Aug 16, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 33

Read Later
नंदिनी...श्वास माझा 33

भाग 33

नंदिनी दिसत नाही म्हणून राजाने त्याच्या बालकणी मधून बघितले तर नंदिनी बाहेर खेळत होती.... खेळता खेळता तिचा बॉल मेन गेट च्या बाहेर गेला..... बोला नाही आला म्हणून ती त्याच्या मागे मागे पळत बाहेर गेली....... तिला बाहेर जाताना पाहून राज घाबरला आणि तो पळतच खाली आला... आणि नंदिनी च्या मागे पळाला..... त्याला बाहेर जाताना बघून सिक्युरिटी गार्ड त्याच्या मागे मागे आला.....

गेटच्या बाहेर येऊन बघतो तर नंदिनी त्याला रस्ता क्रॉस करताना एका  लहान मुलाच्या मागे जाताना दिसली..... रस्त्याने येणाऱ्या गाड्यांकडे तिचं लक्ष नव्हतं आणि एक गाडी तिच्याकडे भरधाव वेगाने येतांना राजला दिसली.....

नंदिनी sss...... राज जोरात ओरडला........ आणि पळत जाऊन त्याने तिच्या हाताला पकडून स्वताकडे ओढलं....... स्वतः आपला हात तिच्या डोक्याखाली ठेवला आणि त्याला गाडीचा धक्का लागला आणि ते दोघे खाली पडले..... सुदैवाने कार वाल्याने वेळेच भान राखून करकचून ब्रेक दाबला पण तरीसुद्धा थोडासा धक्का राजला लागला होता.......राजनंदिनी च्या डोक्याच्या खाली हात ठेवला होता म्हणून तिच्या डोक्याला काहीच लागले नव्हते..... पण राजच्या कपाळाला चांगलंच लागलं होतं.......

तुम्हाला समजत नाही का असं रस्त्याच्या मध्यातून कोण जात असते...... मी इतके हॉर्न दिले तरी बाजूला व्हायचं नाव नव्हते घेत..... माझीच गाडी भेटली होती का समोर यायला...... कार मधला ड्रायव्हर खाली उतरत बडबड करत होता....

नंदिनी .. तू ठीक आहेस ना.......लागला नाही ना राज्या कुठे.... कुठे दुखत तर नाही.....तिच्या डोक्याला परत काही लागू नये जे तिच्यासाठी खूप घातक ठरेल असे डॉक्टरांनी सांगितले होते म्हणून त्याला तिची खूप काळजी वाटली होती........ राज उठून बसत नंदिनी च डोकं चेक करत तिला विचारत होता....

झालेल्या प्रकारामुळे नंदिनी खूप घाबरली होती.... तिने मान हलाऊन च ठिक असल्याचं सांगितलं...

तिथे आजूबाजूला आता बरीच लोकं जमत होती..... सिक्युरिटी गार्ड सुद्धा धावत तिथे पोहोचला होता......राज ने नंदिनी ला उभ केले.....आता त्याला जाणवलं त्याचा उजवा हाथ खूप दुखतोय....

नंदिनी ला घरी घेऊन जा.....सिक्युरिटी गार्ड ला तिथे आललेले बघून राज त्याला बोलला....त्याला आता चक्कर आल्यासारखे वाटत होते. ..... कार ड्रायव्हर कडे बघून सॉरी बोलला नी तिथेच चक्कर येऊन पडला......

गार्ड ने लोकांच्या मदतीने राज ला एका साईड ला केले....राज ला तसे बघून नंदिनी खूप घाबरली होती....

राज.....राज.....राज उठ....राज उठ......ती त्याचाजवळच बसून त्याला उठवत होती......
गार्ड ने लगेच घरी फोन करून सगळं कळवले......

रविकांत घरीच होते.....ते नी आबा...निती... लगेच कार घेऊन तिथे आलेत......

राज......निती घाबरतच राज जवळ गेली

आबा....बघा ना....राज उठत नाही आहे .....नंदिनी रडतच बोलत होती .....

राज उठ ना .....राज उठ....राज उठ.....नंदिनी खूप रडत होती....

