Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 40

Read Later
नंदिनी...श्वास माझा 40

भाग 40

राज...राज...राज.....आबा ....आबा.....राज.....नंदिनी घाबरून आवाज देत होती......आणि आबा बेडवर पडले....

नंदिनी........... आजिसहेब

तोपर्यंत घरातले सगळे आबांच्या रूम  मध्ये पोहचले होते......

काय झालं.........राज खालची गडबड ऐकून धावतच खाली आला.........

आबा बेड वर पडले.....त्यांना बरे नव्हते वाटत...मी पाणी देत होती तर्वते बेड वर पडले....नंदिनी रडतच बोलत होती.....ती खूप घाबरली होती.....वरतून आजिसहेब ची बोलणी खात होती.....

नंदिनी ने कुठलेतरी औषध दिले......नी त्यांनतर हे असे झाले.........आजिसहेब....

राज ने एकदा नंदिनिकडे बघितले नी तो आबांजवळ गेला......

आबा......अहो उठा.......राज ने घाबरतच त्यांचे श्वास नी हृदयाचे ठोके चेक केले.....

डॉक्टर येतीलच मी फोन केलाय.......आणि राहुल आणि बाकीच्यांना पण फोन केलाय ते पण निघाले आहेत येतीलच इतक्यात........काकी

नंदिनी बाहेर जा........मला तोंड ही बघायचे नाही....यांना काही झालं ना तर या घरात उभ सुद्धा राहू देणार नाही......आजिसहेब खूप रागात होत्या...

मी ...मी काही नाही केले......आबा काही नाही झाला ते ठीक होतील.........नंदिनी रडत होती.......

तुम्हीच दिला ना त्यांना औषध...... आजी साहेब

हो.......नंदिनी

तेवढ्यात डॉक्टर आले आणि ते आबांना चेक करायला गेले........ सगळे तिथे बेडच्या बाजूला उभे राहून डॉक्टरांकडे आणि आपण कडे बघत होते

यांना कुठेतरी औषधाच्या साईड इफेक्ट झाला आहे.... ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे..... मी ॲम्बुलन्स ला फोन करतो.......डॉक्टर

डॉक्टर काही सिरीयस नाही ना....... रविकांत

यांनी कुठला औषध आता घेतलं होत........डॉक्टर

नंदिनी कोणता औषध दिला होत आबाना......राज

नंदिनी बॉक्समधून एक टेबलेट्स काढून दिली.......

या तर खूप हाय पावर झोपेच्या गोळ्या दिसत आहेत....... त्यांच्या बाकीच्या मेडिकेशन सोबत या गोळ्या सूट होत नाहीत म्हणूनच ते बेशुद्ध झाले आहेत........ त्यांच्या टेस्ट करूनच काही सांगता येईल .....डॉक्टर

डॉक्टरांचा बोलणे ऐकून सगळे घाबरले.....

आबा उठाना........नंदिनी

या नंदिनी मुळे झालं हे सगळं...... हिने दिले त्यांना औषध........... आजी साहेब खूप चिडत होत्या

मी नाही दिले...... मी फक्त मेडिसिन चा बॉक्स दिला होता आबांना आणि पाणी आणायला गेले होते तिकडे.......नंदिनी

खोटं बोलू नकोस..........

आजीचा आणि नंदिनीच्या कंटिन्यू वाद सुरू होता बाकीच्यांना तर काय बोलावं काही कळतच नव्हतं......राज चे डोकं सुन्न झालं होतं...... तेवढ्यात ॲम्बुलन्स आली आणि आबांना डॉक्टर कडे हॉस्पिटलमध्ये न्यायला घेऊन गेले.....

त्यांच्या पाठोपाठ बाकी सगळे जायला निघाले

मी पण येते........नंदिनी

नंदिनी आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे आमच्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नका....... काही गरज नाही यायची.......आजैसहेब

मी येते.... मला आबांना बघायचं आहे ....

नाही बोललेलं कळत नाही काय.........राज अजूनपन तुम्हाला फक्त नंदिनी च दिसत आहे काय.....इकडे तिच्या मुळे तुमच्या आबासाहेब ची तब्बेत इतकी बिघडली आहे......पण तुम्ही बायकोची च बाजू घ्या......तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला.........आजिसहेब

आजिसहेब अस नाही आहे ....नंदिनी घरीच थांबायचं तू......राज

मला आबा ना बघायचे.........राज मला पण घेऊन चल मी पण येते.......नंदिनी

आजी आणि नंदिनी वेळेवरच इतका वाद घातला होता की राज चे डोकंच काम करणे बंद झालं होतं...... नंदनी ऐकत नाही बघून आणि हॉस्पिटलमध्ये जायला वेळ होता बघून राजनी नंदिनीला गालावर हात उचलला........आणि तो इतका जोराने लागला होता की नंदिनी पलीकडे जाऊन खालीच पडली होती...........

नंदिनी गालावर हात ठेवत अश्रू भरल्या नजरेने राज कडे बघत होती.....

राज चा पण डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या .....त्याने एक नजर छायाताई कडे बघितलं आणि नजरेनेच त्यांना काहीतरी खुणावले आणि तो बाहेर पडला.........

******

डॉक्टरांनी गरज असलेल्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या ... औषधांचा खूप स्ट्रॉंग इफेक्ट त्यांच्यावर झाला होता......... त्यामुळे ते शुद्धीत आल्यावरच काय ते सांगू शकणार होते.......

सगळे तिथेच हॉस्पिटलमध्ये तुमच्यासमोर बेंचवर बसून बाबा शुद्धीवर येण्याची वाट बघत होते.....

