नंदिनी...श्वास माझा 46

राजनंदिनी

भाग 46

पण मला एक नाही कळत आहे तुम्ही दोघं एकत्र कसे काय भिजले......... राहुल आपला हसू दाबत नंदिनी आणि राज कडे बघत होता.......काकी , आई पण त्या दोघांकडे बघत हसत होत्या......

राज आणि नंदिनी ला बऱ्यापैकी थंडीने पकडले होते......दोघांनाही एका पाठोपाठ शिंका येत होत्या.......राज च तर हाल जास्तीच खराब होता.....त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते आणि नाक पण पूर्ण लाल झाले होते...............हातात आई ने बनऊन दिलेल्या काढा चा ग्लास घेऊन हळू हळू पित होता......आणि अधूनमधून समोर बसलेल्या नंदिनी कडे बघत होता........

नंदिनी ची पण हालत काही वेगळी नव्हती.......पण राज पेक्षा बरी होती........तिला पण आई ने काढा दिला होता प्यायला, पण ती मात्र खूप नाटक करत होती पिण्यासाठी.....अजूनपर्यंत तिने एकही घुट पिला नव्हता...... तोंडा पर्यंत नेत होती....परत वाकडं तोंड करत दूर करत होती.........ती पूर्ण घरगुती अवतारात होती.... नाईट ड्रेस कॉटन शर्ट नी पायजमा घातला होता.....तिला कधीच ती मुलींसारखी नाईटी आवडत नव्हती....त्यामुळे ती शर्ट च प्रिफर करायची, त्यात केसांचा केलेला मेसी बन.......त्यातले काही केस बाहेर निघाले होते..........आणि चेअर वार मांडी घालून बसली होती......नी हातात काढा चा ग्लास......आणि त्या ग्लास ला बघून बघून चेहऱ्यावर फारच नाक तोंड वर करत होती......राज ला ती फारच क्युट वाटत होती...........

नंदिनी ss...... लवकर पी ते.......थंड होईल.......आई

किती कडू आहे हे.......नंदिनी

न पिता च कसे कळले कडू आहे ते........पी पटकन , नाटक नको करू.........काकी

इयु........त्याचा रंगच किती भयानक दिसत आहे........नंदिनी

तो राज पितो आहे न काही नाटकं न करता.........तुला खूप नाटक सुचत आहेत..........आई

त्याला तर माहिती पण नाही काढा ची चव कशी आहे ते...........????????......बघ विचारतो.....राहुल

राज गोड आहे ना रे काढा......??????????? .....राहुल राज ला नंदिनी कडे बघत आहे ...त्याच बाकी कुठे लक्ष नाहीये बघून बोलला...

हो..................राज च या सगळ्यांकडे काहीच लक्ष नव्हते.....तो तर स्वतःतच नी नंदिनी ला बघण्यात बिझी होता........

काकी आणि आई राज कडे बघत गालात हसत होत्या....

हा त्याचा फेवरेट स्टेट मध्ये गेलाय..... हिपनोटाइज झालाय तो......काही विचारा " हो" म्हणणार तो????????????......राहुल

आबा पण हसत होते.......

राज खरंच कडू नाहीये ....???.......नंदिनी, नंदिनीच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली....

It's medicine Nandini.....take it fast......you will feel better........ राज

नंदिनी जरा प्रेमानं बघ त्या गलास कडे.....आपोआप गोड होते ते.........????......राज ने तेच केलेय.....म्हणून त्याचं गोड झाला काढा..????????..........राहुल राज ची मस्करी करत होता......

Yuk........ नंदिनी ने एक घुट पीला.......मला नकोय हे.....मी बरी झाली..........नंदिनी ... आणी परत तिला शिंका आली.....

