नंदिनी...श्वास माझा 41-42

राजनंदिनी

भाग 41

हॅलो...........

प्लीज त्यांना लवकर पाठवा, ही कोणाचेच ऐकत नाही आहे.........खूप मारत सुटलिये......जीव घेईल त्यांचा.....

हे बघ तिथे यायला थोडा वेळ लागेल.......कसे ही करून थांबावं, समजवं.......काही पण कर........

ह्म्म.....मी प्रयत्न करते आहे पण नाही ऐकत आहे ती कोणाचेच.........आता तर बरीच गर्दी पण जमलीये आजूबाजूला...........

Okay...........

*********

भाग 42

राजनंदिनी चा लग्नाच्या तीन वर्ष नंतर...................

हॅलो...........

प्लीज त्यांना लवकर पाठवा, ही कोणाचेच ऐकत नाही आहे.........खूप मारत सुटलिये......जीव घेईल त्यांचा.....

हे बघ तिथे यायला थोडा वेळ लागेल.......कसे ही करून थांबावं, समजवं.......काही पण कर........

ह्म्म....   दादा .मी प्रयत्न करते आहे पण नाही ऐकत आहे ती कोणाचेच.........आता तर बरीच गर्दी पण जमलीये आजूबाजूला...........

हे बघ दादा म्हणशील तर अजिबात येणार नाही.......मी नंदिनीचा सोडून मी कुणाचाच दादा नाही आहो......

हा हा हा.....बर पण या त्यांना घेऊन लवकर....

रेड ब्लॅक कॉम्बिनेशन असलेल्या चेकचा शर्ट खाली टाईट जीन्स पायात लेदरचे ब्लॅक शूज...... खांदे पेक्षा थोडे लांब केस वरती रबर मध्ये बांधलेले..... हातात जरा जाड्या बेलच ब्लॅक कलर चे घड्याळ....... गोरी हिरव्या डोळ्यांची अशी एक मुलगी चार मुलांना हाता पायांनी बुक्क्यांनी चांगलाच मार देत होती.........

देशील.... देशील.... मुलींना त्रास...... हात पाय मोडून ठेवेल.............. त्या मुलांच्या नाकातोंडातून रक्त येत होते आजूबाजूला बरीच गर्दी होती पण ती मात्र त्या मुलांना मारत सुटली होती कोणाचंच ऐकत नव्हती.....

तेवढयात तिथे एक व्हाइट कार येऊन थांबली.....तो कार मधून उतरला .....त्याने डोळ्यावरचा गॉगल काढून खिशात ठेवला नी पुढे येत होता.....

बरं झालं तुम्ही लवकर आले......कुणालाच ऐकत नाही आहे कप  ती.....पण हे काय तुम्ही एकटेच आलत , ते नाही आलेत..........त्यांच्या शिवाय तिला कोणीच कंट्रोल करू शकत नाही.......ती टेन्शन मध्ये येत बोलली

चील.........

नंदिनी sssss............ त्याने आवाज दिला....... त्या आवाजा सरशी मुलांना चांगलीच मार देणाऱ्या नंदिनी वळून बघितलं........ 

नंदिनी सोड त्यांना.........

तू इथे काय करतो आहे........ माझं मी पाहून घेईल..... म्हणत नंदिनी परत या मुलांना मारत होती........

नंदिनी त्यांना कळली आहे त्यांची चूक..........

पण नंदिनी मात्र ऐकायच्या मूड मध्ये नव्हती

नंदिनी उगाच जास्त काहीतरी होईल सोड त्यांना आता........... पण हट्टी नंदिनी जोपर्यंत मनासारखं करणार नाही तोपर्यंत ती कुणाचं ऐकणार नाही होती....

........ नंदिनी ऐकत नाही आहे बघून त्याने तिला खांद्यावर वर उचलले..... आणि तिला कारकडे घेऊन येत होता

सोड...सोड....मला.... नंदिनी हातपाय आपटत होती पण त्याने तिला घट्ट पकडलं होतं त्यामुळे तिला खाली उतरता येत नव्हते............

