Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 38

Read Later
नंदिनी...श्वास माझा 38

भाग 38

So Mr Shiraj now just watch how I spil your reputation and good image in a minute...... माझा प्रेमाचा अपमान करताय ना ......मला जे पाहिजे असते ते मला मिळतच असते नाहीतर मग ते मी स्पॉइल करत असते.......म्हणत लावण्या बाहेर जायला दाराजवळ गेली...

Mis Lavanya.......... एक मिनिट.....

घाबरला वाटतो.......आता कसं लाईन वर आला ......ती मागे वळली......मला माहिती तुझ्यासारखी मुलं सरळ बोललेल समजत नाही........ती त्याच्याजवळ जात होती

तो काहीच बोलला नाही....फक्त इशाऱ्याने कॅबिन चा एका कॉर्नर कडे बोट दाखवले......

लावण्याने तिकडे बघितले....ते बघून तिला घाम च सुटला.......

(Yess right....tumhi सगळ्यांनी बरोबर गेस केले होते.....तिथे सीसीटीव्ही कॅमेरा होता ????)

So MIS Lavanya...... तुम्हाला माहिती रागात आपण आपलं मानसिक balance हराऊन बसतो......समोरच्याला ला उध्वस्त कसे करता येईल हा विचार करता करता तुम्ही स्वतःचा विचार करायचं विसरलात.....आणि दुसरी गोष्ट प्रेम....प्रेमात समोरच्याचा आनंद बघ्याचा असतो....देणं असते ..घेणं नाही....आणि असा हिसकावून तर नाहीच नाही...

हवं तर मी आता जे काही तुम्ही चालवले आहे तो व्हिडिओ आणि तुमच्या विरोधात असलेली पुरावे आऊट करू शकतो.....पण मी ते करणार नाही....तुमचं लाईफ मला खराब नाही करायचे आहे......... I am giving you one chance.....and stay away from me and my family......
तुमचा अनादर करणे... रादर कुठल्याच मुलीचा अनादर करणे माझ्या एथिक्स मध्येच नाही.....  सो आपला अवतार ठीक करा....नी रिझाईन करा......मी बाहेर जातोय....तुमच् आवरून ऑफिस सोडा...... राज कॅबिन बाहेर निघून गेला...

लावण्या तर फक्त त्याच्याकडे बघत बसली.........तिची जी काही गुर्मी होती ती एका मिनिटं मध्ये त्याने उतरवली होती........त्याचे वागणे बघून ती शॉक झाली होत.......इतकं सगळं होऊनही तो इतका शांत कसा राहू शकतो.......

******

राज............शशिकांत रागात नुकताच ऑफिस मधून आलेल्या राज ला थांबवले

राज ला त्यांच्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नव्हती.....तो वरती रूम मध्ये जाता जाता तिथेच थांबला...

राज....तू लावण्या ला ऑफिस मधून का काढले......

राजने रागातच वळून त्यांचा कडे बघितले....

मी काहीतरी विचारतोय

माझं ऑफिस.....मी कोणालाही काढू शकतो......

तुझ्यामुळे माझा खूप लॉस झालंय......mr पाटील नी माझा सोबतचा प्रोजेक्ट terminate केलाय........its all because of you .........

Good......some loss is better than big damage...

राज..........शशिकांत थोड्या जोरातच ओरडले......तू उद्धटपणे वागतोय......कोणासोबत बोलतोय समजते काय तुला......तुझ्या त्या पागल बायको मुळे तुझं डोकं पण खराब झालंय......

Dad..... राज चा आवाज वाढला.....मी चूप आहो त्याचा गैरफायदा घेऊ नका.....आणि नंदिनीच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही .....and stay away from me and my life.........

राज.............ही पद्धत आहे काय आपल्या वडिलांसोबत बोलायची......आई

राज ने एकदा आईवर नजर टाकली......त्याला आईसमोर त्यांच्याबद्दल काही बोलायचे नव्हते....

सॉरी..........राज रागातच वरती रूम मध्ये निघून गेला.  