नंदिनी पी ते लवकर............नाहीतर मला पाजता येतं ते........राज

हो नंदिनी..... लास्ट टाईम आठव हा.......राज ने कसे पाजले होते तुला.......तुझे नखरे सगळ्यांसमोर चालतील पण राज समोर नाही चालत , माहिती ना तुला.......पिऊन घे शहाण्या बाळा सारखं.........काकी

हे सगळं या राज मुळे होते आहे ..........याच्या मुळेच ओली झाली मी..........आणि आता हा कडू काढा प्यावं लागतं आहे .........नंदिनी वाकडं तोंड करत काढा पित होती

राज मुळे म्हणजे.....??....तो तुला पावसात घेऊन गेला काय....??......राहुल

नाही......तो नाही घेऊन गेला.............नंदिनी

मग.........??.......राहुल

मी मुलींना बाहेर डान्स शिकवत होते........ते गिरकी घेत होती....गिरकी घेता घेता राज वर आदळली मी.......तो तर आतमध्ये ऑफिस मध्ये होता...माहिती नाही तिथे कुठून आला.........आणि ते पाऊस आला अचानक...कळलेच नाही...मी ते....त्याच्याकडे ब......घ..... त................नंदिनी बोलतच होती की राहुल अगदी तिच्या चेहऱ्या पुढे जवळ उभा होता............

तू.......तू......माझी मस्करी करतोय.....????????????......नंदिनी जागेवरून उठली नी राहुलच्या पाठीत धपाटा देण्यासाठी त्याच्या मागे धावली....

आत्ता समजले...........आज हा म्युट मोड वर का गेला आहे.......आजिसहेब your pantus are on the way ssssss......????????????????.....राहुल, पुढे पुढे पळत होता.......नंदिनी त्याचा मागे...........नंदिनी त्याला मारण्याच्या नादात तेवढी होती की तिला राहुल पुढे काय बोलला ते सुद्धा कळले नव्हते..........राज मात्र लाजला होता....त्याचा चेहरा ब्लश करत होता........

तुम्ही लोकं मोठे व्हा आधी..........

राज च्या डोक्यात पण आश्रम मधला सिन सुरू होता.........तो सतत तोच विचार करत होता......पण विचार करता करता त्याने आपले विचार बदलावळे.....नको सद्ध्या नकोत ही स्वप्न.......जे सुरू आहे सध्या तेच ठीक आहे , त्याने स्वतःला समजावले..

******

नंदिनी सकाळी डायनिंग टेबल वर नाश्ता करत बसली होती.....नी डोक्यात वर्षा ला मदत कशी करायची याचाच विचार करत होती........राज ला मागितले तर तो देईल ही......पण नको......आपल्या हिमतीवर मदत करायची........नंदिनी खाता खाता विचार करत होती......तेवढयात तीच लक्ष रविकांत आणि राज च्या बोलण्याकडे गेले आणि तिला कळले की ऑफिस मध्ये अकाउंट डिपार्टमेंट मध्ये व्ह्यकांसी आहेत....नी त्याचे इंटरव्ह्यू उद्या होणार आहेत.........  आणि ते ऐकून तिला आयडिया आली......नाश्ता आटोपून ती वरती आपल्या रूम कडे जायला निघाली...

का ग.....आज कॉलेज नाही काय...??......आई

आ.....आहे.....पण मी नाही जातेय..........नंदिनी

का....???....... बरं वैगरे वाटत नाहीये काय....??......राज लगेच तिच्या जवळ येत तिच्या डोक्याला , गळ्याला हाथ लावत बघत होता......कारण ती कॉलेज ला जायच्या तयारीने च खाली आली होती.....आणि अचानक नाही बोलतेय.....त्याला तिची काळजी वाटली

अरे मी बरी आहे.....काही नाही झालेय........ते अचानक आठवले उद्या एक टेस्ट आहे....तर आज घरीच अभ्यास करते....तसे पण कॉलेज मध्ये काही फार महत्वाचं शिकवत नाहीये...उगाच टाईम पास होतो....म्हणून म्हटले आज घरीच अभ्यास करावा........नंदिनी

ठीक आहे........राज, तसेही नंदिनी अभ्यासाच्या बाबतीत खूप सिन्सिर आहे , ती तिचा अभ्यासाच्या बाबतीत लॉस होईल असे काही करणार नाही...... राज ल माहिती होते.....त्याला पण तिचे बोलणे पटले, सो मग त्याने फार काही विचारले नाही...

नंदिनी पळतच वरती राहुल च्या रूम मध्ये गेली........राहुल ऑफिस ला जायची तयारी करत होता......

नंदिनी धापा टाकत राहुल च्या रूम च्या दारामध्ये उभी होती......

