Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 32

Read Later
नंदिनी...श्वास माझा 32

भाग 32

दिवाळीला शॉपिंगच्या वेळी घडलेल्या प्रकारावरून राजनंदिनी ची जास्तच काळजी वाटायला लागली होती..... जरी त्याने तिला बॅड टच गुड टच  समजून सांगितले होते तरीसुद्धा फिजिकली  स्वतःची काळजी तिला घेता यावे असेच वाटायचे...... त्यादिवशी तो तिच्यासोबत होता म्हणून ठीक होते पण नेहमी तो तिच्या सोबतच राहील असं नव्हतं आणि आज जी नंदिनी ची हालत होती ते पण यामुळेच होतं......... त्यामुळे त्याला तिच्या सेफ्टी ची खूप काळजी वाटायची..... त्याने तिला फिजिकली ट्रेन करायचा विचार केला...... तो स्वतः मार्शल आर्ट्स मध्ये वेल ट्रेन होता त्यामुळे त्याने स्वतः तिला बेसिक मार्शल शिकवायचा प्लांन केला आणि दिवाळीनंतर रोज सकाळी जवळपास अर्धा ते पाऊण तास असतो तिची ट्रेनिंग घेत होता......देसी लेव्हल तिच्या ठीक झाला म्हणजे तो प्रॉपर तिला मार्शल आर्ट क्लास लावून द्यायचा विचार करत होता....

****

वेल डन श्रीराज....... मी विचार केला होता त्यापेक्षा सुद्धा नंदिनीची ग्रोथ खूप चांगली होत आहे.... या सहा महिन्यात तिने चांगला रिस्पॉन्स दिला आहे..... डॉक्टर

It's all because of you doctor...... सगळ्यांनी तर अपेक्षा सोडली होती पण तुम्ही दिलेल्या पॉझिटिव्हिटी... आणि ट्रीटमेंट मुळे हे सगळं पॉसिबल झालं... राज

अशा केसेस मध्ये खूप कमीच चान्सेस असतात ब्रेन ग्रोथ व्हायची.... आणि डॉक्टर तर मेडिसिन आणि ट्रीटमेंट लिहून देऊ पण सर्वस्वी ते पेशंट आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांवर अवलंबून असते....and I must say it's all because of you.... Your love...your care and most important your patience......अशी व्यक्ती हँडल करणं खूप कठीण असते त्यासाठी खूप पेशन्स ची गरज असते......आणि हे तुम्ही करून दाखवलेला आहे जर एखाद्या व्यक्तीला नीट काळजी आणि भरपूर प्रेम दिलं.... वेळोवेळी प्रोत्साहन.... तर नक्कीच ती व्यक्ती बदलू शकते.... डॉक्टर

डॉक्टर तिचे मेमरी परत यायचे काय चान्सेस आहेत...... राज

सध्यातरी चान्सेस म्हणाल तसे काही दिसत नाही आहे......पण ती जर अशीच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत राहिली तर येत्या काही महिन्यात आपण तिला तिच्या मागच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आठवण करून  देण्याचा प्रयत्न करूयात आणि बघूया ती त्यावर कशी रिस्पॉन्स करते आणि मग त्यावरच पुढची ट्रीटमेंट ठरविण्यात तोपर्यंत जे सुरू आहे ते तसंच सुरू राहू द्या.... डॉक्टर

थँक्यू डॉक्टर....राज

*******

नंदिनी राज  च सगळच ऐकायला लागली होती....तो तिला सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पणे समजावून सांगायचा त्यामुळे तिला त्या लगेच समजायला लागल्या होत्या.....आता जास्तीत जास्त भर तो सोशल अवरेनेस आणि फिजिकल डेव्हलपमेंट यावर देत होता....

नंदिनी आता बरीच इंडिपेंडंट झाली होती..... आता ती बहुतेक सगळेच स्वतःचे काम स्वतः करायला लागली होती ...... पण कधी कधी मात्र हट्टीपणा खूप करायची.... मग ती कोणाच ऐकत नव्हती...... आजकाल तिचा हट्टीपणा जास्तीत वाढला होता.....