पुन्हा जर कधी मुलींची छेड काढताना दिसले.... तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा......... नंदिनी त्याच्या खांद्यावरूनच त्या मुलांना जोराने ओरडून बोलत होती........

स्वतःचा जीव प्रिय असेल तर पळा आता इथून...ती परत यायचा आधी....... नंदिनी ची मैत्रीण त्या मुलांना बोलली......

ती मुलं उठत पडत पळली होती....

त्याने तिला गाडीमध्ये नेऊन बसवले....... आणि गाडी थेट घराच्या दिशेने घेतली......

*****

आ sss...... स sss............ नंदिनी सोफ्यावर बसली होती..........

... राज नंदिनी चा हाताच्या कोपरा ला फुंकर मारत मेडिसिन क्रीम लावत होता.......

फायटिंग करताना नंदिनीच्या हाताला थोडं लागलं होतं त्यातून थोडं रक्त सुद्धा येत होतं पण ती कुणालाच आपल्या हाताला हात लावू देत नव्हती म्हणून राहुलने फोन करून राजला घरी बोलावून घेतलं होतं.......नंदिनी कोणाचाच ऐकायची नाही फक्त राज च एक असा व्यक्ती होता ज्याच्या समोर ती चूप बसायची....

कोणी सांगितलं होती अशी काम करायला....... नको त्या गोष्टी करायचे असतात.... कुणाचं ऐकायचं नसते.........आजिसहेब

नंदिनी ने डोळे वर करून आज साहेबांकडे बघितले.......

किती मुले होती..??.......राज नंदिनीला मेडिसिन लावत थोडा रागानेच बोलला....

असतील तीन-चार मुलं...........नंदिनी

मुलं ......??...ती गुंड दिसत होती..........राहुल

ते तर बरं झालं तिच्या मैत्रिणी नेहा ने  फोन करून मला सांगितलं........ उचलून घेऊन यावं लागलं तिला........राहुल

कॉलेजमध्ये काय तुम्ही हेच काम करायला जाता काय.............आजिसहेब

अहो हो हो थोड थांबून बोला........ आबा

फारच लाडावून ठेवलं आहे तुम्ही सगळ्यांनी आणि राज ने तर जास्तीच........आजिसहेब

हो मग मी आहेच लाडाची.......नंदिनी राजच्या गळ्यात हाथ टाकतच होती की राज तिच्या कडे थोडा चिडून बघत होता........त्याला तस बघून तिने हाथ मागे घेतला....नंदिनी चूप बसली .....तिला माहिती होत राज आता तिच्यावर चिडला आहे ते........

राज चिडला आहे बघून आजीने पण चान्स मारला.....

हे आता रोजचंच झालं आहे.......... दर दोन-तीन दिवसाआड हे मारा पिटी करून घरी येत असते.,......... आजी साहेब वैतागत बोलत होत्या

हो तर आपली सुरक्षा करायला नको.........नंदिनी

कोणाला धाड भरलय तुझी खोड काढायची........आजिसहेब

माझी नव्हती काढली कोणी...... मी कॉलेजमधून येत होती तर ते रस्त्यावर एका मुलीला त्रास देत होते....नंदिनी

दुसऱ्यांच्या गोष्टीत पाय अडकवत जा आणि घरावर गोटे घेऊन या तुम्ही.....आजिसहेब

कोणी मुलींना त्रास देत आहे...... त्यांची छेड काढत आहे आणि मी तिथून जाताना फक्त बघत राहू काय....???.... मला नाही जमणार ते......मी तर अजून मारणार......कोणाची हिम्मत च कशी होते मुलींना हाथ लावायची......त्यांच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे काय मुली म्हणजे............नंदिनी चिडत होती

ऐकायचाच नाही ......करा जे करायचे ते.........आजिसहेब...