आबा लवकर बरे व्हा....... मला खूप गरज आहे तुमची...... राज आबांच्या रूमच्या समोर दाराच्या काचेच्या चौकटी मधून आत मध्ये झोपलेल्या आबांना बघत होता.......

हे काय होत आहे...... सगळेच हातातून निसटला सारखं होत आहे ........ हे सगळेच माझे आपले आहे........ एकाचा हात पकडला तर दुसऱ्याचा हात सुटतो आहे........ काय करू मी....... देवा ही काय परीक्षा घेतोय माझी... ..
आज कसा काय माझा स्वतःवरचा तोल गेला..... काय नाही सांभाळू शकलो मी स्वतःला......... असा कसा मी नंदिनी वर हात उचलला......... माझा पूर्ण विश्वास आहे की यात नंदिनीची काही चूक नाही........ पण ते औषध...... राजच्या डोक्यामध्ये असंख्य विचार सुरू होते.....

जवळपास तीन तास होत आले होते पण अजूनही आबा शुद्धीत आले नव्हते ......आता मात्र सगळ्यांच टेन्शन खूप वाढत चाललं होतं.......

राज जर यांना आज काही झालं ना तर मी नंदिनीला आणि तुला कधीच माफ नाही करणार.......... हे सगळ नंदिनी मुळे होत आहे आणि नंदिनी या घरात फक्त तुझ्यामुळे आहे..........आजिसहेब

आईसाहेब काही होणार नाही तुम्ही बसा इकडे .......काकी आधी साहेबांना समजावत होती.......

आधीच आबांना बरं नव्हत त्यात आजीचं असं बोलणं त्याच्या मनाला फार टोचले होते....... तो चुपचाप उभा होता....
भाई सगळ ठीक होईल...... राहुल राज चा खांद्यावर हात ठेवत बोलला....

ह्म्म..........

रात्री जवळपास नऊ वाजताच्या दरम्यान आबा शुद्धीत आले......... डॉक्टरांनी आम्हाला चेक करून सगळं ठिक असल्याचं सांगितलं........ तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला...... सगळे आबांना भेटायला आत मध्ये गेले राज मात्र एका कोपऱ्यामध्ये उभा राहून बघत होता...... आबा ठिक आहे म्हटल्यावर त्याच्या जीवात जीव आला होता......

आबा आम्ही किती घाबरलो होतो....... आता बरं वाटत आहे ना......... राहुल आबांजवळ जात बोलला....

हो आता बरं वाटत आहे...........

पण हे असं अचानक..........रविकांत

अरे दुपारी जीव कासावीस व्हायला लागला होता...... माझ्या औषधांची वेळ चुकली...... दुपारी नंदिनी रूममध्ये आली तर तिला औषध मागितला.,.... तिने मला डब्बा दिला आणि ते पाणी आणायला गेले मी त्यातून औषधांची बॉटल काढली आणि औषध घेत होतो तेव्हा मला नंदिनी म्हणाली सुद्धा की आबा रोज घेत आहे ते औषध नाही आहे..... ती मला म्हणाली पण की मी राजला बोलावून आणते........ पण मला इतका चक्कर आल्यासारखं वाटत होतं की मला काहीच सुचलं नाही आणि मी तिला म्हणालो की नाही हेच माझा औषधे आणि मी ते खाऊन घेतलं आणि गडबडीमध्ये बहुतेक दोन गोळ्या घेण्यात आल्या होत्या............ आणि त्यामुळेच हे बहुतेक सगळे झाल असाव...

आबांचं बोलणं ऐकून त्याच अवसानच गळाले आणि तो मटकन तिथे असलेल्या खुर्चीवर बसला......

भाई are you okay....... राहुल राज जवळ येत बोल ला

राजनी होकारार्थी मान हलवली आणि तो शांतपणे एकाच ठिकाणी बसून होता.....

डॉक्टर म्हणत आहेत की आज रात्रभर येथेच राहावे लागेल..... तर तुम्ही सगळे जा मी थांबतो इथे.......रविकांत

मी थांबतो.........राज

एकचं थांबता येते येथे......  डॉक्टर आनंद माझी फ्रेंड आहे त्यामुळे काही लागला तर मी लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो...... त्यामुळे मी थांबतो तुम्ही जा सगळे.......रविकांत

आबा लवकर बरे व्हा...... राज आबांचा हात आपल्या हातात घेत बोलला....

राज नंदिनी........आबा

ती घरी आहे.......राज

ठीक आहे ना ती....आबा

राजनी फक्त मान हलवली..... काळजी घ्या आबा......

सगळ्यांना रविकांत चे बोलणं पटलं असते म्हणून सगळे घरी परत निघून आले.......

नंदिनी..........राज ने घरात पाय ठेवल्या ठेवल्या समोर असलेल्या छाया ताई ला विचारले...

झोपल्या आहेत थोडा वेळ झाला......... छाया

जेवण.......राज

नाही........आबा ना बघायचे येवढेच बोलत होत्या..... छाया

राज तिथेच सोफ्यावर बसला........नंदिनी वर हाथ उचलल्याचे सतत त्याचा डोक्यात सुरू होते.......नंदिनी चा तो चेहरा सतत त्याच्या डोळ्यापुढे येत होता .......आपण नंदिनी सोबत किती चुकीचे वागलो ....याच भावनेने त्याला खूप गिल्टी वाटत होते......पण काय करणार गोष्ट तर घडून गेली होती......आता पछतावा करून काय होणार होते......त्याने आपले दोन्ही हात चेहऱ्यावरून केसांवर नेले नी सुस्त आपल्याच विचारात सोफ्यावर बसला होता...

राज जेवायला चल ....आई त्याला बोलवायला आली

भूक नाहीये...... ..

