भाग 45
तिचा स्पर्श राज ला जाणवला.......पण ती बरेच दा यायची म्हणून तो उठला नाही.......
नंदिनी ने तिचा एक हाथ त्याच्या बाजूला ठेवला....नी ती त्याच्या जवळ खाली झुकत होती........तिचे मुलायम केस त्याचा चेहेरा सोबत खेळत होते.........आणि त्या स्पर्शाने अचानक राज चे हृदय जोराने धडधडायला लागले......तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर रोमांच उठत होते.........त्याला काहीच कळत नव्हत .....पण काहीतरी हवेहवेसे घडत होते........तिच्या या अशा स्पर्शाला तो आसुसला होता.......कधीची तो तिची वाट बघत होता.......
नंदिनी हळू हळू त्याचा ओठांजवळ जात होती......राज ला तर वाटत होत आता हृदय बाहेर उडी घेते की काय.......त्याच डोकच ब्लँक झाला.....त्याने त्याचा श्वास रोखून धरला होता............
नंदिनी आता राज च्या खूप जवळ गेली होती.......आणि आता ती किस करणार तेवाढया राजने त्याचा पालथा हाथ त्याचा ओठावर ठेवला.........आणि तिचे ओठ त्याच्या हाताच्या तळव्यावर टेकले...........राज ने रोखून धरलेला श्वास सोडला..............नंदिनी ला त्या स्पर्शाने तिला काहीतरी वेगळे फिलिंग जाणवले....जे आतापर्यंत तिने अनुभवले नव्हते..........काय होत तिला कळत नव्हते पण पहिल्यांदा राज जवळ असलेला वेगळं वाटत होते.......आणि ती ताडकन बाजूला झाली.......
ती बाजूला झाली तसा राज पण लगेच उठून बसला.......
काय करत होती......????.....राज तिच्या डोळ्यांत बघून बोलत होता......
त्याच्या प्रश्नाने नंदिनीचा गोंधळ झाला......आता काय सांगू.....रागावला तर...........नंदिनी विचार करत होती
नंदिनी......काय झालंय........मी रागावणार नाही, बोल काय झालंय.......आणि हे तू काय करत होती........परत कुठले चॅलेंज वैगरे सुरू होते काय तुमचे.......राज
नंदिनी जवळ येत होती तेव्हा त्यालाही ते हवेसे वाटत होते पण अचानक त्याला आठवले की हे प्रेम तर तिला कळत नाही , आणि मग त्याला त्यांचे फालतू चॅलेंज आठवले......आणि ती जवळ येतच होती की त्याने त्याचा हाथ मध्ये आणला होता.......
नंदिनी ला काय बोलावे काळात नव्हते.....आणि ती करायला तर आली होती.. किस......पण तिचा ओठांचा स्पर्श त्याचा हाठला झाला होता....नी तिला वेगळच फील झाले होते, वेगळंच काहीतरी वाटत होते...........असे मला तर कधीच वाटलं नव्हतं.....ती तर नेहमीच राज च्या अंगाखांद्यावर उद्या मारायची, त्याला चीपकायची..., अस नवत की त्याचा स्पर्श नवीन होता तिच्यासाठी.....पण मग आज हे वेगळं का.........ती मान खाली घालून बसली होती.........