चंडिके......माते....... कंट्रोल कंट्रोल......राग कंट्रोल.......राहुल

आजिसहेब आणि नंदिनिकची वादावादी संपुष्टात येताना दिसत नव्हती म्हणून राहुल मध्ये आला..... तस त्याच आता हे रोजचंच काम झालं होत.......

नंदिनी ला उद्या पासून कॉलेज मध्ये ड्रायव्हर सोडायला नी पिकप करायला जाईल.........बाईक keys.???........म्हणत त्याने हाथ पुढे केला

मी ड्रायव्हर सोबत ना.............नंदिनी बोलणारच की राज ने परत एक कटाक्ष टाकला नी keys मागितल्या....

नाही....नको देऊस....मान हलवत...नंदिनी राहुल खिशातून keys काढतंना बघून बोलली......

राज ने राहुल कडे बघितले .... राहुल ने चुपचाप त्याच्या हातात नंदिनीच्या बाईक चा keys दिल्या.........नंदिनी ने खाऊ की गिळू नजरेने राहुल कडे बघत होती...

राज keys घेऊन काही न बोलता आपल्या रूम मध्ये निघून गेला.....

********

नंदिनी........नंदिनी आता बरीच समजदार मोठी झाली होती.......आता ती १८ वर्षाचा मुलीसारखी वागत होती.........राज ने तिच्या फिजिकल ग्रोथ वर खूप लक्ष दिले होते...... जिम्, योगा, मार्शल आर्ट्स, कराटे.... असं सगळ्यांमध्ये ती चांगलीच ट्रेन झाली होती त्यामुळे ती आता 

शरीराने पण चांगलीच मजबूत झाली होती...........आता ती कोणालाच घाबरायची नाही.....फक्त राज ला सोडून.....त्याचा एका शब्दावर ती सगळं ऐकायची.....

बोलण्यात सुद्धा भयंकर हुशार झाली होती.......तोडीस तोड होती......कुठे गोड बोलून काम काढायचं नी कुठे राग ...आधीपेक्षा पण हुशार झाली होती.......घरात सगळ्यांची लाडकी होती......आजिसहेबांची तर तू तू मैं मैं वाली पार्टनर होती .....दोघी घरात आहेत आणि घर शांत असेल असे व्हायचेच नाही...बाकी कोणाचा काही प्रोब्लेम नव्हता......स्वतःची काम, बाहेरची काम सगळं ती करायला लागली होती, आता ती दुसऱ्यांवर अवलंबून नव्हती.......तिला रात्रीतून कधीतरी एखाद्या वेळेस  स्वप्न पडायची.......आपल्यासोबत अस काही झाले आहे असं काहीसे तिला वाटायचं........पण तिची आधीची मेमोरी आली नव्हती.....

नंदिनी च ड्रॉइंग खूप चांगलं झालं होते.......तिची fine arts साठी कॉलेज मध्ये एडमिशन घेतली होती..... तिचं 12 वी आधीच झालं होते त्यात चांगले पर्सेंटज होते आणि आता ती बोलायला समजायला पण नॉर्मल होती त्यामुळे तिला आरामात एडमिशन मिळाली होती.....

तिचा कॉलेज मध्ये पण चांगलाच मोठा ग्रुप झाला होता....तिची तिथे पण खूप धिंगा मस्ती चालायची.....स्वतःच्या भरवश्यावर काहीतरी बनून दाखवायच्या नावाखाली ती बिस्नेसमन shriraj deshmukh ची बायको आहे असे कोणाला सांगितले नव्हते.......त्यासाठी कारणही तसेच काही झाले होते....

