नंदिनी...श्वास माझा 43

Rajnandini

भाग 43

Hey hottie...... what's up bro......... नंदिनी राज च्या मागे पळत पळत मॉर्निंग टाईम जॉगिंग करत घरात आली तर समोर राहुल ला बघून दम खाt बोलली......

Hey lazy bird..... how's the morning today...?????..... राहुल एक नजर राज वर टाकत नंदिनी ला बोलला...

It's very hot......huh......... तुला माहिती आहे एक जन रागात भारीच हॉट दिसतेय.....बाहेर मुलींना तर मेजवानीच भेटली बाबा.......... हुश्श.......नंदिनी बाजूला सोफ्यावर जाऊन बसली....

हा हा हा हा....... तू मजा केलेली दिसते........राहुल

मग काय..........असे छान छान सीन सोडते होय मी......मी तर फोटो पण क्लिक केले..........नंदिनी राज कडे बघत बोलत होती......राज न्यूज पेपर घेऊन बसला होता.....अधून मधून नंदिनी कडे बघत होता....रागात आहे हे दाखवायचे पण होते..... पण तिचे ते क्यूट भाव पण बघायचे होते .  .....ती बाकी मुली राज कडे कश्या बघत आहे ते राहुल ला अक्टिंग करून सांगत होती.... ..तो पेपर आडून तिलाच बघत होता.....

भाई पेपर झाला का वाचून ......नाही म्हणजे मग मला पण हवा होता.......राहुल

हो बस थोडासाच राहिला आहे........राज

तू असाच वाचत राहिलास तर तो कधीच पूर्ण होणार नाही वाचून.......राहुल गालातल्या गालात हसत होता......

राज प्रश्नार्थक नजरे ने बघत होता........

तू पेपर उलटा पकडला आहे......राहुल ला हसायला येत होते

राज गोंधळाला.......त्याची चोरी पकडल्या गेली असे भाव त्याचा चेहऱ्यावर होते.......

ते ऐकून नंदिनी चे सुद्धा लक्ष राज कडे गेले......ती पण त्याला बघून हसायला लागली.........

कसलं ग गोड ते माझं हिटलर.......नंदिनी लाडात येत राज जवळ जात आपल्या दोन्ही हातांनी त्याचे गाल ओढत होती.........माहिती नाही त्या मुलींना हा कुठून हॉट वाटतो.......मला तर फारच क्युट वाटतो........राज तू रागावला असला ना की तुझा चेहरा ना असा लाल लाल होतो.......नंदिनी त्याच्या बाजूला जाऊन बसली.....

राज अजब नजरेने तिला बघत होता........राहुल ने डोक्यावर हात मारला.......भाई तुला खूप वाट बघावी लागेल.......तुझं काही नाही होऊ शकत.......ये तू कितीही मस्का लाव तुला बाईक ची key नाही भेटत......राहुल हसत होता.......

राज दे ना बाईक ची key......... प्ली sssss ज..... नंदिनी पपी शेप चेहरा करत बोलली

No............ राज

माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे ना यार राज........ते ड्रायव्हर कार वैगरे मला सूट तरी होत का.......हसतील ना माझे फ्रेंड्स..........नंदिनी

हो बरोबर..,... नंदिनी भाई की इज्जत का सवाल है.........राहुल

ये काय तू मध्ये मध्ये गरम तेल ओततोय रे.............नाही सगळ्या मुली तुझ्या बहिणी बनवल्या तर बघ हा...........नंदिनी

बाई बाई.......माफ कर.......भाई देऊन दे key........ ती मुद्दाम थोडी मारामारी करत होती.....हेल्प करत होती.......नंदिनी च्या धमकी ला सिरीयस घेत राहुल नंदीची साईड घेत बोलला.........

हो ना.......मी पण तेच सांगतेय........मी मुद्दाम नाही केले.........कोणत्याही मुलीची इज्जत म्हणजे आपली इज्जत असते.............Raj you only teach me these all good things......... आणि आता तूच आपल्या शब्दानं वर नाही आहेस....,...नंदिनी

हे बघ सोन्या ती मुलं गुंड प्रवृत्तीचे होते........प्रत्येक वेळ ला स्वतः जाऊन भिडायची गरज असते काय......पोलिस कशासाठी असतात, मोबाईल कशासाठी आहे.......आणि कोणीच नसले तरी फोन करून तू मला राहुल ला तर कळवू शकते.........काहीच नसेल तर शेवटी आपण पुढे जायचं.........

