नंदिनी...श्वास माझा 37

Raj Nandini

भाग 37
 

डॉक्टर ला बघून नंदिनी घाबरली नी राज ला बिलगून उभी होती....ती त्याला सोडत नव्हती....

आज सकाळ पासून नंदिनी ला चांगलाच ताप होता.... त्यामुळे बराच अशक्तपणा होता ..... आणि रात्री घडलेल्या प्रकारामुळे ती खूप घाबरली होती....... झोपेतून सतत घाबरून उठत होती......आणि ती परफेक्ट ली फाइन आहे याची सुद्धा त्याला खात्री करून घ्यायची होती...... राज तिला चेकअपसाठी तिच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे घेऊन आला होता...... पण ती मेल डॉक्टर बघून आज खूपच घाबरत होती....... रस्त्यात पण जी काही माणसं लागली ती त्यांना बघून खूप घाबरत होते........ आणि राजला सोडायला तयार नव्हती.....

नंदिनी हे आपले नेहमीचे डॉक्टर अंकल आहेत ना...... तुझे तर फ्रेंड सुद्धा आहेत...... असं घाबरायचं नाही आणि मी आहो ना सोबत...... राज तिला समजावत होता

नंदिनी मात्र काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हती..... फक्त नाही नाही करत राज्य शर्टाची कॉलर पकडून त्याच्या शर्टाच्या दोन खुपसत होती...

Shriraj it's okay.... don't force her ..... डॉक्टरांनी त्याला woman स्पेशलिस्ट एका लेडीज डॉक्टर्स नाव सजेस्ट केलं......... राजने लगेच डॉक्टरांचे अपॉईंटमेंट घेतली आणि नंदिनीला त्यांच्याकडे चेक करायला  घेऊन गेला....
तिथेसुद्धा नंदिनी त्यांना घाबरत होती...... पण त्या डॉक्टर चाईल्ड स्पेशालिस्ट असल्यामुळे त्यांनी तिला बरीशी खेळणी दिली गोष्टी सांगितल्या बऱ्यापैकी तिचा लक्ष डायव्हर्ट केले....... आणि ती कंफटेबल झाल्यावर त्यांनी तिचा चेकअप केला.....

मिस्टर राज फिजिकली त्या व्यवस्थित आहेत,.....पण त्यांच्यासोबत झालेल्या प्रकारामुळे त्या खूप जास्ती घाबरले आहे.... मनस्थिती थोडी खराब झाली आहे आणि त्यामुळेच ताप आलेला आहे...... मेडिसिन देत आहे त्याने ताप तर जाईल पण नॉर्मल व्हायला बराच वेळ लागेल.... तुम्हाला आणि घरातल्या सगळ्यांना तिच्यासोबत फार लक्ष ठेवून प्रेमाने वागावे लागेल...... आणि झालेली गोष्टी तिच्यासमोर काढू नका आणि तसलं काही आजूबाजूला किंवा टीव्हीवर सुद्धा तिला दिसणार नाही याची काळजी घ्या नाहीतर तिला परत परत त्याच गोष्टी आठवत राहील तशी पण त ती पुरुषांपासून तिला भीती वाटेल...... ही भीती जायला बराच काळ लागू शकतो.... त्यामुळे रात्री झोप न येणे किंवा वाईट स्वप्न येणार त्यामुळे ती रात्री-बेरात्री तून पॅनिक होऊ शकते...... तिला जास्तीत जास्त आनंदी खुष ठेवण्याचा प्रयत्न करा....... म्हणजे ती झालेला प्रकार विसरायचा प्रयत्न करेल... डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही....... पण पण ती सध्या एका लहान मुलांसारखी वाटते आहे तर याचा एक एडवांटेज आहे की खुशी लहान मुलं गोष्टी लवकर विसरतात तसं तिला जर ऍक्टिव्हिटीज आणि खेळण्यांमध्ये गुंतवलं तर ते पण लवकरात लवकर ठीक होऊ शकते.......... आठ दिवस बघा नाहीतर आपण चाइल्ड साक्रेटीस कडे एकदा जाऊन येऊ शकतो....

