नंदिनी...श्वास माझा 36

एक निस्वार्थ प्रेम

भाग 36

नंदिनी भेटत नव्हती.....राज खूप panic झाला होता.....

राहुल तिकडे......राज ने हाथ दाखवला नी तुकडे पळाला.....

थोड्या वेळ पूर्वी.....

राजनंदिनी चा डान्स नंतर सगळीकडे त्यांचे कौतुक होत होते......नंदिनी आता बऱ्यापैकी ठीक वागत होती....बालिशपणा होता....पण राज नी सगळ्यांपुढे कसे वागायचे वैगरे सगळं समजावून सांगितले होते....त्यामुळे ती  कमीच बोलत होती...हसून फक्त हो नाही मध्ये उत्तर देत होती.....आणि कुठे काही गडबड झालीच तर काकी राज राहुल सांभाळून घेत होते.....

नंदिनी काकी सोबत काही लहान मुलींसोबत गप्पा करत होती..... गेस्ट वाढल्यामुळे राज त्यांना अटेंड करत होता.....ड्रिंक .. स्नॅक्स असे अधूनमधून सर्व्हिंग सुरू होते....आणि सॉफ्ट मुसिक.....

लावण्याने इशारा केला.......एका वेटर नी एका ज्यूस चा ड्रिंक्स मध्ये काही टॅबलेट टाकल्या......नी ते घेऊन तो राज जवळ गेला.....ज्यूस बघून तो ग्लास हातात घेतला......हातात ग्लास घेऊन तो बिस्नेस चा गप्पा करत होता..नी लक्ष मात्र नंदिनिवर होते.....

लावण्या टक लाऊन राज ज्यूस कधी संपवतो ते बघत होती......पण गप्पा मध्ये राज ने ग्लास हातातच पकडून ठेवला होता..........तो ग्लास तोंडाजवळ नेनाराच की अचानक सगळी लाइट्स बंद झाले .....नी सगळी कडे अंधार पसरला....

Oh God ...... लाइट्स कसे काय बंद झालेत.....हा तर माझा प्लान नव्हता.....आता कळलानार कसे राज ने ज्यूस पिला की नाही ते........लावण्या मनातच बोलत होती

ओह शिट..........अंधारात नंदिनी ला भीती वाटते ...... रजल वाट काढत नंदिनी उभी होती तिकडे जात होता....तो मोबाईल चा लाईट ऑन करणारच की तेवढयात  लाईट आले ....पण त्याला नंदिनी मात्र दिसली नाही.......आता त्याला थोडी काळजी वाटली.....आणि ती होती तिथे अजाऊबजुला शोधायला लागला......पण ती भेटतच नव्हती ......

बाकी लोकांना डिस्टर्ब नाही म्हणून    त्याने राहुल नी रोहन ला सोबतीला घेतले......नी चुपचाप विचारपूस करत होते...पण ती कुठेच सापडत नव्हती.... आता राज थोडा पॅनिक झाला होता.....आणि अचानक त्याने त्याचा हाथाकडे बघितले.....त्याचा रिस्ट वाच ब्लींक करत होता....आणि काही लक्षात येऊन त्याने त्याचा मोबाईल मध्ये काही केले.....

राहुल तिकडे......राज ने हाथ दाखवला नी तिकडे हॉटेल रूम्स चा अरिया होता तिकडे पळाला........

आज पार्टी मध्ये जने त्याला सकाळपासूनच कंफर्टेबल वाटत नव्हते.......त्याची अजिबात जायची ईच्छा नव्हती पण dad च्या फोर्स मुळे त्याला जावे लागणार होते.....

Wow घड्याळ........राज नंदिनी ची पार्टी साठी तयारी झाल्यावर निघणारच होते की त्याला काहीतरी आठवले आणि त्याने कपाटातून एक रिस्ट वाच काढले नी ते नंदिनी चा हातात घातले होते...

