Aug 16, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 48

Read Later
नंदिनी...श्वास माझा 48

भाग 48

Yipiii sssss.........मला  मिळाली..........नंदिनी ओरडतच घरात आली...

अगं हो हो......कोण मिळाले???........जरा दम घे........आई

ना..........आता वेळ नाही जास्ती......मला मिळाली....मला मिळाली........नंदिनी जोरजोराने ओरडत होती........तीच बोलणं कोणालाच काही कळत नव्हते....

काय खाल्ल रे आज हिने.......किती ओरडते आहे..... उड्या मारत आहे......आणि बोलायला काहीच तयार नाही.........काकी, तिच्या मागून ऑफिस मधून येणाऱ्या राज ला विचारत होती...

माहिती नाही काकी......आज ऑफिस ला पण उशिरा आली.......तिच्या मॅनेजर च्या शिव्या पण खाल्ल्या तिने ते पण हसत हसत.........मी सुद्धा शॉक आहो.....विचारतोय तर सांगत पण नाही आहे.......सगळ्यांसमोर बोलेल म्हणतेय.......राज

नंदिनी आता तरी सांग काय झालं आहे...........राज

थांब रे ........राहुल ला येऊ दे ऑफिस मधून..........म्हणत तिने राहुल ला कॉल केला.....

ये आज च करशील काय सगळे कामं....???...ये ना घरी लवकर..........नंदिनी

अग थोड राहिले आहे......येतोच एक दीड तासात......राहुल

खूपच स्लो आहेस तू.............राहू दे काम, घरी ये आधी.....नंदिनी

आज येवाधी का आठवण येते आहे...??...काही कांड करून आली आहेस काय....??......मी साईड नाही घेणार हा तुझी........,मला राज चा मार नाही खायचा.....आपलं आपलं निपटव........राहुल

ये गप रे.......तुला फालतू बडबड करायला भारी वेळ आहे, ते काही नाही आताच ये........राहिले काम ते उद्या कर, परवा कर, नाहीतर रात्री जागून कर.........आधी घरी ये.........नंदिनी

तू तुझ्या राज च्या मागे लाग ना.....मला का त्रास देते आहेस.......राहुल

तो ऑलरेडी घरी आलाय..........तुझ्या सारखा नाही तो, आजू बाजूला बघत बसतो.......कोण कशी दिसतंय अन काय काय???...तो तुझ्या सारखा बुद्धू नाही....असा पटा पट काम करतो तो......ती फोन वर हाताच्या बोटांनी चुटकी मारत बोलत होती....

काकी ने तर डोक्यावर हात मारला.........

राज तर तिचे एक्साईटमेंट बघत होता..... बोलतांना शब्दा शब्दाला बदलणारे तिचे हावभाव, हातवारे.......राहुल ला धमकावणे.....सगळीच त्याला मजा वाटत होती....कुठून च इतकी एनर्जी आणते ....सकाळी कॉलेज, मग जॉब....तरी पण थोडासाही थकवा दिसत नाही .....पूर्ण जोश मध्ये दिसत होती......राज तिला बघतच बाजूला चेअर वर बसला होता.......

मग येवढेच आहे तर त्यालाच पकव आता.......मला काम करू दे..........राहुल

राहुल्या फालतूपणा करायचा नाही.....चुपचाप घरी ये १५मी मध्ये, तसे तर दहाच मिनिटाचा रस्ता आहे पण पाच जास्तीचे देतेय.........नाही तर त्याच्या पुढल्या १० मिं मध्ये मी तिथे असेल.........नंदिनी

ये धमकाऊ नको.........येतोय.........नुसती दादागिरी चालवते........त्याला माहिती होते तिचे नाही ऐकले तर ती गोंधळ घालेल........ आणि तो काम गुंडाळून घरी यायला निघाला.....

हुश्श.......... स्पेशल कॉफी हवी होती......नंदिनी सोफ्यावर बसत बोलली..