डॉक्टरांनी त्याला काही मेडिसिन्स आणि तिच्या सोबत कसं वागायचं त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या.....

राज सुद्धा मनातून खूप खचला होता...... त्याच्या सुद्धा डोळ्यासमोरून झालेल्या गोष्टी जात नव्हत्या.....पण नंदिनी साठी त्याला स्ट्रोंग राहणं खूप गरजेचं होतं....... तिच्यासोबत वावरताना अगदी पहिल्यासारखा नॉर्मल वागत होता........

*******

नंदिनीला तीन-चार दिवस चांगला ताप होता.....ती राज ला अजिबात एक मिनिटांसाठी सुद्धा सोडायला तयार नव्हती..... बाथरूम ला जाणे सुद्धा त्याच्यासाठी कठीण होऊन बसलं होतं..... खाणं-पिणं.... झोपन.... सगळेच राज चा मांडीवर ...जवळ......बसूनच सुरू होते...... एक मिनिटासाठी तिने त्याचा हात सोडला नव्हता.... तो पण तिच्यापासून अजिबात दूर जात नव्हता.... फारच काम आले तर राहुल.... आई कुणालातरी तिच्याजवळ समजावून बसवुन जायचा....... तिला होणारा त्रास बघुन तो पण मनातून खूप तुटला होता...... तिच्या डोळ्यात सतत त्याला काही ना काही प्रश्न दिसायचे..... पण ती फार अबोल झाली होती...... चुपचाप फक्त राजकडे बघत बसायची....... राज सतत तिला छोट्या छोट्या तिच्या आवडीच्या गोष्टी सांगून.... टीव्ही मध्ये तिच्या आवडीचं कार्टून लावून तिला जास्तीत जास्त एंगेज ठेवायचा प्रयत्न करत होता......आबा.. राहुल.. आई.. काकी असे सगळे मिळून कधी कॅरम कधी लुडो तिच्या आवडीचे गेम तिच्या सोबत खेळत होते........ तरी मात्र अजूनही तिला घराच्या बाहेर जायची भीती वाटत होती....

*****

रोहन मला त्या राकेश ची सगळी माहिती हवी आहे..... राज रोहनला फोनवर काही इन्स्ट्रक्शन देत होता....... राजला खरंतर या प्रकरणात त्या राकेश ला अजिबात सोडायचं नव्हतं त्याला पोलिसात द्यायचे होतं...... पाण्या कंप्लेंट मुळे नंदिनी सुद्धा त्यात असणार होती...,. तिच्या मनावर डोक्यावर शरीरावर इतका परिणाम झाला होता त्यात परत पोलीस केस म्हटलं तर वारंवार तिला नको ती प्रश्न विचारले जाणार होती ज्यामुळे तिची परिस्थिती अजूनच वाईट झाली असती आणि तिला त्या सगळ्यातून बाहेर निघणं कठीण झालं असतं म्हणून त्याने राकेश ची कंप्लेंट केली नव्हती...... पण त्याला असं सोडणार सुद्धा नव्हता

राकेश च्या सगळ्या माहितीमध्ये त्याला त्याच्या बरचाशा इल्लिगल कामाची सुद्धा माहिती मिळाली होती...... रोहनने आपली माणसे कामाला लावून राकेश च्या विरोधात सगळे पुरावे जमा केले होते...... आणि चांगलीच स्ट्रॉंग केस बनवली होती...... आठ दिवसांमध्ये राकेश चा बिझनेस सगळे काम मातीत मिळवली होती....... सगळीकडून त्याला चांगलंच एकटे पडलं होतं...... त्याच्या सगळ्या वाईट कामांची पुराव्यासकट माहिती पोलिसांना देऊन त्याची रवानगी पोलीस स्टेशनमध्ये केली होती........