नीती नंदिनी ला घरी घेऊन जा .....राज ला  हॉस्पिटल मध्ये नेतोय..... काळजी करू नको........आबा ...आबा सगळ्यांना समजावत तर होते पण ते सुद्धा आपण खूप घाबरले होते.......

******

सगळं .....सगळं या नंदिनी मुळे होते आहे....... माझ्या पोराच्या जिवावर उठली ही बला....... तरी म्हणत होते हे लग्न योग्य नाही..... पण आमचा ऐकणार कोण...... आजीसाहेब खूप रागात बोलत होत्या......... नंदिनी रडत होती...... काकी सगळ्यांना धीर देत होत्या......

इथे रडायचा नाही...... चल जा आपल्या रूम मध्ये.... मला तोंड सुद्धा दाखवू नका...... आणि राज पासून दूर रहा....... त्याच्याजवळ सुद्धा गेले तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही........... आजी ओरडल्या...... आजीला बघून नंदिनी घाबरून वरती जाऊन बसली.......

काकीने राहुल ला फोन करून त्याला सुद्धा हॉस्पिटल मध्ये पाठवले......

राज ठीक असल्याच आबांनी  फोन करून कळवलं तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला....

*******

आजीसाहेब नंदिनीला खाली येऊ देत नव्हत्या...... नंदिनी तिथे बाल्कनीमध्ये खाली बसून गेट कडे बघत राजाची वाट बघत होती..... जवळपास तीन तास होत आले होते तिथेच  बसली होती..... आणि फायनली तिला कार आत मध्ये येताना दिसली....... ती पळत खाली यायला लागली....

नंदिनी..... तिथे थांबा बिल्कुल खाली यायचं नाही......... तुमच्यामुळे राजला हा सगळा त्रास होतोय..... खाली आला तर याद राखा..... आजीसाहेब

नंदिनी तिथे वरती पायऱ्यांजवळ उभी होती....... तेवढ्यात राहुल आणि रविकांत राजला घरात घेऊन आले आणि सोफ्यावर बसवले......

आजी.. आई.. काकी ..शशिकांत... सगळे त्याच्या जवळ येऊन त्याची विचारपूस करू लागले.......पण राज ची नजर मात्र नंदिनी ला शोधत होती.....आणि शेवटी त्याला नंदिनी वरती उभी राज कडे एकटक बघत असलेली दिसली....राज पण तिलाच बघत होता.... ती ठीक आहे बघून त्याला बर वाटले

राज बरे वाटतेय ना ......आई

हो...मी ठीक आहे......राज

डॉक्टर काय म्हणाले आणि तुम्हाला त्याला इतका उशीर कसा....आणि हे ऐवघं काय काय लागलंय.....आई काळजी करत होती...

हो हो....ठीक आहे तो....डोक्याला लागल्यामुळे ब्लड लॉस झाला थोडा म्हणून त्याला चक्कर आली होती..तो बेशुद्ध झाला होता...शुद्धीत यायला थोडा वेळ लागला म्हणून थांबावं लागेल हॉस्पिटल मध्ये....आणि राईट हातात थोड फ्रॅक्चर झालंय.....तर 4आठवडे हे प्लास्टर लावले आहे..medicines दिले आहेत आणि आराम करायला सांगितले आहे...........काळजी करण्यासारखे नाही काही..... राहुल

सगळं या नंदिनी मुळे झालं.....किती सहन करावे लागते आहे ..... कालपासून च त्याला बर नव्हते... आता त्यात हे .....काय गरज होती तिकडे रोड वर जायची....काही कळत नाही नि वळत नाही....... आजिसहेवांची बडबड सुरु होती...... राज ची अवस्था बघून आता आई ला पण नंदिनीचा थोडा राग आल होता......