मिस्टर श्रीराज........ मला तुमच्याशी नंदिनी बद्दल बोलायचं आहे..... नंदिनीची श्वेता टीचर क्लास घेऊन झाल्यावर नंदिनी बाहेर खेळायला गेल्यावर घराजवळ बोलायला आली

हा बोला मॅडम.......राज

नंदिनी चा आजकाल स्वभाव थोडा मुडी बनत चाललेला आहे....... तिला शिकवलेल सर्वच चांगल्या प्रकारे समजत आहे ........मी तिला आता बर्‍यापैकी तिच्या बॉडी स्ट्रक्चर बद्दल पण थोडीफार माहिती द्यायला सुरुवात केली आहे..... आणि इंग्लिश आणि मॅथ्स सुद्धा तती चांगलं कव्हर करते आहे...... अभ्यासात तसा तिचा काहीच प्रॉब्लेम नाही.... पण आता फारच मुडी झाली आहे.....त्यापेक्षा पण जास्ती मला वाटते भावनिक झाली आहे ........ एखाद्या दिवशी नाही शिकायचं म्हटलं तर किती पण समजलं तरी ती शिकायला तयार होत नाही....त्यामुळे थोड जरी रागावले की लगेच तिच्या मनाला लागते....... आता ती सात वर्षाच्या मुली सारखी राहिली नाही..... तिचे विचार थोडे ग्रो झाले आहेत....... श्वेता टीचर

ह्म्म..... मी पण ते नोटीस करतो आहे....... यावर काय सोलुशन काढता येईल त्याचाच विचार सुरू असतो.....राज

मी काही सजेस्ट करू का........ श्वेता टीचर

Yes please..... राज

मला असं वाटते आता तिला फ्रेंड्स ची गरज आहे...... तिला आता बाहेरच्या जगाशी ओळख करून देण्याची गरज आहे.....इथेइथे घरात तुम्ही तिच्यासाठी सगळे अवेलेबल करून दिला आहे पण आता तिची थिंकिंग लेवल वाढत चालली आहे....... तिला आता नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आवडत आहे....... घरातल्या घरात तिची विचारशक्ती आता बांधली जात आहे........ श्वेता टीचर

ते तर मी तिला बहुतेक एक अनाथाश्रम आहे मुलींचे तिथे घेऊन जात असतो.... तिथे बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये मिसळते...... आणि बाहेर वगैरे पण जाणे सुरूच असते.....राज

हो पण ते आता कधीतरी करता..... तिला आता पेंटिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे.... मी तिचे पेंटिंग चेक केले ती खूप चांगले पेंटिंग्स करायला लागली आहे.... युट्युब वर बघून बघून सुद्धा ती पेंटिंग चांगली काढायला शिकली आहे...... तर मला असं वाटते की तुम्ही तिच्यासाठी एक पेंटिंग चा क्लास लावून द्यावा.....ज्यामुळे तिची आर्टिस्ट लेव्हल तर वाढेलच त्याबरोबर thinking लेव्हल सुद्धा वाढेल.....art lover. जे असतात त्यांची विचार शक्ती कमालीची वाढते.....बऱ्याच गोष्टी स्वतःहून शिकल्या जातात....... आणि तिथे वयाचं काही बंधन नसते.... सेम क्लासमध्ये लहान आणि मोठे दोन्ही प्रकारची मुलं असतात..... माझी एक फ्रेंड आहे ती तिच्या पेंटिंग साठी इथे खूप फेमस आहे आणि ती फाइन आर्टचे क्लासेस घेते.... तिच्याकडे बरीच मुलं येतात...... श्वेता टीचर

मला तुमचं म्हणणं पटत आहे पण नंदिनीला त्या जॉईन करू देतील काय.....राज

ती माझी खूप क्लोज फ्रेंड आहे तर मी मी तिला नंदिनी बद्दल सगळे आयडिया देते....ती घेईल आहे नंदिनीला आणि काही दिवस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जाऊन थांबू शकता..... तिला तिथे तिचं वेगळं विश्व तयार करायला चान्स भेटेल नवीन मित्र मैत्रिणी भेटतील आणि माझी फ्रेंड तिच्याकडे लक्ष सुद्धा देईल..... श्वेता टीचर

ठीक आहे मग मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मी त्यांच्याशी सविस्तर सगळं बोलून घेतो .... काही दिवस वर्ककरून बघू आणि नंदिनी चांगला रिस्पॉन्स दिला तर मी तिची  ऍडमिशन तिथे करून घेईल...... राज

हो नक्की.... म्हणत ती एक कार्ड राज ला देते...