नंदिनी....हे बघ...हे स्पेशल घड्याळ आहे.....आपण जात आहोत ना तिथे खूप लोकं असतील.....समजा मी तुझ्या सोबत नसलो...किंवा तुला कोणी त्रास दिला.....तुला भीती वाटली...... तर हे बटन दाबायच.......okay..... राज

हो ......नंदिनी

राज ने तिच्या हातात स्मार्ट सेफ्टी वाच घातली होती...ज्यात  GPS tracking सुद्धा होते ....ज्याचे setting त्याने त्याचा फोन मध्ये करून घेतले होते.......आणि तेच आता त्याचा फोन मध्ये लाईट ब्लींक झाला होता....ज्यावरून त्याला कळले होते नंदिनी घाबरली आहे.....आणि त्याने फोन मधून लोकेशन trace केले तर ते हॉटेल मधले दाखवत होते....

राहुल नी काकी नना थोडाफार सांगितले नि पनिक न होता तिथे सांभाळून घे म्हणून सांगून तो राज च्या मागे पळाला होता......रोहन सुद्धा राज सोबत गेला होता.....

लोकेशन बिल्डिंग मधल दाखवत होते......
राज ही तर 25फ्लोअर आहेत .......रोहन
रिसेप्शन इस्त , वेटर....आजूबाजूला जितकी लोकं दिसतील त्यांना फोटो दाखवत ते नंदिनी बद्दल विचारात होते.......

नंदिनी सापडत नव्हती...... राज खूप कावराबावरा झाला होता......

तुम्ही म्हणाला ना राज कडे जातोय....कुठे आहे राज....नंदिनी घाबरतच विचारत होती......ती एका रूम मध्ये होती...

हो...तो इथेच येणार आहे........ आणि तो तिच्या जवळ जवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलला...

तिला त्याचा स्पर्श वेगळाच वाटला ....जसे राज ने तिला समजावलं होते......

मी जाते बाहेर.....म्हणत ती दाराकडे जायला निघाली....

इतकी पण काय घाई आहे......तो तिला नको तिथे स्पर्श करू लागला...आता नंदिनी खूप घाबरली ती रडायला लागली....राज राज ओरडत होती......पूर्ण ताकदीनिशी तिने त्याला ढकलले तो पलीकडे जाऊन पडला......आणि तेव्हाच तीच लक्ष हातात असलेल्या वाच कडे गेले नि ती ते बटन काँटीनिअसली दाबत होती .... ज्याचं सिग्नल राज ला पोहचले होते....

रोहन ने हॉटेल managements सोबत बोलून किती इंपॉर्टन्ट आहे सांगुन त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते......त्यात त्यांना नंदिनी दिसली.....त्याच्या सोबत जातांना.....14थ फ्लोअर ला.....राज ने त्याला बघून मुठी आवळल्या.....नी तो घाईनेच लिफ्ट कडे धावला.....नी 14फ्लोअर ला आला.....मागोमाग रोहन राहुल सुद्धा होते....ते त्या floor वर शोधत होते....

राज इथे तर 30rooms आहेत......राहुल

तेवढयात तिथे एक स्टाफ आला...त्याला ते नंदिनीचा फोटो दाखात होते..... विचारपूस करत होते....तेवढयात अजून एक स्टाफ आला.....
तुम्ही राज......स्टाफ
हो.....हिला बघितले.......राज

मी चेहरा नाही बघितला पण त्या mam राज राज करत होत्या ....... अॅक्च्युअली कस्टमर ची माहिती देणे आमच्या रुल्स मध्ये नाही पण मला गडबड वाटली म्हणून.....

रूम........

स्टाफ ने एका कॉर्नर मधल्या रूमकडे बोट दाखवलं

Keys....... रोहन

पण तोपर्यंत राज कुठे तिथे थांबतो....तो नी राहुल तिकडे गेले...तेवढयात स्टाफ keys घेऊन आला नि त्याने डोर उघडले ..

आणि पुढे बघून राज चा राग अनावर झाला....

नंदिनी रडत राज राज करत बेड वर होती नी तो तिच्या वर....