राज खरे तर असा कधीच नव्हता .....तो नेहमी आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असाच वागायचा....... त्याच्याकडे बरीच पावर होती .......त्याची ओळख इ मोठ्या लोकांपर्यंत होती........ पण त्याने या गोष्टीचा कधीच गैरवापर किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला नव्हता......... पण यावेळी मात्र तो राकेशला सोडणार नव्हता......... त्याने केलेल्या कृत्याची सजा त्याला मिळायलाच हवी होती......... त्याच्या विरोधात त्याने इतके स्ट्रॉंग केस बनवली होती की कोणी त्याला मदत करु शकणार नव्हतं की कोणीच त्याला सोडवू शकणार नव्हतं.........

********

आज त्या गोष्टीला जवळपास दीड महिना होत आला होता...... पण नंदिनी मध्ये फार काही जास्ती बदल झाला नव्हता........ राजने मात्र संपूर्ण वेळ नंदिनी ठीक होईपर्यंत नंदिनी ला च द्यायचं ठरवलं होतं त्यामुळे त्याने ऑफिसमध्ये जाणे सुद्धा बंद केले होते...... घरी सुद्धा ऑफिसचे काम करणं कमी केले होते अगदी खूप महत्त्वाचं काम असलं तर ती जेव्हा झोपली असायची तेव्हा तो ते करायचा......राहुल ने ऑफिस बऱ्यापैकी सांभाळलं होतं त्यामुळे राज ला ऑफिसची जास्ती काळजी आता वाटत नव्हती....... त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ नंदिनीला देऊ शकत होता.......

नंदिनीच बर्‍यापैकी डेली रुटीन सुरू झालं होतं....... पण आज पुढे असतांना ती सगळं  करायची...... जितका सांगितलं तितकाच  करायची....... राजा सोडून बाकी कोणाचाही स्पर्श तिला नकोसा वाटायचा चुकून जरी टीचर चा आईचा कुणाचाही स्पर्श झाला तरी ती अंग चोरायची....... सुरूवातीला काही दिवसांसाठी डॉक्टरांनी स्लीपिंग पिल्स दिले होते...... सुरुवातीला तिला झोप यायची नाही आणि आली तरी ती दचकून घाबरून झोपेतून उठायची त्यामुळे तिच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होत होता पण काही दिवसांसाठी म्हणून झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे रात्रभर तिची नीट सुरू होत होती....... सुरुवातीचे पंधरा दिवस त्याचे ऑलमोस्ट झोपे झोपेतच गेले होते..... राजनी सायटिक डॉक्टरांकडून बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या होत्या.......त्याप्रमाणे तो तिच्यासोबत कंटिन्यू  पॉजिटिव आणि हेल्दी टॉक्स करत होता....... त्याने सर्च करून बऱ्याच मोटिवेशनल स्टोरीज जमा केल्या होत्या...... या सगळ्यांचा तिच्या मेंदूवर चांगला परिणाम दिसून येत होता....... ती आता अभ्यासात बऱ्यापैकी लक्ष घालत होती..... तरीसुद्धा अजूनही ते एकटी राहिला..... राजला सोडून राहिला घाबरत होती...... तिला तर बेडवर सुद्धा झोपायला बरीच भीती वाटायची...... वारंवार तिला वाटायचं की बेड खालून कोणीतरी येईल आणि तिला पकडेल......... झोपताना पण टीप तिचा पूर्ण अंग चोरून राज्य कृषीमध्ये झोपायची पांघरून थोडंसं जरी वर-खाली झाला तर घाबरून उठून बसायची.....

*******

अशाप्रकारे त्या परीने  बॅडमॅन ला चांगलंच झोडपून काढलं..... आधी ती घाबरली.....रडली..... पण मग तिने ठरवलं की असं रडतरडत घाबरत घाबरत नाही जगायचं..... मला आनंदाने माझा प्रत्येक दिवस घालवायचा असे तिने ठरवलं आणि त्यासाठी तिला खूप स्ट्रॉंग होणे गरजेचं होतं..........आणि मग तिने त्या प्रमाणे स्वतःची तयारी करून घेतली,...... आणि मग जेव्हा बॅडमॅन ने त्या परि वर हमला केला तेव्हा तिने कुठल्याच राजकुमाराची वाट न बघता त्याला चांगलंच मारलं आणि पोलिसांकडे दिलं...........

