नंदिनी...श्वास माझा 30

राजनंदिनी

भाग 30

राजssss....... बघून चाल ना.... तुटेल ना माझी पणती........

राज फोनवर बोलत त्याच्या रूम मध्ये येत होता तर त्याचा पाय तिथे कलर करून ठेवलेल्या एका पणति ला लागला....... आणि त्यावर नंदिनी ओरडली होती

तर असं कोणी रस्त्यात बसते काय...... आणि किती पसरून ठेवल आहे तू हे सगळं.........राज

तुला दिसत आहे ना मी काय करते आहे...... मग त्या पणत्या वाळावण्या साठी अशा दूर दूर ठेवावे लागतात ना........ तुला तर काहीच माहिती नाही..... नंदिनी डोक्यावर हात मारत बोलली..... राजला तिचे ते क्युट एक्स्प्रेशन बघून खूप हसायला आले....

नंदिनी रूम मध्ये दाराच्या पुढे मोकळ्या जागेमध्ये सगळ्या आणलेल्या पण त्या पसरवून बसली होती सोबतच वेगवेगळ्या रंगाच्या बॉटल पाणी असा सगळा पसारा तिने केला होता..,... एक एक पणती हातात घेऊन त्याला सुंदर रंग देत होती..... सगळ्या पणत्या खूप सुंदर दिसत होत्या....... त्या कलर करण्यात गुंतली होती खूप मन लावून ती पणत्या कलर करत होती........ ब्रश ने थोडाफार रंग तिच्या चेहरयाला सुद्धा लागला होता... दोन-तीन केसांच्या बटा तिच्या गालांवर  खेळत होत्या.... बाकीची वेणी थोडीफार विस्कटली होती...... पुढे येणार्‍या केस अधून मधून ती हाताने कानामागे करत होती आणि परत पण ती कलर करण्यामध्ये लक्ष घालत होती...,... ती खुपच क्युट दिसत होती.....आणि तो फोनवर बोलत बोलत तिलाच बघत होता त्यामुळे त्याच लक्ष नव्हतं आणि एका पणति ला त्याचा पाय लागला होता.....

सॉरी बाबा माझं लक्ष नव्हतं...... आपण हे सगळे एका साईडला करुया ...म्हणत एका पणति ला हात लावायला गेला.....

थांब... हात नको लावू तिला.....आत्ताच कलर केला आहे  त्या वाळल्या सुद्धा नाही आहे...... ....तू हात लावशील तर ती खराब होईल..... जस आहे तसच राहू दे...... बिलकुल हात लावायचा नाही ....उचलायच नाही काहीच....... तू बघून तीकडणे पलीकडून जा....... आणि मला डिस्टर्ब करू नकोस मला खूप काम आहेत....... नंदिनी नाटक की रागवत बोलली....

सॉरी सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं....... खरं आहे पूर्ण घरात तू एकटीच मला काम करताना दिसते आहेस.... कर हा आरामात...... तिचा हसरा चेहरा बघुन त्याला फारच गोड वाटलं होतं तो हसतच साईडला निघून गेला....

किती पण ऑफिस मधून थकून आलं.... कितीही काम झाले असले...... कितीही त्रासला असला.., तरी नंदिनीच गोड रूप बघून त्याच्या सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा....... तिच्यासोबत तो वेगळ्याच विश्वात असायचा जिथे थकवा.. टेन्शन... प्रॉब्लेम्स........ अशा कुठल्याच गोष्टी नसायच्या....

राज फ्रेश होऊन आला आणि त्या साईडला काऊच वर बसून सोबत आणलेल्या काही फाइल्स चेक करत होता.....

राज तुझं लॅपटॉप चं काम झालं आहे का...... मला थोडं काम होतं...... नंदिनी त्याच्या पुढ्यात जाऊन उभी बोलत होती.....