राकेश.........राज ओरडतच त्याने मागून त्याच्या कॉलर ला पकडले नी ओढले नी भिंतीवर त्याला भिरकावले.....

राज .....नंदिनी रडत होती.....राज ने तिला उचलून तिच्या चेहऱ्यावरून हाथ फिरवत तिला आपल्या कुशिमध्ये घेतले...नी तिला शांत करत होता......

नंदिनी ठीक आहेस ना बाळा....... रागमध्ये असलेल्या राज चा आवाज एकदम प्रेमळ झाला.....

राज यांनी मला bad टच केले....मला मारले....माझे कपडे फाडले.....नंदिनी रडतच राज ला लागलेले दाखवत होती....मला राज कडे जाऊ दे मी त्याला खूप विनवणी केली ....मला सोडायचं नव्हता.....मला खूप मारला यांनी....खूप मारलं....मला भिंतीवर आपटले.........नंदिनी रडत होती
.....

राज ने बघितले तर तिच्या कपाळाला .... हाताला लागला होते.....केसा विस्कटलेले.....कपडे वॉरून फाटलेले...होते........तिला त्या अवस्थेत बघून राज च मन कळवले....त्याचा डोळ्यात पाणी आले.....त्याने तिला परत आपल्या मिठीत घट्ट पकडले.....

राकेश तिथून पळणाराच की राहुल....रोहन ने त्याला तिथेच पकडून अडून ठेवले.....राहुल ने त्याला चांगलाच चोप दिला .....

नंदिनी मी राहुल आहोत ना....कोणी काही करणार नाही....घाबरु नको.... स्ट्रोंग आहेस ना तू.....माझी नंदिनी खूप स्ट्रोंग आहे ना.......राज तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडत बोलत होता......  राज ने प्रेमाने बोलून नंदिनी ला शांत केले......

भाई........राहुल ने त्याच ब्लाझेर काढून राज चा हातात दिले....

राज ने तिला ब्लाझेर घालून दिले.....तिचे केस नीट केला....नी तिच्या कपाळावर किस केले....

राहुल सोबत जा.....मी आलोच थोड्या वेळात...... ह्म्म......राज

लवकर येशील ना.......नंदिनी

हो .......राहुल ....बाहेर कुणाला काही कळता कमा नये......नी खाऊ घाल..... जेवली नाहीये ती..,...राज

नंदिनी रडतच राहुलच्या कुशीत शिरली........

नंदिनी रडू नको.....बघ मी आहो.....राज आहे ना...... चल आपण जाऊया.....तुला लागलंय ना ...औषध पट्टी लावू...... राहुल तिला समजावत बाहेर घेऊन गेला......

तुझी हिंमतच कशी झाली तिला हाथ लावायची...,.....आता राज ने राकेश कडे बघितले......राज चे डोळे जणू आग ओकत होते.......त्याने आपल्या मुठी आवळल्या आणि जागा भेटेल तिथे राकेश ला पायाने हाताने मारत सुटला.......राकेश प्रतिकार करत होता पण आधीच राहुल ने त्याला चांगलाच चोपला होता.....नी आता राज.....

रूम.मध्ये सगळ्या वास्तू तुटत होत्या.....राज पाहिजे तिकडे त्याला फेकत होता.....

आतापर्यंत रविकांत शशिकांत लांसुद्धा माहिती झाला होते..... ते सगळे इकडे आले होते......तर राज भयंकर रित्या त्याला मारत होता.....त्याचा राग बघून कोणाचीच मध्ये पडायची हिम्मत होत नव्हती.....फक्त दुरूनच बोलत होते...

आता राकेश अर्धमेला होत जमिनीवर पडला होता....
राज बस कर.... मरेल तो आता......रोहन मध्ये पडला.....

मरु दे.....त्याची चूक च तशी केलीय......हिंमतच कशी झाली त्याची माझ्या नंदिनी ला हाथ लावायची.....फुला प्रमाणे जपत आलोय मी तिला.......याची हिंमतच कशी झाली....राज परत त्याला मारत होता....

