Jan 27, 2022
Love

नंदिनी...श्वास माझा 44

Read Later
नंदिनी...श्वास माझा 44

भाग 44

कॉलेज झाल्यावर ठरल्या प्रमाणे नंदिनी आणि तीच मित्र मंडळ हॉटेल मध्ये गेले........त्यांचं नेहमीच आवडते हॉटेल....तिथे ओपन गार्डन अरिया होता तिथेच ते लोक जास्तकरून बसायचे नी गप्पा, मस्ती करायचे........पण आज जरा बाहेर पावसाळी वातावरण वाटत होते म्हणून अजा ते सगळे आतमध्ये एक कॉर्नर पकडून बसले होते......मस्ती, एकमेकांना चिडवत होते......वेटर ऑर्डर घ्यायला आला तर नेहमी प्रमाणे त्याला भांबावून सोडले होते........एकदा एक सांगायचं मग ते कॅन्सल करायचे , मग परत तेच, प्रत्येकजण वेगवेगळं मगवयाचा......बिचाऱ्या वेटर ला त्रासून सोडायचे......., वेटर ऑर्डर घेऊन गेला.....

ये बर आपण गेम खेळूया........

Dare to do.......... आर्याविर

नो यार........काहीही सांगता तुम्ही.....रेवती

घाबरली येवाध्याताच.......सुहास

नंदिनी जवळून शिका काही.......she always ready for anything........... अर्यविर

Okay so game is......everyone will tell about their first kiss........ पूजा

व्हॉट.......???........नंदिनी

हो....आपल्या पहिल्या लीप किस बद्दल सांगायचं......आपण आता इतके लहान ही नाही आहोत की कोणी लीप किस केले नसेल........we are well matured now.......so it's okay wwbcan share with फ्रेंड्स.......रेहान

मी नाही केलेय ऑर कोणी मला नाही केले आहे लीप किस......नंदिनी खिन्न आवाजात म्हणाली

काय.....??... तू अजून लीप किस नाही केले........OMG........ रेवती

नाही........नंदिनी

अरे यार तु तर काहीच नाही केले आहे मग.......कसलं भारी असते फर्स्ट किस.......तुला तर काहीच नाही माहिती.......कसले थ्रिल असते.........पूजा

जाऊ द्या, हिच्या साठी दुसरा टास्क ठेऊया.......सुहास

आणि मग सर्व आपल्या फर्स्ट किस चे किस्से सांगत होते.......काही गंमत, काही कोणी बघू नये म्हणून केलेली खटपट....असे काहीस त्यांचे सुरू होते......नंदिनी त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होती.......आपण इतकं मोठ असून आपल्याला हे काहीच कसे कळत नाही.....असे काही काही विचार ती करत बसली होती...

ये तुम्हाला माहिती तिकडे प्रायव्हेट अरिया मध्ये ऑफिस मीटिंग सुरू आहे आणि तिथे कोण बसलाय.... ते माहिती तुम्हाला...... रेवा जी वाशरूम मधून येत उगाच हॉटेल ला चक्कर मारत येत होती ती सगळ्याजवल येत खूप एक्सितेड होत सांगत होती.....

कोण.......सुहास पण एक्साईतेड होत विचारत होता....

The most handsom youngest buisness icon Shriraj Deshmukh.......... रेवा

काय..........???....खरंच........???..अर्यविर

रेवा चे ऐकून तर नंदिनी ला पाणी पिता पिता ठसकाच लागला.......

Are you okay Nandini....... अर्यविर

आ..... हो......ठीक आहे.........नंदिनी

ये कसला हँडसम आहे यार तो....म्हणजे मी नेहमी मॅगझिन  मध्ये बघत आले त्यांना.....पण आज पहिल्यांदा अस बघतेय.....फोटो पेक्षा ही ते रिअल मध्ये कसले भारी दिसतात.........OMG????????...... रेवा

ये खरंच......तुम्हाला माहिती ते ना खूपच टलेंतेड आहेत........मी त्यांचे इंटरव्ह्यू बघितले आहे........प्रत्येक मुलाला त्यांच्यासारखं बनायला आवडते......खूप लोकांचे आयडील आहे ते.......सुहास

येस.....आणि डाऊन टू Earth......कसलाच घमेंड नाही.......रेहान

हो ना आणि काय सुपर बोलतात....अस वाटते त्यांचं बोलणं ऐकतच राहावं........आणि कुठलाही विषय इतक्या सध्या नी सोप्या शब्दात समजाऊन सांगतात की ते लगेच पटते.........अर्यविर

हो खरंच.....आता मला दिसले ना काहीतरी प्रेझेंटेशन देत होते....... त्यांची बॉडी लँग्वेज......त्यांचा कॉन्फिडन्स.....वरून इतके हँडसम........wow..... रेवा

सगळ्याच मुली कशा काय राज च्या फॅन होतात......जो पण बघतो , बघतच राहतो त्याला...... ह्मम स्पेशल च आहे तो...........नंदिनी सगळ्यांचं ऐकून मनात विचार करत होती....