काय.....?..... लॅपटॉप तुला पाहिजे..... तुला माहितीये कसं वापरायचं ते....... राज आश्चर्यचकीत होऊन तिच्याकडे बघत बोलत होता

हो...... मला त्या श्वेता टीचरने शिकवलं ना...... आपल्याला त्यामध्ये काय पण बघता येते..... काही येत नसलं तर त्यातून बघून करता येते..... देना तुझं काम झालं असेल तर मला ओपन करून.....नंदिनी

Wow great....... ये बस इथे माझ्याजवळ.... ओपन करून देतो..... त्याला पण बघायचं होतं तिला काय काय करता येतं आणि काय करायचंय ते.... त्याने तिला लॅपटॉप ओपन करून दिला..

तिने डेस्कटॉप वर असलेल्या यूट्यूब च्या आयकॉन वर व्यवस्थित डबल क्लिक केले....... युट्युब ओपन झाले तीन एकर सर सर्च मध्ये नेले आणि काहीतरी विचार करत बसली....... राज ला खूप कौतुक वाटत होतं......इतक्या मध्ये कामाच्या बऱ्याच व्यापामुळे त्याने नंदिनी कडे नीट लक्ष दिले नव्हते त्यामुळे तिच्या मध्ये झालेले बदल त्याला तेवढे समजले नव्हते.......

विचार करता करता ती उठली आणि तिने एक पेन आणि पेपर आणला.......

राज पणती ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात...

लॅम्प......

राज मला या कागदावर लॅम्प डेकोरेशन दिवाळी लिहून दे ना इंग्लिश मध्ये.....नंदिनी

Not bad...... very nice.... मनातच म्हणत त्याने पेपर वर तिला सगळे स्पेलिंग लिहून दिले.... तिने ते युट्युब मध्ये टाकले आणि दिव्यांच्या डेकोरेशन खूप सारे त्यात व्हिडीओ आले.........आणि त्यातून एकेक व्हिडिओवर क्लिक करत ती पणती चे  कलरिंग डेकोरेशन बघत होती......

राज आता यावर सोपी रांगोली डिझाईन लिहून दे..... सोपी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हा इझी इझी रांगोली डिझाईन लिहून दे..... परत त्याने सेम तिने म्हटल्याप्रमाणे पेपरवर लिहून दिले......तिने ते सर्च केले आणि दोन-तीन रांगोळीचे डिझाईन तिने पेपर वर काढल्या.....

अरे वा तुला तर बरच काही माहिती आहे.......राज

हो अरे श्वेता टीचर ने सांगितलं काही आलं नाही तर इथे युट्युब मध्ये असे खुप सारे व्हिडिओ असतात ....जे पाहिजे आहे  ते टाकायचं म्हणजे आपल्याला त्याची  माहिती मिळते.... कसं करायचं ते सुद्धा समजते.. सगळे स्टेप्स दाखवतात........ आणि तुला माहिती आहे गुगल म्हणून पण असते..... त्यामध्ये आपल्याला याची माहिती पाहिजे आहे त्याचं नाव टाकलं की त्याची सगळी माहिती मिळत असते.......मला तिने वेगवेगळ्या फ्लावर्स बद्दल एनिमल्स बद्दल शिकवलं ना तेव्हा ती तिच्या लॅपटॉप मध्ये अशीच करत होती.......आणि तिने मला पण शिकवले मग मी पण असं सर्च करत होती पण मला स्पेलिंग नव्हते तर ती मला असं पेपरवर लिहून देत होती.......बरं घे तुझा लॅपटॉप... झाल माझ काम म्हणत ती तिथून पळआली आणि परत आपल्या पणत्यां मध्ये येऊन बसली.....