आजीसहेब.....मी ते लहान मुलाला ... तो रस्त्यातून चालला होता ....आई आई रडत होता...... म्हणून मी त्याची मदत करायला जात होते..........नंदिनी रडत बोलतच खाली येत होती की आजिसहेब परत ओरडल्या

तिथेच थांबायचं.....बिलकुल राज चा आजूबाजूला मला तुम्ही दिसायला नको.......आणि खबरदार कोणी हीची बाजू घेतली तर ..... आजीसहेब

नंदिनी रडत परत घाबरून राज कडे बघत वर गेली......तिला रडतांना बघून त्याच्या हृदयात कळ उठत होती.....पण जर काही बोलले तर...आधीच सगळं गरम होत वातावरण ...त्यात भर नको म्हणून तो चूप फक्त नंदिनी कडे बघत होता......नंदिनी च मन खूप भरून आले होते....कधी कधी राज ला भेटते बोलते अस झाल होत तिला....

काल पण किती त्रास दिला हे नाही खायचं ते नाही खायचं.....आता च बनऊन दे ......बायको सारख नाही पण कमीत कमी काहीतरी काळजी पाहिजे ना .....आपल्याच माणसाला आपण किती त्रास द्यायचा.....मदत नाही करता येत...काळजी नाही घेता येत ठीक आहे ...पण कमीत कमीत आपला त्रास नाही होणार असं तर वागता येते ना........आई

अरे तुम्ही हे काय लाऊन ठेवलंय....त्याला बर नाहीये.....त्याला आराम करू द्यायचे सोडून तुमचं हे वेगळच सुरू झाले.....हे सगळं आपण नंतर पण बोलू शकतो......राहुल राज ला त्याचा रूम मध्ये घेऊन जा ....आबा कडाक आवाजात बोलले..तसे सगळे चूप झाले..

*****

नंदिनी राहुलच्या रूम मध्ये बसली होती....नी राज चा रूम मधून सगळे कधी बाहेर जातात बघत होती.....कोणी ना कोणी सतत त्याचा आजूबाजूला असायचं...

राहुल दादा जाऊ दे ना..... मला राजला भेटू दे ना..... .....  त्याला काही त्रास देणार नाही..... मी बोलणार पण नाही..... फक्त मला एकदा बघू दे ना ......त्याच्याजवळ जाऊन बघू दे ना.......... नंदिनी रडत रडत राहुलला बोलत होती....

राहुल ला तिची अवस्था बघावल्या जात नव्हती...... पण आजिसहेबांनी रागावल्यामुळे त्याची हिम्मत होत नव्हती.....

हे बघ नंदिनी तो ठीक आहे आता..... आराम करू दे त्याला... आपण नंतर भेटू..... काकी बसली आहे त्याच्या जवळ.....राहुल

नंदिनी ने मान हलविली आणि चूप राहिली.... राज सुद्धा खूप वेळा पास नंदिनी ची वाट बघत होता त्याला सुद्धा तिला भेटायचं होतं पण आई बसली होती म्हणून तो काहीच बोलला नाही...... आईला फोन आला म्हणून ती रुमच्या बाहेर गेले..... आई ला रूम चा बाहेर जाताना बघून नंदिनी पळतच बाहेर आली .. आणि राजच्या रुममध्ये आली..... राज बेडवर टेकुन बसला होता ....त्याने डोळे मिटले होते...

नंदिनी धावतच त्याच्या जवळ येऊन उभी राहिली...... आणि पाणी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती..... .. राज ला नंदिनी ची चाहूल लागली आणि त्यांनी डोळे उघडले बघतो तर समोर नंदिनी उभी होती....... तोसुद्धा केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत होता...... नंदिनी त्याचा चेहरा कपाळ हात सगळं बघत होती.....कोणीच कोणाशी बोलत नव्हतं..... एक वेगळीच शांतता त्यांच्या दोघांमध्ये होती......

फोन आटपून आई आत मध्ये जाणारच  तेवढयात आबांनी आईचा हात पकडला आणि तिला बाहेरच थांबवलं......

नंदिनी .....परत त्रास...... आई बोलत होती की आबाने तिला मानेने च चूप राहायला सांगितले..