नंदिनी ला हे सगळं ऐकातांना खूप गम्मत वाटत होती....तिला तर हे सगळेच माहिती होते......पण आपला ग्रुप पण राज चा ऐवधा मोठा फॅन आहे तिला ऐकून फारच भारी वाटत होते....त्याहून ही जास्ती की सगळ्यांना त्याच्या सारखे बनायचे हे ऐकून नंदिनी त्याचा गर्व वाटत होता...

त्यांच्या ऑर्डर आल्या......सगळ्यांनी गप्पा मारत खाण्यावर ताव मारला...... खातांना पण त्यांच्या राज संबधीच गप्पा सुरू होत्या.......

ये नंदिनी तुझं पण सरनेम देशमुख आहे ना ग........सुहास

हो..........तुझ्या घरचे ओळखत असतील ना त्यांना.......रेवा

असेल............. नो आयडिया..........नंदिनी ने उडवा उडवीची उत्तरं दिले.....

खाणं आटोपले होते, आता सगळ्यांनी आप्पल्या आवडीने आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, कॉफी असे काही काही मागवले होते...

इकडे राज ची पण मीटिंग संपली होती........बाकी सगळे गेले होते, राज च थोड काम राहिले होते, तो लॅपटॉप मध्ये आपलं काम आटोपत बसला होता........

ये आपण सगळ्यांनी आपले फर्स्ट किस सांगितले.....पण या नंदिनी ने काहीच माझी सांगितले......तर तिला पनिष्मेंट तर बनतेय..........रेवती

मी घाबरते काय.....anything........ नंदिनी

तेवढयत राज नी त्याच्या सोबत राहुल बाहेर येताना दिसला.........आणि सगळ्यांची नजर त्याच्यावर वळली....

He so charming yar...... feels like to kiss him......look at his lips...... it's so hot......... पूजा

ये पूजा बस कर.......किती लाईन मारशील........अर्यविर

हा.... हा.......नंदिनी साठी पानिशमेंट आठवली..........रेहान

काय......? सगळे

नंदिनी तू Mr Deshmukh सोबत 10मिन तरी बोलून दाखवायचं..........आणि त्यांना आम्हा सगळ्यांना हॅलो म्हणायला लावायच........रेहान

Yeah...... येस , काय भारी आयडिया रे........ रेवा

Ohh..... ऐवढे सोपी........मला वाटलं काहीतरी कठीण सांगाल..............नंदिनी....बाकीच्यांना काय माहिती नंदिनी साठी हा बाये हाथ का खेल था......

तिच्या चेहऱ्यावर चा कॉन्फिडन्स बघून बाकीच्यांना हरल्या सारखं वाटतं होते.....म्हणून मग त्याला थोड ट्रिकी बनवायचा प्लॅन केला त्यांनी

ओके, गाईस.....नंदिनी रेहान ने जे सांगितले ते तर करायचेच पण त्या आधी त्यांना बघून विसल मारायची.........पूजा

काय...,???? No way...........पहिलेच नंदिनी च नी राज चे ठरलेले होते ....की बाहेर एकमेकांना ओळख दाखवायची नाही.......खर तर हे नंदिनीचे च होते ठरलेले......तिला राज नाव वापरून काही करायचे नवते.....त्यामुळे आता जर तिने विसल केले पब्लिक अरिया वरून अपरिचित व्यक्ती... ऍटलिस्ट....... बाहेर तरी तसेच होते.....तर राज तिच्यावर नक्कीच चिडेल तिला माहिती होते.........आणि ती भयंकर विचारात पडली.....

मी काय म्हणते......हे नको.....तुम्ही म्हणाल तर त्यांच्या सोबतच्या पण व्यक्ती ला पटावते.......तो पण बघा....सुपर हँडसम आहे..........त्याला पण घेऊन येते तुमच्या सोबत गप्पा करायला.........वाटेल तर त्यांना आपल्या सोबत अर्धा तास बसवते...........पण ते विसल च नको.....नंदिनी

तो......दुसरा.....आहे हँडसम, पण बघ ना चेहऱ्यावरून तरी तो बच्चा च वाटतो..........रेवती

नाही तुला जे सांगतोय ते जमत असेल तर सांग नाहीतर हार मान.........सुहास

येस.........सगळे

राज आणि राहुल बोलत बोलत जात होते.......तेवढयात त्यांना जोरदार विसल चा आवाज आला........