नंदिनी.....बघ माझ्याकडे............राज हळू आणि प्रेमाने बोलला
त....ते......मी...... किस...........नंदिनी
ह्मम....... किस चॅलेंज होते काय..........राज
न.....ना.....नाही......... तस नव्हते.........नंदिनी
मग...??.... राज
ते सगळे फर्स्ट किस डिस्कस करत होते.........छान छान वेग वेगळे अनुभव सांगत होते.......पण मी तर.....मला तर काहीच माहिती नव्हते.......फ्रेंड्स म्हणाले तू unlucky आहेस......तुला काहीच माहिती नाही, तुला यातले काहीच मॅजिक माहिती नाही......म्हणून मला पण बघायचे होते......पण माझा तर कोणी बॉयफ्रेंड पण नाही.....मग मी कोणाला करून बघणार......म्हणून मी तुला.............नंदिनी लहानसा चेहरा करत बोलली
तीच बोलणं ऐकून तो त्याच्या जुन्या आठवणीत गेला होता......तिच्या बोलण्याने त्याला त्याच फर्स्ट किस आठवले होते......जेव्हा तो शिकायासाठी अमेरिका ला जा अर होता.....त्याधी त्याने किती प्रयत्न केले होते तिला किस करायला...पण ती करू देत नव्हती........आणि जायच्या वेळेस तिने स्वतःच त्याला किस केले होते.......आणि तेच त्याचे पहिले नी आतापर्यंत चे शेवटचे lip kiss होते.......किती सुंदर आठवण होती ती.......मी दूर जाणार म्हणून तिचं मन किती रडत होत तेव्हा........किती त्रास होत होता तिला......पण माझं स्वप्न आहे म्हणून तो पण त्रास हसत सहन केला तिने.......किती वाट बघत होती...... जसेकाही तिला दुसरं काहीच नको होत.....रोज एकच कधी येतो........खरंच आहे तीच जग माझ्या भोवतीच फिरायचे.......तिची सगळी स्वप्न.......पण तिच्या प्रत्येक स्वप्नात मीच तर होतो.........तीच बोलणें सुरू व्हायचे शरू वर नी संपयाचे पण शरू वर...........माझी नंदू.........आणि त्या दिवशी सकाळी रस्त्यावर कुणाचीही भीती न बाळगता तिने केलेला पहिला किस........अजूनही जसाच्या तसा जाणवतो ओठांवर............आणि ती आठवण येऊन त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मायल आले.....
इकडे नंदिनीची बडबड सुरु होती........
तिच्या बोलण्यावर नी तिचा चेहरा बघून खूप हसायला आले.....
पण मग तू तुझा हाथ का घातला मध्ये..........तू जागा होता..???......हो तू जागा होता ना .....नंदिनी
ह्मम....म्हणूनच घातला हाथ मध्ये....... फर्स्ट किस असे कसेही, कुणालाही थोडी करायचे असते.......तुझे फ्रेंड्स बरोबर बोलले ते खूप स्पेशल असते आणि मग असे कोणाला करतात काय...??....ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला करायचे असते......नुसते बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असून चालत नसते....ते प्रेम असे हवे जे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हवे......त्या व्यक्तीवर आपले नितातंत प्रेम हवे..........तुझं माझ्यावर तस प्रेम आहे काय.....???.....राज
ह्मम......... नाही......माहिती नाही.........नंदिनी
म्हणूनच मी हाथ मध्ये घातला...........मला तुझं फर्स्ट किस वाया घालवायचे नव्हते........तुम्ही आजकाल ची मुलं ना ....तुम्हाला याचं काहीच महत्त्व नाही वाटत......तुम्हाला सगळ्यांचं गोष्टींची घायी असते.....प्रेमात पडायचे..... किस करायची.......आणि नाही पटले , मनासारखे नाही झाले की लगेच ब्रेकअप करून मोकळे व्हायची.........मग दुसरा bf or gf........... आणि म्हणून मग खर प्रेम कळत नाही.......त्या गोड भावनेच्या अनुभवांना तुम्ही लोकं मुकता.......कधी कधी अट्ट्रॅक्शन ला च प्रेम समजून बसता............ राज
नंदिनी त्कयाच बोलणं ऐकत होती......तिला त्याच बोलणं ऐकतच रहावेसे वाटत होते.........
ती खूप इंटरेस्ट घेऊन ऐकत होती....
प्रेम म्हणजे शारीरिक अट्ट्रॅक्शन नसते सोन्या......... मनाच मना सोबत, श्र्वासाच श्र्वासासोबत, हृदय च हृदय सोबत जोडलेले नाते असते.......कधी एकमेकांशिवाय जगातही न येणे, कधी फक्त एकमेकांसाठी जगणे असते.....म्हणून आपलं हे किस त्या स्पेशल व्यक्ती साठी जपून ठेव ज्याच्यावर तू प्रेम करशील.......... ओके..........राज
ते ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू उमटले, ....तिला तर वाटले होते राज रागवेल......पण तो रागावला नव्हता........वरून त्याने खूप प्रेमाने समजाऊन सांगितले होते........
चल झोप आता.....बरीच रात्र झाली आहे.......तुझ्या डोळ्याखाली ब्लॅक सर्कल्स येतील आणि मग परत तू धिंगाणा घालशील...........राज ने हसतच तिच्या गालावर थोपटले......
शी बाबा तुम्ही दोघं मला सतत चिडवत ला असता......नंदिनी
बरं.......go now........ राज
ह्मम ...... गूड नाईट........... आणि परत त्याच्या कंबरेतून हाथ घालत त्याला हग केले......