जाऊदे तिला....... त्याला पण तिची गरज आहे....... त्या दोघांचं नातं आपल्या सगळ्यांच्या समजण्याच्या पलीकडले आहे........ त्यांचे एकमेकांवरचे प्रेम खूप वेगळ आहे...... आबा

पण.........आई

राज ला लवकर बरं झालेल बघायच आहे ना.......तिच्याच साथीने तो लवकर बरा होईल........ आबा

नंदिनी आजूबाजूला दिसली नाही म्हणून राहून सुद्धा तिथे आला...... आबांनी त्याला सुद्धा तिथेच थांबवले...

नंदिनी थोडे पुढे जाऊन राजच्या बाजूला बेड वर बसली... त्याच्या डोक्याला लागलेल्या तिला बघवत नव्हतं......त्याच्या कडे बघतच तिने आपला एक हात हळूहळू पुढे नेत राज्य डोक्याला लागलं होतं तिथे लावला.......

Sssssss............ राजला थोडसं पेन जाणवलं

त्याच्या आवाजाने तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गालांवर वहायला लागलं...... तिने लगेच हात बाजूला घेतला...

खूप दुखत आहे का........ तिच्या कंठातून आवाज सुद्धा निघत नव्हता तरी ती कशी कशी बोलली......

राजने नाही म्हणून मान हलवली........आल्यापासून एवढ्या वेळाने आता तो तिच्याशी काहीतरी बोलला होता........... रडताना आता तिचा आवाज निघत होता...... पण कोणाला आवाज जाईल म्हणून तिने आपलं तोंड आपल्या दोन्ही हाताने दाबून धरलं होतं............. आता मात्र राज ला तिची अवस्था सहन झाली नाही...... तिने आपला डावा हात दूर करत तिला जवळ येण्याचा इशारा केला....... जसा त्याने इशारा केला तशी ते त्याच्या गळ्यात जाऊन पडली......... त्याच्या मानेमधून आपले दोन्ही हात टाकत.... आपल्या एका हाताने त्याची शर्टची कॉलर पकडत ती त्याला बिलगली आणि आता तिला तिचं रडू आवरलं नाही आणि ती हुंदके देत रडत होती...त्याला अजून अजून घट्ट पकडत रडत होती....... बऱ्याच वेळापासून कंट्रोल करून ठेवलेल्या भावना...... आता मात्र तिला कंट्रोल होत नव्हतं....... त्याने पण तिला एका हाताने तिच्या कंबरे मधून घट्ट पकडून घेतले......न बोलता सुद्धा त्या दोघांना एकमेकांचे मन एकमेकांचे दुःख कळत होत...... लागलं राजला होतं पण दुःखत नंदिनीला होतं.....

बाहेर उभे असलेल्या आई आबा चा डोळ्यांमध्ये त्या दोघांना बघून पाणी आले......

त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे....... राहुल राजला काही हवे नको ते लक्ष दे..... आबा आई खाली निघून आले

आता रडून तीच डोकं आणि मन बरं शांत झालं होतं...... आणि दमून ती तशीच झोपी गेली......तिला जवळ घेऊन राज च सुद्धा मन शांत झाले होते....... आणि आपोआपच त्याचा सुद्धा डोळा लागला.........

मेरे हाथ में तेरा हाथ हो
सारी जन्नतें मेरे साथ हो
तू जो पास हो फिर क्या ये जहाँ
तेरे प्यार में हो जाऊं फ़ना
तेरे दिल में मेरी साँसों को पनाह मिल जाए
तेरे इश्क में मेरी जां फ़ना हो जाए
जितने पास हैं खुशबू साँस के
जितने पास होठों के सरगम
जैसे साथ हैं करवट याद के
जैसे साथ बाहों के संगम
जितने पास-पास ख़्वाबों के नज़र
उतने पास तू रहना हमसफ़र
तू जो पास...