नंदिनी ने  सगळ्या पणत्या खूप सुंदर डेकोरेट केल्या होत्या....... नंदिनी ने घरातल्या सगळ्या कामगार मंडळींना बरच कामाला लावलं होतं...... अधून-मधून आजी रागवायची तर नंदिनी ने आम्हाला आपल्या हाताशी घेतलं होतं.....कुठे गडबड झाली की आबा मध्ये बोलले की सगळे काम होऊन जायचे... त्यामुळे नंदिनी आपल्या आवडीने त्यांच्याकडून डेकोरेशन करून घेतले होते....... ते त्यांना मोबाईल मधून फोटो दाखवून त्या सारखं करून घेत होती........ नंदिनीच्या उत्साहामुळे घरामध्ये चार-पाच दिवस आधीपासूनच सणाचे वातावरण निर्माण झालं होतं...... तरीसुद्धा आजी साहेबांच्या
डॅड चा रूमला आणि हॉल ला तिने हात लावला नव्हता..... बाकी सगळ्यांनी  आनंदाने तिला पाहिजे ते करू दिलं होतं........ सगळ्या बाल्कनी मध्ये आकाश दिवे लावले होते .....लाइटिंग लावून घेतली होती...... माळी काकांकडून   तिने बाजारातून खूप झेंडूची आणि शेवंती ची वेगवेगळ्या रंगाची फुले मागवली होती.....त्याची लांब लांब मोठी हार बनवून सगळ्या दारांना.. खिडक्यांना ...हॉलमध्ये गॅलरीला... आत मधल्या पायऱ्या ना .... हार लावून घेतले....... देवघराला तर तिने खूप छान सजवले होते..... घर अगदी नव्या नवरी प्रमाणे दिसत होते.. छाया काकींना सुद्धा तिने फराळामध्ये बनवायला बरेच नवीन नवीन पदार्थ सांगितले होते....... छाया काकींना बऱ्याच पदार्थांची रेसिपी येत नव्हती तर तिने राज कडून गुगलवर सर्च करून रेसिपीच्या प्रिंटआऊट काढून पाया काकींना नेऊन दिल्या होत्या.,.......राजनी सुद्धा नंदिनीला जे करायचं आहे ते करू द्या असं सगळ्यांना सांगितले होते त्यामुळे फार कोणी काही मध्ये बोलत नव्हतं.... आजी साहेबच अधून-मधून थोडीफार कुरबुर करत होत्या...... ते आबासाहेब नी राज बघून घ्यायचे....

नंदिनी उठ तिथून खूप गोंधळ करून ठेवला आहे तू.......आई आणि छाया काकी दोघे लाडू बांधत बसल्या होत्या त्यात नंदिनी मदत करते म्हणून बसली होती पण तिने सगळ्या गोंधळ घातला होता.......

आई एकच लाडू दे ना.......नंदिनी

नंदिनी आधी नैवेद्य दाखवायचा आहे.... नंतर तुला देईल......आई

छाया काकी प्लीज ssss.... एकच दे....नंदिनी

नंदिनी तुम्हाला सांगितलं ना आधी नैवेद्य दाखवायचा आहे.... का बर हट्ट करत आहात..... चला पळा इथून..... आजी साहेब गरजल्या.....

नंदिनी ताटातून दोन लाडू उचलले आणि ती पळायला लागली.... आजी साहेब तिच्या मागे लागल्या.....

नंदिनी चला ठेवा ते लाडू...... आधी देवाला नैवेद्य दाखवायचा..... आजी साहेब तिच्या मागे पळत होत्या... ती पुढे पुढे त्या मागे मागे..... तिला खूप मजा येत होती

खाली काय धिंगाणा सुरू आहे म्हणून राज बाहेर आला सोबतच बाबा सुद्धा बाहेर आले...

माझी आजी म्हणते.... मुले ही देवाघरची फुले ....लहान मुलांनी खाल्ल तर काही होत नाही.......नंदिनी

तुम्ही लहान आहात का.... एवढी मोठी घोडी झाला आहात.... आजीसाहेब

आबा बघा ना मला एक लाडू सुद्धा नाही देत आहेत..... नंदिनी आबांच्या गोल-गोल फिरत बोलली साहेब सुद्धा तिच्या मागे त्यांच्या गोल-गोल फिरत होत्या......