गुड नाईट...... राज
*********
नंदिनी ला सकाळी उठयला उशीरच झाला होता.......राज नी पण तिला आज उठवले नव्हते......जेव्हा तो सकाळी एक्झरसाइज साठी उठवायला गेला होता तेव्हा २-३ दा आवाज देऊनही ती उठली नव्हती, खूप गाढ झोपेत होती.......म्हणून त्याने तिला झोपू दिले होते....
नंदिनी ने सकाळी उठून पटापट आवरून घेत कॉलेज ला जायची तयारी केली आणि बाग घेऊनच खाली डायनिंग टेबल वर आली , सगळेच आधी नाश्ता करायला बसले होते........
आई लवकर दे नाश्ता...........उशीर होतो आहे........नंदिनी टेबल वर बसत ओरडली
ये तू मला उठवले का नाही......नंदिनी राज च्या दंडावर मारत बोलली.....
नंदिनी.....किती जोरात........ राज ..
सॉरी सॉरी,..खरंच जोऱ्यात लागले काय...??? नंदिनी त्याचा हाथ चोळत होती...
डंबल्स मारून मारून हीचे हाथ लोखंड सारखे झाले.......एक म्हाजे एक सुद्धा नाजुकपण नाही हिच्या मध्ये....... राहुल
मी अशीच ठीक आहे.....तुझ्या त्या रिटा सारखी नाही, एक फुंक मारली की खाली पडायची......आणि तसे पण त्याने मला उठवले नाही.....म्हणून खाल्ला त्याने मार......नंदिनी
तू घोरत पडली होती........राहुल
हो....तुला बरं माहिती........नंदिनी
मग काय माझ्या रूम मध्ये आवजा येत होता.......मला तरी वाटलं कोण कुंभकर्ण आहे.....शोधत आलो तर तू दिसली......झोपमोड केली सगळी माझी........किती छान स्वप्नं बघत होतो..............राहुल
हो माहिती......बेस्ट बिझनेस मन अवॉर्ड राज ला च मिळणार.....तू स्वप्नच बघत बस.........नंदिनी
आई ssss.........दे ना लवकर........किती उशीर करतेय..........नंदिनी परत ओरडली, आणि नेमके ते आजिसहेबांना ऐकायला गेले ..
काहीतर सूनां सारखं वागत जा......सासूबाई आहे ना त्या तुमच्या........त्यांना हातात द्यायचं सोडून, त्यांना तुम्हाला हातात द्यावे लागते.........आजिसहेब
राज ला , राहुल ला देतात न.....मग.......मला दिले तर काय होत.....???......मला सूनबिन बनण्यात काही इंटरेस्ट नाही.......नंदिनी
झालं याचं सुरू....राहुल, राज , आबा एकमेकांकडे बघत होते...
किती हाऊस असते , सून आली की आराम मिळेल, पण इथे सगळंच वेगळं आहे, एक गुण नाही सूनेसारखा......आजिसहेब
हो.... तर....आई ला मदत लागली तर मी करेलच ना.....आता तिचे हातपाय नीट आहे.......जेव्हा तिला नाही जमणार तेव्हां मी करेल....आणि तसे पण ती मला जे काम सांगते ते मी करतेच की..........आणि सूने च म्हणाल तर तुम्हाला माहिती काय सून कशी वागते ते..............सासू ला वृद्धाश्रमात पाठवतात, घरातून बाहेर काढतात ......तुमच्याच तर मैत्रिणी सांगत होत्या.,....जर मी सूनेसारखी वागायला लागली तर मग बघा भारी पडेल हा तुम्हाला.....म्हणजे आई च तर जाऊच द्या, तुम्ही तर आजी सासू आहात...सासुच घरात नाही आवडत, तर आजी सासू चे काय करायचे........आता तुम्हीच ठरवा मी सूने सारखी वागू की मुलीसारखी.........नंदिनी एकदम गूढ आवाजात आजिसहेबांना घाबरावल्या सारखी बोलत होती.....
फारच आगाऊ झाल्या या.....तुम्ही नी सूनबाई तुमचं बघून घ्या काय करायचं ते....... आजीसहेब तिथून निसटल्या.........कारण त्यांना माहिती होते नंदिनी सुनेचे पूर्ण characteristics सांगेल.........