नंदिनी..??.....राज ने आवाज ओळखला होता , घरी पण जेव्हा मस्ती चालायची तेव्हा ती अशीच विसल शिटी मारायची......चालता चालत विसल च्या आवाजाने तिथेच थांबले.........आणि त्यांनी मागे वळून बघितले.....तर नंदिनी दोन्ही हाताचे एक एक बोट आपल्या तोंड मध्ये पकडून पपी फेस करून उभी होती....

भाई ssss.......ही तुझ्यावर लाईन मारते आहे........फुल टपोरीगिरी करते ही तर........ राहुल मोठे डोळे करत नंदिनी कडे बघत होता......

राज ने एकदा राहुल कडे बघितले नी नंदिनी कडे बघत होता......

अरे यार काहीच कळत नाही आहे त्याच्याकडे बघून हा चिडला  आहे की रागावला आहे की रागवला नाही आहे.... नंदिनी तू तर गेली आता.... आता  परत राज ची हिटलर गिरी सुरू होणार , परत तुझ्या बाईक ची key  जाणार दिसतेय..........प्रत्येक प्रश्न सकट नंदिनीच्या चेहऱ्यावर भाव बदलत होते........ती आळीपाळीने कधी राज कडे तर कधी राहुल कडे बघत होती

राजनी एक थोडा रागीट कटाक्ष नंदिनी वर टाकला , बकीच्यांकडे थोड नॉर्मल बघून  मान वळाऊन पुढे जायला निघाला.....राहुल पण त्याच्या मागे जायला वळला....

नंदिनी तुझ half काम झाले आहे, आता त्यांना हॅलो म्हणायला मनावयचे..............रेहान मागून बारीक आवाजात बोलला....

राज चा राग बघून नंदिनीच्या मनात धडकी भरली होती..... आता काय सांगाव म्हणून तिच्या डोक्यातही खूप चलबिचल सुरू होती ....... त्याच्याशी जाऊन बोलावे म्हणून ती पळतच त्यांच्या मागे गेली.... त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली.......

सॉरी........   एक हाताने कान पकडून बिचार असं पपी फेस करत ती राजकडे बघत होती....

राज दोन्ही हात खिशात खाल्ले तिच्याकडे एकटक बघत होता........
राज काही बोलत नाही आहे बघून तिने राहुल कडे बघितलं आणि प्लीज त्याला समजले म्हणून डोळ्यांनीच रिक्वेस्ट करत होती......

प्रकरण खूप गरम आहे,  घरी जाऊन बोलू ....राहुल बोलला

राहुल उशीर होतोय......म्हणत राज पुढे जायला निघाला

राज .....प्लीज ....सॉरी ना... प्लीज ........ नंदिनी तशीच उलटी होऊन तो पुढे जात होता त्याच्या समोर समोर पळत होती आणि बोलत होती........ पण राज तिच्याकडे बघतही नव्हता आणि पुढे पुढे जात होता...

दुरून नंदिनी चे फ्रेंड हे सगळं बघत होते,  पण त्यांना ऐकू मात्र काहीच जात नव्हतं.......

राज माझे एक काम होतं.....तिचे बोलन ऐकून तो तिथेच थांबला.....नी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरे ने बघत होता

त......ते.......माझे फ्रेंड्स.......आम्ही ते......dare to do खेळत होतो...........नंदिनी

मग.........???......राज एक भुवई वरती करत बोलला...

ते तुम्हाला बघून विसल करणे पण त्यातलाच एक काम होतं.......... आणि आता प्लीज तू त्यांना सगळ्यांना हॅलो म्हण ना तेवढे एक काम राहिले आहे........नंदिनी

नाही म्हणालो तर......???......राज

मग मी हरेल..........नंदिनी

Okay........... राज पुढे जायला निघाला

अरे असं काय करतोयस,  ते सगळे तुझे फॅन आहेत , ते सगळेच तुला फॉलो करतात , त्यांना तुझ्यासारखं बनायचं,  त्यांना खूप अभिमान वाटतो तुझा ... प्लीज चल ना एकदा.........नंदिनी

हे असे फालतू चॅलेंज दिल्याने मोठे होणार आहात का तुम्ही लोक..............???...... आता तर मी बिलकुल नाही येणार........... या चुकीच्या गोष्टी आहे आणि चुकीच्या गोष्टींना मी सपोर्ट करणार नाही............ राज

तुला मी हरले तरी चालेल का मग.......नंदिनी

हो.......... चुकीच्या गोष्टींमध्ये हरलं तरी चालेल........मुळात चुकीच्या गोष्टींमध्ये जिंकलेलं सुद्धा मला आवडणार नाही.........राज

राज............... मी सॉरी बोलते ना प्लीज एकदा चल ना..........नंदिनी

I said no.......now no more discussion........ राज

नंदिनी मी येऊ का...... मी पण तर याचाच लहान भाऊ आहे      मी पण कंपनी सांभाळतच की....... राहुल एक्साईटेड होत बोलला...

