Aug 16, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 47

Read Later
नंदिनी...श्वास माझा 47

भाग 47

Hey नंदिनी......तू ऑसम आहेस यार.......सगळ्या मुली रिजेक्ट केल्या............ I am very happy......... राहुल आनंदाने उड्या मारत होता........

तुझी परफेक्ट मॅच नव्हती रे कोणी..........नंदिनी

म्हणजे.........इतक्या मुलीनं मध्ये एक पण माझ्या साठी नव्हती..... सुपर्ब यार.......बघ मी आहोच युनिक.......... राहूल

जास्ती उड्या मारू नकोस.........तू एक सर्किट.....तुझ्यासाठी पण तशीच लागेल ना...... सर्किट.........नंदिनी

काय म्हणाली........मी सर्किट काय...... थांब सांगतोच तुला...म्हणत राहुल तिला मारायला तिच्या मागे धावायला लागला.....ती पण पुढे पळत होती....... राहुल तिच्या मागे पाठी मागे......

राज नुकताच ऑफिस मधून आला होता........त्याने शर्ट बदलायचा म्हणून काढून ठेवला होता..........आणि बाकी चेंज करणार तेवढयात फोन आला म्हणून त्याने तो रिसिव्ह केला होता नि फोन वर बोलत बेड जवळ उभा होता....

राहुल च्या रूम मधून नंदिनीच्या रूम मध्ये.....पळत पळत ती राज च्या रूम मध्ये आली.......आणि राज जवळ जाऊन त्याला बघून तिथेच थबकली........

राज शर्टलेस होता.....फोन वर बोलण्यात तो बिझी होता......नंदिनी त्याला तसे बघून एकदम शांत झाली....नी त्यालाच बघत होती......तिने तिला समज आल्या पासून  पहिल्यांदाच त्याला असे शर्ट लेस बघत होती.......नंदिनी ला समज आल्यापासून राज कधीच तिच्यापुढे तसा गेला नव्हता...त्यामुळे तो असा अचानक तिच्या समोर उभा होता......तिला तर कळतच नव्हते पण त्याला बघत राहण्याचा मोह तिला झाला होता......तो एकदम फिट होता..,..एखाद्या मॉडेल ला ला पण लाजवेल तेवढा भारी तो दिसत होता......नंदिनी त्याला बघण्यात मग्न झाली होती.........

राहुल पळत पळत तिच्या मागे आला होता.....नी काही बोलणार तेवढयात चूप होत तिथेच दरात थांबला......नी त्या दोघांकडे क्षणभर बघत होता..........राज चे लक्ष नव्हते नी नंदिनी ....ती तरी तिथे कुठे होती.......ती राज ला बघण्यात तल्लीन होती........नंदिनी ला तसे बघून त्याच्या डोक्यात एक विचार डोकावून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ स्मायल आले.....आणि हळूच आवाज न करता पुढे जात होता..........आणि काही कळायच्या आताच नंदिनी राज च्या अंगावर जाऊन आपटली........

बरोबर.....राहुल च तिला धक्का देऊन तिथून पळाला होता........आणि जाता जाता रूम च दार बंद करायला नव्हता विसरला.......

नंदिनी ला मागून धक्का बसला.....नी ती जाऊन राज च्या अंगावर आपटली होती........अचानकपणे नंदिनी अशी राजच्या अंगावर येऊन पडली.....त्याचा हातातला फोन खाली पडला.........नी आपोआपच त्याचे हाथ तिला पकडायला तिच्या कंबरेभोवती गेले.....नी दोघेही बेड वर पडले.........

धडाम ßss...........