ताई.....काही मदत कर......पैसे दे.........एक भिकारी....राज आणि नंदिनी बाहेर मार्केट मध्ये असताना एका भिकारी नंदिनी जवळ पैसे मागायला आला 

राज तुझी पर्स दे..........नंदिनी ने त्या भिकारी ला बघून राज ला त्याची पैशांची पर्स मागितली ....राजने काही न बोलता तिला पर्स दिली.....नंदिनी ने त्यातून काही नोटा काढल्या नी त्या भिकारी ला दिल्या ........भिकारी ने त्या घेतल्या नी तो चालला गेला......नंदिनी ला तशी पण लहानपणापासून च मदत करायची सवयच होती....

दोघंही कार मध्ये येऊन बसले.......

नंदिनी तू त्याला पैसे का दिले..........राज

त्याला गरज होती..... बघितलं नाही लहान मुलगा होता त्याच्याजवळ......तो जेवला नव्हता दोन दिवसांपासून म्हणून दिले.........नंदिनी

नंदिनी असे कोणावरही विश्वास ठेऊन तू असे पैसे वाटणार काय.........राज

पण राज मी तर मदत केली त्याची.........ऐवधा का चिडतो तू...........थोडेसे पैसे दिल्याने तुझे कमी नाही होणार........नंदिनी

तुला माहितेय काय पैसे कमावणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये.......आणि मदत करायचीच असेल तर पैसे कमावून आन.......राज

अरे पण तुला पैसंची कुठे कमी आहे.....तुझं ऐवघं नाव आहे....पैसे आहेत.........तू का हे पैसे पैसे घेऊन बसला आहे.......तू पण तर करतो ना मदत.........नंदिनी

नाव कमावणे, पैसे कमावणे सोपी नाही आहे नंदिनी......तुला त्याची किंमत कळत नाही आहे..........स्वतःच नाव बनऊन दाखव म्हणजे कळेल...किती कष्ट करावे लागतात ते.........राज चिडत बोलत होता..

राज आता तू उगाचच चिडतो आहे........ठीक आहे मी माझं नाव बनाऊन दाखवेल......ते पण तुझ्या नावाचं वापर न करता.......नी तुझ्याच कंपनी मध्ये येऊन जॉब पण करेल...... .challenge........ नंदिनी पण थोडी रागात बोलली आणि मान वळाऊन खिडकीतून बाहेर बघत होती..... राज कार चालवत होता....

याला काय झालं अचानक.......हा का इतका चिडतो आहे......नंदिनी मनातच विचार करत होती...

नंदिनी ने ज्या भिकारी ला मदत केली होती.....काही वेळा नंतर राज ला तो चहा टपरीवर सिगरेट पितांना....काही लोकं सोबत मस्ती करताना दिसला होता....  दिसला होता.......ते बघून राज चे डोकेच फिरले होते......त्याला तर आधीच राग आला होता....इतकी हाठपायाने चांगली लोक भोळ्या भाबड्या लोकांचा उपयोग करतात..... फिजिकली dissable असल्याचे नाटक करतात.....लहान मुलांचा गैरवापर  करतात....मुलांची चोरी .........म्हणून त्याला भिक देणे अजिबात आवडत नव्हते.......गरजूंना मदत करणे वेगळे ......पण ही अशी भिक देऊन या लोकांचा व्यापार मध्ये हातभार लवण्यासारखेच होते........आणि नंदिनी ने मदत केलेल्या व्यक्तीला ठीक असलेले बघून त्याला राग आला होता......आणि तोच नकळत नंदिनिवर निघाला होता......पण नंदिनी ने मात्र ते खूप मनाला लाऊन घेतले होते आणि त्यातूनच राज च नाव न वापरता तिला काहीतरी करून दाखवायचे होते......आणि म्हणूनच कॉलेज मध्ये सुद्धा कोणालाच माहिती नव्हते नंदिनी राज ची वाइफ आहे ते ......आधी राज ने तिला समजावण्याचा बराच प्रयत्न केला ....रागात बोललो, मनातून काढ वैगरे.......पण मग खरच तिला काही करायचं होत आणि त्याला तिचा आत्मविश्वास कमी करायचा नव्हता.... त्याने तिला परमिशन दिलं होत ................