काय ग काय झालं....???...अशी धापा का टाकते आहेस...??.... बरं नाही वाटत आहे काय...??.......राहुल काळजीने बोलला

अरे यार काय तुम्ही लोकं.......किती काळजी करता माझी......थोडस काही बदललं की लगेच बरे नाही काय विचारता......खाली तो राज पण किती काळजी करत होता.......नंदिनी

ह्मम........त्याचा हक्क आहे तुझी काळजी करण्याचा.........राहुल

काय...??........नंदिनी

काही नाही......ते सोड.....काय झालं ते सांग....आणि अशी पळत का आली......??....राहुल

तू आज ऑफिस ला उशिरा जातोय.........नाहीतर सुट्टीच घे.........नंदिनी

काय....???......राहुल

ह्मम, मला खूप महत्वाचं काम आहे तुझ्या जवळ.....पूर्ण दिवस च लागेल.........नंदिनी

बोल काय काम आहे...??......राहुल

आणि मग नंदिनी त्याला सगळ सांगते.........

अग, तुला पैसे हवे ना.......राज देईल ना..... माग त्याला........राहील

नाही मला नकोय.........नंदिनी

बरं, तो नाही, तर मी देतो......राहुल

तुला कळत नाहीये......मला माझ्या मेहनतीचे हवे आहे.......आणि म्हणूनच मला जॉब करायचा आहे..........नंदिनी

ह्ममम......मग मी काय करू......??......तुला माहिती आहे राज च्या ऑफिस मध्ये शिफारस नाही चालत......फक्त मेहनती नी पात्र लोकांनाच जॉब भेटतो.......राहुल

हो माहिती मला....म्हणूनच तर तुझ्याकडे आले ना.....हे बघ मल अकाउंटिंग मधले बरच येते......पण ऑफिस मध्ये कुठल्या पद्धती ची काम असतात ते सगळं सांग मला......आणि मला जे येत नाही ते शिकव.........माझ्या जवळ जास्ती वेळ नाही आहे......आणि मला राज ला काहीच कळू द्यायचे नाही.........नंदिनी

अग पण त्यासाठी डिग्री लागेल ना....ते कुठे आहे तुझ्या जवळ........राहुल

ते....ते माझं मी म्यानेज करेल........नंदिनी

फारच सिरीयस मेटर दिसत आहे........ठीक आहे.....उशिरा जातो मी.......राहुल

********

राज........मी डीसेंट दिसेल असे तयार करून दे ना मला......एकदम प्रेझेंटेबल ...... First impression is last impression असते ना , एकदम तसे........नंदिनी सकाळी राज च्या रूम मध्ये येत बोलली

Anything special........??...... राज एक भुवई वरती करत तिच्या कडे बघत होता...

अरे काल मी तुला सांगितले ना आज माझी एक टेस्ट आहे......बाहेरची लोक असणार आहेत.......प्रेझेंटेबल दिसायला हवे ना........तुला तर माहिती माझी मी तयारी केली तर ओके ओके दिसते.......तू तयार करून देतो ना ,मग मी एकदम ऑसम दिसते ना....... नंदिनी

ओके........ चल तुझ्या रूम मध्ये आधी ड्रेस सिलेक्ट करू......मग त्या नुसार तयारी करू......

********

नंदिनी राजच्या ऑफिस मध्ये गेली होती......
नंदिनी ने तिचा रिसुमे तिथे सबमिट केला , walk-ins होते म्हणून नंदिनी तिथे तिची टर्न येयीपर्यंत वाट बघत होती.....तिथे बरेच लोक इंटरव्ह्यू साठी आले होते........बहुतेक सगळ्यांचे पोस्ट ला अनुरूप असे प्रोफाइल होते........नंदिनी ला ते बघून थोड टेन्शन आले होते........पण तिला स्वताहवार विश्वास सुद्धा होता....नी चांगल्या कामात देव सुद्धा मदत करतो , तिचा विश्वास होता.......बहुतेक सगळ्यांचा नंबर येऊन गेला होता, पण नंदिनी चा अजून पर्यंत आला नव्हता...

सर, आपल्याला टोटल दोन कँडिडत हवे होते.....एक मिळाला आहे...........आणि आता लोक संपले आहेत......तर मला वाटते बाकी जे इंटरव्ह्यू देऊन गेले ,त्यातला च एक बघावा.........सिलेक्शन पांनेल मधला एक बोलला...

त्यांची सेलेक्शन प्रोसिजर खूप कठीण होती म्हणून बरीच लोकं त्यामध्ये पास होऊ शकले नव्हते........