पण राज........नंदिनी

नंदिनी.....मला माहिती आहे तू खूप स्ट्राँग आहेस.......पण का म्हणून दुशमनी ओढवून घ्यायची......थोड डोक्याचा वापर करत जा....पत्येक वेळ हातपाय च वापरले पाहिजे असे नाही आहे............राज तिला समजावत होता.....
नंदिनी तुला जर काही झाले तर.......मी तुला काही होऊ देऊ शकत नाही......पण फार वाईट लोक आहेत रे आजूबाजूला......प्रत्येकाचं मन तुझ्यासारख निरागस नसते........... कसं समजावू तुला.......राज मनातच नंदिनी कडे बघत विचार करत होता...

हो..... नेक्स्ट टाईम पासून करेल डोक्याचा वापर......आता तरी दे ना बाईक ची चाबी..........नंदिनी

मला वाटत नाहीये तुझ्या डोक्यात काही गेले आहे........राहुल

तू काही हॉट बीट नाही आहेस...... I am taking my words back.......... नंदिनी, नंदिनी ने राहुल कडे बघून वाकडं तोंड केले..,..

तू पण नहीयेस हॉट.....तू तर पॉट सारखी गोलू मोलू आहे.....म्हणूनच कोणी बघत नाही तुझ्या कडे......राहील तिला चिडवत होता....

राज याला सांभाळ हा..........नाही तर मी तुझ्या भावाला चांगलं झोडून काढेल.......दोघंही उषा घेऊन मारामारी करत होते.......

हे काय...हे काय चाललं आहे .....आणि....हे कसे कसे शब्द वापरतात....नीट बोलता येत नाही काय  तुम्हा दोघांना......आजिसहेब

आजिसहेबांना बघून दोघंही होते त्या ठिकाणी चूप उभे राहिले.......

हिच्या सोबत राहून तुम्हीपण बिघडत चालला आहात........ एकतर आधीच बिघडलेला आहे यांच्या नादाला लागून......... आता तुम्ही पण....... बोलायची वागायची सगळी रीतभात तुम्ही विसरून गेले आहात...... काय जादू करून ठेवलाय काय माहिती,  सगळं घर यांच्या मागे पागल आहे........आजिसहेब

आजी साहेब प्रेम म्हणतात याला प्रेम ......नंदिनी डोळे आणि भुवया उंचावत बोलली......

तिचे बोलणे एकूण राज ला ठसका लागला.......... नंदिनी लगेच त्याला पाण्याचा ग्लास मधून पाणी पाजत त्याच्या पाठीवर हात फिरवत होती.........

हो तुम्हाला भारी प्रेम कळतं...... जे कळायला  पाहिजे ते कळत नाही आणि सगळी दुनिया कळते...........आजिसहेब

काय मुलांनो आज सकाळी सकाळी इथेच ...??..हेल्दी टॉक्स सुरू आहे वाटते...??... आबा आजीकडे कटाक्ष टाकत आजीला चिडवत बोलले....

प्रेमाची परिभाषा शिकवते आहे तुमची ही कार्टी.......आजिसहेब

अरे वाह.... खरच...... पण तुम्हाला गरज आहे त्याची...... आबा आजी  साहेबांची मस्करी करत होते .......त्यांना मस्करी करून त्यांना बघून राहुल आणि राज गालातल्या गालात हसत होते पण आजी साहेबांसमोर जोराने हसू तर त्या चिडतील म्हणून चुपचाप हसू दाबून बसले होते....... नंदिनी मात्र जोरजोराने हसायला लागली...

खूप हसायला येत आहे ना आधी तुम्ही शिका प्रेम म्हणजे काय असते......... आल्या मोठ्या मला शिकवणाऱ्या....... आतापर्यंत पंतू खेळायला पाहिजे होता घरांमध्ये....... तर यांच खेळ अजून संपला नाही..........आजिसहेब

पंतू.........???? नंदिनी विचार करत होती

पंतू म्हणजे नातवाचा मुलगा........ राहुल नंदिनीचा डाउट क्लिअर केला ,...त्याचं बोलणं ऐकून राजने डोक्यावर हात मारून घेतला कारण त्याला माहित होतं की याच्यापुढे अजून बरेच प्रश्न येतील......