रोने दे आज हमको तू आँखें सुजाने दे
बाहों में ले ले और ख़ुद को भीग जाने दे
हैं जो सीने में क़ैद दरिया वो छूट जायेगा
हैं इतना दर्द के तेरा दामन भीग जायेगा

जितने पास-पास धड़कन के हैं राज़
जितने पास बूंदों के बादल
जैसे साथ-साथ चंदा की है रात
जितने पास नैनों के काजल
जितने पास-पास सागर के लहर
उतने पास तू रहना हमसफ़र
तू जो पास...
अधूरी साँस थी धड़कन अधूरी थी अधूरे हम
मगर अब चाँद पूरा हैं फलक पे और अब पूरे हैं हम

I never saw the couple like you both...... किती प्रेम करता एकमेकांवर.....प्रेम काय असते तुमच्या दोघांपसून शिकावं......... राहुल थोड्यावेळाने आत मध्ये आला आणि त्याने त्या दोघांच्या अंगावर नीट पांघरून घातले......... त्या दोघांना बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधान कारक स्माईल आले..... रूमचा दरवाजा अलगद बंद करून तो बाहेर चालला गेला....
 

******

छायाने जेवणाचं ताट रूम मध्ये आणले...... छोटा टेबल बेडवर ठेवून त्यावर त्याच्यापुढे जेवायचे ताठ ठेवले......

नंदिनी बाथरूममधून  बाहेर आली....  बघते तर राज एका हाताने जेवायचा प्रयत्न करत होता पण त्याला नीट जेवता येत नव्हतं....

छायाच्या मागे आई राजला खाऊ घालायला येतच होती कि ती दाराजवळच थांबली.,.....

नंदिनी राजच्या बाजूला जाऊन बसलि....... तिने दोन्ही हाताने पोळी चे छोटे छोटे तुकडे करत होती..... राज तिच्या या सगळ्या कृती बघत होता........

भाजीपोळी चा एक एक घास नंदिनी त्याला आपल्या हाताने भरवत होती....... भात वरण चा वाटीत घालून चमच्याने मिक्स करून त्याला खाऊ घालत होती .......सोबत तिच्या न संपणाrया गोष्टी सुरू होत्या...... एक घास त्याला एक घास स्वतः खात होती........ असा तिचा खाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरू होता....... तिच अस खाऊ घालणं बघून त्याला हसू आलं......

आई ला त्या दोघांना बघून समाधान वाटले....... आणि तिथून चालल्या गेल्या..

छाया काकी भाजी पोळी आणा..... तिथूनच बसल्याबसल्या नंदिनी ओरडली....

*******

मध्यरात्री अचानक राज उठून बसला...... त्याच्या हालचालीने नंदिनीला जाग आली.....

काय झालं राज......... पाणी देऊ काय......नंदिनी

ह्म्म........ पाय दुखत आहेत..... आणि डोक पण जड होत आहे....... झोप नाही येत आहे........राज

राहुल दादा ला बोलवू काय.......नंदिनी त्याला पाणी देत बोलली...

ह...... नको.... झोप तू... मी ठीक आहो.......राज

नंदिनी काहीतरी विचार करत बसली......आणि मग तिला बरं नसताना राज तिची कशी काळजी घेतो ते सगळं आठवलं...... ती कपाटातून तेलाचे बॉटल घेऊन आली.... आणि त्याच्या पायाला तेल लावायला त्याच्या पायाला हात लावला तर त्याने पाय आखुडला.......

काय करते तू....... मी ठीक आहे सोन्या झोप तू......राज

श sss ..., शांत बस......पायांना तेल लावून मालिश करून  देते.... म्हणजे तुला थोडं बरं वाटेल आहे....... मला झोप येत नाही आहे..... आणि जास्त बोलू नकोस परत डोकं दुखेल...... नंदिनी आई सारख रागवत बोलली...... तेवढ्या त्रासात पण त्याला ती खूप क्युट वाटत होती... अर्धा त्रास तर त्याचा तिचं तो क्युट चेहरा बघूनच पळाला....

नंदिनी ने बराच वेळ  त्याच्या पायांना तेलाने मालिश करून दिली....... तो तिला बघण्यात मग्न झाला होता....

राज झोप ना.......नंदिनी

ह्म्म......राज... राज प्रयत्न करत होता पण त्याला झोप येत नव्हती.... त्याची चुळबुळ सुरू होती......