टोटल पंधरा रिसुमे आले आहेत.....चौदा च झाले इंटरव्ह्यू..........एक बाकी आहे........ राज

हो पण ती आपल्या काहीच कामाचा नाही आहे.... ती मुलगी फक्त बारावी आहे आणि आता कुठलातरी एज्युकेशन करते आहे.... आर्ट फिल्म रिलेटेड काहीतरी कोर्स आहे....... मला नाही वाटत की ती आपल्या काही कामाची आहे ......शिकलेली लोक सुद्धा येथे टिकाव धरू शकले नाही तर तिचा इंटरव्यू घेउन काही फायदा नाही..... तिचा पण वेळ वाया जाणार ...आपला पण वेळ वाया जाईल ......मला असं वाटते तिला आधीच आपण नको म्हणून सांगूयात..........

ह्मम.........ठीक आहे..... पण तिथे आली आहे,  तर तिला जर तुम्हाला नाही म्हणून कळवायचं होतं तर आधीच कळवायला हवं होतं ....इतक्या वेळ तिला इथे वाट बघायला का लावले.......???... सगळ्यांच्या वेळेचा रिस्पेक्ट करा......... राज चिडत च बोलला

सॉरी ........ इंटरव्यू घेणाऱ्या मधला तो खाली मान घालून बसला होता....

बोलवा त्यांना, आणि प्रॉपर प्रोसिजर नुसार त्यांचा इंटरव्यू घ्या... ........ पुढच्या वेळेपासून हे लक्षात असू द्या .... जे काही आहे ते आधीच क्लीअर करा......कोणाचा ही वेळ वाया घालवलेला मला अजिबात आवडत नाही.......राज

ओके सर............

राज चा फोन वाजला म्हणून त्याने थोडं साईड ला जाऊन फोन रिसिव्ह केला......

May I come in sir........ नंदिनी डोअर नॉक करत होती..

नंदिनी???............राज ने आवाज ओळखला होता......पण कदाचित भास झाला असावा असे त्याला वाटले , कारण आजकाल त्याला सगळीकडे नंदिनी दिसत होती.. ऐकू येत होती........ आणि त्याने आपले फोनवर बोलणे कंटिन्यू केले.......

येस......

नंदिनी दार उघडून आत मध्ये आली........तिथले सगळे तिला बघतच बसले........इतकी ती  प्रेझेंटेबल आणि कॉन्फिडनट दिसत होती......

नंदिनी लेडीज व्हाईट क्रीम कॉटन चा शर्ट,  त्याखाली नेव्ही ब्लू कलर परफेक्ट फिटिंग ची ट्राउझर, शर्टावर मॅचिंग होईल असा टाय, पायामध्ये पेन्सिल हील ब्लॅक शुज..... हातामध्ये सिम्पल ब्लॅक बेल्ट वॉच.... केसांना वरती धरून बांधलेली हाय पोनी...मेकप च्या नावाखाली फक्त..... डोळ्यांना अगदी बारीक असे ब्लॅक आय लाइनर...... आणि ओठांवर लाईट पेज न्यूड कलर चे लिपस्टिक, कानामध्ये सिंगल स्मॉल पर्ल........ आणि चेहर्‍यावर प्रचंड आत्मविश्वास.......... तिची बॉडी लँग्वेज हुबेहूब राज सारखी तिने कॅरी केली होती.......

या ऑफिस मध्ये कोणालाच माहिती नव्हते नंदिनी राज ची वाइफ आहे ते.......इथला बहुतेक सगळच स्टाफ नवीन होता.......आणि आता नंदिनीच्या पण लूक आणि स्टाईल मध्ये खूप फरक झाला होता....त्यामुळे ही तीच नंदिनी आहे कोणाला कळले पण नसते....

एक्सक्यूज मी........सर......... कोणी काही बोलत नाही आहे बघून नंदिनीच बोलली....

राजनी बोलता मुलीच्या मागे वळून बघितले आणि तो नंदिनीला तिथे बघून एकदम शॉक झाला....... आणि थोड्या वेळेसाठी तो तिला फक्त बघत होता....... तो त्याचा फोन संपवून सिलेक्शन पांनेल मध्ये येऊन बसला......तसाही तो इंटरव्यू कधीच घेत नव्हता, तो फक्त ऐकायचं काम करायचा..........तो इंटरव्यू देणाऱ्या व्यक्तीचे फक्त ऑब्झर्वेशन करत असायचा.....