ठरल्याप्रमाणे राज नंदिनी ला पेंटिंगचे कोचिंग क्लासेस लावून देतो..... तिथे बारा-तेरा वयोगटातली मुलं होते.... आधी नंदिनीला तिथे थोडा त्रास झाला..... पण टीचर खूप सपोर्ट होती त्यामुळे हळूहळू त्यांनी तिथे यायला लागली आणि तिथल्या मुलांसोबत तिची चांगली मैत्री सुद्धा झाली..... सुरुवातीला काही दिवस राज तिथे थांबायचा पण नंतर तिथे रहायला लागले तेव्हा मात्र तो तिला सोडून द्यायचा आणि घ्यायला जायचा.... तिच्यामध्ये बराच बदल व्हायला लागला होता....तिला नवीन मित्र मिळाल्याने ती खूप खुश होती....... क्लासवरून घरी आली की ती आबांना राजला कोण काय बोललं काय झालं या सगळ्या गोष्टी सांगायची....... ती आता बरच एंजॉय करायला लागली होती... बऱ्यापैकी पॉझिटिव चेंज दिसत होता.

*****

सकाळी राज आणि राहुल ऑफिस मध्ये पोहोचले.... दोघांना आत मध्ये येत होते की रोहन त्यांना जॉईन झाला आणि मग रोहन आणि राज office रिलेटेड गप्पा करत पुढे जात होते.....

गुड मॉर्निंग मिस रोजी...... ब्यूटिफुल रोज फॉर अनादर ब्यूटिफुल रोज..... राहुल रिसेप्शनिस्ट जवळ जात तिला एक रोज देत बोलला....

थँक्यू सर..... रोझी तिने त्याला स्माईल दिली

राहुल.......राज
पुढे गेलेल्या राजने मागे वळून बघितलं तर राहुल रिसेप्शनिस्ट जवळ उभा गप्पा मारत होता.....

राहुल मात्र तिच्यासोबत फ्लर्ट करण्यात बिझी झाला होता....

Sir...... देशमुख सर कॉलिंग यु......रोझी

त्यानंतर ऑफिसमध्ये बराच फिमेल स्टाफ येत होता.... ते सगळे राजकडे बघत होते .....राहुल चे सगळ लक्ष त्यांच्याकडे होतं....

Ohh ...yaa...... मिस रोजी... I am more hot or your boss..... राहुल रोजी ची मस्करी करत बोलला

राहुल सुद्धा दिसायला एकदम हँडसम होता... पण तरीसुद्धा ऑफिसमध्ये फिमेल स्टाफ चे सगळे लक्ष राजकडे असायचे.....

सॉरी बट मिस्टर देशमुख....... रोजी त्याच्याकडे हसत बोलली

Oh God.......I am more cool yaar...okay leave it....... गुड डे ब्यूटीफुल....सी यू aदर टाईम.....राहुल तिला बाय करून राजकडे गेला

ड्रग च प्रकरण झाल्यापासून राहुल ने राज ची कंपनी जॉईन केली होती...... राज चा हाताखाली तो ऑफिसच्या कामात चांगलाच तरबेज झाला होता..... आणि त्याच्या खेळकर आणि फ्रेंडली स्वभावामुळे ऑफिसमध्ये पण त्याचं सगळ्यांसोबत खूप चांगलं जमायला लागलं होतं......