अग पण तू तर दोन लाडू घेतलेस ना.....आबा

हो एक माझ्यासाठी आणि एक राज साठी......नंदिनी

अच्छा ठीक आहे मग...आबा

आणखी लाडावून ठेवा यांना........ नुसता गोंधळ घालून ठेवला आहे घरामध्ये........ किती तो आरडाओरडा चालला आहे मघापासून.....आजिसहेब

अहो किती वर्षांनी आज घरामध्ये दिवाळी असल्यासारखा वाटत आहे..... लहानपणी राज करायचा हट्ट त्याच्यानंतर कोणीच केला नाही....... आबा

सून आहे ना त्या..... जरा तरी सूने सारखं वागावं.......आजिसहेब

अहो ज्या घरा मध्ये लेकी सुनांचा हसण्याचा खेळण्याचा आवाज फिरतो ...त्या घरांमध्ये वास्तुदोष अजिबात नसतो..नाहीसा होतो...... त्या घरामध्ये लक्ष्मी सुख समृद्धीचा वास असतो........ आज किती वर्षांनी घर असं हसतखेळत वाटत आहे....... म्हणून म्हणतो घरात एक तरी मुलगी असावी..... घर बोलक होते...... नंदिनी मुळे माझी मुलगी नसण्याची सुद्धा इच्छा पूर्ण झाली आहे........आबा

रितीभाती काही पाळू नका.....करा काय करायचं ते.... आजी नाराज होत सोफ्यावर जाऊन बसली..

नंदिनी लाडू खाणार तेवढ्यात राजने तिचा हात पकडला.....

नंदिनी........ आजी साहेब सांगतात आहे ना ते ऐकायचं राजा....... आता तू मोठी होत आहेस होना..... आपल्या काही रितीभाती आपल्या चांगल्यासाठीच बनवलेल्या असतात..... त्याचे आपण पालन करायचे....... जसे तू घर सुंदर सजवलं....... किती छान दिसते बघ.... तसंच आपल्याकडे देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण काही खात नसतो... हो ना...... मग उद्या सकाळी नैवेद्य दाखवला की पहिला लाडू तुला......राज

नंदिनी ने मान खाली घालत लाडू परत नेऊन ठेवले...,. पक्का मला उद्या देशील...... प्रॉमिस....नंदिनी

पक्का प्रॉमिस.....राज

रात्रीचे जेवण आटोपून सगळे आपापल्या खोल्यांमध्ये आराम करायला निघून गेले...

नंदिनी च मात्र अजूनही सजावटीचं काही नाही राहिलं होतं ती घरात फेरफटका मारत होती....

ये राज मला ते पायाला लावायचं तेल बनवून दे ना...... राज काम करत बसला होता ..

काय झालं नंदिनी.....राज

मला ते तिला मध्ये काय काय टाकून तेल गरम करून बनवत असतात ना ... काही दुखलं की लावण्यासाठी...ते तेल बनवून दे ना.....नंदिनी

काय झालं तुझे पाय दुखत आहेत का...... कंटिन्यू मस्ती करत असतेस.... तरी सांगत असतो थोडा आराम कर आराम कर..... पण ऐकेल ते नंदिनी कुठे.....राज

माझे नाही आजी साहेबांचे दुखत आहेत..... खाली त्या आपले पाय दाबत बसले आहेत....नंदिनी

मला नाही येत ते तेल बनवता......राज

तिकडे गावाला आजीला फोन कर ना ते सांगेल तुला.... आबांचे पाय दुखत असते की ती तसंच करून त्यांना लावले तर ते लवकर बरं वाटते मग त्यांना....नंदिनी

बरं ......राज

राजने तिकडे गावाला आजीला फोन केला आणि नंदिनीला तेल बनवून दिले.....

नंदिनी एका वाटीमध्ये तेल घेऊन आजीसाहेबांच्या रूम मध्ये घाबरत घाबरतच गेली.....

या आता काही बाकी राहिला आहे का... दिवसभर एवढ पळवलं आता सगळे पाय दुखुन राहिले..... आजी साहेब चिडचिड करत बोलत होत्या....