नाही.... त्यांना तू बेबी वाटतो...... त्यांना राज सोबतच बोलायचं......नंदिनी..

हा...... इतका मोठा इन्सलट माझा...... आता तर बोलायला येतील तरी नाही बोलणार....... चल रे भाई जाऊ आपण इथून......राहुल

तू खूप भाव खातो आहेस ........नंदिनी

नंदिनी भाव खाना असं काहीही नाही आहे,  जे चूक आहे त्याला प्रोत्साहन देत नाही आहे एवढंच......राज

हे असे चॅलेंज देणे... डेअर गेम्स....... आता तुम्ही हे साधी खेळतात पुढे जाऊन  तुम्हाला मजा येत नाही आहे, थ्रील  नाही म्हणून...... मग काहीतरी अजून कठीण कठीण जीवावर बेतणारे अशी चॅलेंजेस तुम्ही तरुण पिढी देत असता....... तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होतात ते कळत नाही,  फक्त आपल्याला हरायचे नाही आहे,  मित्रांना करून दाखवायचे आहे म्हणून तुम्ही अशी काहीही चॅलेंजेस एक्सेप्ट करतात.......त्यामुळे कोणी फिजीकली हर्ट होतो तर कोणी मेंटली होतो , कधी कधी तर  लोकांचा जीव जाताना सुद्धा मी बघितलेला आहे............

आणि मला सांग तुमच्या या अशा चॅलेंजेस मुळे तुमची कुठली परसनालिटी डेव्हलप  होते,  त्याचा पुढे जाऊन तुम्हाला फायदा होतो आहे....... आता हे तुमचं विसल चे प्रकरण........ इथे किती लोक आहेत...... कोण कशा विचारांचे स्वभावांचे आहेत , तुम्हाला माहिती आहेत का.????......आताचा काळ बाहेर किती खराब आहे,  स्पेशली मुलींसाठी,  मुलींसाठीच काय मुलांसाठी सुद्धा........असा पब्लिक एरियामध्ये तुम्ही विसल मारत आहात अशा अनोळखी माणसांवर,  बाहेरच्या लोकांना बघणार्यांना त्याचं काय सिग्नल जाते ....... अरे वा मुलं फारच फॉरवर्ड विचारांची दिसत आहे..... यांच्या सोबत काहीही केलेला चालते........ किंवा अजून असेच बरेच काही तरी आणि मग इतर लोक तुमच्या याच गोष्टींचा फायदा नाही घेऊ शकत काय .........

नांदणी त्याचे बोलणे ऐकत होते........

गेम्स खेळायचे असतात , मस्ती करायची असते , पण आपण काय करतो आहोत , कुठे करत आहोत , याचं भान ठेवून ....तुमचं वयच आहे की तुम्हाला मस्ती करण,  मजा करणार आवडते आणि हे वय सुद्धा आहे या वयात केलं सुद्धा पाहिजे आणि त्यासाठी नाही म्हणत नाही आहो,  पण जागा काय आहे तुम्ही कुठे आहे किंवा तुम्ही काय करत आहे जर एखादी चांगले चॅलेंजेस त्याच्यामुळे तुमचं डेव्हलपमेंट होते काही होते अशी द्या,  ही असली फालतु टपोरीगिरी करण.......... I realy don't like these all...... मला या गोष्टींचे समर्थन करायचं नाही आहे म्हणून मी येत नाही आहो........ चुकीच्या गोष्टींना मी कधीच सपोर्ट करणार नाही,  येवढेच लक्षात ठेव........

त्याचं बोलणं ऐकून नंदिनी खाली मान घालून चुपचाप उभी होती......... तिच्या चेहऱ्यावरून राजला कळत होतं की तिला गोष्ट पटलेली आहे........ पण तिचा चेहरा थोडा उतरलेला वाटत होता

नंदिनी सोबत मी तर कुठेही जाऊ शकतो,  अगदी स्वर्गात म्हणशील तरी सोबत सोबत जाऊया.......... ह्मम राज तिच्याकडे बघत , चेहरा थोडा खाली करत हसत बोलला......त्याला तिचा मूड स्पॉइल करायचा नव्हता.....

त्याच ते बोलण एकूण नंदिनी चेहऱ्यावर स्माईल आलं......... आणि हसतच तिने होकारार्थी मान हलवली.....