अच्छा ओके......... पण मग आजी साहेब तुम्हाला पणती नाही चालणार का........??..........नंदिनी

सगळे चालते..... आणा म्हणजे झालं.......आजिसहेब

उगाच नंदिनी जास्त प्रश्न विचारून विषय वाढेल असा असा विचार करून राजने माजी साहेबांना मध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला......

आजी साहेब............ राज काही बोलणार तेवढ्यात बाबांनी त्याला डोळ्यानेच शांत रहा म्हणून सांगितले आणि मी बोलतो म्हणून बोलले.........

राज च्या आजी तुम्ही काय घेऊन बसलात मध्येच.........प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुमची इच्छा पण पुर्ण होईल तोपर्यंत धीराने घ्या..........आबा

पण आबा आजी साहेब बरोबर तर बोलत आहे,  मला पण पाहिजे छोटा बेबी खेळण्यासाठी.........नंदिनी

हो नंदिनी मला पण तेच वाटते......... काकी किचनमधून हात पुसत बाहेर येत बोलल्या

हो ना ,  मी पण तेच म्हणते पण त्या आधी पहिले लग्न तर व्हायला हवे ना या  बोक्याचे........ नंदिनी राहुलच्या पाठीत  बुक्का मारत बोलली......

काय......???........राहुल ओरडला

सर्वांनी डोक्यावर हात मारला........ आपण बोलतो काय हिला समजते काय..........

निरागस तर ती अजूनही होती.....पण बदमाशीपणा तिचा वाढला होता.....तो तिलाच बघत होता.....बोलतांना बदलणारे तिचे भाव.......आजकाल तर जास्तीच गोड वाटायला लागली होती.....दादागिरी मात्र भयंकर वाढली होती.......अगदी गावाकडची नंदिनी करायची तशी.........किंबहुना त्याहून ही जास्ती.....कॉलेज मध्ये काय ,घरात काय आपलंच चालवायची........... राज ला हसू येत होते.......

ये बाई मी असाच ठीक आहो......... उगाच नको त्या पनोत्या लावू नको माझ्या मागे...........फालतू फालतू या लोकांच्या डोक्यात हे असे फालतू चे विषय घालू नकोस..... माझ्या मागे लागतील ते........राहुल

अरे वा ही पण आयडीया चांगली आहे असा पण हा घोड्या लग्नाचा झालाच आहे..........काकी

ये , तू ना खूप उडतोय...... तुला आता जमिनीवर राहायची गरज आहे.........काकी आपण आता याचं लग्न करू.........नाही तर हा कोणी आण्याचा.....नंदिनी

हो......सूनबाई राहुल च्या लग्नाचं आता बघायला हव.........एका नातवाचे हट्टी पणा बघतोय.........नको आता राहुल च करायला हवे......आजिसहेब

भाई आपल्या बायको ला सांभाळ........नाहीतर मी काय करेल माहिती नाही......माझी वाट लावायला निघाली आहे...........राहुल राज जवळ खुसुरपुसुर करत होता...

बायको बनू दे , सांभाळइल च ......पण आता तूच निस्तर....कोणी सांगितलं होते पंतू चा अर्थ सांगायला......भोग आता......राज

राज भाई, this is not fare...... हा महिला वर्ग भयंकर आहे, जाम पिडतात यार मला ह्या......... राहूल, राहुल राज मध्ये खुसुपुसर सुरू होती...

अगं....तू तर एकदम बरोबरच बोलली, पण आता  आम्ही राज बद्दल बोलतोय........काकी

काय.....? राज च लग्न???? ......नंदिनी

सगळ्यांनी डोक्यावर हात मारला...,..

तुमचं नि राज चे लग्न झाले आहे ना.........तुम्ही त्यांची बायको आहात......विसरलात काय...... अजिसहेब

हा......ते तर लहानपणी झाले होते ना ......त्याला कोण लग्न थोडी म्हणत्यात......मला तर लग्न शब्दाचा नीट अर्थ पण माहिती नाही...... असं कसं लग्न होणार मग आमचं...राज माझा बेस्ट फ्रेंड आहे.......आणि मी त्याची..............तुम्हीच कोणी त्याला जबरदस्ती केली असणार लग्नासाठी......हो नक्कीच आजिसहेब असतील.............नंदिनी

हो....मीच म्हणाले होते .....???... करतेय कोण, भरतेय कोण.......???........आजिसहेब

नंदिनी ने सगळं आजिसहेबांवर गोष्ट टाकलेली बघून बाकीचे तोंड दाबुन हसत होते......