आजी साहेब ते.....नंदिनी

चला आता आमचं डोकं खाऊ नका ....जाऊन झोपा... आजीसहेब

ते काय बोलताय ते ऐकून तर घ्या....आबा

राज मात्र बाहेरूनच दुरून बघत होता...... तिचे नाते संबंध तिलाच हँडल करू द्यावे.... तिचा प्रयत्न तिलाच करू द्यावा...... म्हणून तो त्यांच्यामध्ये पडला नव्हता...,

बोला काय काम आहे.....आजिसहेब

ते मी हे पायाला लावायचं तेल आणला आहे...... तर तुमच्या पायाची मालिश करून देऊ का .....तुमचे पाय खूप दुखत आहेत ना....... नंदिनी

काही नको चला जा तुम्ही...... आणि तुम्हाला मालिश तरी करता येत का..... आजीसाहेब

हो तिकडे घरी आबांचे कधी आजीचे पाय दुखत होते तर मी त्यांना पायाला तेल लावून देत होते.....तुमचे पाय खूप दुखत असेल तर तुम्हाला रात्री झोप नाही लागणार..... मी थोडसं लावून देते.....नंदिनी

अहो ती म्हणते तर लावून घ्या तसे पण तुमचे मगापासून पाय खूप दुखत आहेत.... उगाच मग पेन किलर घ्यावी लागते....आबा

काहीतरी विचार करून आजी साहेब तिला तेल लावू देते...

कोणी बनवून दिले तुला हे तेल.....आबा

राज ने...... नंदिनी आजी साहेबांच्या पायाची मालिश करत बोलली...... ते खूप मन लावून मालिश करत होती...

आबांना बाहेर राज उभा दिसला.... ते सुद्धा उठून बाहेर गेलेत.....

दिवसभर तुझी आजी नंदिनीच्या मागे पडली असते..... नंदिनी मात्र सर्व विसरून जाते...... खूप प्रेमळ आहे नंदिनी...... तिला सगळ्यांचीच काळजी असते..... खरं सोनं आहे........... आबा राज चा पाठीवर थोपटत बोलत होते

राजने त्यांच्याकडे बघून एक छोटीशी स्माईल केली....

तिची आठवण परत येईल की नाही माहिती नाही..... पण तुला नक्कीच खूप जीव लावेल....... तुला आयुष्यभर साथ देईल ती....... तुझं तर जीवापाड प्रेम आहेस तिच्यावर.... पण ती सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे..... एवढेच की तिला ते कळत नाही आहे....छान जीवन साथी निवडली आहेस तू...... कोणाकडून  कसलीच अपेक्षा नाही तिची..... निरागस निस्वार्थ प्रेम आहे तीच आपल्या सगळ्यांवर..... फॅमिली म्हणजे काय असतं तिला कळते..,.... थोडी वाट बघावी लागेल पण होईल सगळं नीट....,....आबा

हो आबा मी तिची माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघू शकतो..... मला कशाची  काही घाई नाही.... तिची मेमरी परत नाही आली तरी...  ..ती जशी आहे तशीच मला हवीहवीशी आहे......राज

खुश राहा बाळा.....आबा

नंदिनी बस पुरे आता ....बघ आजी  झोपले सुद्धा....आबा आत मध्ये येत बोलले..

हो झालं...... गुड नाईट आबा....... नंदिनी वाटी किचन मध्ये नेऊन ठेवली..

राज माझे पाय खूप दुखत आहेत..... मला आता चालायला सुद्धा होत नाही आहे... मी आता कशी जाऊ वरती रूम मध्ये....... नंदिनी राज जवळ येत नाटकी सुरात बोलत होती.....

हा हा हा...... लाडोबच्या अंगात आल वाटते आता.......राज

राज मला उचलून घेऊन चल ना......नंदिनी

लाड करून घ्यायचे आहेत बाकी काही नाही....... चला....त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर कुशीमध्ये उचलून घेतलं...... तिने त्याच्या गळ्यात हात घालुन त्याला घट्ट पकडले होते....  पायऱ्यांवरून तो तिला वरती आणत होता...... तेवढ्या वेळात ती त्याच्या छातीवर डोकं ठेऊन झोपली सुद्धा होती.,......

********
आज धनत्रयोदशी.....

नंदिनी राजला हलवत हलवत उठवत होती...