काय यार ब्रो...... स्वतः तर एन्जॉय करत नाही मला तर थोडा एन्जॉय करू दे...... कशीबशी एक मुलगी बोलत होती माझ्यासोबत..... ते पण तुला बघवली नाही गेले..... राहुल राज जवळ येत बोलला

तुझा ब्रो खूप बोर आहे....... त्याला फक्त काम दिसते..... इथली हिरवळ त्याला दिसतच नाही....... तो स्वत आपण नाही बघत नाही आपल्याला पण नाही बघू देत...... चला एक प्रोजेक्ट तुमच्यासोबत डिस्कस करायचे आहे....रोहन राज चा केबिनमध्ये आले...

Guys..... ऑफिस मध्ये काम करतात......राज

राहुल तू  मेहता हॅन्ड ग्रुपच प्रोजेक्ट हँडल करणार आहेस..... हे फाईल घे आणि स्टडी करून घे.... रोहन तुला सगळे डिटेल्स समजावून सांगेल...... आणि हो आपला जो रॉयल रिम्स सोबतचा प्रोजेक्ट होता तो चांगलाच सक्सेसफुल झाला आहे त्यामुळे आपल्याला प्रॉफिट सुद्धा चांगलं झालं आहे तर हा प्रोजेक्ट ज्यांनी हँडल केला त्या टीमला बोनस पॉइंट्स ॲड करा.......राज

काँग्रॅच्युलेशन्स राज.....रोहन

ब्रो पार्टी तो बनती है..... राहुल खुश होत बोलला

एस.... राहुल बरोबर बोलतोय...... आपला स्टाफ खूप चांगलं काम करत आहे.... पार्टी तर द्यायला पाहिजे..... तेवढाच स्टाफ फ्रेश होतो आणि परत जोमाने कामाला लागतो..,..... ग्रंड नाही पण एक छोटीशी डिनर पार्टी करूयात.... काय म्हणतो राज.....रोहन

ह्म्म...... ठीक आहे मग उद्याच अरेंज करा..... बुक floor ऑफ हॉटेल सनशाइन... मिस लावण्या अरेंज करेल सगळं.... तिला सांगून द्या.....राज

ब्रो तूच का नाही सांगत..... बिचारी केवढे तुझ्या आजूबाजूला करत असते........ राहुल

शट अप .......... राज

*******

Wow......he is looking so handsom.....

आवाजाने लावण्याने वळून बघितले तर राज देणार जिथे अरेंज केला होता तिथला इंटरान्स मधून आत मध्ये येताना दिसला आणि त्याला बघूनच सगळा फिमेल स्टाफ त्याच्याकडे बघत होता...... लावण्याची पण नजर त्याच्यावर अडकली........

 

 

राजने ब्लॅक टी शर्ट... ब्लॅक ट्राउझर आणि त्यावर ऑरेंजीश ब्राऊन कलरचा ब्लेझर घातलं होतं....  हातात ब्लॅक बेल्ट रिस्ट वॉच.... हलकीशी शेव.... केसा वरती जेल ने सेट केले होते..... तो पहिल्यांदाच सगळ्यांसमोर कॅज्युअल लुक मध्ये आला होता..... सगळ्या मुली त्याच्याकडे बघत होत्या.......थोड्या वेळासाठी का होईना त्यांना सगळ्यांना नंदिनीचा खूप हेवा वाटत होता.... त्यातल्या त्यात ती नॉर्मल नाही आहे हे माहित असल्याने.... मुलींना बरीच होप होती......

 

                  

 

नंदिनीची आज बरीच चिडचिड सुरू होती..., ती त्याला पार्टीसाठी जाऊच देत नव्हती......पण पार्टी आपण स्वतः अरेंज केली असल्यामुळे आपल्याला थोड्यावेळासाठी तरी जायला पाहिजे म्हणून त्यांनी नंदिनीला कसंतरी समजावले होते आणि तो थोड्यावेळासाठी पार्टीमध्ये आला होता....

पार्टी आता रंगात आली होती.... ड्रिंक्स... डीजे.... डान्स आणि डिनर.......