लग्न आधी प्रेम व्हावं लागतं.......माझ्या मैत्रिणीने सांगितले.........नंदिनी

मग...??...बिना प्रेमाच्याच तुम्ही आलात या घरा मध्ये...???..........आजिसहेब

हो आमचे प्रेम आहे एकमेकांवर......आपल्या सगळ्यांचेच आहे न एकमेकांवर......म्हणून काय आपण सगळ्यांनी एकमेकांसोबत लग्न केले आहे काय......नंदिनी

अरे राम.........कुठल्या भाषेत समजवावे यांना......आजिसहेब

म्हणजे मला येवढेच सांगायचे आहे की माझं या घरातल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे, हा राज वर थोड जास्ती आहे.......पण लग्न साठी ते तसं वाले प्रेम पाहिजे ना...... तस्स..... तस्स वाल........ कसं समजावू तुम्हाला......नंदिनी

सगळ्यांनाच खूप मजा येत होती आजिसहे आणि नंदिनी मधले द्वंद्व ऐकायला........
राज ला थोड वाईट वाटले......पण  तरीही तो खूश होता की नंदिनी प्रेम, लग्न या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे......तिला अटलिस्त येवढे तरी कळले होते की लग्नासाठी प्रेम गरजेचे आहे.....त्यामुळे त्याच्या मध्ये एक होप जागी झाली होती.....नी नंदिनी काय सांगते आहे ऐकत होता...

तस्सं म्हणजे कसं नंदिनी.......राहुल तिची मस्करी करत होता....

तसं म्हणजे तस्स रे.....ते मोविज मध्ये दाखवतात.....कुणाला बघितले की अशी दिलं मधलाई गिटार वाजते.....असे आपण स्वप्नात असा परफेक्ट डान्स करत असतो....सगळी कडे मस्त गुलाबी गुलाबी दिसतं.......सगळीकडे तोच दिसतो..... हार्ट बिट्स फास्ट होतात.......बोलायला जायचं पण बोलता येईना........ते तू बघितलं नाहीये काय मूव्ही मध्ये..कसा रे तू येवाध्या ग........नंदिनी पुढे बोलणारच की राहुल ला समजले आता आपली खैर नाही.....त्याने तिच्या तोंडावर हाथ ठेवला नी समजलं समजलं म्हणाला.......,.......नंदिनी

राज खूप मोविज बघता का तुम्ही........ बापरे हे असं सगळं कधी होणार.... काकी

अन् हिला कधी कळनार..,....की ऑलरेडी हे सगळं घडून गेले..........नंदिनी तुला माहिती प्यार एक बार ही होता है...... बार बार नाही.......राहुल

हा तर एकदा तर होऊ दे...नंदिनी

झालंय ग बाई हे सगळं........नंदिनी आठव ग........त्याच्या समोरच तू अशी बोलतेय......त्याची काय अवस्था होत असेल....... देवारे मी जरबकाही पुण्या केले असेल ना तर एकतर हिला सगळं आठाऊ दे नाहीतर हे तिला लवकर कळू तरी दे...... राहुल मनातल्या मनात बोलत होता....

बरं बरं....समजले मला तुमचे हे पुराण......तुमचं काही व्हायचं नाही.....जा तयार व्हा कॉलेजला जायला उशीर होईल...,...आणि सूनबाई राहुलचा लग्नाचं घ्या मनावर....... विचारा त्यांना कोणी आवडत असेल तर....नाही म्हणजे मागच्या वेळ सारखं आजी विलन ठरायला नको........नाहीतर आपल्या महाराजांना बोलवा.....यावर्षी लग्न करायचं.....आजिसहेब

राहुल आपलं तोंड पाडत तिथून रूम मध्ये चालला गेला

सगळे आपापल्या कामाला निघून गेले.....

*******

राज नंदिनीच्या च बोलण्याचा विचार करत होता.......आपण कधी तिच्यासाठी फ्रेंड च्या पुढे जाऊ आहे की नाही........नंदिनी ला रियालिझ होईल की नाही majh तिच्यावर प्रेम आहे ते......कळेल ना तिला.....आणि नाही कळले तर........तर.......तर काय...,राज च्या डोक्यात असे असंख्य विचार सुरू होते.......नी विचार करता करता च तो नंदिनी च्या रूम जवळ आला तर दारातच थबकला.....नी आतमध्ये बघत होता..
 