जा तुम्ही फ्रेश होऊन या.....तोपर्यंत मी कॉफी बनवते.......काकी

अहो काकी..... स्पेश ssssss ल ......मला स्पेशल वाली एनर्जिटीकवाली कॉफी हवी आहे......नंदिनी स्पेशल शब्दावर जास्तीच जोर देत राज कडे बघत बोलत होती.........आणि ते पण आताच......म्हणजे आताच......राज ला वरती जातांना बघून नंदिनी ओरडत बोलत होती........

अग तो पण आताच आला आहे ना....... थकला असेल तो पण......मी देते बनाऊन आता..........काकी

ठीक आहे........... नंदिनी चा चेहराच उतरला.......

काकी मी आलोच फ्रेश होऊन...........आणि हो कॉफी मी बनवतो आहे.........आलोच........,...तो नंदिनिकडे बघत बोलला...........

त्याचं बोलणं ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरले............आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू बघून राज च्या चेहऱ्यावर हसू आले .....आणि तो फ्रेश व्हायला आतमध्ये निघून गेला........

तुला नाही व्हायचं काय फ्रेश.........काकी

नाही......मी फ्रेश च आहे......नंतर जाईल वरती......ती तिथेच सोफ्यावर पाय लांब करत मोबाईल बघत बसली.....काकी पण आपल्या कामासाठी निघून गेली....

राज फ्रेश होऊन खाली आला तर ती शांत सोफ्यावर झोपली होती........तो तिच्या जवळ जाऊन बसला.....,...त्याने तिच्या हातातला मोबाईल काढून बाजूला ठेवला......नी मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला........

झोपली असली की किती शांत असते.......नाहीतर हातपाय नी डोकं, सतत सुरू असते........नंदू किती गोड दिसतेय तू........राज मनातच बोलत तिच्या कडे बघत तिच्यामध्ये गुंतला होता....

अरे हे काय.....ही झोपली...........?? काकी

अचानक आवाज आल्यामुळे राज थोडा दचकला.......जसेकाही त्याची काही चोरी च पकडल्या गेली होती.........आणि त्याने मागे वळून बघितले.....त्याच्या चेहऱ्यावर गडबडल्याचे स्पष्ट भाव दिसत होते.......

अरे हो हो.....इतका काय गडबडला......तुझीच बायको आहे, बिनधास्त बघ...........राहुल मागून येत त्याचे गोंधळलेले एक्स्प्रेशन बघत हसत होता...

काकी का पण हसायला आले....

पण हे काय.....मला इतके तडका फडकी बोलावले.....नी महाराणी स्वतः आराम करत आहेत........थांब उठावतोच........म्हणतच राहुल नंदिनिजवळ जातच होता की राज ने त्याचा हाथ पकडला......नी त्याला थांबवले

झोपू दे.....खूप दमली आहे.........राज

Okay ...... रानीसरकरांचे राजे...........आपली जशी आज्ञा........राहुल.

खूप काम असते काय रे ऑफिस मध्ये.........???....जरा कमी काम देत जा....पोर थकून जाते.....सकाळी कॉलेज मग ऑफिस............आई

ह्मम काम तर असतेच.......लोक 8-9 तासमध्ये जे काम करतात ते या मॅडम 5 तासात उरकावतात......सवय नाही आहे , दमते थोडी.........होईल काही दिवसांनी सवय.......राज

हो......नी बाकी लोकांना पण त्रास द्यायचा असतोच.....ती पण काम खूप असतात मॅडम ला..........राहुल

काही काय........कुठे त्रास देते ती.......???..राज

हो .....मी पण कोणाला सांगतोय.......तुला कुठं काही दिसते........तिने काही केले तरी तुला गोडच वाटते...........राहुल

असे काही नाहीये...........राज ला हसू येत होते

मग कसे आहे राजे....???....राहुल भुवया उडवत राज ला चिडवत होता...

तुला प्रेम होईल तेव्हा कळेल...... चल पळ आता इथून, नी फ्रेश होऊन ये......काकी

नको रे बाबा...........खूप कठीण असते ते.......प्रेमात आनंद कमी नी वेदनाच जास्ती आहे.........मी नाही इतका स्ट्राँग..........राहुल, राज कडे बघत होता..