किती थकल्यासारख दिसतोय...खाऊन घे थोड काही......

राज विषाद पणे हसला........

राज काय झाला......असा का हसतोय .......आई

पौरुषत्व सिद्ध केले ना आज मी बायकोवर हाथ उचलून........कसा काय थकवा येणार मला......फार अभिमान वाटावा अस वागलो आहो ना मी..........

अरे पण..........आई

पण काय आई......... घरात काही चुकीचं घडलं......माणूस रागात असला.......कोणाला तर काहीच बोलता येत नाही......मग बायको बरी हक्काची असते......राग काढायला........ती बरोबर आहे की नाही जाणून घेण्याची गरज च पडत नाही ना ......चारचौघात तिच्यावर हाथ उचलून.....तिचा अपमान करून....घालून पाडून बोलून.....एक नवरा - मुलगा आपलं पुरुषत्व सिद्ध करतो .....आणि मग घरातल्यांना खूप समाधान होते.....नाही असे वागले तर याला फक्त बायकोचं पाहिजे ...आम्ही तर कोणीच नाही लगेच सगळी लोक प्रतिक्रिया द्यायला लागतात..... घरची loka म्हणून त्यांना काही बोलता येत नाही.....बायको बरी असते ना आपला राग काढायला.....आज मी माझं पुरुषत्व सिद्ध केले.........आज मी हाथ उचलला नंदिनिवर.......तिची काहीच चुकी नसतांना.....ती बोलत होती पण मी तिच्या वर विश्वास नाही दाखविला.....ती आबांची काळजी घेत होती........आणि मी.....मी काय केले.........तो आपल्या हाठाकडे बघत होता ......आणि आपला हाथ भिंतीवर आपटला.......

त्याला होणारा त्रास सगळ्यांना कळत होता पण कोणाला काय बोलावे काहीच कळत नव्हते.....आजिसहेब तर चुपचाप त्याला बघत होत्या......

भाई....प्लीज.......राहुल ने जाऊन त्याला मिठी मारली.....

भाई नको त्रास करून घेऊ स्वतहाला.......नंदिनी खूप समजदार आहे...ती घेईल तुला समजून......तिच्या पेक्षा जास्त तुला कोण समजून घेते.........ती जितकी बालिश आहे तितकीच तुझ्या बाबतीत खूप समजदार आहे......आणि खर म्हणजे तीच खूप प्रेम आहे तुझ्यावर नी आबावर पण.......राहुल राज ला समजावत होता ...

ह्म्म..........राज वरती त्याचा रूम मध्ये जायला निघाला.....

थोड जेवण करून घे .......आई

इच्छा नाहीये........तुम्ही जेवण करा नि आराम करा.....राज बोलून रूम मध्ये निघून आला...

नंदिनी बेड वर एका कडावर पाय पोटा जवळ घेऊन झोपली होती...केस सगळे तिच्या चेहऱ्यावर आले होते........राज तिच्या जवळ जाऊन बसला......त्याने अलगदपणे तीचेचेहाऱ्यावरचे केस तिच्या कानामागे केले........नी तिला बघितले तर त्याचा जीव फार हळहळला......त्याला स्वतःचाच खूप राग आला........

त्याचा हाथाची चार बोट तिच्या गालावर उमटली होती.....तिचा गाल लाल झाला होता.....तिचे अश्रू गलावराच सुकले होते.......चेहरा अगदी मलून दिसत होता.......त्याने आपल्या थरथरत्या हाताने तिच्या गालावरून हाथ फिरवला............त्याचबरोबर त्याच्या डोळ्यातले पाणी त्याच्या गालावर ओघळले...........

त्याने क्रीम आणले नी हळूवारपणे तिच्या गालाला लावत होता.........

राजsss.......... राज चा हाथ तिने हातात पकडला.........त्याच्या स्पर्शाने ती जागी झाली.......आणि उठून बसली......

राज काय झालं...... तू रडत का आहेस ......ती आपल्या नाजूक हाताने त्याचे डोळे पुसत म्हणाली........

नंदिनी I Am sorry'......... मला माफ कर.....मी खूप चुकीचे वागलो.....मी तुझ्यावर हाथ उगारला.........मला माफ कर...... तो तिचे हाथ आपल्या हातात पकडत त्यावर किस करत होता.....

राज आबा कसे आहेत........राज मला आबांना बघायचं.......मला आबांना भेटायचं........नंदिनी काकुळतीने बोलत होती

तीच ते वागणं बघुन त्याच मन खूप गहिवरून आला.........त्याला वाटले ती रागवेल....भांडेल.......रुसेल......पण तिने यातले काहीच केले नव्हते......

आबा ठीक आहेत......बर आहे त्यांना.....आता हॉस्पिटल मध्येच आहे.....उद्या सुट्टी देतील..........

मी फोन करत होते ... पण छाया काकी म्हणाली आता नको करू सगळे कामात असतील......राज मला भेटायचं त्यांना......राज मला आबा कडे जायचं.......मी त्यांना नका घेऊ म्हणाले औषध पण त्यांनी ऐकले नाही माझं.......आणि ते बेडवर पडले......राज मला बघायचं आबा ना.......ते ठीक आहे काय बघायचं.....

सकाळी जाऊ .......

नाही मला आताच बघायचं त्यांना....... राज मला बघू दे ना ते ठीक आहे ना......

ह्म्म.......जेवण नाही केलेस ना ........

मला भूक नव्हती......... चल ना हॉस्पिटल मध्ये

एका अटीवर काहीतरी खायचे.....मग......

हो.......

दोघंही खाली आले.....त्याने फ्रीज मधून भाजी बाहेर काढली नी गरम केली....पोळी सुद्धा गॅस वर थोडी शेकून घेतली....... भाजी पोळीचा एक घास त्याने नंदिनिपुढे धरला.........तिने पण आनंदाने काहीच नाटक न करता खाल्ला.....