नंदिनी कॉलेज जायला तयारी करून आरसा मध्ये मुलांसारखी काही काही पोझ घेत होते.......

राहुल म्हणतो तसेच असेल काय.....मी मोटी वाटते काय.......म्हणूनच माझा कडे कोणी बघत नसेल काय...????.....ती आपल्या शर्ट वर करत पोट बघत होती, कंबर बघत आरसा मध्ये बघत होती......मग तिला आठवले तिच्या मैत्रिणीने सांगितले होते थोड हॉट कपडे घाल.....वैगरे....
नंदिनी ने घातलेले शर्ट बघितला, मग तिने शर्ट च्या खालच्या काही बटन काढल्या नी त्याची पोटावर कनॉट बांधली......त्यामुळे शर्ट थोडा वरती गेला होता, नी तिची नाजूक कंबर थोडी दिसत होती....

वाह..,.परफेक्ट......ती स्वतः ला च फ्लाईंग किस देत बोलली.....

राज दार नॉक केले......नंदिनी चे त्याचा कडे लक्ष गेले....

नंदिनी तुझ्या बाईक ची key................ राज तिच्या पुढे key पकडत बोलला.....

Yepieee.......... नंदिनी उड्या मारतच राज च्या गळ्यात जाऊन पडली.........

राज you are the best........ तुला माहिती तू पूर्ण वर्ल्ड मधला सुपर बेस्ट पर्सन आहे..........नंदिनी

ह्मम....... I know....... राज ने हसतच तिचे पिटुकले नाक ओढले........पण सांभाळून राहायचे......जास्ती मस्ती नाही.......राज

हो.....बिलकुल मस्ती नाही करणार........नंदिनी

बरं, आज काय स्पेशल आहे काय, वेगळीच तयार झाली आहे .....राज

राज बघ ना माझ्याकडे कोणी बघतच नाही.....सगळे माझ्यापासून लांब राहतात.........माझी फ्रेंड म्हणाली थोडेसे असे स्टायलिश हॉट दिसणारे कपडे घाल, मेकप वैगरे कर..........म्हणून जरा वेगळा चेंज केला......कशी दिसते आहे मी......नंदिनी त्याला गोल फिरत पोज्स घेऊन दाखवत होती..........

ह्मम......let me see.......... राज दोन्ही हाथ फोल्ड करून उभा राहून तिला बघत होता.........

त्याचा फेस एक्स्प्रेशन वरून नंदिनी ला कळत नव्हते ....चांगली दिसत आहे की नाही......ती पण प्रश्नार्थक नजरें  ने त्याला बघत होती...

नंदिनी तुला माहिती तू स्पेशल आहेस.....तू बाकी मुलांसारखी फक्त वरतून वरतून दाखवण्यासाठी सुंदर नाही आहेस...... तू चेहऱ्याने तर खूप सुंदर आहेस च पण मनाने हृदयापासून सुंदर आहेस.......तुला या आर्टिफिशियल सौंदर्याची गरज नाही आहे.......तुला कोणी पसंत केले पाहिजे तुझ्या आतल्या सौंदर्याला बघून.....ना की या बाहेरच्या सौंदर्याला बघून.......तुला तरी कंफर्टेबल वाटत आहे काय या मध्ये........राज