नंदिनी ने fine arts कोर्स मध्ये एडमिशन घेतली होती.......फ्रेंड्स सोबतच कॉलेज ला जाणं येणे असायचे.......कुणाला काही त्रास झाला की नंदिनी ला ते बघवायचे नाही आणि प्रत्येक ठिकाणी मॅडम मदतीला उपस्थित........आणि बोलून कोणी ऐकले नाही की मारामारी..........तर आज जरा जास्तीच मारामारी झाली होती......म्हणून राज रागावला होता.....पण रागावला असला तरी नंदिनिकडे तो दुर्लक्ष नव्हतं करत........आणि जेव्हा राहुल फोन करून सांगितले नंदिनी ला लागले आहे तो लगेच घरी आला होता..........तिला ठीक आहे बघून आणि मेडीसिन लाऊन तो वरती आपल्या रूम मध्ये निघून गेला होता....

घ्या सांभाळा आता.........त्याला राग यायला भाग पाडता तुम्ही नंदिनी..........आजिसहेब बोलून आतमध्ये चालल्या गेल्या..

तू का दिली त्याला keys........ तुला माहिती ना आता तो देणार नाही.........नंदिनी राहुल चा पाठीत एक ठुसा मारत बोलली

हो.....म्हणजे मग त्याने माझ्या पण गाडीची keys घेतली असती..........राहुल

Huu..... नंदिनी ने वाकडं तोंड केले....

Huu त huu..... जा बघ आधी...... पण सांभाळून , आज पारा चांगलाच चढला आहे .........राहुल

माहिती आहे.........नंदिनी आपल्या रूम मध्ये गेली......आणि राज चा राग कसा घालवायचा याचा  विचार करत बसली........

हो.......आता राज आणि नंदिनीची रूम वेगवेगळी होती.......नंदिनी लांजाशी जशी समज येत होती......तिला राज पुढे  अक्वरड वाटायला लागले होते.......जेव्हा पासून तिला पुरुषी रूप कळायला लागले होते तेव्हा पासून त्याच्या समोर कपडे घालने......त्याच्या सोबत झोपणे थोड अक्वरड वाटत होते......basically तिला स्पेस देणे काय असते ते समजायला लागले होते.......

आधी ती एकच रूम पण वेगवेगळ्या बेड वर झोपायचे......पण नंतर तिने माझी रूम पाहिजे म्हणून हट्ट पसरला होता.......घरात आई आजिसहेबांना नव्हते आवडले ते......त्यांना नवरा बायकोचं असं वेगळ्या रूम मध्ये राहणं पटलं नव्हते ......पण राज ला तीच्यातले बदल जाणवत होते....जशी हळू हळू एखादी मुलगी मोठी होते नि हळू हळू तिला सगळ्या भावना कळायला लागतात तसेच तिच्यासोबत होत होते....तिला स्त्री आणि पुरुष वेगळे आहे हे कळायला लागलं होते........ती त्याच्याकडे मित्र चा नात्याने बघत होती.....नवरा बायको वाली किंवा प्रेम वाली भावना तिच्या मनात नव्हत्या........तिला गर्ल फ्रेंड बॉयफ्रेंड असे थोडीफार कळत होत......तिच्या कॉलेज चा ग्रूप मधून वेळोवेळी असे नॉलेज भेटत होते.......पण तीच हृदय प्रेम वाल्या भावानेपासून दूर होते......राज ची काळजी , त्याच्या विषयी प्रेम तिच्या मनात होते.....पण हे तेच प्रेम आहे हे तिला अजून कळले नव्हते.......तिच्या भावनेचा respect ठेऊन त्याने घरच्यांना समजावले होते.....आणि स्वतः दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट झाला होता.......आधी ची रूम तर त्याच्या नंदिनीची च होती.....ती तिच्या रूम मधून बाहेर जाणार नाही त्याने सगळ्यांना सांगितले होते......आणि म्हणूनच तो नंदिनीच्या बाजूला असलेली रूम मध्ये शिफ्ट झाला होता........दोघांच्या रूम ची बालकनी एकच होती......आणि नंदिनी तिथेच झुल्यावर बसून अधून मधून राज चा रूम मध्ये वाकून बघत त्याचे हावभाव बघत त्याचा रागाचा अंदाज घेत बसली होती......आणि त्याचा राग कसा घालवायचा नी त्याच्याकडून बाईक ची चाबी कशी मिळवायची विचार करत होती.....