बरेच कपल डान्स फ्लोअर वर डान्स करत होते.....
लावण्याला सुद्धा राज ला डान्स साठी विचारायची इच्छा झाली पण तिला माहिती होतं की तो येणार नाही म्हणून आधी ड्रिंक ऑफर करूया आणि मग डान्स साठी विचारू या असा विचार करून तिने त्याच्यासाठी एक ड्रिंक बनवले आणि त्याच्याजवळ द्यायला गेली....

Excuse me sir...this is for you...... लावण्या तिच्या हातातला ग्लास राजला ऑफर करत बोलली......... राज रोहन आणि राहुल ड्रिंक काऊंटर जवळ उभे होते...

थँक्स मिस लावण्या.... पण मी ड्रिंक नाही करत..... राज

Sir it's normal....and very small peg..... लावण्या राजला फोर्स करत बोलली..

सॉरी..... excuse me ....म्हणत राज तिथून बाकीच्या स्टाफ मेंबर ला भेटायला निघून गेला..... लावण्या त्याच्याकडेच बघत होती.....

तसा तर राज आधी कधी कधी ड्रिंक करायचा...... पण जेव्हापासून त्याचं नंदिनी सोबत लग्न झालं होतं तेव्हापासून त्यांनी ड्रिंकिंग सोडलेलं होत.....

He is so hot na..... राहुल

Yess...... लावण्या राजकडे बघत बोलली

डान्स करायसाठी विचारायचं होता ना.....राहुल
ह्म्म....लावण्या

अजिबात भाव देत नाही ना...... राहूल

That's the big problem...... लावण्या

मी ड्रिंक पण करतो आणि डान्स पण...... राहुल लावण्याच्या हातातला ग्लास घेत बोलला...

Sorry I am not interested in babies..... लावणी त्याच्याकडे बघून वाकडी इस्माईल केली आणि तिथून निघून गेली...

Baby.........ha............ राहुल डोळे मोठे करत बघत होता

Baby............रोहन मात्र जोर जोराने हसायला लागला...

पार्टी बरीच बाकी होती पण राज सगळ्यांशी बोलून तिथून लवकर निघून आला...... आज राज बराच थकला होता.... त्याला थोडे थकल्या सारखे झालं होतं.... बहुतेक थोडी कणकण असावी......

सगळे जेवणाच्या टेबल वर बसले होते...... नंदिनी मात्र रुसलेली दिसत होती......पार्टी मधून घरी येऊन राज लगेच फ्रेश होऊन जेवाय साठी टेबलवर येऊन बसला....... सगळे जेवत होते नंदिनी मात्र तशीच बसली होती....

नंदिनी काय झालं जेवत का नाही आहेस......राज

मला नाही जेवायचं..... तू मला का नाही घेऊन गेला..... मी नाही जेवणार.....नंदिनी

मी ऑफिसच्या कामाने गेलो होतो..... तुला सांगून गेलो होतो ना......राज

गप्पा नंतर करा आधी मुकाट्यानं जेवण करा......आजिसहेब

मला नाही आवडलं हे...... मला पास्ता पाहिजे......नंदिनी

जे बनवले आहे तेच जेवायचं ...उगाच नाटकं नको..... आजीसहेब

नंदिनी जेव  ...उद्या बनवू पास्ता.....आई

नाही..... मला आजच पाहिजे.....नंदिनी

नंदिनी.... हे काय आहे हट्टीपणा आम्हाला चालणार नाही..... मुकाट्याने जेवण करा.... आजी साहेब रागावल्या

नाही.... मला नाही जेवायचं...... नंदिनी आता भोंगा पसरला..

छायाताई थोडासा पास्ता बनवून द्या...राज ... राज ला माहित होतं ती हट्टाला पेटली म्हणजे कोणाचंच ऐकत नाही

नाही ....मला तूच बनवलेला पाहिजे....नंदिनी

नंदिनी आज छायाताई ला बनवून दे उद्या मी बनवून देतो.... आता मी खूप थकलो आहे.....राज

जा ....मला पास्ता पण नाही खायचा आणि जेवायचं पण नाही..... नंदिनी टेबल वरून उठात बोलली

हे काय नवीन आता...... तो थकून आलेला आहे..... एवढं सुद्धा कळत नाही का...... काही काळजीच नाही त्याची....... हे पाहिजे... ते पाहिजे... आत्ताच पाहिजे... सगळा फालतूपणा लावून ठेवलाय....... अशी नाटकं चालणार नाही..... जेवायचं असेल तर जेव्हा नाहीतर उपाशी रहा......आजी साहेब थोड्या रागातच बोलल्या..