दे टाळी......आबा नंदिनी ला टाळी साठी हाथ देत बोलले....तशी नंदिनी ने पण हसतच त्यांना टाळी दिली....
आजिसहेवांना तिथून गेलेले बघून आबा सोबत बाकीचे ही हसायालयाला लागले......
काय ग नंदिनी ....किती त्रास देते त्यांना......आई तिच्या समोर नाश्ता ची प्लेट ठेवत बोलली......
त्यांच्यासोबत वाद घातला ना की माझ्या अंगात अशी शक्ती येते......बाहेर सगळ्यांना निपटाऊ शकतो, आत्मविश्र्वास वाढतो......तू नको ग काळजी करुस आमचं आम्ही बघून घेऊ........
राहुल हे बघ काही मुलींची फोटो आणि माहिती आहे...तुला कोण आवडते तसे सांग, आपण गुरुजींना कळऊ....म्हणत काकी ने काही मुलींचे फोटो आणि बायोडेटा राहुल ला आणून दिले.....
अग इतकी काय घाई आहे...... राहुल ने डोक्यावर हात मारला
वेळ जातो रे बघता बघता.......आई
अरे मी इतका हँडसम.... चांगला कमावणारा....मला कोण नाही म्हणेल.......राहुल
ये तू ओव्हर कॉन्फिडन्स नको होऊ.....तसेही तू काही राज नाहीये तुला कुठलीही मुलगी हो म्हणायला..........काकी तुम्हाला सांगते त्या दिवशी हे दोघं हॉटेल मध्ये दिसले होते..........आणि हा राहुल त्यांना बच्चा वाटत होता......नंदिनी राहुल ची मस्करी करत बोलत होती...
Very funny...... राहुल चिडका चेहरा करत बोलला
बच्चा च आहे तो माझा.......काकी ने त्यावर दुजोरा दिला...
ते ऐकून नंदिनी पोट धरून हसत होती....
बीचाऱ्याची काही इज्जतच राहत नाही, आणि राज सोबत असला की याला तर एकही जण बघत नाही ....राज तर त्यांना इतका ड्याशींग अँड चारमिंग वाटतो की एकीला तर त्याला की.........बोलता बोलता ती चूप बसली..
क....काय.....काय बोलत होती तू......किस असे काही...??? ....राहुल
किस....कुठे...काही ही हा तुझं.........नंदिनी
अन् तू त्यांना बघत बसते..???.......राहुल
हा तर........मग माझी कॉलर टाईट होते, आपला राज इतका ऑसम आहे ते ऐकून...... तस तर मला माहितीच आहे ...पण अस ऐकताना खूपच भारी वाटते........नंदिनी
तुला जेलस फील नाही होत........???......राहुल एक कटाक्ष राज वर टाकत बोलला
ते का बर.....की का जेलस होईल.....???....नंदिनी
अग तू त्याची बा..........राहुल काही बोलणार तेव्हढ्यात राज ने त्याला नको म्हणून खुणावले......
महान आहेस देवी , माते sss...... पाय दाखव तुझे........राहुल तिला नमस्कार करण्यासारखी अक्टिंग करत बोलला..
अरे कुठला विषय कुठे नेताय तुम्ही......आणि तुला ग आता उशीर नाही होत आहे काय.....???
तू बघ रे फोटो , ज्या ज्या आवडल्या त्या वेगळ्या कर......पण भेटणार आधी मी त्यांना.......मग मी ज्या शोर्टलिस्ट करेल त्या तुम्ही बघ्याच्या......... that's final, no argument......... नंदिनी
ये तुला काय कळते त्यातले.........राहुल
माझं रिसर्च सुरू आहे लग्न विषयावर वर........... नंदिनी
अन् तुझे inputs कोण आहेत.........राहुल
साभार Google माता.........आणि गरजच पडली तर माझे great great philosopher Mr Shriraj Deshmukh........ I tell you he is having al the answers........ नंदिनी
Bye ssss........ नंदिनी ओरडतच बाहेर जात होती, परत काहीतरी आठऊन ती परत राज जवळ आली.......
मला जेलस व्हायला पाहिजे का.....??? ती राज कडे बघत होती....
राज तिच्या डोळ्यांमध्ये बघत होता.......खूप प्रेमाने..........पण त्याला उत्तर काय द्यावे ते कळत नव्हते.....