नंदिनी राज चा कुशिमध्ये झोपली होती आणि राज तिला गोष्ट सांगत होता.....

असा होता येत ...... परी पण स्ट्रॉंग बनवू शकते.....नंदिनी

हो.... परी पण स्ट्राँग बनू शकते आणि बनायलाच पाहिजे..... आशी किती दिवस ती घरात घाबरून बसणार आहे...... समुद्र ...बीच... गार्डन... मित्रांसोबत एन्जॉयमेंट मग तिला कसं करता येणार....... अशी तर वाईट लोक आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात........ पण त्यांना घाबरायचं नसते.......राज

राज तो अंकल खूप वाईट होता.......तो मला तुझ्याकडे घेऊन जातो म्हणून त्याने मला उल्लू बनवले आणि तिकडे वेगळ्याच रूम मध्ये घेऊन गेला..... आणि मला इकडेतिकडे टच करत होता....... मला ते खूप घान वाटत होते........मी त्याला जाऊ दे म्हणाली तरी तो माझा ऐकत नव्हता............ आणि मला म्हणत होता कोणाला सांगायचं नाही..... नाहीतर तो मला रूम मध्ये बांधून ठेवेल.......... तो माझ्याजवळ आला तर मी त्याला पोटामध्ये किक मारली आणि त्याला ढकलले तर तो भिंतीकडे जाऊन पडला.......आणि मग मी माझ्या हातातल्या घड्याळाचे बटन दाबत होते आणि बाहेर जायचे ते पण आले होते पण त्याने मला परत पकडल....... आणि मग त्याला राग आला आणि त्याने माझे कपडे फाडले........नंदिनी

बघ बर आपण मार्शल आर्ट शिकत आहो तर त्याचा फायदा झाला की नाही...... बघतो स्ट्रॉंग झाली...... आणि त्यामुळे तू तुझ्या हातातलं बटण न घाबरता दाबलं आणि मला कळलं सगळं........राज

तर त्याने मला परत जबरदस्ती पकडल आणि मला म्हणत होता की मी आता मोठी झाली आहे तर असं करायचं असते....... सगळेच करतात..........नंदिनी

राज तिच्या कडे बघत तीच सगळं ऐकून घेत होता....आज त्या दिवसांनंतर ती पहिल्यांदा त्या प्रकारावर बोलत होती.....आता पर्यंत सगळं तिच्या मनातच तिने साठाऊन ठेवले होते......या गोष्टी मनाच्या बाहेर निघणे जरुरी होते......त्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नव्हती.....राज रोज या ना त्या कारणने गोष्ट सांगण्याच्या बहाण्याने तिला बोलत करायचा प्रयत्न करत होता.....जो बऱ्यापैकी आज सफल होतांना दिसत होता....

राज मी मोठी झाली काय आता......नंदिनी

ह्म्म....मोठी तर तू झाली आहेस आता.....बघ तू तर आई पेक्षा तुझी उंची मोठी झाली ना .....तू तर आता माझ्या खांद्यापर्यंत येतेस........आणि बघ तुझ्या बॉडी मध्ये पण बदल झाला आहे ना .......राज

नंदिनी स्वतःकडे निरखून बघत होती.....आतापर्यंत तिच्या ह्या अशा गोष्टी कधीच डोक्यात आल्या नव्हत्या......

पण मी इतक्या लवकर कशी काय मोठी होऊ शकते....नंदिनी

ह्म्म......आपण कधी मोठं होतो ना आपल्याला पण कळत नाही.......आणि तू खूप हुशार आहेस ना म्हणून लवकर मोठी झाली.......राज

पण राज मग तो bad अंकल घान घान काही करत होता....आणि मोठं झाल्यावर अस करावाच लागते म्हणत होता ते खरं आहे काय.....पण मग तू तर असा काहीच कधी करत नाही........नंदिनी

नाही.....ते खरं नाही.....अस वाईट वागणं ....वाईट च असते......... न विचारता. त्याची परवानगी न घेता कोणालाही हाथ लावणं...वाईट असते......मग ती लहान मुलगी असो वा मोठी...किंवा मुलगा असो .......संमती न घेता....समोरच्याची इच्छा जाणून न घेता ....अस वागणं वाईटच असते.......राज