नंदिनी ने त्याच्याकडे बघितलं..... ती त्याच्या डोक्या जवळ मांडी घालून बसली.... आणि हळुवारपणे त्याचा डोकं आपल्या मांडीवर घेतले....... आणि हळुवारपणे त्याच्या केसांमधून हात फिरवत होती...... तिचा अस काळजी घेणे बघून त्याचा मान खूप भरून आलं..... त्याने कुस बदलली... तिच्या कंबरेत हात घालून तिला घट्ट पकडले...... आणि कधीतरी त्याला झोप लागली........ नांदणी सुद्धा बसल्या जागेवर तशीच झोपी गेली.

******

राजला थोडी विकणेस होती.... त्याला उठायला.... कपडे घालायला ..... स्वतःचे स्वतः करायला थोडा त्रास होत होता....... सगळ करण्यामध्ये राहुल त्याला मदत करत होता .......दोन दिवस नंदीने लक्षपूर्वक सगळं बघून समजून घेतले........

राहुल दादा मी करते....... तुम्ही जा तुम्हाला ऑफिसला उशीर होईल...........नंदिनी

राहुल राजला स्पंज बाथ (.ओल्या    टॉवेल ने अंग पुसणे) देत होता...... तेव्हाच तिथे नंदिनी येत त्याला बोलली.....

पण नंदिनी.............राहुल

तुम्ही दोन दिवस केलं ना..... मी सगळं बघितलं....... आणि मी गूगल .. युट्यूब वरुन पण सगळी माहिती घेतली आहे....... मला काही झालं तर राज माझी काळजी घेतो ना....... मग आता मी  त्याची काळजी घ्यायला हवी...... आणि काही लागलं तर मी आईला आणि आबांना विचारेल......नंदिनी

राहुल ने एकदा राज कडे बघितले....... राज ने डोळ्यांनी त्याला जा म्हणून खुणावले......

ठीक आहे...... काही लागलं तर मला आवाज दे........ राहुल

हो......

नंदिनी ने एका टब मध्ये बाथरूम मधून कोमट पाणी आणलं आणि राज बसला होता त्याच्या बाजूच्या टेबलवर ठेवलं......राज एका हाताने शर्ट च्या बटन काढायचा प्रयत्न करत होता पण त्याला ते नीट करता येत नव्हतं.....

नंदिनी ने आपल्या हाताने त्याचा हात बाजूला केला आणि त्याच्या शर्टच्या बटन काढत होती....... ती ते करण्यात खुप मग्न झाली होती...... राज बेडला टेकुन बसला होता आणि शांतपणे तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव टीपत होता...... आणि त्याला त्याच्या लग्नाचा पहिल्या दिवसाची रात्र आठवली......तेव्हा नंदिनीला शर्टाचं बटन काढता सुद्धा येत नव्हता आणि लावता येत नव्हतं....... आणि ते सगळ आठवून आपोआपच त्याच्या चेहऱ्यावर स्मायल पसरलं

नंदीने एक छोटे नॅपकिन हातात घेतलं..... पहिले पाण्यात हात घालून पाण्याचे टेंपरेचर चेक केल्यानंत.......र नॅपकिन त्यात बुडवून नीट पिळुन घेतले....ते परफेक्ट पिल्या गेली नव्हते तरी तिने तिच्या परीने चांगलाच प्रयत्न केला होता....... आणि त्या नेप्तूने त्याचा चेहरा हळुवारपणे त्याच्या डोक्याला धक्का न लावता पुसला.... नंतर हळुवार पणे त्याचे हाथ वैगरे सगळं तिने नीट पुसले..... एक कोरडा टॉवेल घेऊन परत पुसले...... कपाट  मधून हाफ स्लीवस शर्ट घेऊन त्याच्या हाताला धक्का न लागता तिने त्याला तो शर्ट घालून दिला...... त्याच्या हाताला एलबो पासून खाली लागलं होतं त्यामुळे प्लास्टर हाताला होतं त्यामुळे तो बर्‍यापैकी त्याचा हात हलवू शकत होता......