नंदिनी पण राजला बघून थोड्यावेळासाठी गोंधळली होती,  मग तिने तिचा उद्देश डोळ्यापुढे आणला आणि परत ती कॉन्फिडन्ट झाली......

Oh sorry, please have a seat........ त्यातला एक बोलला..... टोटल तिथे पाच लोक बसले होते......

Good morning everyone...... नंदिनी ने सगळ्यांना आय कॉन्टॅक्ट करत विश केले....

नंदिनी ने एकदा राज कडे बघितले.......त्याने तिला छोट स्मायल दिले........त्याला बघून नंदिनी चा आत्मविश्र्वास वाढला होता......... खरं तर राज कसा रिॲक्ट करेल याचेच तिला टेन्शन आले होते....पण त्याचा प्रसन्न चेहरा बघून तीच टेन्शन कुठल्या कुठे पळाले होते.....

राज सुद्धा तिला तिथे बघून शॉक झाला होता......तिला नोकरी ची का गरज पडली याचाच तो विचार करत होता......पण काहीतरी नक्कीच खास कारण असेल तिच्या असे करण्या मागे .....कारण ती पैशांच्या मागे धावणारी मुलगी नव्हती त्याला माहिती होते.....काहीतरी चांगल्याच कारणासाठी ती हा इंटरव्ह्यू देत असेल ....त्यामुळे त्याने त्याच्या चेहऱ्यावर चांगले भाव ठेवले होते, त्याला बघून तिचा थोडा ही आत्मविश्र्वास कमी झाला नाही पाहिजे......आणि तिने बघितले तेव्हा त्याने तिला छान गोड स्मायल दिले होते...

Ms Nandini..... आपण आपले पूर्ण नाव नाही दिले आहे ..???......... मॅनेजर

कारण मला असे वाटते माझी ओळख ही माझ्या पारिवारिक नावाने होण्यापेक्षा माझ्या कामाने व्हावी.......नंदिनी

तुम्हाला माहिती हा इंटरव्ह्यू कुठल्या पोस्ट साठी सुरू आहे...??.....मॅनेजर

हो..........नंदिनी

मग तुम्हाला यासाठी काय क्वलिफिकेशन हवे असते..??.......आणि तुमच्या रेजुम वरून कळते आहे तुमच्या कडे आम्हाला हवे असलेले एज्युकेशन नाही आहे..........मॅनेजर

माझ्या कडे त्याची डिग्री नाही आहे, पण माझ्याकडे तुम्हाला हवे असलेले एज्युकेशन, नॉलेज आहे.......नंदिनी

राज तिच्याकडेच बघत बसला होता...तो पूर्ण अटेंशन देत तिचे बोलणे ऐकत होता........त्याने त्याचा मोबाईल मधले व्हॉईस रेकॉर्डर ऑन केले होते....नी तिचे बोलणे रेकॉर्ड करत होता.....तिचा हा पहिलाच ते पण इतक्या मोठ्या कंपनी मधला........तो ती देत असलेल्या उत्तरांवर खूप इंप्रेस झाला होता.....

नंदिनीचा बोलण्यातला कॉन्फिडन्स बघून मॅनेजर ला थोडा राग येत होता......कारण त्यानेच ती या इंटरव्ह्यू साठी योग्य नाहीये असे आधी सांगितले होते...

Ms नंदिनी तुम्ही खूप ओव्हर कन्फिंडेन्स होत आहेत......मॅनेजर

नाही सर..... असं नाही आहे......नंदिनी

जॉब का करायचा आहे.....??......मॅनेजर

सर काही पर्सनल काम आहे..........नंदिनी

ह्मम.....समजले......नक्कीच घरून भेटणारी पॉकेट मनी कमी पडत असणार, तुमच्या सारख्या यंग जनरेशन ला मना सारखे वागागता यावे.... पार्टीज, डिस्को , पैसे कमी पडत असतील........घरून पण भेटत नसतील.....म्हणून मग हे जॉब..........मॅनेजर

सर, मी घरी मागेल तितके पैसे मला मिळतात......इतके की मी तुमची ही कंपनी पण विकत घेऊ शकते.....आणि तुम्हाला स्यालारी देऊ शकते.........आणि दुसरी गोष्ट माझ्या फॅमिली चा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे.......मला त्यांच्या पासून लपून काही काम करावे लागत नाही, मला जे करायचे आहे त्यासाठी मला घरून पूर्ण मोकळीक आहे.......मला पैसंचे महत्त्व कळते......आणि म्हणूनच मला हा जॉब करायचा आहे........नंदिनी

तुमच्या बोलण्यावरून तुम्ही बऱ्याच श्रीमंत घराच्या वाटत आहात........मग इथे जॉब का करायचा आहे.......??