झालं तुमच्या दोघांचं बोलून,  फालतू फालतू नंदिनी मला तुझ्यामुळे याचे प्रवचन ऐकावं लागलं....... मला तर ही भिती वाटत होती की तुझ्यावरून बोलता-बोलता कधी हा माझ्यावर सरकेल ......राहुल

राजने एक भुवई वरती करत त्याच्याकडे बघितले...

राहुलच्या बोलण्यावर नंदिनी खुदकन हसली......

पण नंदिनी राज खरच बरोबर बोलतो आहे...... मी सुद्धा तुमच्या वयात असताना खूप चुका केले आहे...... लकीली मी त्या सगळ्या चुकांमधून बाहेर निघालो , नाहीतर आज माझ्या लाईफ काही वेगळं असतं....... इतिहास सुंदर छान सक्सेसफुल लाइफ मी जगतोय ते राज मुळेच....... I थिंक तुलाही कळले असेल , तुझ्या मित्रांना जाऊन पण समजावं, ओके........राहुल

ह्मम........नंदिनी

चल राज,  निघायला हव......राहुल

राहुल बाबा कि जय हो ,बाय...... म्हणायचं नंदिनी पळत आपल्या मित्रांकडे गेली....... राजाने राहुल सुद्धा बाहेर त्यांच्या कारमध्ये येऊन बसले आणि ऑफिसमध्ये गेले....

आधी तरी सगळ्यांनी नंदिनीला लोजर लुजर म्हणून चिडले पण नंतर नंदिनी राज आणि त्याच्या मधलं झालेलं चॅलेंजेस वरचं सगळं बोलणं आपल्या मित्रांना सांगितला आणि हे किती डेंजरस आहे ते सुद्धा पटवून सांगितलं...... आणि त्या सगळ्यांना ते पटलं सुद्धा आणि त्यांना राजबद्दलचा अजूनच मान वाढला.........,

******

Hey bro, looking upset.....??.... ब्रेक अप वैगरे झाला काय.........नंदिनी राहुल जवळ त्याच्या रूम मध्ये जात बोलली.....

तू तर बोलूच नको, सगळं तुझेच केलेले आहे, आजिसहेब आणि आई आता लग्नासाठी मागे लागले आहेत.......महाराजांना बोलाऊन त्यांना पत्रिका वैगरे पण दाखऊन झाली........राहुल

हा..... मग प्रॉब्लेम काय आहे...??? तसेही कधी ना कधी लग्न तर करायचे आहेच ना ......नंदिनी

अग पण मी लग्नाचा विचारच नाही केला कधी.........राहुल

तर मग काय म्हातारा झाल्यावर करणार आहेस काय......तुला तर आजिसहेबांनी सुट पण दिलीये, कुणी आवडत असेल तर सांग .........पण तुझ्या त्या बकवास गर्लफ्रेंड नको सांगू.......त्या फक्त तुझ्या पैशाच्या मागे आहेत.............नंदिनी

तुला मोठ कळते सगळं..........राहुल

हो......मुलींबद्दल तरी कळते थोड.......आणि आतापर्यंत ज्या पण. तुझ्या गर्लफ्रेंड होत्या त्या तुझ्या गुड लूक्स नी पैशाच्या मागे होत्या.........रिअल लव्ह नव्हते.........नंदिनी

तुला बरं कळतेय रिअल लव्ह.............राहुल

कळत नाही सगळं, पण काही काही समजते........नंदिनी

तुला राज बद्दल काय वाटते ग...........राहुल

म्हणजे......??? नंदिनी

तुला फेस वरून कळते म्हणाली ना......तर त्याचा फेस वरून काय कळते.........राहुल

तो खूप छान आहे..........तो सगळं खूप मनापासून करतो........नंदिनी

अगं म्हणजे तो प्रेम करतो की नाही ते......त्याच खर प्रेम......???.....राहुल

त्याला पण गर्लफ्रेंड आहे.......??? पण त्यांनी मला तर नाही सांगितले काही........नंदिनी डोळे मोठे करत बघत होती....

राहुल ने डोक्यावर हात मारला............तुझ्याशिवाय दुसरं कुठं काय दिसतेय त्याला...........राहुल

ह्मम.......राहुल, राज कोणावर प्रेम करतोय का रे......तसे तर तो आपल्या सगळ्यांवर करतो.........पण ते तसे वाले  लग्न साठी करतात तसे.....त्याच soul, eyes इतके pure आहेत ना काही कळत नाही रे ......म्हणजे तो कुठल्याच मुलीकडे वेगळ्या नजरेने बघत नाही ना, म्हणजे मला तरी दिसला नाही......नंदिनी

ह्मम......आहेच तो तसा......तो बघणार पण नाही, ...लग्न केले आहे त्याने......नंदिनी तुला माहिती लग्न नंतर लाईफ च बदलते ग....म्हणून मला भीती वाटते आहे .........राहुल

खरंच, इतकं कठीण असते हे सगळं......पण मला वाटते प्रेम असेल तर सोपं होईल बहुतेक.........नंदिनी

मी पण कोणाला विचारतोय........घरीच तर सगळं उदाहरण आहे.......राहुल मनातच विचार करत होता....