******

या प्रसंग पासून नंदिनी अचानकच मोठी झाली होती........ तिने एक्सीडेंट पाहिला होता... ज्यामुळे तिचे आई बाबा तिला सोडून गेले होते आणि आता हा ....... त्यामुळे ती खूप घाबरली होती...... आणि म्हणतात ना अनुभवातूनच माणूस शिकतो आणि मोठा होतो तसंच तिच्यात काहीसा बदल झाला होता.....तिने राज्याची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती....... तो माझा आहे आणि मीच त्याची काळजी घेणार असं तिने सगळ्यांना सांगितले होते..... आबांनी सगळ्यांना नंदिनीच्या मध्ये बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं.....नंदिनी त्याची नीट आणि आनंदाने काळजी घेत होती त्यामुळे कोणी जास्ती मदत बोलत नव्हते....... तिला तिथे काही जमायचं नाही तेव्हा ती राहुल ला बोलावून घ्यायची........

राजला बरं नव्हतं... जवळपास एक महिना तो घरीच होता आणि त्याची सगळी काळजी..... काय हवं नको ते नंदिनी बघत होती........ तिने त्याच्या आवडीच्या खाद्य पदार्थांची लिस्ट बनवली आणि ती छाया काकींना दिली होती....... बाहेर एक्ससाइज ...वॉकला जाण तर बंद होतं..... नंदिनी त्याला सकाळी खाली गार्डन मध्ये त्याचा हात पकडून वॉक करत होती..... सोबत तिची कंटिन्यू चालणारी बडबड असायची..... तो पण तिच्यासोबत खूप आनंदी असायचा......

बघ बोललो होतं ना...... नंदिनी सोबतच तो लवकर बरा होईल....... आबा आईला त्या दोघांना बघून बोलत होते..
आणि नंदिनी ने तिची जबाबदारी खूप आनंदाने... न थकता चांगल्या प्रकारे निभावली बर काहो राज चा आजीसाहेब.....

******

एक महिन्यानंतर राज चेकअपसाठी हॉस्पिटल मध्ये गेला होता...... हॉस्पिटलमध्ये तो गेला पण इकडे नंदिनीचा जीव मात्र वर खाली होत होता...... ती बाहेर गार्डन मध्येच उभी राहून त्यांच्या येण्याची वाट बघत उभी होती..... तेवढ्यात त्यांची कार आत मध्ये आली..... राहुल आणि राज कार मधून उतरले..... राज्या हाताचे प्लास्टर आणि डोक्याची पट्टी निघालेले बघून तिला खूप आनंद झाला....... धावत पळत जाऊन ती राज चा गळ्यात पडली.......आपल्या पायांच्या टाचा उंचावून तिने त्याच्या गालावर आनंदाने किस केले...... त्याने तिला स्वतः जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि तिच्या कपाळावर किस केले...... आणि आता नंदिनीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं....

तेवढ्यात घरातले बाकीचे पण बाहेर आले....

नंदिनी .....आता तो पूर्ण ठीक झाला आहे आता का रडते आहेस......राहुल

राज मला फक्त तू हवा आहे ..... मला दुसरे काहीच नको....... मला तो स्ट्रॉंग आवडतो...... असा मला नाही आवडत.......राज तू मला  माझ्या आई बाबांचा सारखा कधीच सोडून जाणार नाहीस ना........ राज मला फक्त तु पाहिजे...... मला फक्त तुच तूच पाहीजे....... मी तुला त्रास नाही देणार......जर मी तुला त्रास दिला ना तर तू मला रागव... हवं तर मार.....पण मला सोडून कधीच जाऊ नको..... नंदिनी रडत बोलत होती

तू आणि मी नेहमीच सोबत आहोत..... आणि असं घाबरायचं नाही..... तू स्ट्रॉंग आहेस ना....... त्याने तिला आपल्या कुशीत घेतले.....

आईस्क्रीम खायला जायचं......राज

हो...........नंदिनी

आधी हसून दाखव....... मगच......राज

मला चॉकलेट फ्लेवर देशील...... नंदिनी आपले डोळे पुसत  बोलली...

