Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 39

Read Later
नंदिनी...श्वास माझा 39

भाग 39

झालेला प्रसंग चा नंदिनी ला आता विसर पडला होता....ती अगदी पहिल्यासारखी घरात वावरत होती....राज चा नी घरच्यांच्या प्रेम नी काळजी मुळे ति डिप्रेशन मध्ये न जाता नॉर्मल वागायला लागली होती......फक्त त्या दिवसापासून आपण मोठा झालो आहे अशी काहीतरी कल्पना तिच्या डोक्यात भरली होती......

******

काय झालं.....सगळे असे का बसले आहात.???........राज ऑफिस मधून आत आला तर सगळे चुपचाप टेन्शन मध्ये असल्यासारखे बसले होते.....नी किचन मधुन भांड्यांचा आवाज येत होता.......

नंदिनी............तिकडे..........काकी किचन कडे बोट दाखवत बोलली......

 

 

राज तुम्हाला सांगून ठेवते......आपल्या बायकोसाठी वेगळं किचन बनवा........हे जे काही काय काय बनवायचं भूत चढलाय ना .....खूप भारी जातय......ती गीता पण ना बावळट काय काय गोष्टी सांगत होती तिला. ...... आजिसाहेब वैतागत बोलत होत्या......

आई आणि काकिंना गालातल्या गालात हसायला येतं होते.....आबा पण इकडे तिकडे बघत हसू दाबत होते......

घरातला एकंदर माहोल बघून राज चा लक्षात आले की काहीतरी गडबड झालीय ज्यामुळे आजिसहेबा चा मूड गेलंय नंदिनी मुळे......

अरे वाह गीता आजी आली होती.......कधी आल्या लंडन वरून परत....२ वर्ष होत आली तिकडेच होत्या .......राज वातावरण हल्क कराण्यासाठी काहीतरी बोलला....

अरे राज तू आला......जा फ्रेश होऊन ये.....मी नाश्ता बनवलाय सगळ्यांसाठी.........नंदिनी किचन मधुन बाहेर येत बोलली......


 

राज तर तिच्याकडे च बघत बसला......गळ्यात अप्रोन....एका हातात चमचा......वेनितून काही केस बाहेर आलेले.........एकदम कर्तव्यदक्ष गृहिणी भासत होती.......राज तर मंत्रमुग्ध होत तिला बघत होता.........

काय...........?....... राहुल डोळे मोठे करत सगळ्यांकडे कसेनुसे तोंड करत बोलला..... जो आताच राज सोबत ऑफिस मधून आला होता

ह्म्म्म........ आज सगळं नंदिनी च्या च हातचं बर का..........काकी एक भुवयी उंचावत राज कडे बघत त्याला चिडवत होत्या......

राज साठी स्पेशल बर का सगळं.......हो ना नंदिनी........काकी

हो मग.....मी बायको आहे ना त्याची........
थकला असशील ना.......खूप काम झाले असतील ना ......नंदिनी तिच्या ड्रेस चा एक कोपरा वर करत राज चा डोक्यावर घाम पुसल्या सारखी करत बोलली.......

राज ला तर काहीच कळत नव्हते ...तो तर तिच्या त्या रूपातच हरवला होता......त्याच लक्ष नाही बघून बाकी सगळे हसत होते......

हा...................ही अचानक अशी काय करते आहे.....काही भूत वैगरे झपाटले काय..........आणि हा मजनू ......हा तर हीपनोटाईज झाला.........ये ब्रो........राहुल राज ला हलवत होता.........

ह.... क......काय........काय झालं......राज बोलत होता पण बघत नंदिनी कडे होता.....

काही नाही........हिला कोण चावल म्हणटल.........राहुल

गीता मावशी...........काकी

काय.......राहुल

गीता मावशी चावल्या तिला..........म्हणजे जे सगळं शहाणपण शिकवलं......काकी ना आता हसू आवराले नाही....

राज....राहुल....जा....फ्रेश होऊन या........आई हसू दाबत बोलली......

राज ने मान हलवली नी तो वरती जायला निघाला......

राज लवकर ये...... वाट बघतोय......नंदिनी ने आवाज दिला...