माझं स्वप्न आहे या कंपनी मध्ये आणि आताच्या बेस्ट बिझनेसमॅन Mr Shriraj Deshmukh सोबत काम करायचं आहे, त्यांच्यासारखे बनायचे आहे .......नंदिनी

त्यांच्या सारखं बनने इतके सोपी नाही आहे...??

मला माहिती आहे.......पण शिकायला सुरुवात तर नक्कीच करू शकतो........नंदिनी

काय माहिती तुम्हाला त्यांच्या बद्दल.......??

आणि नंदिनी ने त्याच्या एज्युकेशन पासून त्याने आतापर्यंत केलेले काम, प्रोजेक्ट्स, त्याला भेटलेले अवॉर्ड, त्याने केलेलं सामाजिक काम .....सगळं राज कडे बघत  सांगितले.......

बापरे भयंकर अभ्यास करून आलेली दिसतेय......राज तिच्याकडे बघतच मनामध्ये विचार करत होता....

सगळे अवाक होत तिच्या कडे बघत होते , कारण त्यातला बऱ्याच लोकांना येवढे डिटेल मध्ये पण माहिती नव्हते.......

खूप मोठ्या फॅन दिसत आहात तुम्ही सरांच्या........

हो.......असे म्हणू शकता..........चांगलं बनण्यासाठी चांगल्या व्यक्ती ला फॉलो करावे लागते..........नंदिनी

ठीक आहे , जितकं बोलण्यात हुशार आहात तेवढेच कामात हुशार आहात काय बघुया.........

हो, चालेल...........नंदिनी

आणि त्याने नंदिनी ला अकाउंट मधला त्यांच्या ऑफिस मध्ये येणाऱ्या मोठ्या प्रॉब्लेम पैकी एक प्रॉब्लेम सोल्व करायला लॅपटॉप तिच्या पुढे केला....

Ms नंदिनी, तुमच्या जवळ 15 मिनिट आहेत........लॅपटॉप मधला प्रश्न वाचा आणि सोडवा.....

Sure sir.......... तिने चेअर थोडी मागे केली आणि लॅपटॉप आपल्या मांडीवर घेतला.....नी तिचे बोट कीबोर्ड वर सराईतपणे चालायला लागली होती......

कसली क्यूट दिसते आहे ही........अगदी माझ्यासारखी करते आहे......आधीच वेड लावले आहे हिने......अशी वेगवेगळी रूपं.....मला पागल करेल..........तिचे चेहऱ्यावरचे भाव बघत राज ला हसायला येत होते........

बाकीचे पण तिलाच बघत होते........त्यातले बरेच जणांना वाटत होते की ती करणार नाही.......एकतर एज्युकेशन नव्हते आणि त्यांना वाटत होते बोलतच जास्ती.....

आणि नंदिनी ने लॅपटॉप त्यांच्या पुढे ठेवला...

मॅनेजर ने वेळ बघितली तर सातच मिनिट झाली होती.....त्याच्या चेहऱ्यावर कुत्सित स्मायल आले......नाही जमले ना.......आम्हाला माहिती होते.....तुमच्या आधी आलेली लोकांना आम्ही 20मिन दिली तरी त्यांना नाही जमली....... मॅनेजर

तेवढयात बाजूला बसलेल्या माणसाने ते चेक केले.....

Mr ठाकूर ..... it's perfect.........

What.....???........

Yess......

आता मात्र त्याला इंसल्टींग वाटलं....

Ms Nandini......now you have only five minutes......... त्याने परत लॅपटॉप तिच्या पुढे केला नी त्यात आता दिलेल्या प्रश्न पेक्षाही कठीण प्रश्न दिला होता.....

नंदिनी ने परत लॅपटॉप तिच्या मांडीवर घेतला नी सोल्व करायला लागली...