राज खाली आणि नंदिनी त्याच्यावर पडली होती.........आणि पडता पडता तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या कॉलर बोन ला  झाला........आणि त्या स्पर्शाने नंदिनीला तिला वेगळेच काहीतरी झाल्यासारखे वाटले.......तिला कळत नव्हते काय होते आहे.......पण तिला तिचे हृदयाच्या हार्ट बिट्स ची स्पीड वाढल्या सारखी वाटली..........ती त्याच्या छातीवर जाऊन पडली होती......तिला त्याचे हार्ट बिट्स स्पष्ट ऐकू येत होते.......त्या दिवशी सारखेच ते तिला काहीतरी सांगत आहेत असे तिला वाटत होते.......आणि ती ते ऐकण्यात मग्न झाली होती.............

ती अशी अचानक त्याच्यावर येऊन पडली होती......त्याला सुद्धा काही कळले नव्हते......त्याला फक्त इतके कळले होते की ते दोघे पडत आहेत....आणि नंदिनी ला काही लागायला नको, म्हणून त्याने तिला त्याच्या हातात पक्क पकडले होते.....कारण ती पडली तरी त्याच्या अंगावर पडेल....तर तिला लागायचे चान्सेस राहणार नाही..........पण नकळतपणे च का होईना.....तिचा तो झालेला स्पर्श...खूप गोड असा स्पर्श ....तो आज खूप वर्षांनी....जवळपास आठ वर्षांनी अनुभवत होता......त्याच्या पहिल्या किस नंतर तिचा हा तिला कळायला लागल्या पासून पहिल्यांदा असे गोड काहीतरी फील झाले होते...........तिचा स्पर्श झाला....आणि त्याने त्याचे डोळे मिटून घेतले........आणि तीच असे जवळ असणे तो अनुभवत होता.......त्याने पण उठायची अशी कुठलीच घाई केली नव्हती........

असे नव्हते की नंदिनी ने त्याला कधीच किस केले नव्हते....ती बरेचदा आधी त्याला तिला आनंद झाला की त्याच्या गालावर किस करायची.....पण तेव्हा तो तिच्याकडे बायकोच्या नजरेने कधीच बघायचा नाही.....ती एक लहान मुलगी आहे असेच तो बघायचा.....त्यामुळे त्याच्या मनात तिने स्पर्श केला तरी अगदी लहान मुलांनी किस केलेली निरागस फिलिंग अस्याची......त्या नजरेने त्याने तिच्याकडे कधी बघितलेच नव्हते.....त्याने पूर्णपणे स्वताहवार कंट्रोल केला होता.....नी त्याचीच त्याला सवय सुद्धा झाली होती......पण त्या दिवशी आश्रम मध्ये जेव्हा नंदिनी त्याला धडकली होती.....तेव्हा तिच्या नजरेत त्याला वेगळे काहीतरी जाणवले होते......वेगळं काहीतरी हवंहवंसं........तेव्हापासून परत तो तिला आता आपल्या संगिनी , आपल्या प्रेमिका च्या नजरे ने बघायला लागला होता......त्याच्या हृदयात परत त्या प्रेमाच्या भावना उमलू लागल्या होत्या........असे नव्हते की त्याचे प्रेम कमी झाले होते, किंवा संपले होते......पण झालेल्या घटने मुळे त्याने आपले प्रेम हृदयाच्या एका कप्प्यात ठेऊन दिले होते....नी तो पूर्णपणे तिचा बाबा, तिचा मित्र, तिची आई, तिची मैत्रीण असे बनला होता.........आणि आज इतक्या वर्षांनी त्याचे ते जपून ठेवलेले प्रेम आता उमलयाला लागलं होत.......