मग तो अंकल असा का वागला.......तुला तर आजीने परवानगी दिली आहे ना ....तरी पण तू असा घान कधीच वागत नाही माझ्या सोबत........नंदिनी

मी मोठा होत होतो ना तेव्हा जर मी कधी काही वाईट केले....किंवा कुणाला त्रास दिला........तर आई आणि आबा मला रागवायचे....... कसं वागायचं सांगायचे......मी ऐकले नाही की आई मला कधीकधी मार सुद्धा द्यायची......आई आणि आबा नी मला चांगल्या गोष्टी शिकवल्या........प्रत्येक वयाच्या मुलीचा....बाईचा मान ठेवायचा असतो......कुठल्याच मुलीकडे वाईट नजरेने ने बघायचे नाही......मुलींबद्दल फक्त नी फक्त रेस्पेक्ट च ठेवायचा असतो.....मानसिकरीत्या शारिरिकृत्या कुठलाच त्रास द्यायचा नाही.......मुलगी म्हणजे देवीचे रुप असते....असे सगळे आई...आणि बाकी घरचे सगळे  शिकवत होते......राज

नंदिनी खूप मन लाऊन

तो अंकल जेव्हा मोठा होत असेल तेव्हा घरच्यांनी नसेल त्याला समजून सांगितले.......तो चुकीचा वागला असेल तरी दुर्लक्ष केले असेल......मुलींबद्दल चा रेस्पेक्ट त्याला समज्वाला नसेल.....आणि त्याने त्याच्या आजूबाजूला सुद्धा असेच काही बघितले असेल.....आपण जे करतोय ते बरोबरच आहे ......अशी त्याचे विचार बनत गेले.....आणि मानसिक दृष्ट्या तो आजारी झाला.......राज

ह्म्म....... राज पण तू तर पूजा... देवीची पूजा वगैरे काही करत नाही........नंदिनी

मन्या पूजा करणे म्हणजे देवीला हळदकुंकू लावूनच पूजा केली पाहिजे असं नाही...... प्रत्येक वयाच्या मुलीचा बाईचा मान ठेवणे..... तिला त्रास न देणे..... पाहिजे तेव्हा मदत करणे...... तिच्या सोबत काही वाईट न करणे..... आणि कधीच कुणाचंही वाईट न करणे...... चांगली काम करणे...... जमत असेल तर गरजूला मदत करणे..... यालासुद्धा देवाची पूजा करणे असेच म्हणतात..........राज

राज तू त्याला खूप मारलं ना...... मला राहुलदादा सांगत होता........ त्याला पोलिसांनी पकडून नेले.......नंदिनी

हो ......तो आता जेलमध्ये आहे......राज

मग तू आता मला काहीच करू नाही शकणार नाही..... तो मल परत त्रास नाही देणार ना.....नंदिनी

नाही..... आता तर कोणालाच त्रास देणार नाही.......राज

तो खरच पोलीस स्टेशन मध्ये आहे.......नंदिनी

हो........ तुला बघायचं.........राज

पण तो परत मला काही केलं तर.........नंदिनी

नाही करणार काहीच .....पोलिस असतील ना तिथे..... आपण उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनला..........राज

पण...... मला भीती वाटते.....नंदिनी

मी असेल आहे ना तुझ्यासोबत........राज

नंदिनी चा मनातली भीती काढण्यासाठी आणि तो खरच पोलीस स्टेशनमध्ये आहे ..... तो आता तुला काहीच करू शकत नाही......आणि जर आपल्याला असंच कोणी त्रास दिला तर पोलीस त्यांना पकडून नेतात..... शिक्षा करतात........हा विश्वास बसवण्यासाठी राज तिला पोलीस स्टेशन मध्ये नेण्याचा विचार करतो.... त्याचा पण तिथे त्याचा मित्र असतो त्यामुळे एक कॅज्यल विजिट तो करू शकत होता....