तू घाबरु नको रे........ आपण शोधू छान मुलगी तुझ्यासाठी.......नंदिनी

आधी आपलं बघ...........राहुल

हो ते तर मी बघणारच आहे , नाही जमलच तर माझा सुपर हिरो आहे ना , तो सॉलव करतो माझे प्रॉब्लेम्स.......तू माझी काळजी करू नको.......नंदिनी

बरं माते.......राहुल तिच्या समोर हाथ जोडत म्हणाला......

******

मला एक सांगायचे आहे......नंदिनी
सगळे डिनर साठी डायनिंग टेबल वर बसले होते........नी नंदिनीच्या बोलण्याने सगळे आ फाडून तिच्या कडे बघत होते....

काय.....???.....आजिसहेब

राहुल साठी जे पण मुलगी बघेल तिला आधी मी भेटेल....माझ्या एक्साम मधून ती पास झाली तरच पुढे जायचं.......नंदिनी

आजिसहेबांनी डोक्यावर हात मारला.....

घ्या......आता कोण बघणार मुलगी लग्नासाठी, तर या.......ज्यांना स्वतःच कळत नाही, नी चालल्या राहुल साठी मुलगी बघायला.......आजिसहेब

आजिसहेबंच बोलणं ऐकून सगळ्यांना हसू आले......

हो.....आधी मीच बघणार........राहुल दादा म्हणाला भीती वाटतेय, लग्न नंतर लाईफ चेंज होते......तर मी त्याला मदत करणार त्याची भीती घालवायला.......तर हे फायनल आहे की आधी मी बघणार मुलगी..........नंदिनी

वाह , वाह......वाहिनिसहाबाची जिम्मेदारी घेतली तर..... वाह.......काकी हसत होत्या...

आधी आपल्या लग्नावर लक्ष द्या..........कुणीतरी वाट बघत आहे तुमची...........आजिसहेव राज कडे बघत बोलल्या........

आजिसहेबंच बोलणं ऐकून राज इकडे तिकडे बघायला लागला........

कोण...??.....कोण वाट बघत आहे माझी......???.....नंदिनी

कोणी नाही.......संपव जेवण........ तुझ्यासाठी काहीतरी बनवून ठेवलं आहे.......राज ,

राज ने विषय बदलला, कारण तिला काही सांगितले की ती विचार करत असायची,  आठवायचा प्रयत्न करायची त्यामुळे तिच्या ब्रेन वर ताण यायचा......तसेही आजकाल तिला काही काही जुनी स्वप्न पडत होती......काहीतर आपल्यासोबत घडले आहे अशी.....ती खूप पॅनिक व्हायची.....ज्यामुळे तिचा डोकं दुखायचे, कधी तब्बेत बिघडायची......राज ला कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती.......त्याचा साठी तिच्या तब्बेती शिवाय दुसरं काहीच इंपॉर्टन्ट नव्हते......घरात सगळं माहिती असूनही कधी कधी बोलण्यात कोणीतरी काही तरी बोलून जायचं, कोणी मुद्दाम नव्हते करत, कदाचित राज चा कळजीमुळे बोलल्या जायचे, राज ला ते सगळं कळत होत.......तो सगळ्यांचा लाडका होता...........त्यामुळे त्याच्या सुखासाठी बोलायचे..... म्हणून तो पण कोणाचं मन दुखेल अस बोलत नव्हता पण जर कधी असे विषय निघाले तर विषय मात्र नक्कीच बदलायचा.....येवाध्या दिवसात त्याच तसूभर ही नंदिनिवरचे  प्रेम कमी झाले नव्हते, नाही त्याच्या तिच्याकडून काही अपेक्षा होत्या.......तीच असणे, तिचा आनंद, तिचं सुख, तीच हसणं हेच त्याच्यासाठी आताही महत्वाचे होते........ जबरदस्ती ने हे नातं त्याला पुढे न्यायचं नव्हते, नी त्याचं नंदिनी वर पूर्ण विश्वास होता की कधी तरी नंदिनी ला त्याचं प्रेम कळेल....... वाट बघण सुद्धा प्रेमातला च एक भाग आहे ना .........

काय.....??......तू बनवलं...??....नंदिनी

हो............राज

Yepiee.........मग तर ऑसम च असेल.......पण आज काय स्पेशल..???.......नंदिनी

आज तू हरली ना माझ्यामुळे......म्हणून........राज

Oh, so sweet....... ती तिथूनच त्याला फ्लायिंग किस करत होती......तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता ......राज ते बघून खूप सुखावला होता.........