नंदिनी ने सर्वांना उपमा आणि कॉफी आणून दिली.....

वाह वाह.... नंदिनी मस्तच ...... आबा तिचं कौतुक करत बोलले......आणि सगळे प्लेट कडे बघत होते.....

तू उपमा बनवला आहे की खीर......राहुल ने चमच्याने उपमा वरती उचलून बघितला..........

हा ते पाणी थोड जास्त झाल ..........नंदिनी

जास्ती.....खूप जास्ती ......राहुल मस्करी करत होता.....

ठीक आहे ....उद्या बरोबर करेल........नंदिनी

काय............. राहुल..... ब्रो हीच काही कर हा.....राहुल राज चा काना जवळ जात बोलला

आता आधी खा ना ..... गप्पा नंतर करा.......

सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते .......

राज तू .....तू खा पाहिले.....तुझ्यासाठी स्पेशल आहे .....काकी

राज ने सगळ्यांकडे बघितले नी एक चम्मच तोंडत टाकला.....सगळे राज चा फीडबॅक ची वाट बघत होते .........नंदिनी तर त्याचा अगदी त्याचा चेहरा पुढे च जाऊन बसली होती.....

राज ने खाऊन सगळ्या कडे बघितले...नंतर नंदिनी कडे....ती वाट बघत होती....

छान झालाय............राज

ये.....????????????????.......नंदिनी खूप खुश झाली

सगळ्यांनी सुस्कारा सोडला.......नी खायला घेतले.......जसा सगळ्यांनी तोंडत घास घातला सगळ्यांचे एक्स्प्रेशन बदलले.......

ब्रो.....प्रेमात तुझ्या जिभेची चव पण गेली रे ......यात तर काहीच नाही.....नो मीठ... नो तिखट.....काहीच नाहीये.......

खा चुपचाप.....नी चांगलच म्हण..........तसे पण जास्ती असण्यापेक्षा कमी असलेले बरे ......राज

कमी......काहीच नाहीये यात............राहुल

कसं झालं राहुल दादा..........आता नंदिनी ची नजर राहुल वर होती ...

हा...........टेस्टी... यम्मी......delicious...... mind-blowing...........

जास्ती होतंय........आबा राहुलच्या कानात बोलले....

Yipieee..........

छान झाले..... छान झाले......सगळ्यांनी नाईलाज स्ताव कौतुक केले ....... आजिसहेब तर सगळ्यांचे नाटक बघत होत्या....

नंतर सगळ्यांनी कॉफी घेतली......

इयु.........ये बाई किती कडू......साखर घाला यात.......राहुल

राज कडू झाली...........नंदिनी लहानसे तोंड करत बोलली

ना.....नाही......परफेक्ट आहे.......राज तिचे मन ठेवत बोलला

बघ......तू नाटकच खूप करतो......नंदिनी

ये त्याच जाऊ दे........तो या धरती वरचाच नाहीये........नी तसे पण तुझ्या हातून विष पण गोड लागेल त्याला........माझ्या कॉफी मध्ये घाल.....नाहीतर मी नाही पिणार........ राहुल

ह्म्म....दे.......

पण आज अचानक हे येवढे अत्त्याचार का आमच्यावर........राहुल

हे सगळं त्या गिती च केलेले आहे.....तिनेच भरले हीचे कान.......बायको ने कसे वागायचे शिकवले..........आजिसहेब वैतागत बोलल्या......

तेवढयात नंदिनी ला काहीतरी आठवले.....

ये राज आपण गूड न्यूज कधी देणार. आहोत...........नंदिनी

कॉफी पिता पिता राज ला जोर्याचा ठसका लागला नि सगळी कॉफी बाहेर..........तो कसेनुसे तोंड करत सगळ्यांकडे बघत होता......

आजिसहेबांनी तर डोक्यावर हाथ मारला......बाकी सगळे राज चे एक्स्प्रेशन बघून तोंड दाबून हसत होते.....राज ला तर हसावं.. रडाव की लाजव काहीच सुचत नव्हते......

घ्या आवरा आपल्या बायकोला..........दुपारी पण सगळा गोंधळ घालून ठेवला......