तू पण नाही जेवला ना ......मला माहिती होते मी नाही जेवणार तर तू पण नाही खाणार काही......तिने त्याला आपल्या हाताने त्याल घास भरवला...

किचन मध्ये झालेल्या भांड्यांची आवाजाने आई बाहेर आली होती त्या दोघांना असा जेवताना बघून तिला समाधान वाटले आणि ती आत मध्ये चालली गेली..... राजने राहुल ला निरोप देऊन नंदिनीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेला..... रात्रीचे दीड वाजले होते सगळीकडे शुकशुकाट पसरला होता....... जवळपास पंधरा मिनिटात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते...... राजनंदिनी ला जवळ घेऊन आला......दोघांनी तिथं दाराच्या काचेतून आत मध्ये बघितले तर आबा स्वस्थ झोपले होते........

नंदिनी बघ ....आबा ठीक आहेत....... आता झोपले आहेत आपण उद्या येऊ.......

राज मला आबासोबत बोलायचं आहे.......

नंदिनी ते आता झोपले आहेत.....

आपण इथेच बसून वाट बघू .... आबा उठले की आपण बोलायला जाऊ........

ठीक आहे........राजला तिच मन मोडायची इच्छा झाली नव्हती त्यामुळे तो तिथेच थांबायला तयार झाला....आणि दोघेही रूमच्या समोर असलेल्या बेंचवर जाऊन बसले...... दिवसभर थकल्यामुळे बसल्या बसल्या दोघांचा डोळा लागला.....

सकाळी आबांना घरचाच चहा आवडतो म्हणून राहुल सकाळी सकाळीच साडेपाच वाजता आबांसाठी चहा घेऊन आला होता..... आबाच्या रूम जवळ येतो बघतो तर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आले.... त्याने खिशातून आपला मोबाईल काढला आणि राजनंदिनी चा फोटो क्लिक केला...... नंदिनी राज चा शोल्डर वर डोके ठेवून झोपली होती आणि राज तिच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपला होता दोघांच्याही चेहऱ्यावर खूप शांत भाव दिसत होते......

सकाळच्या चहलपहल ने राजला जाग आली...... बघतो तर नंदिनी त्याच्या शर्टाची कॉलर पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती...,. तिचा तो शांत निरागस चेहरा पाहून त्याला खूप बरं वाटलं...... आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलं......

भाई...... राहुल

आबा उठले.,......

हो........ बोलवत आहे तुम्हाला.....

नंदिनी..... उठ...आबा उतलेत....तुला बोलावत आहेत.... राज नंदिनी च्या गालावर थोपटत बोलला.....

आबा...... नंदिनी आवाज देतच आबा जवळ गेली

आबा तुम्हाला आता बरं वाटते ना......

हो एकदम फ्रेश........आबा

आबा चला आता.... घरी जाऊ आपण........

अगं हो हो..... आता डॉक्टर येतील.... एकदा चेक करतील.... मग आपण घरी जाऊ शकतो......आबा

ठिक आहे मी पण तोपर्यंत इथेच थांबेल.....
आबा तुम्ही राज ला सांगा ना काल मी तुमची तब्येत खराब नव्हती केली........ आबा राज ला रागवा..... काल त्याने येथे मला गाला वर मारलं......

राज ssss....... आबा थोडे रागातच पण हळू बोलले..

ते.....ते......राज

राज मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती.......आबा

आबा मला माहिती आहे मी चुकलो.......

नंदिनी I am sorry.... परत असं नाही घडणार...... राज नंदिनी समोर आपले दोन्ही कान पकडून उभा राहिला

नंदिनी चांगला चान्स आहे जी पाहिजे ती पनिशमेंट दे........राहुल

दहा उठाबशा..... राज तू दहा उठाबशा काढ........नंदिनी

धत...... राहुल ने डोक्यावर हात मारला...... अग तो 100 पुश-अप्स इझिली करू शकतो..... तु काय दहा उठाबशा काढायला सांगते.........राहुल

तो मला हीच पनिशमेंट देतो तुम्ही पण त्याला तीच पनिशमेंट देणार..... राज तू उठाबशा काढून दाखव

राजने छोटेसे तोंड करत सगळ्यांसमोर दहा उठाबशा काढल्या त्याची एक्सप्रेशन बघून सगळ्यांनाच हसायला आले होते नंदिनी सोबत सगळेच हसायला लागले.....

नंदिनी लगेच त्याच्या गळ्यात जाऊन पडली आणि तिने त्याच्या गालावर किस केले....... परत नाही मारणार ना

नाही..... प्रॉमिस...... राज तिला  आपल्याजवळ घेत तिच्या केसांवर किस करत बोलला......

**********

मिस्टर शशिकांत देशमुख........ राज ओरडतच त्याच्या वडिलांच्या रूम मध्ये गेला.....

राज ही काय पद्धत आहे बोलायची.........आई

आई आज तू मध्ये पडू नकोस......

तर मिस्टर शशिकांत देशमुख तुम्हाला नंदिनी घरात नको होती तर मला सांगायचं असतं...  मी आणि नंदिनी तुमच्या एका शब्दावर घराच्या बाहेर पडलो असतो...... इतका dirty गेम खेळायची तुम्हाला काहीच गरज नव्हती......

राज बेहव्ह यूर्सेल्फ........ आणि कोणता गेम......शशिकांत

हो तर तुम्हाला माहीतच नाही तुम्ही काय केलाय..... ठीक आहे तुम्हाला आठवण करून देतो......