प्रेम सगळं शिकवते माणसाला........कळेल तुला......जा फ्रेश होऊन ये, कॉफी आणि पास्ता बनवतो आहे.........राज

अरे वाह तुझ्या हातचं पास्ता नी कॉफी...........जियो मेरे भाई जियो......राहुल त्याला फ्लायिंग किस करत त्याच्या रूम मध्ये पळाला...

तुम्ही दोघं भाऊ कमी, हेच दोघं बहिनभाऊ जास्ती शोभतात......नुसता उधम करतात.........काकी नंदिनी राहुल कडे बघत बोलल्या

असू दे ग काकी......लहान आहेत..........राज किचन कडे वळला

हो रे....आता लग्न होणार आहे, ऐवधा मोठा घोडा झाला.......कधी सुधारणार..........काकी

करू दे ग मस्ती......एकदा जबाबदारी अंगावर पडली की आपोआपच शहाणं होत माणूस.......राज पास्ता बनवायला निघून गेला.....

नंदिनी उठली तेव्हा ८-८.३० वाजत आले होते.....

यार ..तुम्ही कोणी मला उठवलं का नाही......मला तुम्हा सगळ्यांना सरप्राइज द्यायचे होते ना.........झोपून उठत नंदिनी ची कुरकुर सुरू झाली

हा तुझा पहारेदार ......तुझ्या जवळ ही भटकू नव्हता देत कोणाला......कसे उठावणार होतो.......आणि काय ग मला श्वास घ्यायला पण वेळ नाही दिला आणि स्वतः मस्त घोरत पडली होती...........राहुल

हो ना मी तर कॉफी ची वाट बघत होते......माहिती नाही कशी झोपली ते............नी तिला काही आठवले.......राज माझी कॉफी...........??..नंदिनी

नंदिनी आता जेवायला बसत आहेत सगळे......आधी जेऊन घे.....मग नंतर घे कॉफी......आई

मला हवी होती कॉफी.........तिने परत सुर लावला

नंदिनी.........आता जेवायचं आहे......जा फ्रेश होऊन या......सगळे वाट बघत आहेत.......आजिसहेब

मला नकोय ते ....आज किती छान न्यूज देणार आहे मी.....काहीतरी छान खायला भेटेल असे वाटले होते........... नंदिनी ने वाकड तोंड केले नी जागेवरून उठत फ्रेश व्हायला आत मध्ये गेली...नी फ्रेश होऊन चुपचाप डायनिंग टेबल वर येऊन बसली..,

Wow....... पास्ता............नंदिनी सुगंध घेत आनंदाने ओरडली ....

Yummy........... राज ने बनवले आहे.........सुपर........नंदिनी ने एक घास खाल्ला....नी..नंदिनी तिथूनच पुढे बसलेल्या राज ला बघत फ्लायिंग किस देत होती.......तिला तसे करतांना बघून राज  चा चेहरा पण आनंदी झाला.......तो तिला खातांना बघत बसला होता...

तू बोलायच्या आधीच तुझ्या मनातले कळते कोणालातरी.....पण तू मात्र ढप्पूच राहशील......... राहूल

म्हणजे....,.???.......नंदिनी

वाघाचे पंजे........ जेवण कर........राहुल.

राहुलच्या वाक्याने नंदिनी ची नजर राज वर गेली.....,.....तर राज  जेवत होता...

खरंच तर बोलतोय राहुल......राज ला कसे कळते मला काय हवे असते ते........माझ्या तोंडातून निघायच्या आधीच तो सगळं माझ्यापुढे आणून ठेवतो.......त्याला तर माझं डोकं, माझं मन सगळंच वाचता येते.......नंदिनी राजकडे बघत मनातच विचार करत होती.........आणि त्याने तिच्यासाठी आतापर्यंत केलेल्या एक एक गोष्टी तिच्या डोळ्यांसमोरून जात होत्या...........किती गोड आहे हा....... सगळंच कसं परफेक्ट आहे याचे......किती काळजी घेतो माझी.... न सांगताच........पण सगळ्यांचीच काळजी असते त्याला.......पण माझी थोडी जास्तीच असते ना.........का राज कडे बघत रहावेसे वाटतेय........तो जवळ असला की काहीतरी वेगळं होते आहे.......पण तो तर नेहमीच माझ्या जवळ असतो.....मग आताच का असं होत आहे........तो पण बदललेला वाटतोय......काहीतरी बदलतेय....पण काय......काहीच कळत नाहीये.........नंदिनी राज कडे बघत त्याच्यामध्ये हरवली होती.........