राज या आजिसहेब मघापासून ओरडत आहेत माझ्यावर.....त्या दुसऱ्या आजी आलाय होत्या त्यांच्या समोर पण ओरडल्या......

केलं काय विचार तिने.........आजिसहेब

त्या आजी मला म्हणाल्या आता भरपूर दिवस झाले तर गूड न्यूज कधी देताय.......तर मी म्हणाली आम्ही तर रोज च good news देतो......फक्त या आजिसहेबच देत नाही......गोड बोलत पण नाही ......आबा पण वाट बघत असतात यांच्या good news ची........आता कालच या राहुल दादा ने नाही का दिली गूड न्यूज.............

आता राहुल ला जोर्याचा ठसका लागला.......

काय........सगळे एकसाथ ओरडले....

काय रे नालयाका ....काकी

मी काही नाही केले......माझ्याकडे का बघता तुम्ही सगळे असे.....ये भवाने मी कधी बोललो तुला ..

तूच काल राज ला सांगत होता ना ऑफिस मधून आल्यावर........नंदिनी

ते होय........मी ऑफिस प्रोजेक्ट च सांगत होतो......

बघा हे असच .......मघाशी आमच्यावरच उकटल्या ......आजिसहेब

आता सगळे हसायला लागले....

राज त्या आजी म्हणाल्या राज ला विचार  नी लवकरात लवकर good news द्या.........तू मला पण नाही सांगितले काहीच.......

राज दे हा लवकर लवकर.....आम्ही पण वाट बघतोय......काकी त्याला चिडवत होत्या....

राज मला पण पाहिजे good news........na dini

राज ने हातातच आपले तोंड लपवले.....आता त्याला खूपच लाजयाला होत होते........

नंदिनी चल तुझ्यासाठी गिफ्ट आणले मी.......राज ने तिचा हाथ पकडला नी तिला वरती घेऊन गेला.......

*******

राज मी आज बायको सारखी वागली ....तुला आवडले काय......

हो छान केले होते तू..........पण नंदिनी तुला सगळे काम करायची गरज नाही......

पण त्या आजी च म्हणाल्या राज ची काळजी घे......

ती तर तू घेतेच ना........

हो.....पण मग काम नाही करायचे...

तसे नाही.....तुला आवडत असेल तर कर......तुला नवीन काही शिकायचे असेल तर शिक पण कोणीतरी म्हणताय म्हणून करायची गरज नाहीये.......तसा पण तुला अभ्यास असतो......बाकीच्या अॅक्टिवितीज असतात......या कामांना आपल्याकडे मावशी आहेत.....

पण मग सगळे म्हणतात बायकोसरखी नाही वागत........राज बायको म्हणजे काय

मैत्रीण..........आयुष्यभराची मैत्रीण.....जीवाभावाची मैत्रीण.......सुखदुःखात साथ देणारी.....काळजी घेणारी.......मला हसवणारी.....माझ्या डोळ्यात अश्रू पोसणारी......आणि......

आणि काय.........

काही नाही......

सांग ना........

आणि खूप प्रेम करणारी......हे तर तू सगळच करते.......

हो........

गुड न्यूज म्हणजे काय .....विचारात होत्या त्या आजी ....तुला माहिती........

हो.....आपण काय चांगली काम करतो तेच...

ती आजी विचारत होती..... छोट बाळ कधी आणत आहात......

खरंच ......तू बाळ आणणार आहेस.....नंदिनी खूप एक्सितेड झाली

बाळ तर मुलींना होते ना.....मी कसं आणणार......

पण ते तर डॉक्टर देतात ना हॉस्पिटल मध्ये.....

ह्म्म......पण मुलींना देतात डॉक्टर

मी मुलगी आहे ना.....मला देतील डॉक्टर बेबी

हो.......तुला देतील

मग चल ना आपण उद्या आणू या बेबी......मला खेळायचे त्याच्यासोबत

खेळता तर येत पण त्याची खूप काम पण करावी लागतात....

मी करेल ना......कपडे घालेल...तयारी करेल

ह्म्म्म.....आणि शी केली सू केली तर.....मी ऑफिस मध्ये राहील.....मग कोण करणार.....आणि तू क्लास ला कशी जाणार बाहेर.......बेबी सोबत वेळ गेला तर अभ्यास कधी करणार

इयु..... यक्की.......,.....शी मी नाही करणार ते......नी मला अभ्यास पण करायचा.......