काय .....काय केलं त्यांनी.......आई

आई तू तर चांगलीच ओळख त्यांना...... तुला त्यांनी कधीच बायकोचा मान दिला नाही....... तू गावाकडची म्हणून त्यांना तुझी लाज वाटत होती..... ते कधीच तुला  त्यांच्यासोबत कुठे नेत नव्हते..... तुला पदोपदी दुखवायचे...त्यांच्या सो-कॉल्ड स्टेटस साठी त्यांनी तुझा किती अपमान केला....... मला तेव्हा पण कळायचे पण मी काही करू शकत नव्हतं..... पण आता नाही..... आता हे घरात चालणार नाही........... आता यांनी यांची सगळी लिमिट क्रॉस केली आहेत...... माझ्या नंदिनी पर्यंत होता ठीक होतं पण ते आता आबांच्या पण जिवावर उठले होते......आमच्या मेडिसिन बॉक्स मध्ये यांनी त्या झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या.......जेव्हा मी त्या गोळ्याचे केल्या तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की या गोळ्या तर आपल्या घरी कोणीच खात नाही..... आणि मग मी सगळी माहिती काढली तेव्हा लक्षात आलं की मिस्टर शशिकांत देशमुख च्या गोळ्या घेऊन आले होते...... नंदिनीला सगळ्यांच्या नजरेत दोषी ठरवण्याचा प्लॅन त्यांनी केला होता आणि मग तिला घराच्या बाहेर काढणार होते...... काय मिस्टर देशमुख बरोबर बोलतोय ना.....

शशिकांत.......... इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही वागला  .....आजी साहेब या बाहेर उभा राहून ऐकत होत्या त्यांना खूप शॉक लागला होता.....

नाही आई साहेब....... आबांना काहीच होणार नव्हतं..... मी त्याची पुरेपूर खबरदारी घेतली होती........ मला फक्त या नंदिनीला राज चा आयुष्यातून काढायचं होतं बाकी काहीच नाही....... आणि मी असा वागणारे नव्हतो आणि माझ्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय सोडला नव्हता.......शहसिकांत

पहिले तुम्ही लावण्या सोबत  माझ्या विरोधात खूप प्लॅन केले ......ते सक्सेसफुल झाले नाही तर माझ्या बिजनेस मध्ये गडबड करायला सुरु केली........ते सुद्धा नाही जमलं तर मला ऑफिसच्या कामाने दिलेल्या पाठवून तिथे माझ्याकडे वाढवण्याचा प्रयत्न केला कारण तोपर्यंत तुम्ही नंदिनी आणि तिच्या आजी आबा ना तिथून गायब करणार होता.......राज

हो पण तू त्या नंदिनीला ऐवधुसा ताप काय आला सगळं सोडून तिकडे पळाला आणि माझा सगळा प्लॅन खराब केला.... मी तिला काहीच करणार नव्हतो फक्त ती तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही अशा ठिकाणी त्यांना पाठवणार होतो.....शशिकांत

मी जर त्या दिवशी वेळेवर नसतो पोहोचलो तर यांनी तिला आणि आजी-आजोबांना माझ्यापासून दूर पाठवण्याचा बरोबर प्लान केला होता........ आणि हे सगळे प्लांट त्यांचे वर्कआउट नाही झाले म्हणून त्यादिवशी यांनी बाबांना घेऊन हा इतका खालच्या पातळीचा प्लॅन केला...... तुम्ही तुमच्या या सो कॉल्ड स्टेटस साठी घरातल्या सगळ्यांना नेहमीच नेहमीच दुखावले आहेत...... पण आता नाही ......आता तुमच्या या डर्टी गोष्टी घरात चालणार नाहीत.... राज चांगलाच चिडला होता..... आता घर मी नाही तुम्ही सोडून जाणार.... आमचे तुमचे संबंध तुटले..........राज

हे सगळं ऐकू नाहीतर चक्कर येऊन खाली बसली..... त्यांना तर काहीच कळत नव्हतं हे सगळं काय चाललंय......

आई तु ठीक आहेस....... राजनी त्याच्या आईला नीट बसवून पाणी दिलं..... मला हे खूप दिवसांपासून माहिती होतं पण तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटेल म्हणूनच मी बोलत नव्हतं पण आता आता हे सगळ सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे.......राज

शशिकांत आम्हाला सुद्धा पहिले नंदिनी या घरात नको होती.... पहिले सहा महिने आम्हीसुद्धा थोडाफार प्रयत्न केला पण आम्ही तुमच्या एवढ्या खालच्या पातळीवर नक्कीच गेलो नव्हतो....... आणि सहा महिन्यानंतर आम्हीसुद्धा हा नाद सोडून दिला........ पण तुम्ही तुम्ही स्वतःच्या वडिलांच्या जीवावर उठलात........आजिसहेब

आई साहेब मला माफ करा माझी चुकी झाली...... मी परत असा कधीच वागणार नाही...... बाबांची तब्येत खराब झाली आणि मला माझी चुकी खरच तेव्हा कळली होती..... मला एक संधी द्या मला माझ्या सगळ्या चुका कळतात आहे.........शहसिकांत

ठीक आहे तूम्ही एवढेच बोलत आहे तर आणि सोनबा इकडे बघून आम्ही तुला एक शेवटची संधी देती पण ही शेवटची संधी असणार आहे.... जर तूम्ही परत काही केले तर मग तूम्ही आमचा कोणी नसणार आहेस...... एवढे ध्यानात ठेवा.....आजिसहेब

आजी साहेब तुम्ही यांना इतक्या लवकर कस काय माफ करू शकता......राज

राज काय करणार आईचं मन आहे ना...... म्हणून शेवटची संधी देत आहे त्यांना..... त्याचा पण घरात आपल्या तिघांनाच आता ही गोष्ट माहिती आहे बाकी सगळ्यांना माहिती पडेल तर आपोआपच सगळे त्यांचा अनादर करतील........आजिसहेब

माझा यांच्यावर अजिबात विश्वास नाही आहे....... वडिलांचे प्रेम तर त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं....... माझा यांच्या आता काहीच संबंध नाही तुम्हा सगळ्यांना जे वाटते ते तुम्ही करा पण जर का माझ्या घरातल्या  किंवा नंदिनी नंदिनीच्या केसाला जरी धक्का लागला तर मग मात्र माझ्यासारखा वाईट कोणी नसणार आहे.......... राज रागातच बोलून तिथून निघून गेला.....