*******

घरात इतकी लोक आहेत ....पण सगळी काम मलाच करावी लागतात....माहितीये देवाला रोज पूजेसाठी हार लागतात.....पण कोणीच करणार नाही......घरातल्या या बायका काहीच करणार नाही.....सगळे कामचोर आहेत...... आजीसाहेब समोर बसलेल्या नंदिनी कडे बघत सुई मध्ये धागा ओवण्याचा प्रयत्न करत चिडचिड करत होत्या .....

नंदिनी एका चेअर वर मांडी घालून हनुवटी दोन्ही हातात ठेऊन त्यांच्या कडे बघत होती......

डोळे मोठे करून बघत काय बसलाय....... आजीसाहेब नंदिनिकडे रागात बघत होत्या...

आईसाहेब..........काकी काही बोलायला जाणार तेवढयात राज ने त्यांचा हाथ पकडला....

काकी त्यांचं त्या दोघींना बघू दे.......राज दुरून किचनमधून बघत होता...

ते तुमचे आबासाहेब माझं डोकं खातात हार पाहिजे......नको ती सवय लावून ठेवलीय तुम्ही त्यांना.......आता ही सुई जात नाही आहे...... आजीसाहेब वैतागत बोलत होत्या

नंदिनी जागेवरून उठली नी जाऊन सुईदोरा घालून दिला .....नी काही फुल घालून हार कसा करायचा सांगून परत जागेवर येऊन चुपचाप बसली......

आता मला शिकवणार तुम्ही हार कसा बनवायचा ते.....आजिसहेब रागात बोलत होत्या......पण तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता....

काय हो तिच्याशिवाय तुम्हाला पण करमत नाहीये वाटते........आबा

मला काय गरज पडलीय.....आजिसहेब वाकड तोंड करत बोलल्या

आबांना त्यांच्या कडे बघून हस्यला आले...

पोलिस स्टेशन मधून आल्यापासून नंदिनी चा मनातली भीती बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती.....आता तीच पहीलेसारखाच रूटीन सुरू झालं होते.......पण तिची नेहमीची मस्ती बंद झाली होती......घर एकदम शांत झाले होते........आबाना तर कर्मतच नव्हते......राहुल ने पण तिच्या बऱ्याच खोड्या काढल्या होत्या.....पण ती त्याला काहीच रिस्पॉन्स देत नव्हती.........पण आता ती तिच्या रूम मधून बाहेर आली होती.....आता सगळ्यांसोबत बसायची पण फक्त शांत असायची....

******

हे काय आज डिनर नाही म्हणजे......खायचं काय आम्ही .... आजीसाहेब

आज राजने इटालियन फूड बनवले आहे ......आई

पण का......आजिसहेब

ते नंदिनी.....सगळ्यांची इच्छा होती म्हणून....काकी.

अहो राज चा आजीसाहेब खाऊन तर बघा......खूप छान झालाय जेवण ......आणि तुम्हाला तर आवडते नवीन नवीन टेस्ट करायला.  ......आबा

आजिसहेबांनी एकदा नंदिनिवर नजर टाकली....ती थोडी रागातच बघत होती....

(दोन दिवसांपासून या ना त्या कारणाने आजिसहेब राज war चिडचिड करत होत्या.....)

मला नाही आवडले....... आजीसाहेबांनी समोरची प्लेट समोर थोडी जोरातच सरकवली

आजिसहेब.......नंदिनी थोड्या मोठ्या आवाजात बोलत उठली

नंदिनी....असू दे...राज तिचा हात खाली ओढत तिला बसायला सांगत होता.... तिने त्याला इग्नोर केले

आजिसहेब.......तो ऑफिस मधून इतका थकून आला असतो......तुम्ही सतत कुरकुर करत असता...... थकला असूनही त्याने सगळ्यांसाठी बनवलं ना ......हट्ट का करत आहात.......नंदिनी

आता राज पण तिच्या बाजूला उभा होत दोघींना बघत होता.....

का....मी का हट्ट करू नये........ तूच करशील काय हट्ट......तो माझा नातू आहे......आम्ही काही बोलू शकतो.....आजिसहेब राज जवळ जात त्याचा हाथ पकडत त्याला  स्वतःकडे खेचत बोलल्या

नाही तो माझा आहे........नंदिनी ने त्याला स्वतःकडे खेचले...