कट्टी....... नंदिनी ने राज कडे बघितलं आणि रडतच आपल्या  रूममध्ये गेली

राज आधी जेवण करून घ्या..... फार लाडावून ठेवल आहे तुम्ही.........
राज तिच्या मागे जाणारच होता की आधी साहेब गराजल्या

राज ने जेवता जेवता छायाताई मला पास्ता बनवायचा साठी काही इन्स्ट्रक्शन दिले आणि  तिच्याकडून पास्ता बनवून घेतला...

राज तुम्ही तिला अतिशय लाडावून ठेवला आहे...... प्रसंग बघून हट्ट करायला पाहिजे..... तुम्ही इतका थकला आहात असा चेहरा सुद्धा उतरला दिसत आहे..... तिला समजायला पाहिजे..... काही काळजीच नाही तुमची...... तिच्याकडून अपेक्षा तरी काय म्हणा...... देव जाणे कधी समज येईल..........आजीसाजेब

अहो राज चा आजी..... कळेल हळूहळू...... आणि ती रोज थोडी करते असा...... काही अस्वस्थपणा वाटत असेल..... बाहेर क्लास मध्ये कोणी काही बोलल असेल.....आबा

घ्या तिची बाजू....... मला तर कळतच नाही तुम्हा सर्वांना काय चांगले दिसते तर तिच्यामध्ये......... हे एक यांचा तर जीव अडकलाय तिच्यामध्ये....... आणि तिला मात्र याची काहीच काळजी नाही...... आजीसाहेब

राज पास्ता घेऊन त्याच्या रूममध्ये गेला बघतो तर नंदिनी तिच्या खेळण्यातल्या गादीवर एका कोपऱ्यामध्ये रडत बसली होती

नंदिनी... हे बघ तुझ्यासाठी पास्ता करून आणला..... राज तिच्या जवळ जात बोलला

मला काहीच नको आहे ....मला जेवायचं नाही......नंदिनी

नको ना मनी असा हट्ट करू...... बघ तुझ्यासाठी बनवून आणला आहे......... खरंच थकलो पिल्ल्या आज खूप......राज

मी कट्टी आहे तुझ्याशी..... मला नाही बोलायचं तुझ्यासोबत..... कोणालाच मी आवडत नाही...... सगळे मलाच रागवतात........नंदिनी

असं नाही आई रे राजा..... सगळ्यांना तू किती आवडते..... तेथे क्लासमध्ये तुझे किती फ्रेंड्स आहेत..........राज

कोणालाच नको असते........ तुला पण मी आवडत नाही.......... नंदिनी रडत रडत बोलत होती
तिच्या बोलण्याने त्याला खूप वाईट वाटलं.....

असं नाही आहे.... कोण बोलला तुला........ माझी तर तू फेवरेट आहे....... मला तर तु खूप आवडते........ राज तिला जवळ घेत बोलला

नाही..... तुला पण मी आवडत नाही....... मला माहिती आहे तुला पण मी आवडत नाही...... नंदिनी त्याला आपल्यापासून दूर ढकलत बोलली.....

नाही रे सोन्या असं नाही आहे...... बरं तू पास्ता तर खाऊन घे.......राज

मला नाही खायचं......... मला भूक नाही आहे......नंदिनी

बरं जेव्हा भूक लागेल तेव्हा जेव...... ये आता झोपायला.....राज

मला नाही झोपायचं तुझ्याजवळ...... तु जा तिकडे......नंदिनी

नंदिनी ऐकत नाही बघून राज तिच्या दूर जाऊन बसला..... त्याला पण आज बरं वाटत नव्हते...... त्यामुळे तो पण तिच्या जास्ती मागे लागला नाही....... राज बेडवर पडल्या पडल्या तिच्याकडे बघत होता........ तिच्याकडे बघता बघता त्याला कधीतरी झोप लागली

नंदिनी रडतरडत तिथेच कोपऱ्यामध्ये झोपली........