राज ने त्या मॅनेजर कडे थोडं रागानेच बघितलं....,...कारण प्रत्येक कॅंडिडेट ते फक्त एकच प्रश्न सोडवायला देत होते मात्र त्याने नंदिनीला परत दुसरा प्रश्न सोडवायला दिला होता........ नंदिनी साठी काय एवढा कडक रुल म्हणून तो विचार करत होता......

आणि नंदिनी ने पाच मिनिटाच्या आत लॅपटॉप मॅनेजर समोर केला............ आणि आता तर बघून तो पुरताच शॉक झाला होता........ कारण तशी प्रश्न कंपनीमध्ये फक्त राज ला च सोडवता येत होते.....

Well done Ms Nandini....... मॅनेजर चेअर वरून उठत टाळ्या वाजवत होता,  त्याला बघून बाकीचे पण उभे राहीले......

राजनंदिनी चे खूप कौतुक वाटले..... तो तिच्या कडून भयंकर इम्प्रेस झाला होता.......

खूप छान मिस नंदिनी,  तुम्ही आता जो प्रश्न सोडवला आहात तो आमच्या कंपनीमध्ये फक्त श्रीराज सरच सोडाऊ शकतात.......... मॅनेजर

त्यांचीच चेली आहे मी..........नंदिनी

सगळे तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते..

I mean, मी त्यांनाच आपली गुरू मानते........नंदिनी

तुम्हाला माहिती इथे ते आहेत........मॅनेजर

हो.........हे Mr Shriraj Deshmukh,  माझे आयडॉल.....नंदिनी नी त्याच्या कडे हाथ दाखवत बोलली

Ms, Nandini you are selected...........

ये ssss yipiee ssss.......नंदिनी तिथेच उड्या मारायला लागली......तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बाकीच्यांना पण आनंद झाला

Ms Nandini शेवटचं प्रश्न......

Yes सर...........नंदिनी

आता खरे कारण सांगाल तुम्हाला जॉब का हवा होता......??? मॅनेजर
 

सर तुम्ही खूप उत्सुक दिसत आहेत , हे जाणून घेण्यासाठी........नंदिनी

हो........

सर मी एका आश्रम मध्ये अनाथ मुलींना डान्स शिकवायला जाते, तिथे एक मुलगी आहे तिला एक कोर्स करायचा आहे, तिच्या पुद्धल्या लाईफ साठी खूप उपयोगी आहे ते.......तर तिला मदत करायला मला हा जॉब हवा होता......मी घरी मागितले असते तर मला भेटले असते पैसे, पण मल माझ्या जबाबदारी वर काही करायचे आहे.........नंदिनी

तिचे उत्तर ऐकून आता राज टाळ्या वाजवायला लागला.........Ms Nandini, very well done, your family will be proud of you....and congratulations........ त्यानें त्याचा हात शेख्यांड साठी पुढे केला.......नंदिनी ने पण हसतच त्याच्या हातात हाथ दिला......

सर, माझी एक रिक्वेस्ट आहे, मी शिकत सुद्धा आहे, माझं कॉलेज 1.30 पर्यंत असते, तर मी 2 वाजता ऑफिस ला येईल.....हवे तर तुम्ही मला half day salary द्या.....पण मी तुमचं सगळं काम करेल........नंदिनी

Mr, ठाकूर ने राज कडे बघितले......राज ने होकारार्थी मान हलवली....

Thanks a lot.....thank you sir...... मी उद्या पासूनच जॉईन करेल.........have a good day you all.......म्हणत नंदिनी बाहेर पडली....

Super talented girl......... मला बरीच प्रश्न पडली होती......विचारायची होती.....पण त्यांच्या हुशारी पुढे गौण वाटली......म्हणून नाही विचारले.....mr ठाकूर

हो पण आधी तुम्ही बरेच पर्सनल गेलात......राज

Sorry sir, आधी मला त्या थोड्या आगाऊ वाटल्या.....पण मी चूक होतो.....बराच ठहरव आहे त्यांच्या मध्ये.......आणि त्यांच्या कडे डिग्री पण नव्हती म्हणून.....

कधी कधी व्यक्ती हुशार असतो, पण कदाचित त्यांना संधी नसेल भेटत, काही वयक्तिक कारण असू शकतात, किंवा आताच्या या महागडी कॉलेज ची फी भरायला प्रॉब्लेम येत असणार......Talent and hard work are always welcome in our company......okay....... राज

Yess sir......