हो..........राहुल
पण का.......??.......नंदिनी राज चा डोळ्यात बघत होती.....आज काहीतरी वेगळं का जाणवत आहे.........राज बघण्यात काहीतरी वेगळेपणा आहे.......काहीतरी आहे मला का कळत नाहीये........ काल रात्री पण वेगळच वाटत होते.........आता पण........नंदिनी विचार करत होती...
जास्ती विचार नको करू, उशीर होईल.....तसेही तुला मारामारी च शोभते, जा तू तीच कर..........राहुल
नाही तुझ्या बायको ला बिघडवले ना , नाही तुला तिनी त्रास दिला न, तर बघाच.........बाय.........नंदिनी ने परत एकदा राज कडे बघितले.........तो अजूनही तिलाच बघत उभा होता........तसेच प्रेमाने.......
*******
आज रविवार होता.....नंदिनी आश्रम मध्ये आली होती.....ती दर रविवारी आश्रम मध्ये मुलींना डान्स शिकवायला यायची.....तिला तिथे लहान मुलांमध्ये खेळायला, वेळ घालवायला खूप आवडायचे.......आज राज सुद्धा आला होता तिच्या सोबत..........त्याला आश्रमाच काही बांधकाम करून घायचे होते.....तेच चेक करायला तो आला होता.....तो ऑफिस मध्ये डिस्कस करत बसला होता.......
नंदिनी ने सगळ्या मुलींना एक झाडाजवळ जमा केले.....बहुदा ती आतमध्ये डान्स शिकवायची, पण आज वातावरण खूप छान होत....हवेत गारवा....हवा वाहत होती....त्यामुळे झाडांची सळ सळ, पक्षांची चिव चिव....निसर्गाचं सुंदर मुसिक सुरू होत......खूप मोहक ,प्रसन्न वातावरण होते......म्हणून आज तिने बाहेरच क्लास घ्यायचा विचार केला होता.......नी त्यांना नीट एका लाईन मध्ये उभ करून ती समोर उभी राहिली...नी पोझ घेतला....साँग प्ले केले...... बाकी मुली तिला कॉपी करत होत्या.....
दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे
दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे
जिन्दरी बेहाल है, सुर है न ताल है
आजा साँवरिया, आ, आ, आ
ताल से ताल मिला, हो ताल से ताल मिला
राज चा फोन आला म्हणून तो बोलायला म्हणून बाहेर आला......बोलता बोलता त्याच लक्ष नंदिनी वार गेले........आणि तिला बघून त्याला त्याच हर्ट बिट स्कीप झाल्यासारखे वाटले........ती दिसतच तशी होती....त्यात ती भान हरपून नाचत होती.....तिने लाईट पिवळा रंगाचा शिफॉन च कुर्ता, सारखाच रंगाचं पटियाला.....त्यावर शिफॉन ची ओढणी बांधली होती......केसांची तीन पेडी वेणी....हवेमुळे तिचे थोडे केस बाहेर आले होते नि तिच्या गलांसोबत्त खेळत होते.....कपाळावर छोटीशी डार्क ब्ल्यू गोल टिकली...........त्यात तिच्या नाचायचं वेगवेगळ्या पोझ.......राज चे हृदय तर पुरतेच घायाळ झाले होते.......त्याला तर फोन वरचा आवाज सुद्धा येत नव्हता , राज काही बोलत नाही आहे म्हणून पलीकडून आपोआप फोन कट झाला होता.........राज भान हरपून नंदिनी ला बघण्यात मग्न झाला होता..........तो तिला बघत बघत थोडा पुढे येऊन उभा राहिला.......तो पण काही कमी दिसत नव्हता , त्याने हाप स्लिवस लाईट ब्ल्यू टीशर्ट , नी ब्लॅक जीन्स घातलेली होती....एकदम क्याजुल ड्रेस अप ..........
तिला तसे मुलांसोबत डान्स करतांना बघून त्याला तिचा अठरावा वाढदिवस आठवला.......त्या दिवशी पण ती अशीच खूप खुश होती.......ते आठऊन त्याचा ओठांवर गोड हसू उमटले.......

सावन ने आज तो मुझ को भिगो दिया
हाय मेरी लाज ने, मुझ को डुबो दिया
सावन ने आज तो मुझ को भिगो दिया
हाय मेरी लाज ने, मुझ को डुबो दिया
ऐसी लगी चढ़ी सोचूँ मैं ये खड़ी
कुछ मैं ने खो दिया, क्या मैं ने खो दिया
चुप क्यों है बोल तू, संग मेरे डोल तू
मेरी चाल से चाल मिला, ताल से ताल मिला
ओ, ताल से ताल मिला ...