बाकीचे यांची गम्मत बघत होते .....खूप दिवसांनी या दोघींची तू तू मैं मैं सुरू झाली होती...

आम्ही त्याचा आजिसहेब आहोत ...तो आमचा आहे.....परत आजिसहेबांनी त्याला आपल्याकडे ओढले

राज माझा आहे.....फक्त फक्त माझा आहे......नंदिनी

नाही तो आमचा आहे.......आजिसहेब

आजिसहेब...बघा नाहीतर.....नंदिनी

नाहीतर काय.....आम्हाला धमकी देता काय.......आजिसहेब

नाहीतर......ती इकडेतिकडे बघत होती........काय करू विचार करत बघत होती.....तिला बाजूला ठेवलेला आजिसहेबांचा मोबाईल दिसला....तिला माहिती होत तो आजिसहेबांचा खूप आवडता आहे....तिने पळतच तो उचलला नी घरभरवपळत सुटली

नंदिनी.....मोबाईल परत करा......... आजिसहेब तिच्या मागे धावत होत्या....

राज .....फक्त माझा आहे....परत करा.......नंदिनी

नंदिनी..........आजिसहेब

तेवढयत फोन वाजला

कोणाचा आहे........आजिसहेब

तुमच्या कल्लुचा.........नंदिनी

नंदिनी.....फोन द्या.........आमच्या सोबत मस्ती करू नका....

नंदिनी ने घरात सगळा गोंधळ घातला होता...........आज खूप दिवसांनी तिचा आवाज घरात घुमत होता......सगळे खूप आनंदाने त्यांच्या कडे बघत होते.....फक्त शशिकांत सोडून........

तिचा खळखळण्याचा आवाज आणि तीच खेळणे बघून राज चा तर डोळ्यात आनंदाश्रु आले होते.....त्याने सगळ्यांच्या नकळत ते पुसले नी नंदिनी कडे बघत होता......

पळल्या मुळे दोघी दमल्या नी एका ठीकानी बसल्या.....थोडा वेळ एकमेकींना हार्ड लूक देत हसायला लागल्या........आणि नंदिनी ने आजिसहेब चा फोन परत केला...

थोड्या वेळ मग अशाच सगळ्यांच्या हसत खात गप्पा झाल्या......नी अचानक नंदिनी रडायला लागली .......अचानक सगळं शांत झाले.......

सगळेच राज ला त्रास देतात.......काही झालं की त्यालाच बोलता......तो सगळ्यांचं ऐकतो म्हणून त्यालाच बोलता.......तो सगळ्यांची कामे करतो तरी त्यालाच बोलता..........तो किती काम करतो.....तो थकला असला तरी कोणाला दिसत नाही.......त्याला बर नसले तरी तो कोणाला सांगत नाही.......का माझ्या राज ला बोलता ...का माझ्या राज ला बोलता.....तोकिती दिवस झाला हसला नाही.......नका त्याला रागावू........माझा राज खूप चांगला आहे ........नंदिनी रडतच बोलत होती.....तीच मन गळा खूप दाटून आला होता.......

सगळे अवाक होत तिच्याकडे बघत होते.......आताच हसणारी मुलगी अचानक अशी रडायला लागली.....राज ला तर काही कळायला मार्ग नव्हता ......पण तिला रडतांना बघून त्याच मन मात्र खूप तुटत होत.....तो लगेच तिच्या जवळ गेला .......

नंदिनी.......राजा.....इकडे बघ....काय झालं........ तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडt तिच्या कडे बघत बोलत होता....

माझा राज खूप चांगला आहे ....नका त्याला त्रास देऊ....नंदिनी हुंदके देत त्याचा कडे बघत रडत होती.....

नंदिनी.....मी ठीक अहो......कोणीच काही बोलत नाहीये........तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता.....पण ती एकच बडबड करत होती.......

राज च तिला काहीच ऐकू जात नव्हते....ती सतत तीच बडबड करत होती.......तिला तास बघून त्याने तिला आपल्या कुशीत घेतले नी तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत होता.........नंदिनी शांत हो......आपलं घर आहे ना हे......शांत हो.....सगळं ठीक आहे.........किती काळजी करतेस माझी........