ती त्याच्या बळकट हातांमध्ये अडकली होती........तीच इतकं जवळ असणे....तिचा नाजूक मऊशार स्पर्श....तिचे हवे वर उडणारे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते......तिचा तो सुगंध........त्याल वेड लावत होते......आणि त्याने नकळत पणे तिचे उडणारे केस आपल्या बोटांनी तिच्या कानामागे केले.......त्याच्या त्या स्पर्शाने नंदिनी भानावर आली , आणि तिच्या लक्षात आले की ती राज वर आहे.....आणि तिच्यामुळे त्याला हलता पण येत नाही आहे....आणि कदाचित तिचे केस त्याला त्रास देत आहेत.........पण तिला हे कुठे कळत होते की त्याला उठायचेच नाहीये ????????, त्याला तर ते आवडत होते.......आणि तिने आपली मान वर करत राज कडे बघितले...........तर तो तिच्याकडे बघत होता.......त्याच्या डोळ्यांमध्ये तिला वेगळेच स्पार्क दिसत होते.........आणि त्याने तिला खूप गोड स्मायल दिले............आणि नंदिनी ला तीच हार्ट बीट स्किप झाल्यासारखे वाटले........ती उठायला जाणार तेवढयात परत ती त्याच्या अंगावर पडली.........

एक मिनिट....मी मदत करतो.......म्हणत त्याने तिच्या  तिला पकडत साईड ला केले......नी तो तिथून उठून उभा राहिला....आणि त्याने नंदिनी ला हाथ दिला........नी तिला स्वतः कडे ओढत उभ केले.......

दोघंही एक मेकांकडे बघत होते.......नी आता नंदिनी च्या लक्षात आले की तो शर्टलेस आहे.......आणि आपण त्याच्याच कडे बघतोय.....तो आपल्या बद्दल काय विचार करेल.........नी आपण हे काय करतोय..........आणि ती लगेच मागे वळली आणि पळतच बाहेर गेली......

तिला बघून राज ला पण हसू आले.....

*******

काय....??....काय करत काय होता तुम्ही दोघं बेड वर...........काकी हसू दाबत बोलत होती

कबड्डी खेळत होते....????????.........राहुल

बाकीचे तोंड दाबून हसत होते.........नंदिनी ला तर जोक कळला नव्हता......पण राज मात्र पुरताच लाजला होता.....त्याला चेहरा कुठे लपाऊ असे झाले होते......

दुपारी जेव्हा नंदिनी राज च्या अंगावर जाऊन पडली होती, आणि ते दोघंही बेड वर पडले तेव्हा बेड तुटला होता.....आणि आता काही लोक बेड चेंज करत होते.......
राज,नंदिनी......घरातले सगळे खाली हॉल मध्ये बसले होते.......आणि तिथेच सगळे हसत होते..

मी काय मुद्दाम नव्हती पडली.......नंदिनी

मग...??????...........काकी

मला ....मला...कोणीतरी......आणि तिला आठवले काय झाले होते ते.......मला या दाद्या पद्या नी धक्का दिला होता..........मी तर चुपचाप उभी होती........नंदिनी ने एक बुक्का राहुल च्या पाठीत मारला.

मग......मला सर्किट म्हणाली होती ना.............मग काय तुझा लाड करणार होतो........पण तू याच्या रूम मध्ये उभी करत काय होती..........राहुल

ते..,मी राज ला बघत.......,..एक मिनिट ते या राज ची चूक आहे.........नंदिनी

मी........मी काय केले........मी तर फोन वर बोलत होतो.....मला तर कळले सुद्धा नाही...........राज

हो, पण तू तिथे करत काय होती......??....काकी, सगळ्यांचीच त्यांची मस्करी करायचा मूड होता.....

फ्री मध्ये Mr, India शो बघत होती????????????????........राहुल

राहुल च्या बोलण्याने राज ला अंदाज आला की काय झाले असेल ते...........आणि मुद्दामच राहुल ने नंदिनी ला धक्का दिला असेल......त्याला राहुल वार फुल डाऊट आला होता........आणि तो राहुल कडे बघत होता....

त्याचा बोलण्याने नंदिनी ला सगळ आठवले, की कसे आपण राज ला बघण्यात बिझी झालो होतो..............आणि सगळ्या समोर तिला ऑकवर्ड वाटले.....

असे काय...........थांब तुला ना....... मारच पाहिजे...........तुझ्यासाठी चांगली तुला चोपून काढणरीच शोधते..........आणि त्यांची मारामारी सुरू झाली....