अरे आत्ताच हॉस्पिटल मधून आलास ना..... लगेच बाहेर निघाला ....आराम तर कर.....आई

आई मी ठीक अहो....... राहुल गाडी काढ......राज

राज मी शूज घालून आली .....जाऊ नको....... आनंदाने ओरडत नंदिनी आत मध्ये शूज घालायला गेली....

वेडाबाई........ राज हसत..... तिच्याकडे बघत होता....

*******

आता राजनंदिनी चा लग्नाला एक वर्ष झालं होतं...... डॅडी आणि आजीसाहेबांना सोडून घरात तिने सगळ्यांचीच मनं जिंकली होती ....... पण आजीसाहेबांनी त्या दोघांच्या प्रेमापुढे आपले हात टेकले होते..... जाणून बुजून नंदिनीला त्या आता त्रास देत नव्हत्या.... पण चान्स मिळाला तर तिला सोडत सुद्धा नव्हत्या........ पण शाशिकांत मात्र अजूनही हार मानली नव्हती..... ऑफिसमध्ये आणि बाहेर लावण्याच्या बऱ्याच ट्रिक्स सुरू होत्या.... ते बरेच कारणामे करत होती........ राज ला आपलं करायचा तिचा प्रयत्न सुरू होता....

नंदिनीची आता अभ्यासात बरीच प्रगती झाली होती....... आता ती बऱ्यापैकी इंग्लिश शिकली होती आणि बोलूसुद्धा शकत होती........ पेंटिंग क्लासमध्ये तर तिचा कोणी हात पकडत नव्हत.....इतके चांगलं पेंटिंग तिच झालं होतं ..... तिथे तिचे खुप मित्र झाले होते..... ती सगळ्यांची लाडकी झाली होती..... तिथली मुलं आता तिला समजायला लागली होती..... ते तिला सांभाळून घ्यायचे...... राज  ने तीची आता प्रॉपर मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर मध्ये ऍडमिशन घेतली होती..... ती छाया काकी आई आणि काकी कडून किचनमधल्या बऱ्याच गोष्टी शिकत होती....... आता ती बर्‍यापैकी 11- 12 वर्षाच्या मुली सारखी वागायला लागली होती.......

*******

And the Award goes to...........

*****

क्रमशः

नमस्कार मित्रांनो कसे आहात......

तुम्हाला सगळ्यांना कथा आवडते आहे .... कमेंट्स आणि लाईक्स मधून कळत आहे ....... स्पेशली श्रीराज चे character......सगळ्यांच्या आवडीचे झाले आहेत......बरेच लोकांना प्रश्न पडला की राज सारखं खरंच कोणी असू शकते काय...? हेच जर एका बाईने केले असते तर कदाचित इतके प्रश्नच पडले नसते......बायकांबद्दल बऱ्याच अश्या रिअल इंस्पिरिंग कथा वाचण्यात आलाय बघण्यात आल्या........पुरुषानं बद्दल कधीतरीच वाचण्यात येत.....पण असतात अशी मुलं असतात.....अगदीच राज सारखी नाही पण असतात.......आता तो कथेचा हिरो म्हंटल्यावr हिरो ग्रेट असणारच .......ही एक काल्पनिक कथा आहे ...... ज्यात एक मुलगा सामाजिक...नैतिक मूल्य जपताना दिसतोय...मुली कडे बघण्याचा दृष्टिकोन.....तिचा मान जपणारा तो आहे......बायको असूनही ती पाहिले एक मुलगी आहे .....हे तो विसरत नाहीये......तिचा रिस्पेक्ट तो जपतो आहे......तो प्रामाणिक आहे...कष्टाळू आहे ....दिलेला शब्द पळतो....आपली नाती मनापासून जपतो.......त्याचा स्वतः वर संयम आहे .......

ही एक फक्त प्रेमकथा नसून त्यातून आपली सामाजिक pariwarik मूल्ये जपायचा प्रयत्न केला आहे.....

तुम्हाला पुढे पण कथा आवडेल अशी अपेक्षा करते

काळजी घ्या, स्वस्थ राहा

******

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️