टीव्ही बघता बघता नंदिनी राज च्या मांडीवरच झोपी गेली....... झोपेत दचकाने..घाबरणे....... अजूनही तीच बंद झालं नव्हतं....... जेव्हा ती घाबरायची तेव्हा राज तिच्या डोक्यावर हात फिरवायचा तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ठेवायचा...... आणि मग ती थोड्यावेळाने नॉर्मल व्हायची...... ती झोपलेले बघून त्याने तिला उचलून बेडवर झोपवले..... तिच्या अंगावरून पांघरून टाकून तो जाणारच होता की तिने त्याचा हात पकडला.....

राज मला सोडून जाऊ नकोस....... मला खूप भीती वाटते...... माझा हात सोडू नको....... राज माझ्याजवळ राह ना....... नंदिनी झोपेमध्ये बडबड करत होती.......

मी इथेच आहे तुझ्याजवळ पिल्लू....... मोठ्या मुश्किलीने तुला सावरला आहे...... इथेच आहे तुझ्याजवळ...... तुझ्यासाठी..... तो परत तिच्या डोक्यात सोबत जाऊन बसला आणि त्याच्या डोक्यातून हात फिरवत होता......

किस्मत से तुम हमको मिले हो
कैसे छोड़ेंगे, ये हाथ हम ना छोड़ेंगे
फिर से बनती तकदीरों को
अरमानों की ज़ंजीरों को,
जानम अब ना तोड़ेंगे
किस्मत से तुम हमको...

क्या कहूँ कैसे, लगते हैं दिल पे, ज़ुल्फों के साये
कोई भूला राही जैसे मंज़िल पा जाये
या कोई दिल तूफ़ान का मारा
दर्द की लहरों में आवारा
कोई प्यारा प्यार का साहिल पा जाये

किस्मत से तुम हमको मिले हो
कैसे छोड़ेंगे, ये हाथ हम ना छोड़ेंगे
टुकड़े दिल के हम-तुम मिल के
फिर से जोड़ेंगे, ये शीशा फिर से जोड़ेंगे...

******

दुसऱ्या दिवशी राज तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता....... पोलीस स्टेशन मध्ये सगळे तिच्यासोबत खूप छान बोलले......घाबरू नको आम्ही तुझी काळजी घेण्याकरिता आहो जणुकाही त्याची शाश्वती ते तिला देत होते...... एका लेडी पोलिस ऑफिसर ने तिला प्रेमाने बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या.... स्वतःला स्वतःची काळजी घेता यावे यासाठी काय काय करता येईल ते सुद्धा सांगितले......... पोलिसांच्या असं चांगल्याप्रकारे ोलणं ऐकून समजून सांगितलेलं ऐकून नंदिनीचा बर्‍यापैकी मनोबल वाढल्यासारखे वाटत होते...... गेली तेव्हा ती राज्यात जवळ-जवळ करत होती त्याला सोडत नव्हती पण हळूहळू एक दोन लेडीज पोलिसांनी तिच्यासोबत फ्रेंडली वागल्या... तसतसं ती हळूहळू त्याच्यापासून दूर झाली..... आपण येथे सुरक्षित आहो ही भावना तिच्या मनामध्ये रुजली....

जेल मध्ये असलेला राकेश दुरूनच तिला राज आणि पोलिसांनी दाखवला त्यांना तिथे जेलमध्ये बघून तिच्या चेहर्‍यावर पहिल्यांदा स्माईल आले.......... तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.......आज बर्‍याच दिवसांनी तिचा कोमेजलेल्या चेहरा टवटवीत वाटत होता....... तिच्या चेहऱ्यावरचे हसू बघून राज्या डोळ्यात आनंदाश्रू आले....

राज मी आता खूप स्ट्रॉंग बनणार आहे...... असे कोणतेच बॅडमॅन मला आता त्रास देऊ शकणार नाही इतकी मी स्ट्रॉंग बनणार आहे......... मी ....तुला सगळ्यांना खूप त्रास दिला ना....... नंदिनी त्याचे डोळे आपल्या हाताने पुसत बोलली....... तिला तसं त्याचे डोळे पुसताना बघून राहत सन्मान भरून आलं आणि बऱ्याच दिवसांपासून त्याचे मन शांत झाले......