राज.....सोड त्याला......नंदिनिसाठी सोड......तुला काही झालं तर तिला कोण सांभाळेल.......रोहन

नंदिनी च नाव ऐकून तो मारायचं थांबला........जर नंदिनी ला काही झालं ना मी तुला जिवंत सोडणार नाही......राज रागातच राकेश ला बोलला.....

बाहेर जायला निघाला तर समोर सगळे उभे होते.... राज ने रागानेच एक कटाक्ष शशिकांत...पाटील...लवण्यावर टाकला ...

रोहन ....nothing should go outside media....and pay for the damage......ni रागातच निघून गेला

*****

राज गाडी पार्क करून पळतच घरात आला.....सगळे जगेच होते......मारामारी मध्ये राज ला पण थोडफार लागले होते......त्याचा पण सगळा अवतार बिघडलेला होता.....

राज अरे......किती लागलंय तुला......आई राज जवळ येत बोलली

राज च मात्र सगळं लक्ष नंदिनी मध्ये होते......त्याने सगळ्यांकडे बघितले....नी त्याला राहुल दिसला....

राहुल नंदिनी........

ठीक आहे...... झोपाऊन आलोय......अंग दुखत होते तिचे तर पेन किलर दिलीये.......राहुल

आई बोलतच होती की राज आपल्या रूम कडे पळाला....

सूनबाई उद्या बोला......जाऊ द्या त्याला.....आणि हो नंदिनी सोबत सगळे नॉर्मल वागा.....झालेला प्रकार आठवेल असा काही बोलू नका......नी घराच्या बाहेर ही गोष्ट गेली नाही पाहिजे.....अगदी घरातल्या नोकरांना सुद्धबकळता कामा नये......पोरीच्या मनावर कुठलाही वाईट परिणाम मला झालेला चालणार नाही.......झोपा आत्ता सगळे...... आबा

राज वरती रूम मध्ये आला तर नंदिनी बेड ला टेकून झोपली होती.......तिचा चेहरा पूर्ण उतरला होता...तिच्या चेहऱ्यावर त्याला वेदना दिसत होत्या......राज तिच्या जवळ गेला त्याने तिला डोळे भरून बघितले...

सॉरी ग नंदिनी......नीट काळजी नाही घेऊ शकलो तुझी.....मला एकदाच माफ कर ग राणी........राज

...फ्रेश होऊन तो तिच्या जवळ बसला.......तिच्याकडे बघत......झालेला प्रकार वारंवार त्याच्या डोळ्यापुढे येत होता........नंदिनीचा घाबरलेला रडवलेला चेहरा त्याचा डोळ्यां पुढून जात नव्हता....आणि अचानक त्याला काही आठवले....

कपाटातून औषध घेऊन तो तिच्या जवळ बसला.....तिला आपल्या कुशीत घेतले......तिची झोप मोड होणार नाही याची काळजी घेत त्याने तिच्या नाईट ड्रेस चा बटन काढल्या........नी तिच्या माने जवळ ...गळ्याजवळ.....चेक करत होता तर तिथे बरेच नखांनी ओरबडल्याचे निशाण दिसत होते.....अगदी तिच्या गळ्याखली सुद्धा.......ते बघून त्याचा डोळ्यात पाणी आले........त्याच मन हेलावले.......त्याने जिथे जिथे ओरबदले होते तिथे तिथे औषध लावले......तिला आपल्या कुशीत घेतले....नी पाठीवर चेक केले....तिथे सुद्धा थोडे फार होते.......मलम लावून त्याने तिला बेड वर नीट झोपवले......तिचा शर्ट थोडा वर केला तर कंबरेवर पोटावर पण लागलेलं होत.......जस जस त्याला तिला लागलेले दिसत होते त्याच मन आतून खूप तुटत होते......त्याचा डोळ्यातले पाणी थांबायचं काही नावच नव्हते घेत.....जिथे जिथे जखम दिसायची तिथे तिथे तो औषध लावत होता....भित भित च त्याने तिची शरीर चेक केले होते.....नी खूप मोठं काही होण्यापासून वाचले होते.......