*****

आबा... राहुल दादा परवा राजचा बर्थडे आहे ना....... आपल्याला काहीतरी सरप्राईज प्लॅन करावे लागेल...... नंदिनी राहुल आणि आबा बाबांच्या रूम मध्ये डोक्यावरून चादर पांघरून लपूनच आत मध्ये बसून डिस्कशन करत होते........ राहुल ला तर तिच्या अशा वागण्याची खूपच मजा वाटत होती....... दोघेही तिच्या बारिश प्लॅनमध्ये सहभागी झाले होते.....

काय...... काय चाललंय यांचे....... बाहेर दारात राज उभा होता ...आई त्याच्याजवळ येत बोलली....

वाढदिवसाचे सरप्राईज प्लॅनिंग.,..... राज हसतच बोलला.... आणि तिथून आपल्या रूममध्ये चालला गेला

राहुल दादा डेकोरेशन सामान आणायला लागेल...... केक स्नॅक्स गिफ्ट...... बापरे किती काम आहेत..... पण पैसे कुठून आणणार........ माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीत.....नंदिनी

ये कुठे चालली...... राहुल नंदिनी चादर काढून बाहेर जातात असताना बोलला

अरे माझ्याजवळ पैसेच नाही ना काही..... हे सगळं कुठून आणणार...... राज ला मागून आणते थोडेफार पैसे.......नंदिनी खुसुरपुसुर करत होती

राहुल डोक्यावर हात मारला....... आबा ला तर फारच हसू येत होतं...

अगं ये...... त्याला सरप्राईज द्यायचा प्लान करत आहे ना........ मग त्याला सर्व माहिती पडेल ना.....राज

मी त्याला खोटं खोटंच सांगते काहीतरी...... पैसे तर लागतील ना......नंदिनी

अगं तर त्याच्याच पैशांनी त्याला सरप्राईज देणार आहेस का.......राहुल

मग कुठून आणणार पैसे मी तर ऑफिसमध्ये जात नाही...... हे आबा सुद्धा घरीच राहतात........

अग पण मी तर जातो ना ऑफिसमध्ये..... माझ्याजवळ आहेत ना........ मला देतो तो तुझा राज salary........ भयंकर खडूस आहे हा तो........ थोडीतरी काही गडबड केली तर salary च कट करतो......

ए खडूस नाही बोलायचं माझ्या राजला......... नंदिनी  त्याच्यापुढे बोट करत बोलली

आली मोठी वकील त्याची...........राहुल

अरे तुम्ही दोघं..... तुम्ही भांडायला आहात की वाढदिवसाच प्लॅनिंग करायला आला आहात........ focus..... आबा

हा राहुल दादा च भांडत असतो......

बरं बरं चल आता काय करायचं ते सांग आधी......

आणि सगळे मिळून राज चा बर्थडेचा प्लॅनिंग करतात आणि सगळं नंदिनीच्या डोक्या प्रमाणे सुरू असते....

********

नंदिनी झाली काय तयार...... बाहेर जायचं .....राहुल नंदिनीच्या रूम मध्ये येt tila आवाज देत होता....

हो हो चल..........नंदिनी

कुठे चालले.........राज

Ssshhh......... नंदिनी तोंडावर बोट ठेवत राज जवळ गेली...

सरप्राईज आहे कोणाला सांगू नको...... यू नेवर नॉ.....नंदिनी

राहुल ने  तिला बघून डोक्यावर हात मारला.........
ये येडाबाई.............पुढे राहुल काही बोलणार तेवढ्यात राज ने  त्याला चूप रहा म्हणून खुणावले आणि हसत होता........

नंदिनी चल आता.... उशीर होईल......राहुल

हो..........राज तिथे  कॉर्नर मध्ये माझे सामान ठेवले आहे...... अजिबात हात लावायचा नाही .......आणखी बघायला सुद्धा जायचं नाही.... सरप्राइज...आहे........ निघता निघता नंदिनीच्या राजला इन्स्ट्रक्शन्स सुरू होते......

हो काही नाही करत...... जा तू .....आरामात ये........राज

हे बावळट...... त्याला का सांगितलं सरप्राईज आहे म्हणून......राहुल तिच्या डोक्यावर टपली मारत बाहेर जात बोलला

त्याला कुठे सांगितलं त्याच्यासाठी सरप्राईज आहे म्हणून...... नंदिनी

धन्यवाद माते.... बसा कारमध्ये........राहुल

********

राज मला झोप आली ..... चल ना झोपून दे.......... रात्री नऊ वाजल्यापासूनच नंदिनीची झोपायची कुरकुर सुरु झाली होती........