*******
 

नंदिनी जर असेच मुली रिजेक्ट  करत राहिली तर राहुल साठी एक पण मुलगी मिळणार नाही............काकी

नंदिनी ला स्वतःच्या लग्नाचं कळत नाही.....आणि तुम्ही तिला राहुल च्या लग्नाची जिम्मेदारी दिलीच कशी........??.... आजीसाहेब

आम्ही कुठे दिली, तीच हट्ट करतेय........आबासाहेब,  राज आणि राहुल चा पण तिला पाठींबा आहे........मग काय बोलणार या सगळ्यांच्या मधात.......काकी

नाश्ता साठी सगळे डायनिंग टेबल वर जमले होते...

नंदिनी, राहुल नी सिलेक्ट करून दिलेल्या फोटो मधून तुम्ही सगळ्याच मुली रेजेक्ट केल्या...... आजीसाहेब

या ढोम्या ला काय कळते मुलींचं.......थोबाड बघून सिलेक्ट केले त्याने........एकही त्याचा लाईक नव्हती..........नंदिनी

एकही चांगली नव्हती....??....आश्चर्य आहे.......तुम्हाला एकही आवडली नाही........सगळ्याच तर दिसायला चांगल्या, शिकलेल्या, श्रीमंत घरच्य होत्या........आणि तुम्हाला एक पण मुलगी नाही आवडली......??.........आणि सूनबाई हे काय आहे, हे मोठ्यांचे काम आहे....लहानाचे नाही....त्यांना कळते तरी काय......... प्रोपर तुम्ही नी राज च्या आई बघा, लक्ष घाला..........आजिसहेब

हो, नाही आवडली तर नाही आवडली, आपल्याला कशाची घाई आहे काय.........??....शोधुया की आरामात.........नंदिनी

बरोबर नंदिनी......काही घाई नाही, तुला पाहिजे तेवढा वेळ घे.......मला काहीच प्रॉब्लेम नाही.....आणि हो नंदिनी ला च बघू द्या......तुम्ही आपली ओल्ड फॅशन मुलगी बघाल माझ्यासाठी.....त्यापेक्षा नंदिनी च बरी............ राहुल

तू चूप बस रे गाधड्या..............काकी ने एक धपाटा त्याच्या पाठीत मारला.......

मला सांगाल काय , तुम्हाला का नाही आवडल्या त्या मुली..........??.... आजिसाहेब

आजिसहेब विश्वास ठेवा हो माझ्यावर......मी काही चूक करणार नाही..........नंदिनी

हो....तरीपण मला कारण ऐकायचे आहे तुम्ही येवाध्या चांगल्या मुलींना नकार का दिला ते.........आजिसहेब

बाकी सगळे या दोघींचे बोलणे ऐकत होते...

आजिसहेब, मी मुलींना भेटली ना......तर सगळ्यांनाच राहुल सोडून बाकी गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता जास्ती.....म्हणजे कोणी विचारत होत.....आपल्या किती कंपनीस आहेत....त्यात राहुल च्या नावावर किती.....राहुल चे किती शेअर आहेत........कोणी विचारत होते तो लग्न झाला की वेगळा राहील काय.....??.....तर कोणाला जॉइंट फॅमिली नव्हती आवडत........,राहुल घरात लहान आहे तर त्याच कोणी ऐकते की नाही.....त्याच घरात चालते की नाही.......कोणाला फक्त तो हवा होता, फॅमिली नाही........कोणी मला स्वभावाने आगाऊ वाटल्या , रेस्टॉरंट मधल्या वेटर सोबत नीट बोलल्या नाही......कोणाला पैशाचा घमंड खूप होता.......कुणाच्या वागण्याबोलण्यात रिस्पेक्ट नव्हता.....,.कोणीच मला हे नाही विचारले राहुल कसा आहे, त्याला काय आवडते, त्याचे छंद काय आहेत..........म्हणून मी त्या सगळ्या रीजेक्ट केल्या....