मज्जा आहे बाबा एका जनाची.........आम्हाला तर असं कोणच प्रेमाने मनवत नाही........राहुल

त्यासाठी स्पेशल लोक असावी लागतात.... तुझ्या सारखं नाही......कोणत्याही चुडेल तुला आवडतात............नंदिनी

बरं गप्पा खूप झाल्या जेवण करा आता........आई

*******

गुड नाईट.......नंदिनी राज च्या रूम मध्ये गेली, राज लॅपटॉप वर काम करत बसला होता.......तिने त्याला जाऊन हग केले नि गूड नाईट म्हंटले.....तिचे हे रोज चे काम होते , सकाळ नी रात्र तिची राज ला बघूनच व्हायची...

गुड नाईट पिल्ल्या.........राज हसून बोलला

राज ठेव ना आता ते काम, किती करणार आहेस, तुला काम करतांना बघून मला दमायला होते.......नंदिनी

हो......झालच आहे , ठेवतोय......राज

ती परत जायला वळली, नी परत काहीतरी आठवल्या सारखं करत राज जवळ आली.......

राज तुला गर्लफ्रेंड आहे काय.....??...नंदिनी

नाही......राज लॅपटॉप मध्येच बघत बोलला

तू कोणावर प्रेम करतो....??.....नंदिनी

नंदिनी आज काय हे असे प्रश्न पडले आहेत...?.. राज हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत बोलला...

सांग ना .....तुझं कोणावर प्रेम आहे काय.....??...नंदिनी

हो...........राज नंदिनी च्या डोळ्यात बघत बोलला......काय चालले आहे हिच्या मनामध्ये......राज मना मध्ये विचार करत होता......

तसे वाले.......???...नंदिनी

म्हणजे कसे..........राज

तसे......म्हणजे...ते तसे....... मोविज मध्ये दख्वतात......तसे..........मग ते किस वैगरे करतात......तसे.........नंदिनी

राज ला तीच बोलणं हसू आल..........

हो....तसेच......राज

कोण आहे ती...???....

आहे एक गोड परी........ राज

कुठे असते.......??? नंदिनी

माझ्या स्वप्नात...........राज

ती पण करते तुझ्यावर प्रेम....??..नंदिनी

हो......पण तिला कळत नाही आहे ती प्रेम करते ते..........राज

म्हणजे....??...नंदिनी

ती पण खूप प्रेम करते, तिच्या लाईफ पेक्षा पण जास्ती......पण तिला माहिती नाही की ती प्रेम करते.......राज

तू लग्न करणार आहेस काय तिच्या सोबत......???.....तू मला का नाही सांगितले....

नंदिनी काय झालं.....अचानक असे प्रश्न का विचारते आहेस........???.....राज

तू कोणाची वाट बघतोय...???....नंदिनी

कुणाचीच नाही.........राज

मग ती तुझी x- girlfriend होती काय.....??...नंदिनी

माहिती नाही......... राज

मग तू....तू मला विसरशील.....???.....नंदिनी

नाही..........तुला माहिती मी तुझ्या शिवाय ब्रिथ पण नाही करू शकत..........राज

प्रॉमिस....????......नंदिनी

हो...........राज ,

पक्का प्रॉमिस......???...नंदिनी

हो बाबा......... राज

माझा बॉयफ्रेंड असला तरी , तू माझ्या सोबत असशील ना.???.......राज,

कॉलेज आणि हे नवीन खूळ.... भरलाय हिच्या डोक्यात.....खरंच आहे की या वयात या गोष्टीचं अट्ट्रॅक्शन असतेच.......गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवीन ट्रेंड......पण खरंच हिला कोणी आवडले तर.......राज च्या डोक्यात विचार  डोकावून गेला..,......जर - तर आज हे सगळं, बघू पुढचं पुढे.....

हो............. राज

तू मला सोडणार नाहीस ना , जर ती आली परत तर.......नंदिनी

आज हिला इतके इन्सेक्युर का वाटते आहे...... राज विचार करत होता....

नाही रे सोन्या...........राज

Promise me.....wherever you will go, you will take me with you......... नंदिनी

Okay......promise......... जा आता झोप, जास्ती विचार नको करू....राज

ह्मम..... gn

जेव्हा राहुल ने राज बद्दल विचारले होते की तो कुणावर प्रेम करतो.....वैगरे...तेव्हा पासून तिच्या डोक्यात राज बद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले होते....... कुठेतर तिला भीती वाटली राज आपल्याला सोडेल की काय.......आणि म्हणूनच तिची ऐवधी प्रश्न सुरू होती....