रूम च दार नॉक झाले......तसा राज भानावर आला....त्याने नंदिनीच्या अंगावर पांघरून नीट केले......डोळे पुसले नो दार उघडले

आई तू.........

हे हळद दूध घे.........जेवणार तर नाहीच तू.....येवढे तरी घे......बर वाटेल ......आई ने बाजूला टेबल वर ग्लास ठेवला.....

राज तू ठीक आहेस.......त्याचा चेहरा त्यांना बघावला नाही गेला.....

आणि मनात साचलेल्या भावना बाहेर आल्या....राज आपल्या आई चा गळ्यात पडून रडायला लागला....

हरलो ग आज मी.......चांगला नवरा नाही बनू शकलो......नाही काळजी घेऊ शकलो नंदिनीची......तिच्या आजी आबा nna दिलेले वचन पूर्ण नाही करू शकलो........हरलो आज मी.......राजचा आवाज जड होत होता........

तिच्या अंगावर इतक्या जखमा आहेत.........काय सांगू उद्या तिला........जखमा भरतीलही.......पण मनावरचे घाव.......किती विश्वास होता तिचा माझ्यावर........राज सोबत असला की मला काहीच होत नाही..... आंधळा विश्वास आहे तिचा माझ्यावर........कशी नजर मिळवू तिला.......खचलो ग मी.......खूप प्रयत्न केला g मी.......नाही सांभाळू शकलो तिला........राज ला काहीच सहन होत नव्हते......

राज ची ती अवस्था आई ला बघवत नव्हती.....

राज शांत हो......तू असा खचून जाशील तर तिला कोण सांभाळणार बाळा........आई त्याच्या डोक्यावरून हाथ फिरवत बोलत होती

कोण म्हणतो तू हरलास.....तू नाही हरला राजा.....बघ ती सुखरूप आपल्या घरी आपल्या डोळ्यांसमोर आहे.........तू जिंकला आहेस.......तू नवरा म्हणून पण जिंकला आहेस.......आता जितके पाहिजे तितकं रडून घे.....पण तिच्या समोर तुला स्ट्रोंग च राहावे लागेल......तिच्या भाषेत तिचा सुपरमॅन ........हो ना.......

आम्ही आहोत तुझ्यासोबत ...आपण सगळे मिळून तिला ठीक करू.......तुझ्या प्रेमाने सगळं विसरेल ती लवकरच......त्याचा डोक्यावर हाथ फिरवत बोलली

आराम कर आता.......

ह्म्म..... राज शांत होत बोलला....

******

राज राज......तो मला मारेल......राज राज मला सोडून नको जाऊ........नंदिनी झोपेतच घाबरत बोलत होती

नंदिनी.......राज तिच्या गालावर मारत तिला उठवत होता

राज .......मला........सोडू......

नंदिनी उठ.....मी इथेच आहो....बघ मला.....राज नंदिनी ला उठावात होता....

तिने डोळे कीलकीले केले.....तर तिला समोर राज दिसला......

राज तो ....तो...मला मारतोय.......राज......नंदिनी घाबरत होती.....

नंदिनी हे बघ.....कोणीच नाही इथे......आपण आपल्या घरी आपल्या रूम मध्ये आहो बघ......ते बघ तुझे खेळणे.....मी इथेच आहो तुझ्या जवळ......कुठेच नाही जाणार......इथेच तुझ्या जवळ राहणार.......

नंदिनी ने सगळीकडे एकवार नजर फिरवली ....नी मग ती शांत होत राजच्या कुशीत शिरली......राज मागे बेड ला टेकून बसून तिला आपल्याजवळ घेत....तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता.......आणि मग कधीतरी दोघांचा डोळा लागला.....

*******

🎭 Series Post

View all