सगळे आश्चर्य होत नंदिनी चे बोलणे ऐकत होते.........

आजिसहेब.....आपल्याला आपल्या राहुल साठी त्याला आयुष्यभर साथ देणारी मुलगी हवी आहे........जी त्याला बघून येईल, ना की त्याचे बँकवलान्स.....पैसे आज आहे उद्या नाही......ज्याच्यासोबत लग्न करतोय , ज्याच्यासोबत आयुष्य जगायचे आहे ,त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारी मुलगी हवी आहे.......लहानापासून मोठ्या पर्यंत वयाने असो वा मानाने, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचा रिस्पेक्ट करणारी हवी.......राहुल वर फक्त राहुल वर प्रेम करणारी हवी...........अशी जिच्या साथीने तो आयुष्यात पुढे गेला पाहिजे..........अशी मुलगी हवी आहे........तर त्यांच्या पैकी कोणीच अशी नव्हती.......म्हणून नाही आवडल्या मला......त्यांचं दिसणे, त्यांची श्रीमंती काय करायची आपल्याला......चेहऱ्याने सुंदर नाही तर मनानं श्रीमंत हवी.....पैशाने श्रीमंत नाही तर कतृत्वने श्रीमंत हवी..................नंदिनी

नंदिनी चे बोलणे ऐकून सगळेच स्तब्ध झाले होते.........ती असाही विचार करू शकते .......कोणालाच विश्वास बसेना.........राहुल तर शॉक च झाला होता......तो तोंड उघडूनच तिच्या कडे बघत होता.........राज ला मात्र नंदिनीच्या विचारांवर अभिमान वाटत होता.......परत नंदिनीच्या या नव्या रूपाच्या तो प्रेमात पडला होता.......

Wah..... शाब्बास नंदिनी............अगदी योग्य केले............खूप छान विचार.......आणि का नसतील......माझ्या राज चे संस्कार झाले आहेत तिच्यावर.............आबा साहेब गर्वाने बोलत होते...

राज ने त्यांच्याकडे हसून बघितले.......खरंच त्याला पण नंदिनी चा गर्व वाटत होता.....

नंदिनी च बघेल राहुल साठी मुलगी..........अजिसहेब

आजिसहेबांचे बोलणे ऐकून नंदिनी ला खूप आनंद झाला.....आणि ती डायरेक्ट त्यांच्या गळ्यात जाऊन पडली.......नी त्यांच्या गालावर किस केले.........आजिसहेबांनी पण हसतच तिच्या डोक्यावर आशीर्वाद देत हाथ ठेवला....

अरे.....ते तोंड बंद कर आधी.......काकी राहुल ला बोलल्या

सगळे त्याला बघत होते...
 

अबे.....नंदिनी......मला पण नव्हती माहिती मला कशी मुलगी हवी आहे ते........फारच कंपलिकॅटेड केले बाबा तू......अशी मुलगी असतें तरी काय......मला जन्मभर बिन लग्नाचं नाही राह्याच........राहुल

असते, असते अशी मुलगी.....एक आपल्याच घरात आहे.......माझी नंदिनी.........आबा

झालं कल्याण..........राहुल ने डोक्यावर हात मारला....

हो राहूदे तू,  याला जी जास्ती आवडली होती ना तिला फॅमिली नको होती........मी माझ्या या ढोम्या ला बरी घरातून जाऊ देईल....... सर्किट आहे तर काय झालं.......आहे तर आपल्या घरचाच.......झेलू आपण त्याला.......नंदिनी राहुल ची मस्करी करत होती.....

परत सर्किट...........राहुल परत तीच्य मागे लागला....

बाय sss............ नंदिनी ने आपली बॅग उचलली नी बाहेर कॉलेज ला जायला  पळाली.....

*******

नंदिनी कॉलेज वरून येतच होती की रस्त्यात तिला गर्दी दिसली......तिने साईड ला बाईक उभी केली नी गर्दी मधून वाट काढत आतमध्ये जात गेली....

********

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️