नाही.....पण सगळेच असे घलातात..........नंदिनी

नंदिनी ........तू माझी नंदिनी आहेस.....बाकी मुलींसारखी नाहीये ..... मुलं तुझ्या दूर असतात कारण तू खरी आहेस........त्यांना माहिती नंदिजवळ टाईम पास केलेला चालणार नाही.....म्हणून ती तुझ्या दूर असतात..................नंदिनी फक्त त्याच्याकडे बघत होती........
त्याने तिचा पोटावर बांधलेला शर्टाची गाठ सोडली......शर्ट नीट केला.....तो तिच्या जिन्स मध्ये खोचला.......परफेक्ट शर्ट इन करून दिला......टेबल वरचा एक टिश्यू पेपर घेतला नि त्याने तिने केलेल्या मेकप पुसला.......डोळ्यांवर लावलेले भडक आय शॅडो पुसला.....त्याच लक्ष तिच्या ओठांवर गेले......तिने लावलेल्या डार्क लिपस्टिक शेड मध्ये ते फारच सुंदर दिसत होते.......कधी आपल्याला या ओठांचा ताबा मिळेल असा रोमँटिक विचार ही त्याचा डोक्यात हजेरी देऊन गेला....आणि त्यालाच त्याचे हसू आले.........नंतर दुसरा टिश्यू पेपर घेऊन तिच्या ओठांवरील डार्क शेड लिपस्टिक पुसले........त्याने थोडासा पावडर पफ तिच्या फेस वर अलगद फिरवला......तिचे डोळे तर तसेच खूप सुंदर होते...बोलके होते..... खरं तर डोळ्यांना काहीच करायची गरज नव्हती....पण आता मुलींना आवडते हे सगळं लावायला त्याला माहिती होते...आणि नंदिनीचा हिरमोड नको व्हायला म्हणून त्याने तिला  तिच्या पापणी च्या वार आय लायनर पेन्सिल नी बारीक रेघ लाऊन दिले......लिपस्टिक शेड्स मधून लाईट पीच natural दिसेल असे शेड सिलेक्ट करून तिच्या हनुवटीला आपल्या एका हाताने पकडत तिचा चेहरा थोडा वर करत हळूवार पणे तिच्या ओठांवर लिपस्टिक लावले.........नंतर तिच्या कानातले हेवी एरिंग्ज काढून त्यात तिचे आणि आता त्याचे फेवरेट हलकासा पिचीश शेड असलेला सिंगल पर्ल घातला......तिने केस लहान केले होते.....केसांसाठी तिला राज वर अवलंबून राहावे लागत होते.......आधी राज ला आवडले नव्हते....पण ती स्वतः शिकतेय, दुसऱ्यांवर डीपेंड राहायला नको म्हणून त्याने तिला केस लहान करू दिले होते.........तिच्या केसांची हाय पोनी टेल केली.....नी केसांची लसूण चोटी ( बारीक बारीक पेड्यांनी घातलेली ) घालून दिली.........नंदिनी च सगळं लक्ष राज च्या सुरू असणाऱ्या हालचाली मध्ये च होते.......

गळ्यात मंगळसूत्र घालने तिने बंद केले होते.....कॉलेज मध्ये घालून जायला तिला वेगळं वाटायचं, कोणीच नाही घालत, नी ती एकटीच......वरून तिने तीच लग्न झालंय म्हणून कोणाला सांगितले नव्हते.......आणि तसे पण तिला मंगळसूत्र चा अर्थ तरी काय कळतोय.... आणि उगाच त्याला तिच्यावर आपली मत लादायची नव्हती.......जे पण हवे होते ते मनापासून तिने स्वीकार करायला हवे असेच त्याला वाटायचे........प्रेमात, नात्यात समोरच्या व्यक्तीला मोकळं सोडायचं असते....त्यांना त्यांचे विचार आहेत, आपल्या पेक्षा वेगळे असू शकतात .....पण वाईट नसतात त्याला माहिती होते.....त्याचा नी नंदिनी च्या नात्यात त्याने तिला पूर्ण फ्रीडम दिले होते.....तिला आकाशाला गवसणी घालतात ते पंख द्यायचा तो प्रयत्न करायचा....आणि तिने पण कधीच त्याच्या दिलेल्या मोकळीक चा गैरफायदा घेतला नव्हता.......मंगळसूत्र काढलं म्हणून घरात मुख्य करून महिला मंडळ थोड नाराज झालं होत........ काळ मनी च महत्वाचं आहे ना ....त्यांचा मान ठेवत त्याने नंदिनी साठी खूप सुंदर नाजूक अशी आताच्या ट्रेण्ड ची चेन बनवली होती त्यात दूर दूर छोटे मोती घातले होते नि मधात एक ब्लॅक मोठा खूप सुंदर असा शायनिंग वाला पर्ल घातला होता.......नंदिनी पण खुश.....घरचे महिला मंडळ पण.......तर तेच ती गळ्यात घालायची....आणि राज ने गिफ्ट दिले आहे म्हंटल्यावर ते तर तिच्या साठी स्पेशल होत........

राज तिची तयारी करून देत असताना तीच मात्र सगळ्यात आवडते काम सुरू होते.....राज ला निहरणे...त्याच्या एक एक हालचाली ती टिपत असायची....त्याची बॉडी लँग्वेज, त्याची बोलायची पद्धत.....नकारात्मक शब्द सुद्धा सकारात्मक पद्धतीने कसे बोलायचे हा तर त्याचा स्पेशल गून होता.........नंदिनिसाठी तो तिचा आयडॉल होता....तिला पण त्याच्या सारखेच बनायचे होते....प्रेमाचं नाही माहिती पण आपल्याला राज सारखेच बनायचे आहे हे तिचं ठामपणे ठरलेले होते.......म्हणून ती त्याचा प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायची.....