नंदिनी अजुन खुप वेळ आहे झोप बर... राज बाजूला ठेवलेल्या मोबाईल मध्ये बघत बोलला.....

राज उठ ना..... आज दिवाळी आहे ना......नंदिनी

नंदिनी थोड्यावेळ झोप कोणी उठले नसेल..... चारच वाजले आता......राज

बरं मला तयार करून दे मग तू झोप....... आबा माझी वाट बघत असतील खाली......नंदिनी

नंदिनी आंघोळ करून आणि राजने तीला तयार करून दिले आणि तो परत डोक्यावर उशी घेऊन झोपला......

आई... काकी आणि आबा उठले होते......

नंदिनी बाहेर छाया काकी च्या मदतीने सुंदर रांगोळी काढली त्यात रंग सुद्धा  भरले......

धनत्रयोदशीच्या दिवशी पूजाअर्चा प्रसाद छान झाला वातावरण अगदी प्रसन्न झाले होतं....

****
आज नरक चतुर्दशी...

उठा उठा दिवाळी आली..... मोती स्नानाची वेळ झाली
उठा उठा दिवाळी आली..... मोती स्नानाची वेळ झाली....

नंदी नीने राजला उठवलं......

नंदिनी.........राज झोपेतच बोलत होता

राज आज उठावंच लागते..... आज मी तुझं काही ऐकणार नाही........ आज लवकर आंघोळ करायची असते..... सूर्य यायच्या आधी...... उठना आता..... तसं पण मी तुला  झोपू देणार नाही आहे....नंदिनी

फ्रेश होऊन नंदिनी खाली गेली.......

उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली
उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली....

म्हणत तिने प्रत्येकाच्या रूमचे दार ठोकले होते आणि सगळ्यांना उठवलं होतं....

खाली आई आणि काकी अभ्यंगस्नानाचे तयारी करत होत्या...... नंदिनी ने सुद्धा त्यांना मदत केली....

आरतीचा ताट.... सुगंधित उटणे...... चौरंग चौरंगाच्या भोवती सुंदर रांगोळी त्याभोवती दिवे...... पहाटेचे चार वाजताच वातावरण...... ते सगळं फारच मनभावक दिसत होतं.....

सगळे फ्रेश होउन खाली आलेत....... आईने काकीने आजीने सगळ्यांचे औक्षण केले....... सुगंधित उटणे.... तेल उदबत्त्यांचा फुलांचा सुवास घरभर दरवळला होता..... सकाळच पहाटेच ते वातावरण खूप प्रसन्न झाले होते.... सगळ्यांनी अभ्यंगस्नान केले........

नंदिनी बाहेर रांगोळी काढत होती.... सगळीकडे दिवे ठेवले होते

राज तयार होऊन खाली आला आणि बाहेर नंदिनी रांगोळी काढत होते तेथे गेला..... नंदिनी रांगोळी काढण्यात खूप मग्न होती..... आज बऱ्याच दिवसानंतर ती ट्रॅडिशनल ड्रेस घालून तयार झाली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत होती,.. राजनी आपल्या मोबाईल मध्ये तिचे काही छान छान फोटोज केले..... तेवढ्यात राहुल सुद्धा तयार होऊन बाहेर आला.....

ब्रो तुझ्या बायकोवर ना टीव्हीचा फारच जास्त असर होतोय हा...... तुला माहिती सकाळी सकाळी ती मला उठवायला आली आणि काय म्हणत होती माहिती....

उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली
उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली

हाहाहाहा.....राज

सकाळी सकाळी उठावं लागलं ना....... जोपर्यंत दार उघडलं नाही तोपर्यंत ती ठोकतच होती..... भयंकर हुशार झाली आहे तुझी बायको......राहुल

हाहाहाहा...... तुझी वहिनी........ मला पण सकाळी सकाळी असा त्रास दिला आहे तिने....... आणि आता चार-पाच दिवस तयार च राहा हे असच होणार आहे........ भयंकर दिवाळी अंगात आली आहे तिच्या...... राज हसतच बोलत होता...