थोड्या वेळाने राजला जाग आली बघतो तर बाजूला नंदिनी नव्हती..,..... नंतर त्याला आठवले की नंदिनी रडत-रडत तिथे कॉर्नरला झोपली आहे..... तो तिच्या जवळ गेला....... रडून-रडून तिचा चेहरा पार सुकला होता..... "मी तुला आवडत नाही"  तिचं हे बोलणं पण त्याच्या खूप जिव्हारी लागलं होतं....

कैसे बताये क्यूँ तुझको चाहें,
यारा बता न पाएं
बातें दिलों की,
देखो जो बाकी,
आँखें तुझे समझाएं
तू जाने ना…तू जाने ना…

मिलके भी हम ना मिले
तुमसे न जाने क्यूँ
मीलों के हैं फासले
तुमसे न जाने क्यूँ
अनजाने हैं सिलसिले
तुमसे न जाने क्यूँ
सपने हैं पलकों तले
तुमसे न जाने क्यूँ
तू जाने ना…तू जाने ना…

कसा सांगू तुला ...कसा कळेल....... I love you more than life....... राज चा डोळ्यात पाणी आले होते

त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.... आणि तो तिला उचलायला जाणार की त्यालाच अशक्तपणा जाणवला...... थोड्या त्याला गरगरल्यासारखे वाटले...... नंदिनी एकटी तिथे झोपून घाबरत म्हणून.. ... तो तिथेच खाली तिच्या बाजूला तिला मागूनच आपल्या कुशीमध्ये घेतले ......वारंवार त्याला मी तुला नाही आवडत वाक्य आठवत होते....त्याच मन खूप भरून येत होते....त्याने तिच्या केसांमध्ये मानेजवळ डोकं ठेऊन तिला घट्ट पकडून झोपला

सकाळी नंदिनी त्याच्यावर नाराज होती..... राज तिला समजावण्याचा बराच प्रयत्न करत होता.... पण त्याचा काहीच ऐकत नव्हती.....

आज    राजला थोडा ताप होता..,बरं वाटत नसल्यामुळे राज ऑफिसला गेला नव्हता...,. ब्रेकफास्ट करून जाणे मेडिसिन घेतले होते.... त्यामुळे त्याचा डोळा लागला...

थोड्या वेळाने त्याला जाग आली तर नंदिनी रूममध्ये नव्हती..... काय म्हणून आवाज आला म्हणून तो बाल्कनीमध्ये गेला तर नंदिनी एकटीच बाहेर बॉल खेळत होती....... तिला खेळताना बघून त्याला बरं वाटलं.... नाहीतर कालपासून ती रुसली होती...... तिला हसताना खेलानातन्ना बघून त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली आली

खेळता खेळता नंदिनी चा बॉल गेटच्या बाहेर गेला...... नंदिनी तो बॉल आणायला बोल च्या मागे मागे गेट चा बाहेर गेली...... राज वरून ते बघत होता..... आणि अचानक त्याच्या लक्षात आले की तिथे सिक्युरिटी गार्ड नाही आहे..., रस्त्यावरून बऱ्याच गाड्या जात होत्या......राज तसाच पळत पळत खाली आला..... आणि नंदिनी च्या मागे गेला..... बघतो तर नंदिनी रस्त्याच्या मधोमध एका लहान मुलाच्या मागे चालली होती..... एक गाडी खुप भर्धावपणे  समोरून येत होती त्याकडे तिचे लक्षच नव्हतं.......

नंदिनीsssss...... राज जोरात ओरडला आणि धावतच नंदिनी कडे गेला...... नंदिनीला त्याने उचलून धरले आणि वळला  आणि तेवढ्यातच........
धडाम....... बरीच लोक तिथे जमले....

******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️