*******

नंदिनी उड्या मारतच घरी आली होती.....ती खूप खुश होती......गणित तर तिचा तसा आधीपासूनच आवडता विषय होता, आणि ती नेहमीच राज आणि राहुल ला काम करतांना बघत अस्यची......आणि बुक्स वाचून, इंटरनेट चा वापर करून , माहिती गोळा करून अकाउंट मधली बरीच सेल्फ स्टडी तिने केली होती.........राज जेव्हा पण काम करायचा , आणि नंदिनी जर फ्री असेल तर ती त्याचे काम बघत असायची, आणि तो जे टर्म्स वापरायचा त्याची डिटेल मध्ये अभ्यास करायची.......आणि काल पण तिने राहुल कडून स्पेशल ट्रेनिंग घेतली होती.....

काल जेव्हा तिला कळले राज च्या कंपनी मध्ये इंटरव्ह्यू आहेत, तिने राहुलचे खूप डोकं खाल्ले होते....... आणि राहुल ने पण तिला खूप मन लाऊन शिकवले होते.......

राज घरी आइस्क्रीम घेऊन आला होता.......

Wow....... आज काही स्पेशल का....????..... काकी

नंदिनी ने घरी आल्यावर कोणालाच काही सांगितले नव्हते......ती राज ची च वाट बघत होती......तिला आधी त्याच्याकडून त्याच ऐकून घ्यायचे होते......

हो........सगळ्यांना येऊ द्या , सांगतोच.......राज

सगळे हॉल मध्ये जमले.......राहुल ला तसे थोडेफार माहिती होत, पण नंदिनी सिलेक्ट झालिये त्याला माहिती नव्हते......

बोला राज ......काय काहीतरी स्पेशल आहे , ऐकले......आबा

ह्मम......आणि त्याने त्याचा मोबाईल मधून नंदिनी च्या इंटरव्ह्यू ऑन केले...........नंदिनी तर सरप्राइज झाली होती............

इंटरव्ह्यू संपला तसा सगळ्यांनी अभिमानाने टाळ्या वाजवल्या.........नंदिनी ला तर खूपच लाजल्या सारखे झाले होते.........ती पळतच जाऊन राज च्या कुशिमध्ये शिरली.......आणि त्याचा शर्ट मध्ये आपला चेहरा लपवत होती.........

Proud of you Nandini....... राज ने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता......

मला पण माझ्या नंदिनी वर खूप गर्व आहे......आबा...

अरे अरे..... याचं क्रेडिट मला जाते बरं......मीच ट्रेन केले तिला........ ऑफीस ला बुट्टी मारून.........राहुल

हो का........म्हणजे मी काहीच नाही केले.......सगळं तूच केले..........नंदिनी आणि राहुलची फाईटिंग सुरू झाली....

********

नमस्कार मित्रांनो
दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!!

दिव्यांचा सण, दिव्यांनी उजळुन जाऊ दे......आपलं आयुष्य चांगल्या विचारांनी प्रकाशमान होऊ दे

Say no for crackers...save Nature, save Life

********

कथे ला चांगला positive रिस्पॉन्स येत आहे त्या साठी धन्यवाद.......

मुलं प्रामाणिक असतात, खर प्रेम करू शकतात.........हे कथे मध्ये दाखवल्या बद्दल काही लोकांनी मेसेजेस द्वारे कळवले .....त्यांना हे खूप आवडले...

तसेच कथेतून दिलेले positive मेसेजेस मिळतात आहे अश्या कॉमेंट्स पण आहेत....त्या बद्दल धन्यवाद....कथेतून चांगले मेसेजेस जात आहे चांगल्ले वाटले.....प्रत्येक मेसेज कमेंट्स ला रिप्लाय करायला जमत नाही.....त्या बद्दल क्षमा असावी......पण मी सगळे कमेंट्स वाचत असते......

आजच्या भागात कॉर्पोरेट लाईफ बद्दल थोड सांगण्याचा प्रयत्न केला आहे......काही कारणांमुळे लोक हुशार असून सुद्धा कधी डिग्री नाही, कधी शिकायला पैसे नाही किंवा अजून काही कारण असू शकतात.....तर प्रत्येक व्यक्ती एक चान्स deserve करतो......त्यामुळे हुशारी ला महत्त्व दिल्या गेले पाहिजे ...येवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.....

पुढला भाग परवा पोस्ट होईल.....

धन्यवाद...

🎭 Series Post

View all