला तिच्याच विश्वात गेलेलं बघून राज बोलला

ह..... हो......राज कॉफी घेऊ या......मी बनवते.......म्हणजे मला येत नाही नीट बनवता पण करते ट्राय.......नंदिनी

राज हसला.....त्याला माहिती होते संध्याकाळ पासून तिला कॉफी हवी होती.......

ओके चल.....मी शिकवतो तुला.......राज

नंदिनी खुश झाली....आणि दोघंही खाली किचन मध्ये आली......

रात्रीचा अंधार होता सगळी कडे....एक छोटा डिम लाईट लुकलुकत होता अधूनमधून.....

राज असू दे ना.....दिसतेय......नंदिनी.....राज लाइट्स ऑन करायला जाणार तेवढयात नंदिनी बोलली...

ठीक आहे.....राज ने स्मायल केले...

नंदिनी ने एका मग मध्ये कॉफी फेटायला घेतली.......

नंदिनी तसे नाही....थांब मी सांगतो........म्हणत तो तिच्या मागून येत तिच्या पाठीमागून, तिच्या कंबर जवळऊन दोन्ही हात पुढ्यात नेत तिच्या हातातला मग तिच्याच हातावर पकडत...तिचा चम्मच पकडलेला दुसरा हात पकडत तो तिला कॉफी फेटायच शिकवत होता.....

आता तिला तिच्या पाठीकडून त्याचा स्पर्श तिला होत होता.......तिचे दोन्ही हात त्याचा हातात होते........तिला त्याचा तो स्पर्श वेगळा वाटत होता.....पण हवाहवासा पण......तीच तर त्या कॉफी मध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं......तिच्या खंद्यापासून थोडा पुढे आलेला त्याचा चेहरा....त्यावर पडणारा मंद मंद प्रकाश...त्यात त्याच्या चेहऱ्यावर खूप तेज दिसत होते......तो कॉफी बनवण्यात बिझी होता.....नी ती त्याला बघण्यात........

Done now.......... म्हणत राज ने तिच्या कडे बघितले......तर ती त्याला हरवल्यासारखी वाटली

काय झालं.....??.....राज

अ.....काही नाही......त्याच लक्ष तिच्याकडे गेले बघून तिला स्वतःलाच खूप ऑकवर्ड वाटले...

ओके.....झाली बघ कॉफी....त्याने तिच्या पुढे गरम गरम मग धरला

राज ..बाहेर झोपाळ्यावर बसूया......नंदिनी

थंडी आहे ना......राज

थोड्या वेळ..........नंदिनी

ओके....... चल.....राज
 

दिवाळी नंतर चे थंडीचे दिवस...रात्रीचे ११ वाजत आले असेल....बाहेर शुभ्र चांदणं पडले होते.....रंगीबिरंगी फुलं एकमेकांसोबत शांत संवाद साधत होती....... छोटी छोटी जाई जुईची फुलं चांदण्या सारखी चमकत होती.....सगळीकडे फुलांचा गंध दरवळला होता......हवे मध्ये गारवा होता.....खूप छान असे मनमोहक वातावरण होते........दोघेही बाहेर झुल्यावर येऊ बसले........गरम गरम कॉफी पीत त्या दोघांच्या ऑफिस, इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या......तो तर ऐकायचे काम करत होता.......नंदिनीच तिच्या कॉलेज च्या गमतीजमती, ऑफिस मधल्या गोष्टी त्याला सांगत होती.......जवळपास दीड तास होत आला होता...ते दोघं गप्पच मारत होते......गप्पांच्या ओघात त्यांना वेळेचं पण भान राहिले नव्हते........बोलता बोलता नंदिनी ने त्याच्या खांद्यावर मान टाकली.......त्याने वळुन बघितले तर ती झोपली होती.......तिचे सगळे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते......त्याने हळूवार पणे तिचे केस तिच्या कानामागे अडकवले.......ती खूप निरागस वाटत होती.....तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर पण स्मायल आले......तिला थंडी वाटत असावी बहुतेक....झोपेतच ती त्याच्या शर्ट ला पकडतच त्याच्या जवळ जवळ सरकत होती.......त्याने आपला एक हाथ तिच्या मानेखालून घेतला नि तिला आपल्या जवळ आपल्या कुशीत घट्ट पकडून घेतले...........खूप दिवसांनी ती अशी त्याच्या जवळ गेली होती......आधी ती नेहमीच त्याच्या अशी कुशीत झोपायची...पण आता बऱ्याच दिवसांनी तो ते अनुभवात होता........तीच असे जवळ आल्याने तो खूप सुखावला होता.....

दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके
सबको हो रही है
हाँ सबको हो रही है
खबर चुपके चुपके
ओह दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके
मगर चुपके चुपके
मगर चुपके चुपके
चुपके चुपके
चुपके चुपके

ऐसे भोले बन कर हैं बैठे
जैसे कोई बात नहीं
सब कुछ नज़र आ रहा है
दिन है ये रात नहीं
क्या है कुछ भी नहीं है अगर
होठों पे है ख़ामोशी मगर
बातें कर रहीं हैं
बातें कर रहीं हैं
नज़र चुपके चुपके
दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके

कहीं आग लगने से पहले
उठता है ऐसा धुंआ
जैसा है इधर का नज़ारा
वैसा ही उधर का समा
दिल में कैसी कसक सी जगी
दोनों जानिब बराबर लगी
देखो तो इधर से
देखो तो इधर से
उधर चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके
सबको हो रही है
हाँ सबको हो रही है
खबर चुपके चुपके
ओह दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके
मगर चुपके चुपके
मगर चुपके चुपके
चुपके चुपके
चुपके चुपके

*******
क्रमशः

🎭 Series Post

View all