आज इतक्या लवकर कशी काय झोप आली तुला........काकी

काकी...ssshhh........ नंदिनी काकी कडे बघत डोळे मिचकावत होती....... तिला असं करताना बघून बाकीच्यांना तर खूप हसायला येत होते पण त्यांनी आपलं हसू तोंडातच दाबून ठेवले होते......राज चा वाढदिवसाच्या डेकोरेशन करायचं म्हणून नंदीने संध्याकाळपासूनच खूप घायी सुरू केली होती..... झोपल्या वरच तिला डेकोरेशन करता येणार होते तिच्या सरप्राईज प्लॅननुसार म्हणून... तिने जबरदस्ती सगळ्यांना आठ वाजता जेवायला बसवले होते........

राज लवकर निजे लवकर उठे असे आबा म्हणतात ....आपल्य शरीरासाठी चांगले असते........नंदिनी

तिचं बोलणं ऐकून राज ला गालातच हसायला आले

तुला बरं आज सगळ्या गोष्टी आठाऊन राहिल्या.......आजिसहेब

आजीसाहेब तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहात........ आणि मी गूड गर्ल आहे .....आज पासून मी सगळ्या चांगल्या गोष्टी करणार आहे.........नंदिनी

हो हो नंदिनी खूप शहाणी झाली बरं का ......चला चला झोपा सगळे ...... आबासाहेब

राज चल..... पटकन चल....... मला खूप जोऱ्याची झोप आलिये.......

बरं चला..... राज हसतच सगळ्यांना गुड नाईट म्हणून तिला घेऊन वरती गेला....... नंदिनी पायर्‍या चढता चढता खाली राहुल आणि आबांना सगळ्यांना डोळे मिचकावून गंमत सांगत होती...... आणि त्याच्यासोबत वरती गेली...

बापरे आज खूपच शहाणी झाली ग तू .......स्वतःहून जाऊन झोपून गेली.......राज

राज टाइमपास काय करत आहे.....ये बरं लवकर झोपायला.......

हो आलो....... राज तिच्याशेजारी बेडवर जाऊन झोपला....... नंदिनी ने त्याला पांघरून दिले आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हाताने थोपटत होती..... राज झोप ना लवकर किती वेळ लावतो.......

हो झोपतो आहे...... त्याने तिला आपल्या कुशीत घेतलं आणि तो झोपी गेला.....

थोड्यावेळाने नंदिनी उठून बघितले तर तिला राज झोपलेला दिसला....... तिने हळूच  त्याचा हात बाजूला केला आणि खाली आली....... राजने एकवार तिच्याकडे बघितलं आणि गोड हसला आणि डोक्यावर उशी घेऊन झोपला......

 

 

 

 

ए ठमे..... हे काय तू पर्पल आणि पिंक कलर्स चे डेकोरेशन करून ठेवलं....... बाहेरून केक आणत राज आत मध्ये येत डेकोरेशन बघत बोलला...

माझा फेवरेट कलर आहे पिंक आणि पर्पल.......नंदिनी

अग तुझा बर्थडे आहे की त्याचा बर्थडे आहे.......राज

राजचा......... तू काळजी नको करू त्याला हेच आवडेल.........नंदिनी

नंदीने डायनिंग टेबल जवळ काकी सोबत मिळून पिंक पर्पल कलर चे डेकोरेशन केले होते......

राहुल ने टेबलवर आणला केक काढून ठेवला......

 

 

हे काय हा कोणता केक आणला तू........नंदिनी

अग तूच तर बोलली होती फ्लावर फ्लावर्स केक आन........ राहुल

हो पण मी तुला चॉकलेट फ्लेवर चा केक सांगितला होता ना........नंदिनी

त्याचा पायनापल फ्लेवर आहे आवडता........ सगळं काही तुझ्या आवडीचं होणार काय....... डेकोरेशन परंतु आपल्याच आवडत्या कलरचा केलं...... atleast त्याच्या आवडीचा केक तर राहू दे आणि तू बोलली होती तसे खूप सारे फ्लावर आहेत केक वर.......

अरे भांडत काय बसला आहात तुम्ही...... बारा वाजत आले ना......... चला जा राज ला  घेऊन या .......काकी

मी घेऊन येते......नंदिनी

मी घेऊन येतो त्याला .....तुलाच नीट पायऱ्यांवरून चालता येत नाही....... परत त्याचे डोळे बंद करत कसा आणशील तू इथे थांब मी आणतो उठून.......

चला साहेब .... तुमच्या स्पेशल वन बर्थडे ची तयारी झाली आहे........ राहुल ने हसतच राज ला आवाज दिला....... नाटक कर बाबा आता सरप्राईज झाल्याचं तो त्याच्या डोळ्यावर हात ठेवत त्याला खाली आणत होता........

हाहाहाहा......हो....

सरप्राईज....... नंदिनी जोराने ओरडली आणि लाईट लागले.....

हा.........राज डोळे मोठे करत सरप्राईज झाल्यासारखा दोन्ही  गालांवर आपले दोन्ही हात ठेवत बघत होता.........

आवडले ना .....आवडले ना...... मला माहीत होतं तुला नक्कीच आवडेल....... नंदिनी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आनंदाने उड्या मारत होती........

आजिसहेब...आई....काकी  आणि नंदिनी ने साग्रसंगीत  राज चे औक्षवान केले........

चला आता लवकरात लवकर छोटी नंदिनी येऊ द्या घरात...... म्हणजे पाच जणांच्या औक्षावणाचा लाभ घेता येईल........ काकी राजला चिडवत बोलली...

काकीच्या बोलण्याने राज लाजला...... काकी परत नको सुरू करू..... ते गुड न्यूज चे प्रकरण सांभाळता सांभाळता वाट लागली होती माझी.........राज

See see someone blusshing....... काकी त्याला चिडवायला एकही चान्स सोडत नव्हती......