ह्म्म........मग कोनिपण असे विचारले की good news कधी देत आहात...तर सांगायचं त्यांना.....की मला सद्ध्या खूप अभ्यास करायचा आहे...माझी ड्रीम्स पूर्ण करायची आहेत.....नंतर राज आणि मी विचार करेल...

हो करेक्ट.........

गुड........झोप आता...

राज मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना.......

हो......बेस्ट बेस्ट बेस्टस्त फ्रेंड.....

*******

नंदिनी उठ त्या बॅग वरून.....मला बाग पॅक करू दे .......

राज मला तुझ्यासोबत यायचं.......

मी ऑफिस चा कमानी चाललो आहे नंदिनी......तुला आजी कडे पोहाचाऊन देतोय ना .....

मग तू पण थांब तिथे .......

P
नंदिनी हट्ट नाही करायचा...........मी लवकरच परत येईल.......उठ आता बॅग्स वरून.......

मी नाही.........तुला मी आवडत नाही ना आता......जा कट्टी कट्टी........

मी कधी असे म्हणालो.........नंदिनी उगाच त्रास नको देऊ ग........आणि तुझं सगळं अक्टिवितीज बुक्स कलर्स काय काय पाहिजे तुला ते आणून दे .......राज बॅग्स पॅक करता करता बोलत होता....

राज ला ऑफिस चा कामानी एक आठवड्यांसाठी दिल्ली ला जायचे होते......नंदिनी ला इथे एकटे सोडवेसे वाटत नव्हते त्याला म्हणून तो तिला गावला आजी आबा कडे पोहाचाऊन तिकडे जाणार होता......आणि म्हणूनच नंदिनी नाराज होती...

जा मला नाही बोलायचे तुझ्यासोबत.....तू नेहमी आपल्याच मतचे करतो.......माझंतर कोणी ऐकतच नाही......तुला फक्त काम च करायला आवडते....फक्त ऑफिस च आवडते .......मी आवडत च नाही तुला.........नंदिनी. बेड वर दोन्ही पाय दुमडून गाडी मध्ये तोंड खुपसून बसली...

huh....   ब्लॅकमेल करन सुरू झालं मॅडम च.......

कोण रुसून बसले आहे ......राज नंदिनी जवळ जात तिच्या बाजूला बसत बोलला...

मला नाही बोलायचं....नंदिनी ने आपला दोन्ही हातात आपलं फेस झाकला नी दुसऱ्या साईड नी बघितले....

चॉकलेट.......   तो तिच्या दुसऱ्या साईड ने गेला

नको......तिने परत चेहरा दुसऱ्या साईड ला केला.....

अरे बापरे खुप्पाच राग आलेला दिसतोय.......राज ने तिला वळवले नी तिला कंबरे मध्ये गुदगुली करायला लागला....

राज मला नाही बोलायचं...जा तू तिकडे....नंदिनी ला आता खूप हसू येत होते

 

 

 

 

आता दोघंही मस्ती करायला लागले होते.....नंदिनीचा नाराजी राग तर कुठल्या कुठे पळाला होता......मस्ती करता करता नंदिनीच्या नाईट शर्ट क्या वरच्या दोन बटन निघाल्या होत्या........खेळता खेळता राज चे लक्ष तिच्या कडे गेले......

मन्या आता तू मोठी झाली आहेस......मस्ती करताना ....खेळताना आपल्या कपद्यांकडे लक्ष ठेवत जा......राज तिच्या शर्ट चा बटन लावत होता....

तू आहेस ना.......

मी प्रत्येक वेळ असणार आहे काय......आणि आता स्वतःची काळजी स्वतः घेणे तुझी स्वतःची जबाबदारी आहे.....तिच्या गालावर थोपटत बेड चा खाली उतरत बोलला

राज नको ना जाऊ मला एकटीला ठेऊन ......तू ऑफिस मधून यायचा असला तरी मी किती वाट बघत असते.......मला नाही आवडत तुझ्याशिवाय राहायला..........नंदिनी  टोंगळ्यांवरच चालत चालत राजच्या चा कंबरेला दोन्ही हातांनी पकडत त्याला रडत रडत बिलगली...........