नाही रे मन्या तू कधीच त्रास देत नाहीस.....त्याने तिला आपल्या कुशीत के तिच्या कपाळावर किस केले.....

थँक्यू मिस्टर गौरव...... आज तुमची.... तुम्हा सर्वांचे खूप मदत झाली...... सगळ्यांना धन्यवाद करून ते दोघे घरी परत आले....

*******

मे आय कम इन सर........लावण्या

येस.....राज

मिस लावण्या..... हे तुमचं रेजिगनेशन  लेटर...pls sign it....... राज

आज जवळपास दोन महिन्यांनी राज ऑफीस मध्ये आला होता........ पाणी आले आले त्याने पहिले काम हे केले होते..... लावण्याला ऑफिसच्या बाहेर काढायचे होते...... जेव्हा राज ने  रोहनला राकेश बद्दल माहिती गोळा करायला सांगितली होती तेव्हाच लावण्यावर सुद्धा वॉच ठेवायला सांगितला होता........ त्यामुळे पार्टी च्या दिवशी रात्री लावण्याचा सुद्धा काहीतरी प्लान होता हे त्याला कळले होते......त्याच बरोबर पहिल्यांदा नंदिनी ऑफिस मध्ये आली होती तेव्हा तिला घाबरवण्याचा सुद्धां लावण्याचा हात होता........ आणि ऑफिसमध्ये छोट्या-मोठ्या त्याच्यासोबत होणाऱ्या गडबडीमध्ये सुद्धा लावण्याचा हात होता हे त्याच्या लक्षात आले होते........ त्याला तिच्यावर बऱ्याच दिवसांपासून डाउट होता...... त्यामुळे त्याने तिच्यावर वॉच ठेवायला सांगितला होता आणि आता त्याच्या हातात बरेच प्रूफ लागले होते......आणि आज ऑफिस मध्ये आल्या आल्या पहिलं काम त्याला तिला ऑफिसमधून काढायचं होतं.....

व्हॉट........ मी काय केला आहे..... मी रिझाईन नाही करणार......लावण्या

तुम्ही ऑफिसमध्ये आल्यापासून काय काय केल आहे हे सगळेच मला माहिती आहे त्यामुळे चुपचाप  रिजाइन करा आणि इथून चालते व्हा......राज

तुमच्याकडे काय प्रूफ आहेत...... उगाच तुम्ही माझ्यावर चुकीचे आरोप लावू नका.......लावण्या

Ms. Lavanya don't check my pateince level........now leave..... राज

तू माझे पेशंस  चेक करतोय...... तुझ्या वडिलांनी मला तुझ्यासोबत लग्न करायच आश्वासन दिलं होतं....... किती वर्षापासून मी हे स्वप्न बघत आहेत..... पण तू त्या पागल मुलीशी लग्न करून मोकळा झाला ....... पण तुझ्या बाबांनी मला होप दाखवली........ ऑफिसमध्ये आले त्यासाठी ....... स्वतःची इंडस्ट्रीज सोडून तुझ्या कंपनीमध्ये एका साध्या लेबलवर काम करते आहे...... तुझा टेन्शन मिळवण्यासाठी काय नाही ते केलं....... पण तू आहेस की एक नजर बघायला सुद्धा तयार नाही..... एवढं काय आहे त्या पागल मुलींमध्ये....... ना दिमाग... ना शिक्षण ना करियर...... दिसायलाही सो सो आहे...... तुझ्या लायकीची तरी आहे काय ती.......

Lavanya....... mind your language.....don't forget you are talking about my wife .... राज थोड्या मोठ्या आवाजातच बोलला.....