राज च जेवता जेवता नंदिनी कडे बघितले.......तर त्याला जाणवले ती त्याच्याकडेच बघते आहे.........

नंदिनी बदलते आहे......की..... माझा भ्रम आहे.........पण तिचे डोळे वेगळंच काहीतरी बोलत आहे........राज ने थोड्या वेळ तिच्या कडे बघितले.......सगळे इथेच आहेत विचार करत त्याने नंदिनिवरून आपली  नजर वळवली

ओ मॅडम ....थंड होत आहे ते...........राहुल नी नंदिनीच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली...

ह........काय झालं....???........राहुलच्या आवाजाने नंदिनी भानावर आली.......

संपवा लवकर..........तुमच्या सरप्राइज ची सगळे वाट बघत आहेत.......सगळ्यांची जेवणं झालीत पण, तुम्ही कुठे स्वप्नात धडपडत आहात.......राहुल तिची मस्करी करत होता.....

आणि तिने बघितले तर सगळ्यांचीच जेवणं झाली होती........तिने पटपट खायला सुरू केले...

नंदिनी हळू.....ठसका लागेल.......मी आहो इथे तुला कंपनी द्यायला.....हळू खा.......राज

ह्मम.......हो........नंदिनी हे

जेवण आटोपले तसे सगळे लिव्हिंग एरिया मध्ये जाऊन बसले........

आता तरी सांग काय सांगणार होती......??...काकी

हो हो......सांगतेय.......त्यासाठीच तर तेवढी धडपड करत होती.....या टोम्या ला पण त्यासाठीच तर बोलाऊन घेतले होते...........पण कॉफी...............म्हणत तिची नजर राज कडे गेली........,..राज एक भुवई उंचावत तिच्याकडे बघत होता............

आ....नको कॉफी.........म्हणत तिने तिच्या पँट क्या पॉकेट मधून एक पेनड्राईव काढले नी ते ती टीव्ही च्या मागच्या साईड ला लावत होती....

नंदिनी , आपण एकत्र मूव्ही बघतोय......???.....त्यासाठी तू मला ऑफिस मधून बोलाऊन घतेले...??.....राहुल

नंदिनी किती उधम घातलेला तू मघापासून.........तुला मूव्ही दाखवायची....??.....काकी

आजिसहेबांच्या पण डोक्यावर आठ्या आल्या......

नाही हो काकी......ये तू चूप बस रे जरा थोड्या वेळ........थोडा धीर धर........तर मी एक सरप्राइज देणार आहे...ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात....,..

काय.......??....तू प्रेमात वैगरे तर नाही पडलीस.....??.....राहुल

राहुलच्या बोलण्याने राज च्या काळजात एकदम धस्स झाले..........अचानक त्याच मन भरून आलं होत.........पण तो स्वतः ला सावरत नंदिनी काय सांगते आहे त्याकडे बघत होता........

*******

हॅलो फ्रेंड्स, एक नवीन प्रेम कथा  "जय.....वेडी" पोस्ट करते आहे, आताच्या सुरू असलेल्या कोरोना महामरिवर आधारित....नक्की वाचा आणि कळवा कशी आहे ते..

 

नंदिनी...एक वेगळी कथा आहे....त्यात दाखवलेला संयम, प्रेम, आताच्या काळात असेलच की नाही असे बरेच प्रश्न पडतात.....तर ही जय..वेडी आताच्या परिस्थिती ला अनुसरून लिहिली आहे......ही संपूर्ण कथा लिहून झाली आहे म्हणून पोस्ट करतेय.......रोज एक परत येईल....

नंदिनीचे दोन दिवस आड पार्ट येतील....नंदिनीचे लिखाण सुरू आहे...म्हणून वेळ लागतो पार्ट पोस्ट करायला.....

 

धन्यवाद...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️