नंदिनी.........अशी का करते आहेस.....ऐक ना ग राणी.....खूप महत्वाचं काम आहे म्हणून तर जातोय ना........मला तरी कुठे करमते तुझ्याशिवाय........तू अशीच रडशील तर माझा पाय तरी बाहेर पडेल काय......आणि तुला तर आवडते ना आजी आबा कडे.......मग मस्त राहून घे आजी आबा सोबत.....त्यांना पण तुझी किती आठवण येते..........राज तिला जवळ पकडत डोक्यावरून हात फिरवत होता....

नंदिनी त्याला सोडून रागातच एकटीच बेड वर जाऊन तोंडावरून पांघरूण घेऊन झोपली...

राज ने राहिलेले सगळे पॅकिंग केले ....

आजकाल भारीच वाढले आहे रुसने फुगणे.....   एकदा नंदिनी कडे बघितले नी स्वतःच हसला नी नंदिनीच्या बाजूला बेड वर जाऊन झोपला......

राज शिवाय नंदिनीला झोप यायची तर नाही.....पण आजकाल तिला रुसायच पण असते.....तिची सारखीच चुळबुळ सुरु होती...तिने अधून मधून तोंडावरच पांघरूण खाली करून राज झोपला की नाही बघत होती...तो झोपला खात्री केली नि त्याच्याजवळ जाऊन त्याला घट्ट पकडून झोपली...

******

हळू जा हो पोरांनो नी पोहचले की फोन करा.....आई

आई तू .......राज काही बोलणार तेवढयात नंदिनी बोलली

आई तू काळजी नको करू ........काकी राहुल कडे लक्ष ठेव......राहुल मी नाही तर गडबड नाही करायची......आबा औषध वेळेवर घ्या....आजिसहेव आराम करून घ्या नंदिनी नाही तर..........नंदिनी राज सारखी नक्कल करत बोलली.....

सगळे राज कडे बघत त्याला चिडवत होते...

नौटंकी..........राज ने हसतच केसंमधून हाथ फिरवला...

नंदिनी लवकर ये.....तुझ्याशिवाय करमत नाही मला......आबा

आबा फक्त 2 दिवस....येतेच मी .......नंदिनी

दोन........सगळे अवाक झाले...

नंदिनी आपण आठ दिवसांनी येतोय......राज

हो तेच ते........नंदिनी खट्याळ पणे हसत होती......

हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन चालला दिसतोय.....आबा समजले होते...

सगळ्यांना बाय करून राज नी नंदिनी निघाले.....

राज ने नंदिनी ला आई आबा कडे सोडले नी ऑफिस कमा साठी दिल्ली साठी निघाला...

******

Make sure his work should increase from 7to 15 days ......

You don't worry......

*******

एक दिवस नंदिनीचा चांगला गेला....आजी आबा सोबत गप्पा मारण्यात....आजूबाजूला मिरवण्यात गेला.....पण रात्री मात्र तिला राज ची आठवण येऊ लागली...

राज तू कधी येणार आहे......माझं झालं सगळ्यांना भेटून......आता तू लवकर ये........नंदिनी ची फोन वर राज जवळ कुर कुर सुरू केली.....आणि त्याने कसेतरी तिला समजावले...

नंदिनी अगं .....कामाने गेलाय ना.....का त्रास देते त्याला.....किती दिवसांनी आली आहेस.......

सगळ्यांनी समजाऊन सुद्धा तिला अस्वस्थ वाटत होते.... आणि झाले सुद्धा तसाच सकाळी उठून तुला चांगलाच ताप भरला होता......... आज लग्न पासून जवळपास दीड वर्षात नंदिनी कधीच राज चा दूर राहिली नव्हती..... ही पहिलीच वेळ होती की ती त्याला सोडून रात्रभर राहिली होती....... तो दिवस तर ती फारच सुस्तावली होती...... तिचा कशातच मन लागत नव्हतं आणि तापाने सुद्धा अशक्तपणा जाणवत होता........ ती झोपून झोपूनच होती..