मी तुला कुठलेच एक्सप्लेनेशन देण्याकरिता बांधील नाही आहो...... आणि मी तुला अशी कुठलीही कमिटमेंट दिली नव्हती मी तर तुला ओळखत सुद्धा नव्हतो.......राज

आधी नव्हता ओळखत आता तर ओळखतोस ना....... ठीक आहे ती तुझी बायको आहे तिला ठेव तू घरी....... आपल्यामध्ये काही रिलेशन असला तर तिला काही कळणार सुद्धा नाही आणि काही फरक नाही पडणार नाही....... आपण आता सोबत राहू...... लावण्या त्याच्या जवळ जात..... त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवत... त्याच्यासोबत नकोती चाळे करत बोलली

Stay away...... don't cross your limits...... तुला तुझी काही सेल्फ रिस्पेक्ट नाही..... हे जे काही तू करते आहेस ना ते आत्ताच थांबावं....... मी तुला एक सिम्पल l गोष्ट सांगितली आहे ते कर आणि निघ इथून..... नाहीतर मला धक्के मारून तुला ऑफिसच्या बाहेर काढावे लागेल..... राज तिला हाताला धरून दूर लोटत बोलला..

तू कोणासोबत बोलतो आहे तुला कळत आहे का....... तू माझी इन्सल्ट करतो आहे...... तू मला काय धक्के मारून बाहेर काढणार.......... मी बघ आता काय करते..... नाही तुझं नाव खराब केलं तर नाव नाही लावणार लावण्या....... आणि हि तुझीच लोक आणि0नाही  तुझं तोंड काळ करेल तर बघ....म्हणत तिने आपल्या शर्टाच्या वरच्या तीन बटन काढल्या..... एका हाताने आपल्या शर्टाची बाही खांद्या जवळून फाडली आणि आपल्याच हाताने तिथे आपली नखे रुतवली..... कपडे असता व्यस्त केले..... केस विस्कटले.... ओठांची लिपस्टिक खराब केली...... डोळ्यात पाणी आणून बिचारी बनली......

राज अवाक् होत तिच्याकडे बघत होता....

त्या दिवशी पार्टी मध्ये खरंतर माझा तुला फसवायचा प्लॅन होता........ सगळे प्लॅनिंग पण नीट झाली होती...... पण तुझी ती मूर्ख बायको तिने वेटरला तुझ्या ड्रिंक मध्ये औषध मिसळताना बघितलं आणि ती तुला सांगायला येत होती...... त्यानंतर तुम्हा दोघांनाही फसवण्याचा मी प्लान केला होता...... पण तिचं नशीब चांगलं होतं आणि तो मूर्ख राकेश........सगळं फिस्कट्वले.... पण ठिक आहे तेव्हाच अपूर्ण राहिलेले काम आता पूर्ण करते......

मी अशी बाहेर गेले ना तर मला कोणाला काही सांगायची सुद्धा गरज पडणार नाही....Now wait and watch.....

******

******

नमस्कार मित्रांनो

सर्वप्रथम दसरा चा हार्दिक शुभेच्छा!

आपल्या सगळ्यांना राज नंदिनीचे character आवडत आहेत त्यासाठी खूप धन्यवाद.. मला काही कॉमेंट्स आणि मेसेज आले की लाईक्स आणि कॉमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत काय...किंवा कथा लाईक्स कॉमेंट्स साठी नका लिहू......किंवा लाईक्स कॉमेंट्स साठी कथा मधात नका सोडू वैगरे........ अवडलीत आपली टिप्पणी......मी likes नी कॉमेंट्स साठी कथा लिहीत नाही आहे.....फक्त तुमची प्रतिक्रिया आली तर चुका कळतात, आवड कळते, लिखाणाचा उत्साह वाढतो......मी कथा माझ्या आवडीसाठी, माझ्या समाधानासाठी लिहिते आहे , माझी इथे कुणासोबत कुठलीही स्पर्धा नाही...आणि करायची सुद्धा नाही.......तर मी ही कथा अर्धवट सोडणार नाही, ती मी पूर्ण करणार आहे so don't worry.....

खूप छान वाटले कथा तुम्हाला आपली वाटते आहे ....माझ्या कल्पनेतील shriraj तुम्हा सर्वांना आवडला....त्याचे विचार आवडलेत.....तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद, असेच भरभरून प्रेम असू द्या .....

Sorry for late post 

काळजी घ्या, आनंदी राहा

***********

🎭 Series Post

View all