नंदिनी गिरकी घेत होती.........तेवढयात अचानक पाऊस सुरू झाला........पाऊस सुरू झाला म्हणून बाकी मुली आतमध्ये पळल्या......नंदिनी मात्र नाचाण्यात खूप मग्न झाली होती........गिरकी घेता घेता तिचा बॅलन्स गेला नि समोर राज च्या अंगावर जाऊन आदळली.........ती पडणारच होती की राज ने तिला तिच्या कंबर मध्ये हाताने पकडून घेतले होते........पडायच्या भीतीने तिने डोळे बंद केले होते.......तीच डोकं राजच्या छातीवर होते......तिला राज च्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती......त्याचे हार्ट बिट्स काहीतरी बोलत आहे असे तिला वाटत होते.........आणि ती ते ऐकण्यात मग्न झाली होती........
नंदिनी च असे अचानक जवळ आलेलं बघून त्याचे हार्ट बिट्स खूप वाढले होते.....त्यात वरून पाऊस पडत होता.....त्यात हे इतके सुंदर गाणे वाजत होते.......
गाण्याच्या आवाजाने नंदिनी ने वरती बघितले तर राज तिच्या कडे बघत होता........ती पण त्याच्या डोळ्यात बघता बघता हरवली होती........ती त्याचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होती.....गाण्यातल्या ओळी जणू त्याच्या मनातले च बोलत होते......
माना अंजान है तू मेरे वास्ते
माना अंजान हूँ मैं तेरे वास्ते
माना अंजान है तू मेरे वास्ते
माना अंजान हूँ मैं तेरे वास्ते
मैं तुझ को जान लूँ, तू मुझ को जान ले
आ दिल के पास आ, इस दिल के रास्ते
जो तेरा हाल है, वो मेरा हाल है
इस हाल से हाल मिला, ओ ताल से ताल मिला
ओ, ताल से ताल मिला
दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे
जिन्दरी बेहाल है, सुर है न ताल है
आजा साँवरिया, आ, आ, आ
ताल से ताल मिला, हो ताल से ताल मिला
पावसामुळे दोघंही पूर्णच भिजले होते.......नंदिनी च्या केसांची काही बटे तिच्या गालांवर चीपकली होती......तीच ते भिजलेलं रूप, ती इतकी जवळ, तिच्या गलांवरची केस तिच्या मागे नेण्याचा मोह त्याला आवरला नाही.....आणि तो त्याचा हाथ वरती नेत होता.....
ताई sssss दादा ssssss.............जोराचा पाऊस येतो आहे, आतमध्ये या.........तिथली एक मुलगी त्यांना आवाज देत होती......
त्या मुलीच्या आवाजाने राज भानावर आला......
आपण हे काय करत होतो....विचार मनात येताच त्याने आपला हाथ खाली केला..... नी नंदिनी चा हाथ पकडला नी तिला आतमध्ये घेऊन गेला.......
नंदिनी जा केस पुसून ये....लगेच निघू आपण......ओल्या कपड्यांमध्ये जास्ती वेळ नाही राहू शकत.......राज
हो आलेच......म्हणत ती मुलींच्या रूम मध्ये गेली, एकीने तिला टॉवेल दिला.......एकीने तिची वेणी उकलली......
ये स्मिता बाहेर तो राज उभा आहे ना त्याला पण नेऊन दे एक टॉवेल......नंदिनी
हो ताई.....म्हणत तिने एक टॉवेल घेतला नी बाहेर गेली...
नंदिनी डोकं पुसत होती.....पुसता पुसता तीच लक्ष खिडकी मधून बाहेर बघणाऱ्या एक 15-16 वर्षाचा मुली कडे गेले....तिला ती उदास वाटत होती....