किती वेगळा आहे ना हा......एक मुलगी इतक्या जवळ असूनही याची नजर किती pure आहे......किती रेस्पेक्ट करतो माझा........बाहेर पण सगळ्याच मुलींचा करतो.....किती मुली याच्या मागे असतात पण कधीच वाईट नजरेने कोणालाच बघत नाही.....म्हणूनच राज माझा सगळ्यात फेवरेट आहे नंदिनी त्याला बघत स्वतःच्याच विचारांमध्ये हरवली होती.....

झाली तयारी....बघ......राज......पण नंदिनी च त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते........ती तर त्याला बघण्यात गुंतली होती.....

नंदिनी........कुठे हरवली........राज तिच्या डोळ्या समोर चुटकी वाजवत बोलला

ह.........काही नाही.........काय म्हणत होता तू.........नंदिनी

मॅडम स्वप्न फक्त बघू नका, ती सत्यात पण येऊ द्या.....म्हणत त्याने तिला आरसा समोर फिरवले..... See this is my Nandini, dashing and confident............ राज थोडा दूर होत तिला बघत बोलला.......

Wow........ मी किती क्यूट दिसत आहे ना .......आणि स्मार्ट पण..........thank you.......... नंदिनी ने त्याला हग केले...

मन्या तू कोणाला आवडली पाहिजे तू जशी आहे तशी,, ना की बदलून .....प्रेम जबरदस्ती नाही करता येत.....ते आपोआप होत असते....... ह्मम.....तो तिच्या गालावर हाथने थोपटत बोलला.....

Yess.....you are great, you always solve my problems........ नंदिनी ने परत त्याचा एक गाल ओढला.......

नंदिनी......हे काय , मी लहान आहो काय आता........राज

नाही......पण तू खूप क्यूट आहेस........नंदिनी

बरं मी निघते आता....तिने तिचे बुक्स बॅग मध्ये भरले....नी पळतच दाराजवळ गेली......नी परत तिथून मागे वळली....thank you for keys...... तिने तिथूनच त्याला फ्लायिंग किस दिले....नी बाहेर पळाली

तिला तसे करताना बघून राज चा चेहऱ्यावर हसू आले.......हळू जा ....तो रूम च्या बाहेर येत वर्तूनच खाली उतरणाऱ्या नंदिनी ला बोलला........

हो ssss....तू काळजी नको करू sss........ ती खाली पोहचत ओरडली.......आणि समोर येणाऱ्या राहुल ला धडकली.....

ये तुफान मेल...हळू..........अरे वाह आज तर खूप सुंदर दिसत आहे.......क्या सिक्रेट भाई..........राहुल

तो...जादुगार.......नंदिनी वरती राज कडे बोट दाखवत म्हणाली...... अँड thank you घोड्या.......नंदिनी

ते तर तुला बघितल्यावर च कळले मला......स्वतःच्या हाताने तयार होतेस ना तर बंदरी दिसतेस........राहुल

ये.......बंदरी ती.... तुझी ती आहे.......नंतर वाद घाल....मला उशीर होतोय..... बाय......have a cool day....... पुढे बघितले तर आजिसहेब होत्या........... बाय lady don....... आबा ना कमी त्रास द्या.........ओरडली...

Lady Don काय.....?? ...थांबा बघटेच तुम्हाला.......आजिसहेब

त्यांचं ऐकायच्या आताच ती बाहेर पळाली होती.....

Lady Don शब्द ऐकून राहुल नी राज च्या चेहऱ्यावरचे भाव च बदलले....आता आपली काही खैर नाही......दोघंही एकमेकांकडे कासेनुसे बघत होते...
 

कोण आहे तिला हे सगळं शिकवणारा.........आजिसहेब

मी नाही शिकवत तिला काही, तीच शिकवत असते मला आता......... अन्. गुरू...  .... त्याने वरती हात दाखवला.....तिचा गुरू ...तो बघ..........राहुल

आजिसहेबांनी वरती बघितले......

मला ऑफिस ला उशीर होतोय.....तयारी करायची म्हणत राज तिथून निसटला......