पण काही बोल...... यावर्षी मात्र दिवाळीला जाम भारी वाटतंय घरात......... खूपच जास्त पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आहे...... घर कसलं सजवले भाई..... नाही म्हणजे दरवर्षी पण आपण खूप डेकोरेट करत असतो... पण ते सगळं बाहेरून करून घेतो..... यावर्षी नंदीने आपल्या आवडीने करवून घेतले.....  घराला घरपण जाणवत आहे... सकाळी उठायला थोडा कंटाळा वाटला होता पण बघ आता खूप फ्रेश वाटते आहे.....राहुल

ह्म्म.... बघ आता पुढे अजून काय काय बघायला मिळतं....राज

सकाळी देवाची पूजा करून सगळ्या फराळाचा नैवेद्य दाखवला ......आणि मग सगळ्यांना फराळाची फ्लॅट मिळाली ती बघून नंदिनी फारच खुश झाली.......कधी कधी तिला फराळाचं बनलेल्या खाते असं झालं होतं..... दोन दिवसापासून तिने फारच आतुरतेने वाट बघितली होती...

सगळे एकत्र बसून गप्पा गोष्टी करत फराळ करत होते.....

राहुल छान छान गाणी लावना...... तिकडे आबा रेडिओवर सकाळी मस्त गाणी लावतात खूप छान वाटते......

जो हुकूम मेरे आका मनात राहुल उठला आणि त्याने सॉफ्ट म्युझिक सुरू केले.........पहाटेच ते मनमोहक वातावरण अगदी वर्षांनुवर्षे मनात राहील असे झाले होते......

*******

आज लक्ष्मीपूजन......... संध्याकाळची वेळ झाली होती..... लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी झाली होती...... घर लाइटिंग आणि दिव्यांनी दिमाखात उभे होते.......

आत मध्ये तर डोळे दिपवून टाकणारा सौंदर्य होते...... आज आई आणि काकीने तर घराचं मंदिर केलं होतं....

नंदिनी ने  कलर केलेले दिवे दिमाखात तेवत होते......

सगळे ट्रॅडिशनल गेटअप तयार झाले होते.... राजनंदिनी सुद्धा काही कमी दिसत नव्हते...राज ने नंदिनी ला खूप सुंदर तयार केले होते की जणू काही लक्ष्मीच रूप दिसत होती....

नंदिनी रेड कलरचा गोल्डन बॉर्डर असलेला फ्लॉवर लेन्थ ट्रॅडिशनल वन पीस त्यावर वन साईड रेड कलर चे गोल्डन बॉर्डर असलेली ओढणी घेतली होती....... गळ्यात नेकलेस.... कानात जरा मोठे इयरिंग्स ..... हातात गोल्डन बांगड्या.....केसवर बांधून त्यावर गजरा लावला होता.... आणि कपाळावर नेहमीची तिची छोटी चंद्रकोर आणि त्याखाली ड्रेसला मॅचिंग अशी छोटी टिकली लावली होती.......

राजने तिला कॉम्प्लिमेंट करेल असा ट्रॅडिशनल फिटींगचा नेहरू कोट पॅटर्न असलेला एकदम लाईट निळा त्यावर रेड फ्लावर्स असलेला ड्रेस घातला होता....... दोघे एकदम लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत होते.....

आजीसाहेब नी आबा पूजेवर बसले होते.... मनोभावे लक्ष्मीपूजन झाले.... आबांची इच्छा होती की आता घरात आलेल्या नवीन जोडप्याने पूजेवर असावे पण घरात सगळ्यांची इच्छा होती की दरवर्षी दिवाळीची पूजा आजिसहेब आणि आबा करतील.... त्यामुळे दरवर्षी आजी साहेब आणि आबाच पूजा करायचे....

नंदिनी ने आठाऊन आठवून 7   8 आरत्या गायल्या होत्या तिच्या सोबत बाकी सगळे सुद्धा तिच्या सुरात सूर मिसळत होते........ नंतर राजनंदीने सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला आणि प्रसाद वाटला.....प्रसाद वाटता वाटता बराच प्रसाद तिनेच फस्त केला होता.....