राज सोबत बोलून बघव विचार करत तिने राजच्या बल्कनी चे दार ठोठावले......राज ने एक नजर तिच्याकडे बघितले आणि परत तो लॅपटॉप मध्ये घुसून बसला......त्याने बालकनी चे दार उघडले नाही.....

अरे यार हा फारच रागात दिसत आहे.....दार पण उघडत नाहीये.........नंदिनी विचार करत होती

काय मग,  डॉन बोलला काय.........राहुल

नाही न...........फारच हट्टी आहे हा...........नंदिनी

हो ...मग.....तुझ्याकडून शिकला आहे हट्टपणा........आधी शहाणा होता बिचारा........राहुल

बिचारा ....आणि हा......?? डॉन.... ..,...डोळे फुटले तुझे.......बरोबर आहे तुझे डोळेच खराब आहेत.....तुला तर बंदर पण सुंदर दिसते........नंदिनी

ये पर्सनल जाऊ नको हा........gf आहे ती माझी.....राहुल

हो.....तेरावी...........नंदिनी

हा तर काय झालं......gf ही gf असते ... आणि तुला काय माहिती ग ती सुंदर आहे की बंदर.....राहुल

बघितले मी........ हॉटेल मध्ये.......त्या बंदरी ला....तुझ्यासोबत........तुला काय वाटते....मल कळणार नाही........मी माझ्या फ्रेंड्स सोबत तिथेच होती तेव्हा........नंदिनी

ये बंदरी नको बोलू तिला........राहुल

बोलेल.....काय करशील........?? ....तसेही ती तुझं फायदा घेत आहे....... सीरियस नाही , प्रेम बिम नाही तीच.......नंदिनी

हो जसे काही तुला खूप कळते प्रेम म्हणजे.....मला सांगते आहेस...........राहुल

माहिती नाही पण माझं प्रेम हे असं नसणार आहे येवढे माहिती मला.......त्या बंदरी सारखे fake नसणार आहे.......स्पेशल असणार आहे..........नंदिनी

ये तू इथे माझा ब्रेकअप करायला बसली की......राजला पटवायला.........???...राहुल

दोन्ही........नंदिनी

हे काय खीसुर पुसुर सुरू आहे.......नीट जेवण करा आधी........आजिसहेब 

नंदिनी आणि राहुल डायनिंग टेबल वर जवळ जवळ बसून जेवण कमी नी खुसुरपुसुर च जास्ती करत होते..........राज मात्र जेवता जेवता या दोघांना बघत होता......

बोकांबो इकडेच बघत आहे...... जेवण कर चुपचाप......नंदिनी 

बोकांबो भयंकर रागात दिसतोय.....तू पण चुपचाप बस आता.......राहुल

नंदिनी ने कसेतरी तोंड केले....,

नंदिनी ने दोन तीन दा राज ला स्मायल देऊन बोलायचा प्रयत्न केला होता.....पण त्याने काही रिस्पॉन्स दिला नाही......

राहुल आणि नंदिनी च रात्री जेवताना हेच चालायचं......जेवण कमी नी गप्पा जास्ती.....दिवसभर घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या नाही नि एकमेकांची खीचाई केली नाही की दोघांचं जेवण पचायच नाही......