आजिसहेब आता डोळे मोठे करत राहुल कडे बघत होत्या.......
यार हे नवरा बायको मलाच फसवतात नेहमीच........राहुल चूप उभा होता....

बरोबरच तर बोलली ती....आबा तिथे येत बोलले....

काय...???...वाटलच....  तुमचाच हाथ दिसतोय या सगळ्या मध्ये ....आजी आबा कडे वळल्या

आबांनी राहुल ला जा म्हणून इशारा केला....

Thank you....... राहुल त्याच्या रूम मध्ये पळाला

अहो डॉन म्हणजे घराचा मुखिया....नी lady म्हणजे बाई......तुम्ही हेड आहात ना.....तेच ती म्हणाली........आबा

आणि आजी आबांची रोज सारखी छोटी मोठी कुरकुर सुरू झाली

*******

राज तयार होऊन ऑफिसर ला आला......आता तो त्याच्या वडिलांचं ऑफिस सांभाळत होता......सहा महिन्यांपूर्वी शशिकांत ला लेफ्ट साईड हाथ ला नी पायाला परालिसिस अटॅक आला होता.....त्यातच ते बरेच दिवस बेड वरच होते.......आता हळू हळू रेकवर होत होते....

म्हणून आता राज ने त्यांचं ऑफिस स्वतःच्या अंडर घेतले होते.....त्याच ऑफिस राहुल नी रोहन उत्तम प्रकारे बघत होते त्यामुळे तिथले काहीच टेन्शन नव्हते....तिथे काम पण प्रनिकपणे सुरू होते, इकडे मात्र बराच घोळ होता......रविकांत एकटा नव्हता सांभाळू शकत ...म्हणून राज जॉईन झाला होता......त्याने कामाची पद्दत, रुल्स सगळेच चेंज केले होते....बराच स्टाफ सुद्धा चेंज केला होता.........बरीच लोकं गैरव्यवहार करत होते.....शशिकांत ची पण फुस्स होती त्यांना.........राज लभे काहीच खपणारे नव्हते.....त्याने सगळं आपल्या पद्धतीने सेट केले होते....त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागत होती.......राज ने हे ऑफिस सुद्धा बराच एक्सपांड केले होते.......काका रविकांत पण त्याचा कामावर खुश होते.....

*****

नंदिनी चे कॉलेज खूप छान सुरू होते, बहुतेक सब्जेक्ट मध्ये तीच टॉप करत होती....... टीचर लोकांची पण ती आवडती स्टूडेंट होती......बऱ्याच मुलांची ती क्रश होती.....बरीच मुलं तिच्यावर लाईन मारायचे...पण प्रत्यक्षात कुणालाच तिच्या पुढे जाऊन बोलायची हिम्मत नसायची.......कारण तिच्या तोंड पेक्षा पण तिचा हातपाय जास्ती फास्ट चालतात कॉलेज मध्ये सगळ्यांनाच माहिती होते......म्हणून तिच्या वाट्याला कोणी जायचे नाही.....

तिच्या बऱ्याच मैत्रिणींना बॉयफ्रेंड होते.....तिच्या मैत्रिणी कडून वेळोवेळी तिला याचे डोज पुरवल्या जायचे.......

ये चला ना यार हा लेक्चर बंक करू......बोर होतंय.....कुठेतरी बाहेर फिरायला खायला जाऊया...,रेवा

ये नाही हा.......आधी पूर्ण क्लासेस अटेंड करायचे.....नंतर पाहिजे तिथे जाऊ......नंदिनी

काय यार नंदिनी तू फारच बोर आहे.....सुहास

एज्युकेशन मोस्ट इंपॉर्टन्ट आहे.......याच्या सोबत नो कंप्रोमैज.......पाहिले हे करायचं मह हवं तिथे जाऊ....नंदिनी

ओके.......तुझ्या शिवाय तसेही आम्हाला माझा नाही येणार.,.....आर्याविर

ह्मम.....म्हणूनच ही भाव खाते ऑल टाइम......रेवती

भाव वैगरे काही नाही....जिथे अभ्यास, तिथे अभ्यासाचं, मस्तीच्या वेळी मस्ती मग त्यात आपण मागे नाही राहत...

ठरल मग.... आफ्टर कॉलेज हॉटेल ला जाऊ या......रेवा

ओके.... डण......

*****

क्रमशः

🎭 Series Post

View all