काय ही पोरगी...... तो नाही आहे तर ताप काढून बसली.... तो बिचारा आपलं काम करायला गेला..,. तर हीच आहे आपल्या इकडे असं....... धड एक दिवसही झाला नाही इकडे येऊन.........आजी

ह्म्म........ खूप लळा लावला श्रीराजनी........बघितले ना   इतक्या वर्षात आपण नाही करू शकलो .....तेवढ्या दीड वर्षात नंदिनी मध्ये किती बदल झाला....... बरीच समजदार झाली आहे आता ती...... पोरगा बोलला तसा वागून सुद्धा दाखवल.... नंदिनीच्या आजी तिला थोड्या मोठेपणाच्या काही गोष्टी समजून सांगा.......आबा

नंदिनी.....काय करते...... आज काय केले दिवसभर...... रात्री काम आटोपल्यावर राजनंदिनी ला फोन केला होता..

राज मी तुझ्यासोबत उद्या बोलु काय ...मला झोप येते आहे.....नंदिनी

नंदिनी तुझ्या आवाजाला काय झालं.... तुझा आवाज का असा येतो आहे ..... तुला बरं नाही काय....... राज काळजी करत होता

काही नाही मला झोप येते आहे.......नंदिनी

बरं आजीला दे फोन........

आजी राज बोलतोय फोनवर बोलायचे त्याला तुझ्यासोबत...... नंदिनी ने  तिथूनच आवाज दिला

आजी नंदिनीला काय झालं .....बरं आहे ना तिला......राज

हो अरे किती काळजी करशील...... तुझ्यापासून पहिल्यांदाच राहते ना एकटी .....थोडी आळसावलेली आहे... सकाळी थोडासा ताप होता.... म्हणून थोडी सुस्त झाली आहे..... तू काळजी करू नको.....आजी

राजने बाय बोलून फोन ठेवला.....

****-

राज तू आला .... झोपेतून ती लगेच उठून बसली आणि समोर बघत होती........ राज त्याच्या टीशर्ट चा बाह्य वर करत  नंदिनीच्या रूम मध्ये येत होता.....

राज sss..........नंदिनी धडपडतच बेडवरून खाली उतरली आणि पळत जात त्याच्या गळ्यात पडली.......... राजने पण तिला स्वतःच्या कुशीत घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता.....

मन्या किती ताप आहे तुला...... असं कोणी करते का..... असा ताप काढत असतात का........

तू मला सोडून जाणार नाहीस ना........ मला राहता येत नाही ना तुझ्या शिवाय मी काय करू....... मी मुद्दामून नाही केले......... मला रात्री झोपच नाही आली.......

पागल... सोनुली माझी........ तिच्या केसांवर किस केले

बरं चल आता आराम कर..... मी कुठे जाणार नाही......राज

नंदिनीला बरं नाही ऐकून त्याचा तरी मान कुठे तिथे कामात लागणार होतं........नंदिनीला बरं नाही आहे ऐकताच त्याने रिटर्न ची मध्यरात्रीची फ्लाइट पकडली होती नी सकाळी नंदिनी उठायच्या आधीच  आणि बाकीचे सगळे काम रोहन वर सोडून तो परत आला होता.......

आबाsssss............नंदिनी कारमधून उतरून पळतच घरात येता आबासाहेबांच्या गळ्यात पडली होती......

अरे वाह वाह आली माझ्या घराची रौनक........ तू नव्हतीस तर घर किती रिकामं झालं होतं......... मला अजिबात करमत नव्हते तुझ्याशिवाय........ अरे पण तुम्ही तर चार दिवसानंतर येणार होता ना........आबा

तुमच्यासारखे तुमची नात फुल नोटंकी....... एका दिवसात तिने ताप काढला.......राज

ह्म्म....... राज कुठे काम करतोय मग...... राजचा तर जीव वर-खाली झाला असेल........  गेला असेल सगळं सोडून धावत-पळत नंदिनी ला भेटायला ......काकी त्याला चिडवत होती.......

सोडून द्या सगळे काम आणि बसा घरात....... आजिसहेबांनी त्यांना बघून डोक्यावर हात मारला..... 

******

राज माझे कलर्स संपले आहेत......घ्यायला चल ना...

नंदिनी उद्या जाऊ.....