रात्री जेवताना च सगळे एकत्र असायचे बाकी तर सगळ्या वेळ सगळे आपल्या कामात बिझी असायचे......त्यामुळे नंदिनी ला सगळे रात्री च भेटायचे....आणि मग ती आठवाऊन आठवून गप्पा काढायची......जेवतांना चूप बसायचं आजिसहेबा च वारंवार सांगून सुद्धा नंदिनी ला मात्र बडबड नी गप्पा केल्या शिवाय जेवण घश्या खाली उतरायचे नाही......

जेवण आटोपून सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले.....राज सुद्धा नंदिनी सोबत काही ना बोलता निघून गेला.......

रात्री नंदिनिबला बऱ्याच वेळ झोप येत नव्हती.....राज सोबत बोलायचं प्रयत्न केला होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता......

नंदिनी ला एक आयडिया आली आणि तिने एका पेपर वर काही लिहिले.....नी तो पेपर राज चा रूमच्य दारा खालून आतमध्ये सरकवला.....आणि आपल्या रूम मध्ये जाऊन झोपली.....

.राज नेहमीच दार लोटून ठेवायचा कधीच लॉक करत नव्हता रात्री झोपताना.....नंदिनीला रात्री कधी भीती वाटली, घाबरली तर ती राज चा रूम मध्ये सोफ्यावर जाऊन झोपायची....म्हणून राज त्याचा रूम च दार कधीच बंद करायचं नाही.........पण आता त्याने मुद्दाम बंद करून ठेवला होता.....

राज ऑफिस चे काम करत बसला होता.....तेवढयात त्याला दारा खालून येणारा कागद दिसला......थोड्या वेळाने जाऊन त्याने तो उचलून आणला...

डिअर डॉन.....मग ते खोडल होत

डिअर राज,

सॉरी ना.....

पण राज तूच शिकवलं ना मला की कोणाला घाबरायच नाही....मुलींची बायांची respect करायची.....ते त्रासात असतील तर मदत करायची.......मग मी तेच तर करत होते....हा म्ह्णजे ती मुलं....हो थोडे गुंड सारखेच होते.....पण ते त्या मुली ला त्रास देत होते......मग मी तिला तशीच कशी बघू शकत होते.......आजूबाजूची पण loka भ्याड च होती.....फक्त बघत उभे होते.....काही तर व्हिडिओ आणि फोटो काढत होते मदतीला यायचे सोडून....त्यांना पण दिल्या ठेऊन मी.........ती गुंड दिसत तशी होती ...पण मारायला गेले तर फुसकीच निघाली.....खरंच मी चांगलच हॅण्डल केले आहे.....तू पण माझ्या जागेवर असता तर तू पण तेच केले असते.......तुझा विश्वास नाही काय माझ्यावर.....

राज , बोल ना प्लीज.......मला झोप नाही येत ना तुझ्या गूड नाईट शिवाय........

Yours sincerely, obidiently ????????

Nandini????

आणि तिने आपल्या नावाखाली दोन दात पुढे आलेला मोठा smiley काढला होता........राज लंते बघून हसायला आले......

काम आटोपून तो नंदिनी चा रूम मध्ये गेला....तर नंदिनी झोपली होती.........तो तिच्या जवळ गेला......नंदिनी चा निरागसपणा थोडासाही कमी झाला नव्हता.......राज खूप वेळ तिच्या कडे बघत होता.....त्याने तिच्या अंगावरचे पांघरुण नीट केले....त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला नी केसांवर किस केले

गुड नाईट सोन्या.......राज च्या आवाजाने झोपेतच तिच्या ओठांवर स्मायल आले.........तिचा तो हसरा चेहरा डोळ्यात साठाऊन ...तिच्या रूम च दार बंद करून तो आपल्या रूम मध्ये जाऊन झोपी गेला....

********

क्रमशः

🎭 Series Post

View all