सगळ्यांनी एकमेकांसोबत फोटो काढले....काही फॅमिली फोटो सुद्धा काढलेत.....

राहुल ने नंदिनी राज चे कपल फोटो क्लिक केले....पण एका ही फोटो मध्ये नंदिनी सरळ उभी नवहती.....तिने वेडेवाकडे तोंड करून सगळे फोटो बिघडवले होते...... राहुल तिचे नखरे बघून त्रसल होता.....

भाई I am done..... तूच काढत बस आता....राहुल दुसरीकडे गेला

नंदिनी आता नीट उभी रहा.... शहाण्या मुलीसारखं.... मला आपली एक तरी selfie घेऊ दे......राज आणि त्याने तिला घट्ट पकडले ..तिला आता हलता येत नव्हते.....गोड हस बघू आता......ती हसली आणि त्याने पटकन एक selfie काढला .....

राज फटाके उडवू......नंदिनी

फटाके उडवणे चांगलं नसते नंदिनी......राज

सगळेच तर उडवतात....... तो ना एकदम आबा पॅटर्न झाला आहेस.... म्हातारा झाला तू ... सतत नाही नाही नाहीच म्हणत असतो......नंदिनी

तसं नाही नंदिनी..... अगं त्याच्या धुरामुळे वातावरण खराब होते...... त्याच्या धुराचा बऱ्याच लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो...... प्राणीमात्रांना त्याचा त्रास होतो....... म्हणून मी नाही म्हणतो......राज

नंदिनी चल आपण फटाके उडाऊ..... त्याच काय ऐकत असते.......राहुल

राज फक्त दहाच......नंदिनी

नो.......राज

8.......नंदिनी

नो.......राज

नंदिनी चल तो ऐकणार नाही आहे...... राहूल

राहुल तुला माहिती आहे ना ती राज ची परमिशन घेतल्याशिवाय काही करत नाही..... घेऊ दे तिला परमिशन.....आबा

अरे पण राज कधीच फटाके उडवत नाही ना...... तो नाही देणार....राहुल

दिल्ली बघ ती नंदिनी पटवते व्यवस्थित.... आबा हसत बोलले

7......नंदिनी

नो....राज

राज असा काय करतो प्लीज..... मी एक चॉकलेट नाही खाणार........... मी मॅथचा अभ्यास करणार........ बरं मी योगा टीचर चा सगळा ऐकणार. ...... प्रॉमिस....... मला उडवायचे ना फटाके....... नंदिनी राज ला पटवत होती...

तिचं पटावन बघून राजला हसायला आलं......

बरं फक्त पाच उडवायचे....... आणि ते पण साधी वाले..... मोठ्या आवाजांची नाही......ठीक आहे.......राज

Yipieee....... नंदिनी उड्या मारतच राहुल कडे गेली......

नंदिनी नीट काळजी घे.......राज

हो sss.....

राहुल सोबत तिने  मोजून पाच फटाके उडवले...... राहुलने तिला जास्त फटाके उडवण्यासाठी म्हणाला पण तिने पाच म्हणजे पाचाच उडवले.......

फटाके उडवताना चा तिचा चेहऱ्यावरचा आनंदराज टिपत होता त्याने काही फोटो त्याच्या मोबाईल मध्ये सुद्धा काढून घेतले......

भाई धन्य आहात तुम्ही नवरा बायको... अगदी मेड फॉर इच अदर........ राहुल राज समोर हात जोडत बोलला..... त्याला तसं बघून आबा हसायला लागले...

नंदिनीचा खूप विश्वास आहे तुझ्यावर........ तिला मी पाच पेक्षा जास्त फटाके उडवायला बोललो तर तिने साफ नकार दिला.....मी तिला किती फोर्स केला तरीसुद्धा ती आली नाही.......राहुल

त्याचं बोलणं ऐकून राजने समाधानाची स्माईल दिली..... आणि माझा सुद्धा तिच्यावर खूप विश्वास आहे.......राज

******

क्रमशः

🎭 Series Post

View all