नाही मला आत्ताच पाहिजे......

नंदिनी उद्या सुट्टी आहे उद्या आराम आहे जाता येतं......

मला आत्ताच काढायचा आहे पेंटिंग.....

नंदिनी तुला बोललो ना उद्या जाऊ....... मला आता काम आहेत.....

नाही मला आत्ताच पाहिजे.....

नंदिनी तुला बोललेलं कळत नाही आहे काय ....हट्ट का करतेस..... राज थोडा ओरडतच बोलला

नाही पाहिजे मला काही .....तिने हातातला पेंटिंगचा पेपर चुरगळा करत फेकून दिला...

नंदिनी......... हे काय वागतेस तू....... चांगलं वाईट काही कळतं की नाही..... हा काय उद्धटपणा झाला....... राज आता नंदिनीला रागवत बोलला...

मला तुझ्याशी नाही बोलायचं .....म्हणत नंदीनी खाली चालली गेली

त्याने मुठ वळली आणि टेबलावर मारले...... लॅपटॉप काढून बसला...

आज तो ऑफिसमधून लवकरच आला होता ऑफिस मध्ये त्याचे काही काम झाले नव्हते त्यामुळे तो बरस चिडला होता....... आधी त्याचा मूड खराब त्यात नंदिनी हट्ट करून परत त्याचा मूड बराच घालवला होता.....

आबा काय होतंय तुम्हाला...... बरं वाटत नाही आहे काय...... थांबा मी राजला बोलावून आणते......

नंदिनी आबांच्या रूममध्ये गेली तर आबा जोराने श्वास घेत होते..,..

नंदिनी तो मेडिसिन चा बॉक्स दे ...... आबा कसेबसे तिला बोलले.....

राज ...राज... राज ...राज .....नंदिनी जोराने आवाज देत होती.....

काय झालं...... आजी साहेब आई धावतच आबांच्या रूम मध्ये आल्या......

ते आबा आबा..... औषध..... पडले बेडवर.....नंदिनी खूप घाबरली होती आणि घाबरतच काय काय बोलत होती...

आवाज ऐकून राज सुद्धा खाली धावत आला.......

काय झालं.......राज

मी डॉक्टरांना कॉल केलाय डॉक्टर येथील आता....काकी

नंदिनी ....बाहेर जा..... माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नका......... आजिसहेब

मी ....मी......काही नाही केलं...... नंदिनी रडत रडत आबा जवळ जात होती....

नंदिनी आम्ही तुम्हाला सांगितलं बाहेर जा........आजिसहेब ओरडला.....

मला सांगेल का कोणी काय झालं येथे...... आबांना काय झालं.......राज

राज ते बेशुद्ध झाले आहेत.........आई

या नंदिनी त्यांना कोणत्यातरी औषध दिलं.... आणि ते बेशुद्ध झाले.......आकिसहेब

मी काही नाही केलं......राज मी काही नाही केलं नंदिनी रडत होती......

यांना जर काही झालं ना नंदिनी मी तुला सोडणार नाही...... राज हे सगळं तुझ्यामुळे झाला आहे..... या पागल मुलींमुळेच ते सगळे झालेला आहे.......आजिसहेब

मी पागल नाही आहे...... मी काही नाही केलं.......

तूच....... तुझ्यामुळेच झाले हे सगळं.........

मी नाही केलं काही...... आबा आबा उठाना......

नंदिनी बाहेर वा........आजिसहेब

नंदिनी ssss......... थाड ssss..........

सगळे एकदम शांत झाले आणि राज कडे बघत होते

नंदिनी  खाली जाऊन पडली ........ती गालाला हात लावत भरल्या डोळ्यांनी राज कडे बघत होते.......

आधीच ऑफिस मध्ये डोकं फिरलं होतं .... इकडे बाबांना काय झालं ते त्याला कळत नव्हतं..... आणि त्यामध्येच आजी आणि नंदिनीची कलकल सुरू होती...... त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्यांनी नंदिनीच्या गालामध्ये खूप जोर्याने एक झापड ठेवून दिली आणि ती इतकी जोराने लागली होती की नंदिनी सरळ खाली जाऊन पडली होती.......

*****

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️