*******

नंदिनी आपल्या बेड वर येऊन झोपली.....पण तिला झोप येत नव्हती......तिने मोबाईल घेतला तर व्हॉटसॲप वार तिच्या ग्रुप ची मस्ती चालली होती......त्यांचं दुपरचेच किस प्रकरण डिस्कशन सुरू होते...नी त्यावरून एकमेकांना चिडवत होते...

नंदिनी ..यार you are so unlucky......you miss all this magics from your life....... रेवा

Yess really.....agree...... नी तुझा तर कोणी बॉयफ्रेंड पण नाही........ तुझं लग्न झाले की तुला भेटेल हा अनुभव.........पूजा

पण लग्न आधी जी मजा असते ना ती नंतर नसतेच.......रेवती

जाऊ द्या.......झोपते मी.....gn..... नंदिनी ने मोबाईल बाजूला ठेवला
पण आता तिच्या डोक्यात हे किस चे भूत घुसले होते........त्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकून तिची पण इच्छा झाली........आपण पण हा मजिकल अनुभव घ्यायला हवा....वारंवार तिच्या डोक्यात सुरू होते.......ती विचार करता करता राज चा रूम जवळ आली, तर राज झोपला होता......ती आतमध्ये गेली नि त्याच पांघरून नीट केले.....नी त्याच्या शेजारी बसली.......त्याच्याकडेच बघत होती.......

किती गोड आहे ना हा.......खरंच दिसतो पण खूपच छान....सगळे म्हणतात तसेच.......त्याच्याकडे बघता बघता तीच लक्ष त्याच्या ओठांकडे गेले नि तिला दुपारचं पूजा चे बोलन आठवले....किती हॉट आहेत याचे lips..... खरंच आहेत अगदी धनुष्य चा आकरासारखे..,..श्रीरामाचे फोटो मध्ये असतात अगदी तसेच........आणि मित्रांचं किस प्रकरण आठवलं........

ती हनुवटीवर हाथ ठेवून त्याला बघत बसली होती......नी तिच्या डोक्यात भलते भलते विचार येऊ लागले....

मी राज ला किस करून बघू काय....कसे फील होते ते......??.....तसाही तो झोपलाय , त्याला कळणार नाही.....??.....पण कळले तर.....???...तो मला रागावला तर....????.....नको नको......पण मग मला कसे कळणार ते मॅजिक....मला तर बॉयफ्रेंड पण नाही.......आणि मला कधीच नाही भेटला बॉयफ्रेंड तर......???...तर मग मल हे मॅजिक कधीच कळणार नाही......यार नंदिनी तू खरंच unlucky आहेस...........काय करू......??....राज ला च करून बघते.........झोपलाय तो.....त्याला नाही कळणार..........हो हो...हेच....हेच करूया.........रागावला तर रागावला.... सॉरी बोलूया.......पण ट्राय तर करूनच बघू.........आणि ती त्याच्या खूप जवळ जाऊन बसली.....

तिचा स्पर्श राज ला जाणवला.......पण ती बरेच दा यायची म्हणून तो उठला नाही.......

नंदिनी ने तिचा एक हाथ त्याच्या बाजूला ठेवला....नी ती त्याच्या जवळ खाली  झुकत होती........तिचे मुलायम केस त्याचा चेहेरा सोबत खेळत होते.........आणि त्या स्पर्शाने अचानक राज चे हृदय जोराने धडधडायला लागले......तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर रोमांच उठत होते.........त्याला काहीच कळत नव्हत .....पण काहीतरी हवेहवेसे घडत होते........तिच्या या अशा स्पर्शाला तो आसुसला होता.......कधीची तो तिची वाट बघत होता.......

नंदिनी हळू हळू त्याचा ओठांजवळ जात होती......राज ला तर वाटत होत आता हृदय बाहेर उडी घेते की काय.......त्याच डोकच ब्लँक झाला.....त्याने त्याचा श्वास रोखून धरला होता............

************

क्रमशः

************

राजांनो....माझ्या प्रजांनो थोडंसं पेशन्स ठेवा.......कथेचे वेगळे वळण सुरू झाले आहे.........थोडी वाट बघा.......रागावू नका......सगळ्या गोष्टी येतीलच हळू हळू पुढे.......

मी सगळ्या समीक्षा आणि मेसेजेस वाचत असते.......फक्त reply करायला होत नाही....तरी माफ करा......

 

आता दिवाळी असल्यामुळे कदाचित भाग टाकायला उशीर होईल....जसा लिहून झालं तसे पोस्ट करेल....

 

दिवाळी च्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा...

काळजी घ्या आनंदी रहा, 

धन्यवाद

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️