आई ने डोळ्यांनीच काय झाले म्हणून त्याला विचारले.....त्याने डोळ्यांनीच माहिती नाही म्हणून सांगितले......आबांनी त्याला तिला रूम मध्ये न्यायचा इशारा केला.....

त्याने तिला आपल्या हातावर उचललेले नी वरती रूम मध्ये घेऊन गेला.....नंदिनी रडत रडतच झोपी गेली होती.....त्याने तिला बेड वर नीट झोपवले नी तो बाजूला सोफ्यावर जाऊन लॅपटॉप ओपन करून बसला ....पण त्याचा डोक्यात नंदिनीचे बोलणेच फिरत होते.....अचानक तिला काय झालं तो विचार करत होता.......

तेवढयात नंदिनी उठून त्याच्या मांडीवर जाऊन त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात घालून त्याच्या छातीवर डोकं ठेऊन बसली........

राज मी खूप त्रास देते ना तुला............

नाही........
 

मला माहिती आहे .......मी खूप हट्ट करते...तुला त्रास देते....माझ्यामुळे तुला सगळे रागवत असतात.....

नाही रे पिल्लू ....असे नाही आहे काही.....तू माझ्याजवळ असली ना की मला काहीच त्रास होत नाही......अनाई जर कधी झाला असेल तरी तुझा हसरा चेहरा बघितला ना की सगळं कुठल्या कुठे पळून जाते......

राज तू मला सोडून नाही देशील ना.........

नंदिनी.......कोण बोललं तुला अस............हे बघ मी फक्त तुझा आहे नि तू फक्त माझी आहेस.......तू नी मी एकमेकांसोबत च असणार आहोत.....नेहमीसाठी...... ह्म्म.......

ह्म्म्म...........

तुझ्यासाठी तर मी काहीपण करू शकतो......तुला माहिती आहे ना ......फक्त मला तू आनंदी हवी असते.........आणि तू माझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार........आणि अस रडायचं नाही......मला नाही आवडत.....तुला माहिती तू रडली की मला पण रडायला येते.........राज तिच्या केसंमधून हाथ फिरवत बोलत होता.....

तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये - २

(ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा ज़िन्दगी भर ) - २
सारे संसार का प्यार मैं ने तुझी में पाया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये - २

चँदा तुझे देखने को निकला करता है
आइना भी ओ ... दीदार को तरसा करता है
इतनी हसीं कोई नहीं - २
हुस्न दोनो जहाँ का एक तुझमे सिमट के आया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये

प्यार कभी मरता नहीं हम तू मरते हैं
होते हैं वो लोग अमर प्यार जो करते हैं
जितनी अदा उतनी वफ़ा - २
इक नज़र प्यार से देख लो फिर से ज़िन्दा करदो
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये - २

ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा ज़िन्दगी भर - २
सारे संसार का प्यार मैने तुझी में पाया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये - २

ग़म है किसे हो सारा जहाँ चाहे दुश्मन हो
क्या चाहिये हाथों में जो तेरा दामन हो
तू है जहाँ मन्ज़िल वहाँ - २
धड़कनों की तरह अपने दिल में मुझको छुपा लो
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये


 

ती ह्म्म.... ह्म्म......करत होती......

राज ने बघितले तर ती झोपली होती......तो पण तसाच पुढे टेबल वर पाय लांब करून अंगावर बाजूच पांघरूण ओढून मागे टेकला.........नंदिनी तशीच त्याच्या मांडीवर पाय पोटाजवल घेऊन एक हाथ त्याचा गळ्यात एका हाताने त्याच शर्ट पकडून त्याच्या छातीवर डोकं ठेऊन झोपली होती............तो मात्र तिचा विचारच करत होता...........या दोन महिन्यात त्याला तिच्या मध्ये भावनिक पातळीवर बरेच बदल दिसत होते.......

**********

तू मिले दिलं खीले हे अतिशय सुंदर गाणं एका वाचक मैत्रिणीने सुचवले आहे....

काळजी घ्या स्वस्थ रहा????

*********

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️