अरे तुम्ही किती उशीर लावता आहात...... चलाना केक कट करू.....नंदिनी

हॅपी बर्थडे टू यु .....हॅपी बर्थडे टू यु डियर राज..........हॅपी बर्थडे टू यु..... नंदिनी सोबत सगळ्यांनीच केक कटिंग सॉंग म्हटले त्यातल्या त्यात नंदिनी जरा जोर यांनीच उत्साहात सॉंग म्हटले......

राजने केकचा एक पिस कट केला आणि तो खाऊ घालणार होता की नंदिनी त्याच्या हातातला केक घेतला आणि त्याला खाऊ घातला.......

थँक यु स्वीट हार्ट....... राजने केक वरची क्रीम तिच्या नाकावर लावत बोलला....

स्वीट हार्ट...........?.......नंदिनी विचार करत बोलले

माझी गोड गोड परी......... परत राजने तिच्या गालाला थोडासा केक लावला.........

चल आता गिफ्ट द्या पटापट......नंदिनी

अरे तुला भारीच घाई झाली........... राहूल

मला बघायचंय सगळ्यात बेस्ट गिफ्ट कोणाच आहे....... मी सगळ्यात बेस्ट गिफ्ट देणार आहे.....नंदिनी

आजीने राजला गळ्यातली सोन्याची चैन दिली.... आबांनी त्याला पुस्तक दिलेत..... काकीने शोभेच्या काही वस्तू...... काकांनी त्याच्या एक्ससाइज रिलेटेड काही वस्तू दिल्या..... आईने त्याला त्यांचा तिच्या आवडीचा शर्ट दिला......

वाह वाह मज्जा आहे बाबा एका मुलाची तर........ये दाद्या तू काय दिलं.... दाखव तुझं.  गिफ्ट.......नंदिनी

माझं तर सगळ्यात बेस्ट आहे.........राहुल

नाही नाही माझ्या तुझ्यापेक्षा पण बेस्ट आहे......नंदिनी

दाखव........राहुल

तू पहिले दाखव........नंदिनी

राहुलने एक बॉक्स राजाच्या हाती दिला.... राजनेते उघडलं तर त्यात wrist watch होती ....

हा हाहाहाहा...... राज तर अशी सिंगल घडी घालतच नाही तो तर तीच घडी घालतो जी त्याची आणि माझी सेम असते........नंदिनी

माहितीये मला तुझ्यासाठी पण आणली आहे...... सेम टू सेम........ बर्थडे कोणाचा आणि गिफ्ट कोणाला...... राहुल वाकडे तोंड करत  नंदिनीला गिफ्ट दिले.....

ये ???????????????? राहुल दादा तू बेस्ट आहे...... नांदणी नाचायला लागली......... तिला नाचताना बघून बाकीच्यांना पण खूप हुरूप चढला

चला आता सगळ्या स्पेशल गिफ्ट बघायचं .....नंदिनी चल  तुझं गिफ्ट दाखv आता........आई

हो..... चला चला....... नंदिनी सगळ्यांना हॉलमधल्या एका छोट्या वॉल जवळ घेऊन आली...... त्या वॉल वर तिची ओढणी घातली होती.... तिने हळूच ती ओढणी  खाली केली........ आणि सगळे आवासून त्याच्याकडे बघत होते..... नंदिनी च गिफ्ट होतच स्पेशल....

 

 

नंदिनी ने त्या वॉल वर एक फॅमिली ट्री बनवला होता.... त्याच्या मधोमध तिने त्यांचा फॅमिली फोटो लावला होता......आणि बाजूला सगळ्या छोट्या छोट्या फोटोमध्ये राज सोबत आई..... आजिसहेब..आबा....राहुल काकी काका...... नी एक  स्वतः सोबतचा फारच क्युट .... असे सगळ्यांसोबत तिने राज चे फोटो लावले होते........

My family is the best family असा मेसेज तिने त्यावर ती लावला होता......

This is the best gift ever.... राज पुटपुटला......

अरे वा हे कसं काय सुचलं नंदिनी तुला....आबा

मला माहिती आहे राज आपल्या फॅमिली वर खुप प्रेम करतो आणि आपण सगळे त्याच्या जवळचे आहोत......नंदिनी

थँक्यू सोन्या.... राजने आपला एक हात समोर केला तशी नंदिनी धावतच राजच्या कुशीमध्ये शिरली.......

ऐ दिल लाया है बहार
अपनों का प्यार,
क्या कहना
मिले हम,
छलक उठा
ख़ुशी का ख़ुमार,
क्या कहना
खिले-खिले चेहरों से आज
घर है मेरा गुल-ए-गुलज़ार
क्या कहना
ऐ दिल लाया है बहार..

.हम तुम यूँ हीं मिलते रहे
महफ़िल यूँ हीं सजती रहे
बस प्यार की यही एक धुन
हर सुबह शाम बजती रहे
गले में महकता रहे
प्यार भरी बाहों का हार
क्या कहना
खिले-खिले चेहरों...
ऐ दिल लाया है बहार...

************

राजनंदिनीच्या लग्नाच्या तीन वर्ष नंतर............

************

प्रिय वाचक मित्रांनो......

तुम्हाला आतापर्यंतची कथा आवडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...... मनापासून आभार......

तर आता इथून पुढे आपली कहाणी थोडीशी बदलत आहे ....... इथून पुढे काय होईल राजनंदिनी च्या पुढच्या आयुष्यात..... बघा गेस करा..... कमेंट मध्ये सांगा..... बघुयात तुमची माझी स्टोरी मॅच होते का..... तोपर्यंत एक छोटासा ब्रेक........

आजचा भाग कसा वाटला  नक्की कमेंट करा.... तुमच्या कमेंटच्या प्रतीक्षेत.......

Thank you ????????

*********
 

    मिलते है ब्रेक के बाद.............
 

********

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️