काय ग वर्षा काय झालं......अशी उदास का आहेस....??....नंदिनी तिच्या जवळ जात बोलली
काही नाही ग ताई.....असेच....वर्षा
वर्षा मी ताई आहे ना तुमची....मला नाही सांगणार तू........नंदिनी
ताई मला एक कॉम्प्युटर कोर्स करायचा होता, पण त्याची फीस खूप आहे ग.......बघ आता माझं दहावी होत, आणि तो कोर्स केला ना की मला छोटी शी एखादी नोकरी लागेल..... मग मी माझ्या इथल्या लहण्या मैत्रिणींना पण मदत करू शकेल.......वर्षा
अरे वाह, खूप छान प्लॅन आहे.......नंदिनी
पण ताई फीस खूप आहे त्याची.....इतके पैसे कुठून आणू.....वर्ष
किती आहे.......???...नंदिनी
40000........... वर्षा
ह्मम....... बरं , मला त्या कोर्स चे डिटेल्स आणि अड्रेस दे.....बघते मी काय जमतंय काय..........नंदिनी
खरंच.....तू मदत करशील.........???.... वर्षा आनंदाने तिच्याकडे बघत होती...
हो......नंदिनी
Thank you Tai....... मला नोकरी लागली ना की मी तुझे पैसे परत करेल.......वर्षा तिला कॉम्प्युटर कोर्स च कार्ड देत बोलली
बरं चालेल........आता रुसायच नाही, अभ्यास करायचा... ओके........नंदिनी
हो........
नंदिनी sss....... राज ने आवाज दिला......
हो......नंदिनी केस हातपाय पुसून बाहेर आली..
चल घरी जाऊया....पाऊस थांबायचा दिसत नाही......राज
हो......
सिक्युरिटी काका नी दोघांना छत्री मध्ये त्यांचा कार पर्यंत पोहचवले......दोघंही आतमध्ये बसले..... राज ने गाडी स्टार्ट केली नि घराच्या दिशेने घेतली............अधूनमधून तो नंदिनी ला बघत होता.......नंदिनी ला भिजला मुळे थंडी वाजत असावी, ती थोडी थर थर करत होती.....राज ने कार मधला हिटर सुरू केले.....आता थोडी गरम हवा येत होती......थकल्यामुळे नी त्यात गरम हवे मुळे तिला झोप लागली.......तिची मान वारंवार खाली येत होती.......राज ने त्याचा एक हाथ तिच्या मानेखली धरला........नी एक हाथ स्टिअरिंग वर होता.........
त्याचा गरम हाथाचा स्पर्श तिला सुखावून गेला होता बहुतेक, झोपेतच तिच्या ओठांवर स्मायल आलं होत.....तिने त्याचा साईड ला कड बदलली आणि त्याचा हाथ पकडून निर्धास्त झोपली......तिला तसे करतांना बघून राज च्या ही चेहऱ्यावर समाधानच स्म्याला आले होते......
येव्हणा ते घरी पोहचले होते....... ती छान गाढ झोपेत होती....आता पाऊस पण थांबलेला होता.....राज ने तीच डोकं नीट टेकाऊनी ठेवले नी कार मधून खाली उतरला आणि त्याने नंदिनी ला आपल्या हातावर आपल्या कुशी उचलले नी आतमध्ये आला.....
का रे....काय झालं हिला......आई काळजी ने त्याच्या जवळ येत विचारपूस करत होती
अग काही नाही, झोपली आहे, खूप मस्ती केली, आता थकली........गाष्ट झोपेत होती उठवायची इच्छा नाही झाली ......म्हणत तो तिला घेऊन वरती पायऱ्या चढला नी तिच्या रूम मध्ये आला......तिला बेड वर झोपवले.......तिचे कपडे ओले होते........त्याने लगेच कपडे लढायचे म्हणून तिच्या कुर्त्याच्या बटन काढायला हाथ लावला........पण थोडा विचार करून लगेच मागे घेतला ...नी बाहेर आला....
छाया ताई........त्याने वरूनच आवाज दिला....
हो दादा......... छाया
नंदिनीचे कपडे ओले आहेत, ते चेंज करा.....नी थोडे गरम कपडे घालून द्या........राज
हो दादा......छाया आतमध्ये गेली..
राज पण आपल्या रूम मध्ये जाऊन त्याने शॉवर घेतले की फ्रेश झाला......डोकं पुसता पुसता त्याला आश्रम मधले नंदिनी जवळ असल्याचे क्षण आठवत होते.....,..आज ती पण हरवली होती.....ती काहीतरी विचार करत होती......पहिल्यांदा आज ती त्याला वेगळी भासली होती......आपण भावनेच्या आहारी काही चुकीचं केले नाही...याचेच त्याला समाधान होते.......नाहीतर नंदिनी ने कसे रिॲक्ट केले असते....हाच विचार त्याचा डोक्यात सुरू होता.....
******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा